पुणे :
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) ला ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’(एन.आय.आर.एफ) मध्ये पुण्यात प्रथम, राज्यात 4 था तर देशात 40 व्या क्रमांकाच्या महाविद्यालयाचे मानांकन मिळाल्याबद्दल भारती विद्यापीठ विश्व विद्यालयाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते डॉ. सचिन वेर्णेकर (भारती विद्यापीठ विश्व विद्यालय व्यवस्थापन शास्त्रशाखेचे अधिष्ठाता आणि ‘आय एम ई डी’चे संचालक) आणि सहकार्यांचा सत्कार करण्यात आला.
भारती विद्यापीठ विश्व विद्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त हा सत्कार करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, माजी कुलगुरू डॉ.एस.एफ.पाटील आदी मान्यवर आणि एनआयआरएफ चे सदस्य उपस्थित होते.
डॉ.सचिन वेर्णेकर यांच्या समवेत सत्कार स्विकारताना डॉ. सोनाली धर्माधिकारी, डॉ. सीमा तारणेकर, श्वेता जोगळेकर, अनुराधा येसूगडे, संगीता पाटील, सुचेता कांची आदी उपस्थित होते.
‘संस्थापक डॉ.पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ.विश्वजीत कदम यांच्या पाठिंब्यामुळे व त्यांच्या प्रोत्साहनामुळे भारती विद्यापीठाने हे यश मिळविले आहे. उच्चशिक्षणाला पोषक वातावरण, उत्तम शिक्षणपद्धती, उत्तम शिक्षकवर्ग व विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळेच आयएमईडी ला व्यवस्थापनाच्या शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान देणे शक्य झाले आहे.’ अशी माहिती डॉ. सचिन वेर्णेकर यांनी दिली.

