पुणे – ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिले वर्ल्ड रेकॉर्ड केले तेव्हा मला बोलावले, मी आलो त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. आता दुसरे रेकॉर्ड करत आहे, त्यावेळी मला बोलावले, त्यावेळी मी उपमुख्यमंत्री आहे. आता तिसरे रेकॉर्ड केले आणि मला बोलविले तरी मी पुन्हा येणार नाही,’ असे बोलत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मिस्किल भावना येथे व्यक्त केल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने स्वांतत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वराज्य महोत्सव’ आणि ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमातंर्गत युवा संकल्प अभियानांचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. यावेळी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ‘विद्यापीठ हे केवळ शिक्षणामुळे ओळखले जात नाही, तर शिक्षणाबरोबरच ज्ञानाधारित समाजनिर्मितीमध्ये विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची असते. शिक्षणातून ज्ञानाकडे वाटचाल होणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, ‘भारत हा विश्व गुरू होईल’’, त्याची वाटचाल आता सुरु झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिले वर्ल्ड रेकॉर्ड केले तेव्हा मला बोलावले, मी आलो त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. आता दुसरे रेकॉर्ड करत आहे, त्यावेळी मला बोलावले, त्यावेळी मी उपमुख्यमंत्री आहे. आता तिसरे रेकॉर्ड केले आणि मला बोलविले तरी मी पुन्हा येणार नाही,’ असं बोलताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र, भाषण संपवताना फडणीसांनी आपल्याच विधानावरून यू टर्न घेतला. पुढच्या कार्यक्रमालाही मला बोलवा, मी कोणत्याही पदावर असलो तरी नक्की येईल, असे म्हणत फडणवीनी सारवासारव केली.
विद्यापीठ हे केवळ शिक्षणामुळे ओळखले जात नाही. तर शिक्षणासोबत ज्ञान वाटप झालं पाहिजे. आपल्याला शिक्षणाकडून ज्ञानाकडे वाटचाल करायची आहे. आम्ही ५० कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला होता. त्यामुळे हरित पट्टा वाढला. त्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा मोठा वाटा होता.
तरुण पिढीवर भाष्य करताना फडवणीस म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की, ‘भारत हा विश्व गुरू होईल, त्याची वाटचाल आता सुरू झाली आहे’. हे तरुण पिढीला समोर ठेवून पंतप्रधान मोदी बोलतात. आपण सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. आमची युवा पिढी तिरंगा घेऊन सेल्फी घेऊन फोटो अपलोड करेल. याची नोंद गिनीज बुकात घेतली जाईल. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे’.
‘तरुणाई ज्याच्या पाठिशी उभी राहते, ते सर्व यशस्वी होते. राष्ट्रभक्त समाज ज्या देशात असतो, तो देश पुढे जातो. त्यामुळे आपला देश पुढे जात आहे. देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत. १०० व्या वर्षी आम्ही काय करणार यावर मोदी काम करत आहेत. असेही ते म्हणाले.