मुंबई-
व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात ज्यांना अत्याधुनिक आणि उत्तुंग शिक्षण घ्यायचे आहे, अशा व्यवस्थापन क्षेत्रातील इच्छुकांसाठी आयबीएस मुंबई ही, बी-स्कूल्समधली प्रथम श्रेणीची संस्था म्हणून उदयास आली आहे. अन्य बी-स्कूल्स आणि आयबीएस मुंबई यामधील फरकच स्पष्ट करायचा झाला तर असे म्हणता येईल की, आयबीएस मुंबई ही अशी संस्था आहे, जिच्यामधून केवळ व्यवस्थपनतले तज्ञच नव्हे, तर जागतिक परिमाण असलेले विचाररवंत नेते (थॉट लिडर्स) घडवले जातात. इथे असे वातावरण निर्माण केले जाते जेणेकरुन इथे शिकणारा प्रत्येकजण विचारप्रवण बनतो, आपल्या अनुभवांचे आदान-प्रदान करतो, आलेल्या समस्यांवर यशस्वीपणे मात करतो, निर्णयक्षम बनतो, टीमवर्क अर्थात समूहाने काम करण्याला प्राधान्य देतो, तसेच आंत्रप्रुनरशिपचा विकास घडवतो, जेणेकरुन तो ज्या क्षेत्रात काम करतो आहे, त्या क्षेत्रातील विद्यमान जागतिक परिमाणांशी त्याला जुळवून घेताना सोपे जाते आणि ज्ञानप्राप्तीसह कौशल्याचा विकास घडवता येतो.
आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी पुरवण्याच्या क्षेत्रात (इंटरनॅशनल प्लेसमेंटस)आयबीएस ग्रुपमध्ये आयबीएस मुंबईने कायमच वर्चस्व राहिले आहे. कंपनीने आजवर केलेल्या इंटरनॅशनल प्लेसमेंटसपैकी ५० टक्क्यांहून अधिक प्लेसमेंटस या आयबीएस मुंबईकडून झाल्या आहेत. आयबीएस मुंबईने तयार केलेल्या पीजीबीएम या दोन वर्षांच्या प्रोग्रामची रचनाच अशी केली आहे की, कोणात्याही विकसित कंपनीमध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेले विशेषज्ञ तयार व्हावेत, ज्यांच्याकडे उच्च वयवस्थापन कौशल्य उपलब्ध असेल.
या प्रोग्राममुळे व्यवस्थापनच्या सर्वच क्षेत्रातील विविध विषयांची प्रगल्भता आपोआपच प्राप्त होते. या प्रोग्राममध्ये सादर केलेले सर्वच कोर्सेस उत्तम सरावाशी निगडीत असून साधनसामुग्रीचा योग्य वापर करत मूलभूत तत्त्वे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत; जेणेकरुन विद्यार्थ्याला कंपन्यांमधील आव्हानात्मक परिस्थितीला समर्थपणे तोंड देता येवू शकेल. कोणत्याही कंपनीच्या कॉर्पोरेट ध्येयधोरणांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने योग्य ते व्यवस्थापन कौशल्य विद्यार्थ्याला कसे मिळेल, या दृष्टीकोनातून या कोर्सेसची रचना केली आहे. याबाबत बोलताना प्रो. वाय. के. भूषण म्हणतात की, इथे शिकणारे विद्यार्थी हे सारासार विचार करायला शिकतात आणि उपलब्ध माहितीचे योग्य ते विश्लेषण करुनच व्यावासयिक निकषांवर टीकणारे निर्णय घ्यायला शिकतात. तसेच या निर्णयांना धोरणात्मक प्रतीपूर्तीची बैठक असते, ज्यामुळे त्या विशिष्ट क्षेत्राचे सखोल ज्ञान प्राप्त होत जाते. आता याच कोर्सेसमधून भावी पिढ्यांना अत्याधुनिक साधनसामुग्री आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचे कंपनीने ठरवले आहे.
याशिवाय केंद्रिभूत आणि स्पेशलाइज्ड कोर्सेसचा विचार करता आता नव्याने समर इंटर्नशिप प्रोग्राम (एसआयपी) अशा उन्हाळ्यातल्या सुट्टीच्या कोर्सेाचे नियोजनही करण्यात आले आहे. आयबीएसच्या शिक्षणप्रणालीमधला हा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. एसआयपीमुळे विद्यार्थ्यांना वास्तव जीवनातील प्रत्यक्ष प्रसंगांद्वारे प्रशिक्षण दिले जाते, जे सहसा वर्गात शिकवून येणे शक्य नसते. त्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर मेहनत करावी लागते आणि ठाशीव निष्कर्षाप्रत यावे लागते.
आयबीएसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेंट (पीजीपीएम), ज्यामध्ये अशी सॉफ्ट स्किल्स शिकवली जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विकसित होणे, व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे, संवादकौशल्य सुधारणे आणि व्यावसायिक कौशल्यात पारंगत होणे शक्य होते.
आयबीएस मुंबईच्या सातत्याने वाढत असलेल्या औद्योगिक नेटवर्कमुळे आयबीएस मुंबईचे करिअर मॅनेजमेंट सेंटर हे सातत्याने अग्रेसर रहात असून बीएसएसआय, आयटी आणि आयईटीईएस, मिडीया आणि एंटरटेनमेंटसह डिजीटल मार्केटींगमधील कंपन्यांना त्याचा लाभच होत आहे. यामुळेच अशा विद्यार्थ्यांना सर्वोच्च संशोधन क्षेत्रातही संधी उपलब्ध होत आहे.