Home Blog Page 431

विधानसभेत आदित्य ठाकरे, गुलाबरावांत खडाजंगी:

खाते कळले की नाही,आदित्य ठाकरेंचा सवाल; तुमच्या बापानेच खाते दिले होते,पाटलांचे उत्तर:म्हणूनच तुम्ही पळून गेला होता, आदित्यांचे प्र्त्युत्तर

मुंबई- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पाटलांना तुम्हाला खाते कळाले की नाही, असा सवाल केला. त्यावर पाटलांनी मला हे खाते तुमच्या बापानेच दिले होते असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी म्हणूनच तुम्ही पळून गेला होता, असा खोचक टोला त्यांना हाणला. या प्रसंगाने सभागृहात एकच गदारोळ माजला.

आदित्य ठाकरे आज विधानसभेत चांगलेच आक्रमक दिसून आले. त्यांनी आज राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना धारेवर धरले. राज्याच्या मंत्र्यांनी सभागृहात अभ्यास करून यावा. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल तर तो राखून ठेवावा. मंत्र्याला सांगा अभ्यास करून उत्तर द्या. पण यामुळे मंत्र्यांना त्यांचे खाते कळाले की नाही हा प्रश्न उपस्थित होते, असे ते गुलाबराव पाटलांना उद्देशून म्हणाले.

आदित्य ठाकरे यांची ही खोचक टिप्पणी गुलाबरावांना चांगलीच जिव्हारी लागली. आदित्य ठाकरे खाली बसल्यानंतर ते लगेच जागेवर उभे राहून म्हणाले, अहो यांच्या बापाला कळले होते, म्हणून त्यांनी मला खाते दिले होते. यावेळी त्यांनी वडिलांऐवजी बाप असा शब्द वापरला. ही चूक लक्षात येताच त्यांनी वडील शब्द वापरून सारवासारव केली. पण या प्रसंगाची म्हणजे गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंचा बाप काढल्याची खमंग चर्चा विधिमंडळ परिसरात चर्चा रंगली होती.

उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेना एकजूट असताना गुलाबराव पाटील यांच्यासाठी आदित्य ठाकरे यांचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य असायचा. पण आता शिवसेनेतील बंडखोरीनंतर गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांचा थेट बाप काढण्याइतपत स्थिती बदलली आहे.

आज विधानसभेत गुलाबराव पाटील हे आपल्या विभागाच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. पाणी पुरवठा, युरिया, नॅनो युरिया, शेणखत आदी विविध प्रश्नांवर बोलत असताना आदित्य ठाकरे मध्येच बोलण्यास उभे टाकले. ते पाहून गुलाबराव पाटलांनी त्यांना शांत बसण्यास सांगितले. त्यावर ठाकरे गटाच्या आमदारांनी आक्षेप घेतला. यावेळी वाद वाढल्यानंतर अध्यक्षांनी या दोन्ही नेत्यांना शांत राहून आपापल्या जागेवर बसण्याचे निर्देश दिले.

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी मनसेचा चिंचवडमध्ये मेळावा – बाळा नांदगांवकर

मनसेचा १९ वा वर्धापनदिन मेळावा रविवारी

पिंपरी, पुणे (दि.५ मार्च २०२५) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी (दि. ९ मार्च) सकाळी ९:३० वाजता, राज ठाकरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
बुधवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर, मनसे शहाराध्यक्ष सचिन चिखले, मनसे पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्ष सीमाताई बेलापूरकर, सचिव रुपेश पटेकर, शहर उपाध्यक्ष राजू सावळे, बाळा दानवले, विशाल मानकरी, विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, मयूर चिंचवडे आदी उपस्थित होते.
नांदगावकर यांनी सांगितले की, ९ मार्च रोजी मनसेचा १९ वा वर्धापनदिन आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन साजरा करण्याची संधी पिंपरी चिंचवड मध्ये पहिल्यांदाच मिळत आहे. या मेळाव्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी व नवीन पदांची निर्मिती करण्यासाठी राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
अबू आझमी नेहमी चुकीची वक्तव्य करून लाईम लाईट मध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. मीच मुसलमानांचा तारणहार आहे असे भासवण्यासाठी ते अशी वक्तव्य करतात. अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याची सर्वपक्षीय मागणी योग्य आहे. धनंजय मुंडे यांनी काल दिलेल्या राजीनाम्या विषयी नांदगावकर यांना प्रश्न विचारला असता नांदगावकर म्हणाले की, धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सरकारमध्ये उपइंजिन म्हणून आहेत. लालकृष्ण अडवाणी यांच्यावर आरोप झाले होते त्यावेळी त्यांनी तात्काळ राजीनामा दिला होता. हा भाजपचा इतिहास आहे. “हे राज्य अराजकतेकडे जात नाही ना ?” असे बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य आठवते असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी भविष्यात कोणीही चुकीची वक्तव्य करू नये यासाठी राहुल सोलापूरकर आणि कोरटकर यांच्यावर गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नांदगावकर यांनी केली. चिंचवड येथे होणार्‍या ९ मार्चच्या मेळाव्याची पूर्ण तयारी झाली असून नव्या उमेदीने राज्यभर पक्ष बांधणीस पुन्हा सुरुवात करण्यात येणार असल्याचेही नांदगावकर यांनी यावेळी सांगितले.

जीबीएस रुग्णांसाठीअनुदानात वाढ मिळावी:-आ.शिरोळे यांची मागणी

आरोग्य मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई : उपचारासाठी जीबीएस रुग्णांवर होणारा खर्च जास्त असतो, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अनुदानात वाढ करावी, अशी मागणी आ.सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) विधानसभेत केली.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शिरोळे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. जीबीएस रुग्णांना होणारा त्रास तसेच रुग्णाच्या नातेवाईकांचा होणारा खर्च याचा विचार करून आयुष्मान योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना याद्वारे २लाखापर्यंत दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन आबिटकर यांनी सभागृहाला दिले.

जीबीएस आजारावरील औषधे कुठे-कुठे उपलब्ध आहेत? तसेच कमी दरात ती कशी देता येतील? याचाही विचार झाला पाहिजे, असेही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सभागृहाला सांगितले.

जीबीएस रुग्णांची सर्वाधिक संख्या पुणे शहर आणि जिल्ह्यात आहे. हा गंभीर स्वरूपाचा आजार पसरू नये याकरिता कोणती काळजी घ्यावी? या विषयीची प्रसिद्धी वर्तमानपत्रे, होर्डिंग्ज, सोशल मीडियाद्वारे प्रशासनाने करावी. महापालिकेकडून नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) उघडण्यात आला आहे. या कक्षाच्या फोन नंबर्सची प्रसिद्धी जास्तीत जास्त झाली पाहिजे. ज्यायोगे रुग्णांना नेमकी माहिती मिळेल आणि लवकरात लवकर उपचार करणे शक्य होईल. तरी ही सूचना त्वरीत अमलात आणावी. असे आवाहन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सरकारला केले.

उद्धव ठाकरेंचा घणाघात:म्हणाले – सूरतेला पळालेल्या गद्दारांना ‘छावा’ दाखवा; एकनाथ शिंदें, नीलम गोऱ्हे, अबू आझमींवरही निशाणा

मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आमदारांना छावा चित्रपट दाखवण्याच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला. गद्दारांना छावा चित्रपट दाखवलाच पाहिजे. विशेषतः सूरतेला पळून गेलेल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत कशी लुटली होती हे दाखवण्यासाठी त्यांचाही चित्रपट दाखवला पाहिजे, असे ते म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या पक्षासह महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आमदारांना छावा चित्रपट दाखवण्याच्या मुद्यावरून सरकारचे कौतुक करत एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांवर निशाणा साधला. आमदारांना छावा चित्रपट दाखवण्याच्या संकल्पनेचे मी स्वागत करोत. संभाजी महाराजांवरील छावा चित्रपट दाखवत आहेत. ही चांगली गोष्ट आहे.पण शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपटही दाखवला गेला पाहिजे. आपल्या महाराजांनी सूरत कशी लुटली होती हे सूरतेला पळून गेलेल्यांना दाखवले पाहिजे. त्यांना त्यांचे शौर्य दाखवले पाहिजे. मेलो तरी बेहत्तर, पण त्यांनी धर्म बदलला नाही. त्यामुळे आपल्या संभाजीराजांचा चित्रपट गद्दारांना दाखवलाच पाहिजे, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोगल बादशहा औरंगजेब याचे कौतुक केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झालेल्या सप आमदार अबू आझमी यांच्यावरही भाष्य केले. अबू आझमी यांचे निलंबन किती दिवसांसाठी करण्यात आले हे महत्त्वाचे आहे. कारण, हे निलंबन अधिवेशनापुरते नव्हे तर संपूर्ण 5 वर्षांसाठी करण्याची गरज होती, असे ते म्हणाले.उद्धव ठाकरे यांनी यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निलंबनाचीही मागणी केली. नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यास आमच्याकडून उशीर झाला. आत्तापर्यंत त्या निलंबित होण्याची गरज होती. याच अधिवेशनात त्यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. आम्ही ज्या कारणांसाठी अविश्वास प्रस्ताव दाखल केला, ती कारणे तुमच्यासमोर येतील. याशिवाय पक्षांतर हा देखील विषय आहे, असे ते म्हणाले.दरम्यान, नीलम गोऱ्हे यांच्या मर्सिडीजच्या विधानावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी माझ्या शिवसेनेच्या महिला रणरागिणी व शिवसैनिकांनी त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिल्याचे स्पष्ट केले.

कोश्यारी ,कोरटकर व सोलापूरकरवर कारवाई करण्याचे धाडस दाखवा: नाना पटोले

सत्ताधारी भाजपा सदस्यांचाच सभागृहात गोंधळ; बहुमताच्या जोरावर गोंधळ घालणारे ‘गोंधळी सरकार’.

मुंबई, दि. ५ मार्च २५
भाजपाच्या विचाराचे जे मुळ आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा सातत्याने अपमानच केला आहे. हा प्रकार पूर्वीपासून आजपर्यंत चालत आला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर कारवाई केली जाते मग छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर व राहूल सोलापुरकरवर सरकार कारवाई का करत नाही? छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवावे, असे आव्हान ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिले आहे.

विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रात व राज्यातील भाजपा सरकार हे संविधानाला मानत नाही, ते धर्माच्या आधारावर भूमिका घेऊन कारवाई करते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात इतिहासातील काही घटनांचा उल्लेख केला पण आज वर्तमानात जे घडले आहे त्याचा विचार मुख्यमंत्री का करत नाहीत? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यावर कारावई करण्याचा मुद्दा उपस्थित झाल्यावर सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घातला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींचे समर्थन सत्ताधारी भाजपा आमदार करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत अधिवेशन चालवण्याची जबाबदारी सरकारची आहे पण गोंधळ घालणाऱ्या पक्षाचे हे ‘गोंधळी सरकार’ आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यातील महिलांच्या एका कार्यक्रमातील भ्रष्टाचाराला तत्कालीन मुख्यमंत्री व आत्ताचे नगरविकास तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच जबाबदार आहेत असे प्रतिज्ञापत्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सादर केले आहे. अशा प्रकारे मुख्य सचिवांनी माजी मुख्यमंत्र्यांविरोधात प्रतिज्ञापत्र सादर करण्याची महाराष्ट्रातील ही पहिली घटना आहे. आम्ही विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करणार आहोत, सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांच्या प्रकरणात भाजपा सरकारने अत्यंत जलद गतीने कारवाई करत त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले आणि त्यांना सरकारी घरही तातडीने खाली करायला लावले. राहुल गांधी यांच्यासाठी वेगळा कायदा व माणिकराव कोकाटे यांच्यासाठी वेगळा कायदा, असे दुतोंडी सापासारखे भाजपा वागत आहे. आज शिक्षेला स्थगिती आणली आहे पण ज्या दिवशी शिक्षा ठोठावली त्यावेळीच कोकाटे यांचा राजीनामा घेऊन सदस्यत्व रद्द का केले नाही? असा प्रश्न पटोले यांनी विचारला आहे.

आ.रासनेंना हवेत २ भुयारी रस्ते:शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा..म्हणाले,’ तरच शहरातील कोंडी सुटेल

  • शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्गाचा प्रस्ताव
  • आमदार हेमंत रासनेंनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची भेट, आठवडाभरात होणार अधिकाऱ्यांची बैठक

पुणे (दि ०५) : शहराच्या मध्यवर्ती भागातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक जलद व सोयीस्कर करण्याच्या दृष्टिकोनातून शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या दोन भुयारी मार्गांच्या निर्मितीसाठी आमदार हेमंत रासने यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. या प्रस्तावास गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेत प्रकल्पांच्या मंजुरीसाठी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे तसेच प्रमुख बाजारपेठा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने येथे दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. परिणामी, वाहतूक कोंडी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रस्तावित भुयारी मार्ग हे या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरणार असून, पुणेकरांसाठी हा एक महत्त्वाचा बदल ठरेल.

या प्रस्तावास गती देण्यासाठी हेमंत रासने यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मंजुरीसाठी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, पुढील आठवड्यात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन भोसले यांनी दिले आहे. तसेच, हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असा शब्द दिल्याची माहिती रासने यांनी दिली आहे. खडक येथील रखडलेल्या मामलेदार कचेरीच्या बांधकामाला गती देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.


राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची देखील अधिवेशना दरम्यान भेट घेऊन खडकमाळ येथील पोलिस वसाहतीच्या जीर्ण झालेल्या इमारतींची नव्याने उभारणी करण्याची मागणी रासने यांनी केली आहे.

सामान्य माणसाला सत्ताधारी लोकांकडूनच धोका

पुणे- महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता भाजप खासदार रक्षा खडसे यांची मुलगी असुरक्षित आहे, भाजप बूथ प्रमुख सरपंच संतोष देशमुख ह्यांची सत्तेतील लोकांकडूनच क्रुरपणे हत्या केली जाते, भाजप चा आमदार मंत्री जयकुमार गोरे स्वतःचे विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो ह्या सर्व घटना सत्ताधारी लोकांच्याच आहेत म्हणजे महाराष्ट्राला, सामान्य माणसाला सत्ताधारी लोकांकडूनच धोका आहे हे दिसून येते, आमदार अबू आझमी हा इतिहासाचा अभ्यास नसताना महाराष्ट्रात चुकीचे वक्तव्य करतो, मिंधे चा आमदार तानाजी सावंत हा ७० कोटी चे टेंडर ३००० कोटी वर नेतो, आणि ह्या सर्व गोष्टी घडत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री फडणवीस शांत बसले आहेत की महाराष्ट्रात अशांतता पसरवीत आहेत हा प्रश्न आज सामान्य माणसाला पडला आहे . असाआरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे पक्षाच्या वतीने आज डेक्कन गुडलक चौकात सत्ताधारी महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले,
यावेळी आजपर्यंतचे सर्वात असक्षम असणारे गृहमंत्री फडणवीस यांचा राजीनामा मागण्यात आला तसेच धनंजय मुंडे ह्याला ही सरपंच संतोष देशमुख हत्येस जबाबदार धरून कारवाई करण्यात यावी, महिलांसाठी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणलेला शक्ती कायदा केंद्राने लवकरात लवकर पारित करून घ्यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच धनंजय मुंडे यांच्या पोस्टर ला शेण फासून, जोडो मारो आंदोलन करण्यात आले यावेळी महिला शिवसैनिक आक्रमक झाल्या होत्या त्यांनी महिला सुरक्षा विषयावर सरकारला धारेवर धरले महाराष्ट्राला पार्ट टाईम नव्हे तर फुल टाईम गृहमंत्री असावा अशी मागणी करण्यात आली .

यावेळी आंदोलनास शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महिला सहसंपर्क संघटिका कल्पना थोरवे, उपशहर प्रमुख प्रशांत राणे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, कार्यालयीन सचिव मकरंद पेठकर, उमेश वाघ, विभाग प्रमुख प्रवीण डोंगरे, मुकुंद चव्हाण, महेश पोकळे, संतोष भुतकर, गोविंद निंबाळकर, राजेश मोरे, अतुल दिघे, अजय परदेशी, विलास सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, युवराज पारिख, चेतन चव्हाण, परेश खांडके, गिरीश गायकवाड, महिला आघाडीच्या अमृता पठारे, ज्योती चांदेरे, सुनीता खंडाळकर, गौरी चव्हाण, रेखा कोंडे, विद्या होडे, मृणमयी लिमये, करुणा घाडगे, सोनाली जुनावणे, स्वाती कथलकर, विजया मोहिते, रोहिणी कोल्हाळ, सुनीता दगडे, स्नेहल पाटोळे, वैशाली कापसे, संजय वाल्हेकर, अनिल परदेशी,अमर मारटकर, ज्ञानंद कोंढरे, अशितोष मोकाशी, नितीन निगडे, गणेश घोलप, नागेश खडके, राहुल शेडगे, शशिकांत सटोटे , आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, शाम कदम, जुबेर तांबोळी, दिलीप पोमण, जुबेर शेख, अफाक शेख, दिपक चावरिया, रमेश जुनवणे, प्रकाश धामने, प्रकाश चौरे, हेमंत यादव, कैलास बांदल, संजय गवळी, नीरज नांगरे, मयूर कोंडे, अक्षय हबीब, ओंकार मारणे, गणेश वायाळ, मोहन पांढरे, शैलेश जगताप, संतोष होडे, राजेंद्र खंडाळकर, आशिष अढळ, ओंकार मारणे, अमोल घुमे, नितीन दलभंजन व शिवसैनिक उपस्थित होते.

सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ

हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई, दि. ०४ : माहे नोव्हेंबर २०२४ अखेर पर्यंत सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची टक्केवारी २२ टक्के होती. ती वर्षाअखेर म्हणजेच माहे डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत २५ टक्के इतकी झाली आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ६१३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून ६८३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची टक्केवारी १९ टक्के इतकी आहे. माहे डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ७५३ गुन्हे उघडकीस आणले व ७४८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची ही टक्केवारी २२ टक्के इतकी आहे. यावरून सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.

एखादा सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, सायबर पोलीस ठाणे, केंद्र शासनाचे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीचे पोर्टल व हेल्पलाईन क्रमांक १९३० येथे संपर्क साधून तात्काळ माहिती देण्यात यावी अथवा तक्रार करावी, असे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

नोंद झालेल्या जास्तीत जास्त सायबर गुन्ह्यांची उकल करण्याच्या दृष्टीने पोलीस सतत प्रयत्नशील असतात. जास्तीत जास्त सायबर गुन्हे उघडकीस येण्याकरीता सायबर विभागात काम करणारे अधिकारी व अंमलदार यांना तांत्रिक तपासाचे वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येते. सायबर गुन्ह्यांची उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. सायबर गुन्हे रोखण्याकरीता दैनंदिन स्तरावर पोलीस ठाणे हद्दीत घेण्यात येणाऱ्या नागरिकांच्या कॉर्नर मिटींग, सोसायटी मिटींग, जेष्ठ नागरिकांचे क्लब, झोपडपट्ट्या तसेच शाळा, महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी व त्याची कार्यपद्धती, सुरक्षा विषयक उपाय योजनांची माहिती देण्यात येत आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता फसवणूक करणाऱ्या अॅपपासून सावधानता बाळगण्याचे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

मोहल्ला समित्या तसेच इतर जनतेच्या बैठकांमध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देवून वेळोवेळी चालणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या ट्रेंडविषयी जनजागृती करण्यात येत आहे. अनोळखी व्यक्तीकडून सोशल मीडियावर ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ स्वीकारू नये व त्याला कोणताही प्रतिसाद देवू नये. शाळा व महाविद्यालयाच्या सभेमध्ये आणि निर्भया पथकाच्या बैठकांमध्ये देखील अनोळखी व्यक्तींच्या ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ व प्रतिसाद न देण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. हॅशटॅग #Thodasasochale अन्वये सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः पुढाकार घेऊन तयार केलेल्या व्हिडीओ/चित्रफित इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप व युट्यूबमार्फत प्रसारित करण्यात आल्या आहेत, असे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त यांनी कळविले आहे.

लोहा फाउंडेशनतर्फे मूकबधिर मुलांच्या शाळेसाठी मदतकार्य 

शिक्षण प्रसारक मंडळीचे वि.रा.रुईया मूकबधिर विद्यालयात उपक्रम संपन्न 

पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेष मुलांच्या शिक्षण व कल्याणासाठी लोहा फाउंडेशनने पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळीचे वि.रा.रुईया मूकबधिर विद्यालय, सदाशिव पेठ येथे मदतकार्य आयोजन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गत फाउंडेशनने शालेय साहित्याने भरलेले शाळेचे दप्तर वाटप केले, ज्यामध्ये कंपास, चित्रकलेची पुस्तके, रंगीत पेन्सिल बॉक्स आणि पौष्टिक नाश्ता देण्यात आला. कार्यक्रमास लोहा फाउंडेशनच्या अध्यक्षा संजना लाल, विश्वस्त राजश्री वाणी याही उपस्थित होत्या. तसेच शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका  संगीता शिंदे यांनी लोहा फाउंडेशनच्या या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.

संजना लाल म्हणाल्या, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने मिळावीत तसेच त्यांच्या अभ्यासादरम्यान पुरेशी ऊर्जा टिकवण्यासाठी ही मदत करण्यात आली. लोहा फाउंडेशनचा उद्देश समाजातील गरजू मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हा आहे. या छोट्याशा परंतु महत्त्वाच्या मदतीच्या माध्यमातून आम्ही या होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, हा आमचा प्रयत्न आहे. या मदतकार्याचा एक भाग म्हणून फाउंडेशनने शिक्षणाच्या माध्यमातून वंचित विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा संकल्प व्यक्त केला.

लोहा फाउंडेशन अनेक वर्षांपासून समाजोपयोगी उपक्रमांमध्ये अग्रेसर आहे. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकास यावर भर देत हे संस्थान गरजू विद्यार्थ्यांसाठी सातत्याने कार्यरत आहे. आजचे हे मदतकार्य हा केवळ एक टप्पा असून, भविष्यातही अशाच समाजोपयोगी कार्याला चालना दिली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. 

रंगावलीकार चारुदत्त वैद्य यांचा सन्मान

श्रीरंग कलादर्पण फाउंडेशन तर्फे आयोजन ः ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु व प्रवचनकार स्थितप्रज्ञानंद सरस्वती माताजी यांची उपस्थिती

पुणे : श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनच्या वतीने चारुदत्त वैद्य यांना श्रीरंग कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रंगावलीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांना दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 

बालगंधर्व कलादालन येथे शिल्पकार प्रमोद कांबळे व ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु व प्रवचनकार स्थितप्रज्ञानंद सरस्वती माताजी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे प्रा.अक्षय शहापूरकर, अजित पवार, जगदीश चव्हाण, प्रतीक अथणे, महादेव गोपाळे, श्रीहरी पवळे  हे उपस्थित होते. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

चारुदत्त वैद्य हे कलाकार असून त्यांनी नोकरी सांभाळून चित्रकला, रांगोळी चे वर्ग घेतले व त्यामाध्यमातून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत त्यांना व त्यांच्या विद्यार्थ्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत. त्यांच्या कलाक्षेत्रातील भरीव कामगिरी मुळे त्यांना विविध संस्थांनी सन्मानित केले आहे. तसेच अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणेच्या वतीने त्यांना कला सांस्कृतिक नेतृत्व पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.

महिलांनी अनुभवला ऍडव्हेंचर बाईकचा थरार..

पुणे – अनेक तरुणींना लेह लडाखला दुचाकीवर प्रवास करण्याची अथवा ऍडव्हेंचर बाईकवर राईड मारण्याची इच्छा ‘बकेटलिस्ट’ असते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांच्या या बकेटलिस्ट अपूर्णच राहतात. तरुणींची नेमकी हीच इच्छा पुण्यातील उद्योजिका शुभांगी सावंत यांनी पूर्ण केली. महिलांना क्षणभर विरंगुळा मिळावा व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने महिला दिनानिमित्त शुभांगी इंडस्ट्रीच्या वतीने ऍडव्हेंचर बाईक राईडसह विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. लोहगावमधील खांडवे नगर येथील मैदानावर हा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी स्त्री-शक्तीचा सन्मान करुन विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये २०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला व बाइकर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये इंडोनेशिया सह मुंबई, जयपूर मधून देशातील इतर शहरांतून ४० हुन अधिक बाईकर्स सहभागी झाले होते. विविध राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पोर्ट्स बाईक्सचे दर्शन यावेळी बाईकप्रेमींना बघायला मिळाले.

यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक सतीश मुंद्रा, डॉ. राजेंद्र शिंपी, शुभांगी इंडस्ट्रीच्या शुभांगी सावंत, मोटोपार्क१९९चे रुपेश चोंधे उपस्थित होते.

बाल मानसोपचारतज्ज्ञ असणाऱ्या शुभांगी सावंत यांनी साधारणतः पंधरा वर्षांपूर्वी लोहगाव भागात जागा खरेदी केलेली. अधून मधून त्याठिकाणी भेट देत असत, त्यानिमित्ताने त्यांची भेट तेथील महिलांशी होत असे, भेटीवेळी तेथील महिला सातत्याने त्यांना ‘या ठिकाणी फॅक्टरी टाकताय का?’ हा एकच प्रश्न विचारत. शिक्षणाचा अभाव व नाजूक आर्थिक परिस्थिती असलेल्या महिलांची अवस्था पाहून त्या अस्वस्थ झाल्या. या महिलांना त्यांच्या भागात रोजगार मिळावा या उद्देशाने शुभांगी सावंत यांनी “शुभांगी इंडस्ट्रीची” निर्मिती केली. शुभांगी इंडस्ट्रीच्या माध्यमातून विविध घरगुती मसाले तसेच स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या लिक्विड निर्मितीवर भर दिला. त्यासाठी स्थानिक महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक सक्षम केले. केवळ यावर न थांबता त्यांना अर्थ साक्षर करत बचत गटाची निर्मिती केली. यातून त्यांच्या परिवारासाठी विविध कार्यक्रम घेत मानसिक, सामाजिक जनजागृती करण्यास सुरुवात केली. महिला दिनाचे निमित्त साधत शुभांगी यांनी महिलांची “बकेटलिस्ट” पूर्ण केली.

शुभांगी सावंत म्हणाल्या की, प्रत्येक तरुणींना आपले छंद जोपासण्यासाठी दैनंदिन जीवनातून वेळ काढणे त्यांना शक्य होत नाही. साहसी खेळांचा अनुभव हा नेहमीच जगायला नवीन ऊर्जा प्रदान करणारा असतो त्यामुळे महिलांसाठी हा कार्यक्रम घेण्याचे ठरविले. यावेळी दैनंदिन जीवनातून वेळ काढत अनेक गृहिणींनी कौतुकाने बाईक रायडर तरुणींशी संवाद साधला. विना गियर दुचाकी चालविणाऱ्या तरुणींनी ऍडव्हेंचर बाईक चालविण्याचे तंत्र शिकून घेतले. यावेळी अनेक तरुणींनी आपल्याला लेह लडाखला दुचाकीवर प्रवास करण्याची इच्छा ‘बकेटलिस्ट’ व्यक्त केली. मात्र रक्त गोठवणाऱ्या थंडीतून, दर्या खोर्यातून, नदीच्या प्रवाहातून, वाळवंटातून, अपुऱ्या ऑक्सिजन असलेल्या वातावरणातून अनेक संकटांवर मात करत प्रवास यशस्वी कसा करायचा याविषयीच्या अनेक गोष्टी यानिमित्ताने तरुणींना कळाल्या.

‘नामदेव तुझा बाप’ म्हणत कवी, साहित्यिकांचे अभिनव आंदोलन

सेन्सॉर बोर्डाच्या कोण नामदेव ढसाळ? या प्रश्नाला सम्यक साहित्य संमेलन, पुणेच्या वतीने अभिनव पद्धतीने उत्तर

पुणे : भारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाने विद्रोही कवी, पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ  पुण्याती साहित्यिक, कवी यांनी एकत्र येत अभिनव पद्धतीने गुदळक चौकातील कलाकार कट्ट्यावर आंदोलन केले.  ‘नामदेव तुझा बाप’ असे म्हणत नामदेव ढसाळ यांच्या कविता व लेखनांचे वाचन, आणि विद्रोही कवितांचे सादरीकरण करत सेन्सॉर बोर्डाच्या कोण नामदेव ढसाळ? या प्रश्नाला उत्तर दिले. 

सम्यक साहित्य संमेलन, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्या वतीने या अभिनव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार  म. भा. चव्हाण होते. या आंदोलनात पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, राहुल डंबाळे, दंगलकार नितीन चंदनशिवे, प्रा.राजा भैलूमे, डॉ.  निशा भंडारे, किरण सुरवसे, सागर काकडे, हृद‌मानव अशोक,  रोहित पेटारे उर्फ मिर्झा, कला दिग्दर्शक संतोष सखंद, दीपक म्हस्के, कुमार आहेर, विठ्ठल गायकवाड, आनंद जाधव, आकाश सोनवणे, डॉ. शुभा लोंढे, नागेश भोसले यांच्यासह मान्यवर साहित्यिक, कवी सहभागी झाले होते.

म. भा. चव्हाण म्हणाले, नामदेव ढसाळ हे जागतिक साहित्यिक होते. ते जातीय साहित्यिक नाहीत. बहुजनांचे आग्रदुत होते ते. त्यामुळे एका साहित्यिकाला आपण विशिष्ट जातीत बंद करणे योग्य नाही.

नितीन चंदनशिवे म्हणाले, नामदेव ढसाळ यांची कविता ही नुसती कविता नव्हती तर ऑन ड्युटी 24 असणारी व्यवस्था होती. त्यांच्या कवितांनी केवळ पुस्तकात येवून स्थान मिळवलेले नाही. काही कविता लिहायच्या असतात, काही वाचायच्या असतात तर काही कविता या बोंबलायच्याच असतात. मराठी साहित्याला बोंबलायची सवय नव्हती ती सवय ढसाळ यांच्या  साहित्याने लावली. मात्र आजच्या हेडफोन लावणाऱ्या पिढीला तो आवाजच ऐकायलाच येत नाही.

परशुराम वाडेकर म्हणाले, नामदेव ढसाळ कोण? असं म्हणत त्यांच्या कवितांवर आधारीत एका चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली. ढसाळांच्या कवितांपेक्षा आक्षेपार्ह चित्रीकरण आजकालच्या चित्रपटात पाहायला मिळत पण ते सेन्सॉर बोर्डाला दिसत नाही. ढसाळांनी आपल्या लेखणीतून कामगार, मजूर यांना केंद्रस्थानी ठेवून फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार पसरवण्याचे काम केले. त्यांच्या कवितांची दाखल घेवून भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. पण  आज त्या सरकारला नामदेव ढसाळांचा विसर पडला आहे. ढसाळ यांची कविता प्रत्येकाच्या मनामनात पोचली आहे. गरिबांचा विद्रोह त्यांनी आपल्या लेखणीतून मांडला. त्यांच्या कविता मधील शिव्यांमध्ये ही प्रेम आहे.

दरम्यान, बुद्धगया येथे सुरू असलेल्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. नामदेव ढसाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि राष्ट्रगीताने या अभिनव आंदोलनाची सांगता झाली. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे यांनी केले तर दीपक म्हस्के यांनी आभार मानले.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी बौद्ध अनुयायांचा महामोर्चा

  • बौद्ध भिख्खूंच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येत अनुयायी होणार सहभागी

पुणे : बिहार मधील बुद्धगया येथे तथागत भगवान गौतम बुद्धांचे हजारो वर्षापासूनचे विहार असताना देखील त्याचा ताबा  मात्र बौद्धेतर विशेषता ब्राम्हणी धर्मपंडितांकडे आहे. ही बाब जगातील सर्वच व्यक्तींना खटकत असून महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध अनुयायांच्या देखरेखी खाली कार्यान्वित असावे असा संविधानीक अधिकार आहे. यासाठी गेल्या १०० वर्षापासून व्यापक लढा देखील सुरु आहे. सध्या बुद्धगया  येथे जगातील सर्वच बौद्ध भिख्खूंचे प्रतिनिधी आंदोलन करत आहेत. याच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी बौद्ध अनुयायांचा महामोर्चा पुणे शहरात आयोजित करण्यात आला आहे. बौद्ध भिख्खूंच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने अनुयायी या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती, पुणेच्या वतीने आज देण्यात आली. 

भदंत नागघोष महाथेरो.. भंते राजरत्न .भंते बुद्धघोष थेरो ..भंते धम्मधर थेरो.भंते पय्यारक्खित.भंते धम्मानंद…भंते यश..भंते प्रियदर्शी भंते सुमंगल, भंते राहुल यांच्या नेतृत्वाखाली  शनिवार, दि. ८ मार्च रोजी दुपारी 3 वाजता हा महामोर्चा  बालगंधर्व चौक येथून सुरू होणार आहे. डेक्कन, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे अलका चौकात मोर्चाचा समारोप होणार आहे. 

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी  देशात अनेक जण आमरण उपोषण करून आपला प्राण पणाला लावत आहेत. बिहार राज्य  सरकार हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.  बिहार सरकारचा बुद्ध गया मंदिर कायदा १९४९ रद्द करण्यात यावा, आणि संपूर्ण महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावे ही या महामोर्चाची प्रमुख मागणी असल्याचे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती, पुणेच्या वतीने सांगण्यात आले.

“निर्जन आणि अंधाऱ्या २७४ ठिकाणी प्रकाश व्यवस्था सुधारणा”, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निर्देशानुसार पुणे महापालिकेची तातडीची कार्यवाही

पुणे, दि. ५ फेब्रुवारी २०२५ : पुणे शहरातील निर्जन आणि अंधाऱ्या २७४ ठिकाणी प्रकाशव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या पोलिसांच्या विनंतीनुसार, पुणे महानगरपालिकेने तातडीने कार्यवाही करून नवीन पथदिवे बसवण्याचे आणि अक्षम पथदिव्यांचे दुरुस्तीकरण करण्याचे काम पूर्ण केले आहे. या उपक्रमामुळे रात्रीच्या वेळी सुरक्षा वृद्धी होईल आणि शहरातील निर्जन भागांमध्ये प्रकाशाची सोय निर्माण होईल. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी १ जानेवारी रोजी दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेने ही कार्यवाही अंमलबजावणी केली असून, पुढील व्यवस्थेची ग्वाही पत्राद्वारे देखील दिली आहे. यामुळे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी डॉ. राजेंद्र भोसले (महानगरपालिका आयुक्त), उपायुक्त (परिमंडळ कार्यालय क्रमांक २), व श्री अविनाश सकपाळ यांचे आभारही मानले.

शहरातील प्रमुख भागांमध्ये कार्यवाही

महापालिकेच्या परिमंडळ कार्यालय क्रमांक २ अंतर्गत शिवाजीनगर-घोलेरोड, कोथरूड-बावधन आणि औंध-बाणेर या तीन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रकाश व्यवस्था सुधारण्याचे काम करण्यात आले. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करून आणि नवीन पथदिवे बसवून प्रकाश यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रातील कामे

  • डेंगळे पुलाखाली नवीन पथदिवे बसवून प्रकाशयोजना
  • पाटील इस्टेट परिसरातील ब्रिजवर ब्रेकेट लावून उजेड
  • आपटे रस्त्यावर आणि रामोशीवाडी परिसरात नवीन पथदिवे
  • वाकडेवाडी, जनवाडी, पांडवनगर येथे बंद दिवे सुरू

कोथरूड-बावधन क्षेत्रातील कामे

  • सार्थ शिल्प सोसायटी, एकलव्य कॉलेज, परमहंस नगर येथे पथदिवे बसवून प्रकाश व्यवस्था
  • गोपीनाथ नगर, परांजपे शाळा ते कमिन्स कंपनी मागील गेट, शिंदे नगर लेन नं. ३ येथे पथदिवे
  • चांदणी चौक बस स्टॉप, कोथरूड डेपो, ARAI रोड येथे नवीन पोल

औंध-बाणेर क्षेत्रातील कामे

  • पाषाण-सुतारवाडी, बालेवाडी, पाषाण जलशुद्धीकरण केंद्र परिसरात प्रकाशयोजना
  • महादेव वाडी, सुसरोड, भाऊ पाटील रोड येथे उजेड
  • संजय गांधी लमाणतांडा वसाहत, बोपोडी-आदर्शनगर स्मशानभूमी येथे सीसीटीव्ही आणि प्रकाशयोजना

नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल

पुणे महानगरपालिकेने आधीपासून असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती केली. ज्या ठिकाणी अद्याप सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाही, तिथे लवकरच ते बसवले जाणार आहेत.

या उपाययोजनांमुळे पुणे शहरातील निर्जन ठिकाणी सुरक्षितता वाढेल. विशेषतः महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे उपक्रम उपयुक्त ठरणार आहेत.

लाडकी बहीण:2100 रुपये याच अर्थसंकल्पात देणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलंच नाही : अदिती तटकरे

मुंबई -मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojana )विधानपरिषदेत वादळी चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षांकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब ( Anil Parab), काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रश्न विचारले. तर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे (Minister Aditi Tatkare) यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. अनिल परब आणि सतेज पाटील यांनी 2100 रुपयांच्या संदर्भात प्रश्न विचारले असता जाहीरनामा 5 वर्षांचा असतो असं उत्तर अदिती तटकरे यांनी दिलं. आहे

लाडकी बहीण योजनेबद्दल आम्ही दर दिवशी बोलत असतो. ही लक्षवेधी लाडक्या बहिणींची आहे. किती बहिणी अपात्र होणार आहेत किंवा निकष आधी का लावले गेले नाहीत? असा प्रश्न करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सरकारला धारेवर धरले. या योजनेसाठी जी तरतूद गरजेचे होती, ती केली गेली का? पण आता महिलांना अपात्र करत आहात. नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना दोन्हीचा लाभ काही महिला घेत आहेत. म्हणजे सरकारची फसवणूक केली जात आहे. यावर सरकार काय कारवाई करणार असा सवाल देखील परब यांनी उपस्थित केला. सरकार कारवाई करणार का? ज्या अधिकाऱ्यांनी सरकारच्या पैशांचा अपव्यय केला आहे, ते दोन्ही लाभ देऊन त्यांच्यावर काय कारवाई करणार आहात? असा सवालही त्यांनी केला. अर्थसंकल्पावेळी लाडक्या बहिणांनी 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली होती, ते 2100 रुपये कधी देणार असा सवालही परब यांनी उपस्थित केला होता.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीत किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करु अशा पद्धतीचं वक्तव्य कुठंही केलं नाही असे अदिती तटकरे म्हणाल्या. राज्य सरकार एखादी योजना जाहीर करत असतो. 100 टक्के देणार, जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो, या अर्थसंकल्पात 2100 अशा पद्धतीचं वक्तव्य कुठंही केलेला नाही. जाहीरनामा पाच वर्षांसाठी जाहीर केला जातो. योग्य पद्धतीनं त्यासंदर्भातील प्रस्ताव विभाग म्हणून शासन आणेल. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ ज्यावेळी सूचित करेल त्यावेळी तशा प्रकारचा प्रस्ताव विभाग तयार करेल असे सुळे म्हणाल्या.

लाडकी बहिण योजना ही महायुती सरकारची सर्वात महत्वाची योजना आहे असं अदिती तटकरे म्हणाल्या. आधीपासून टीका होत राहिली पण महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

2 कोटी 63 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. तपासणीची प्रक्रिया ऑगस्टपासून आम्ही सुरुवात केली होती. संजय गांधी निराधार योजनेतील डेटा आम्हाला प्राप्त झाला, त्यात 1 लाख 97 हजार महिलांचा डेटा आला आहे. ही प्रक्रिया सुरु होती म्हणून तसे अर्ज झाले तसा डेटा प्राप्त होत गेला. सप्टेंबरमध्ये जेव्हा अर्ज भरले गेले तेव्हा 2 लाख 54 हजार निराधार योजनेचा डेटा आम्हाला मिळाला असल्याचे अदिती तटकरे म्हणाल्या. ऑक्टोबर डिसेंबरमध्ये आचारसंहिता होती म्हणून तपासणी प्रक्रिया बंद होती. डेटा आम्ही स्वतः परस्पर करत नाही. इतर विभागाकडून आम्हाला डेटा येतो असेही तटकरे म्हणाल्या. त्या त्या पद्धतीने कारवाई करत आम्ही गेलो.

लाडक्या बहिणीचा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हप्ते काढले होते त्यावेळी देखील निकषात बदल केले नव्हते. स्थानिक पातळीवर आम्हाला जशा तक्रारी आल्या, तशी करवाई आम्ही करत गेलो असे तटकरे म्हणाल्या. RTO वरुन जो डेटा मिळाला तशी कारवाई केली गेली आहे. जुलैमध्ये 5 लाख महिला अशा होत्या ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हते. तेव्हा आपण आधी प्रक्रिया सुरु केली. त्यानंतर महिलांना खात्यात लाभ दिला गेला असेही तटकरे म्हणाल्या. 21 ते 65 वय असणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे. 65 नंतरच्या महिला बाद केल्या जातील असेही तटकरे म्हणाल्या.