३५०० कोटींत खारट पाणी गोड!

Date:

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितित चर्चेविना प्रस्ताव मंजूर

मुंबई : समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्यासाठी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्याचा पालिके ने घाट घातला आहे. या प्रकल्पातून दररोज २० कोटी लिटर पाणी मिळेल असा दावा प्रशासनाने के ला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर झाला. यासाठी इस्रायलमधील एका कं पनीने पालिकेला या प्रकल्पाबाबत प्रस्ताव दिला आहे. त्यावरून पालिके ने आता हा तब्बल साडे तीन हजार कोटींचा प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले आहे. त्याकरिता मनोरी येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत उपलब्ध असलेल्या १२ हेक्टर जागेवर संयंत्र उभारले जाणार आहे.

मुंबईला दररोज सात धरणांतून ३८० कोटी लिटर पाणीपुरवठा के ला जातो. मात्र एखाद्या वर्षी पाऊस कमी पडल्यास मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागते. त्यातच येत्या काळात मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणीही वाढणार आहे. त्यामुळे पालिके ने गारगाई पिंजाळ हे धरण प्रकल्प हाती घेतलेले आहेत. मात्र या प्रकल्पांना अद्याप वेग आलेला नसताना आता पालिके ने समुद्रापासून गोडे पाणी तयार करण्याचा प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले आहे. शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अट्टहासामुळे पालिके ने हा प्रकल्प हाती घेतल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम इस्त्रायली कं पनीला देण्यात येणार असून त्याकरिता पालिका साडे पाच कोटी रुपये देणार आहे. तसेच मसुदा निविदा बनवण्यासाठी ४० लाख रुपये दिले जाणार आहे. मात्र प्रकल्प रद्द झाल्यास हे पैसे कं पनीने पालिके ला परत करायचे आहेत.

कोणत्याही प्रकल्पासाठी निविदा मागवून लघुत्तम निविदाकाराला काम देण्याची पद्धत पालिकेत प्रचलित आहे. मात्र या प्रकल्पासाठी इस्त्रायली कं पनीला मूळ सूचक म्हणून नेमले आहे. राज्य शासनाच्या अधिनियम ‘महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एनेब्लिंग ऑथोरिटी अ‍ॅक्ट’नुसार या कं पनीने हा प्रस्ताव सादर के ल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या कायद्यांतर्गत अनाहूत प्रस्ताव सादर करण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहे. त्यानुसार हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर बांधला जाणार आहे.

  • प्रकल्पाची वैशिष्टय़े

’ दर दिवशी २० कोटी लिटर पाण्याचे नि:क्षारीकरण करता येणार, त्याचा विस्तार ४० कोटी लिटपर्यंत करता येणार.

’ या प्रकल्पासाठी ६ हेक्टरची जागा आवश्यक असून विस्तार के ल्यास ८ हेक्टर जागेची गरज

’ सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यास ८ महिने व प्रत्यक्ष बांधकामास ३० महिने कालावधी लागू शकतो.

’ या प्रकल्पाचा ढोबळ अंदाजित खर्च ३५२० कोटी इतका आहे. त्यात १६०० कोटी भांडवली खर्च व १९२० कोटी हा प्रचालन व परिरक्षण खर्च आहे.

’ शुद्ध पाण्याच्या प्रति किलो लिटरसाठी सुमारे ताशी ४ किलोवॅट इतक्या विजेच्या आवश्यकता आहे. हा विजेचा खर्च महापालिका देणार आहे.

निवडणुकीसाठीची घोषणा

हा प्रकल्प म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून के लेली घोषणा आहे. आदित्य ठाकरे यांच्या हट्टापायी या प्रकल्पाचा घाट घातला आहे.

मुंबईत भरपूर पाऊस पडतो, त्यामुळे पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठीच्या योजना पूर्ण कराव्यात, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे रवी राजा यांनी दिली आहे.

  • काल्पनिक प्रकल्प.

हा प्रकल्प पूर्णपणे काल्पनिक असून तो प्रत्यक्षात येणे कठीण आहे. पालिके चे पैसे वाया घालवणारा हा प्रकल्प आहे. त्यापेक्षा सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा जो पालिके चा प्रकल्प आहे त्याचेच योग्य नियोजन केले तर १०० कोटी लिटर पाणी मिळू शकणार आहे, अशी प्रतिक्रिया समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी व्यक्त के ली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रायफल शूटिंगमध्ये अप्रतिम आशिष ढेंगे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पुणे- इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अप्रतिम आशिष ढेंगे...

मुसळधार पावसाने दुबई ची तुंबई….विमानोड्डाणं रद्द…..प्रवाशी अडकले….

दुबईला गेलेले भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले .... पुणे- गेली...

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...