पुणे-भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केलेल्या लसीकरणाच्या संकल्पाला उदंड प्रतिसाद मिळत असून, जवळपास १३०० जणांनी लसीकरणासाठी आपले नाव नोंदवून कुपन घेतले. या सर्वांचे दिनांक १० आणि ११ जून रोजी लसीकरण होणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि शुभचिंतकांना हार, तुरे नको वंचितांसाठी लस आणि रिक्षावाले काकांसाठी सीएनजी कुपन भेट द्या, असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला अनुसरून समाजातील दानशूर व्यक्तींनी प्रतिसाद देत निधी दिला.
आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पानुसार, आज दिनांक ८ जून रोजी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालया लसीकरणासाठी नावनोंदणी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात कोथरुड करांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत आपले नाव नोंदवून कुपन घेतले. जवळपास १३०० जणांनी या उपक्रमाअंतर्गत कोविन अॅपच्या माध्यमातून आपले नाव नोंदवले. आज नाव नोंदवलेल्या सर्वांचे दिनांक १० आणि ११ जून रोजी लसीकरण होणार आहे.
दरम्यान, लॉकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रिक्षाचालकांनाही मदतीचा एक हात देण्याचा संकल्प आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केला असून, रिक्षाचालकांना १००० रुपयांचे सीएनजीचे कुपन दिले जाणार आहेत. यासाठी उद्या दिनांक ९ रोजी रिक्षाचालकांनी आपले लायसन्स, परमिट आणि आधारकार्डची छायांकित प्रत घेऊन, आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड येथील जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

