पुणे : मागील चाळीस वर्षांपासून सामाजिक-कौटुंबिक समस्या, सामूहिक विवाह, महिला सक्षमीकरण, आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापन, जलस्त्रोत विकास, आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन आदी क्षेत्रांत देशातील अग्रगण्य सामाजिक संस्था असलेल्या भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) ‘राष्ट्रीय अधिवेशन’ दि. ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ रोजी वर्धमान सांस्कृतिक भवन, बिबवेवाडी, पुणे येथे संपन्न होणार आहे. दर दोन वर्षांनी होणार्या या राष्ट्रीय अधिवेशनासाठी देशभरातील मान्यवर राजकीय नेते, प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि बीजेएसचे तीन हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
या अधिवेशनात उद्घाटन सत्राबरोबरच अनेक सत्र, थेट संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, शपथविधी असा भरगच्च दोन दिवसीय कार्यक्रम असणार आहेत. यात देशभरातून आलेले तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. बदलती जीवनशैली आणि काळानुसार जैन समाजाचे अनेक गुंतागुंतीचे निर्माण झाले आहेत. कालानुरूप प्रश्न बदलले आहेत, त्यांनी उग्र रूप धारण केले आहे. जैन समाजातील या कौटुंबिक, सामाजिक, वैवाहिक अशा अनेक प्रश्नांवर विचारमंथन आणि त्यावरील उपाय यावर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच नव्या पिढीला समजेल, अशा त्यांच्या भाषेत बीजेएसने तयार केलेल्या खास कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. त्याचबरोबर नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा शपथविधी, अनेक सहभागी राज्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या कार्याची व्याप्ती देशभर पसरलेली असून संस्थेशी जोडले गेलेले अनेक राज्यात कार्यरत हजारो समर्पित कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत.
“बेंगलोर, चेन्नई, उदयपूर येथील राष्ट्रीय अधिवेशन यशस्वीपणे संपन्न झाल्यानंतर यावर्षी पुणे शहर या अधिवेशनासाठी सज्ज झाले आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून या अधिवेशनाच्या तयारीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात देशभरातील बीजेएसचे ३००० कार्यकर्ते, प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मागील अधिवेशनांप्रमाणेच हे अधिवेशन ऐतिहासिक होईल, यात शंका नाही.” असा विश्वास भारतीय जैन संघटनेचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था यांनी व्यक्त केला.
पुण्यात भारतीय जैन संघटनेचे ‘राष्ट्रीय अधिवेशन’,देशातील ३००० प्रतिनिधी सहभागी होणार
घरफोडी करून १२ लाखाचे दागिने विकायला आलेल्या तरुणाला अमरधाम स्मशानभुमीजवळ पकडले
पुणे- उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरफोडी करून सुमारे १२ लाखाचे सोने विक्रीला आलेल्या एका २५ वर्षाच्या तरुणाला हडपसर पोलिसांनी रंगेहाथ पकडले . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ .२५/११/२०२४ रोजी हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार तानाजी देशमुख व अमित कांबळे यांच्या बातमीदांरामार्फत बातमी मिळाली की, हडपसर पोलीस स्टेशन येथे दिनांक २२/११/२०२४ रोजी मार्वेला आर्को सोसायटी, हडपसर मध्ये झालेल्या घरफोडीमधील आरोपी नामे अनिल मिनर्सिंग खडका सद्या रा. माळवाडी, हडपसर व मुळचा नेपाळ हा चोरीचे सोन्याचे दागिने विकण्याकरीता अमरधाम स्मशानभुमी माळवाडी या ठिकाणी येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी वरिष्ठांना कळवुन सापळा रचला
अमरधाम स्मशानभुमी माळवाडी या ठिकाणी आरोपी अनिल मिनसिंग खडका, वय २५ वर्षे, रा. केशव चौक, यश हॉस्पीटलचे शेजारी, माळवाडी, हडपसर, पुणे हा संशयित रित्या आजुबाजुस पाहत स्मशानभुमीच्या दिशेने आल्याने त्यास युनिट ०५ चे पथकाने त्यास शिताफीने पकडले. त्यास पकडल्यापासुन त्याचे पॅन्टच्या खिशामध्ये हात घालुन काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करीत होता. त्याबाबत पोलीसांनी त्याचेकडे चौकशी केली असता, त्याने मार्वेल आर्को सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये सोन्याचे दागिने चोरी केले असुन ते दागिने मी विकण्याकरीता आलो आहे असे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी त्यांची अंगझडती घेवुन त्याचेकडे मिळुन आलेले सोन्याचे एकुण ग्रॅम १७३.५०० वजनाचे एकुण ११,५९,५००/- रु.किं. चे सोन्याचे दागिने असा हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १७८४/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०५ (अ) मधील मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी अनिल मिनर्सिंग खडका याने हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्याला हडपसर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात पुढील कार्यवाहीकरीता देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सपोनि विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार, अमित कांबळे, तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद निंभोरे, विनोद शिवले, स्वाती गावडे, पल्लवी मोरे, शुभांगी म्हाळसेकर, अकबर शेख, राहुल ढमढेरे यांचे पथकाने केली आहे.
रुबी मेडिकल सर्व्हिसेस तर्फे भारतातील पहिल्या अनामया एमआरआय मशीनचे अनावरण
पुणे 26 नोव्हेंबर 2024 : रुबी मेडिकल सर्व्हिसेस तर्फे ताजने माळा,नवीन नगर रस्ता,संगमनेर येथील आपल्या सुविधेमध्ये अनामया या भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीचे 1.5 टी एमआरआय मशीन प्रस्थापित करण्यात आले आहे. मेक इन इंडिया पुढाकार अंतर्गत अद्यावत वैद्यकीय तंत्रज्ञानात अग्रणी असलेल्या आणि रेफेक्स समूहाचा भाग असलेल्या थ्रीआय मेडटेक कंपनीने विकसित केलेले हे मशीन म्हणजे भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रात परिवर्तनीय टप्पा आहे.
आंध्रप्रदेश मधील विशाखापट्टणम येथील मेडटेक झोन (एएमटीझेड) येथे निर्मित केलेले अनामया हे भारतातील अभिनवता व उत्कृष्टतेचा पुरावा आहे.अनामया हे आरोग्याशी निगडीत असून इमेजिंग द पाथ टू वेलनेस या तत्त्वासह विश्वास आणि प्रगतीचे प्रतीक आहे.हे अद्यावत व पथदर्शक एमआरआय मशिन प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानासह अचूक निदान प्रदान करते,त्याचबरोबर जलद स्कॅन,रूग्णांसाठी अधिक सुलभता आणि किफायतशीर प्रक्रिया प्रदान करते.या मशिनचे अनावरण म्हणजे दुर्गम भागांमध्ये जागतिक दर्जाच्या निदान सुविधा प्रदान करण्याचे रूबी मेडिकल सर्व्हिसेसच्या ध्येयाशी सुसंगत आहे.
अनावरणाच्या या कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोडाईजी,कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट व विभागप्रमुख डॉ.प्रणव महादेवकर आणि रूबी हॉल क्लिनिकच्या धोरण व व्यवसाय विकास विभागाच्या सरव्यवस्थापक नताली ग्रांट नंदा यांसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमात दीप प्रज्वलन,अनामया एमआरआय मशिनचे अनावरण करण्यात आले आणि त्यानंतर रूबी हॉल क्लिनिकचा आरोग्य सेवा क्षेत्रातील उत्कृष्टतेचा वारसा दर्शविणारी कॉर्पोरेट फिल्म प्रदर्शित करण्यात आली.
रूबी हॉल क्लिनिकचे चीफ कार्डिओलॉजिस्ट,अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.पी.के.ग्रांट यांनी या महत्त्वाच्या टप्प्याबाबत आपला आनंद व्यक्त केला.ते म्हणाले,मेडिकल इमेजिंग तंत्रज्ञानामध्ये पथदर्शक,अभिनव संकल्पना आणि भारतात असेंबल केलेले अनामया 1.5 टेस्ला एमआरआय स्कॅनर आमच्या संगमनेर युनिटमध्ये प्रस्थापित करणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.हे अद्यावत मशिन म्हणजे केवळ प्रगत तंत्रज्ञान नव्हे तर अद्वितीय प्रतिमा गुणवत्ता आणि निदान अचूकता प्रदान करून रेडिओलॉजिस्टच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करते.किफायतशीर दरासह हे मशिन सर्वांसाठी उपलब्ध होऊन आरोग्य सेवा पुरवठादार आणि रूग्णांमधील दरी भरून काढण्यास मदत करेल.आमचे ध्येय हे सहज उपलब्ध असलेले किफायतशीर,विश्वसनीय आणि जागतिक दर्जाच्या मेडिकल इमेजिंग सोल्युशन्स प्रदान करणे हे आहे.भारतातील आरोग्य सेवा परिवर्तनाचा भाग बनणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
महाजन इमेजिंगचे संस्थापक अध्यक्ष व आयआरआयएचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ.हर्ष महाजन यांनी रूबी मेडिकल सर्व्हिसेस आणि थ्री आय मेडटेकच्या प्रयत्नांचे कौतुक केले.ते म्हणाले की,अनामया एमआरआय मशिनसाठीचे सहकार्य हे भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रातील नवा अध्याय आहे.केवळ अद्ययावतच नव्हे तर किफायतशीर आणि सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकेल,अशा तंत्रज्ञानाची निर्मिती भारत करू शकतो हे यातून दिसून येते.हा पुढाकार आरोग्य सेवेमधील भविष्यातील अभिनव कल्पनांसाठी एक प्रारूप ठरेल.
पुणे शहरात ७५ वी संविधान रॅली संपन्न
पुणे, दि.२६: सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत ७५ वी संविधान रॅली आयोजित करण्यात आली.
भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करून कॅम्प येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे डॉ. दिवसे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून संविधान रॅलीची सुरुवात करण्यात आली. नवीन जिल्हा परिषद – ब्ल्यू नाईल हॉटेल चौक – पोलीस आयुक्त कार्यालय चौक – समाजकल्याण आयुक्तालय – एसबीआय बँक चौक – बंडगार्डन पोलीस ठाणे चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, ससून रुग्णालयासमोर यामार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा येथे संविधान रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी मोठे बॅनर्स, घोषवाक्य फलक घेऊन रॅलीत सहभागी झाले. बार्टी कार्यालयामार्फत चित्ररथाची व्यवस्था करण्यात आली. येरवडा येथील सफाई कामगारांच्या मुलांची शासकीय निवासी शाळा मधील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा परिधान करुन समाजाला समानता-बंधुता व एकात्मतेचे दर्शन घडविले.
यावेळी बार्टीच्या उपायुक्त वृषाली शिंदे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, राधाकिसन देवडे, बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता डॉ. आम्रपाली मोहिते आदी उपस्थित होते.
या संविधान रॅलीमध्ये समाजकल्याण, बार्टी तसेच विविध शाळा, विद्यालय व महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थी यांच्यासह सुमारे ३ हजार नागरि
डॉ.आंबेडकरांच्या घटनेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचा संकल्प महत्वाचा – दीपक मानकर
पुणे- “सामाजिक जीवनाला गतिमान करण्याचे काम हे संविधानाच्या माध्यमातून होत असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचा संकल्प करूयात तो अधिक महत्वाचा आहे असे प्रतिपादन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केले आहे.

“२६ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. २६ नोव्हेंबर या दिवशी भारतीय संविधान व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ “भारतीय संविधान दिन” देशभरात साजरा होत आहे. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राज्यभर २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ना. श्री. अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पुणे स्टेशन रोड, ससून हॉस्पिटल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले, तसेच पुतळ्याच्या आवारामध्ये शहराध्यक्ष दीपक मानकर व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करत भारतीय संविधान दिन साजरा केला.
यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी विचार मांडताना म्हणाले, भारतीय संविधानास आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तुत्वाने भारतीय लोकशाहीला मूर्तिमंत स्वरूप देण्याचे काम त्यांनी केलेलं आहे. या संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीला मजबूत करण्याचे काम होत असून आपणही समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करायला पाहिजे. क्रांतिसूर्य, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष मा. दीपक मानकर, माजी नगरसेवक प्रदीप गायकवाड, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष दत्ता सागरे, उपाध्यक्ष मुनीर सय्यद, सरचिटणीस महेश कुंभार, धनंजय पायगुडे, अमित जावीर, व्यापारी अध्यक्ष वीरेंद्र किराड, फार्मसी सेल अध्यक्ष विनोद काळोखे, आयटी सेल अध्यक्ष मोहन मोरे, विद्यार्थी सेल अध्यक्ष शुभम माताळे, पुणे कॅन्टोन्मेंट कार्याध्यक्ष राहुल तांबे, सांस्कृतिक सेल कार्याध्यक्ष अशोक जाधव, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, कोथरूड महिला अध्यक्ष तेजल दुधाणे, योगेश वराडे, उपाध्यक्ष डिंपल इंगळे, संघटक सचिव करुणा अंथानी, प्रवीण पवार, युवक उपाध्यक्ष गिरीश मानकर, व्यापारी सेल उपाध्यक्ष विशाल आगरवाल, कोथरूड उपाध्यक्ष निलेश शिंदे, संघटक सचिव मुस्ताक शेख, महिला उपाध्यक्ष सुनिता चव्हाण, चिटणीस सुनिता बडेकर, पुणे कॅन्टोन्मेंट ओबीसी अध्यक्ष अतुल जाधव, पुणे कॅन्टोन्मेंट युवती अध्यक्ष अर्चना वाघमारे, फार्मसी सेल उपाध्यक्ष सनी किरवे, नवनाथ खिलारे, संदीप गाडे, शिवाजीनगर विद्यार्थी अध्यक्ष कार्तिक थोटे, चिटणीस भारत पंजाबी, हनीफ शेख, विद्यार्थी कार्याध्यक्ष सत्यम पासलकर, खडकवासला उपाध्यक्ष रोहिदास जोरी, चिटणीस शाम शेळके, संतोष हत्ते आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधान दिनानिमित्त टिळक भवनमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन.
मुंबई, दि. २६ नोव्हेंबर २०२४
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला संविधानाच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष व सामाजिक एकात्मतेचे अधिकार दिले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. २६ जानेवारी १९५० साली हे संविधान लागू करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या या संविधानाला आज ७५ वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे दादर येथील मुख्यालय टिळक भवनमध्ये संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन वाचन करण्यात आले.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष डॉ. अमरजितसिंह मनहास, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, सोनू शुक्ला, सुभाष पाखरे, दत्ता नांदे, नामदेव चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
संविधान साकारणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी ‘संविधान दिन’ साजरा केला जातो. काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी कटीबद्ध असून लोकशाही व संविधान टिकले तरच आपले स्वातंत्र्य अबाधित राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या
हिंदुराष्ट्र ही संकल्पना संविधान विरोधी – निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचे मत
विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने संविधान दिना निमित्त आयोजित भारतीय संविधान विचार संमेलनाचे उद्घाटन
पुणे : महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या, यामध्ये संविधान हा शब्द सत्ताधारी आणि विरिधाक या दोघांच्याही प्रचाराचा प्रमुख भाग होता. मात्र संविधान – संविधान करणाऱ्या या दोन्ही बाजूच्या लोकांनी खरेच संविधान जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? पूर्वीच्या काळी भेदाभेद करणारी संस्कृती चांगली कशी असेल ? असे सवाल उपस्थित करत हिंदुराष्ट्र ही संकल्पना भारतीय संविधान विरोधी असल्याचे मत निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी व्यक्त केले.
विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने संविधान दिना निमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित ‘भारतीय संविधान विचार संमेलन’ च्या उद्घाटन प्रसंगी न्या. ठिपसे बोलत होते. याप्रसंगी निवृत्त पोलिस महासंचालक सुधाकर सुराडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, डॉ. सुरेंद्र जोंधळे (मुंबई) ,इरफान इंजिनिअर ( मुंबई), समाजवादी जन परिषदेच्या अखिल भारतीय अध्यक्षा ॲड. निशा शिवूरकर, ह.भ.प . श्यामसुंदर महाराज सोनार, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे, संमेलनाचे मुख्य आयोजक परशुराम वाडेकर, संमेलनाच्या निमंत्रक, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, दीपक म्हस्के आदि मान्यवर उपस्थित होते. ‘भारतीय संविधानाचे ७५ वर्षे .. विकास व वाटचाल’ हा या संमेलनाचा विषय आहे.
पुढे बोलताना न्या. ठिपसे म्हणाले, भारतीय संविधान आपला देश धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे म्हणते याचा अर्थ कोणत्याही धर्माला इथे संविधाना पेक्षा जास्त महत्व नाही. आज हिंदुराष्ट्र ही संकल्पना मांडणारे जुनी संस्कृती चांगली असल्याचे सांगत आहेत परंतु त्याकाळी असलेली विषमता, भेदाभेद याचे समर्थन होऊ शकत नाही हे वास्तव आहे. आज हिदूराष्ट्र चा नारा देणारे सुद्धा संविधान – संविधान चा उदो उदो करताना दिसत आहेत याचाच अर्थ ज्यांना ते नकोय किंवा बदलायचे आहे ते संविधान प्रेम असल्याचा आव आणत आहेत अशी टीका त्यांनी केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगणारे, चळवळीतील काही नेते, कार्यकर्तेही हिदूराष्ट्रवाल्यांच्या पोस्टरवर झळकत असल्याची खंत न्या. ठिपसे यांनी व्यक्त केली.
आपल्या देशात लोकशाही आहे, लोकशाहीचा अर्थ फक्त बहुमत असा होत नसल्याचे सांगत न्या. ठिपसे म्हणाले, हुकूमशहाला सुद्धा बहुमत लागते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हिटलर आहे. फक्त बहुमत म्हणजे न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य नाही. लोकशाही मध्ये या चार गोष्टी असतात तसेच तिथे अल्पसंख्यांकांचे संरक्षण सुद्धा आवश्यक असते. फक्त बाबसाहेबांचा जयजयकार आणि संविधानाचा उदो उदो न करता संविधानातील विचार रुजविण्याचा, अंगिकारण्याचा प्रयत्न गरजेचे असल्याचे न्या. ठिपसे यांनी नमूद केले.
ह.भ.प . श्यामसुंदर महाराज सोन्नर म्हणाले, भारतीय संविधान हे संताच्या विचारांवर आधारलेले आहे. आज काही महाराज देशाला हिंदूराष्ट्र करण्याची मागणी करत आहेत, हे महाराज देशाच्या आणि संतांच्या विरोधात आहेत, कारण स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुता ही संतांची शिकवण आहे आणि भारतीय संविधान सुद्धा आपल्याला हेच शिकवते. यामुळे संविधान संरक्षण विषयी जागरूकता करण्यासाठी मी पत्रकारिता सोडून वारकरी मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
इरफान इंजिनिअर म्हणाले, आपल्याकडे पूर्वी राजेशाही होती पण संविधानाने ती व्यवस्था पूर्णपणे पलटवली. मात्र आता जाती धर्मांमध्ये भीती पसरवली जात आहे. अल्पसंख्यांक विरोधी वातावरण तयार केले जात आहे. आजचे मनुवादी सरकार कायद्याचे हत्यार करून जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करत आहे.
जोंधळे म्हणाले, आज आपल्या हाती असलेले संविधान हे परिपूर्ण आहे. मात्र ज्या ज्या वेळी यातील मुद्दे हे अव्यवहार्य वाटले त्या त्या वेळी घटनेच्या चौकटीत राहून या संविधानामध्ये बदल करण्यात आले. त्यामुळे आजची भारतीय राज्यघटना ही काळसंवादी आहे. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद यामध्ये आहे. तर उद्देशीका ही भारतीय राज्यघटनेचे नैतिक बलस्थान आहे.
संविधानातील मूल्ये नष्ट करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याची टीका ॲड. निशा शिवूरकर यांनी केली. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी ही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात निवृत्त पोलिस महासंचालक सुधाकर सुराडकर म्हणाले, आज संविधान धोक्यात आहे याचा अर्थ आपले अधिकार धोक्यात आहेत, मात्र याची आपल्याला जाणीव नाही. संविधानाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी पोलिस आणि न्यायपालिकेला त्यांची कर्तव्य करायला भाग पाडा. आज आपली जी वाटचाल सुरू आहे ती पोलीसराज कडे आहे. जे आपल्या देशाला घातक आहे. त्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवायचा असेल तर तो कायदेशीर मार्गानेच ठेवला पाहिजे. त्यामुळे बाबासाहेबांच्या शिकवणी प्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना परशुराम वाडेकर म्हणाले, लोकसभा – विधानसभा निवडणूकीत संविधान – संविधान बोलणारे राजकीय पक्ष आज संविधान दिनाला मात्र झोपलेले आहेत. भारतीय संविधान म्हणजेच विकास आहे हे लक्षात घेऊन आपल्या राज्यकर्त्यांनी वागायला पाहिजे मात्र दुर्दैवाने असे झाले नाही आता होतानाही दिसत नाही. आजही आंबेडकरी चळवळीतील लोक संविधानवर काम करत आहेत, बोलत आहेत इतरांनीही यावर काम केले पाहिजे त्याशिवाय संविधान खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणार नाही.
संमेलनाची सुरुवात सुप्रसिद्ध गायक विजय कावळे आणि पार्टी यांच्या ‘संविधानाचा जलसा’ या गाण्यांच्या कार्यक्रमाणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.
न्यायालये,सरकार, EC जनतेसाठी ..त्यांनी जनतेवर EVM लादू नये ..
अमेरिकेतही मतदान बॅलेटपेपरद्वारेच होते. एलन मस्क यांनीही EVM छेडछाडबद्दल चिंता व्यक्त केली आहे.भारतातच का EVM लादले जाते? मतदान EVM वर करायचे कि बॅलेटपेपर वर याचे स्वातंत्र्य भारतीयांपासून कोणी का हिरावून घ्यावे ?–-शरद लोणकर (पुणे )
मुंबई-न्यायालये जनतेसाठी आहेत ..त्यांनी जनतेवर EVM लादू नये ..ज्यांचा विश्वास नाही त्यांनी का म्हणून EVM स्वीकारावे ? ज्यांना कागदी मतपत्रिकेवर आपले मत नोंदवायचे आहे त्यांना ते नोंदविता का येऊ नये .. न्यायालयांनी जनतेवर EVM नेच मतदान करा असा आदेश लादू नये अशी जनमानसात प्रतिक्रिया उमटत असताना त्याबाबतची दखल घेऊनच महाविकास आघाडीने आता ‘मिशन EVM’ सुरु करण्याचे ठरविले आहे आणि त्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत .आणि कॉंग्रेसने देखील आता EVM विरोधात आवाज उठविला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष खर्गे स्वतः या EVM विरोधातील मोहिमेत सहभागी होणार आहेत .
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. मात्र आता महाविकास आघाडीच्या वतीने यासाठी ईव्हीएम मशीनला दोष देण्यात येत आहे. ईव्हीएम मशीन मध्ये गडबड करून भारतीय जनता पक्षाने हा विजय मिळवला असल्याचा दावा काही नेते करत आहेत. त्यातच आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील ईव्हीएम विरोधात मिशन उघडण्याच्या तयारीत आहेत.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज राज्यभरातील पराभूत उमेदवारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्व उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये ईव्हीएम संदर्भातील माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी वकिलाची एक फौज उभी करण्याची सूचना देखील करण्यात आली आहे. या माध्यमातून कायदेशीर लढाई देखील लढली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत पराभूत उमेदवारांनी रोष व्यक्त केल्याची माहिती देखील समोर आली आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने देखील राज्यभरातील पराभूत उमेदवारांची एक बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीत देखील ईव्हीएम मशीनच्या आकडेवारी बद्दल आपापल्या मतदारसंघातून अपडेट माहिती गोळा करण्याचे आदेश पराभूत उमेदवारांना देण्यात आले आहे. आगामी काळात ईव्हीएम मशीन विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने राज्यामध्ये जन आंदोलन उभे करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही माहिती महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे.
ईव्हीएम मशीनच्या गडबडीच्या माध्यमातूनच महाविकास आघाडीचा पराभव झाला असल्याचा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ईव्हीएम मशीन विरोधात आम्ही आजच नाही तर या आधी पासूनच बोलत असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी गडबड नक्कीच असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे आता या विरोधात जन आंदोलन उभे करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
दरम्यान आजच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. ईव्हीएममधील गडबडीमुळे मतमोजणीत घोळ झाल्याचा दावा मविआच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ईव्हीएम बंद करून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशा मागणीची के.ए. पॉल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असे कसे होऊ शकते? असा शब्दांत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांची कानउघडणी केली.
मोदींच्या दौऱ्यापूर्वी लॉरेन्सकडून चंदीगडमध्ये 2 बॉम्बस्फोट
चंडीगड -3 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंदीगड दौऱ्यापूर्वी मंगळवारी सकाळी सेक्टर-26 मधील दोन क्लबबाहेर स्फोट झाले. लॉरेन्स गँगने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. याबाबत गोल्डी ब्रारने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. प्रोटेक्शन मनी न देणे हे स्फोटाचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले.सेव्हिल बार अँड लाउंज आणि डीओरा क्लबच्या बाहेर झालेल्या स्फोटामुळे क्लबच्या बाहेरील काचा फुटल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध रॅपर बादशाह देखील सेव्हिल बार आणि लाउंज क्लबच्या मालकांमध्ये भागीदार आहे.चंदीगडचा ज्या भागात स्फोट झाले ते पॉश क्षेत्र आहे. जवळच भाजी मंडई आहे. अनेक केंद्रीय संस्था जवळपास आहेत. पोलिस लाईन आणि सेक्टर-26 पोलिस स्टेशनही आहे.मुखवटा घातलेले आरोपी सेक्टर-26 पोलीस ठाण्यातून आले होते. आरोपींनी दुचाकी स्लिप रोडवर उभी केली. प्रथम त्याने सेव्हिल बार आणि लाउंजच्या बाहेर क्रूड बॉम्ब फेकला. यानंतर ते डीओरा क्लबबाहेर बॉम्ब फेकण्यासाठी आले. या दोन क्लबमध्ये सुमारे 30 मीटरचे अंतर आहे

सोशल मीडिया पोस्टमध्ये गोल्डी ब्रारचा हवाला देत लिहिले आहे – ‘गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स गँगचे रोहित गोदारा 2 स्फोटांची जबाबदारी घेत आहेत. या दोन्ही क्लबच्या मालकांना प्रोटेक्शन मनी साठी मेसेज करण्यात आला होता. पण त्यांना आमची कॉल बेल ऐकू येत नव्हती. त्यांचे कान उघडण्यासाठी हे स्फोट घडवले. जो कोणी आमच्या कॉल्सकडे दुर्लक्ष करत आहे, त्याने हे समजून घेतले पाहिजे की यापेक्षा मोठे काहीतरी होऊ शकते.
बॉम्ब फेकणारा तरुण दुचाकीवरून आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. घटनेत वापरण्यात आलेल्या बॉम्बमध्ये खिळे आणि ज्वलनशील पदार्थ भरलेले होते. घटनास्थळावरून संबंधित वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. देशी बॉम्ब (सुतळी बॉम्ब) फुटले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिस खंडणीच्या कोनातूनही तपास करत आहेत.या घटनेचा सीसीटीव्हीही समोर आला आहे. पहाटे 3.15 वाजता एका युवकाने क्लबच्या दिशेने बॉम्बसदृश वस्तू फेकली. त्यानंतर मोठा स्फोट झाला. धुराचे लोट उठताच तरुणाने तेथून पळ काढला.
डीएसपी दिलबाग सिंह यांनी सांगितले की, पहाटे 3.25 वाजता आम्हाला नियंत्रण कक्षात वैयक्तिक समस्येची माहिती मिळाली होती. आमचे तपास अधिकारी घटनास्थळी गेले. एसएसपी कंवरदीप कौर यांनी ऑपरेशन सेल, गुन्हे शाखा, जिल्हा सेल आणि इतर पोलिस ठाण्यांना आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मोदींच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रावर डोळे झाकून सही करणारा मुख्यमंत्री बसवणार: नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिल्लीत घेतली मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधींची भेट.
मुंबई, दि. २६ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांना मोठे बहुमत दिले असताना मुख्यमंत्री ठरवण्यात वेळ लागण्याची गरज नाही. भाजपा युतीला महाराष्ट्राच्या जनतेची चिंता नाही, महाराष्ट्र विकणारा व्यक्ती त्यांना हवा आहे म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही करणारा व्यक्तीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर नेमला जाईल, त्यामुळे उशीर होत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नांदेडचे नवनिर्वाचीत खासदार प्रा. रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्यासह महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे खासदारही उपस्थित होते.
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आमच्या भेटीत पक्षश्रेष्ठींना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाची माहिती देण्यात आली आहे. हा निकाल अनपेक्षित आहेच पण तो जनतेलाही मान्य नाही. जनभावना वेगळ्या आहेत, त्या भावनांचा काँग्रेस पक्षाने नेहमीच आदर केला आहे. ईव्हीएममध्ये गडबड असल्याची चर्चा सुरु आहे, मत एकाला टाकले तर ते दुसऱ्याला जाते असे मतदार सांगत आहेत तर सुप्रीम कोर्ट सिद्ध करून दाखवा असे म्हणत आहे. त्यामुळे ईव्हीएमविरोधात एखादे जनआंदोलन उभारले पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.
संहितेची मागणी लक्षात घेऊन तांत्रिक बाबींचा विचार करा : प्रदीप वैद्य
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित शिक्षक कार्यशाळेला प्रतिसाद
पुणे : नेपथ्य आणि प्रकाश योजनेची गरज किती आहे असा प्रश्न आधी संहितेला विचारा. संहितेची मागणी आणि गरज लक्षात घेऊन तांत्रिक बाबींना महत्त्व द्या, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ प्रदीप वैद्य यांनी दिला.
महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धा तर महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांच्या शिक्षक प्रतिनिधींसाठी आज नेपथ्य आणि प्रकाशयोजना याविषयी द बॉक्स येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी वैद्य यांनी शिक्षकांशी संवाद साधला.
वैद्य म्हणाले, काळानुरूप तांत्रिक बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. स्पर्धेतील एकांकिका सादरीकरणाचा निर्धारित वेळ याचा विचार करून नेपथ्य, प्रकाशयोजनेची आखणी करावी. उपलब्ध साहित्याचा उपयोग करून प्रतिकात्मक नेपथ्य साकारावे, प्रकाशयोजना करताना रंगसंगतीचा विचार करावा. विचारांना चालना देण्यासाठी स्पर्धेतील इतर एकांकिकाही आवर्जून बघा असा सल्लाही त्यांनी दिला.

‘भालबा’साठी 37 तर नातू करंडक स्पर्धेसाठी 28 शाळांचा सहभाग
महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धेत 37 तर महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत 28 शाळांनी सहभाग घेतला आहे. भालबा केळकर नाटिका स्पर्धा दि. 10 ते दि. 12 जानेवारी 2025 तर राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा दि. 13 ते दि. 21 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे. 5 ते 10 वयोगटातील मुलांसाठी भालबा केळकर नाटिका स्पर्धा तर पाचवी ते दहावी या इयत्तेतील मुलांसाठी राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा घेण्यात येते. भालबा केळकर नाटिका स्पर्धेचे यंदाचे 32वे तर राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
कात्रजमध्ये गांजा विक्रेत्या तरुणाला अडीच लाखाच्या गांजासह पकडले
पुणे : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रज परिसरात एका तस्कराकडून २ लाख ४३ हजार रुपयांचा गांजा पकडला. देव नरेश तनेजा (वय २४, रा. कात्रज) असे या तस्कराचे नाव आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार संदिप शेळके यांना बातमी मिळाली की, कात्रज येथील एकता मित्र मंडळ चौकात एक जण गांजा घेऊन येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून देव तनेजा याला पकडले. त्याच्याकडून २ लाख ४३ हजार रुपयांचा गांज पकडण्यात आला असून त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक तपास करीत आहेत.ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा , अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे , पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड , सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार संदिप शेळके, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, संदिप जाधव, उदय राक्षे, दिशा खेवलकर, साहिल शेख, अझिम शेख, आझाद पाटील, निलम पाटील यांनी केली आहे.
तथागत गौतम बुद्धांचा भारत विश्वबंधुतेचे तीर्थक्षेत्र-बंधुताचार्य प्रकाश रोकडे
पुणे, ता. २६: ,”स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संविधानिक मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेली नसून, ती तथागतांच्या धम्मक्रांतीतून आलेली आहेत. सर्वच संत महात्मे आणि समाजसुधारकांनी या मूल्यांच्या प्रस्थापनेवर भर दिल्याने भारत हे विश्वबंधुतेचे तीर्थक्षेत्र बनले हे सत्य असून, त्याला प्रत्यक्ष कृतीतून उजाळा देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध झाले पाहिजे,” असे प्रतिपादन लोककवी वामनदादा कर्डक महाकवी संमेलनाचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी केले.
भारतीय संविधानदिनानिमित्त विश्वबंधुता साहित्य परिषद आणि दर्पण प्रकाशन पुणे यांच्या वतीने आयोजित लोककवी वामनदादा कर्डक महाकवी संमेलनाचे उद्घाटन पहिल्या विश्वबंधुता विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. सविता पाटील यांच्या हस्ते झाले. नवी पेठेतील पत्रकार भवनात आयोजित संमेलनावेळी स्वागताध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री सुनिता कपाळे, प्रकाशक गुलाबराजा फुलमाळी, कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, सौ. पौर्णिमा वानखेडे, कादंबरीकार शंकर आथरे, कवयित्री शिल्पा कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रसंगी ११४ कवींच्या रचनांचा प्रा. चंद्रकांत वानखेडे संपादित ‘विश्वबंधुतेचा बोधीवृक्ष’ हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला. संमेलनात ११० हुन अधिक कवींनी आपल्या काव्यरचना सादर केल्या.
प्रकाश रोकडे म्हणाले, “या देशातील नालंदा आणि तक्षशिला विश्वविद्यालयांमधून या मूल्य विचारांचे शिक्षण दिले जात होते. त्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत होते, हा शाश्वत इतिहास आहे. विश्वबंधुतेचा संदेश देणारा आपला देश आहे. बंधुतेचे हे मूल्य समजून घेत आपण माणूसपणाची भावना वृद्धिंगत करायला हवी. आज जगाला युद्धाची नाही, तर बुद्धाची गरज आहे, हे आपण आत्मसात करायला हवे.”
डॉ. सविता पाटील म्हणाल्या, “आयुष्यात येणाऱ्या अडचणीकडे डोळसपने पाहिले पाहिजे. त्यातून आपल्यातील क्षमता ओळखता येतात. कविता आपल्याला जगण्याची उर्मी देते. भावना व्यक्त करण्याचे व्यासपीठ देते. त्यामुळे ती केवळ मनोरंजन करणारी नव्हे, तर क्रांती घडवणारी असावी. लेखणी क्रांतीचे प्रतीक आहे. या प्रतिभाशाली लेखणीतून समाज परिवर्तन होणारी काव्य निर्माण व्हावीत.”
प्रा. चंद्रकांत वानखेडे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. संविधानदिनानिमित्त उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून प्रत्येकाला बंधुतेचे तिरंगी वस्त्र, संविधान उद्देशिका देऊन सन्मानित करण्यात आले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. गुलाबराजा फुलमाळी यांनी आभार मानले.
अग्निवीर भरती रॅली (पुरुष आणि महिला) , अहमदनगर येथे 14 ते 27 डिसेंबर 2024 पासून.
अग्निवीर आर्मी भरती रॅली (पुरुष आणि महिला) ए.टी यांत्रिकी पायदळ केंद्र आणि शाळा, अहमदनगर
पुणे-महाराष्ट्र राज्यातील सहा जिल्ह्यांतील शॉर्टलिस्ट केलेल्या पुरुष उमेदवारांसाठी (अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे आणि सोलापूर) आणि शॉर्टलिस्ट केलेल्या महिला उमेदवारांसाठी , मुख्यालय रिक्रूटिंग झोन , पुणे यांच्या अंतर्गत अग्निवीर भरती मेळावा होत असून दमण, दीव आणि दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांमध्ये होत आहे 14 ते 27 डिसेंबर 2024 या कालावधीत मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूल, अहमदनगर (पंकज जोशी स्टेडियम) येथे आयोजित करण्यात आली आहे .अहमदनगरचे जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांनी संमती दिली आहेअहमदनगर येथे भरती रॅली यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे
प्रवेशपत्रे जारी करण्यात आली आहेत आणि आगामी भरती रॅलीसाठी उमेदवार उत्साहित आणि प्रेरित आहेत. या भरती रॅलीमध्ये जवळपास 6000 निवडलेले उमेदवार सहभागी होण्याची शक्यता आहे. रॅलीचे आयोजन 1.6 किमी धावणे, शारीरिक तंदुरुस्ती चाचण्या, शारीरिक मोजमाप चाचण्या आणि वैद्यकीय चाचण्यांचा समावेश असेल. लष्करी डॉक्टरांची एक समर्पित टीमही वैद्यकीय तपासणीसाठी अहमदनगर येथे ठेवण्यात येणार आहे . उमेदवारांना सूचनांमध्ये दिल्याप्रमाणे सर्व संबंधित कागदपत्रे मिळविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Agniveer Recruitment Rally (Men and Women), Ahmednagar wef 14 to 27 Dec 2024.
Agniveer Recruitment rally under the aegis of HQ Recruiting Zone, Pune for the Shortlisted Male Candidates of six districts (Ahmednagar, Beed, Latur, Dharashiv, Pune & Solapur) of Maharashtra State & shortlisted Female Candidates, who are domicile of Maharashtra, Gujarat, Goa & UTs of Daman, Diu & Dadra & Nagar Haveli, is being conducted at Mechanised Infantry Centre & School, Ahmednagar (Pankaj Joshi Stadium) with effect from 14 to 27 December 2024.District administration of Ahmednagar and Local Military Authorities have consentedfull support for successful conduct of Recruitment Rally at Ahmednagar.
Admit Cards have been issued and candidates are excited and motivated for the upcoming Recruitment Rally. Close to 6000 shortlisted candidates are likely to participate in the said Recruitment Rally. The conduct of the Rally will comprise of 1.6 Km Run, Physical Fitness Tests, Physical Measurement Tests and Medicals. A dedicated team of Army doctors will also be placed at Ahmednagar for the conduct of Medicals. Candidates have been advised to get all relevant documents as given out in instructions.
देशातील सर्व तीर्थ ज्ञान तीर्थ क्षेत्र व्हावे-हभप यशोधन महाराज साखरे
आळंदीत जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन
पुणे, दि. २६ नोव्हेंबर: “आळंदी ही ज्ञानाची भूमी आहे. हे तीर्थ क्षेत्र मानवाला भवसागरातून पार करून परमार्थाकडे घेऊन जाते. त्यामुळेच देशातील सर्व तीर्थ क्षेत्र हे ज्ञान तीर्थ क्षेत्र व्हावे या उद्देशाने डॉ. विश्वनाथ कराड अविरत कार्य करीत आहेत. ते सहिष्णुतेचे खरे आदर्श व्यक्तीमत्व आहेत.” असे विचार हभप यशोधन महाराज साखरे यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधन पर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सहिष्णुता सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी श्री क्षेत्र देहू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, आळंंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश काका वडगावकर, अशोक उमरगेकर, विठ्ठलराव काळोखे, बाळासाहेब काळोखे व गणपतराव कुर्हाडे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच सौ. उषा विश्वनाथ कराड, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये आणि नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण उपस्थित होते.
हभप यशोधन महाराज साखरे म्हणाले,” सहिष्णूता ही व्यापक असून त्यात विश्व चिंतनाचा समावेश आहे. यामुळे सर्व तीर्थ क्षेत्र हे ज्ञान तीर्थ व्हावे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत ज्ञान पोहचविण्यासाठी कार्य करावं. आळंदीत ज्ञान, नाद, विज्ञान आणि ब्रह्म याची अनुभूती होते. येथील घाटांची निर्मिती करण्यास करण्यास डॉ. कराड यांनी जे सोसले ते पाहता ते खरे सहिष्णूतेचे आदर्श आहेत.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”जगातील सर्व तीर्थ हे ज्ञान तीर्थ क्षेत्र व्हावे या दिशेने कार्य करीत आहोत. अहंकाराचा वारा न लागो अंगी या नुसार आळंदी, देहू, पंढरी ते देवभूमी बद्रीनाथ येथे घडलेले कार्य हा माऊलीचा प्रसादच आहे. विनम्रता, श्रध्दा, भक्ती आणि कर्मयोग हे याचेच फलीत आहे. बद्रीनाथ येथील सरस्वती मंदीराजवळ स्वर्गारोहणाचा मार्ग बनून नवा इतिहास घडला आहे.”
त्यानंतर डॉ. संजय उपाध्ये, सुरेश काका वडगावकर यांनी विचार मांडले.
डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी प्रस्तावना केली व नंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.
हभप शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.
