पुणे :
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा -2017’ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी दिली.
ही स्पर्धा दिनांक 9 जानेवारी 2017 रोजी आयएमईडी, एरंडवणे, पौड रोड, पुणे -38 येथे होणार आहे. महाविद्यालयीन सर्व विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असून, स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता नाव नोंदणी आवश्यक आहे. इच्छुक स्पर्धकांनी दिनांक 5 जानेवारी पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘मानवता हा धर्म व माणूसकी ही जात’, ‘आरक्षणाचे फायदे व तोटे’, ‘जातिव्यवस्था नष्ट झाली पाहिजे का?’, ‘भ्रष्टाचार मुक्त जीवनाचे परिणाम’, ‘स्त्री सबलीकरण व तिची सुरक्षा’, ‘दहशतवाद-धर्म व आंतरराष्ट्रीय राजकारण’, ‘स्वातंत्र्याची सत्तरी’, ‘डिजीटल इंडिया’, ‘पर्यावरणाचे महत्व व त्याचे रक्षण’ हे स्पर्धेचे विषय आहेत.
—————————— —————————— –
अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क :
डॉ.एच.एम.पाडळीकर – 9423386539, डॉ. प्रमोद पवार – 9689926752
ऑनलाईन नाव नोंदणीसाठी – imed.bharatividyapeeth.edu


