Home Blog Page 528

‘आंतरराष्ट्रीय उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरून’ आजपासून आंतरराष्ट्रीय प्रवास होणार आणखी सुलभ-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे-

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरुन होणारी सर्व उड्डाणे आता नव्या टर्मिनल वरून होणार असून याची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मंत्री मोहोळ यांनी विमानतळाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला.

पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आले असून या टर्मिनलवरुन होणाऱ्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली आहे. मात्र इमिग्रेशनच्या यंत्रणेबाबतची निर्माणाधीन प्रक्रिया आता पूर्णत्वास गेली आहे. मंत्री मोहोळ यांनी या सर्व प्रक्रियेचा आढावा घेतला आणि तांत्रिक बाबींसंदर्भात माहितीही घेतली.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पुणे विमानतळावरुन आताच्या घडीला एकूण ३ मार्गांवरून ५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु असून ही सर्व उड्डाणे नव्या टर्मिनलकडे स्थलांतरित करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी पुणेकर प्रवाशांसाठी आजवर जुनेच टर्मिनल वापरले जात होते, ज्यावर अद्ययावत सुविधांचा अभाव होता. आता मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात सुखकर होणार आहे.’

‘इमिग्रेशन संदर्भातील तांत्रिक प्रक्रिया पूर्णत्वास नेऊन नवे टर्मिनल आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुणे विमानतळाच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देण्याची मालिका अशीच अखंडित राहील’, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.

शिवाजीनगर एसटी स्थानक लवकरच पूर्वीच्या जागी होईल-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – मेट्रो च्या कामामुळे स्थलांतरित झालेले शिवाजीनगर एसटी स्थानक लवकरच पूर्वीच्या जागी उभे राहील, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (सोमवारी) प्रसारमाध्यमांना दिली.

या स्थानकाच्या स्थलांतराबाबत उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्यासमवेत सिद्धार्थ शिरोळे यांनी आज सविस्तर चर्चा सर्कीट हाऊसवर झालेल्या बैठकीत केली. एसटी स्थानकाचे स्थलांतर लवकरच मूळ जागी करावे, अशी विनंती शिरोळे यांनी, उपमुख्य मंत्री पवार यांना केली. लगेचच पवार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर एसटी स्थानक हलविण्याचे काम लवकर करण्याचे निर्देश महा मेट्रोच्या प्रशासनाला पवार यांनी दिले.

एसटी स्थानक स्थलांतर प्रकल्पाबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) आणि महा मेट्रो (पुणे) यांच्यात करार अंतिम टप्प्यात असून, महा मेट्रो हे काम पूर्ण करणार आहे. हा प्रकल्प लवकर व्हावा, यासाठी दोन्ही बाजू प्रयत्न करणार आहेत, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

प्रार्थना पद्धती वेगळी असली तरी धर्म व देशाप्रती भाव हवा 

हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे आयोजित हिंदू सेवा महोत्सवाची संत संमेलनाने सांगता 
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्म टिकवला आणि वाढविला. त्याच महाराष्ट्रात संत चरणांचे आशीर्वाद मिळणे हे प्रत्येकाचे भाग्य आहे. पैसा, अपत्य किंवा लॉटरी हे भाग्य नाही. संत दर्शन हेच खरे भाग्य आहे. आपल्याकडे प्रत्येकाची प्रार्थना पद्धती वेगळी असली तरी धर्म व देशाप्रती भाव असायला हवा, असा सूर संत संमेलनात उमटला. 
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. याचा समारोप संत संमेलनाने झाला. यावेळी नाशिकच्या महंत वेणा भारती, ह.भ.प.चिदंबरम महाराज साखरे, कीर्तनकार गणेश महाराज भगत, इस्कॉन चे बलभद्रकृपा प्रभू, रासपती प्रभू, परमात्मा प्रभू, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री, इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल, चरणजितसिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
वेणा भारती म्हणाल्या, विश्वाला एकत्र करण्याची मोहीम भारताने मांडली आहे. पुण्यातील महोत्सवात असेच कार्य झाले असून येथे मठ मंदिरांचे साधू संत यांचे दर्शन झाले. अध्यात्म ही वीरश्री असून महाबळ वाढविणारी आहे. अध्यात्म्यात स्वतःची ओळख करून परमेश्वरापर्यंत ते आपल्याला पोहोचवत असते.  
चिदंबरम महाराज साखरे म्हणाले, महाराष्ट्रात असे महोत्सव होणे गरजेचे आहे. पुढील १० ते १५ वर्षात कीर्तन परंपरा चालेल की नाही, अशी शंका काहींना वाटत होती. मात्र अशा महोत्सवातून विश्वास निर्माण होत आहे. तसेच आपल्या परंपरेची ओळख देखील होत आहे. 
बलभद्रकृपा प्रभू म्हणाले, परमेश्वराकडे पाठ फिरवली तर आपण अधर्मि होऊ आणि दुःख सुरु होईल. साधू संतांचे हेच काम आहे की अशा लोकांना परमेश्वराशी जोडणे. त्याकरिता गीता, भागवत वाचन आणि नामजप रोज करायला हवे. आपण परमेश्वराला मार्गदर्शक बनविले, तरच योग्य दिशेला जाऊ शकतो. 
कृष्णकुमार गोयल म्हणाले, देवस्थानाच्या सामाजिक कार्यातून सर्वाना प्रेरणा मिळेल. सेवा, कर्तव्य, त्याग याची महती महोत्सवात पाहायला मिळाली, असेही ते म्हणाले. अशोक गुंदेचा म्हणाले, धर्मावर विश्वास व एकता वाढविणे यासाठी महोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला. शालेय मुला-मुलींमध्ये संस्कार रुजावे, याकरिता देखील अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. धर्माबद्दल सर्वांच्या मनात प्रेम वाढविणे हाच उद्देश होता, असेही त्यांनी सांगितले. किशोर येनपुरे यांनी सूत्रसंचालन केले. 

देशभरातील हुशार विद्यार्थ्यांना पूर्णतः आर्थिक सहाय्य असलेल्या बहुवर्षीय शैक्षणिक कार्यक्रमासाठी अर्ज करण्याचे आमंत्रण

लोढा जिनियस प्रोग्राम आणि अशोका विद्यापीठाची भागीदारी;  9 वी ते 12 वीच्या हुशार विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू· ‘व्हॉट अनलॉक्स युअर जिनियस?’ या डिजिटल कॅम्पेनची सुरुवात· कुटुंबाकडून मिळालेल्या ₹20,000 कोटींच्या निधीनंतर लोढा फाऊंडेशनचा उपक्रम अधिक व्यापक

 पुणे : लोढा फाउंडेशनच्या नुकत्याच स्थापन झालेल्या लोढा जिनियस प्रोग्रामतर्फे अशोका विद्यापीठाच्या भागीदारीने 9वी ते 12वीच्या हुशार विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः प्रायोजित बहुवर्षीय शैक्षणिक कार्यक्रमासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया 1 डिसेंबर 2024 पासून 15 जानेवारी 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. अभिषेक लोढा आणि त्यांच्या कुटुंबाने लोढा फाउंडेशनला दिलेल्या निधीनंतर लगेच हा उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. लोढा जिनियस प्रोग्राम हा बहुवर्षीय उपक्रम आहे, ज्यामध्ये दरवर्षी अशोका विद्यापीठात चार आठवड्यांचा कॅम्पस अनुभव आणि वर्षभर सुरू राहणारे शिक्षण यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम सर्व प्रमुख परीक्षा मंडळांशी सुसंगत आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यास अधिक सखोल करण्यास व निवडलेल्या क्षेत्रात करिअरच्या विविध मार्गांचा शोध घेण्यास याची मदत होते. या उपक्रमात सखोल विज्ञान व गणिताचे अभ्यासक्रम, उपयुक्त जीवनकौशल्ये, सातत्यपूर्ण मार्गदर्शन, आणि विशेष इंटर्नशिप या संधींचा समावेश आहे. हा कार्यक्रमांतर्गत नोबेल पुरस्कार विजेत्यांसह नामांकित शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग असून विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळेपासून त्यांच्या पहिल्या नोकरीपर्यंत मदत करण्यात येते. काही निवडक विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय STEM कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी शिष्यवृत्ती संधी देखील उपलब्ध करून दिल्या जातात. या कार्यक्रमावर प्रतिक्रिया देताना लोढा फाउंडेशनच्या हेड ऑफ एज्युकेशन महिका शिशोदिया म्हणाल्या, “लोढा जिनियस प्रोग्रॅम हा नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या लोढा फाउंडेशनचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे. भारतभरातील विशेष प्रतिभावान मुलांसाठी, त्यांच्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीची पर्वा न करता, शिक्षणाचा दर्जा उंचावणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मुलांचे मूल्यमापन एका प्रवेश परीक्षेद्वारे केले जाते. या परीक्षेत विशिष्ट अभ्यासक्रमावर न भर देता वैज्ञानिक तर्कशक्ती, गणित आणि लॉजिक यावर या परीक्षेत भर देण्यात येतो. त्यानंतर त्यांच्या समस्या-निवारणाच्या क्षमतेनुसार आम्ही विद्यार्थ्यांची निवड करतो आणि प्रतिभावान विद्यार्थी निश्चित करण्यासाठी त्यांची मुलाखत घेतो आणि त्यांना ‘जिनियस’ म्हणतो. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या वर्षात या प्रतिभावान विद्यार्थ्यांना वेगाने प्रगती करण्यासाठी सुयोग्य व्यक्तींशी संपर्क साधून देतो, संधी आणि आयडिया उपलब्ध करून देतो. उद्याचे परिवर्तनकर्ते, नेतृत्व आणि समाजसेवकघडवणे हा लोढा जिनियस कार्यक्रमाचा उद्देश आहे; असे विद्यार्थी जे भारताला शाश्वत भविष्याकडे नेतील आणि राष्ट्र व समाजाच्या विकासासाठी योगदान देतील. “लोढा जिनियस प्रोग्राम हा कठोर शैक्षणिक अध्ययन, मार्गदर्शन आणि वास्तविक जगातील अनुभव यांचा अनोखा संगम आहे. लोढा फाउंडेशनसोबत या उपक्रमात सहभागी होताना आम्हाला अभिमान वाटतो. हा उपक्रम यंदा अधिक पुढे नेऊन शिक्षण क्षेत्र व समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे आमचे ध्येय आहे. गेल्या वर्षापासून भारतातील हुशार विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळत आहे. ही भागीदारी म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून भारताचे भविष्य घडवण्याच्या आमच्या सामूहिक बांधिलकीचे प्रतीक आहे,” असे अशोका विद्यापीठाचे कुलगुरू सोमक रायचौधरी यांनी सांगितले. अशोका विद्यापीठाच्या सायन्स अॅडव्हायजरी कौन्सिलचे अध्यक्ष प्रो. के. विजयराघवन म्हणाले, “लोढा जिनियस प्रोग्राम हा केवळ एखाद्या सामान्य उन्हाळी कार्यक्रमापुरता मर्यादित नाही. तो एक सर्वसमावेशक आणि नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आहे. अशोकामधील आकर्षक उन्हाळी उपक्रमाच्या अनुभवासोबतच, या कार्यक्रमाच्या माध्यमातून वर्षभर सखोल शिक्षण, मार्गदर्शन आणि विकासाच्या संधी उपलब्ध होतात. अशोका विद्यापीठ आणि लोढा फाउंडेशन यांची भागीदारी शिक्षणाच्या माध्यमातून भारतातील भविष्यातील नेतृत्व आणि परिवर्तनकर्त्यांना सक्षम बनवण्याच्या आमच्या सामूहिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे.” संपूर्ण कोर्स आणि त्यातील उपक्रमांचा सर्व खर्च लोढा फाउंडेशन उचलत असल्यामुळे विद्यार्थ्यांवर, त्यांच्या पालकांवर किंवा शाळांवर कोणताही आर्थिक भार येत नाही.देशभरातील प्रतिभावंत मुलांना सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी लोढा फाउंडेशनने ‘व्हॉट अनलॉक्स युअर जिनियस?’ या नावाने एक डिजिटल कॅम्पेन सुरू केले आहे. हे कॅम्पेन पालक, विद्यार्थी, शाळा, शिक्षक (प्रशिक्षक, मार्गदर्शक इ.) आणि सरकारी शिक्षण मंडळांवर लक्ष केंद्रित करते. कॅम्पेनच्या व्हिडिओमध्ये या अनोख्या कार्यक्रमाची झलक पाहायला मिळते आणि तो यूट्यूब व इंस्टाग्रामवर पाहता येऊ शकतो. हा कॅम्पेनमध्ये ‘व्हॉट अनलॉक्स युअर जिनियस? > पीपल, अपॉर्च्युनिटीज अँड आयडियाज’ या संदेशावर भर देण्यात आला आहे. कार्यक्रमाची रूपरेषा· पात्रता : मे 2025 पर्यंत 9वी ते 12वीमधील विज्ञान आणि गणितातील असामान्य कामगिरी केलेले विद्यार्थी.· स्थळ : अशोका विद्यापीठ, सोनीपत येथे वार्षिक कॅम्पस अनुभव, तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून सुरू राहणारे शिक्षण.· महत्त्वाच्या तारखा: अर्ज प्रक्रिया 1 डिसेंबर 2024 पासून 15 जानेवारी 2025 पर्यंत | कॅम्पस अनुभव मे 2025 च्या मध्यापासून जून 2025 च्या मध्यापर्यंत.· शुल्क: विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचा सर्व खर्च पूर्णतः प्रायोजित.· अध्ययन निष्पत्ती : सखोल आणि बहुविषयक शिक्षणाद्वारे विज्ञान आणि गणिताच्या क्षितिजाचा विस्तार. · अर्जासाठी भेट द्या : www.lodhageniusprogramme.com

‘मिशन अयोध्या’ची नवी पोस्ट आणि पोस्टर चर्चेत!

प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीतील अयोध्या राम मंदिराशी जोडलेला आणि मराठी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा  प्रख्यात दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे लिखित आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाचा प्रवास, त्याच्या अत्यंत आकर्षक मोशन पोस्टरमुळे सर्वांचे आकर्षण ठरत असून भक्त आणि चित्रपट रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता तयार झाली आहे. नुकताच या चित्रपटाचे नवे पोस्टर आणि कॅप्शन चर्चेत आली आहे. “पुढच्या पिढयांना आपण कोणता ‘राम’ शिकवणार आहोत? रावणावर विजय मिळवणारा राम कि “रामराज्य” प्रत्यक्षात आणणारा आदर्श ‘राजाराम’? हे दोन प्रश्न या कॅप्शनद्वारे उपस्थित करण्यात आले आहेत. समाजमाध्यमात याविषयी अनेक तर्कवितर्कांसह च्रर्चा सुरु झाल्या आहेत.

भस्मासुरी आगीच्या वावटळीत उभ्या असलेल्या एका पाठमोऱ्या व्यक्तीचा शक्तिशाली प्रतिमाविष्कार, तिच्या हातातील प्रभू श्रीरामांच्या झेंड्याचा तेजस्वी अभिमान आणि पार्श्वभूमीवर ऐकू येणारी प्रभू रामांच्या मंत्र – नामाची भक्तिमय धून असे मोशन पोस्टर चित्रपटगृहांसह सामाजिक माध्यमांवर झळकाल्यानंतर या चित्रपटाविषयी कमालीचे आकर्षण तयार झाले आहे. त्यामुळे आता नव्याने झळकलेल्या या फोटो आणि पोस्टमुळे चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार आहे? यात कोण कोण, कोणत्या कोणत्या, भूमिकांमध्ये आहेत याविषयीचे कुतूहल कायम आहे….

राममंदिर स्थापनेच्या पहिल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत, ‘मिशन अयोध्या’ २३ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

 ‘मिशन ग्रे हाऊस’ चा टीझर रिलीज, 17 जानेवारीला होणार रिलीज

(Sharad Lonkar)

रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि रफत फिल्म्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार झालेला ‘मिशन ग्रे हाऊस’ या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 17 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटात सस्पेन्स, थ्रिल आणि ॲक्शनचा परिपूर्ण मेळ आहे.  

टीझरच्या सुरुवातीला पांढऱ्या टी-शर्टमध्ये एक मध्यमवयीन माणूस एका अंधाऱ्या बंगल्यात भीतीने भरलेला दिसतो. अचानक घराच्या दारात डोक्यापासून पायापर्यंत झाकलेला गूढ व्यक्ती भिंग घेऊन उभा राहतो. काही क्षणांतच या व्यक्तीचा खून होतो, आणि गूढतेची कथा उलगडण्यास सुरुवात होते.  

यानंतर, कबीर राठोडची दमदार एंट्री होते. पोलिसांच्या गणवेशात मोटरसायकलवरून आलेला कबीर गुन्हेगारांशी लढताना दिसतो. ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांच्या हत्येचा सीन, रहस्यमय खुनी हातात रक्तमाखलेला चाकू घेऊन उभा असलेला क्षण, आणि अनुभवी कलाकार किरण कुमार व राजेश शर्मा यांची चिंता या सगळ्यामुळे टीझर रोमांचक बनतो. टीझरच्या शेवटी कबीर आणि मिस्ट्री मॅनमधील तीव्र संघर्ष प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.  

दिग्दर्शक नौशाद सिद्दीकी म्हणतात, “‘मिशन ग्रे हाऊस’ हा चित्रपट एक अनोखी कथा घेऊन येत आहे. या चित्रपटात सस्पेन्स, थ्रिल, ॲक्शन आणि ड्रामाचा उत्तम संगम आहे. अबीर खान या तरुण अभिनेत्यासाठी ही एक मोठी संधी आहे, तर अनुभवी कलाकारांच्या सहयोगामुळे कथा अधिक इम्प्रेसिव झाली आहे.”  

मिशन ग्रे हाऊस, रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि रफत फिल्म्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली, युवा अभिनेता अबीर खान या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. तसेच पूजा शर्मा देखील टेलीविजन नंतर बॉलीवूडमध्ये एंट्री करत आहे. त्याच्यासोबत चित्रपटात दिग्गज कलाकार रझा मुराद, किरण कुमार, राजेश शर्मा, आणि निखत खान महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या अनुभवाने आणि अप्रतिम अभिनया मुळे चित्रपट मनोरंजक बनवला आहे.

चित्रपटाचे संगीत एच. रॉय यांनी दिले आहे. सुखविंदर आणि शान यांसारख्या प्रसिद्ध गायकांची गाणी चित्रपटात आहेत, ज्यामुळे हा चित्रपट एक म्युझिकल थ्रिलर ठरतो. चित्रपटाची कथा झेबा के. यांनी लिहिली आहे. लोणावळा आणि पुणे या ठिकाणी चित्रपटाची शूटिंग करण्यात आलीआहे.  ‘मिशन ग्रे हाऊस’ हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली 17 जानेवारी 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

छतावर सौर ऊर्जानिर्मितीसाठी महावितरणतर्फे मोफत नेट मीटर

0

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२४- छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आता महावितरणतर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर मिळेल. त्यामुळे ग्राहकांना आपल्या प्रकल्पात किती वीजनिर्मिती झाली व घरामध्ये किती विजेचा वापर झाला याची अद्ययावत माहिती मोबाईल ॲपवर मिळेल. मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून ग्राहकांना ही सवलत देण्यात येत आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत तीन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेचे प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत ग्राहकाच्या छतावर बसविलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पात किती वीज तयार झाली, ग्राहकाने घरात किती वीज वापरली व किती अतिरिक्त वीज ग्राहकाकडून महावितरणला विकली गेली याची नोंद करण्यासाठी एक वेगळा नेट मीटर बसवावा लागतो. आतापर्यंत त्याचा खर्च ग्राहकाला करावा लागत होता. आता महावितरणने ग्राहकांना सोलर नेट मीटर विनामूल्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांचे पैसे वाचण्यासोबत त्यांना मोबाईल फोनवरच वीजनिर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिट इत्यादी माहिती दररोज मिळेल. त्यानुसार त्यांना वीजवापराचे नियोजन करून वीजबिल शून्य येण्यासाठी नियोजन करता येईल.

राज्यात सध्या ३ लाख २३ हजार ग्राहकांनी महावितरणकडे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. या सर्व ग्राहकांना महावितरणच्या सोलर नेट मीटर विनामूल्य देण्याच्या निर्णयाचा लाभ होईल.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झाल्यापासून राज्यात ८३,०७४ ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवून योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांची एकत्रित क्षमता ३१५ मेगावॅट आहे व त्यांना केंद्र सरकारकडून ६४७ कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. 

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी www.pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. महावितरण ही या योजनेची अंमलबजावणी करणारी राज्यातील नोडल एजन्सी आहे. महावितरणने यासाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना व पुरवठादारांना महावितरणच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता राहत नाही. नोंदणी केल्यापासून अंतिम मंजुरीनंतर प्रकल्प सुरू करेपर्यंत ‘फेसलेस’ व ‘पेपरलेस’ पद्धतीने काम चालू राहते. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत गतिमानता आली आहे.

बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांनी घेतले व्यवहारज्ञान 

विद्यार्थ्यांनी लावले सुमारे ३० स्टॉल
पुणे : विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान प्राप्त व्हावे आणि गणित विषयाच्या मूलभूत क्रियांना चालना मिळावी, या उद्देशाने बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. मराठी शाळेच्या प्रांगणात ‘बाल आनंद मेळावा’ आयोजित करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ, भाजीपाला, शैक्षणिक साहित्य, खेळण्यांची छोटी दुकाने मांडून व्यवहारज्ञानाचा अनुभव घेतला. याशिवाय नेमबाजी, रिंग फेकणे आणि गंमत जत्रेतील विविध खेळांमधून मुलांनी आनंद घेतला.

शिक्षण प्रसारक मंडळीच्या नू.म.वि. मराठी शाळेच्या प्रांगणात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन शि. प्र. मंडळीचे श्रीकृष्ण चितळे, पराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका माया सोयाम, पर्णल ठाकूर हे उपस्थित होते.

पराग ठाकूर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक जडणघडणीबरोबर स्वसंरक्षणासाठी शाळेत लाठी-काठीचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचप्रमाणे, आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांचा संपर्क वाढावा यासाठी कॉम्प्युटर लॅब सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा याकरिता आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सुमारे ३० स्टॉल लावले होते. विद्यार्थी व पालकांनी मिळून धान्य, कडधान्य, भाजीपाला, शैक्षणिक साहित्य, खेळणी, तसेच घरी बनवलेले केक, चॉकलेट, बिस्किट, मोदक यांसारख्या खाद्यपदार्थांचे प्रदर्शन सादर केले. रिंग फेकणे, बॉलने ग्लास पाडणे, पाळणा, जम्पिंग जॅक अशा खेळांमधून उपस्थितांनी आनंद लुटला.

अखंड ध्यानामध्ये स्वतः जगायला शिका – सरश्री

पुणे-अध्यात्मिक गुरु व लेखक सरश्री यांचा “या… ध्यानामध्ये जगायला शिकूया” हा अध्यात्मिक कार्यक्रम सिंहगड रोड येथील मनन आश्रम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी सरश्री यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. आजच्या धावपळीच्या युगात ध्यान करणे किती गरजेचे आहे. याचे त्यांनी महत्त्व पटवून देत त्याच बरोबर ध्यानामध्ये कसे जगायचे याचा त्यांनी उपस्थितांना कानमंत्र दिला.यावेळी बोलताना सरश्री म्हणाले, की “एखादी गोष्ट मिळवण्यासाठी लोक हजारो तंत्र, मंत्र शिकत असतात, हे करा, ते करा, हे कसे मिळवायचे, ते कसे मिळवायचे याचे मंथन करत बसतात.” सोशल मीडियावर जावून अशा प्रकारचे हजारो व्हिडीओ लोक बघतात. मी कोण आहे. याचा विचार न करता स्वतःला सोशल मीडियावरती शोधत असतात. ज्या ठिकाणी तुम्ही नाहीत. त्या ठिकाणी तुम्ही कसे सापडाल. त्यामुळे आभासी दुनियेत न रमता खऱ्या आयुष्यात आपण सर्वांनी जगायला शिकले पाहिजे. तुम्ही नसलेल्या गोष्टी बनवण्याचा विचार केलात तर तुम्हाला पूर्णत्व मिळणार नाही. तुम्ही म्हणाला मी एक स्त्री आहे, तर स्त्री हे पूर्ण ज्ञान नाही, तो स्त्री असण्याचा एक भाग आहे. आपण जे काही झालो त्यात फक्त समाधान आहे, तुम्ही जे जीवन जगत आहात ते आता संपून जाईल. तुम्हाला स्वत:ला स्वतःबद्दल जाणून घ्यायचे आहे ? मग ध्यान करताना तुम्ही काय गृहीत धरत आहात, जे तुम्ही गृहीत धरत आहात त्यात समाधान आहे ? ध्यानात बसलेले असताना, तुम्हाला काय वाटत आहे? याचा विचार व्हायला हवा. ध्यानामध्ये आपण जगायला शिकल्याशिवाय आपण जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. 

सेलिब्रेटी मास्टरशेफ कार्यक्रमात फराह खान आता सेलिब्रेटिंनाच धारेवर धरणार!

(Sharad Lonkar)

नव्या वर्षात सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर मास्टरशेफ इंडिया हा बहुप्रतिक्षित कार्यक्रम आता पूर्वीपेक्षा जास्त उत्साहवर्धक असेल, हा कार्यक्रम आता सेलिब्रेटी मास्टरशेफ- अब उन सबकी सिटी बजेगी.. या नावाने परत येत आहे.
विविध खाद्यपदार्थांची आवड असलेल्या आणि मनोरंजन करणाऱ्या फराह खान या सदर सेलिब्रेटी मास्टरशेफ कार्यक्रमात सूत्रसंचालन करतील. संबंधित पदार्थांच्या कहाण्या तससेच त्यासंबंधीचे किस्से त्या या कार्यक्रमात सांगतील. रोखठोक आणि अत्यंत प्रामाणिक प्रतिक्रियेसाठी प्रसिद्ध असलेल्या फराह खान या आपल्या किचनमधील सर्वात कठीण टीकाकार असतील. समोर सेलिब्रेटी असले तरीही त्या शब्दांमध्ये भेदभाव करत नाहीत. धारदार प्रतिक्रिया आणि वन लायनर्स याद्वारे त्या स्पर्धकांना जमिनीवर ठेवतात तसेच प्रत्येक डिश तयार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतील.

या कार्यक्रमाबद्दल बोलताना फराह खान म्हणाल्या, “मी खाद्यपदार्थांची शौकिन आहे. पाककृतींचे प्रयोग करणे, नवे पदार्थ चाखून पाहणे, त्यात माझे काही बदल करणे मला आवडते. माझे स्वत:चे डिजिटल चॅनेल तयार करून मी माझे खाद्यपदार्थाबद्दलचे प्रेम प्रवाही केले आहे. मी सेलिब्रेटी मास्टरशेफ या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करण्याची संधी मिळाली तेव्हा मी ती सोडली नाही. या कार्यक्रमाचे स्वरुप मला खूप आवडते. तसेच या स्पर्धेतले उत्कृष्ट शेफ जज, प्रतिभाशाली रणवीर ब्रार आणि विकास खन्ना यांच्याशी मैत्री झाल्याने मला आनंद झाला. मास्टरशेफचा परिवार पहिल्यांदा भारतात आला तेव्हा मी त्याचा एक भाग होते आणि आता सध्याच्या भागात सहभागी असलेले सगळेच अविश्वसनीय सेलिब्रेटी माझ्या चांगलेच परिचयाचे आहेत. त्यामुळे आता आम्ही कार्यक्रमात चांगलाच धुडगूस घालणार आहोत. सूत्रसंचालक या नात्याने मी मास्टरशेफच्या किचनमध्ये मेजनानी देण्यासाठी मी उत्सुक आहे. रोखठोक, आरपार प्रामाणिक प्रतिक्रियांचीच इथे अपेक्षा करा.. कारण ‘सेलिब्रेटी मास्टरशेफमध्ये फराह खान शिट्टी वाजवणार…’ प्रेशर सुरु झाले आहे.. फक्त उत्कृष्ट कलाकारच चमकणार..’’

धनंजय मुंडेंना सातपुडा,पंकजा मुंडेंना पर्णकुटी बंगला .. मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या..कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला ..पहा

मुंबई : राज्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर 8 दिवसांनी मंत्र्‍यांचे खातेवाटपही पार पडले. त्यामध्ये, अनेक नेत्यांच्या खात्यांची खांदेपालट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. तर, काही नेत्यांना पहिल्यांदा मंत्रि‍पदाची संधी मिळाल्यानंतर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ (Minister) खातेवाटपानंतर आता मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठ सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले. त्यामध्ये, विधानपरिषद सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी हा बंगला देण्यात आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul narvekar) यांना शिवगिरी बंगल्याची चावी मिळाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे.चंद्रकांत पाटील यांना सिंहगड बंगला देण्यात आला आहे.

महायुतीच्या 31 मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं असून त्याची यादीही समोर आली आहे. त्यानुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखे पाटलांना रॉयलस्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत तर गणेश नाईकांना पावनगड बंगला देण्यात आला आहे. धनंजय मुंडेंना सातपुडा, देण्यात आला आहे.

शि. द. फडणीस यांना मानाचे रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड

पहिल्या रोटरी डिस्ट्रिक्ट साहित्य संमेलनात होणार गौरव

पुणे : जानेवारीत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड देऊन गौरव केला जाणार आहे, अशी माहिती प्रांतपाल 3131चे शितल शहा यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
शनिवार, दि. 4 आणि रविवार, दि. 5 जानेवारी 2025 या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यवसायिक सेवा देताना सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीस मानाचे रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड देऊन गौरविले जाते. संमेलनाचे निमित्त साधून फडणीस यांचा गौरव केला जाणार आहे.
वयाच्या शंभरीत पदार्पण केलेले शि. द. फडणीस हे आजही तेवढ्याच उर्जेने आणि उमेदिने कार्यरत आहेत. आजही त्यांची व्यंगचित्रे विविध माध्यमांधून प्रसिद्ध होत असून ते आपल्या व्यंगचित्रांद्वारे लोकांना हसवत आहेत. व्यंगचित्रे समाजातील विसंगतीवर टिकात्मक पद्धतीने भाष्य करणारी असतात हा समज फडणीस यांच्या व्यंगचित्रांमधून खोटा ठरला आहे. त्यांच्या शब्दविरहित चित्रांनी खमंग, खुसखुशीत विनोद निर्मिती केली आहे. अनेक लेखकांची पुस्तके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांच्या मख्यपृष्ठांद्वारे त्यांची व्यंगचित्रे समाजमनास भिडली आहेत. शि. द. फडणीस यांच्या प्रयत्नाने कायदाच्या माध्यमातून चित्रकारांना कॉपीराईटचे हक्क मिळवून दिले आहेत. शि. द. फडणीस यांची व्यंगचित्रे देश-परदेशातील आर्ट गॅलरीमध्ये झळकली आहेत.

रंगत-संगत प्रतिष्ठानचा भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार शाम खामकर यांना जाहीर

पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध कवी, गझलकार शाम खामकर (खडकवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांचा भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.
कार्यक्रम रविवार, दि. 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नेवी पेठ येथे होणार असून पुरस्काराचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफल असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून सिने-नाट्य अभिनेत्री, कवयित्री भाग्यश्री देसाई यांची उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गझल मुशायरा आयोजित करण्यात आला असून यात प्रमोद खराडे, नचिकेत जोशी, डॉ. मंदार खरे, सुनिती लिमये, नूतन शेटे, कविता क्षीरसागर, चंचल काळे, डॉ. मृणालिनी गायकवाड, स्वाती यादव, उर्मिला वाणी, डॉ. मृदुला कुलकर्णी-खैरनार, प्रभा सोनवणे, स्वप्नील पोरे यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावातच नाथ असल्यामुळे अनाथांना काळजीचे कारण नाही- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे.

पुणे दि. २३: सनाथ वेल्फेअर फाउंडेशन वर्धा यांच्यावतीने दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिर व अनाथांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी बोलताना नीलमताई म्हणाल्या की, “भविष्यकाळात स्त्रियांच्या चळवळीमध्ये राजकारणामध्ये अनाथ मुलींचा नक्कीच सहभाग मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येईल. त्याचप्रमाणे ४ थे महिला धोरणामुळे मुलींच्या आर्थिक प्रगतीकडे तसेच महिला सक्षमीकरणाच्या विषयात आपल्या सर्वांना निश्चितच प्रगती झाल्याची पाहायला मिळेल.

मुलींच्या अनाथ गृह संस्थांची sop करणे गरजेचे आहे. अनाथ मुला- मुलींच्या विवाह जमावण्यासंबंधी राज्यातील विविध संस्थांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. अनाथ मुलींना बाळंतपणासाठी माहेरवाशींचे प्रेम मिळावे म्हणून अनेक मोठ्या संस्थांशी चर्चा करून एक कक्ष उभारणी बाबतीत सकारात्मक पाऊल उचलण्याविषयी नक्कीच प्रयत्न केला जाईल”, असे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

“आफ्टर केअर वस्तीगृहाच्या निर्मितीकरिता शासनाकडे पाठपुरावा करणार”, असे मतही यावेळी उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांनी मांडले.

माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशी द्या:त्याचा पार हाडे मोडून जीव घेतला, राहुल गांधींच्या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा टाहो

0

परभणी – माझ्या मुलाच्या मारेकऱ्याला फाशी द्या. सोमनाथला 4 दिवस मारले, त्याची पार हाडे मोडून त्याचा जीव घेतला, अशा शब्दांत परभणी हिंसाचारात बळी गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीनंतर न्यायाची याचना केली आहे.

राहुल गांधी यांनी सोमवारी दुपारी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या तो दलित आहे म्हणून करण्यात आल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर सोमनाथ यांच्या आईने पत्रकारांशी बोलताना न्यायाची मागणी केली आहे.

पीडित माता पत्रकारांशी बोलताना म्हणाली, माझ्या मुलाला मारणाऱ्यांना कठोस शिक्षा द्या. त्यांना फाशी द्या अशी मागणी मी राहुल गांधी यांच्याकडे केली. आमचा न्याय लवकर करा अशी विनंती केली. त्यावर त्यांनी जी कायदेशीर कारवाई आहे ती होईल अशी ग्वाही दिली. माझ्या मुलाची मारहाण करून हत्या करण्यात आली. त्याचा खूनच झाला. कारण, माझ्या मुलाला कोणताही आजार नव्हता. त्याला व्यसनही नव्हते. त्याला 4 दिवस मारहाण करण्यात आली. पार हाडे मोडून त्याचा जीव घेण्यात आला. या प्रकरणी संशय तर आहेच.

राहुल गांधी यांनी आम्हाला काय झाले? कसे झाले? याची विचारणा केली. त्यावर आम्ही जे घडले ते सांगितले. माझा मुलाचा मृत्यू झाल्याची गोष्ट पोलिसांनी आम्हाला 5 दिवसांनंतर सांगितली. तुमच्या मुलाचा मृत्यू झाला असून, येऊन बॉडी घेऊन जा असे ते म्हणाले. त्यानंतर आम्ही धावत येत मृतदेह ताब्यात घेतला. आता मुख्यमंत्री माझ्या मुलाचा मृत्यू दमा व हृदयविकाराच्या झटक्याने झाला असे कसे काय सांगू शकतात? असा प्रश्न मी राहुल गांधी यांना विचारला.