विविध महाविद्यालयातील १५० विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे :
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ आय.एम.ई.डी.च्या वतीने आंतरमहाविद्यालयीन ‘सी-गुगली स्पर्धा २०१७’ चे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा नुकतीच आय.एम.ई.डी कॅम्पसमध्ये झाली. या स्पर्धेमध्ये पुण्यातील विविध महाविद्यालयातून एम.सी.ए विभागाचे पदवीचे शिक्षण घेणारे व पदव्युत्तर एकूण १५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन राजीव कोईरी (सॉफ्टवेअर वरिष्ठ अभियंता, सिनेक्रोन), भैरव बागची (‘
कॅप
जेमिनी’ चे व्यवस्थापक) यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनप्रसंगी डॉ. सचिन वेर्णेकर (भारती विद्यापीठ व्यवस्थापन शास्त्रशाखेचे अधिष्ठाता आणि ‘आय.एम.ई.डी’चे संचालक), प्रा.डॉ.अजित मोरे, प्रा.सत्यवान हेंबाडे, प्रा.डॉ. नीलेश महाजन, प्रा.स्वाती देसाई, प्रा.श्वेता जोगळेकर, प्रा.डॉ.एच.एम.पाडळीकर, प्रा.दीप्ती देशमुख उपस्थित होते.
‘माहिती तंत्रज्ञान’ विषयावर आधारित या स्पर्धेचे संयोजन सत्यवान हेंबाडे, प्रा.सुजाता मुळीक, डॉ. अजित मोरे (एम सी ए विभाग प्रमुख) यांनी केले होते.
पदवीचे शिक्षण घेणारे व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य वाढ आणि क्षमता वाढीसाठी उपयोग व्हावा या प्रमुख हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

