होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे बेटांच्या देशात विस्तार ,ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये निर्यातीची सुरुवात

Date:

आता जगभरातील ३८ देशांमध्ये दुचाकी वाहतुकीच्या गरजा पूर्ण

नवी दिल्ली, २७ जुलै २०२२ – भारतातील जागतिक दर्जाच्या उत्पादनाच्या सुविधांचा वापर करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला १२५ सीसी मोटरसायकल SP125 ची निर्यात करणार असल्याचे आज जाहीर केले. या मोटरसायकल्सची सीबीयू मार्गाने निर्यात केली जाणार असून या बाजारपेठांमध्ये CB125F नावाने त्यांची विक्री केली जाणार आहे.

SP125 च्या २५० युनिट्सची शिपमेंट जुलै २२ नंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडला पाठवण्यात आली आहे. सध्या होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या अल्वार (राजस्थान) येथील तापुकारा प्लँटमध्ये SP125 चे उत्पादन केले जात आहे.

या कामगिरीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘या घडामोडीमुळे एचएमएसआयच्या जागतिक बाजारपेठांना पुरवठा करण्यासाठी भारतातील उत्पादन क्षमतांचा वापर करण्याच्या दीघकालीन योजनेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. एचएमएसआयचा विश्वासार्ह दर्जा जगभरातील ३८ देशांना सेवा देत असून कंपनीने आखलेल्या योजनेप्रमाणे जागतिक बाजारपेठांमध्ये विस्तार केला जात आहे.’

उल्लेखनीय बाब म्हणजे SP125 ही एचएमएसआयने भारतात लाँच केलेली पहिली बीएसव्हीआय मोटरसायकल आहे. १९ नव्या पेटंट अप्लिकेशन्सचा समावेश असलेल्या SP125 मध्ये १२५ सीसी एचईटी इंजिन ईएसपी तंत्रज्ञानासह देण्यात आले आहे. SP125 मध्ये या विभागात पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेले विविध प्रकारचे तंत्रज्ञान देण्यात आले असून त्यात फुल डिजिटल मीटर, डिस्टन्स टु एम्प्टी, सरासरी इंधन कार्यक्षमता, इंधनाची प्रत्यक्षातली कार्यक्षमता, एलईडी डीसी हेडलॅम्प, इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच, इंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम/पासिंग स्विच, इको इंडिकेटर, गियर पोझिशन इंडिकेटर यांचा समावेश आहे.

जगभरात होत असलेला एचएमएसआयचा विस्तार

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने २००१ मधे अक्टिव्हा मॉडेलसह भारतातून निर्यातीची सुरुवात केली. सध्या होंडाद्वारे ३८ वैविध्यपूर्ण निर्यात बाजारपेठांमध्ये १९ दुचाकींच्या पोर्टफोलिओसह ३० लाख ग्राहकांना आनंद दिला जात आहे. या बाजारपेठांमध्ये आशिया आणि बेटांचा प्रदेश, मध्यपूर्व व लॅटिन अमेरिका आघाडीवर आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवजयंतीनिमित्त स्वच्छतेचा संकल्प – ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’चा भव्य शुभारंभ

पुणे: आज १९ फेब्रुवारी, शिवजयंतीच्या पावनदिनी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन...

देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून...

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा

देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ...