Home Blog Page 405

‘गुलाबी कर’ नष्ट करण्यासाठी संवेदनशीलता, जागरूकता आवश्यक !

भारतासह जगभरात दि. 8 मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्यात आला. सर्वत्र विविध कार्यक्रम, सत्कार, व्याख्याने यांची रेलचेल आढळली. महिलांना सन्मानाची, समानतेची वागणूक देण्याबद्दलच्या आणाभाका,शपथा, निर्धार जाहीर करण्यात आले. मात्र त्याचवेळी महिलांवर आर्थिक अन्याय करणाऱ्या ‘गुलाबी करा’ बद्दल मात्र कोणी चकार शब्द काढलेला दिसला नाही. हा गुलाबी कर नष्ट करण्यासाठी सर्व पातळ्यांवर जागरूकता, संवेदनशीलता निर्माण होण्याची नितांत गरज आहे. या वेगळ्या पण महत्वाच्या विषयाचा घेतलेला वेध.

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये ‘ गुलाबी कर’ अस्तित्वात आहे. हा कर ‘पिंक टॅक्स’ म्हणून जगभर ओळखला जातो. अगदी थोडक्या शब्दात सांगावयाचे झाले तर पुरुष व महिला या दोघांसाठी अनेक उत्पादने,वस्तू किंवा सेवा समान वापरल्या जातात. मात्र बाजारामध्ये अशा उत्पादनांच्या किंमती किंवा सेवांचे शुल्क पुरुषांसाठी जेवढ्या असतात त्यापेक्षा काही टक्के जास्त किंमती, शुल्क महिलांकडून वसूल केल्या जातात. पुरुष व महिला या दोघांकडून वापरल्या जाणाऱ्या सारख्या उत्पादनांच्या किंमतीमध्ये लिंगभेद केला जातो. समानतेच्या दृष्टिकोनातून महिला वर्गाच्या बाबतीत हा कर अन्यायकारक ठरतो. महिला वर्गाला त्यासाठी द्यावी लागणारी जादा किंमत किंवा शुल्क म्हणजे एक प्रकारचा ‘गुलाबी कर’ आहे असे मानले जाते. आपली लोकसंख्या 146 कोटींच्या घरात आहे व त्यापैकी 70 कोटी महिला आहेत, हे लक्षात घेता हा ‘गुलाबी कर’ अर्थकारणावर परिणाम करणारा आहे.

‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली ‘या अर्थविषयक साप्ताहिकामध्ये दोहा – कतार येथील श्री साईबाल घोष यांनी याबाबतचा संशोधनात्मक प्रबंध प्रसिद्ध केला असून हा गुलाबी कर नष्ट व्हावा अशी मांडणी केली आहे. यासाठी त्यांनी विविध देशातील कुटुंबांचा व त्यांनी केलेल्या खर्चाबाबत संशोधन केले. २०१५ ते २०२२ या सात वर्षाच्या काळात त्यांनी कुटुंब स्तरावरील खर्चाचा अभ्यास केला. या अभ्यासावरून जगात सर्वत्र हा ‘पिंक टॅक्स’ अस्तित्वात असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.

‘गुलाबी करा’च्या संदर्भात भारताचा विचार करता ही कर पद्धती किंवा अशी यंत्रणा आपल्याला नवीन किंवा अद्वितीय नाही. आपल्याकडील सर्वसाधारण सामाजिक नियम व बाजारातील गतिशीलता यामुळे आपल्या देशात गेली अनेक वर्षे गुलाबी कर अस्तित्वात आहे. या ‘ गुलाबी करा’ मध्ये कोणती उत्पादने व सेवा यांचा समावेश केला जातो याचा अभ्यास केला असता विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने, दुर्गंधीनाशक उत्पादने व वस्तरे (रेझर, डिओडोरंट्स), किंवा शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी वापरले जाणारे साबण, बॉडी वॉश यांसारखी वैयक्तिक काळजी उत्पादने, टी-शर्ट, जीन्स आणि जॅकेट यांसारख्या कपड्यांच्या वस्तू, हेअर कट आणि केस रंगवण्यासारख्या सारख्या सलून सेवा, खेळणी व महिला स्वच्छता उत्पादने यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

पुरुष व महिलांना सर्वत्र समान दर्जा व वागणूक दिली जावी ही संकल्पना सर्व प्रगतिशील देशांमध्ये अस्तित्वात आहे. या पार्श्वभूमीवर पुरुष व महिलांमध्ये लिंगभेद केला जाऊ नये एवढेच नाही तर लिंग समानतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचा ‘कर’ वसूल केला जाऊ नये हा महत्त्वाचा मुद्दा प्रकर्षाने निर्माण होतो. अशा प्रकारचा गुलाबी कर काढून टाकला तर महिलांवरील आर्थिक भार निश्चितपणे कमी होईल अशी यामागे अपेक्षा आहे. त्याचबरोबर लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून भारताचे एक पाऊल पुढे जाऊ शकते. एवढेच नाही तर त्यामुळे बाजारातील पारदर्शकता निश्चितपणे वाढणार असून सर्व उत्पादने व सेवांच्या किमती जास्तीत जास्त पारदर्शक राहून ग्राहकांना चांगल्या किमती व सेवांचा फायदा होऊ शकतो. बाजारातील उचित स्पर्धा प्रथांना यामुळे प्रोत्साहन दिले जाऊन भेदभावपूर्ण किंमती पूर्णपणे नष्ट होतील अशी अपेक्षा आहे. कोणत्याही व्यवसायात निष्पक्ष स्पर्धा असणे व ग्राहकांना चांगल्या किमती व सेवांचा लाभ होणे हे समाजाच्या दृष्टिकोनातून निश्चितच हितकारक आहे.

या गुलाबी कराचे काही निश्चित तोटे आहेत. त्यांचा अभ्यास केला असता महिलांवरील आर्थिक ताणामध्ये गुलाबी कराची भर पडत आहे. एका पाहणीनुसार महिला व पुरुषांची कमाई व वेतन लक्षात घेतले तर भारतामध्ये महिलांची कमाई पुरुषांपेक्षा सुमारे 30 ते 35 टक्के कमी आहे. महिलांच्या गरजा आणि त्यांना दिले जाणारे प्राधान्य हे पुरुषांपेक्षा जास्त असते व त्यासाठी होणारा खर्च पुरुषांपेक्षा जास्त होत असतो अशी धारणा समाजामध्ये निर्माण होताना दिसत आहे. गुलाबी करामुळे किंमती स्वाभाविकपणे वाढतात. त्यामुळे अनेक उत्पादनांच्या बाबतीत खरेदी करणाऱ्या महिलांचा प्रवेश आपोआप मर्यादित होतो. साहजिकच अशी अत्यावश्यक उत्पादने व सेवा वापरण्याच्या बाबतीत महिला वर्गाला प्रतिबंध होऊ शकतो अशी बाजारातील परिस्थिती आहे.

याबाबत देशातील विविध राज्यांमधील उत्पादने व सेवांचा अभ्यास केला असता साधारणपणे असे लक्षात आले आहे की महिलांसाठी असलेल्या उत्पादनांच्या किमती या दोन ते सहा पट जास्त आहेत. त्यामुळे दरवर्षी साधारणपणे 300 डॉलर किंवा वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च जास्त केला जातो असे लक्षात आले आहे. बायोकॉन कंपनीच्या अध्यक्ष श्रीमती किरण मुजुमदार शॉ यांनी गुलाबी करामुळे निर्माण झालेल्या लिंग असमानतेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. महिला व पुरुष वर्ग जी उत्पादने, सेवा समानरित्या वापरतात त्याबाबत समान किंमत असण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली होती.

जागतिक पातळीवर केलेल्या अभ्यासामध्ये महिला-पुरुषांच्या वस्त्र प्रावरणाच्या बाबतीत महिलांच्या वस्त्रांच्या सरासरी किमती ०.७ टक्के जास्त आहेत असे आढळले होते. अमेरिकेत याबाबत शंभर ब्रँड्सचा अभ्यास करण्यात आला होता. त्यात महिलांच्या उत्पादनांसाठी असलेल्या किमती 12 ते 13 टक्के जास्त असल्याचे आढळले होते. इंग्लंडमध्ये अशा प्रकारची पाहणी केली तेव्हा महिलांना अशा उत्पादनांसाठी दहा टक्के किंमत जास्त द्यावी लागत असल्याचे आढळले होते. भारतामध्ये अशा प्रकारच्या गुलाबी करायच्या बाबत संशोधन करण्यात आले. त्यामध्ये व्यक्तिगत पातळीवरील खर्चाचा अभ्यास न करता कौटुंबिक पातळीवर त्याचा अभ्यास करण्यात आला. त्यामुळे एक प्रकारे दुय्यम प्रकारची माहिती यामध्ये संकलित करण्यात आलेली आहे. विविध राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त कुटुंबांमध्ये ही पाहणी या कालावधीत करण्यात आली होती. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनोमी ( सीएमआयई) संस्थेने याबाबतचे संशोधन केलेले होते. त्यामध्ये महिला ग्राहकांकडून अनेक वेळा जास्त किमती किंवा शुल्क वसूल केल्याचे सकृत दर्शनी आढळलेले आहे.

जागतिक पातळीवर या गुलाबी कराच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने व मोहीम राबवण्यात आली. २०१५ मध्ये कॅनडाने महिलांच्या सर्व उत्पादनावरील कर पूर्णपणे रद्द केलेला होता. त्यानंतर २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाने याबाबतचे पाऊल पुढे टाकून महिलांच्या उत्पादनांवरील कर रद्द केला. जर्मनीमध्ये महिलांसाठी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडवर चैनीची वस्तू म्हणून 19 टक्के कर लावण्यात आला होता. २०२० मध्ये तो कमी करून केवळ 6 टक्के करण्यात आला. इटली व स्पेन या दोन्ही देशांमध्ये अगदी अलीकडे हा कर कमी करण्यात आलेला आहे. स्कॉटलंडमध्येही कमी उत्पन्न गटातील महिलांसाठी ही सर्व उत्पादने मोफत देण्याबाबतचा कायदा संमत करण्यात आलेला आहे. काही विकसनशील देशांचा अभ्यास केला असता केनयासारख्या देशाने 2004 मध्ये या उत्पादनावरील कर लक्षणीय रित्या कमी केला. त्याचप्रमाणे कोलंबियांमध्ये अशा प्रकारचा लिंगभेद करणारा कर हा घटनाबाह्य ठरवण्यात येऊन २०१८ मध्ये तो नष्ट करण्यात आला. नामीबिया मेक्सिको, इक्वाडोर व श्रीलंका या देशातही याबाबत काही सवलती देण्यात आल्या आहेत.

वास्तविक पाहता भारतामध्ये गुलाबी करावर बंधने घालणारा किंवा प्रतिबंध करणारा कोणताही अधिकृत कायदा अस्तित्वात नाही. परंतु लिंगभेद टाळण्याच्या दृष्टिकोनातून व महिला व पुरुष यांच्यात आर्थिक समानता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या गोष्टी करणे आवश्यक आहे. किमान सध्याच्या प्रगतिशील समाजामध्ये त्याबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. देशाच्या पहिल्या नागरिक म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महिला आहेत. तसेच गेली अनेक वर्षे देशाच्या अर्थमंत्री पदावर निर्मला सीतारामन यांच्यासारखी महिला अत्यंत निष्ठेने काम करीत आहे. असे असूनही आर्थिक पातळीवर काहीशी असमानता निर्माण करणाऱ्या या ‘गुलाबी कराचे ‘अस्तित्व नष्ट व्हावे अशी अपेक्षा केली तर ती गैर ठरणार नाही. अर्थमंत्र्यांनी काही वर्षांपूर्वी म्हणजे २०१८ मध्ये मासिक पाळीच्या संबंधित उत्पादनावरील 12 टक्के जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मधून पूर्णपणे सवलत दिलेली होती. एक प्रकारे याबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यमान सरकारने एक पाऊल टाकलेले होते. परंतु वास्तवामध्ये आजही अशा प्रकारचा लिंगभेद करणारा गुलाबी कर व्यापक प्रमाणात आढळत आहे. विविध कंपन्यांनी याबाबतची सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन अशा उत्पादनाच्या किमती कमी करण्याची गरज आहे. भारतातील महिला संघटनांनी याबाबत एकत्र येऊन नजीकच्या भविष्यकाळात नष्ट होण्यासाठी सकारात्मक मोहिमेद्वारे संवेदनशीलता व जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.

लेखक :प्रा. नंदकुमार काकिर्डे (लेखक पुणे स्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत)

क्षय रोग निर्मूलनासाठी नव्या आशेचा किरण

२४ मार्च २०२५ जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विशेष लेख….

संपूर्ण जगातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्र क्षयरोगाच्या (TB) विरोधातील संघर्षात झालेल्या प्रगतीचा आढावा घेत आहे. क्षयरोग हा केवळ एक संसर्गजन्य आजार नसून तो सामाजिक विषमता देखील दर्शवतो. गरीब आणि वंचित समुदाय, स्थलांतरित, निर्वासित आणि आदिवासी लोकसंख्या यांच्यात हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. दरवर्षी जवळपास १२.५ लाख लोकांचा बळी घेणारा हा आजार, योग्य निदान आणि उपचारांमुळे पूर्णपणे बरा होऊ शकतो.
क्षयरोग (TB) हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस (Mycobacterium tuberculosis) नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करणारा हा आजार शरीरातील इतर अवयवांमध्येही पसरू शकतो. भारतात हा आजार मोठ्या प्रमाणावर आढळतो आणि त्यामुळे देशाच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येतो आहे.
भारत हा जगातील सर्वाधिक क्षयरोगग्रस्त लोकसंख्या असलेला देश आहे. जागतिक क्षयरोग अहवाल २०२३ नुसार, जगातील एकूण TB रुग्णांपैकी २५-२८% रुग्ण भारतात आढळतात. भारतात दरवर्षी सुमारे २६-२७ लाख नवीन क्षयरोग रुग्णांची नोंद होते. देशात दरवर्षी सुमारे ५ लाखांहून अधिक लोक TB मुळे मृत्यू पावतात.
भारतात क्षयरोग नियंत्रणासाठी १९६२ मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (NTCP) सुरू करण्यात आला. २०१९ मध्ये या कार्यक्रमाचे नाव बदलून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP – National TB Elimination Programme) करण्यात आले.केंद्र सरकारने २०१८ मध्ये घोषित केलेल्या योजनेनुसार, भारताने जागतिक उद्दिष्टाच्या (२०३०) आधीच २०२५ पर्यंत TB निर्मूलनाचा संकल्प केला आहे.
मोफत TB निदान आणि उपचार: सरकारी आरोग्य केंद्रांवर सर्व TB रुग्णांना मोफत उपचार आणि औषधे पुरविली जातात.
प्रगत निदान आणि उपचार पद्धती: TB निदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान जसे की Xpert MTB/RIF, TrueNat, आणि Line Probe Assay यांसारख्या प्रयोगशाळा चाचण्या उपलब्ध आहेत.
प्रभावी औषधोपचार:
संवेदनशील TB साठी ६ महिन्यांचा पूर्ण उपचारक्रम (HRZE – Isoniazid, Rifampicin, Pyrazinamide, आणि Ethambutol)
औषध-प्रतिरोधक TB (MDR-TB/XDR-TB) साठी ९-१२ महिन्यांचे अद्ययावत उपचार
निक्षय पोषण योजना: TB रुग्णांसाठी दरमहा ₹५०० पोषण भत्ता देण्यात येतो, जेणेकरून त्यांच्या आहारात सुधारणा होईल आणि उपचाराचा परिणाम चांगला मिळेल.
समुदाय आधारित TB रुग्णांसाठी उपक्रम:
“निक्षय मित्र” योजना: समाजातील व्यक्ती आणि संस्था TB रुग्णांना पोषण आहार, औषधे, आणि भावनिक आधार देऊ शकतात.
खाजगी डॉक्टर आणि रुग्णालयांचे सहकार्य: खाजगी आरोग्य क्षेत्रातील डॉक्टरांना सरकारी TB कार्यक्रमात सामील करून सर्वांना उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.भारतातील खाजगी आरोग्य सेवा क्षेत्रात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध आणि योग (AYUSH) यांसारख्या पारंपरिक वैद्यकीय प्रणाली मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात AYUSH वैद्यक तज्ज्ञांचा सहभाग वाढविल्यास, क्षयरोगाच्या उपचारांमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल.
क्षयरोगाच्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी विशेष धोरणे
औषध-प्रतिरोधक क्षयरोग (MDR-TB, XDR-TB):
औषध-प्रतिरोधक क्षयरोग (MDR-TB) हा TB चा एक प्रकार आहे, ज्यावर सामान्य TB औषधांचा परिणाम होत नाही.
या साठी सरकारने Bedaquiline आणि Delamanid ही आधुनिक औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत.
बालक आणि गर्भवती महिलांसाठी विशेष उपाययोजना:
बालरुग्णांसाठी अनुकूलित औषधे
गर्भवती महिलांना सुरक्षित उपचार पद्धती
TB निर्मूलनासाठी पुढील दिशा
TB प्रतिबंधासाठी लसीकरण: BCG लस ही बालकांसाठी TB प्रतिबंधक म्हणून दिली जाते. याशिवाय, क्षयरोगाच्या बाबतीत प्रौढ बीसीजी लसीकरणाचा परिणाम पाहण्यासाठी भारत सरकारने विविध भागात प्रौढ बीसीजी लसीकरण हा पायलट अभ्यास सुरू केला आहे.
नवीन M72/AS01E आणि VPM1002 यांसारख्या संशोधित लसींवर संशोधन सुरू आहे.
जनजागृती आणि शिक्षण: TB संदर्भात समाजामध्ये गैरसमज कमी करण्यासाठी विविध प्रचार मोहिमा राबवल्या जात आहेत.
पोषण आणि आरोग्य सुधारणा: TB रुग्णांच्या आहारावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी निक्षय पोषण योजना आणि इतर सरकारी मदतीच्या योजनांचा प्रभाव वाढविला जात आहे
निष्कर्ष
TB हा पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार असून, वेळेत निदान आणि योग्य उपचार घेतल्यास तो नियंत्रित करता येतो. २०२५ पर्यंत TB निर्मूलनाचे भारताचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे.
“होय! आपण क्षयरोग संपवू शकतो!”
डॉ. मृदुला होळकर
M.Sc. (Public Health),
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,
राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे जिल्हा

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी मूल्यमापन चाचणी

पुणे : केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार २३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.

राज्यात ६ लाख ६६ हजार १२८ इतक्या असाक्षरांची चाचणी घेण्याबाबत जिल्ह्यांना सूचित करण्यात आले आहे. या परीक्षेतील प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित असून तीन भागांमध्ये विभागलेली एकूण १५० गुणांची असणार आहे. यामध्ये अनुक्रमे वाचन ५० गुण, लेखन ५० गुण, संख्याज्ञान ५० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (१७ गुण) अनिवार्य आहेत व एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (५१ गुण) अनिवार्य असतील. कोणत्याही एका भागाचे ३३ टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त ५ वाढीव गुण देता येतील. परंतु तीनही भागाचे मिळून ५ पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाहीत. परीक्षेस जाताना एक आयकार्ड आकाराचे छायाचित्र, जन्मतारखेचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक आदींपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

ही चाचणी परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तेलगू, तामीळ, बंगाली इत्यादी माध्यमातून होणार आहे. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी काळ्या अथवा निळ्या शाईचा पेन वापरावा. असाक्षर व्यक्तींनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर २३ मार्च रोजी ओळखपत्रासह उपस्थित रहावे. नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) तथा राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

महिला सुरक्षेसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज-न्यायाधीश महेंद्र महाजन

पुणे, : महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येण्याची गरज आहे, महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि सक्षम भविष्य निर्मितीकरीता समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करुया, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी केले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन पुणे आणि अलीमा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे बुधवारी (१९ मार्च) आयोजित कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. कॅरोलीन मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी शकील शेख आदी उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्व महिला पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन महिला सुरक्षेसाठी कायद्यांची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पोलीस प्रशासनास कायदेशीर मदतीची गरज लागल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण त्यांना नेहमीच सहकार्य करण्यास तत्पर आहे. महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन करत असलेल्या कार्य चांगले आहे.

यावेळी न्यायाधीश श्री. महाजन यांच्या हस्ते पोलीस दलातील ४१ महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या सखी सुरक्षा आणि इतर उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि संकटातील महिलांचे संरक्षण करण्यासाठी ‘सखी सुरक्षा’ पुस्तिका अत्यंत उपयुक्त आहे, सर्व महिला अधिकाऱ्यांनी या संसाधनाचा प्रभावीपणे उपयोग करावा, असेही श्री. महाजन म्हणाले.

महिला सशक्तीकरणासाठी ‘सखी सुरक्षा’ पुस्तिका महत्त्वाची – सोनल पाटील

‘सखी सुरक्षा’ पुस्तिका महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. संकटात असलेल्या महिलांसाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक तसेच तपास अधिकाऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्जांचे क्युआर कोड या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. सर्वांनी या पुस्तिकेचा उपयोग करून महिलांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी एकत्र यावे, असे आवाहन श्रीमती पाटील यांनी केले.

शिवरायांचा अपमान करणाऱ्याला शोधा:त्याला मदत करणाऱ्यांचा बुरखा फाडा, इंद्रजित सावंतांची मागणी

पुणे-छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला मदत करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा बुरखा फाडा, अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली आहे. त्यांनी पोलिसाकंडे कोरटकरचा पासपोर्ट जप्त करण्याचीही मागणी केली आहे.प्रशांत कोरटकरवर इंद्रजित सावंत यांना धमकी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढल्याचा आरोप आहे. त्यातच तो दुबईला पळून गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर इंद्रजित सावंत यांनी त्याचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, पोलिसांनी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा. कोणतीतरी यंत्रणा आहे, जी कोरटकरसारख्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या मनात अशी शंका आहे. यामुळेच त्याला आतापर्यंत अटक होत नाही.

शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या काही प्रवृत्ती असतील तर त्या शोधून काढल्या पाहिजेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. त्यांचा बुरखा फाडून टाकला पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. हे शासनाचे विशेषतः गृहमंत्र्यांचे काम आहे. इंद्रजित सावंत यांनी यावेळी कोरटकरला आपला मोबाईल नंबर कुठून मिळाला? असा सवालही उपस्थित केला.ते म्हणाले, मी कोल्हापुरात राहतो. माझा व त्या कोरटकरचा आयुष्यात केव्हाच संबंध आला नाही. मग माझा दूरध्वनी क्रमांक, माझा मोबाईल क्रमांक त्याला कुणी दिला? या गोष्टीचाही सोक्षमोक्ष लागला पाहिजे. त्याच्या मोबाईलमधून जे कम्युनिकेशन झाले ते समोर आले पाहिजे. धमकी देऊन एक महिना लोटला तरी तपास पुढे सरकला नाही. त्यामु्ळे माझा भ्रमनिरास होत आहे.पोलिसांशी माझे थेट बोलणे झाले नाही. माझे वकील त्यांना भेटून आलेत. आम्ही पोलिसांकडे कोरटकरचा पासपोर्ट ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. शिवरायांच्या अवमानामुळे शिवप्रेमींची मने व्यथित झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः नागपूरचे आहेत. त्यामु्ळे हे सर्व प्रकरण चिल्लर निश्चितच नाही. हा अतिशय गांभिर्याने घेण्याचा मुद्दा आहे. कारण, हा मुद्दा केवळ मला धमकी मिळाली किंवा शिवीगाळ झाल्याचा नाही. तर मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या शिवाजी महाराजांविषयी काय भावना आहेत? त्याचा आहे. त्यामुळे एक संवेदनशील मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून त्यांनी हा मुद्दा हाताळावा.इंद्रजित सावंत यांनी जुना राजवाडा पोलिस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्याकडे एका अर्जाद्वारे प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली आहे. आजपर्यंत प्रशांत कोरटकर इंदूर, चंद्रपूर व कोलकाता आदी ठिकाणी लपल्याच्या बातम्या येत होत्या. पण आता तो थेट दुबईला पळून गेल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांना फरार आरोपीची चौकशी करण्यासाठी सगळ्या कायदेशीर मार्गांचा वापर करण्याचा अधिकार आहे. माझी विनंती आहे की, आरोपी प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट पोलिस स्टेशनला आणून दाखवणे व पासपोर्ट जमा करण्याविषयी त्याच्या पत्नीला समन्स बजावण्यात यावा. तसेच त्याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांची चौकशी केली जावी, असे सावंत यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.

महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार

मुंबई, दि. 22 मार्च 2025 – महावितरणला शनिवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळातर्फे (सीबीआयपी) सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज वितरण कंपनी म्हणून गौरविण्यात आले. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर उपस्थित होते.

महावितरणच्या गौरवाबद्दल अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे आभार मानले तसेच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

महावितरण मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्याला वीज पुरवठा करते. महावितरणचे घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आणि कृषी असे ३ कोटी ११ लाख ग्राहक आहेत. महावितरण देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे.

महावितरणने ग्राहक सेवेसाठी तसेच वीज वितरणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा केलेला वापर, ऊर्जा परिवर्तन आराखडा राबवून नवीकरणीय ऊर्जेच्या वापरावर दिलेला भर, वीज खरेदी खर्चात कपात करून ग्राहकांसाठीचा वीजदर कमी करण्यासाठी आयोगासमोर मांडलेला प्रस्ताव, शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर ऊर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० सह राबविलेल्या विविध योजना आदी बाबींचा विचार करून महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आले.

वीज उपकेंद्रांची संख्या वाढविणे, त्यांची क्षमता वाढविणे, नव्या वीज वाहिन्यांचे जाळे उभारणे, वितरण रोहित्रांची उभारणी तसेच वीज वितरण व्यवस्थेत केलेली सुधारणा यांचाही विचार महावितरणचा सन्मान करताना करण्यात आला.

कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही गेम चेंजर योजना आहे. हा देशातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक दशकांची कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठ्याची मागणी पूर्ण होणार आहे. योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. आगामी वर्षामध्ये राज्यातील सर्व कृषी पंपांना शंभर टक्के सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचे उद्दीष्ट पूर्ण होईल. या योजनेत किफायतशीर दरात वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे महावितरणचा वीज खरेदी खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंप बसविण्यात महावितरणने देशात प्रथम स्थान मिळविले आहे. उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालविण्यासाठीच्या राज्य सरकारच्या योजनेसाठी महावितरणला नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

गावाची संपूर्ण विजेची गरज स्थानिक पातळीवर तयार झालेल्या सौर ऊर्जेवर भागवून गावाला ऊर्जा स्वयंपूर्ण करण्यासाठी महावितरणने सौर ग्राम योजना सुरू केली आहे. त्यामुळे गावकरी वीजबिलमुक्तही होतात. राज्यात १०० गावे महावितरणतर्फे सौर ग्राम विकसित करण्यात येणार असून त्यापैकी १० गावे सौर ग्राम झाली आहेत. 

महावितरणने स्वतःची कार्यालये, वीज उपकेंद्रे, ग्राहक सेवा केंद्रे आणि अतिथी गृहे सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. महावितरणच्या मुख्यालयाच्या छतावर बसविलेल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले.

महावितरणने राज्यात विद्युत वाहनांसाठी ६३ चार्जिंग स्टेशन्स राज्यात उभारली आहेत. पुणे येथे उभारलेल्या विद्युत वाहनांचे चार्जिंग स्टेशन छतावरील सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाला जोडून महावितरणने अक्षय्य ऊर्जेच्या आधारे वाहनांचे चार्जिंग करण्यासाठी पाऊल टाकले आहे.

विदुषी सावनी शेंडे गायनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न

पुणे – हृद्य स्पर्श – हॅव अ हार्ट फौंडेशनच्या वतीने किराणा घराण्याच्या प्रख्यात गयिका विदुषी सावनी शेंडे यांच्या गायनाचा बहारदार कार्यक्रम पीवायसी जिमखाना येथील सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी डॉ.सुधीर भाटे(संस्थापक हृद्य स्पर्श), डॉ.समीर भाटे,कॅप्टन डॉ.अजय बदामीकर, विवेक देशपांडे, कर्नल निखिलेश पराडकर आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी सावनी शेंडे यांनी मारू बिहार रागातील “रतिया मै तो “ने सुरुवात केली, बसंत बहार व अन्य रागातील विविध गाणी सुरेलपणे सादर करून रसिकांची मने जिंकली. यावेळी बोलतांना डॉ.सुधीर भाटे यांनी हृदयाच्या आरोग्यासाठी जनजागृती व्हावी या साठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे नमूद केले.

सायबर सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी रोटरीने पुढाकार घ्यावा-डॉ. दीपक शिकारपूर यांचे आवाहन : व्यावसायिक गुणवत्ता, सेवा पुरस्कारांचे वितरण

पुणे : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण समाजात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) सतत कार्यरत असणारी तरुण पिढी सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य ठरते आहे. तरुण पिढी गुन्ह्यांमध्ये कशी ओढली जाते हे त्यांनाही समजत नाही. मोबाईलचा वापर किती आणि कसा करावा याविषयी पालक मुलांना सजग करत नसल्यानेही मुलांच्या हातून चुका घडत आहेत. समाजातील ही परिस्थिती पाहता रोटरी क्लबने सायबर सुरक्षेबाबत जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी, रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे विस्डमतर्फे व्यावसायिक सेवा आणि गुणवत्ता पुरस्कारांचे वितरण डॉ. शिकारपूर आणि जिल्हा व्यावसायिक संचालिका मधुमिता बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी डॉ. शिकारपूर बोलत होते. कोथरूड येथील गांधी भवनात आयोजित कार्यक्रमात आयजीपी, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमीचे संचालक डॉ. राजेंद्र डहाळे यांचा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराने तर हेल्दी फूड बँकेची स्थापना करणाऱ्या डॉ. प्रतिभा कोलते यांचा व्यावसायिक सेवा पुरस्काराने गौरव करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ पुणे विस्डमचे अध्यक्ष निलेश धोपाडे, सचिव पूजा वाडेकर मंचावर होते.
समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा रोटरी क्लब ऑफ पुणे विस्डमतर्फे गौरव करण्यात येत आहे, याबद्दल मधुमिता बर्वे यांनी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
सायबर गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी डॉ. दीपक शिकारपूर यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरल्याचे सांगून डॉ. राजेंद्र डहाळे म्हणाले, बँकेसंदर्भातील माहिती अनेकजण मोबाईलमध्ये ठेवतात. अनावश्यक फोन कॉल्सला प्रतिसाद दिल्यामुळे गोपनिय माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागते, त्यामुळे मोबाईल वापरताना सजग राहून योग्य तऱ्हेने हाताळावा. सेवानिवृत्तीनंतर समाजकार्यात स्वत:ला वाहून घ्यायचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी आहार, विहार आणि व्यवहारात सुधारणा झाली पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. प्रतिभा कोलते यांनी व्यक्त केली.

‘महाराजांचा अपमान करा आणि पळून जा, फडणवीसांची नवी योजना’, हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

पुणे-काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात होणाऱ्या महाराजांच्या अपमानाच्या पा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते म्हणाले की, ‘कोरटकर सारखा निर्लज्ज माणूस देश सोडून पळून जातो. यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक योजना सुरु केली आहे की काय ? कि महाराजांचा अपमान करा आणि पळून जा. या विकृत माणसाला सरकारने सुरक्षा पुरवली. इंग्रज देखील औरंगजेब एवढे जुलमी आणि क्रूर होते. अपमान करा आणि पुरस्कार मिळवा असचं सुरु आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार तुघलकी आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे कोणत्याही प्रकारची माफी मागणार नाही. एकनाथ शिंदे हे मला माफी मागा नाही तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करतो, असे म्हणत धमकावत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

या पत्रकार परिषदेला माजी मंत्री रमेश बागवे, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे,प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी,अनंत विठ्ठलराव गाडगीळ, दिप्ती चौधरी,युवक कॉंग्रेसचे सौरभ बाळासाहेब अमराळे पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार संजय जगताप, संजय बालगुडे, आदी उपस्थित होते. त्यानंतर काँग्रेस प्रांताध्यक्ष यांनी पुणे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी, पिंपरी चिंचवड पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन केले.


सपकाळ पुढे म्हणाले की, कोरटकर पळून जातो सरकार काय करत आहेत? तुमचा, देशाचा गृह विभाग झोपला होता का? कोरटकरला पळून जाण्यासाठी मदत करण्यासाठी पोलिसांना देवेंद्र फडणवीस यांनी भाग पाडले आहे का? असा सवाल देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. दुसरीकडे माजी मंत्र्याचा लाडका मुलगा न सांगता पळून जातो त्याच विमान मागे बोलावून परत आणले जाते आणि महाराजांचा अपमान करणारा आरोपी पळून जातो. असं देखील सपकाळ म्हणाले आहेत.हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, मी कोणाबद्दल एकेरी बोललो नाही, अपमानजनक बोललो नाही. मग माफी का मागावी. सरकारकडून प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही त्याबाबत बोलले जात नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.सपकाळ म्हणाले की, पुण्याची सभ्य, सुसंस्कृत मुल्य आहे. मतभेद असले तरी चालेल पण मनभेद नको. राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात असावे, टीका केली जावी पण एकमेकांनी व्यवस्थित राजकारण केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह व्यक्त्व्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर हा परदेशात पळून गेला. गृहमंत्री आणि तो नागपूर मधील असल्याने त्यांचे परिचय आहे. सपकाळ म्हणाले की, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या सोबत त्याचे सलगीचे संबंध आहे. त्यावर कारवाई न करता औरंगजेब कबर उखडून टाकणे प्रश्न निर्माण करण्यात आला आहे. राज्यातील कारभार पाहता तो क्रूर पद्धतीचा आहे म्हणून औरंगजेबाचा कारभार व फडणवीसांचा कारभार सारखाच आहे असे मी म्हणालो असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी असे म्हणून माझ्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिंदेंनी मागणी केली पण मी माझ्या विधानावर आजही ठाम आहे, माफी मागण्याचा प्रश्नच नाही. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशी करून कारवाई केली जाईल असे सांगितले. माझ्या विधानावर कारवाईचा इशारा देणारे दोन्ही उपमुख्यमंत्री राहुल सोलापुरकरच्या विधानावर गप्प का आहेत? प्रशांत कोरटकर कसा पळून गेला? त्याच्यावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न सपकाळ यांनी केला. पुणे शहरात राज्यभरातून शिक्षणासाठी मुले मुली येतात, पण या शहरात आता ड्रग्जची खुलेआम विक्री होते, गुजरातच्या कांडला बंदरातून ड्रग्ज येतात त्याचा तपास केला जात नाही. महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का, असा प्रश्न जनतेला पडला असून राज्यातील गृहविभागाचा कारभार पाहता राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्र्याची गरज आहे असेही सपकाळ म्हणाले.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विकृत बोलणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत नाहीत तर दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकरून काडला जात आहे. कबर उखडून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. औरंगजेब जसा क्रूर होता तसेच इंग्रजसुद्धा क्रूर व जुलमी होते, त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांड केले, भगतसिंग सारख्या अनेक क्रांतीकारकांना फाशी दिली, त्या इंग्रजांचे हस्तक म्हणून ज्या लोकांनी काम केले, ज्यांनी इंग्रजांची पेन्शन घेतली यांची स्मारके, पुतळे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल उखडून टाकणार का, याचे उत्तर त्यांनी द्यावे असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

कोरटकर देश बाहेर पळून जाताना त्याला कोणी मदत केली, गृह खाते झोपले होते का? पोलिस यांनी त्याला संरक्षण होते का? पोलिसांची त्याला पाळून जाण्यास फूस होती का ? याबाबत गृहमंत्री यांनी उत्तर द्यावे. सपकाळ म्हणाले की, लाडका मंत्री, ठेकेदार, मुलगा अशा योजना सरकारने सुरू केल्या असून माजी मंत्री यांचा मुलगा देशा बाहेर जाताना त्याला संरक्षण दिले जाते. क्रांतिकारक, महापुरुष यांच्यावर टीका करून पोलिस संरक्षण दिले जात आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर कोणती कारवाई केली गेली नाही. बीडमध्ये संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणात तपासात हलगर्जीपणा झाला. पोलिस धाक नसल्याने स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीवर बलात्कार झाला. केंद्रीय राज्यमंत्री यांच्या मुलीची छेड काढून आरोपींवर कारवाई होत नाही. परभणी मध्ये पोलिस कोठडीत अमानुष मारहाणमध्ये मृत्यू झाला. या सर्व घटनेतून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था याची लक्तरे काढणारे आहे.

भारतीय सेना दल आणि पुनीत बालन ग्रुप संयुक्त विद्यमाने ‘युगांतर २०४७ चे’ आयोजन

  • भरती विभाग पुणे आणि पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने आयोजन
  • सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देणार ”

पुणे ; प्रतिनिधी
राष्ट्र उभारणीत भारतीय सैन्याच्या भूमिकेबद्दल जागरूकता पसरवणे आणि सैन्य दलातील करिअरच्या विविध संधींवर प्रकाश टाकून सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भारतीय सैन्य दलाच्यावतीने पुण्यात युगांतर २०४७ चे आयोजन करण्यात आले आहे. सैन्य दलाच्या पुणे भरती विभागाच्या वतीने आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे दि. २५ रोजी हा कार्यक्रम होणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध संस्थांमधील सुमारे ३ हजार महाविद्यालयीन विद्यार्थी त्यात सहभागी होणार असून हा कार्यक्रम “युवा, योग आणि तंत्रज्ञान” या थीमवर केंद्रित असणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे प्रेरक व्याख्याने, भारतीय सैन्यात सामील होण्याबाबत माहिती सत्रे, कॅडेट्सनी त्यांच्या परिवर्तनाच्या प्रवासातील अनुभवांची देवाण- घेवाण, प्रसिद्ध वक्त्या सुश्री जया किशोरी यांचे विशेष प्रेरक व्याख्यान, आधुनिक लष्करी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणारे शस्त्र प्रदर्शन, प्रशंसित मानस तज्ज्ञ अमित कलंत्री यांचे मन वाचण्याचे सादरीकरण आणि सबली – द बँड यांचे थेट संगीत सादरीकरण यांचा समावेश असून आरजे तरुण हे कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणार आहे.
या कार्यक्रमात ‘राष्ट्र उभारणीकडे’ या प्रेरणादायी चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचा उद्देश राष्ट्र उभारणीत भारतीय सैन्याच्या भूमिकेबद्दल जागरूकता पसरवणे आणि दलातील विविध करिअर संधींवर प्रकाश टाकणे आहे. भारताच्या विकसित राष्ट्रात रूपांतरामागील प्रेरक शक्ती म्हणून तरुणांची भूमिका असल्याने, हा कार्यक्रम त्यांना ते अर्थपूर्ण योगदान कसे देऊ शकतात यासंबधीचा विचार देणार आहे.

युगांतर २०४७’ हा केवळ एक कार्यक्रम नाही तर तरुणांना भारतीय सैन्याच्या नीतिमत्तेशी जोडण्यासाठी, त्याची मूल्ये समजून घेण्यासाठी आणि राष्ट्रसेवेच्या संधी शोधण्यासाठी एक व्यासपीठ आहे. भारताचे भविष्य घडवण्यासाठी शिस्त, नेतृत्व आणि नवोपक्रमाचे महत्त्व हा उपक्रम अधोरेखित करतो.
– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.

भारतीय सैन्य दल आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यावतीने पुण्यातील तरुणांसाठी युगांतर २०४७ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या तरुण पिढीला भारताच्या गौरवशाली इतिहासहाची माहिती करून देण्यासाठी एक महत्वाचा प्रयत्न आहे. या एकदिवशीय कार्यक्रमात पुण्यातील विविध शैक्षणिक संस्था मधील ३ हजार विद्यार्थ्यांना भारतीय सेनेची ताकद आणि सैन्य दलाच्या वतीने आत्मनिर्भर भारतासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नाची माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमात एनडीएचे विद्यार्थी त्यांचे अनुभव कथन करणार असून भारतीय संस्कृतीची झलक दाखविण्यासाठी प्रसिद्ध वक्त्या जया किशोरी यांचेही व्याख्यान होणार आहे. युवा, योग आणि तंत्रज्ञान” असा धागा असलेल्या या कार्यक्रमात आपले स्वागत असून येत्या २५ मार्च रोजी गणेश कला क्रीडा येथे सकाळी साडे दहा वाजता आम्ही आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत.
– मेजर जनरल योगेश चौधरी. (व्हिएसएम, एडीजी, झेड आर ओ)

“रंग रूप” भारतीय नाट्यशास्त्रावर होणार मंथन!

तीन दिवस राष्ट्रीय परिसंवाद:

पुणे: सांस्कृतिक कार्य विभाग परिषद, महाराष्ट्र राज्य आणि एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा नाट्य विभाग , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ रंग रूपक ‘ या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन राज्य कपूर मेमोरियल येथे मार्च २५ ते २७ दरम्यान ‘ आले आहे.

भारतीय परंपरेतील नाम नाट्य संस्कृतीचा प्रसार व्हावा या दृष्टीने आयोजित या परिसवांदात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखित नाट्यदिग्दर्शक/नाट्यकर्त्या मार्गदर्शन करणारी मीडी माहिती एमआयटी-एयू विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.महेश चोपडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अमोल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भारत सरकारचे नागपूर येथील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रस्थानी आयोजित या तीन दिवसीय परिसंवादाची विषयवस्तू “भारतीय ज्ञान परंपरेतील नाट्यशास्त्राची भूमिका” ही आहे. एनएसडी , नवी दिल्लीचे व्यावसायिक संचालक पद्मश्री वामन केंद्रे , एनएसडी दिल्लीचे कार्यकारी अध्यक्ष पद्मश्री भरत गुप्त , संगीत नाटक अकादमी , नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा , प्रसिद्ध अभिनेते , शिखर पद्मश्री चंद्रप्रकाश द्विवेदी मार्गदर्शन करणार असून नाट्यक्षेत्राच्या विकासासाठी प्राचीन नाट्यशात्रीय सिद्धांताचे मूल्य अधोरेखित करणार आहेत. तसेच प्रख्यात शास्त्रीय नर्तक पद्मश्री शशधर आचार्य , गुरुषमा भाटे , ज्येष्ठ नाट्यक्षेत्रज्ञ डॉ. संगीता गुंडेचा , पियाल भट्टाचार्य , डॉ. गौतम चार्तेजी , प्रा. संध्या रायते , डॉ. सुदिन कुमार मोहंती आणि प्रसाद भिडे नाट्यशास्त्रातील विविध पैलूंवर मार्गदर्शन करणार आहेत.

भरतमुचित रचित नाट्यशास्त्र रंगम-नाट्य-अभिनय- या सह भारतीय संस्कृतीचा पक्ष वारसा असूनही या खेळीतील भारतीय तत्वज्ञान , मानसशास्त्र आणि सद्य स्थितीतील नाट्यचळवळ देखील सखोल मंथन होणार असून विद्यार्थी नाट्यरसिक नाट्यसाधनेचे नवनीत जोडून विश्वास ठेवतात. व्यक्त करण्यात आला.

या परिसंवादास एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड , महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्यालयाचे संचालक विभीषण चवरे , एमआयटी एडीटी विद्यापीठ कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र , गुजरात आस्था बोले कार्लेकर विधानसभा गोड विरुद्ध आहे. तर कुलसचिव डॉ. महेश चोपडे , सिनेनाट्य अधिष्ठाता डॉ. मुकेश शर्मा आणि संस्कार अखिल भारतीय संघ भारत अभिजीत गोखले मंत्री मार्गदर्शन मार्गदर्शन आहे.

या परिसंवादाचे आयोजक डॉ. अमोल देशमुख आणि समन्वय प्रा. सुनीता नागपाल , प्रा. निखिल शेटे , प्रा. अनिर्बन बाणिक आणि प्रा. किरण पावसकर कार्यक्रमाच्या यशासाठी अथक प्रयत्न आहेत.

नाट्य सादरीकरणाने रंगत!या परिवादात प्रख्यात नाट्यगृहाचे विद्यार्थी साधक संवाद साधणार आहेत. या भाषाच प्रथितयश नाट्यकर्मींद्वारे नाट्य सादरीकरण होणार आहे. नाट्यतंत्र , नाट्य-जाणिवा विकसित करण्यासाठी “रंग रूपक” पर्वणी ठरणार आहे.

पुणेकर अनुभवणार शास्त्रीय नृत्यकलेचा अद्भभूत आविष्कार

नृत्यगुरु पंडिता रोहिणी भाटेंना ५०० पेक्षा जास्त नृत्यांगनांची आदरांजली

२२- २३ रोजी कोथरुडमधील शुभारंभ लॉन्स मध्ये भव्य आयोजन

पुणे-पुणेकरांना कथ्थक, सत्रीय, ओडिशी आदी शास्त्रीय नृत्यकलेचा अद्भूत अविष्कार अनुभवायला मिळणार असून, जवळपास ५०० पेक्षा जास्त नृत्यांगना नृत्यगुरु पंडिता रोहिणी भाटे यांना आदरांजली वाहणार आहेत. येत्या २२ आणि २३ मार्च रोजी कोथरुडमधील शुभारंभ लॉन्स येथे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शास्त्रीय नृत्य हा भारतीय सांस्कृतिचा अविभाज्य भाग आहे. प्रचीन काळापासून भारतातील शास्त्रीय नृत्य प्रकारांना एक शिस्त आणि कलेच्या माध्यमातून ईश्वराला समर्पित करण्याचा मार्ग म्हणून शास्त्रीय नृत्य कलेला ओळखले जाते. कथ्थक, भरतनाट्यम्, कुचीपुजी, ओडिसी, कथकली, मोहिनीपट्टणम्, मणिपुरी या भारतीय शास्त्रीय नृत्याच्या विविध शैली असून, या सर्व शैली पुणेकरांना एकाच व्यासपीठावर अनुभवता येणार आहेत.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था पुणे यांच्या माध्यमातून कोथरुडमध्ये २२ आणि २३ मार्च रोजी सायं. ५.३०. वा. शुभारंभ लॉन्स पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, हैदराबादच्या ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना पद्मश्री आनंद शंकर जयंत आणि कथ्थक उस्ताद निरुपमा आणि राजेंद्र आदींसह जवळपास ५०० पेक्षा जास्त शास्त्रीय नृत्य कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

तसेच, या महोत्सवानिमित्त नृत्य गुरु शमा भाटे, गुरु मनीषा साठे, गुरु सुचेता चापेकर या देखील मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

शास्त्रीय नृत्य हा भारतीय सांस्कृतीचा कलेचा अविभाज्य भाग असल्याने जागतिक स्तरावर ही भारतीय शास्त्रीय नृत्याला एक आदराचे स्थान आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या परदेश दौऱ्यावेळी देखील भारतीय शास्त्रीय नृत्य कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वागत केले जाते. तसेच, अनेक परदेशी नागरिक देखील भारतीय शास्त्रीय नृत्य कलेवर अध्ययन करत आहेत. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे आणि शास्त्रीय नृत्य कलेचे अद्भूत दर्शन अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. तरी सदर कार्यक्रमास पुणेकरांनी अवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ना. पाटील यांनी यानिमित्ताने केले आहे.

जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बैठकीत केलेल्या सूचनांची प्रशासनाच्यावतीने दखल

प्रकरणे वेळेत निकाली काढण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश

पुणे, दि. २१: जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत करण्यात येणाऱ्या सूचनांची प्रशासनाच्यावतीने दखल घेण्यात आली असून सर्व संबंधित विभागाने याबाबत वेळेत कार्यवाही करुन त्या निकाली काढाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय यांच्यासह जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यांनी या बैठकीत विविध विषयांबाबत सूचना केल्या. त्यावर संबंधित विभागांच्यावतीने करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबतचा आढावा आगामी बैठकीत घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डूडी म्हणाले.

बैठकीत अशासकीय सदस्य यांनी प्रामुख्याने महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, महावितरण या विभागातील ग्राहकांच्या व नागरिकांच्या समस्या निराकरण करण्याच्या सूचना केल्या.
0000

डॉ. विश्वनाथ कराड हे लाल मातीतील कुस्ती जगविण्यासाठी प्रयत्नशील- हिंदकेसरी दीनानाथ सिंग

राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धेचे उद्धाटन

पुणे, दि.२१ मार्च: “आधुनिक काळातही लाल मातीवर प्रेम करणारे डॉ. विश्वनाथ कराड हे खर्‍या अर्थाने कुस्ती जगविण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत.  असे विचार हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, पुरातन यज्ञभूमी रामेश्वर (रुई) ग्रामस्थ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती प्रित्यर्थ संत एकनाथ महाराज षष्ठीचे औचित्य साधून लातूर येथील रामेश्वर (रुई) येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा २०२५ च्या उद्घाटन प्रसंगी सन्माननीय पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी आमदार रमेश अप्पा कराड हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच, महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम, शिवछत्रपती पुरस्कार विष्णुतात्या जोशीलकर, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, पैलवान बंडा पाटील रेटरेकर, नजरूद्दीन नाइकवडी, शिवछत्रपती पुरस्कार दिनेश गुंड, रामेश्वरचे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड, श्री. काशीराम दा. कराड, डॉ. हनुमंत कराड, श्री. राजेश कराड , ऋषिकेश कराड  व प्रा. विलास कथुरे उपस्थित होते.
दिनानाथ सिंग म्हणाले, ” डॉ. कराड हे पुनम का चाँद आहेत. त्यांनी पैलवानांना जो आधार दिला आहे त्यातून खेळाप्रती प्रेम दिसून येते. ही स्पर्धा सतत अशीच चालत राहावी यासाठी पुढील पिढी तयार आहे.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”मऊ मेणाहूनि आम्ही विष्णूदास | कठीण वज्रास भेदू ऐसे ॥’ अशी परंपरा असलेल्या रामेश्वर (रुई) या छोट्याशा गावात जागतिक स्तरावरील पैलवान येत आहे ही अभिमानास्पद बाब आहे. आमच्यावर विश्वास ठेऊन येथे येणार्‍या पैलवानांसाठी आम्ही काबिल ठरण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा खेळ परंपरेचा असून लोकांना जोडणारा असून भावी जीवनाला दिशा देणारा आहे. ही स्पर्धा १८ वर्षापासून सुरू आहे. तसेच येथे सर्वधर्मांचे मंदिर असल्याने हे गांव संपूर्ण जगभर मानवता तीर्थ म्हणून ओळखले जात आहे. मराठवाडा हा साधु संतांची भूमिका आहे. या पुढील काळात भारत देश संपूर्ण जगासमोर विश्वगुरू म्हणून उदयास येणार आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेचा संदेश स्वामी विवेकानंद यांनी जगासमोर ठेवला आहे. ते आता सत्यात उतरतांना दिसत आहे.”
विष्णुतात्या जोशीलकर म्हणाले, ” वारकरी हे धारकरी अशा उक्ती प्रमाणे डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ घेतली जाणारी ही स्पर्धा अद्वितीय आहे. संपूर्ण राज्यात अशा प्रकाराचा कार्यक्रम होत नाही. हे गांव सर्वधर्म समावेशक असून संपूर्ण लोकांना घेऊन वाटचाल करीत आहे.”
प्रा.विलास कथुरे यांनी प्रास्ताविकेत कुस्ती संदर्भातील संपूर्ण माहिती दिली. तसेच या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून पैलवान आले आहेत. यात एकूण २०० पैलवान लात मातीत उतरणार आहेत.
उदघाटनाची कुस्ती कोल्हापुरचा अभिषेक जोगदंड व रामेश्वर रूई येथील जुणेद पठाण  यांच्यात झाली. या मध्ये जुणेद पठाण हा विजयी झाला.
तसेच पुणे येथील भालचंद्र कुंभार व पुण्याचाच सोनु कोलाटकर यामधील स्पर्धेत भालचंद्र कुंभार हा चितपटाने विजयी झाला.
कुस्ती स्पर्धेचे धावते वर्णन समालोचक बाबा निम्हण यांनी केले.
डॉ. महेश थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विलास कथुरे यांनी आभार मानले.

मध्य रेल्वे पुणे विभाग उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार

0

पुणे-

उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यामुळे आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे-नागपूर आणि दौंड-कलबुर्गी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.  
 
१.  पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट एसी स्पेशल (२४ ट्रिप)

गाडी क्रमांक ०१४६९ एसी साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल पुण्याहून १५.५० वाजता, दर मंगळवारी ०८.०४.२०२५ ते २४.०६.२०२५ पर्यंत सुटेल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी (१२ फेऱ्या) ०६.३० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४७० एसी साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल नागपूरहून दर बुधवारी ०९.०४.२०२५ ते २५.०६.२०२५ या कालावधीत ०८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी (१२ फेऱ्या) पुण्यात २३.३० वाजता पोहोचेल.

रचना: तीन एसी 2 टियर, 15 एसी 3-टायर, 1 जनरल सेकंड क्लास कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन.

२.  पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (२४ सहली)

गाडी क्रमांक ०१४६७ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल पुण्याहून १५.५० वाजता, दर बुधवारी ०९.०४.२०२५ ते २५.०६.२०२५ पर्यंत सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (१२ फेऱ्या) ०६.३० वाजता नागपूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४६८ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल प्रत्येक गुरुवारी १०.०४.२०२५ ते २६.०६.२०२५ या कालावधीत नागपूरहून रात्री ८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी (१२ फेऱ्या) पुण्यात २३.३० वाजता पोहोचेल.

रचना: एक फर्स्ट एसी, एक एसी 2-टायर, दोन एसी 3-टायर, 5 स्लीपर क्लास, 6 जनरल सेकंड क्लास आणि 2 जनरल सेकंड क्लास कम गार्डची ब्रेक व्हॅन.

०१४६९/०१४७० आणि ०१४६७/०१४६८ :- उरुळी, दौंड चोर मार्ग, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा

३) दौंड-कलबुर्गी अनारक्षित स्पेशल – आठवड्याचे ५ दिवस (१२८ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01421 अनारक्षित स्पेशल दौंड येथून 05.00 वाजता, आठवड्यातून 5 दिवस (गुरुवार आणि रविवार वगळता) 05.04.2025 ते 02.07.2025 पर्यंत सुटेल आणि त्याच दिवशी 11.20 वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल. (६४ सहली)

गाडी क्रमांक 01422 अनारक्षित स्पेशल कलबुर्गी येथून 05.04.2025 ते 02.07.2025 पर्यंत आठवड्यातून 5 दिवस (गुरुवार आणि रविवार वगळता) 16.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 22.20 वाजता दौंडला पोहोचेल. (६४ सहली)
 
४) दौंड-कलबुर्गी अनारक्षित स्पेशल – द्वि-साप्ताहिक (५२ ट्रिप)

गाडी क्रमांक ०१४२५ अनारक्षित स्पेशल दौंड येथून दर गुरुवार आणि रविवारी ०३.०४.२०२५ ते २९.०६.२०२५ या कालावधीत ०५.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.२० वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल. (२६ सहली)

गाडी क्रमांक 01426 अनारक्षित स्पेशल कलबुर्गी येथून 03.04.2025 ते 29.06.2025 पर्यंत दर गुरुवार आणि रविवारी 20.30 वाजता सुटेल आणि दौंडला दुसऱ्या दिवशी 02.30 वाजता पोहोचेल. (२६ सहली)

01421/01422 आणि 01425/01426:, 10 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणी कम गार्ड ब्रेक व्हॅनसाठी रचना

०१४२१/०१४२२ आणि ०१४२५/०१४२६ साठी थांबे: भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अकलकोट रोड, बोरोटी, दुधनी आणि गणागापूर.

आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 01421,01422,01425,01426, 01469, 01470, 01467 आणि 01468 साठी विशेष शुल्कावर बुकिंग 24.03.2025 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर उघडेल.   

सुपरफास्ट मेल/एक्स्प्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या अनारक्षित निवासासाठी सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांची तिकिटे UTS द्वारे बुक केली जाऊ शकतात.

तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा