पुणे आयसीएआयमध्ये उभारला ‘जीएसटी सहायता डेस्क – खा. अनिल शिरोळे यांनी केले उद्घाटन
पुणे: जीएसटी लागू होण्याची तारीख फक्त 4 आठवडे दूर असून, उद्योग तसेच व्यावसायिक व इतरांसाठी ही नवीन कर यंत्रणा सहज सुलभ बनविण्यासाठी पुण्यात आयसीएआयमध्ये जीएसटी सहायता डेस्क उभारण्यात आला आहे. जीएसटी दशकातील सर्वात मोठा नवनिर्माण आणि सुधारित कर आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ने १६३ शाखांमध्ये प्रशिक्षण ,परिषद ,कार्यशाळेचा अवलंब केला आहे.
आज “जीएसटी सहायता” डेस्कच्या पुणे शाखेचे उद्घाटन बीबवेवाडी येथे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले.ह्या उद्घाटन प्रसंगी आयसीएआयचे इतर सदस्य देखील उपस्थिती होते.
एसएमईएस आणि व्यापार्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सीए अरुण आनंदगिरी ( अध्यक्ष, पुणे शाखा डब्यूआयआरसी अॉफ आयसीएआय) म्हणाले की, “हे सहायता डेस्क पूर्णपणे कार्यरत आहे, आणि ह्याच्या मदतीने जीएसटी यंत्रणा अधिक सहज व सुलभ होईल.
उद्योग व्यवसायांकडे अधिक समर्थपणे पोहचण्यासाठी, आयसीएआय संपूर्ण देशातील आयसीएआय शाखांमध्ये ‘जीएसटी सहायता’ डेस्क सुरू करीत आहे, जीएसटी व्यापारी, उद्योजक, एसएमई क्षेत्र इत्यादींच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात मदत करेल.