Home Blog Page 397

विदर्भाच्या रणजी संघाचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई, दि. २६ – रणजी ट्रॉफी ही देशातील सर्वात प्रतिष्ठेची आणि मोठी क्रिकेट स्पर्धा मानली जाते. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे मुंबई, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र अशा तीन वेगवेगळ्या संघांचा समावेश असून यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भाने शानदार कामगिरी करत जेतेपद पटकावले आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ संघाचे विधान परिषदेत मनःपूर्वक अभिनंदन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, क्रिकेट विश्वचषक जिंकणारा आपला संघ असो, किंवा देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू असोत त्यांचा उचित सन्मान करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. आम्ही खेळाडूंसाठी नियम आखले असून, त्यानुसार योग्य पातळीवरील खेळाडूंना योग्य सन्मान व पुरस्कार देण्याचे काम राज्य सरकार करेल. राज्य शासनाकडून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

सर्वसामान्य कार्यकर्त्याची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड हे संविधानाचे सामर्थ्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड

मुंबईदि. २६: एक सामान्य कार्यकर्ता विधानसभेच्या उपाध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर विराजमान होतो हे आपल्या संविधानाचे सामर्थ्य आहे, असे स्पष्ट करत विधानसभेच्या उपाध्यक्षपदी सदस्य अण्णा बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अण्णा बनसोडे यांच्या सामाजिक व राजकीय  कारकिर्दीचा उल्लेख करत सांगितले की, एक साधा कार्यकर्ता ते विधानसभेचा उपाध्यक्ष हा प्रवास प्रेरणादायी आहे. ते जनतेच्या विश्वासावर पुढे आले असून, त्यांच्या अनुभवाचा सभागृहाला निश्चितच लाभ होईल.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे शासन सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या या सभागृहात सामान्य कार्यकर्त्याची उपाध्यक्षपदी निवड झाली याचा मला मनस्वी आनंद झाला आहे. उपाध्यक्षपदावरून अण्णा बनसोडे सभागृहातील सदस्याच्या प्रश्नातून राज्यातील जनतेला न्याय देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री शिंदे अभिनंदनपर भाषणात म्हणाले की, विधानसभेच्या उपाध्यक्षपदी सदस्य अण्णा बनसोडे यांच्या निवड प्रक्रियेत सर्वपक्षीय सहकार्याचे वातावरण दिसून आले. विरोधी पक्षातील नेत्यांनीही सकारात्मक भूमिका घेत बनसोडे यांच्या निवडीला पाठिंबा दर्शवला, याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षातील नेत्यांचेही आभार मानले आणि उपाध्यक्षपदी विराजमान झालेल्या अण्णा बनसोडे यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ने “KSHITIJ 2024-25” संपन्न

पुणे : ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (DPCOE) ने आपल्या वार्षिक सामाजिक समारंभ “KSHITIJ 2K25” चे आयोजन 18 मार्च ते 24 मार्च 2025 दरम्यान यशस्वीरित्या पूर्ण केले.एक आठवड्याचा हा समारंभ अत्यंत यशस्वी ठरला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाचा एकत्रित अनुभव घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात 18 मार्च रोजी कमल उल्हास क्रीडा मैदानावर क्रीडा स्पर्धांसह झाली, ज्याने पुढील कार्यक्रमांसाठी चांगली तंदुरुस्ती दिली.विद्यार्थ्यांनी एकांकिका, काव्य वाचन, आणि गेमिंग अशा विविध सादरीकरणांमध्ये आपली प्रतिभा दाखवली.लुक-अलाइक डे, वादविवाद, पथनाट्य (स्ट्रिट प्ले) आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी कॉलेजच्या परिसरात उत्साह निर्माण केला. याशिवाय कला प्रदर्शन, हॅलोवीन डे सेलिब्रेशन, आणि एक रंगारंग फन फेअर मध्ये देखील विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला.

कार्यक्रमाचा शेवट 24 मार्च रोजी झाला, ज्या दिवशी सांस्कृतिक सादरीकरणे, फॅशन शो आणि इलेक्ट्रिफायिंग डीजे नाइटसह समारंभाचा समारोप करण्यात आला,जो उत्साही वातावरणात पार पडला.

सदर कार्यक्रमास मुख्य पाहुणे म्हणून,सागर उल्हास ढोले पाटील, अध्यक्ष, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी (DPES), हे उपस्थित होते.सरांच्या प्रोत्साहनामुळे कार्यक्रमाला वेगळीच झळाळी मिळाली. सरांचे अत्यंत मोलाचे योगदान, सहकार्य व त्यांच्या समर्थनामुळे “KSHITIJ 2K25” हा कार्यक्रम सर्वांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

हा कार्यक्रम सांस्कृतिक समितीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला, ज्याचे नेतृत्व प्रा .सुप्रिया शेळके, प्रा. भुषण करमकर, प्रा. मनीषा काकडे कॉलेज चे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश राजनकर आणि डॉ. अभिजीत दंडवते यांनी केले.

या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना त्यांच्या सृजनशीलतेला उभारी देण्यासाठी आणि कॉलेजच्या समुदायामध्ये मजबूत नातेसंबंध निर्माण करण्यासाठी उत्तम मंच प्रदान केला.

दिशा सालियान खून प्रकरणी आदित्य ठाकरेंचा थेट संबंध:कुटुंबियांची पोलिस आयुक्तांकडे तक्रार, ते नैतिकता म्हणून राजीनामा देणार का?- संजय गायकवाड

मुंबई-दिशा सालियान हिचे आई-वडील यांनी काल पोलिस आयुक्तांची भेट घेतली. दिशाच्या खूनामध्ये विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट संबंध असल्याची तक्रार दिली आहे, असे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.संजय गायकवाड म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. दिशाच्या हत्येत आदित्य ठाकरेंचा थेट संबंध असल्याचा आरोप तिच्या वडीलांनी केला असून आता आदित्य ठाकरे नैतिकता म्हणून राजीनामा देणार का असा सवाल त्यांनी केला आहे.

मुलीच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात त्यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर या प्रकरणातील तथ्ये लपवल्याचा गंभीर आरोप केला आहे आणि तेच मास्टरमाईंड असल्याचे सांगितले आहे. त्यांनी मुंबई पोलिसकडे आदित्य ठाकरे, अभिनेता दिनो मोरिया, अभिनेता सूरज पंचोली व त्यांचे अंगरक्षक, माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग, सचिन वाझे आणि रिया चक्रवर्ती यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.दरम्यान, उच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असताना सतीश सलियन यांनी मुंबई पोलिसात तक्रार केल्याने शंका उपस्थित केली जात आहे.

परमबीर सिंह यांनी हे प्रकरण दाबण्याच्या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड आहेत. परमबीर यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव आल्यानंतर कव्हरअप करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळी कोणताही राजकारणी आला नसल्याचा दावा केला. पण मोबाईल टॉवरच्या लोकेशनपासून प्रत्यक्षदर्शींच्या जबाबापर्यंत सर्वच गोष्टी त्यांचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध करतात,असे सतीश सलियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी सांगितले. एनसीबीच्या चौकशी अहवालाचा हवाला देत सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे ड्रग्ज व्यापारात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. ही माहिती मुंबई पोलिसांना लेखी तक्रारीत देण्यात आली आहे.

सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी पत्रकारांना सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. दिशा सालियन प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा गैरवापर केला असून त्यांना सहआरोपी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयितांना वाचवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

भास्कर जाधवांनी विधानभवनातील गैरव्यवहाराचे करताच विधान.. सभागृहात गोंधळ .

मुंबई- मी जबाबदारीने सांगतो काल अध्यक्षांच्या कर्मचाऱ्याच्या ऑफिसात सत्ताधारी पक्षाचे आमदार गेले असून लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत, असे आमदारांनी विचारल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदावर अन्न बनसोडे यांची निवड झाल्यावर त्यांच्या अभिनंदानार्थ बोलताना भास्कर जाध म्हणाले, फादावीस आणि अजितदादा यांनी बनसोडे हे पान टपरीवाले होते असे सांगून त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले आहे . मी देखील ट्रक वर क्लीनर होतो . असे सांगून त्यांनी वृत्तपत्रातील बातमीचा हवाला देत आता विधान भवनात प्रवेशासाठी १० हजार रुपये घेतले जात असल्याच्या बातमी कडे लक्ष वेधले आणि अध्यक्षांच्या अधिकाऱ्यांकडे सत्ताधारी आमदार गेले होते आणि त्यांनी लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील अशी विचारणा केल्याचा आरोप करताच सभागृहात गोंधळ झाला.

ठाकरे पिता-पुत्रावर आरोप करणारे वकील नीलेश ओझा यांना सर्वोच्च न्यायालयाने ठोठावली होती 3 महिन्यांची शिक्षा

मुंबईदिशा सालियन मृत्यूप्रकरणी वकील नीलेश ओझा यांनी आदित्य व उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेत. या प्रकरणात या दोघांनाही आरोपी करण्याची मागणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. पण आता या ओझांचीच वादग्रस्त पार्श्वभूमी समोर आली आहे. एवढेच नाही तर सुप्रीम कोर्टानेही त्यांना एका प्रकरणात आर्थिक दंडासह 3 महिन्यांची शिक्षा ठोठावल्याचे उजेडात आले आहे.

दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. पण ही आत्महत्या होती की हत्या? यावरून बरेच राजकारण रंगले आहे. पण आता दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून आपल्या मुलीची सामूहिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी मंगळवारी मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांशी बोलताना त्यांचे वकील नीलेश ओझा यांनी या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी करण्यात आल्याचे सांगितले. यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ओझा यांची वादग्रस्त कारकिर्द पुढे आली आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, सुप्रीम कोर्टाने 2020 मध्ये न्यायसंस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याप्रकरणी नीलेश ओझा यांना आर्थिक दंडासह 3 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. याच प्रकरणात जनहिति याचिका दाखल करणाऱ्या राशीद खान पठाण यांनाही शिक्षा झाली होती. ओझा व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही प्रलंबित खटल्यांवरून आपल्या तत्कालीन न्यायमूर्तींविरोधात गंभीर आरोप केले होते. त्यानंतर कोर्टाने त्यांना प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या आर्थिक दंडासह 3 महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली होती. ओझा यांच्यासह महाराष्ट्र व गोवा इंडियन बार असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विजय कुर्ले व एका एनजीओचे राष्ट्रीय सचिव राशीद खान पठाण यांनी आपल्या आरोपांद्वारे न्यायपालिकेला बंधन बनवण्याचा प्रयत्न केल्याचे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी नोंदवले होते.

अधिवक्ता नीलेश सी. ओझा हे एक मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. ते मूलभूत मानवी हक्कांसंदर्भात जनजागृती व त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करतात. ते सध्या मुंबईत वास्तव्यास असून, मुंबई हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात वकिली करतात. त्यांचे ध्येय मानवतावादी जागतिक भारत निर्माण करणे आहे.

अ‍ॅड. नीलेश ओझा यांचा जन्म व संगोपन महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे झाले. तिथेच त्यांनी बीई (इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स) पूर्ण केले. अभियंता ते वकिलापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाला. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, अ‍ॅड. नीलेश ओझा यांना एका आघाडीच्या पेमेंट प्रोसेसिंग कंपनीत नोकरी मिळाली. त्यानंतर कालांतराने ते वकिलीकडे वळले.

नीलेश ओझा यांनी भारतीय न्यायालयांमधील पूर्वसूचना आणि प्रक्रियांच्या कायद्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शक, ‘खोट्या शपथपत्रांवर आणि खोट्या खटल्यांवर कारवाई कशी करावी (खोटी साक्ष कायदा)’, पवित्र वेद और इस्लाम धर्म, भगवद् गीता में ईश्वर के आदेश, चुकीचे निर्णय आणि पोलिसांच्या अत्याचाराविरुद्ध न्याय कसा मिळवायचा’, ‘मानवी हक्क नियमावली’ – जामिनाचा कायदा, ‘पोलीस, नागरिक आणि मानवाधिकार कायदा’ आदी पुस्तके लिहिली आहेत.

सई ताम्हणकर थिरकणार लावणीवर!

‘देवमाणूस’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो २०२५ च्या बहुचर्चित मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’ निर्मित, या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणूका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

नुकतीच या चित्रपटातील महत्वपूर्ण गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘देवमाणूस’मध्ये पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे.

हे गाणे एप्रिलमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सई ताम्हणकरच्या चाहत्यांसाठी तसेच मराठी प्रेक्षकांसाठी ही एक विशेष भेट असणार आहे. पहिल्यांदाच सई मोठ्या पडद्यावर लोककला सादर करताना दिसणार आहे.

याबद्दल सई सांगते, “लव फिल्म्ससोबत काम करण्याची आणि ‘देवमाणूस’ परिवाराचा भाग होण्याची संधी मिळाल्याने मी प्रचंड आनंदी आहे. अशा प्रतिभावान टीमसोबत काम करणे एक अविस्मरणीय अनुभव आहे. पहिल्यांदाच मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन लावणी सादर करत आहे आणि माझ्या चाहत्यांनी व प्रेक्षकांनी ती पाहावी, यासाठी मी खूप उत्सुक आहे. आत्ताच फार काही सांगू शकत नाही, मात्र मी जे काही सादर करणार आहे, ते प्रेक्षकांसाठी एक नवीन आणि वेगळा अनुभव ठरेल, याची मला खात्री आहे!”

‘लव फिल्म्स’ प्रस्तुत ‘देवमाणूस’, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग निर्मित, हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

जयकुमार गोरेंना CM पाठीशी घालत असल्याचा रोहीत पवारांचा आरोप

मुंबई : मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर होत असलेल्या आरोपावरुन आमदार रोहित पवार सभागृहमध्ये तर सभागृहाबाहेर खासदार सुप्रिया सुळे आक्रमक आहेत. या दोघांनी जयकुमार गोरे यांच्याविरोधात सापळा रचला असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात काल केला.
मात्र त्यावर स्पष्टीकरण देण्याची परवानगी रोहित पवारांना देण्यात आले नाही. यावर त्यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले आहे. जयकुमार गोरे यांच्याविरोधात एक गठ्ठा पुरावे आहेत, त्यांचा राजीनामा तर होणारच असे आव्हानच आमदार रोहित पवार यांनी दिले आहे. ते म्हणाले, अंतिम आठवड्यावर उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचा विषय आणला आणि सुप्रिया सुळे आणि माझे नाव घेतले. मात्र जेव्हा मी राइट टू रिप्लायची विनंती केली तर मला बोलू दिले नाही. मुख्यमंत्र्यांनी फक्त त्यांच्या भाषणातून आमचे नाव रेकॉर्डवर आणण्यासाठी हे केले का, असा संतप्त सवाल आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने आरोप केले. एका महिलेला एका मंत्र्याने अश्लील फोटो पाठवल्याचे आम्हाला एका महिला पत्रकाराने सांगितले, तिथून हा विषय सुरु झाला. महिलेच्या न्यायासाठी एक ते दोन फोन झाले असतील. मात्र 100-200 फोन केले नाही, असे रोहित पवार म्हणाले. रोहित पवार म्हणाले की, जयकुमार गोरे हे या प्रकरणी हायकोर्टात बेलसाठी गेले आहेत. हे प्रकरण आणि फोटो पाहून चुकीचं इंटेशन असल्याचं कारण देत न्यायमूर्तीने जामीन नाकारला. असं सर्व प्रकरण असताना मंत्र्यांविरोधात हक्कभंग आणू दिला जात नाही. उलट पत्रकारांनी प्रश्न विचारु नये म्हणून एका पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात आलं. आम्ही सभागृहात काही बोलू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी माझं आणि सुप्रिया सुळेंचं नाव घेतलं.

रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझं (रोहित पवार) नाव घेतलं, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचं देखील नाव घेतलं. तो विषय आमच्याकडे आला, आम्हाला सांगण्यात आलं की त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे. तसेच पत्रकारालाही न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही एक किंवा दोन फोन केले असतील. पण शंभर ते दोनशे फोन केले गेले नाहीत. आता तेथे कारवाई सुरू आहे. पण हा विषय फक्त पारदर्शकपणे हाताळायला हवा, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे

मात्र पीडित महिलेला सापळा रचून एक कोटींच्या खंडणीत अडकवण्यात आलं आहे. अरुण देवकर नावाचा पीआय आहे, त्याने पैसे ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. देहव्यापाराचे आरोप या पीआयवर आहेत. दुर्दैवाने त्या महिलेचा वकिल मॅनेज झाला. त्या वकिलाने फीचे पैसे घेऊन बोलावून तिथे देवकरने लावलेल्या ट्रॅपमध्ये महिलेला अडकवले. त्या पीडित महिलेला मी किंवा सुप्रीया सुळे यांनीही फोन केला नाही, असे स्पष्टीकरण रोहित पवार यांनी विधिमंडल परिसरात माध्यमांशी बोलताना दिले.

एक कोटी रुपयांची लाच घेताना पीडितेला पकडण्यात आले आहे, हे एक कोटी रुपये कॅश कुठून आली, कोणी आणली, असे प्रश्न उपस्थित करत रोहित पवार म्हणाले की एवढी मोठी रोख रक्कम घेऊन येणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत का? ते मंत्र्यांचे मित्र आहेत म्हनु न त्यांना सोडून दिले जाणार असाही टोला त्यांनी लगावला.

ते म्हणाले की, तुषार खरात नावाच्या पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर आरोप झाले. का तर त्याने यांच्या (जयकुमार गोरे) विरोधात बातम्या केल्या. यांनी (जयकुमार गोरे) मृत व्यक्तीची नावाने असलेली जमीनी लाटल्या, पैसे खालले याच्या बातम्या त्याने केल्या. ते मंत्री असल्याने त्यांचा हक्कभंग स्वीकारला जातो, मात्र आम्हाला हक्कभंग आणू देत नाही. आम्हाला हक्कभंग आणू दया. आम्ही पुराव्यांचा गठ्ठे मुख्यमंत्र्यांना आणून देऊ, असेही रोहित पवार म्हणाले.जयकुमार गोरे यांच्या विरोधात एवढे पुरावे आहे की त्यांचा राजीनामा घेतला जाईल, असे आव्हानच रोहित पवार यांना दिले आहे.

तीन हजार विद्यार्थ्यांना भारतीय सेनेत सामील होण्यासाठी मिळाले प्रोत्साहन

  • भारतीय लष्क़र व ’पुनीत बालन ग्रुप’कडून ’युगांतर 2047’ उपक्रमाचे आयोजन
  • पुणे :
  • भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी युवकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ’युगांतर 2047’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांमधील तीन हजार एनसीसी विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेत भारतीय लष़्क़र आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रनिर्माणासाठी पुढाकार घेत या प्रेरणादायी सेमिनारचे आयोजन केले होते. युवक, योग आणि तंत्रज्ञान हे भारताच्या प्रगतीचे आधारस्तंभ असलेल्या या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये सखोल चर्चा झाली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल अनूप शिंगल, एव्हीएसएम, एस.एम, महासंचालक, सैन्यभरती, नवी दिल्ली यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मे. जन. योगेश चौंधरी, व्हिएसएम, एडीजी, झेआरओ पुणे, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, आरएमडी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल- बालन, निवृत्त ब्रिगेडीयर सैरभसिंह शेखावत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

‘विकसित भारत’ या संकल्पनेवर बोलताना लेफ्टनंट जनरल शिंगल यांनी भारतीय सैन्याच्या राष्ट्रनिर्माणातील महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला आणि युवकांनी सैन्यात भरती होऊन देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. त्यांच्या प्रभावी भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि जबाबदारीची जाणीव निर्माण केली.
’पुनीत बालन ग्रुप’च्या सहकार्याने आयोजित या सेमिनारमध्ये अनेक उपक्रम झाले त्यात वरिष्ठ सैन्य अधिकार्यांकडून प्रेरणादायी व्याख्याने, करिअर मार्गदर्शन सत्र, भारतीय सैन्यातील संधींबाबत माहिती, एनडीए कॅडेट्सचे अनुभव, विशेष प्रेरणादायी भाषण ज्यात – जया किशोरी यांचे, शिस्त आणि चिकाटीचा महत्त्व पटवून देणारे व्याख्यान उपस्थित विद्यार्थ्यांना विशेष भावले.
यावेळी सैन्य दलाच्या विविध शस्त्रास्त्रांचे प्रात्यक्षिक प्रदर्शन आणि आधुनिक लष्करी तंत्रज्ञानाची झलक हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. प्रसिद्ध मेंटलिस्ट अमित कलंत्री यांचा मन वाचण्याचा परफॉर्मन्स सर्वांना अचंबित करणाराहोता. शेवटी सबाली – द बँड’चा लाईव्ह म्युझिकल परफॉर्मन्स ने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढवला.

या उपक्रमामुळे भारतीय सैन्यात प्रवेश घेऊ इच्छिणार्या युवकांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळाले. ‘युगांतर 2047’ हे केवळ एक सेमिनार नव्हते, तर भारताच्या तरुण पिढीला राष्ट्रनिर्माण आणि परिवर्तनाच्या आघाडीवर आणण्याचा एक महत्त्वाचा उपक्रम ठरला.

भारतीय लष्क़र ही केवळ नोकरी नाही तर ती आपली जीवनशैली आहे, ती संक़टाशी सामना करण्याची ताकद देते, जी लष्करातील प्रमुख सेनानींना घडवते, तसेच लष्क़रातील इतर कर्मचार्‍यांना शीस्त लावते. भारताचे भविष्य हे नव्या उर्जेने तरुणांचा हातात येत आहे. त्यासाठी युगातंर सारखे कार्यक्रम महत्वाचे आहेत, ही प्रेरणा प्रथम स्वामी विवेकानंद यांनी दिली आणि युवकांचे महत्व अधोरेखीत केले.
– ले. जन. अनुप शिंगल, (महासंचालक लष्क़र भरती, नवी दिल्ली
)

पुनीत बालन यांनी पुढाकार घेतल्याने युवा पिढीसाठी हा चांगला कार्यक्रम भारतीय लष्क़राला घेता आला. याची टॅगलाईन देखील युथ आणि योगा या धर्तीवर असून ती खुप सुंदर आहे. भारतीय स्वातंत्र्याला 2047 शंभर वर्ष पुर्ण होत आहेत. त्यासाठी युगांतर 2047 हा उपक्रम दिशादर्शक ठरेल, यात शंका नाही.
मे. जन. योगेश चौंधरी (व्हिएसएम, एडीजी, झेआरओ पुणे)

आजच्या युगात तरुण पिढी समाज माध्यामांवरच जास्त भर देत आहेत.अशा वेळी त्यांना भारतीय सैन्यदलात करिअरच्या संधी किती आहेत.हे माहिती व्हावे म्हणून युगांतर 2047 या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय लष्कराला सोबत घेत आम्ही केले.यात सुमारे तीन हजार युवक -युवतींनी सहभाग घेतला.यातून किमान दहा टक्के जारी युवकांचे आयुष्य बदलले तरी हा समाधान होईल.यातून सैन्यदलाला नवे ऑफिसर नक्कीच मिळतील, अशी आशा वाटते.

– पुनीत बालन, अध्यक्ष,पुनीत बालन ग्रुप,.

अभिनेता सोनू सूदची पत्नी समृद्धी महामार्गावर अपघातात जखमी

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याची पत्नी सोनाली सूद यांच्या कारचा मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेत सोनाली यांचा भाचाही जखमी झाला आहे. या दोघांवर नागपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच सोनू सूद तातडीने नागपुरात दाखल झाला आहे.सोनू सूद याच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली सूद यांचा सोमवारी रात्री मुंबई – नागपूर हायवेवर अपघात झाला. त्यांची कार एका ट्रकला धडकली. त्यात गंभीर जखमी झाल्या. हा अपघात झाला तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची बहीण व भाचा सोबत होता. सोशल मीडियावर सोनाली सूद यांच्या गाडीचे काही फोटो व्हायरल झालेत. त्यात कारचा समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सूद यांच्या कारने अतिशय वेगाने ट्रकला धडक दिली असावी असा अंदाज बांधला जात आहे.

या अपघातानंतर सोनाली सूद व त्यांचा भाचा या दोघांना नागपूर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार केले जात आहेत. दुसरीकडे, या अपघाताची माहिती कळताच सोनू सूद तातडीने नागपूरच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून आपल्या पत्नी व भाच्याच्या प्रकृतीची माहिती घेतली. ते सध्या त्यांच्यासोबतच आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणी काळजी करण्याची कोणतीही गोष्ट नाही.रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सोनाली व त्यांच्या भाच्याला पुढील 48 ते 72 तास सातत्याने निगराणी व वैद्यकीय देखभालीत ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अभिनेता सोनू सूदने पत्रकारांशी बोलताना या अपघाताची पुष्टी केली आहे. त्याने सांगितले की, माझी पत्नी सोनाली व भाच्याचा नागपूर – मुंबई महामार्गावर अपघात झाला. सुदैवाने त्यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. हे दोघेही आश्चर्यकारकरित्या बचावले. सध्या त्या्ंच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. कुटुंब लवकरच मुंबईला परतण्याची अपेक्षा आहे.

सोनू सूद व सोनालीचा 1996 मध्ये विवाह झाला. सोनाली या मूळच्या आंध्र प्रदेशाच्या आहेत. या दाम्पत्याला अयान व इशांत अशी दोन मुले आहेत. सोनालीने नागपूर विद्यापीठातून एमबीएची पदवीही घेतली आहे. ती एक प्रसिद्ध चित्रपट निर्माती आहे. विशेष म्हणजे सोनू सूद हा आपल्या कामांमुळे कायम चर्चेत असतो. पण सोनाली याहून अगदी उलट आहे. तिला तिचे खासगी आयुष्य जपायला आवडते.

‘अ‍ॅग्री हॅकॅथॉन’द्वारे राज्यातील कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण क्रांती घडेल;नवकल्पक संशोधकांना संधी मिळून कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 25 :- राज्यातील शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा आहे. कृषि हॅकाथॉनच्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स, कृषितज्ज्ञ आणि शेतकरी बांधवांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या, संस्थांच्या मदतीने शासनस्तरावर करण्यात येणार आहे. या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल. कृषी हॅकॅथॉन स्पर्धेच्या माध्यमातून नवकल्पक संशोधकांना संधी देण्याबरोबरच राज्यातील कृषिक्षेत्राला प्रगतीची आश्वासक दिशा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानभवनातील समिती सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली देशातील पहिल्या ॲग्रीहॅकॅथॉन स्पर्धेच्या नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, प्रधान सचिव (व्यय) सौरभ विजय, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), कृषी आयुक्त सुरज मांढरे, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, संशोधक, तज्ज्ञ उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्थेचा कृषी आणि कृषीपुरक उद्योगावर आधारीत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी, कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘अ‍ॅग्री हॅकॅथॉन’चे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून जलसंधारणासह सिंचनाच्या नव्या पद्धती, शाश्वतशेतीसाठी आधुनिक उपाययोजना, कीटकनाशक आणि जैविक खतांचे वैज्ञानिक उपयोग, शेतमालाची विक्रीसाखळी सुधारण्यासाठी ई-मार्केटिंग आदी उपाय करण्यात येणार आहेत. कृषि हॅकॅथॉनच्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स आणि कृषितज्ज्ञ यांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

राज्य सरकारच्या पुढाकारामुळे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. कृषी हॅकॅथॉनद्वारे नवकल्पक संशोधनाला संधी मिळेल. महाराष्ट्रातील कृषिक्षेत्राला नवी दिशा मिळेल. या हॅकॅथॉनच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये स्मार्ट शेती, हवामान अंदाजप्रणाली, स्वयंचलित सिंचन तंत्रज्ञान, आणि शाश्वत कृषी उपायांसाठी नवनवीन संकल्पना मांडल्या जाणार आहेत. ‘हॅकॅथॉन’मध्ये सहभागी होणाऱ्या संघांना त्यांच्या कल्पना मांडण्याची संधी मिळेल, यशस्वी संकल्पनांना पुढे नेण्यासाठी वित्तीय व तांत्रिक मदत देखील दिली जाणार आहे. खाजगी कंपन्यांचे सहकार्य घेऊन शासनाच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात साकारण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील समस्यांवर आधुनिक आणि तांत्रिक उपाय शोधण्याच्या दृष्टीने कृषी हॅकॅथॉन एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

घरकुल योजनेतील निधीची मागणी लाभार्थी ऑनलाईनरित्या मागवू शकणार जिल्हा परिषदेकडून ऑनलाईन सुविधा उपलब्ध

पुणे, दि. 25: पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत विविध आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या घरकुल बांधकामाच्या टप्प्यानुसार पुढील हप्ता मिळण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेमार्फत गुगल फॉर्मची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेमुळे लाभार्थ्याला या कामासाठी पंचायत समिती कार्यालयात जाण्याची गरज राहणार नसून वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंत व दिव्यांग आवास योजना आणि मोदी आवास योजना या योजना राबविल्या जातात.

आता या सुविधेमुळे घरकुल योजनेतील लाभार्थी स्वतः बांधकामाची प्रगती घरकुलाच्या
छायाचित्रासह व पुढील टप्प्याची निधी मागणी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfFFKxi7lYUqkQH7cJRCMOB8kyG8DCsbPE5gFnq_3nDGedRbg/viewform?usp=header या गुगल फॉर्मद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे नोंदवू शकणार आहेत.

लाभार्थ्याकडून आलेल्या मागणीनुसार शासकीय यंत्रेद्वारे त्याची पडताळणी व जिओ टॅगिंग केले जाईल आणि बांधकामाची खात्री पूर्ण झाल्यानंतर पुढील हप्ता मंजूर केला जाईल. त्यामुळे लाभार्थ्यास अधिक गतीने निधी मिळण्यास मदत होणार आहे.

लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील अधिकृत गुगल फॉर्मची लिंक गट विकास अधिकारी पंचायत समिती व ग्राम पंचायत कार्यालयात, ग्रामसेवक किवा ग्राम पंचायत अधिकाऱ्याकडेही उपलब्ध आहे, असे जिल्हा ग्रामीण विकाय यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
0000

संविधान हा लोकशाही मूल्यांचा पाया – डॉ. नीलम गोऱ्हे

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधान परिषदेत संविधान गौरव चर्चा

मुंबई, दि. २५ : भारतीय संविधान स्वीकारण्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये संविधानाच्या गौरवशाली वाटचालीवर विशेष चर्चा झाली. या चर्चेच्या अनुषंगाने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भारतीय राज्यघटनेच्या ऐतिहासिक प्रवासावर, महिलांच्या योगदानावर आणि सध्याच्या परिस्थितीतील अंमलबजावणीवर सखोल विवेचन केले.

सभापती राम शिंदे यांनी संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सभागृहाने एकत्र येऊन या ऐतिहासिक घटनेचा सन्मान करावा, असे मत व्यक्त करत बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा दिला.

त्याला अनुमोदन देताना, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात संविधानाच्या निर्मितीचा विस्तृत प्रवास उलगडला. त्या म्हणाल्या, “अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती भारताला एक होण्यापासून परावृत्त करू शकत नाही,” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासमितीसमोर दि. १७ डिसेंबर १९४६ रोजी स्पष्ट केले होते.

त्या पुढे म्हणाल्या, “राज्यघटनेचा प्रवास हा अनेक विचारवंत, कायदेविषयक चर्चा आणि ऐतिहासिक घडामोडींनी समृद्ध आहे. १७७७ पासून ईस्ट इंडिया कंपनीच्या वर्चस्वाखाली सुरू झालेल्या बदलांपासून ते १९५० मध्ये लागू झालेल्या भारतीय संविधानापर्यंतची वाटचाल महत्त्वपूर्ण आहे.”

संविधानाच्या निर्मितीत महिलांचा मोठा वाटा राहिल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “राज्यघटना बनविणाऱ्या समितीत १५ कर्तृत्ववान महिलांनी योगदान दिले. त्यांनी स्त्रियांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आणि समाजाच्या सर्व स्तरांतील महिलांसाठीचे हक्क संरक्षित केले.”

त्या पुढे म्हणाल्या, “आजच्या परिस्थितीत महिलांना अनेक कायद्यांद्वारे संरक्षण मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला, त्यामुळे स्त्रीशक्तीला अधिक बळ मिळाले. ‘नमो शक्ती वंदन विधेयक’ हे याचेच रूप आहे.”

संविधानातील समान नागरी कायद्याचा मुद्दा मांडताना त्या म्हणाल्या, “समान नागरी कायदा हा केवळ धार्मिक मुद्दा नसून, तो स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. भारतात पूर्वी दायभागा आणि मिताली हे दोन वेगवेगळे कायदे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलद्वारे या दोन्ही कायद्यांचे संहितीकरण केले, ज्याला महाराष्ट्रातील पुरोगामी महिलांचा मोठा पाठिंबा मिळाला.”

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील स्टँडअप कॉमेडी आणि सायबर क्राईम यासंदर्भात त्यांनी धोरणात्मक पावले उचलण्याची गरज अधोरेखित केली. त्या म्हणाल्या, “सध्याच्या डिजिटल युगात चुकीची माहिती पसरवण्याचे प्रमाण वाढले आहे. सायबरगुन्हे जामिनप्राप्त असल्याने महिलांना न्याय मिळतांना अडचणी येत आहेत . या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने त्वरित उपाययोजना कराव्यात.”

त्या पुढे म्हणाल्या, “भारतीय संविधान केवळ कायदे नाहीत तर ती जीवनमूल्ये समज़ुन ती कुटुंबात आणि समाजातही रुजवणे आवश्यक आहे.”
नीलम गोर्हेंनी महिलांबाबत म्हणजे मानवी अधिकार कायदे व मानव अधिकार कायदे म्हणजे महिलांचे कायदे हे ही अधोरेखित केले .

सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने असोसिएशन ऑफ कम्युनिटी कॉलेज ट्रस्टीज (ACCT) सोबत सामंजस्य करार केला

पुणे – २५ मार्च २०२५ – सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयू) ला सुश्री रॉबिन मॅट्रॉस हेल्म्स यांचे स्वागत करण्याचा विशेष मान मिळाला. कम्युनिटी कॉलेज ट्रस्टीज असोसिएशन (एसीसीटी) चे सदस्यत्व आणि शैक्षणिक सेवांचे उपाध्यक्ष, कॅम्पसला. या भेटीत भारत आणि अमेरिका यांच्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक भागीदारी मजबूत करण्याच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकण्यात आला.

त्यांच्या भेटीदरम्यान, सुश्री हेल्म्स यांनी एसएसपीयूच्या प्र  कुलगुरू डॉ. स्वाती एस. मुजुमदार आणि एसएसपीयूच्या संचालक, प्राध्यापक सदस्यांशी अनेक अभ्यासपूर्ण चर्चा केल्या . दोन्ही देशांमधील विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांसाठी संधी निर्माण करण्यावर भर देऊन, सहकार्य वाढवण्याच्या धोरणांवर या संभाषणात भर देण्यात आला.

या भेटीचे मुख्य आकर्षण म्हणजे एसएसपीयू आणि असोसिएशन ऑफ कम्युनिटी कॉलेज ट्रस्टीज (एसीसीटी) यांच्यात झालेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी . हा सामंजस्य करार शिक्षण, संशोधन आणि जागतिक व्यावसायिक विकासात परस्पर वाढ आणि नवोपक्रमाला चालना देण्याच्या उद्देशाने एका आशादायक भागीदारीची सुरुवात आहे.

या महत्त्वपूर्ण प्रसंगी उद्योग-संबंधित शिक्षण आणि जागतिक भागीदारांसोबतच्या सहकार्याद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याची SSPU ची वचनबद्धता आणखी दृढ झाली. SSPU आणि ACCT यांच्यातील सामंजस्य करारामुळे नवीन शैक्षणिक उपक्रम आणि व्यावसायिक विकासाच्या संधी निर्माण होतील, ज्यामुळे विविध उद्योगांमधील भविष्यातील नेत्यांसाठी मार्ग तयार होईल अशी अपेक्षा आहे.

मन मै अंधविश्वास, देश का सत्यानाश:स्टुडिओच्या तोडफोडीनंतर कुणाल कामराचा आणखी गाण्याचे व्हिडिओ व्हायरल

मुंबई-स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीतातून टीका केली होती. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कुणालच्या स्टुडिओची तोडफोड केली. तसेच तो जिथे दिसेल, तिथे त्याला धडा शिकवण्यात येईल, असा इशारा दिला होता. स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर कुणाल कामराचा हम होंगे कंगाल या एका विडंबन गीताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या गाण्याच्या गाण्याच्या माध्यमातून त्याने पंतप्रधान मोदींवरच निशाणा साधला.या शिवाय आणखी काही विडंबन गीताचे व्हिडिओ कालपासून व्हायरल होऊ लागलेत . तेच व्हिडीओ आता पुन्हा नव्या क्लिप्स समाविष्ट एडीट करून कामरा यांच्या X अकौंट वरून हि पोस्ट करण्यात आल्या आहेत.

कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंवरील व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केले होते. विशेषतः एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख त्यांनी गद्दार असा केला होता. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी शिवसेनेचे पित्त खवळले. शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमधील कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला. यानंतर आता कुणालचे अन्य गाणे व्हायरल झाले आहेत .

कुणालच्या गाण्याचे बोल खालीलप्रमाणे

हम होंगे कंगाल, एक दिन
मन मै अंधविश्वास, देश का सत्यानाश
हम होंगे कंगाल, एक दिन
होगे नंगे चारो ओर,
करेंगे दंगे चारो ओर
पोलिस के पंगे चारो ओर, एक दिन
मन मै नत्थुराम, हरकते आसाराम
हम होंगे कंगाल, एक दिन
होगा गाय का प्रचार, ,
लेके हाथो मे हत्थियार
होगा संघ का शिष्टाचार, एक दिन
जनता बेरोजगार, गरीबी की कागार
हम होंगे कंगाल, एक दिन