Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये;पार पडला दिमाखदार केरळ महोत्सव !

Date:

पुणे- शहर व जिल्ह्यातील केरळवासियांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही 34 व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवार दि. ४ सप्टे. रोजी सायं. ५.३० वाजता केरळ महोत्सव साजरा  झाला . यंदा या महोत्सवाचे २५वे वर्ष आहे . यानिमित्त केळीचे खुंट, नारळाच्या झावळ्या, तोरण व  फुकलम(फुलांची रांगोळी) यांनी बालगंधर्व रंगमंदिर सजवले गेले होते . दीपप्रज्वलन करून केरळ महोत्सवची सुरुवात झाली.

केरळ महोत्सवात पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचा विशेष सत्कार पुणे मल्याळी फेडरेशनचे चेअरमन राजन नायर  यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे फेस्टिव्हलमध्ये सलग २५ वर्षे केरळ महोत्सव होत असून त्याबद्दल आनंद व कृतज्ञता राजन नायर यांनी व्यक्त केली आणि ते पुढे म्हणाले की,महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांच्यामध्ये कला संस्कृती नृत्य गायन या द्वारे प्रेम बंधुत्व वाढविण्याची शिकवण व प्रेरणा पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडींनी आम्हाला दिली त्या बद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.

याप्रसंगी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील हेही उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की महारष्ट्रात पर्यटन विकासाला मोठी चालना मिळाली असून पुणे फेस्टिव्हल सारख्या मोठ्या सांस्कृतिक महोत्सवामुळे पर्यटनवाढीस मदत होते. या प्रसंगी  सौ मीरा कलमाडी,  पुणे मल्याळी फेडरेशनचे को – ऑर्डिनेटर बाबु नायर,  पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल ,मुख्य संयोजक डॉ सतीश देसाई, काका धर्मावत ,मोहन टिल्लू ,श्रीकांत कांबळे उपस्थित होते.   

 भरतनाट्यम, कथकली, कुचीपुडी, मोहिनीअट्टम, फ्युजन डान्स, क्लासिकल डान्स, कैकोटीकली, मार्गमकली आदी नृत्य प्रकारांद्वारे मल्याळी संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या केरळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे जिल्ह्यात ४.५ लाख केरळवासीय राहत असून त्यांच्या 32 संस्थांच्या पुणे मल्याळी फेडरेशनचे चेअरमन राजन नायर आणि कॉ-ऑर्डिनेटर बाबू नायर यांनी याचे आयोजन केले होते . यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्व धर्मियांचा एकोपा दाखवणारे नृत्याविष्कारांनी प्रेक्षकांना विशेष आनंद दिला . या सर्व कार्यक्रमांमध्ये २५० केरळी युवक व युवती कलावंत सहभागी झाले होते.

 या कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने झाली. महाबली असुर यांची कथा नृत्यातून सादर झाली . केरळमधील नद्यांमध्ये होड्यांचा वापर  होत असतो. त्याचे दर्शन वल्लमकली नृत्यातून सादर केले गेले. या कार्यक्रमात फ्युजन ऑफ सिनेमॅटिक डान्स आणि महाराष्ट्राचा लोककलेशी जोडणारी लावणी देखील सादर गेली.

देशाच्या स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केरळसह विविध राज्यांच्या संस्कृतीशी निगडीत छोटे बहारदार नृत्य कार्यक्रम हे देखील आकर्षण ठरले. हा सर्व कार्यक्रम धर्म, जात, भाषा, प्रांत, भेद बाजूला ठेऊन ‘भारत एक देश’ ही संकल्पना रुजवणारे होते. केरळपासून दूर राहणाऱ्या केरळवासीय युवा पिढीला केरळ संस्कृतीचे दर्शन व ओळख यातून प्रभावीपणे झाले तसेच महाराष्ट्रासारखी कर्मभूमी व केरळ सारखी मातृभूमी यांच्यात बंधूभाव वाढावा असाही प्रयत्न यातून केला गेला होता .

समाजातील गरीब, गरजू, अपंगांना पुणे मल्याळी फेडरेशनतर्फे दरवर्षी सातत्याने अर्थसहाय्य व अन्य मदत केली जाते. फेडरेशनतर्फे चर्चेस, आयाप्पा मंदिर व मशीदही उभारली असून शाळा व महाविद्यालय देखील संस्थेतर्फे उभारण्यात आली आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही केला? अखेरीस पुणे पोलिसांना हाय कोर्टानेही केला सवाल

पुणे-मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का...

गांजा विक्री करणा-या तरुणीला केले जेरबंद

पुणे- मुंढवा येथील एका गांजा विकणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला...

सदाबहार गीतांनी रसिकांची सायंकाळ ‘हसीन’

पुणे : धर्मेंद्र यांच्याविषयीचे किस्से आणि त्यांच्यावर चित्रित झालेल्या...

सैनिक कल्याण विभागात सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पद भरती

पात्र उमेदवारांनी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे, दि. 10...