Home Blog Page 407

महिलेला देण्यासाठी 1 कोटी जयकुमार गोरेंकडे आले कुठून?:एवढी मोठी रक्कम देण्याइतकं त्या महिलेकडे काय, रोहित पवारांचा सवाल

मुंबई-जयकुमार गोरे यांनी त्या महिलेला 1 कोटी रुपये दिले, पण हे पैसे त्यांच्याकडे आले कुठून हा मोठा प्रश्न आहे. गोरेंना जर वाटते की आपण काही चूक केलेली नाही तर इतके पैसे तिला देण्यासारखे तिच्याकडे काय आहे, असा सवाल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान रोहित पवार म्हणाले की, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केलेल्या महिलेने करार केला होता की त्या महिलेला कुणी त्रास देणार नाही, त्या करारामुळे ते कोर्टातून सुटले. पण तो करार करण्याची गरज काय असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे. हायकोर्टमधील महिला न्यायाधीश होत्या त्यांनी त्या प्रकरणी ताशेरे का ओढले? या सर्व गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. पण त्या महिलेला जी अटक केली आहे, त्याचा अभ्यास केला पाहिजे.

रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, जयकुमार गोरे यांच्याकडे 1 कोटी रुपये आले कुठून हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही जर धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात तर तुमच्याकडे पैसे मागत असेल तर काहीच परवा नसेल तर दुर्लक्ष करत पोलिसांत जाता आले असते. पण तुम्ही पैसे पाठवले.

जयकुमार गोरे यांच्या प्रकरणी खरात नावाच्या पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना जेलमध्ये टाकत आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. त्या महिलेबद्दल जी माहिती येत आहे, त्याबद्दल मला माहिती नाही. 1 कोटी खंडणी प्रकरणी त्या महिलेला अटक केली हे आपण थोड्यावेळ खरं मानू पण तिला 1 कोटी रुपये दिले का? त्या महिलेकडे असे काय होते की तिला 1 कोटी रुपये देण्याची वेळी आली, असा सवाल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक:1 कोटीची खंडणी घेताना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

सातारा – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक केली आहे. 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी घेतले ताब्यात. सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची मागणी करत 1 कोटी स्वीकारत असताना कारवाई करण्यात आली.

दरम्यान रोहित पवार म्हणाले की, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केलेल्या महिलेने करार केला होता की त्या महिलेला कुणी त्रास देणार नाही, त्या करारामुळे ते कोर्टातून सुटले. पण तो करार करण्याची गरज काय असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे.

सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत. 2016 मध्ये आमदार असताना जयकुमार गोरे यांनी महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक महिने स्वतःचे नग्न फोटो महिलेला व्हॉट्सॲपवर पाठवले होते. या त्रासाला कंटाळून महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी गोरेंनी प्रथम सातारा जिल्हा न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने त्यांचा अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर गोरे यांना अटक होऊन 10 दिवसांची जेलवारीही झाली होती.

या घटनाक्रमानंतर जयकुमार गोरे यांनी 2016 मध्ये सातारा जिल्हा न्यायालयात पीडित महिलेची लेखी माफी मागितली. तसेच पुन्हा त्रास देणार नाही, अशी वकिलांमार्फत हमीही दिली. पण आता महायुती सरकारमध्ये जयकुमार गोरे यांना ग्रामविकास मंत्रिपदाचे ‘बक्षीस’ देण्यात आले आणि त्यांनी महिलेला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. जानेवारी 2025 पासून अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर पीडितेने 2016 मध्ये दाखल केलेली तक्रार व्हायरल करण्यात आली. त्यामुळे पीडितेचे नाव उघड झाले. तिची बदनामी केली गेली. 9 जानेवारी 2025 रोजी पीडित महिलेच्या घरी पत्र आले. त्यात 2016ची तक्रार होती. हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी सुरू आहे, असे पीडित महिलेने म्हटले.

जयकुमार गोरे यांनी आपले पीए अभिजित काळे यांच्यामार्फत माझ्याविरोधात दडिवाडी पोलिस ठाण्यात 2 कोटी खंडणीची तक्रार दाखल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला अशी माहिती त्या महिलेने दिली होती.

काैसरबागेत कार पार्किंगवरून हाणामारी:तलवारीने वार

पुणे -काेंढवा परिसरातील काैसरबाग याठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर कार पार्किंगवरुन झालेल्या वादातून दाेनजणांनी एकमेकांवर धारदार तलवारीने वार करुन दाेघे जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. सदर जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून याबाबत काेंढवा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्रफ अश्फाक शेख (वय- ३०,रा. मिठानगर,काेंढवा, पुणे) व गणेश सुभाष राखपसरे (३२,रा. शेरखान चाळ, काेंढवा,पुणे) अशी जखमी झालेल्या दाेनजणांची नावे आहे. याप्रकरणी काेंढवा पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काेंढवा परिसरात काैसर बाग येथील सना हाॅस्पिटल समाेर बुधवारी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली आहे. गणेश राखपसरे याने त्याची कार संबंधित ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली हाेती. त्यावरुन त्याचे अश्रफ शेख याच्यासाेबत वाद हाेऊन एकमेकांना शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला. त्यावेळी दाेघांनी त्यांच्या गाडीतून धारदार शस्त्र काढूनएकमेकांवर वार केल्याने ते जखमी झाले. याप्रकरणात दाेघे जखमी झाल्याने त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात अाले. पाेलीसांकडे याबाबत दाेघांनी परस्पर विराेधात तक्रार दाखल केली असून ते बरे झाल्यावर त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पाेलीस उपायुक्त डाॅ.राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. आराेपींची सध्या प्रकृती स्थिर असून त्यांचे जबाब पाेलीसांनी नाेंदवले आहे. याबाबत पुढील तपास काेंढवा पाेलीस करत आहे.

खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या ललित ससाणे या आराेपीने त्याचे इतर साथीदार यांच्याशी आपसात संगनमत करुन, त्याच्यावर दाखल गुन्हयाचे तपासात दबाव निर्माण करण्यासाठी लाेहियानगर येथे बेकायदेशीर जमाव जमवला. जमावाचे माध्यमातून तपासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत पाेलीसांना त्यांचे कर्तव्यापासून परावृत्त करणेचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी ललित ससाणे, विकी ससाणे व इतर आराेपींवर खडक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाेलीस निरीक्षक मनाेजकुमार श्रीरंग लाेंढे यांनी आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे.

बांधकाम परवान्यासाठी बारामती नगरपरिपालिकेतील अधिकाऱ्याने मागितली दोन लाख रुपयांची लाच-अटक

0

पुणे -बारामती येथे निर्मिती विहार इमारत, बी विंग- १ या गृहप्रकल्पाचा प्रस्ताव नगरपरिषद बारामती येथे दाखल करण्यात आला हाेता. सदरचा प्रस्ताव मंजुर करण्याकरिता बारामती नगरपरिषदेतील नगर रचनाकार विकास किसनराव ढेकळे (वय- ५०) यांनी दाेन लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजाेडीअंती पावणेदाेन लाख रुपये लाचेची रक्कम ठरवून पहिला हफ्ता एक लाख रुपये स्विकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने (एसीबी) सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी आराेपी विराेधात बारामती शहर पाेलीस स्टेशन येथे ४५ वर्षीय तक्रारदार यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विकास ढेकळे या वर्ग एकचे अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांची एक फर्म आहे. त्यांनी एका गृह प्रकल्पाचा प्रस्ताव नगरपरिषद बारामती येथे दाखल केला हाेता. त्यासाठी नगररचनाकार यांनी तक्रारदार यांचेकडे दाेन लाख रुपयांचे लाचेची मागणी करण्यात आली. याबाबत तक्रारदार यांनी एसबीकडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीचे पथकाने पडताळणी केली असता अाराेपीने पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे संबंधित कामासाठी दाेन लाख रुपये लाच मागणी केली. त्यापैकी तडजाेडीअंती पावणेदाेन लाख रुपये लाच देण्याचे ठरले. त्याचा पहिला हफ्ता एक लाख रुपये ऑक्सीजन जिम, बारामती येथे घेताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे.सदरची कारवाई पाेलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पाेलीस अधीक्षक डाॅ.शीतल जानवे, सहपाेलीस आयुक्त दयानंद गावडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबत पुढील तपास पाेलीस निरीक्षक अमाेल भाेसले करत आहे.

ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुलुंडमध्ये रंगणार `पुकारता चला हूं मैं’!

सांस्कृतिक कार्यमंत्री एँड आशिष शेलार यांची संकल्पना

कालिदास नाट्यमंदिरात रसिकांना मोफत प्रवेश

मुंबई, दि. २० : चित्रपट संगीत रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळविणारे प्रसिद्ध संगीतकार दिवंगत ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिरात उद्या शुक्रवारी (ता. २१) रात्री ८ वाजता `पुकारता चला हूं मैं’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून ओपींनी संगीतबद्ध केलेली अजरामर गीते पुन:र्रचना करून अनोख्या पद्धतीने सादर केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी रसिकांना मोफत प्रवेश असून, ओ. पी. नय्यर यांच्या गीतांमध्ये रमण्याचा अनुभव घेता येईल.

राज्य सरकारचा सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संगीतकार ओ. पी. नय्यर यांना आदरांजली म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मोहित शास्त्री यांचे संगीत संयोजन आहे. त्यांनी ओपींच्या संगीताची पुनःर्रचना केली आहे. सर्वेश मिश्रा, संपदा गोस्वामी, अभिलाषा चेल्लम आणि श्रद्धा वैद्य हे गायक ओ पी नय्यर यांच्या गाण्यांना एक नवा रंग देणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांच्याकडून बहारदार व हलकेफुलके निवेदन केले जाईल. तर दिग्गज वादक दीपक कुमठेकर, सागर साठे, यश लालका, नागेश कोळी, अभिजीत सावंत, निशा मोकल, स्वप्नील दिवेकर, पंकज धोपावकर आणि मोहित शास्त्री हे सर्व संगीत रसिकांचे मनोरंजन करणार आहेत.

कार्यक्रमाची निर्मिती संजीवनी भिडे, अधिता लेले आणि गीता बांदेकर यांच्यातर्फे करण्यात आली आहे. या संकल्पनास ‘अद्विरा किएटिव्स’ यांनी आकार दिला आहे.

या कार्यक्रमाला रसिकांनी आवर्जून उपस्थित राहून ओपींना जन्मशताब्दी निमित्ताने संगीत रुपी आदरांजली द्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे व संचालक विभीषण चवरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

पालघर ते सिंधुदुर्ग पट्टा लाडके उद्योगपती अदानी, अंबानीला आंदण देण्याचा भाजपा सरकार घाट: हर्षवर्धन सपकाळ.

राज्यातील विदारक परिस्थितीला फडणवीस सरकारच जबाबदार, महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या वाढल्या, वेगवेगळ्या गँग बनल्या.

पालघर/मुंबई, दि. २० मार्च
भारतीय जनता पक्षाचे सरकार लाडका उद्योगपती अदानीसाठी रेट कार्पेट टाकत आहे. मुंबईतील धारावी अदानीला विकली आहे, मुंबईतील महत्वाचे भखंड अदानीच्याच घशात घातले आहेत. नवी मुंबई विमानतळही अदानीलाच दिलेले आहे आणि आता पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचा मोठा सागरी पट्टा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अदानीच्या घशात टाकण्याचा घाट घातलेला आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

पालघर येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शेतकऱ्यांचा विरोध असताना, आवश्यकता नसतानाही भाजपा सरकार नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्ग टाकत आहे. जेट्टीतून समुद्र किनाऱ्यापासून थेट सेंट्रल इंडियापर्यंत अदानी अंबानीला रेड कार्पेट टाकले जात आहे. गोव्यातील कोळसा व खनिजे यांचा व्यापर या दोन उद्योगपतींना सहज करता यावा आणि कोकणात सापडलेली मुबलक प्रमाणातील खनिजे अदानी, अंबानीला लुटता यावीत यासाठी हा शक्तीपीठ मार्ग बांधला जात आहे. कोकणी माणूस एकजूट करुन राहतो त्याला छेद देण्यासाठी व या लोकांना शांत बसवण्यासाठी सिंधुदुर्गातील वाचाळवीर मंत्री बेताल वक्तव्य करुन समाजात तेढ निर्मण करत आहेत. आता पालघरमध्येही असेच फासे टाकले जात आहेत, इथल्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. हा आदिवासी भाग आहे पण जमीन अधिगृहणामध्ये त्यांना दिलेल्या संरक्षणाची पायमल्ली सुद्धा केली जात आहे.

देवेंद्र फडणवीस २०१४ ते १९ पाच वर्ष मुख्यमंत्री होते नंतर फोडाफोडी करून २.५ वर्षे ते उपमुख्यमंत्री राहिले आणि आता पुन्हा मुख्यमंत्री बनले आहेत. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे, आता मोठे बहुमत मिळाले आहे पण राज्यात विदारक परिस्थिती आहे आणि त्याला फडणवीस सरकारच जबाबदार आहे. भाजपाच्या राज्यात शेतमालाला भाव नाही, शेतकरी कर्जबाजारी आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, कायदा सुव्यवस्थेची वाट लागली आहे. महिला अत्याचार वाढत आहेत, नव्याने गँग पुढे येते आहेत. रेती गँग, कोयता गँग, आका, खोक्या गँगनी उच्छाद मांडला आहे. सत्ताधारी पक्षातील गुंड खंडणी वसुली करताना दिसत आहेत. राज्य सरकारकडे विकास कामासाठी पैसे नहीत, अर्थसंकल्पात मोठी महसूली तुट आहे परिणामी उत्पन्न व खर्च यांचा मेळ बसत नाही. राज्य सरकामधील प्रमुख नेते नरेंद्र मोदींचे मोठे गुणगाण गात असतात, या ट्रिपल इंजिन सरकारने दिल्लीत जाऊन राज्यासाठी स्पेशल पॅकेज आणावे पण या तिघांमध्ये ती धमक नाही असेही सपकाळ म्हणाले.

विधानसभेला आघाडी होती त्यामुळे पालघरमध्ये काँग्रेसचे उमेदवार देता आले नाहीत पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ताकद नक्कीच वाढेल, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, मनिष गणोरे, यशवंत सिंग, विजय पाटील, पराग पाष्टे आदी उपस्थित होते.
पालघर जिल्हा दौऱ्यात काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्ह्यातील प्रमुख पक्ष पदाधिकारी व ब्लॉक अध्यक्ष यांच्यासोबत संघटनात्मक बाबींसह विविध विषयावर चर्चा केली व त्यानंतर कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल नूतनीकरण उद्घाटन २२ मार्चला

पुणे- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल नूतनीकरण उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणाऱ्या या सोहळ्यास मान्यवर नागरिक, खेळाडू आणि माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत . या संदर्भात या भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी चे पदाधिकारी स्वप्नील लक्ष्मी देवराम दुधाने यांनी सांगितले कि,’कर्वेनगर प्रभागात लोकप्रतिनिधी या नात्याने प्राप्त झालेल्या पहिल्याच संधीत अर्थात सन २०१७ साली आपल्या सहयादी निधीतून स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल विकसित करत लोकार्पण केले. गेल्या आठ वर्षांत प्रभागातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना सेवा देण्याचे कार्य येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन सिंथेटीक टेनिस कोर्ट करत आले आहेत.

आजमितीस अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर नाव कमावले असून ही नक्कीच आमच्यासाठी अभिमानाची बाब होती. परंतु लोटत जाणाऱ्या काळासोबत टेनिस कोर्टची अत्याधुनिकता राखणे आवश्यक होते. या अनुषंगाने वेळोवेळी पुणे मनपाकडे पाठपुरावा करत आपण तब्बल २५ लाख रुपये निधी मंजूर करून आणला व या निधीतून येथिल दुरुस्तीची अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत.सदर निधीतून टेनिस कोर्टचे नूतनीकरण करताना कोर्टवरील सिंथेटिक कोर्टचे रीकोटिंग, भेगा बुजवणे, डागडुजी, रंगकाम, स्वच्छतागृहाचे नूतनीकरण आणि अशी विविध कामे पूर्णत्वास गेली. यामुळे प्रभागातील खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि नागरिक यांच्यातून समाधान व्यक्त आहे. काळानुसार बदलणाऱ्या खेळात खेळाडू म्हणून स्वतःमध्ये बदल करणे, काळाची गरज असून त्यासाठी त्यांना उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध करणे, हे लोकप्रतिनिधी या नात्याने आमचे कर्तव्य आहे. खेळाप्रती आकर्षण आणि प्रेम टिकून राहावे, यासाठी वेळोवेळी बदल आणि नूतनीकरण नेहमीच आवश्यक असते.

आज नागरिकांची कौतुकाची थाप हीच आमच्या कामाची पोहोच पावती असून हे क्रीडा संकुल ज्या नागरिकांसाठी-खेळाडूंसाठी विकसित केले, त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत एक छोटासा नूतनीकरण उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.

केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरीसह तेलबियावर्गीय पिकांचे लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी सर्व त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

विविध योजनांच्या एकत्रिकरणातून आणि जिल्हा नियोजन समितीतून
आवश्यक तेवढा निधी देण्याची ग्वाही

पुणे, दि. २०: केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी आणि तेलबीयावर्गीय सूर्यफूल व करडई या पिकांचे लागवडीखालील क्षेत्र वाढविणे, निर्यातक्षम उत्पादन घेणे, उत्पादन वाढविणे तसेच मूल्यवर्धन तथा खाद्य प्रक्रियेची व्यवस्था करुन निर्यातीच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी विभागाने सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वंकष आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले. या सर्व सुविधांसाठी विविध योजनांचे एकत्रिकरण करून तसेच जिल्हा नियोजन समितीतून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
जिल्ह्याचा समग्र कृषी विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने कृषी महाविद्यालय शिवाजीनगर येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. महानंद माने, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्रा. दिगंबर दुर्गाडे, कृषी उपसंचालक एस. एस. विश्वासराव आदींसह उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, बारामती व नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रांचे अधिकारी, शेतकरी उत्पादन कंपन्या, कृषी निर्यातदार कंपन्यांचे प्रतिनिधी, प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, केळी पिकाचे जिल्ह्यात १ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून ते आगामी वर्षात ३ हजार हेक्टरपर्यंत नेण्याचे तसेच प्रति हेक्टरी उत्पादनातही वाढ होण्याच्या दृष्टीने लक्ष्य ठेवावे. त्यासाठी केळी लागवडीसाठी इच्छुक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे, त्यांचे प्रशिक्षण आयोजित करणे, दर्जेदार रोपे पुरविणे, पाण्याची व्यवस्था, मातीचे आरोग्य, जैविक आधारित खते, औषधे आदी निविष्ठा, कृषी यांत्रिकीकरण तसेच पीकनिहाय उत्कृष्ट उत्पादन पद्धती, लागवडीपूर्वीची, पिकाच्या काढणीपूर्वीची आणि काढणीपश्चात प्रक्रिया आदींबाबतच्या तंत्र, योजनांची माहिती व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याबाबतचा लाभ कसा मिळेल आदींचा समावेश प्रशिक्षण सत्रामध्ये करण्यात यावा, असेही ते म्हणाले. याच पद्धतीने अंजीर, आंबा आदींवरही लक्ष केंद्रीत करण्यात यावे.
शेतकरी उत्पादक कंपन्यांना केंद्रस्थानी ठेऊन त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांपर्यंत लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाची व्यवस्था आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्रांनी समन्वयाने करावी. शेतकऱ्यांचे या पिकांच्या अनुषंगाने पीकनिहाय दोन दिवशीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रांच्या ठिकाणी ७ एप्रिलपासून आयोजित करावे, असेही त्यांनी सांगितले. यामध्ये प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांना मास्टर ट्रेनर म्हणून तयार करुन त्यांच्याद्वारे इतर शेतकऱ्यांना त्या पिकाच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे. पिकांची लागवडीचे क्षेत्र वाढावे यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना निवडण्यासाठी व त्यांना सहभागी करुन घेण्यासाठी कृषी सहायकांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मदतीने व सध्याचे उत्पादक शेतकरी यांच्या सहाय्याने काम करावे.
केळीसह अन्य पिकांची दर्जेदार रोपे, शेततळ्यांसाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. परदेशी बाजारपेठेत निर्यातीसाठी तेथील मागणी, कृषीमालाचा दर्जा, गुणवत्ता यावर विशेष भर द्यायचा असून त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना निर्यात सुविधा केंद्रांसाठी आवश्यक शीतकरण, पॅक हाऊस, निर्यातीसाठी प्रक्रिया केलेला कृषीमाल वाहतूक आदींच्या सुविधा निर्मितीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प तथा स्मार्ट, केंद्र शासनाचा कृषी पायाभूत सुविधा निधी, खाद्य प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रसंस्करण उद्यम औपचारिकीकरण योजना अशा विविध योजनांतून लाभ देण्यात येईल. यासह या बाबींसाठी जेथे अधिकच्या निधीची आवश्यकता असेल तेथे जिल्हा नियोजन समितीतून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही ते म्हणाले.
उत्पादित झालेला कृषीमाल निर्यात होईल याचे नियोजन आधीच करायचे आहे. तसेच निर्यात होऊन राहणारा माल स्थानिक बाजारपेठेत, मॉल, कंपन्या आदी ठिकाणी विक्रीची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आपण जे पीक घेणार आहोत त्याला हमखास बाजारभाव मिळेल तसेच त्याची बाजारात विक्री होईल अशी खात्री देऊन त्यांच्यात विश्वास निर्माण केल्यास निश्चितच या पिकांच्या लागवडीकडे शेतकरी वळतील, असेही ते म्हणाले.
यावेळी श्री. डूडी यांनी उपस्थित शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, निर्यातदार, प्रगतीशील शेतकरी, कृषी विज्ञान केंद्रांचे अधिकारी आदींना यावेळी विविध सूचना केल्या. या सूचना व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्यांना आवश्यक सुविधांचे प्रस्ताव कृषी विभागाकडे देण्याच्या सूचनाही श्री. डूडी यांनी यावेळी दिल्या.

जुनी वाहने खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांनी पोलीस ठाण्याला माहिती देण्याचे आदेश

पुणे दि. २०: जिल्ह्यात ग्रामीण भागात जुनी वाहने खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात द्यावी, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत. माहिती न दिल्यास असे व्यावसायिक भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ प्रमाणे कारवाईस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झालेल्या असून जुन्या मोटारसायकली व वाहने यांची खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु याबाबत खरेदी विक्रीचा योग्य तो तपशील ठेवला जात नसल्याने गुन्हेगारांकडून चोरीच्या वाहनांची खरेदी विक्री होण्याची दाट शक्यता असते. खरेदी विक्रीबाबत योग्य तपशील उपलब्ध नसल्याने त्याचा गुन्हे उघडकीस येण्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे हे आदेश जारी करण्यात आले आहेत. हे आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील.

जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती (वाहन क्रमांक, इंजिन, चासी क्रमांक, मूळ मालकाचे नाव, मूळ गावचा व सध्या राहत असलेले ठिकाणाचा संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, ओळखपत्र, वाहनांचे आरसी, टीसी पुस्तक, खरेदी करणाऱ्याचे नाव, मूळ गावचा व सध्या राहत असलेल्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व ओळखपत्र आदी) दर ७ दिवसांनी स्थानिक पोलीस ठाण्याला द्यावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध आदेश जारी

पुणे दि. २०: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कोणत्याही खाजगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना त्याची पूर्व माहिती ७ दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून संबंधीत प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होवून त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दौंड, बारामती, शिरुर तालुक्याच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळू माफिया देखील टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ड्रोनच्या मध्यमातून टेहाळणी करुन इतर प्रकारच्या चोऱ्याही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

हे आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील. आदेशाचा भंग करुन पोलीसांच्या परवानी शिवाय कोणताही व्यक्ती ड्रोन कॅमेरादवारे चित्रीकरण करताना आढळून आल्यास अशी व्यक्ती भारतीय न्याय संहितेचे कलम २३३ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी विशेष अभय योजना-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत विधेयक सादर

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडील 25 हजार कोटींची वसूली होणार

मुंबई, दि.20 :- “महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांनी प्रदेय असलेल्या) यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक, 2025” आज विधानसभेच्या सभागृहात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज सादर केले. या विधेयकाद्वारे सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांसाठी विशेष अभय योजना आणली आहे. या योजनेद्वारे थकबाकीच्या तडजोडीला गती मिळेल. त्यातून थकीत महसुल शासनाच्या तिजोरीत जमा होऊन विकासकामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार आज विधानसभेत “महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांनी प्रदेय असलेल्या) यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक, 2025” सादर केले. आज विधानसभेच्या सभागृहात सादर केलेल्या विधेयकामुळे केंद्र व राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांना दिलासा देण्यासाठी करण्यात आली आहे. वस्तू व सेवा कर लागू होण्यापूर्वी राज्यकर विभागातर्फे राबविण्यात येणारे विविध कर यासंदर्भात ही योजना असणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे प्रलंबित थकबाकीची रक्कम सुमारे 25 हजार कोटी रुपये आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी सरकारने विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर तडजोड योजना विधेयक लागू झाल्याच्या दिनांकापासून ते दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत लागू असेल. दि. 1 एप्रिल 2005 ते दि. 30 जून 2017 या कालावधीतील थकबाकी यासाठी पात्र असणार आहे. अविवादीत करासाठी कोणतीही सवलत दिली जाणार नाही, त्याचा शंभर टक्के भरणा करणे अनिवार्य असणार आहे. ही संपूर्ण योजना ऑनलाईन पद्धतीने पारदर्शकपणे राबवली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला दिली.

महाराष्ट्रात संवाद मराठीतच..अन्यथा ..रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिखित इशारा ..

पुणे-महाराष्ट्रात संवाद मराठीतच..अन्यथा ..रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिखित इशारा .. येथील शिवसेना पदाधिकारी यांनी समक्ष भेटून दिला . आज दुपारी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीच्या महाराष्ट्र ऑफिसला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत धडक दिली.या संदर्भात शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी येथे सांगितले कि,’हे रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे ऑफिस मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्राचे प्रमुख कार्यालय आहे.ह्या दरम्यान जी चर्चा आमच्यात झाली एक त्या चर्चेत रिलायन्स जिओ तर्फे उच्च पदस्थ अधिकारी श्री गोसावी आणि श्री लांडगे उपस्थित होते.त्यांना मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून कोणत्याही परिस्थितीत रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी मराठीचाच वापर केला पाहिजे, हे स्पष्ट करण्यात आले. तसेच आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून, अशा वेळी जर तुमचा ग्राहक सेवा प्रतिनिधी हिंदीत संवाद साधत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आले. देशातील इतर राज्यात आपण सेवा देताना तेथील स्थानिक भाषेला प्राधान्य देत आहात. मग महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य का दिल जात नाही ? अशी विचारणा करण्यात आली.
ह्यावेळी, रिलायन्स जिओला त्यांच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. रिलायन्स जिओच्या अधिकाऱ्यांनी ती मान्य केली असून, ह्या मुदतीत “मराठी प्रथम” ह्या तत्वाची अंमलबजावणी न झाल्यास त्यांना शिवसेना स्टाईलने आंदोलनातून दणका देण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
ह्या वेळी गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख आबा निकम, राजेंद्र शिंदे, मकरंद पेठकर, विभाग प्रमुख प्रवीण डोंगरे, राजेश मोरे, गोविंद निंबाळकर, संजय वाल्हेकर उपस्थित होते.

एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संस्था आयोजित जी पी सहस्रबुद्धे चषक एकेरी कॅरम स्पर्धेस सुरवात

  • ११२ स्पर्धकांचा सहभाग
    माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे हस्ते उद्घाटन
    पुणे-“ज्येष्ठ नागरिकांनी आनंदमयी जीवन जगण्यासाठी आपल्या आवडत्या क्रीडा स्पर्धा मध्ये नेहमी भाग घ्यावा,सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हावे व समाज जीवनाचा आनंद घ्यावा”.
    सुदृढ आरोग्यासाठी नियमित व्यायाम व योगा बरोबरच कॅरम सारख्या क्रीडा स्पर्धेबरोबरच इतर छंद जोपासवे.क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन नियमित सराव वाढवावा”.असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित जी पी सहस्रबुद्धे चषक एकेरी कॅरम स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.याप्रसंगी कॅरम पटू विलास सहस्रबुद्धे,माधुरी सहस्रबुद्धे,एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संस्थांचे अध्यक्ष अजित गोखले,सचिव उर्मिला शेजवलकर ह्यांची मुख्य उपस्थिती होती.प्रमुख पाहुण्यांचा परिचय कार्याध्यक्षा प्राजक्ता मोघे ह्यांनी करून दिला. अध्यक्ष अजित गोखले यांनी पाहुण्यांचे पुषगुच्छ देऊन स्वागत केले.

पटवर्धन बाग येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात ज्येष्ठ नागरिकांच्या ह्या एकेरी कॅरम स्पर्धेला सुरुवात झाली असून पुणे शहरांतून ११२ स्पर्धक यात भाग घेत आहेत.स्पर्धा दररोज बाद पद्धतीने घेण्यात येत असून सकाळी दहा ते साडे सहा या वेळेत संपन्न होत आहेत.२० ते २३ मार्च दरम्यान चालणाऱ्या ह्या कॅरम स्पर्धा बघण्यास गर्दी होत आहे.
स्पर्धा प्रमुख शिरीष जोशी,मुख्य पंच अभय अटकेकर यांचेबरोबर सतीश सहस्रबुद्धे,पंकज कुलकर्णी,माधव तिळगुळकर, सुनील वाघ,रामकुमार ठाकूर हे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
आजच्या स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे
१) पंकज कुलकर्णी वि वि नंदकुमार झगडे (२२- १५,२५- ८),
२) सुनील शेजवलकर वि वि सुब्रमण्यम अय्यर (१६-१३,२२-६)
३)सतीश सहस्रबुद्धे वि वि माधव देशमुख (१६- ११,९- २६,१४- ७)
४)अजित गोखले वि वि सुभाष चव्हाण (१८- २,१९- ७)
५) मिलिंद रानडे वि वि पद्माकर मेढेकर (१४-११,१३-१२)
६)माधव तिळगुळकर वि वि अलकनंदा भानू ( २५-०,२५-०)
७)शुभदा गोडबोले वि वि भारती आगाशे (१७- ५,१७- ७),
८)शिरीष जोशी वि वि हेमा मांडके (९- १४,२१- ६,१६-५)
९)वसंत रत्नपारखी वि वि अरविंद देशपांडे ( २२- ४,२०- ४)
१०)सुनील वाघ वि वि मकरंद बेहरे (२१- ०,२१- ०)

.

0