पुणे :
भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट (आयएमईडी)च्या वतीने मनुष्यबळ विकास मंचातर्फे व्यवसाय विश्लेषक विषयी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेतंर्गत ‘केस स्टडी प्रेझेन्टेशन 2016’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पदव्युत्तर स्पर्धकांमध्ये राहुल गुप्ता आणि रजत बघेल यांनी प्रथम क्रमांक तर रशिका दिक्षीत आणि शर्मिली बऊल यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. पदवीचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांमध्ये अश्विनी वर्मा आणि अकाला श्रीवास्तव यांनी प्रथम क्रमांक तर प्रखर काब्रा आणि सुनील जैन यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेचे परिक्षण डॉ. नीलम लाल आणि सचिन आयरेकर यांनी केले होते. यावेळी डॉ. माणिक काकडे, डॉ. प्रविण माने (कार्यक्रम संचालक) आणि राजलक्ष्मी वाघ यांचा भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
व्यवस्थापन विभागातील मनुष्यबळ विकास मंचाच्या अंतर्गत या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर आणि एम.बी.ए.महाविद्यालयातील एच आर विभागाच्या सल्लागार डॉ. नीलम लाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना केस स्टडी करताना विद्यार्थ्यांचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आणि संकल्पनात्मक क्षमता यांचा वापर कशाप्रकारे करता येऊ शकेल याची माहिती विद्यार्थ्यांना देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा उत्तम व्यासपीठ ठरली. या स्पर्धेमागे आयोजकांचे व्यवसाय दृष्टिकोनातून विविध पैलू होते. जसे कामगार कायदा, मार्केटिंग, फायनान्स. ही स्पर्धा पदवीचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि पदव्युत्तर विद्यार्थी अशा दोन श्रेणीमध्ये आयोजित करण्यात आली होती.


