अमित शाह व भाजपा विरुद्ध भव्य निषेध मोर्चा मुंबई : आज उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातील चांदिवली मतदार संघात माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वात सकल बहुजन समाजाच्या लोकांसोबत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल लोकसभेत अपमान करणारे वक्तव करणारे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरुद्ध भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.
साकीनाका येथील पेनुनसुला हॉटेल पासून सुरू झालेल्या या निषेध मोर्च्यात अमित शाह यांच्या विरुद्ध जोरदार घोषणा देत निघालेला मोर्चा चांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून समाप्त करण्यात आला. यावेळी लोकाना संबोधित करताना नसीम खान म्हणाले की, लोकसभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनादर करीत आक्षेपार्ह विधान करणारे भाजपाचे अमित शाह यांनी सर्व जनते समोर जाहीर माफी मागावी आणि त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी नसीम खान यांनी या मोर्चा दरम्यान केली. नसीम खान पुढे म्हणाले की, देशात भाजपा सरकार आल्यापासून महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यात बहुजनावरील अत्याचारांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील परभणी, बीड मधील घटना असो किंवा मुंबईतील पवई येथील जयभीम नगर मधील मागासवर्गीय परिवारांना बेघर केल्याची घटना असो अशा कितीतरी घटना संपूर्ण देशात घडत असून भाजपा सरकार आणि त्यांचे नेते देशातील विविध समाजावर अशा प्रकारचे भाष्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच देशातील 140 करोंड जनतेला लोकशाही पद्धतीने जगण्याचा आणि राहण्याचा अधिकार दिला आहे. भाजपा आणि त्याचे नेते अशाप्रकारचे भाष्य आणि समाजात तेढ निर्माण करीत असतील तर देशातील जनता हे मुळीच सहन करणार असे म्हणत आम्ही अशा सरकार आणि नेत्यांचा जाहीर निषेध करीत आहोत.
या मोर्च्यात साधू कटके, प्रकाश बि-हाडे, गौतम साबळे, शंकर वाघ, योगिराज भोसले, कुमार कांबळे, वजीर मुल्ला, भरत सिंह, शहजादे शेख, मनोज तिवारी, रियाज मुल्ला, संजय उपाध्याय, मूर्तजा अंसारी,आशिष जाधव, नीलेश वाघमारे, रामभाऊ गजाकोश, संजय डावरे, आकाश बागले, अनिल लोंढे, शरद पवार, अशोक पोळ, रमेश बालेश, शहाजी गायकवाड, उत्तम गायकवाड, राकेश बनसोडे, दत्त निकम, अड. विजय कांबळे, अड. कैलाश अगावणे, रामेश्वर दवंडे, सहित सोनू यादव, सुरेन्द्र सिंह, अफताब आलम, सविता पवार, राधिका पवार, सुशीला यादव, परवीन शेख, हाजरा शेख, मिना भालेराव, रिटा सिंह, सुलोचना म्हाळसंघ, कमरुनीसा शेख, फरीदा शेख, मनाली गायकवाड, यांच्यासह हजारोंच्या संख्येत लोक उपस्थित होते.
नवी दिल्ली-मतदानाच्या नियमांमधील बदलांबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मोदी सरकारने निवडणूक आयोगाच्या (ECI) स्वातंत्र्यावर हल्ला केला आहे.एक्सवर एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले- यापूर्वी मोदी सरकारने निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या पॅनेलमधून CJI ना काढून टाकले होते आणि आता ते लोकांपासून निवडणुकीची माहिती लपवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Modi Govt’s audacious amendment in the Conduct of Election Rules is another assault in its systematic conspiracy to destroy the institutional integrity of the Election Commission of India.
Earlier, they had removed the Chief Justice of India from the Selection panel which… pic.twitter.com/c1u7pNdlif
मतदार यादीतून नावे वगळण्याबाबत आणि ईव्हीएममधील पारदर्शकतेबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाला जेव्हा जेव्हा पत्र लिहिले तेव्हा ईसीआयने अपमानास्पद स्वरात उत्तर दिले आणि आमच्या तक्रारीही स्वीकारल्या नाहीत.
खरेतर, 20 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही, वेबकास्टिंग फुटेज आणि उमेदवारांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग यांसारखी इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे सार्वजनिक करणे टाळण्यासाठी निवडणूक नियमांमध्ये बदल केले होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, एआयच्या वापराने मतदान केंद्राच्या सीसीटीव्ही फुटेजशी छेडछाड करून बनावट कथा पसरवल्या जाऊ शकतात. बदलानंतरही हे उमेदवारांना उपलब्ध राहतील. इतर लोक ते मिळविण्यासाठी न्यायालयात जाऊ शकतात.
नवी दिल्ली-मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही, वेबकास्टिंग फुटेज आणि उमेदवारांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग यासारखी इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे सार्वजनिक करणे टाळण्यासाठी सरकारने निवडणूक नियम बदलले आहेत. त्यांचा गैरवापर होण्याच्या भीतीने सरकारने शुक्रवारी हे पाऊल उचलले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, एआयच्या वापराने मतदान केंद्राच्या सीसीटीव्ही फुटेजशी छेडछाड करून बनावट कथा पसरवल्या जाऊ शकतात. बदलानंतरही हे उमेदवारांना उपलब्ध राहतील. इतर ते मिळविण्यासाठी न्यायालयात जाऊ शकतात.निवडणूक आयोगाच्या (EC) शिफारशीनुसार, कायदा मंत्रालयाने शुक्रवारी निवडणूक आचार नियम-1961 च्या नियम 93(2)(A) मध्ये बदल केले. नियम ९३ म्हणतो- “निवडणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रे सार्वजनिकरीत्या उपलब्ध असतील.” ते बदलून “निवडणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रे ‘नियमांनुसार’ सार्वजनिकरित्या उपलब्ध असतील.” केले आहे.
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात याचिकाकर्त्यासोबत हरियाणा विधानसभा निवडणुकीशी संबंधित कागदपत्रे शेअर करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये नियम ९३(२) अंतर्गत सीसीटीव्ही फुटेजचाही विचार करण्यात आला. मात्र, या नियमात इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचा समावेश नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते. ही संदिग्धता दूर करण्यासाठी नियमात बदल करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, नामनिर्देशन फॉर्म, निवडणूक प्रतिनिधींची नियुक्ती, निवडणूक निकाल आणि निवडणूक खाते विवरण यासारखी कागदपत्रे निवडणूक आचार नियमांमध्ये नमूद केली आहेत. आचारसंहितेदरम्यान, सीसीटीव्ही फुटेज, वेबकास्टिंग फुटेज आणि उमेदवारांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग यांसारखी इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे त्याच्या कक्षेत येत नाहीत.
निवडणूक आयोगाच्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितले की, सीसीटीव्ही कव्हरेज आणि मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग निवडणूक आचार नियमांतर्गत केले जात नाही, तर पारदर्शकतेसाठी केले जाते.
त्याचवेळी आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात नियमांचा हवाला देऊन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मागवण्यात आले होते. दुरुस्ती हे सुनिश्चित करते की केवळ नियमांमध्ये निर्दिष्ट केलेली कागदपत्रे सार्वजनिक आहेत. नियमात नमूद नसलेली इतर कागदपत्रे सार्वजनिक करण्याची परवानगी देऊ नये.
नियमात बदल केल्यानंतर काँग्रेसने शनिवारी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. आयोगाने निवडणूक प्रक्रियेची अखंडता नष्ट करत पारदर्शकता कमकुवत केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी X वर लिहिले- अलीकडच्या काळात भारताच्या निवडणूक प्रक्रियेची अखंडता झपाट्याने घसरली आहे. आता याचे स्पष्ट पुरावे समोर आले आहेत. निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती शेअर करण्याच्या पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्याऐवजी आयोग नियम बदलत आहे.
शुभ्रा रंजन आयएएस स्टडीने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तात्काळ बंद करव्यात असा केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिला आदेश
मुंबई-केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (The Central Consumer Protection Authority – CCPA) शुभ्रा रंजन आयएएस स्टडी या खाजगी शिकवणी संस्थेला दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एक वर्ग म्हणून ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने तसेच ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या तरतुदींचे उल्लंघन करत कोणत्याही वस्तू किंवा सेवांबद्दल कोणतीही खोटी किंवा दिशाभूल करणारी जाहिरात केली जाऊ नये याची सुनिश्चिती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने म्हटले आहे.
ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उल्लंघन होत असल्याचे लक्षात घेऊन, मुख्य आयुक्त श्रीमती निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2023 संदर्भात दिशाभूल करणारी जाहिरात दिल्याबद्दल शुभ्रा रंजन आयएएस स्टडी विरोधात हा आदेश जारी केला आहे
खाजगी शिकवणी संस्था आणि ऑनलाइन तंत्रज्ञानाधारीत शैक्षणिक व्यासपीठे संभाव्य उमेदवारांना (ग्राहकांना) प्रभावित करण्यासाठी यशस्वी उमेदवारांची छायाचित्रे आणि नावांचा वापर करतात, मात्र ते अशा उमेदवारांनी निवडलेले अभ्यासक्रम अथवा त्यांनी भरलेले शुल्क आणि त्यांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाचा कालावधी ते जाहीर करत नाहीत.
शुभ्रा रंजन आयएएस स्टडीने प्रकाशित केलेल्या आपल्या जाहिरातीत खालील दावे केले आहेत-
“सर्वोत्कृष्ट 100 मध्ये 13 विद्यार्थी”
“सर्वोत्कृष्ट 200 मध्ये 28 विद्यार्थी”
केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये “सर्वोत्कृष्ट 300 मध्ये 39 विद्यार्थी”
तसेच या जाहिरातींमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2023 मधील यशस्वी उमेदवारांची छायाचित्रे आणि नावे देखील ठळकपणे नमूद केलेली असून, अशा उमेदवारांनी निवडलेल्या विशिष्ट अभ्यासक्रमाची कोणतीही माहिती मात्र देण्यात आलेली नाही.
शुभ्रा रंजन आयएएस स्टडीने यशस्वी उमेदवारांची नावे आणि छायाचित्रे ठळकपणे प्रदर्शित केली आणि त्याचबरोबर या खाजगी शिकवणी संस्थेच्या वतीने उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांची जाहिरात आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली. मात्र, या जाहिरातीत उल्लेख केलेल्या यशस्वी उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2023 साठी निवडलेल्या अभ्यासक्रमाच्या संदर्भातील माहिती या जाहिरातीत नमूद करण्यात आली नाही.
संबंधित जाहिरातीत दावा केलेल्या यशस्वी उमेदवारांनी खालील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला होता असे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला चौकशीत आढळून आले :-
S.No
Courses name
No. of students
Political Science and International Relations (PSIR) Crash Course & Test Series
26 students
Essay Program for Mains
10 students
Rapid Revision (Polity, Governance & International Relations)
2 students
Political Science & International Relations (PSIR) + Classroom course
2 students
Political Science & International Relations (IR)
5 students
PSIR Answer Writing Module
8 students
Sociology Offline Batch
2 students
ही खाजगी शिकवणी संस्था जवळपास 50 पेक्षा जास्त अभ्यासक्रम चालवते. मात्र, या संस्थेने आपल्या जाहिरातीत दावा केलेल्या बहुतांश यशस्वी विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध (PSIR) या विषयावरचा लघु अभ्यासक्रम आणि चाचणी मालिका निवडली होती, जी केवळ पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच निवडता येते असे महासंचालकांच्या चौकशी अहवालात असे आढळून आले. वास्तविक नागरी सेवा परीक्षेकरता अंतिम यादीत स्थान मिळविण्यासाठी, जाहिरातीत उल्लेख केलेल्या यशस्वी उमेदवारांनी या खाजगी शिकवणी संस्थेत कोणत्या विशिष्ट अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता याची माहिती मिळणे हा ग्राहकाचा अधिकार आहे. जर अशी माहिती उपलब्ध झाली असती तर संभाव्य ग्राहकांच्या दृष्टीने त्यांना नागरी सेवा परीक्षेत यश मिळावे या अनुषंगाने माहितीच्या आधारे अभ्यासक्रमाची निवड करण्यात त्याची मदत झाली असती.
या खाजगी शिकवणी संस्थेने आपल्या जाहिरातीत उल्लेख केलेल्या प्रत्येक यशस्वी उमेदवाराने निवडलेल्या विशिष्ट अभ्यासक्रमाची माहिती जाणीवपूर्वक लपवली, आणि त्याद्वारे असा समज निर्माण केला की, त्यांच्याद्वारे उपलब्ध करून दिलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या ग्राहकांचा यशाचे प्रमाण हे एकसमान आहे. मात्र प्रत्यक्षात ही बाब योग्य नव्हती.
ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कलम 2 (28) (iv) मध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींची व्याख्या नमूद केली आहे, या व्याख्येत जाणीवपूर्वक महत्वाची माहिती लपवण्याच्या कृतीचाही समावेश आहे. इथे यशस्वी उमेदवारांनी निवडलेल्या विशिष्ट अभ्यासक्रमाची माहिती ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे, कारण अशा माहितीच्या आधारे ते कोणत्या अभ्यासक्रमासाठी आणि कोणत्या खाजगी शिकवणी संस्थेत प्रवेश घ्यायचा हे ठरवू शकतात.
या खाजगी शिकवणी संस्थेने आपल्या जाहिराती आणि लेटरहेडमध्ये “शुभ्रा रंजन आयएएस” आणि “शुभ्रा रंजन आयएएसचे विद्यार्थी” अशा शब्दांचा वापर केला आहे. यामुळे देखील शुभ्रा रंजन या आयएएस अर्थात सनदी अधिकारी आहेत / होत्या असाही भ्रामक समज निर्माण झाला. या संस्थेची ही कृती म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार चुकीची आणि अन्यायकारक व्यापार पद्धत आहे. या संस्थेच्या अशा कृतीमुळे जनतेची आणि संभाव्य विद्यार्थ्यांची दिशाभूल होते आणि त्यांचा असा गैरसमज होतो की, अशा संस्थेतून त्यांनी दिल्या जात असलेल्या सेवा किंवा मार्गदर्शन हे थेट सनदी अधिकाऱ्याच्या विश्वासार्हतेशी संबंधित आहे. शुभ्रा रंजन आयएएस किंवा @shubhraranjanias या शब्दांचा वापर ही लिपिकीय चूक असल्याचा दावाही या संस्थेने केला होता. मात्र प्रत्यक्षात हे शब्द वारंवार लेटरहेडवर आणि जाहिरातींमध्ये वापरले जात होते, त्यामुळे संस्थेचा हा दावा तथ्यहीन आहे. वास्तवात या संस्थेने अपवादात्मक गुणवत्ता आणि यशाची धारणा तयार करण्यासाठी भ्रम निर्माण करणाऱ्या कार्यपद्धतींचा वापर केला आहे. खरे तर कोणतीही जाहिरात ही स्पष्ट, ठळक आणि ती पाहणार्यांना सहजपणे समजू शकेल अशी असआयला हवी आणि त्यासाठी त्यात वस्तुस्थितीविषयी कोणतीही माहिती वगळली जाणार नाही इतक्या कटाक्षाने संबंधीत खुलासे असले पाहीजेत.
या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने या संस्थेला दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तात्काळ बंद करण्याचे आणि दिशाभूल करणारी जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल 2,00,000 रुपयांचा दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2022 च्या निकालासंदर्भात दिशाभूल करणारे दावे केल्याबद्दल वाजीराव अँड रेड्डी या संस्थेला देखील 7 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. वाजीराव अँड रेड्डी इन्स्टिट्यूटने आपल्या जाहिरातीत केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये 933 पैकी 617 उमेदवारांची निवड झाल्याचा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी ते शिकवणी देणार्या आघाडीच्या शिकवणी संस्थांच्या यादीत पहिल्या स्थानावर असल्याचा दावा केला होता. या प्रकरणात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला असे आढळले की दावा केलेल्या सर्व 617 यशस्वी उमेदवारांची मुलाखत मार्गदर्शन कार्यक्रमासाठी नोंदणी केली गेली होती, आणि प्रत्यक्षात ती विनामूल्य प्रदान केली गेली होती. यानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने वाजीराव अँड रेड्डी इन्स्टिट्यूटविरोधात दिशाभूल करणारी जाहिरात तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कायमच खाजगी शिकवणी संस्थांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीं विरोधात कारवाई केली आहे. यासंदर्भात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने आतापर्यंत विविध खाजगी शिकवणी संस्थांना दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी 45 नोटिसा बजावल्या आहेत. यासोबतच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने 20 खाजगी शिकवणी संस्थांना 63 लाख 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद करण्याचे निर्देशही दिले आहेत
केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा, भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि इतर प्रवेश परीक्षांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी आणि उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय ग्राहक मदत प्रणालीच्या (NCH) माध्यमातून खटल्यापूर्वीच्या टप्प्यात यशस्वी हस्तक्षेप केला. विविध खाजगी शिकवणी केंद्रांकडून विशेषत: त्यांनी विद्यार्थी / उमेदवारांचे प्रवेश शुल्क परत न केल्याबद्दल राष्ट्रीय ग्राहक मदत प्रणालीत दाखल झालेल्या असंख्य तक्रारींनंतर, राष्ट्रीय ग्राहक मदत प्रणालीने 432 पिडीत विद्यार्थ्यांना (1 सप्टेंबर 23 ~ 31 ऑगस्ट 24 दरम्यान) एकूण 1.15 कोटी रुपयांचा परतावा देण्यासाठी युद्ध पातळीवर या तक्रारींचे निराकरण करण्याची मोहीम सुरू केली. राष्ट्रीय ग्राहक मदत प्रणालीवर आपल्या तक्रारी मांडणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यातील पिडीत विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर विभागाने हस्तक्षेप केल्यानंतर या सर्व परताव्यांच्या बाबतीतील प्रकरणांमध्ये खटल्यापूर्वीच्या टप्प्यात तातडीने कार्यवाही देखील करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर-माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमच्या 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बोलताना कथित आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ एमआयएमच्या वतीने आंदोलन करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि गाढवाचा वापर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
अमित शहा यांनी संसदेत बोलताना, आंबेडकरांचे नाव घेणे ही एक फॅशन झाली आहे. सगळीकडे आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, म्हणायचे. त्यांनी देवाचे नाव इतक्या वेळा घेतले असते, तर स्वर्गात जागा मिळाली असती, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळाले. अमित शहा यांच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. एमआयएमच्या वतीने देखील छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात आले होते.
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अमित शहा यांच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर येथे तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात गाढवाचा वापर करण्यात आला होता. ज्यामुळे पोलिसांनी यावर आक्षेप घेत 30 आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. आंदोलकांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.या कारवाईवर एमआयएम पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे आंदोलन शांततापूर्ण होते आणि जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
बारामती : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत.. काल नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर अजितदादा रात्री उशिरा बारामतीमध्ये दाखल झाले.. आज सकाळी सहा वाजल्यापासूनच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.. आज अजितदादा बारामतीत आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी बारामतीकरांच्या वतीने अजितदादांचा नागरी सत्कार होणार आहे..
प्रथमतः मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची त्यांनी पाहणी केली. महाविद्यालयातील साधनसामग्री, सोयीसुविधांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. या महाविद्यालयात आयुर्वेदिक पध्दतीनं उपचार पध्दतीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. दरम्यान, याधीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामतीत सुरू झालं असून तिथे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात आता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची भर पडल्यानं वैद्यकीय शिक्षणाचा हब म्हणून बारामतीची ओळख निर्माण होईल, यात शंका नाही. आयुर्वेदिक पध्दतीच्या उपचारांची आवश्यकता भासणाऱ्या सर्व रुग्णांना या महाविद्यालयात अत्याधुनिक सोयीसोविधा पुरवल्या जातील. याबरोबरच रुई येथील शासकीय रुग्णालयाच्या कामाची देखील पाहणी केली.त्याचप्रमाणे श्रीमंत बाबूजी नाईक वाडा, मारुती मंदिर आणि कऱ्हा नदी परिसरातील कामांची पाहणी केली. यासह विद्या प्रतिष्ठान येथील एआय सेंटरच्या कामाचा देखील आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक ती कामाबाबतची माहिती जाणून घेतली. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
पुणे : शब्दांमध्ये लय असेल तर गाणे तयार होते, सुरांमध्ये लय असेल तर संगीत तयार होते, शरीरामध्ये लय असेल तर नृत्य तयार होते, आणि कार्यक्रमामध्ये लय असेल तर अनुष्ठान तयार होते. अशा प्रयोगशील कार्यक्रमांमधून पुढील पिढीवर संस्कार केले तर उन्मेष, ऊर्जा,उत्साह व रचनात्मकता निर्माण होऊन मनोरंजना बरोबरच संगीत क्षेत्रामध्ये देखील रोजगार निर्मिती व अभिव्यक्तीसाठी प्रोत्साहन मिळेल, असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे पूर्व कार्यकारी अध्यक्ष डॉ. दामोदर खडसे यांनी व्यक्त केले. तर हिंदी साहित्य अकादमी पुरस्कृत व अनुवादक डॉ .सुनील देवधर आणि स्वरगंधार कलामंचचे अध्यक्ष धनंजय पूरकर प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. डॉ. सुनील देवधर यांनी शब्द आणि सुरांच्या संगमातून संगीत तयार होते असे प्रतिपादन करुन गीत व संगीताचा पट उलगडला. सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त घेण्यात येणाऱ्या ९८ कार्यक्रमांच्या अंतर्गत सरहद महाविद्यालयाच्या मराठी विभाग आणि मराठी वाड्मय मंडळातर्फे *’कवितेतील रूप गीतांचे – कविता मनातल्या हिरव्या पानातल्या’* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कला शाखा व मराठी विभाग प्रमुख डॉ.वंदना चव्हाण यांनी शब्द आणि अर्थ यांच्या साहचर्यातून निर्माण झालेल्या कवितेला सप्तसुरांची साथ लाभल्यास त्याचे गीत होते आणि या सांगितिक प्रवासाची वाटचाल, स्वरूप व महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे व त्यांना गीतलेखन व संगीत क्षेत्रामध्ये अभिरुची निर्माण व्हावी या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, हे प्रास्ताविकामधून मांडले. कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये स्वरगंधार संस्थेचे संस्थापक गोपाळ कांबळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच त्यांनी संगीत कार्यक्रमाचे निवेदन देखील केले. पौर्णिमा साठे, सुदाम कुंभार, राणू कदम, रत्नदीप यांनी मराठी संगीत क्षेत्रातील आशयघन गीते सुमधुर आवाजात सादर केली. कार्यक्रमाच्या प्रसंगी सरहद संस्थेच्या सचिव सुषमा नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक कृष्णी वाळके व स्नेहमंदिर वृद्धाश्रमच्या संचालक सुमन सामंत, सरहद ग्लोबल स्कूलच्या प्रमुख मनीषा वाडेकर, गोपाळ कांबळे, अशोक भांबुरे, माजी प्राचार्य डॉ. हनुमंतराव जाधवर, प्राचार्य डॉ. संगीता शिंदे, मयुर मसूरकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. श्रीराज भोर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कोमल मोरे यांनी केले.
कात्रज: गुजर निंबाळकरवाडी मधील सरहद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे औचित्य साधून ग्रामीण जीवनाचे दर्शन. ‘सरहद एक गाव’ या संकल्पनेचे आयोजन केले होते.
या मागचा मुख्य उद्देश मुलांना लोप पावत चाललेली संस्कृती, व ग्रामीण जीवन यांचे शहरात दर्शन व्हावे. शिक्षकांच्या मदतीने मुलांनी बैलगाडीची सफर केली . शेती लागवड, शेतखळे, मळणी, उफणणी, तालीम, गावातील घरे, नदी घाट त्यावर कपडे धुणाऱ्या महिला त्यांचा संवाद, जात्यावरील दळण, उखळातील कांडणे, ताक घुसळणे, गोधडी शिवणे, बारा बलुतेदार, प्रत्यक्षदर्शी चुलीवरील स्वयंपाक. आठवडे बाजार, शेळीपालन , कोंबडी पालन, बाल संगोपन, मंदिर शाळा, दवाखाना ग्रामपंचायत, चावडी, वाचनालय, इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला होता. हे जीवन मुलांनी पाहिले नाही तर प्रत्यक्ष अनुभवले प्रत्येक कृती ही मुलांनी जिवंत साकारली. चुलीवर रांधलेल्या स्वयंपाका चाआस्वाद निसर्गाच्या सानिध्यात भारतीय बैठकीत मुलांनी घेतला. सायंकाळी शेकोटी करून मुलांनी विविध प्रकारे कलागुण सादर केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला नलावडे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेच्या सचिवा सुषमा नहार . प्रमुख अतिथी नम्रताताई नमेश बाबर तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख. शाळेच्या विभाग प्रमुख मनीषा वाडेकर . प्राथमिक विभाग प्रमुख कोमल दिवटे. व सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. ग्रामीण रांगड्या बोलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. शशिकला रांजणे व निशा कडते यांनी केले. मुलांनी सर्व प्रात्यक्षिके स्वतः केली. शेतकाळ्यातील मळणी शेती व चुलीवरचा स्वयंपाक असे पारंपारिक वेशभूषेतील सादरीकरणाचे . प्रमुख अतिथींनी कौतुक केले. व शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे ग्रामीण जीवन त्यातील मधाळ गाभा आहे. हा जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून सरहद ग्लोबल स्कूल करते आहे . याचे सर्व अतिथींना कौतुक वाटले. सर्व अतिथींच्या मनोगताने कार्यक्रमाची सांगता झाली.
मुंबई: सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्याबाबत माननीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकृती दिल्याची माहिती आज स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी महामंडळाला दिल्याची माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी आज एका पत्रकाद्वारे दिली. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे स्थळ ,स्वरूप, वेळ तसेच इतर रूपरेषा महामंडळ, संयोजक संस्था आणि स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीनंतर लवकरच जाहिर केली जाईल असेही प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे.
ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे मत : अखिल भारतीय दैवज्ञ समाज उन्नती परिषद तर्फे १० वे दैवज्ञ साहित्य संमेलन उदघाटन
पुणे : ब्राह्मण ही जात नाही तर संस्कृती आहे. चारित्र्यसंपन्नता हा ब्राह्णणांचा सगळ्यात मोठा गुण आहे, परंतु मागील शंभर वर्षात ब्राह्मण समाजाला आत्मविस्मृती आली आहे. याचे सगळ्यांत मोठे कारण म्हणजे गांधी हत्येनंतरचा संहार. त्यानंतर भय आणि नैराश्याने हा समाज पछाडला. ब्राह्मण समाज विखुरला गेला आणि एकत्र येण्याची प्रक्रिया खूप उशिरा सुरू झाली. मुला मुलींना शिकवा आणि परदेशी पाठवा हेच धोरण अवलंबिले गेले. फुले, शाहू,आंबेडकर यांचा महाराष्ट्र असे म्हटले जाते, परंतु टिळक, सावरकर चिपळूणकर यांचा महाराष्ट्र म्हटले जात नाही, असे मत ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेतर्फे १० वे दैवज्ञ साहित्य संमेलनाचे उदघाटन स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले. यावेळी समाजश्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी, साहित्य संमेलनाध्यक्षा कृष्णी वाळके, अजय कारेकर, कुमार अणवेकर, उदय गडकरी, मनमोहन चोणकर, सूर्यकांत कल्याणकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात तीन पुस्तकांचे प्रकाशन झाले. यावेळी संदीप गजानन पावसकर यांना गडकरी प्रतिष्ठानच्या पुरस्काराने तर चंद्रशेखर दाभोळकर यांचा नाथ माधव साहित्यिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
राहुल सोलापूरकर म्हणाले, ज्ञान संवर्धनात मोठेपणा मानणारा ब्राह्मण समाज आहे. ब्राह्मण समाजाने इतर समाजाच्या उत्थानासाठी काम केले. सगळ्या समाजाला एका स्तरावर आणून समाजाचा सांस्कृतिक स्तर उंचावण्याचे सर्वाधिक काम ब्राह्णणांनी केले, हे विस्मृतीत जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, विश्वात्मक एकात्मता आणि संस्कृती च्या सगळ्या अंगाला समृद्ध करण्याचे काम ब्राह्मण समाजांना केले. आपापल्या क्षेत्रात दैवज्ञ आणि इतर ब्राह्मण समाजाने उंची गाठली आहे. समाजाचा इतिहास मोठा आहे, पण ते पुढच्या पिढीकडे सोपविणे देखील तितकेच महत्वाचे आहे, तरच समाज मोठा होतो. डॉ. गजानन रत्नपारखी यांनी मनोगत व्यक्त केले. सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर यांनी प्रास्ताविक केले. डाॅ. श्याम भुर्के यांनी सूत्रसंचालन केले.
पुणे:पालिकेच्या कर आकारणी व कर संकलन खात्याने २०२४-२५ चे उद्दिष्ट पूर्ततेसाठी थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित केलेले आहे. त्यानुसार २ डिसेंबरपासून मिळकत कर वसुलीसाठी बँड पथकाचा समावेश असलेली स्वतंत्र वसुली पथके तयार केली आहेत. या पथकांमार्फत १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील थकबाकी असलेल्या मिळकतीवर थकबाकी वसुलीची कारवाई हाती घेण्यात आली आहे.
त्यानुसार दि. २ ते १३ डिसेंबर या दहा दिवसांच्या काळामध्ये बँड पथकाद्वारे व मध्यवर्ती पथकाद्वारे ३१७ इतक्या मिळकतींना भेट देण्यात आली व ४० कोटी ६८ लाख ५४ हजार २९९ रुपये इतका कर वसूल करण्यात आलेला आहे. तसेच ७५ इतक्या मिळकती सीलबंद करण्यात आल्या आहेत. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुमारे १४ लाख ८० हजार मिळकती असून, त्यापैकी सुमारे ८,८४,६२२ मिळकतधारकांनी त्यांचा मिळकत कर रक्कम रु. १८४१.७७ कोटी इतका जमा केलेला आहे. उर्वरित मिळकत कर थकबाकी धारकांकडे या पुढील कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुली करण्यासाठी पथकांमार्फत मिळकत कर वसुलीचे काम करण्यात येत आहे
‘प्रशासनातील लक्षवेधी साहित्यनिर्मिती’ विषयावर चर्चासत्र पुणे : लिखाणाची उर्मी, आवड असल्याने मनातील विचार कागदावर उमटत गेले. गुन्ह्यांची उकल करताना गुन्हेगारी समाजाचा खरा चेहरा समोर आला. वाईट वर्तणुकीच्या लोकांपासून समाजाचे रक्षण व्हावे; सुदृढ, सुसंस्कृत समाजाची निर्मिती व्हावी या हेतूने लिखाण करीत गेला, अशा भावना पोलिस महानिरिक्षक बी. जी. शेखर यांनी व्यक्त केल्या. संताजीवरील साहित्यकृतीला परवानगी मिळण्यासाठी या पुस्तकाचा दस्तावेज सुमारे सहा महिने विविध शासकीय विभागांमधून फिरला, अशी आठवणही त्यांनी सांगितली. मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात ‘प्रशासनातील लक्षवेधी साहित्यनिर्मिती’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन आज (दि. 21) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शेखर यांनी लेखनप्रवासाचा पट उलगडला. यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांचाही यात सहभाग होता. त्यांच्याशी पुणे महापालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर यांनी संवाद साधला. शेखर पुढे म्हणाले, लेखन करताना काल्पनिक कादंबरी, सत्य घटनेवर आधारित लेखन, इतिहासाची आवड व संशोधक वृत्ती असल्याने ऐतिहासिक तसेच पोलिस खात्यात कार्यरत असल्याने गुन्हेविश्वावरही लेखन केले आहे. शेखर गायकवाड म्हणाले, अस्सल अनुभव आणि कल्पक लेखन या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनुभवातून झालेले लेखन अधिक सकस वाटते तसेच या प्रकारचे लिखाण अधिक टिकावू असल्याचे जाणवले. यातूनच अनुभवांवर आधारित वस्तुनिष्ठ साहित्यकृती माझ्या हातून निर्माण झाल्या. सर्वसामान्यांच्या कुटुंबातील एका खेडेगावात राहणारा मी अतिशय उत्तम शिक्षक लाभल्याने घडत गेला. लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड असल्याने सहावीत असतानाच शंभरहून अधिक पुस्तकांचे वाचन केले. या आवडीचा उपयोग स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासावेळी झाला. दरवर्षी एक पुस्तक लिखाणाचा संकल्प केला असून संशोधनात्मक लेखन, शासकीय कामकाजावेळी आलेले अनुभव, पुढारीशाही लोकशाही यावर भविष्यकाळात लिखाण करण्याचा मानस आहे. अशा प्रकारच्या संमेलनांमध्ये तरुण अधिकाऱ्यांचा समावेश व्हावा तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूर्ण पुस्तकांची निर्मिती व्हावी, त्यांचे इंग्रजीत भाषांतर व्हावे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
आज रात्री मंत्रिमंडळाचे खातेवाटप करण्यात आले असून गृह खाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहिले आहे. तर अर्थ खाते, राज्य उत्पादन शुल्क हे अजित पवारांकडे देण्यात आले आहे. गृहखात्यासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते देण्यात आले आहे. दरम्यान, गृहशिवाय, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहेत.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
कोणाला कोणते खाते पहा यादी –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क कॅबिनेट मंत्री 1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल 2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास) 3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण 4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री 5.गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन 6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा 7.गणेश नाईक – वन 8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण 9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण 10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण 11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन 12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा 13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल 14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन 15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर 16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय 17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय 18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान 19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय 20.अदिती तटकरे – महिला व बालविकास 21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम 22.माणिकराव कोकाटे – कृषी 23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज 24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन 25.संजय सावकारे – कापड 26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय 27.प्रताप सरनाईक – वाहतूक 28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन 29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन 30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे 31.आकाश फुंडकर – कामगार 32.बाबासाहेब पाटील – सहकार 33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री (State Ministers )
माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सव अतंर्गत मातृ-पितृ वंदन कार्यक्रम पुणे : माता पिताच्या चरणापाशी आम्ही स्वर्ग पाहू… प्रक्षालूनी या पदकमलांना सुमने ही वाहू… असे म्हणत आपल्याला जन्म देणाऱ्या आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी मातृ-पितृ वंदन केले. पारंपरिक पद्धतीने पाद्य पूजन करीत मुलांनी आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. तब्बल १ हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्रित मातृ पितृ वंदन केले. कृतज्ञतेचा हा सोहळा भारावणारा होता.
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. त्यामध्ये मातृ-पितृ वंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, एमआयटीच्या कार्यकारी संचालक सुनिता कराड, सी.ए. राधेश्याम अगरवाल, डॉ.रूपाली शेठ, सोमकांत शर्मा, एसपीएम इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी, महेश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मुजुमदार आदी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थी आणि संस्थेच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मातृ पितृ वंदन केले
कार्यक्रमाची सुरुवात मातृ-पितृ वंदन गीताने झाली. शिक्षण प्रसारक मंडळीच्या एसपीएम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘मम माता देवता’ आणि ‘माता पिताच्या चरणापाशी’ हे समूहगीत सादर केले. यानंतर महेश विद्यालय आणि रुईया मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
अशोक गुंदेचा म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्ये ‘मातृ देवो भव’ आणि ‘पितृ देवो भव’ असे आई-वडिलांना संबोधले जाते. त्यामुळे त्यांचे स्थान आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी अतिशय उत्साहाने यामध्ये सहभागी होत माता-पित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मुंबई – कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स इमारतीमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला व त्यांची पत्नी गीता शुक्ला यांच्यासह 6 आरोपींना शनिवारी 6 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.प्रस्तुत प्रकरणात 2 परप्रांतीय कुटुंबामध्ये वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या धीरज देशमुख व त्यांच्या कुटुंबाला अखिलेश शुक्ला यांनी बोलावलेल्या गुंडांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी अखिलेश शुक्लासह 6 जणांना अटक केली होती. या सर्वांना आज न्यायमूर्ती एन. पी. वासादे यांच्या कोर्टापुढे हजर करण्यात आले. त्यात त्यांना 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.