Home Blog Page 3841

“लाईफ स्कूल फाऊंडेशन’तर्फे “सुपर अचिव्हर्स’ विद्यार्थ्यांनी “मर्सिडिझ’ मधून केली लोणावळा सैर!

0

q

पुणे :
दहावीत चमकदार कामगिरी करणाऱ्या “सुपर अचिव्हर्सना’ आणखी प्रेरणा देण्यासाठी “लाईफ स्कुल फाऊंडेशन’ (कोेरेगांव पार्क) तर्फे आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी 40 विद्यार्थ्यांना 10 “मर्सिडीज्‌ ‘ गाड्यांमधून पुणे-लोणावळा सफर घडविण्यात आली. “लाईफ स्कूल’चे संस्थापक नरेंद्र गोयदानी, समन्वयक राज मुछाल आणि ज्योती गोसावी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
“कीप मुव्हिंग मुव्हमेंट’ (पुढे चलूया अभियान) अंतर्गत हा उपक्रम आखण्यात आला होता.
भारतभरातील दहावीतील हजारो विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये जाऊन 7 उपयुक्त सत्रांमधून मोफत मार्गदर्शन करण्यात आले होते. यात सरकारी तसेच खासगी शाळांचाही समावेश होता. “कीप मुव्हिंग मुव्हमेंट’ उपक्रमांतर्गत पुण्यातील 16 शाळांमधून विद्यार्थ्यांना निवडण्यात आले.
यामध्ये कमलनयन बजाज स्कूल, प्रियदर्शनी हायस्कूल, बदरियॉं हायस्कूल, विश्वकर्मा विद्यालय व्ही.आय.टी. इंग्लिश मिडीयम स्कूल, विश्वकर्मा विद्यालय व्ही.आय.टी. मराठी माध्यम स्कूल, सरनोबत गजानन थोपटे स्कूल, एस.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल, सीएमएस इंग्लिश मिडियम हायस्कूल, ज्ञानगंगा इंग्लिश मिडियम स्कूल, डीएव्ही पब्लिक स्कूल, न्यू ग्रेस इंग्लिश स्कूल, जयहिंद हायस्कूल, मोलेदिना हायस्कूल, एस.एम.चोकसे हायस्कूल, सिंहगड स्प्रिंग डेल तसेच महानगरपालिकेच्या मौलाना मोहमद अली जौहर उर्दू माध्यमिक विद्यानिकेतन (गणेश पेठ), वसंतदादा पाटील विद्यालय (बाजीराव रोड) या शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
दहावी इयत्तेत 90 % च्या वर गुण मिळविलेल्या या 30 “सुपर अचिव्हर’ विद्यार्थ्यांना “स्टार ऑफ फ्युचर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी या विद्यार्थ्यांसाठी पुणे-लोणावळा सफर मर्सिडीज्‌ बेंझ गाड्यांमधून करण्याची संस्मरणीय भेट मिळाली. या विद्यार्थ्यांना त्यंाच्या घरून “मर्सिडीज्‌ बेंझ’ गाड्यामधून आणण्यात आले. “मर्सिडीज्‌ बेंझ’ कंपनीने या उपक्रमासाठी 18 गाड्या दिल्या होत्या.
हे विद्यार्थी लोणावळा सफर करत असतानाच पालकांशी नरेंद्र गोयदानी त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कोणते प्रयत्न करता येतील याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना पुढील 10 वर्षाच्या मेंटॉरिंग प्रोग्राम अंतर्गत तज्ज्ञ प्रशिक्षणाद्वारे सतत मार्गदर्शन करण्याची योजना आहे. “लाईफ स्कुल’ अभिनव उपक्रमांद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नव्या संधींचा प्रकाश आणण्यासाठी कार्यरत आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
“लाईफ स्कूल’चे 200 कार्यकर्ते भारतभरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. “कीप मुव्हिंग मुव्हमेंट’ या उपक्रमाद्वारे शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाते. त्याआधारे शिक्षकांनादेखील प्रेरणा मिळते आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्म विचार निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरत आहे. या उपक्रमातंर्गत भारतातील 15 शहरांतील 25,000 शिक्षक आणि लाखभर विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यात “लाईफ स्कूल’ला यश आले आहे, अशी माहिती संस्थापक नरेंद्र गोयदानी, समन्वयक राज मुछाल आणि ज्योती गोसावी यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाला लाइफ स्कूल चे संस्थापक नरेंद्र गोयदानी, चंद्रा वर्धन भंडारी, देवेन भंडारी, अमित भंडारी, राज मुछाल हे उपस्थित होते.

‘कँडल मार्च ‘ २८ नोव्हेंबरला

0

महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात क्रांती घडवणारी कथा असलेल्या कँडल
मार्चचे चित्रिकरण आणि पोस्ट प्रॉडक्शन चाणक्य क्रिएशन्सने पूर्ण केले असून
२८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे चाणक्य क्रिएशन्स,
के4 एन्टरप्रायझेस ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे
भारतातील सामाजिक प्रश्न धोरणकर्त्यांच्या नजरेस आणून ते सोडवण्याच्या
उद्देशाने चाणक्य क्रिएशन्सची स्थापना झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून,
चाणक्य क्रिएशन्स एरवी दुर्लक्षिल्या जाणाऱ्या सामाजिक समस्या
सोडवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणार आहे.
‘कँडल मार्च’, हा एक सत्य घटनेवर आधारित मराठी चित्रपट असून त्याची
कथा लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरलेल्या चार महिला नायिकांच्या भोवती
फिरत राहते. घटनांची एक शृंखला तयार होतो ज्यामुळे चारही नायिका व्यवस्था
आणि अन्यायाविरोधात लढण्यासाठी एकत्र येतात. भारतात घडलेल्या लैंगिक
अत्याचाराच्या घटनांवर आधारलेली ही कथा असून यात तेजस्विनी पंडित,
स्मिता तांबे, मनवा नाईक आणि सायली सहस्रबुध्दे यांनी आशिष पाथाडे
यांच्यासह उत्तम भूमिका साकारल्या आहेत. समाजाची एक काळी बाजू
दाखवणाऱ्या खलनायकाची भूमिका निलेश दिवेकर यांनी साकारली आहे.
संपूर्ण कथा अतिशय सुंदरपणे पडद्यावर उभी केली आहे ती दिग्दर्शक सचिन
देव यांनी तर सचिन दरेकर आणि सचिन देव यांनी पटकथा लिहीली आहे.
चित्रपटाची संकल्पना आणि हृदयस्पर्शी संवाद सचिन दरेकर यांनीच लिहीले
आहेत. मंदार चोलकर यांच्या शब्दांना अमितराज यांनी सूरसाज चढवला आहे.
तसेच वास्तवदर्शी चित्रण छायालेखक राजा सातणकर यांनी केले आहे तर कला
दिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे. चित्रपटाचा कणा निर्माते अंजली आणि
निलेश गावडे आहेत.

अनंतसृष्टीतील तिसर्‍या टप्प्याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

0

पुणे २८ सप्टेंबर २०१४ : घरांच्या किमती गगनाला भिडल्या असून मध्यमवर्गीय ग्राहकांना
घर घेणे आवाक्याबाहेर झाले आहे. त्यामुळे किफायतशीर किमतीत दर्जेदार घरे उपलब्ध करून
देण्याच्या उद्देशाने, दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्सने अनंतसृष्टी हा परिपूर्ण गृहप्रकल्प सादर
केला आहे.
या गृहप्रकल्पाच्या तिसर्‍या टप्प्याचे नुकतेच दिमाखात उदघाटन झाले. पहिल्याच दिवशी
अनंतसृष्टीतील ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक
व दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्सचे मुख्य कार्यकारी संचालक श्री सौरभ गाडगीळ, याप्रसंगी पी.
एन.गाडगीळ ज्वेलर्सच्या संचालिका सौ वैशाली गाडगीळ, दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्सच्या
संचालिका सौ. राधिका गाडगीळ, दाजीकाका डेव्हलपर्सचे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री
अमोल ताविलदार उपस्थित होते. नावनोंदणी करणाऱ्या ग्राहकास दाजीकाका गाडगीळ यांच्या
जन्मशताब्दीच्या निमित्ताने पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स कडून १ लाख रुपयांचे कुपनही देण्यात आले.
ही सवलत ५ ऑक्टोबर २०१४ पर्यंतच सुरू आहे. आयसीआयसीआय, एसबीआय, एक्ससेस बँक अशा
वित्तसंस्थांशी संलग्न असून यामुळे ग्राहकांना गृहकर्ज सुलभतेने उपलब्ध होण्यास मदतहोणार आहे.
‘अनंतसृष्टीच्या तिसर्‍या टप्प्या पहिल्या २ इमारतीतील घरांची विक्री सुरू झाल्यानंतर दोन
दिवसातच त्यातील सर्व फ्लॅट विकले गेले. अनंतसृष्टीमागील आमची संकल्पना आम्ही योग्य रीतीने
ग्राहकांपर्यंत पोचवण्यात यशस्वी झाल्याचे समाधान आहे.’ असे श्री सौरभ गाडगीळ यांनी
यावेळी सांगितले.
‘अनंतसृष्टी विषयी माहिती देताना ताविलदार म्हणाले की, प्रमुख माहिती तंत्रज्ञान (आयटी)
कंपन्या, अनेक महत्त्वपूर्ण उत्पादन उद्योग व नामवंत शैक्षणिक संस्था असणाऱ्या
तळेगाव-कान्हेफाटा भागामध्येनिसर्गाच्या सहवासात ‘अनंतसृष्टी’ हा प्रकल्प वसलेला
आहे. क्लब हाउस, प्रशस्त मोकळी जागा आणि पुणे-मुंबई महामार्गाशी कनेक्टीव्हिटी
हेअनंतसृष्टीचेवेगळेपण आहे. आजूबाजूला रुंद व मोकळेरस्तेआणि सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण
असा ‘अनंतसृष्टी’ प्रकल्प गुंतवणूकदारांसाठीसुद्धा एक सुवर्णसंधी आहे. ग्राहकांनी दिलेल्या
मोबदल्यात त्यांना दर्जेदार व चांगली घरे देण्यासाठी तसेच आपल्या व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचे
सूत्र दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स जपले आहे. यामुळेच अल्पावधीत आम्ही ग्राहकांचा विश्वास
संपादन केला आहे.

शंभर टक्के मतदान करा-आमदार निम्हण

0

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मुळा रोड परिसरात काँग्रेस पक्षाचे
आमदार विनायक निम्हण यांनी मतदारांशी थेट संवाद साधून वैयक्तिक संपर्कावर
भर दिला.या संपर्क मोहिमेत येत्या 15 ऑक्टोबर रोजी
शंभर टक्के मतदान करा, असे आवाहनही आमदार निम्हण यांनी सर्वांना केले.
सोमवारी सकाळी 10.30 वाजता त्यांनी या परिसरात घरोघरी जाऊन
वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या. या वेळी अनेक ठिकाणी त्यांचे घराघरांतून औक्षण
करण्यात आले.
आमदार निम्हण यांच्यासोबत बाळासाहेब अरगडे, विजू शेवाळे, पंडित
पुनरंगम, पिट्टू भट्टी, सदाशिव डांगे, संदीप खडसे, दत्तात्रय सहाणे, टिंकू दास,
प्रशांत भोगले, अमित पिल्ले, विजय गायकवाड, अशोक आल्लाट, सुनिल शेलार,
सुमित गायकवाड, आकाश माने, रमेश शेख आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित
होते. आमदार निम्हण यांनी अरगडे कॉर्नर येथे कार्यकर्त्यांना सूचना देऊन
आपल्या पदयात्रेला सुरुवात केली. सत्यम सोसायटी, लक्ष्मीनारायण कुंज
सोसायटी, इश्‍वर कृपा सोसायटी, दिपाली अपार्टमेंट आदी सोसायट्यांमध्ये जाऊन
नागरीकांशी वैयक्तिक संपर्क साधत पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले. त्यानंतर
त्यांनी बौद्ध विहाराला भेट दिली. त्यानंतर आदर्शनगरमधील सर्व
गल्ल्यांमधील मतदारांची भेट घेतली. यावेळी नागरीकांनी विजयी करण्याचे
आश्‍वासन दिले. दरम्यान, शंकर मंदिरात जाऊन शंकराचे दर्शन घेतले.
याबरोबरच मयुरेश्‍वर गणपतीचेही दर्शन घेतले. सर्वच ठिकाणी निम्हण यांचे
स्वागत करण्यात आले. चहा-पानाचाही आग्रह धरला जात होता. तसेच
महिलांकडून औंक्षणही करण्यात आले. मुळारोडवरील शॉपिंग सेंटर, व्यावसायिक,
व्यापारी यांच्याही निम्हण यांनी भेट घेतली. नुकताच वीजेचा शॉक लागून मरण
पावलेल्या अतिश शिंदे या युवकाच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
सुमारे चार तास चाललेल्या या संपर्क मोहिमेत येत्या 15 ऑक्टोबर रोजी
शंभर टक्के मतदान करा, असे आवाहनही आमदार निम्हण यांनी सर्वांना केले.

महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न अजेंड्यावर घेणार- गिरीश बापट

0

पुणे, ता: 29 (प्रतिनिधी) पुण्यात महिला सार्वजनिक
स्वच्छतागृहाचा प्रश्न अजूनही सुटला नाही, वारंवार प्रयत्न
करूनही प्रशासन दरबारी याची कोणतीच दखल घेतली जात
नाही. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने महिलांची
कुचंबणा होत आहे, तसेच शहरात महिला सुरक्षिततेचा प्रश्न
देखील गंभीर बनत चालला आहे. महिलांवर हल्ला करून
मंगळसूत्र चोर्‍याच्या घटना वाढत आहेत. अशा घटना घडत
असल्याने महिलांसाठी शहर असुरक्षित बनत चालले आहेत.
शिक्षणासाठी परगावहून आलेल्या मुलींचे प्रश्न वेगळेच आहेत.
त्यामुळे महिलांच्या प्रश्नांची समस्या सोडवण्यासाठी सक्षम
यंत्रणा निर्माण करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. असे
प्रतिपादन प्रचार पदयात्रे दरम्यान कसबा विधानसभा मतदार
संघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी केले.
गिरीश बापट यांची प्रचार पदयात्रा सकाळी दहा वाजता
प्रभाग क्रमांक 37 मधून सुरु झाली. या प्रभागातील
नागरिकांच्या समस्या जाणून घेताना ते बोलत होते. भारतीय
जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शनिवार वीर मारुती
मंदीरापासून प्रत्येकाच्या व्यक्तीगत भेटीने सुरू झालेली ही
पदयात्रा शनिवारवाडा, शिंदेपार चौक करत नारायण पेठ
भागात आली. यानंतर पत्र्या मारुती चौकात येऊन बापट यांनी
प्रत्येकांना हस्तांदोलन करत समस्या जाणून घेतल्या. पुढे
आप्पा बळवंत चौक करत पदयात्रा केळकर रस्त्यावर आली,
बुधवार पेठ भागातील दगडूशेठला पदयात्रेचे समापन करताना
नागरिकांशी संवाद साधून अनेक प्रश्नांचे उत्तरे त्यांनी दिली.
यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येणपुरे, प्रभाग
क्रमांक 37 चे अध्यक्ष निलेश कदम, हेमंत रासने, बाळासाहेब मोरे, उमेश मोहरे,
अरुण जोशी, कौस्तुभ गाडे, विशाल घरात, रोहीत धावडे, रवी नारळीकर, उमेश
कांड्डरे, संजयमामा देशमुख, छगन बुलाखे, आनंद मालेगांवकर, दिपक पोटे, सुहास
कुलकर्णी, पुष्कर तुळजापूरकर, नामदेव माळवदे, योगिता गोगावले, निर्मला
कदम, विजया हंडे, रीना सपकाळ, रूपाली कदम, शारदा गोखले आदी उपस्थित
होत्या.

‘बुद्धीजीवी वर्ग भाजपाच्या पाठीशी’ : मीनाक्षी लेखी

0

‘बुद्धीजीवी वर्ग भाजपाच्या पाठीशी’ : मीनाक्षी लेखी

पुणे :

‘कॉंग्रेसला कंटाळून बुद्धीजीवी वर्गाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला मतदान केल्याने परिवर्तन झाले. बुद्धीजीवी वर्गाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पूर्ण परिवर्तन करून भाजपला विजयी करावे,’ असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि खासदार मीनाक्षी लेखी यांनी केले.

” फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ संस्थेतर्फे ‘संपर्क-संवाद’ अभियानातंर्गत बुद्धीजीवी संमेलनात त्या बोलत होत्या. माजी खासदार प्रदीप रावत अध्यक्षस्थानी होते. “फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ चे प्रदेश समन्वयक आर.पी.सिंग आणि सहसमन्वयक उषा वाजपेयी उपस्थित होते. हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी मौलाना आझाद स्मारक सभागृहात झाला.

मीनाक्षी लेखी म्हणाल्या,” समाज परिवर्तनात बुद्धीजीवी वर्गाची भूमिका महत्वाची असते. हाच वर्ग दिशा देण्याचे काम करतो. भविष्य घडविण्यासाठी हा वर्ग पुढे आला आहे हे पाहून समाधान वाटते. “राजकारण हे रोजगाराचे साधन नाही तर योगदान देण्याचे आवाहन आहे’ हे नरेंद्र मोदींचे प्रतिपादन बुद्धीजीवी वर्गाला आवडले आहे’ , असेही निरीक्षण मिनाक्षी लेखी यांनी नोंदविले.

“भ्रष्टाचाऱ्यांना खाली खेचून देशाची प्रतिमा जगात उंचावण्याचे काम नरेंद्र मोदी पंतप्रधान या नात्याने करीत आहेत. महाराष्ट्रदेखील त्यांच्या पाठीशी उभा राहील’, असे मत माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी पोलीस आयुक्त संतोष दत्ता यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. महेंद्र गलांडे, विशाल चास्कर, पियुष बाफना, राजीव गुप्ते, अच्युत दिक्षीत आदी उपस्थित होते.

आमदार निम्हण यांची मतदारांना भेट

0

रविवार सुट्टीचा दिवस साधत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील
काँग्रेसचे उमेदवार विनायक निम्हण यांनी औंधगाव परिसरातील प्रमुख
सोसायटी, मंडळांबरोबरच दुकाने, भाजी मंडईमध्ये जाऊन मतदारांची भेट घेत
आज संध्याकाळी चर्चा केली. तसेच चर्च, गुरुद्वारामध्ये जाऊन आशीर्वाद
घेतले. यावेळी तेथील नागरीकांनी निम्हण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार
असल्याचे सांगितले.

सायंकाळी सहाच्या सुमारास विनायक निम्हण यांनी औंध गावातील पुरातन
विठ्ठल मंदिर कोळीवाडा येथे जुनवणे परिवाराची बैठक घेतली. औंध गावातून
विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन यावेळी केले. नागरीकांनीही पक्षाबरोबरच
व्यक्ती म्हणूनही निम्हण यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. त्यानंतर ते भैरवनाथ
मंदिर गावठाणात आले. भाजीमंडईतील व्यापार्‍यांना मत देण्याचे आवाहन करीत
ते चर्चमध्ये गेले. पिटर भाऊसाहेब चव्हाण यांनी निम्हण यांना आशीर्वाद दिले.
त्यानंतर गावठाणातील विविध सोसायट्यांना भेट दिली. मुलाणी वाड्याला भेट देत
धर्मनिरपेक्ष पक्ष असलेल्या काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केले. विविध
कॉम्प्लेक्समध्ये जाऊन त्यांनी आवाहन केले. त्यानंतर ते जय महाराष्ट्र
चौकातील बाळासाहेब पवार यांच्या घरी भेट दिली. डिंबर समाज, शिंपी
समाजाचीही भेट घेतली. अनेक ठिकाणी महिलांनी निम्हण यांचे औंक्षण केले.
गुरुद्वाराला भेट देत तेथील धर्मगुरु समशेरसिंग मान यांचेही निम्हण यांनी
आशीर्वाद घेतले. निम्हण यांच्यासमवेत नगरसेवक सनी निम्हण, कार्यकर्ते
राहुल जुनवणे, समीर जुनवणे, सुनिल जुनवणे, तेजस बामगुडे, बाळासाहेब शेळके,
अल्लाउद्दीन पठाण, हरुण सवार, औंधगाव व्यायाम मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.
तानाजीराव चोंधे, संचालक बाळासाहेब पवार, कैलास पवार, वसंतराव जुनवणे,
निलेश जुनवणे, रोहन कुंभार, पांडुरंग रानवडे, नितीन चोंधे, रुपेश जुनवणे, अशोक
रानवडे आदी सहभागी झाले होते.

म्हैस पाण्यात … अन मोहोर चालू – वळसे पाटलांची टीका

0

पारगाव-सत्तेवर येण्याआधीच विरोधकांपैकी कोणी म्हणते मी मुख्यमंत्री होणार, कोणी म्हणते मी गृहमंत्री होणार. हे म्हणजे म्हैस पाण्यात आणि मोहोर चालू असा प्रकार आहे. अशी टीका आंबेगाव- शिरूर चमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी येथे केली
पदे येतात आणि जातात, मला पदांचे अप्रूप कधी वाटले नाही. तुमच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी प्रय▪करायचे आहे. जो जीवनात बदल घडवतो, जीवनमान सुधारतो तोच विकास, हीच माझी भूमिका आहे, आज पारगाव परिसरातील सगळ्या वाड्या-वस्त्यांवर लोकांमध्ये उत्साह दिसला. त्यामुळे मताधिक्याची खात्री वाटते ,
वळसे पाटील यांनी शनिवारी पारगाव, लबडे वस्ती, चिचगाई, दातखिळे वस्ती, माळी मळा आदी भागांतील ग्रामस्थांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत पंचायत समितीच्या सभापती जयश्रीताई डोके, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, पारगावच्या सरपंच प्रज्ञा कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दौलतराव लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले,राजकारण कमी करायचे, समाजकारण जास्त करायचे, हा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. खरे तर आंबेगाव तालुक्यात विकासाची चर्चाच आम्ही सुरू केली. त्यातून भविष्यात पारगाव एक मोठे व्यापारी केंद्र झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच भीमाशंकर कारखान्याच्या परिसरात एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेसारखी शिक्षणसंस्था सुरू करणार आहेविरोधकांच्या राजकारणावर टीका करताना वळसे पाटील म्हणाले, सत्तेवर येण्याआधीच विरोधकांपैकी कोणी म्हणते मी मुख्यमंत्री होणार, कोणी म्हणते मी गृहमंत्री होणार. हे म्हणजे म्हैस पाण्यात आणि मोहोर चालू असा प्रकार आहे.
यावेळी प्रज्ञा कुलकर्णी, सुभाष बबन ढोबळे, अचर्ना वाळुंज, दौलतराव लोखंडे, संतराम ढोबळे गुरूजी यांनीही मनोगत व्यक्त केले

जुन्या वाड्याच्या दुरुस्तीसाठी महामंडळ स्थापन करणार -गिरीश बापट

0

पुणे, ता. 28: (प्रतिनिधी) मुंबईच्या धर्तीवर पुण्यात जुन्या वाड्यासाठी दुरूस्ती महामंडळ स्थापन करण्यासाठी येणार्‍या काळात पाठपुरावा करणार. यामुळे शहरातील मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतीत राहणार्‍या नागरिकांना दिलासा मिळेल. सत्तेत आल्यास अशा रहिवाशी व भाडेकरूंसाठी विशेष योजना लागू करण्याचे आश्वासन यावेळी दिले. तसेच, शहरातील वाहतुकीचा प्रश्न खूपच बिकट होत चालला आहे, तो सोडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार. असे मत कसबा विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचार पदयात्रे दरम्यान काढले.

कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक 58 मध्ये आज बापट यांची पदयात्रा झाली. सकाळी दहा वाजता अकरा मारुती येथून या पदयात्रेला सुरवात झाली. त्यानंतर शुक्रवार पेठ येथील विविध भागात फिरून मतदारांचे प्रश्न समजून घेण्यात आले. अकरा मारुती चौक परिसरातील नागरिकांच्या समस्या बापट यांनी जाणून घेऊन सुभाष नगर, राष्ट्रभूषण चौक, खडके गणेश मंदीर या भागात मतदारांशी संवाद साधण्यात आला. नंतर खडकमाळ आळ करत गुरुवार पेठ येथे या पदयात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी गिरीश बापट यांनी मतदारांशी बोलताना नाकर्त्या आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. या पदयात्रेत मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या.

यावेळी नगरसेवक अशोक येणपुरे, प्रतिभाताई ढमाले, कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश ऐनपुरे, उदय लेले, संजयमामा देशमुख, छगन बुलाखे, सोहन भोसले, अनिल थिटे, विजय मरळ, महेश गोखले, संदीप खरडेकर, आनंद मालेगांवकर, भारत निजामपूरकर, दीपक पोटे, सुहास कुलकर्णी, पुष्कर तुळजापूरकर, नामदेव माळवदे, अमित कंक, मुकेश पायगुडे, निलेश वैराट, संजय पायगुडे, कुमार रेणुसे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभाताई गोखले, शाबाना देशपांडे, सीमा जांभुळकर, चारू शिंदे, क्रांती खंडारे, वर्षाताई धोंगडे, मृणाल घोळे, कल्पनाताई जाधव आदी उपस्थित होते.

आ. विनायक निम्हण खडकीच्या चर्चमध्ये

0

पुणे- शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार विनायक निम्हण यांनी
रविवारी सुटीची वेळ साधत संपूर्ण दिवसभर मतदारांशी संपर्क साधला. सकाळ व दुपारच्या
टप्यात वडारवाडी भागातील सर्व मंडळांच्या व सोसायट्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी व
कार्यकर्त्यांशी संपर्क त्यांनी साधला तसेच मतदारांच्याही गाठीभेटी घेतल्या. तत्पूर्वी सकाळी
खडकी येथील सेंट अँड्रयूज चर्चमध्ये जावून निम्हण यांनी तेथील फादर यांचे आशीर्वाद
घेतले. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या नागरिकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली.
विनायक निम्हण यांनी वैयक्तिक गाठीभेटी व संपर्कावर भर दिला आहे. त्यामाध्यमातून
त्यांनी रविवारी संपूर्ण वडारवाडी, पीएमसी कॉलनी, वडारवाडी मारुती मंदिर, बाबा हॉस्पिटल,३९१
सोसायटी, ८८३ झोपडपट्टी, बुद्धविहार पांडवनगर, हा सर्व परिसर पिंजून काढला.त्यांनी या
भागातील् सार्व गणेश व नवरात्रौ मंडळांना भेटी दिल्या. त्यांच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या
आणि कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. वडार समाज संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी
संपर्क साधत त्यांच्या, अडीअडचणी समजून घेतल्या नागरिकांनाही त्यांनी मतदान करण्याचे
आवाहन केले. त्यांच्यासमवेत नगरसेवक मुकारी अलगुडे,खडकी कँटॉंन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष
मनिष आनंद, बंडू चव्हाण, पुणे शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास पवार,रिझवान
शेख,गोविंद रणपिसे,काळू कुसाळकर, विजय विटकर, नारायण पाटोळे,विनायक विरकुड, चरण
डोंगरे,आनंद शिंदे,रामदास पवार, दत्तू कुसाळकर,भारत पवार,श्रावण मंगळवेढेकर, क्रांतीवीर
लहूजी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश वैराळ,सुरेश जाधव, दयानंद इरकर,दशरथ क्षेत्री, कैलास
मंजाळकर आदी कार्यकर्ते संपर्क मोहिमेत सामिल झाले होते. त्यांनी विनायक निम्हण यांना
प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार केला.

पुणे कॅंटोन्मेंट – रमेश बागवे यांचे प्रचारप्रमुख अरविंद शिंदे

0

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या निवडणूक प्रचारासाठी
कॉंग्रेस भवनमध्ये पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
झाली . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, हाजी नदाफ , नगरसेविका
लता राजगुरू , नगरसेविका लक्ष्मी घोडके , नगरसेवक अविनाश बागवे , माजी उपमहापौर प्रकाश मंत्री , मौलाना
काझ्मी , शिक्षण मंडळ उपाध्यक्ष व भवानी ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नुरुद्दीन सोमजी ,पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे
माजी नगरसेवक शैलेश बिडकर , संगीता पवार , प्रसाद केदारी , करण मकवानी , मंजूर शेख , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी
उपाध्यक्ष विनोद मथुरावाला , स्थायी समिती माजी अध्यक्ष रशीद शेख ,अनिस सुंडके , माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे ,
शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी, पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश अय्यर , जया
किराड , सरचिटणीस विठ्ठल थोरात , वाल्मिक जगताप , रफिक शेख , झोपडपट्टी सेलच्या महिला अध्यक्षा सुरेखा
खंडागळे , भगवान धुमाळ , सुजित यादव , राजेश शिंदे , राजाभाऊ चव्हाण , बबलू सय्यद , स्मिता मुळीक व कॉंग्रेस
पक्षाचे प्रमुख पदाधिकारी , सेवा दल व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांनी कार्यकर्त्यांना
मार्गदर्शन करताना सांगितले कि , प्रत्येक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला पाहिजे ,
कॉंग्रेस पक्षाने केलेली विकासकामे हि मतदारांना समजावून सांगितले पाहिजेत . आपण केलेल्या विकासकामांवर
प्रचारामध्ये आपण सर्वांनी भर दिला पाहिजे .
यावेळी पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस पक्षाचे प्रचारप्रमुख व बैठकीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी
सांगितले कि , कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आपला पक्षाचा उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार करावा , त्यासाठी
कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचाराचा रोजच्या रोज आढावा दयावा, आणि मुख्य निवडणुक कचेरीत रोज
संपर्क साधावा. सर्वांनी नियोजनबद्ध आणि एकदिलाने काम केले पाहिजे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात
सांगितले .
प्रचाराच्या नियोजनासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली . या समितीमध्ये विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे ,
नगरसेवक सुधीर जानजोत , माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख , अनिस सुंडके , पुणे महानगरपालिका आणि पुणे
कॅंटोन्मेंट बोर्डाचे सदस्यांची नियुक्ती करण्यात आली .
या बैठकीत या बैठकीचे सूत्रसंचालन राजाभाऊ चव्हाण यांनी केले .कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रमेश बागवे यांना जास्तीत जास्त
मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला
unnamed

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या

0

गान कोकिळा लता मंगेशकर , लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूर आणि मराठी ख्यातनाम अभिनेते – दिग्दर्शक -निर्माते महेश कोठारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या

मेधा कुलकर्णी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0

10414558_789570177760557_4675019157288134507_n
कोथरुड विधानसभा मतदार संघातून नगरसेविका मेधाताई कुलकर्णी यांनी विधानसभेसाठी अर्ज दाखल केला. यावेळी ज्येष्ठ कलाकार श्रीकांत मोघे, बुद्धिबळपटू कुंटे, माजी उपमहापौर बाळासाहेब मोकाटे, पालिकेतील गटनेते गणेश बिडकर, नगरसेविका माधुरीताई सह्स्र्बुध्ये, शहर सरचिटणीस राजेश पांडे, संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते श्रीपाद ढेकणे, उपाध्यक्ष जयंत भावे, डॉ. संदीप बुटाला, महाराष्ट्र सोशल मिडिया सहसंयोजक मंदार घाटे मतदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ कुलकर्णी, माजी नगरसेवक दिलीप उंबरकर, महिला मोर्चा अध्यक्षा मंगला डेरे, कल्पना पुरंदरे, प्रशांत हरसुले, उल्का मोकासदार, त्रिगुण रेणावीकर, उदय कड, रितेश वैद्य, अजित जगताप यासह कोथरुड भागातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळेला या मतदारसंघातील नागरिकांना प्रथमच कमळाला मतदान करण्याची संधी मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात उत्साह असून त्याचा परिणाम मोठ्या मताधिक्याने विजयामध्ये रूपांतरित होईल असा विश्वास उमेदवार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र आमचाच …. उद्धव ठाकरे

0

‘नरेंद्र मोदी यांच्याविरोधात माझा राग नाही. असे सांगत उद्धव ठाकरे यांनी , त्यांना आम्ही संपूर्ण देश दिला. पण आता आमचा महाराष्ट्र आम्हाला देण्याची दिलदारी त्यांच्यात नाही. मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही साथ दिली. मात्र साथ दिल्यानंतरही ते जर अशी लाथ मारणार असतील, तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद कोणाच्या पाठीशी आहेत, ते महाराष्ट्र तुम्हाला दाखवून देईल’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.चहावाला पंतप्रधान झाला याचा आनंद आहे गुजरात दंगलीनंतर सारा देश मोदींच्या विरोधात गेला तेव्हा अडवाणी यांनी मुंबईत येवून बाळासाहेबांकडे विचारणा केली होती ‘ ये मोदी का क्या करे ?तेव्हा सेनेने त्यांची पाठराखण केली , नर्मदा सरोवर प्रकरणी एकट्या पडलेल्या मोदीला सेनेनेच साथ दिली होती . कोण होते मोदी ? असा सवाल करीत ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला उद्धव म्हणाले, शिवाजी महाराजांना संपवायला कुतुबशाह, निजामशाह, आदिलशाह आले. परंतु त्यांचे काय झाले ते सगळ्यांना ठाऊक आहे. (गर्दीतून अमित शहा यांचे नाव पुकारण्यात आले) उगाचच घाई करू नका. माझ्या तोंडून नको ते नाव येईल असे म्हणत त्यांनी अमित शहा यांचे नाव टाळले. मोदी लाट होती तर उत्तर प्रदेश, बिहारमध्ये भाजप का हरली?असा सवाल हि त्यांनी केला .
जागा ,जागा , काय करता , काय मागता? विधानसभेच्या सर्व २८८ जागा देतो आणि त्याबरोबर लोकसभेच्या ४८ जागाही आम्ही तुम्हाला देऊन टाकतो, पण … मात्र त्याअगोदर पाकिस्तान आणि चीनच्या ताब्यातील जागा घेऊन या. कर्नाटकमध्ये असलेला महाराष्ट्राचा भूभाग परत आणा. जागेची काय किंमत असते हे काश्मिरी पंडितांना विचारून पाहा.आणि सीमाभागातील मराठी बांधवांना जाऊन विचारा आणि मग निवडणुकीतील जागा मागा असेही ते म्हणाले .
(उद्धव ठाकरे यांच्या भाषणात अमिताभ बच्चन यांच्या ‘दिवार ‘या सिनेमाच्या संवादाचा बराच प्रभाव असावा असे जाणवले , ‘ जाओ पहले उस आदमी का साईन लावो … फिर मेरे भाई , तुम जिस कागज पार कहते हो उस पे साईन करुंगा … यावर हा भाषणातला मुद्दा होता तर , मेरे पास बंगला है , मोटार ही … क्या है तुम्हारे पास ? …मेरे पास शिव छत्रपती जीन्का आशीर्वाद है … ही स्टाईल त्यांच्या भाषणात जाणवली )
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती तुटल्यानंतर झालेल्या पहिल्याच जाहीर सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी त्यांचा पहिलाच वार अपेक्षेनुसार भाजपवर केला. ‘मोगलांच्या मस्तवाल हत्तीशी दोन हात करणारे मावळे जसे शिवरायांकडे होते, तसेच महाराष्ट्रावर चालून येणाऱ्या मस्तवाल हत्तींच्या सोंडा कापून त्यांना परत पाठविण्यास शिवसेना समर्थ आहे’ या शब्दांत भाजपला लक्ष्य करीत त्यांच्याविरोधात उद्धव यांनी रणशिंग फुंकले. ‘शिवसेना-भाजप युती तोडण्यास मी कारणीभूत नसलो तरीही मला महाराष्ट्राने माफ करावे. महाराष्ट्राला दिलेल्या वचनाला शिवसेना जागणार असून, लाट काय असते ते शिवसेना दाखवून देईल. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आणून दाखवेन’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ महालक्ष्मी रेसकोर्स येथे शनिवारी वाढवण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतच्या वाटाघाटींचा लेखाजोखा सर्वांपुढे मांडला. ‘युती तोडण्याचे भाजपने बहुदा आधीच ठरवले होते. युती टिकविण्याचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला; मात्र अधिकच्या ३५ जागा मागितल्या जात असतील तर त्या देणे कुणालाही अशक्यच ठरले असते. मी माझ्या आणि त्यांच्या वाट्याच्या १९ जागा सोडल्या होत्या. मात्र त्याउपर जागा सोडणे शक्य नव्हते’, असे उद्धव म्हणाले. ‘शिवसेनेने घाम गाळून, प्रसंगी रक्त आटवून ज्या जागा आजवर मिळवल्या, टिकवल्या त्या सहजासहजी द्यायला आम्ही काय जागांचे गोडाऊन काढले आहे का? भूमिपुत्रांच्या आणि हिंदूंच्या रक्षणासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. भाजपने हिंदुत्वाची युती तोडली आहे, त्यांना हिंदू कधीही माफ करणार नाही’, अशी तोफही त्यांनी डागली.
‘बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी रामदास आठवले यांना माझे जाहीर आवाहन आहे. सगळेच मित्रपक्ष पळून गेले आहेत. माझ्याकडे आत्ता आहे तो विश्वास’, असे म्हणत रामदास आठवले यांना उपमुख्यमंत्रिपदाची जाहीर ऑफर उद्धव यांनी पुन्हा दिली.
मुंडे-महाजन यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध होते आणि ते पुढेही राहतील. पंकजाला मी बहीण मानले असून एक भाऊ म्हणून मी तिच्याविरोधात कसा लढणार? त्यामुळे पंकजा आणि प्रितम मुंडे यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार देणार नाही, असे उद्धव यांनी यावेळी जाहीर केले.( मात्र या संपूर्ण भाषणात त्यांनी आपला भाऊ राज ठाकरे यांचा नामोल्लेख अगर साधा स्पर्श हि म न से ला केला नाही)
विरोधकांचा समाचार घेताना, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मला अनुभव नसल्याचे सांगताहेत. मग तुम्हाला अनुभव असताना फायली का नाहीत हलल्या, असा टोला उद्धव यांनी लगावला. भ्रष्टाचार करण्याचा वा कामच न करण्याचा अनुभव मला नसेल तर हे चांगलेच आहे. मंगळावर यान गेल्यानंतर तिथले फोटो प्रसिद्ध झाले आहेत. आपल्याकडच्या शरद पवारांनी तिथेही कदाचित आधीच जमिनी घेऊन ठेवल्या असतील, असा चिमटा त्यांनी काढला.
युती तुटल्याचे सांगण्याची जबाबदारी एकनाथ खडसे यांच्यावर देण्यात आली. त्यावर मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचा खडसे यांनी प्रयत्न केला. मात्र आम्ही मांजर नसून वाघ आहोत. २५ वर्षे मैत्री केली असली तरी या वाघाचे मांजर झालेले नाही. तुम्ही जी घंटा गळ्यात बांधलीत, ती अख्ख्या महाराष्ट्रात नेऊन हिंदूंचा काय घंटानाद असतो, ते तुम्हाला दाखवून देऊ, असे उद्धव म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एक ऑडिओ कॅसेट काढण्यात आली असून त्यात शिवसेनेला विजयी करण्याचा संदेश देण्यात आला आहे. ही कॅसेट भाषणाच्या शेवटी सर्वांना देत उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना वचनबद्ध केले.
मुख्यमंत्रीपदासाठी मी युती तोडली असे आता कोणी म्हणेल, पण मग तुम्ही ज्या जागा वाढवून मागत होतात, त्या मंत्रालयात सागरगोट्या की लगोऱ्या खेळण्यासाठी अशा शब्दांत त्यांनी भाजपचे नाव न घेता उद्धव यांनी तोफ डागली. मी उगाच खुर्चीची स्वप्ने पाहत नाही, मात्र मी जबादारीपासून पळतही नाही. शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील मायबाप जनतेच्या मदतीने मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आणून दाखवेनच. पूर्ण बहुमताने सत्ता आली, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस म्हणेल त्या बालेकिल्ल्यात मी उभा राहीन आणि निवडून येईन, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले शिवसेनेने हिंदुत्वाची कास कधीही सोडली नाही. मुंबईत दंगली पेटल्यानंतर आम्ही गुजराती, मारवाडी, जैन वा मराठी-अमराठी असा वाद केला नाही, प्रत्येकाला आम्ही मदत केली. शिवसेना रस्त्यावर मदतीसाठी उतरली, तेव्हा बाकीचे कुठे गेले होते, असा सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्र कधीच दिल्लीसमोर झुकणार नाही …
गेली २५ वर्षे राज्याच्या राजकारणात नैसर्गिक मित्रपक्ष असलेल्या व आता विधानसभेच्या तोंडावर वेगळा घरोबा करणाऱ्या भारतीय जनता पक्षावर शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनीही शनिवारी चौफेर टीकेची झोड उठवली. ‘महाराष्ट्र कधीच दिल्लीसमोर झुकला नाही, त्यामुळे भाजपने आम्हाला दिल्लीची मिजास दाखवू नये,’ असा खणखणीत इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.
युतीतून स्वतंत्र झाल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रचारसभा शनिवारी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. मात्र तत्पूर्वी शिवसेनेच्या इतर नेत्यांनी आपल्या भाषणात भाजपची ‘कमळाबाई’ अशी निर्भर्त्सना करत त्यांच्या फुटीच्या भूमिकेवर कठोर टीका केली. ‘आमचे आजपर्यंत मिशन १५० होते, आता २५० असेल. जिथे भगवा आहे तेथे छत्रपती आहेत. महाराजांचा महाराष्ट्र इकडे तिकडे जाणार नाही. आम्हाला दिल्लीची मिजास दाखवू नका, महाराष्ट्राने औरंगजेबासारख्या दिल्लीश्वराला पाणी पाजले आहे,’ असे खासदार संजय राऊत यांनी भाजपला ठणकावून सांगितले. ‘आजपर्यंत आम्ही हमाली केली, यापुढे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकरणार नाही,’ असा इशाराही राऊत यांनी दिला.
२५ वर्षांच्या संसारातून आता कमळाबाई निघून गेली आहे. पण सौभाग्य आमच्याकडे आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरच्या लढाईत विजय शिवसेनेचाच होईल, असे म्हणत राऊत यांनी कमळाबाईबरोबर शिवसेनेची अडीच दशकांची युती नव्हती, ते लफडं होतं, या शब्दात भाजपवर हल्ला चढवला. कर्माने मरणाऱ्यांना धर्माने मारण्याची गरज नाही. यापुढे महाराष्ट्राचे राज्य मातोश्रीवरून चालेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीश्वरास मुजरा करणाऱ्यांतला महाराष्ट्र नाही. दिल्लीने अनेकदा महाराष्ट्र वार केले. या वेळी आमच्याकडे बाळासाहेबांच्या पुण्याईचे बख्तर आहे. आगामी निवडणुकीत शिवसैनिक विरोधकांचा मतरुपी वाघनखाने कोथळा बाहेर काढतील, असा आशावाद शिवसेनेचे उपनेते व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौर स्नेहल आंबेकर यांचेही या वेळी भाषण झाले.

विधानसभेसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी

0

जुन्नर – गणपत फुलवडे
आंबेगाव – संध्या बानखेले
खेड-आळंदी – वंदना सातपुते
शिरूर – अरविंद ढमढेरे
दौंड – पोपटराव ताकवणे
बारामती – अॅड आकाश मोरे
पुरंदर – संजय जगताप
मावळ – किरण गायकवाड
चिंचवड – कैलास महादेव कदम
पिंपरी – मनोज कांबळे
भोसरी – हनुमंतराव भोसले
वडगावशेरी – चंद्रकांत छाजेड
पर्वती – अभय छाजेड
कोथरुड – उमेश कंधारे
हडपसर – बाळासाहेब शिवरकर
इंदापूर- हर्षवर्धन पाटील
भोर – संग्राम धोपटे
शिवाजीनगर- विनायक निम्हण
पुणे छावणी- रमेश बागवे
कसबा पेठ -रोहित टिळक

धुळे ग्रामीण – कुणाल पाटील

भुसावळ – पुष्पा सोनावणे

काटोल – दिनेश ठाकरे

हिंगणा – कुंदा राऊत

उमरेड – संजय मेश्राम

यवतमाळ – राहुल ठाकरे

किनवट – नामदेव केशवे

मालेगाव बाह्य – डॉ राजेंद्र ठाकरे

सिन्नर – संपतराव काळे

उल्हासनगर – प्रकाश कुकरेजा

श्रीवर्धन – उदय काटे

अकोले – सतीश भांगरे

कोपरगाव – नितीन औताडे

नेवासा- दिलीप वाघचौरे

शेवगाव – अजय रक्ताटे

राहुरी – अमोल जाधव

पारनेर – डॉ. भास्करराव शिरोळे

श्रीगोंदा – हेमंत ओगले

कर्जत-जामखेड – किरण पाटील

गेवराई – सुरेश हत्ते

माजलगाव – सर्जेराव काळे

बीड – सिराज देशमुख

केज – अंजली घाडगे

परळी – राजेसाहेब देशमुख

अहमदपूर – विठ्ठलराव मखने

माढा – कल्याण काळे

कणकवली – नितेश राणे

कागल – संतान बारदेसकर

नंदुरबार- कुणाल वासवे

धुळे शहर- साबीर शेख

चोपडा- ज्ञानेश्वर भडाळे

जळगाव शहर- राधेश्याम चौधरी

जळगाव ग्रामीण- दिलीप गणपतराव पाटील

अमळनेर – गिरीश पाटील

एरंडोल – डॉ. प्रविण वाघ

चाळीसगाव – अशोक हरी खलाने

पाचोरा – प्रदीपराव पवार

मुक्ताईनगर – योगेंद्र पाटील

मलकापूर – डॉ. अरविंद वासूदेव कोलते

सिंधखेड राजा – प्रदीप नगरे

मेहकर – लक्ष्मणराव घुमारे

जऴगाव (जमोड) – राम विजय बुरंगऴे

अकोला पश्चिम – उषा जगदिशसिंग विरक

अकोला पूर्व – डॉ. सुभाषचंद्र कोरपे

मूर्तीजापूर – शवन शेकुजी इंगळे

वाशिम – सुरेश इंगळे

कारंजा – ज्योती गणेशपुरे

वडनेरा – सुलभा संजय खोडके

अमरावती – आर. डी. शेखावत

दर्यापूर – सिद्धार्थ पांडुरंद वानखेडे

मोर्शी – नरेशचंद्र ठाकरे

हिंगणघाट – उषा अरुण थुटे

वर्धा – शेखर शेंडे

कामथी – राजेंद्र मुळक

भंडारा – युवराज वासनिक

अर्जुनी-मोरगाव – राजेश नंदगवळी

तिरोरा – पी जी कटारे

अहेरी – मुक्तेश्वर गावडे

चंद्रपूर – महेश मेंढे

बल्लारपूर – घनश्याम मुलचंदानी

वरोरा – डॉ. आसावरी देवतळे

दिग्रस – देवानंद पवार

अरणी – शिवाजीराव मोघे

पुसद – सचिन नायक

लोहा – डॉ. श्याम तेलंग

नायगाव – वसंतराव चव्हाण

वसमत – अब्दुल हफीज अब्दुल रेहमान

परभणी – खान इरफान उर रेहमान

गंगाखेड – हरीभाऊ शेळके

पाथरी – सुरेश वरपुडकर मोरे

कर्जत – शिवाजी खरीक

महाड – माणिक जगताप

आष्टी – मिनाक्षी पाटील

उदगीर – रामकिसन सोनकांबळे

उस्मनाबाद – विश्वास शिंदे

परांडा – प्रशांत छेडे
करमाऴा – जयवंतराव जगताप
बार्शी – सुधीर गाडवे
मोहोळ – गौरव खरात
पंढरपूर – भारत भालके
माळशिरस – राजेश गुजर
सांगोला – जगदीश बाबर
फलटण – दिगंबर अवघडे
वाई – मदन भोसले
कोरेगाव – विजयराव कणसे
माण – जयकुमार गोरे

कराड उत्तर – धैर्यशील कदम

पाटण – हिंदुराव पाटील

सातारा – रजनी दिपक पवार

दापोली – सुजीत झिम्हण

गुहागर – संदीप सावंत

चिपळूण – रश्मी कदम

रत्नागिरी- रमेश कीर

सावंतवाडी- चंद्रकांत गावडे

चंदगड- भरमु पाटील

राधानगरी- बजरंग देसाई

शाहुवाडी- करणसिंग गायकवाड

मिरज- सिद्धेश्वर जाधव

इस्लामपूर – जितेंद्र पाटील

शिराळा- सत्यजीत देशमुख

तासगाव-कवठे महांकाळ- सुरेश शेंडगे

जत – विक्रमसिंग सावंत

घनसावंगी- संजय पाटील

बदनापूर- सुभाष मगरे

भोकरधन- सुरेश गवळी

कन्नड- नामदेवराव पवार

औरंगाबाद मध्य- एम एम शेख

पैठण- रविंद्र काऴे

गंगापूर- शोभाताई खोसरे

नांदगाव- अनिलकुमार आहेर

बागलान- जयश्री बरडे

कळवण- बी के गांगुर्डे

चांदवड- शिऱीषमल कोतवाल

येवला- निवृत्ती लहरे

निपड- राजाराम पानगव्हाणे

दिंडोरी- रामदास चरोसकर

नाशिक पूर्व- उद्धव निमसे

नाशिक पश्चिम- दशरथ पाटील

देवळाली- गणेश उनावणे

डहाणू- रमेश पडवळे

विक्रमगड- अशोक पाटील

भोईसर- भुपेंद्र मडवी

नालासोपारा- अशोक पेंढारी

भिवंडी ग्रामीण- सचिन शिंगदा

शहापूर- पद्माकर केवारी

भिवंडी पूर्व- अन्सारी मोहम्मद फाजील

कल्याण पूर्व- विजय मिश्रा

कल्याण पश्चिम- सचिन पोटे

मुरबाड- राजेश घोलप

कमलाकर सुर्यवंशी

डोंबिवली- संतोष केणी

कल्याण ग्रामिण- शारदा पाटील

मिरा भाईंदर- याकुब कुरेशी

कोपरी-पाचपखाडी- मनोज शिंदे

मुंब्रा-कळवा- यासीन कुरेशी

अक्कलकुवा – अॅड. के. सी पाडवी

शहादा – पद्माकर वळवी

नवापूर – सुरुपसिंग नाईक

साखरी – धनाजी अहिरे

शिंदखेडा – श्यामकांत सनेर

शिरपूर – काशिराम पवार

रावेर – शिरीष चौधरी

जामनेर – ज्योत्स्ना विसपुते

बुलडाणा – हर्षवर्धन सपकाळ

चिखली – राहुल बोंद्रे

खामगाव – दिलीपकुमार सानंदा

अकोट – महेश गणगणे

बाळापूर – सय्यद खतीब

रिसोड – अमित झणक

धामनगाव रेल्वे – विरेंद्र जगताप

तिवसा – अॅड. यशोमती ठाकूर

मेळघाट – केवलराम काळे

अचलपूर – अनिरुद्ध देशमुख

आर्वी – अमर काळे

देवळी – रणजीत कांबळे

सावनेर – सुनील केदार

नागपूर दक्षिण-पश्चिम- प्रफुल्ल गुडदे

नागपूर दक्षिण – सतिश चतुर्वेदी

नागपूर पूर्व – अभिजीत वंजारी

नागपूर मध्य – डॉ. अनिस अहमद

नागपूर पश्चिम- विकास ठाकूर

नागपूर उत्तर – डॉ. नितीन राऊत

रामटेक – सुबोध मोहिते

तुमसर – प्रमोद तितीरमारे

साकोली – सेवक वाघये

गोंदिया – गोपालदास अग्रवाल

आमगाव – रामरत्न बापू राऊत

आरमोरी – आनंदराव गेडाम

गडचिरोली- सगुणा ताळंदी

राजुरा – सुभाष धोटे

ब्रम्हपुरी- विजय वडेट्टीवार

चिमूर- अविनाश वार्जुरकर

वणी- वामनराव कासावार

राळेगाव- प्रा. वसंत पुरके

उमरखेड – विजयराव खडसे

हदगाव – माधवराव पवार

नांदेड उत्तर – डी. पी. सावंत

नांदेड दक्षिण – ओमप्रकाश पोखर्णा

देगलूर – रावसाहेब अंतापूरकर

मुखेड – हणमंतराव पाटील

कळमनुरी – संतोष तारफे

हिंगोली – भाऊराव पाटील

जिंतूर – रामप्रसाद बोर्डीकर

जालना – कैलास गोरंट्याल

सिल्लोड- अब्दुल सत्तार

फुलंब्री -कल्याण काळे

औरंगाबाद पश्चिम -जितेंद्र देहाडे

औरंगाबाद पूर्व – राजेंद्र दर्डा

वैजापूर- दिनेश परदेशी

मालेगाव मध्य -शेख असिफ शेख रशीद

नाशिक मध्य – शाहू खैरे

इगतपुरी – निर्मला गावित

पालघर – राजेंद्र गावित

वसई- मायकल फुर्ताडो

भिवंडी पश्चिम – शोएब खान

ओवळा माजिवडा – श्रीमती प्रभात पाटील

ठाणे – नारायण पवार

दहीसर- शीतल अशोक म्हात्रे

मुलुंड- चरणसिंह सप्रा

जोगेश्वरी पूर्व – राजेश शर्मा

दिंडोशी – राजहंस सिंह

चारकोप – भारत पारेख

मालाड पश्चिम – अस्लम शेख

वर्सोवा- बलदेव शेखा

अंधेरी पश्चिम- अशोक जाधव

अंधेरी पूर्व- सुरेश शेट्टी

विले पार्ले-कृष्णा हेगडे

चांदिवली- नसिम खान

घाटकोपर पश्चिम -प्रविण छेडा

चेंबूर- चंद्रकांत हंडोरे

कलिना- कृपाशंकर सिंह

वांद्रे पश्चिम- बाबा सिद्दीकी

वांद्रे पूर्व – संजीव बागाडी

धारावी – वर्षा गायकवाड

माहिम – प्रविण नाईक

वरळी – दत्ता नवघरे

शिवडी – मनोज जामसूतकर

शीव-कोळीवाडा- जगन्नाथ शेट्टी

वडाळा- कालीदास कोळंबकर

भायखळा – मधुकर चव्हाण

मलबार हिल- सुशीबेन शहा

मुंबादेवी -आमिन पटेल

कुलाबा -अॅनी शेखर

उरण- महेंद्र घरत

पेण- रविंद्र पाटील

अलिबाग -मधुकर ठाकूर
संगमनेर – बाळासाहेब थोरात

शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील

श्रीरामपूर- भाऊसाहेब कांबळे

अहमदनगर शहर-सत्यजीत तांबे पाटील

लातूर ग्रामीण-धीरज देशमुख

लातूर शहर-अमित देशमुख

निलंगा-अशोक पाटील निलंगेकर

औसा-बसवराज पाटील

उमरगा-किसन कांबळे

तुळजापूर-मधुकरराव चव्हाण

सोलापूर उत्तर- विश्वनाथ चाकोते

सोलापूर मध्य- प्रणिती शिंदे

अक्कलकोट- सिद्धाराम म्हेत्रे

सोलापूर दक्षिण-दिलीप माने

कराड दक्षिण-पृथ्वीराज चव्हाण

राजापूर- राजेंद्र देसाई

कुडाळ- नारायण राणे

कोल्हापूर दक्षिण -सतेज पाटील

कोल्हापूर उत्तर -सत्यजीत कदम

करवीर-पी एन पाटील

इचलकरंजी -प्रकाश आवाडे

शिरोळ -सा रे पाटील

हातकणंगले- जयवंत आवळे

सांगली – मदन पाटील

पलूस – पतंगराव कदम

खानापूर – सदाशिवराव पाटील