पुणे – निकालाआधीच वृत्तवाहिन्यांनी निकाल ‘एक्झिट पोल’ म्हणून जाहीर करून -वारंवार हा ‘एक्झिट पोल’जनमानसावर बिंबवून तशीच मानसिकता तयार करण्याचे आरंभल्याने भाजप वगळता अन्य राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत आहेत दरम्यान भाजपचे सरकार आल्यास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत अमित शहा ठरवतील असेही दिसत आहे भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास मात्र महाराष्ट्राची दिल्ली सारखी अवस्था होण्याची शक्यता आहे (म्हणजे ‘आप ‘ आणि काँग्रेस च्या सरकारची अवस्था काय झाली हे सर्वांना ठावूक आहे )भाजपच्या अनेक नेत्यांची इच्छा आहे, की जर पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही, तर शिवसेनेची मदत घेण्याऐवजी राज्यात राष्ट्रपती राजवटच कायम ठेवावी. आणि अशा राजवटीत महाराष्ट्रांची अवस्था जटील होण्याची शक्यता आहे . मात्र अजूनही अनेकांना शिवसेनेची सत्ता येईल असे वाटत आहे . जर शिवसेनेला बहुमत मिळाले नाही तर अन्य प्रादेशिक पक्षांचा पाठींबा घेवूनही शिवसेना सरकार स्थापन करू शकेल . पण कोणत्याही परिस्थितीत आता अफजलखानच्या फौजेशी संग नको असा मतप्रवाह हि सेनेतून व्यक्त होताना दिसतो आहे. मतदानापूर्वी अफजलखान संबोधून ज्यांच्यावर हल्ला केला – ज्यांनी ‘उंदीर’ अशी संभावना केली अशा असंगाशी शिवसेना संग करेल काय ? या प्रश्नाचे उत्तर आता निकालानंतरच मिळणार आहे, नाही तर ‘मतदानापूर्वी शत्रू आणि मतदान संपते न संपते तोच गळ्यात गळे ‘सत्तेसाठी पुन्हा वाटाघाटी हे राजकारण पाहता पाहता महाराष्ट्राची जनता आती विटली आहे पण नेमके काय महाराष्ट्राच्या नशिबी येणार ? ते मात्र १९ ताखेलाच समजणार आहे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल १९ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. दरम्यान त्याआधीच मुख्यमंत्रीपदावरुन दावेदारी सुरु झाली आहे. प्रदेश भाजपचे तीन दिग्गज – देवेंद्र फडणवीस ,पंकजा मुंडेआणि एकनाथ खडसे यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर दावा अथवा त्यासंबंधीचा इशारा केला आहे. दरम्यान, पक्षाने निवडणुकीनंतरच्या रणनीतीला सुरवात केली आहे. पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे, की त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे की त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, या प्रश्नावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिले आहे. त्यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथून निवडणूक लढविली आहे.
दुसरीकडे भाजप सूत्रांचे म्हणणे आहे, की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पक्षाची पहिली पसंती देवेंद्र फडणवीस यांना आहे. फडणवीस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्यावर वेळोवेळी विश्वास व्यक्त केला आहे.४४ वर्षीय या नेत्याला संघाचा पाठिंबा सहज मिळू शकतो. मुख्यमंत्रीपदाबद्दल त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी कोणतीही शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगत, मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय संसदीय मंडळ ठरवेल. संसदीय मंडळ मला जी जबाबदारी देईल ती मला मान्य असेल, असे सांगण्यासही ते विसरले नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे, की विरोधी पक्षनेत्याची ही माझी शेवटची वेळ आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन अंदाज लावता येऊ शकतो, की पक्ष सत्तेत येणार आहे याबाबत ते किती शाश्वस्त आहेत .
दरम्यान ‘एक्झिट पोल’हा काही निकाल नाही पण तरीही त्यावर सध्या बरेच विसंबून वागत असल्याने संशयाचे वातावरणही तयार होवू पाहते आहे
अफजलखानाच्या फौजेशी संग नको – शिवसेना राहणार ठाम ?
‘राम मंदिराची उभारणी हा भाजपच्या अजेंड्यावरील महत्त्वाचा मुद्दा पण सरकारवर दबाव टाकणार नाही -संघ परिवार

लखनऊ-‘राम मंदिराची उभारणी हा भाजपच्या अजेंड्यावरील महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र, त्यासाठी केंद्र सरकारकडे २०१९पर्यंत वेळ आहे. त्यासाठी घाई करण्याची गरज नसून आम्ही सरकारवर कोणताही दबाव टाकणार नाही,’ असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केले आहे.. येथे संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तीन दिवसीय बैठक शुक्रवारपासून सुरु झाली आहे. त्यानिमीत्त आयोजित पत्रकार परिषदते संघाचे सर कार्यवाह दत्तात्रय होसाबळे यांनी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले होते. पक्ष सत्तेत आल्यानंतर या मुद्यावर सरकारच्यावतीने अद्याप काय केले गेले याची कोणतीही माहिती नाही. राममंदिराबद्दल संघाने भाजपला विचारणा करण्याची गरज नसल्याचे होसाबळे म्हणाले. भाजप सरकारला पूर्ण बहुमत आहे, 2019 पर्यंतचा त्यांच्याकडे अवधी आहे. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ दिला पाहिजे. या मुद्यावर संघ सरकारच्या कामात दखल देऊ इच्छित नाही, असे होसाबळे यांनी सांगितले. तसेच भाजच्या जाहीरनाम्यातील या मुद्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलण अधिक उचित असल्याचेही ते म्हणाले. विशेष म्हणजे कार्यकारिणीच्या बैठकीसाठी उपस्थित संघ कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रांवर अयोध्येतील शरयू नदी, राम आणि मंदिराची छबी आहे.
बैठकीच्या पहिल्या दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुर परिस्थिती, सीमेवर सुरु असलेला गोळीबार यावर चर्चा झाल्याचे होसाबळे यांनी सांगितले. लव्ह जिहादच्या मुद्यावर ते म्हणाले, यावर संघाने फार आधीच चर्चा केली आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी रणनीती आखली जाईल.दुसरीकडे समाजवादी पार्टीने लखनऊमध्ये होत असलेल्या या बैठकीला जातियवादी षडयंत्र म्हटले आहे. पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले, ‘रास्वसंघ अशा बैठका घेऊन राज्याची वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहे.’
जयललितांना जामीन -तामिळनाडूत जल्लोष…

जयललितांना जामीन मंजूर झाल्याने तामिळनाडूत जल्लोषाचे वातावरण आहे. सगळीकडे आनंद साजरा केला जात आहे. समर्थक ठिकठिकाणी पेढे, मिठाईचे वाटप करत आहेत. एआईएडीएमके पक्षाचा आज 43 वा वर्धापन दिन आहे. याच मुहूर्तावर सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत जयललिताना दिलासा मिळाला आहे. जयललिता यांना कोर्टाने सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जयललिता यांना चेन्नईला जाता येणार आहे. जयललिता यांना दोन महिन्यांसाठी हा जामीन देण्यात आला आहे.
जयललिता 27 सप्टेंबरपासून बेंगळुरू येथील मध्यवर्ती कारागृहात होत्या. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले आहेत. त्या प्रकरणी जयललिता यांनी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर जयललितांनी सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत त्यांनी जामीनाची मागणी केली होती. जयललिता यांनी त्यांना हायपरटेन्शन, डायबिटीज असे आजार असल्याचे सांगितले होते.
जयललिता यांची प्रकृती ठीक नसल्याचे विचारात घेत जयललितांना कोर्टाने जामीन मंजूर केला असून त्यांना घरात उपचार घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांना 18 डिसेंबरपर्यंत घराबाहेर जाता येणार नाही. कर्नाटक हायकोर्टाने दिलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. अद्याप ही शिक्षा रद्द करण्यात आलेली नाही. तसेच जयललिता यांच्या वकिलांना कोर्टाला आश्वासन दिले आहे की जयललिता पक्षातील कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती करतील, अशी माहिती भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी निकालानंतर दिली.
आसाराम यांचा चेहरा पाहाण्यासाठी अनुयायींनी केली गर्दी
जोधपूर- अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापू हे सध्या जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात आहेत. आसाराम यांना गुरुवारी (16 ऑक्टोबर) कोर्टात सुनावणीसाठी आणले असता त्यांच्या अनुयायींनी एकच गर्दी केली. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षारक्षकांना मोठी कसरत करावी लागली.
आसाराम यांचा चेहरा पाहाण्यासाठी लोक सकाळपासून कोर्ट परिसरात उपस्थित होते. आसाराम यांना मोठ्या पोलिस बंदोबस्तात कोर्टात आणण्यात आले. अनुयायींनी हात जोडून आसाराम यांचा आशीर्वाद घेतला. आसाराम हे देखील हात उंचावून अनुयायींना आशीर्वाद देताना दिसले.
विहिरीमध्ये प्रेमी युगुलाचा मृतदेह- पुण्याच्या कृषी महाविद्यालयात खळबळ
पुणे -कुटुंबीयांकडून प्रेमविवाहाला विरोध होण्याच्या भीतीने एका प्रेमीयुगुलाने शिवाजीगर येथील कृषी महाविद्यालयाच्या आवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ते दोघेही गेल्या २ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते.
अभिजित तिमय्या मांडे (वय १९) आणि यशोदा लक्ष्मण म्हेत्रे (वय २४, रा. दोघेही विष्णू कृपा नगर, शिवाजीनगर बसस्थानकाजवळ) अशी आत्महत्या केलेल्या युगुलाची नावे आहेत. आज (शुक्रवारी) सकाळी कृषी महाविद्यालयाच्या आवारातील विहिरीत दोघांचे मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसले. त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे, सहायक पोलीसआयुक्त रमेश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. व्ही. जाधव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एच. एन. शिरसाठ, उपनिरीक्षक दर्शन पाटील, प्रसाद पवार आदी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. व्ही. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजितचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून, तो सध्या बेकार होता. तर यशोदाचे जास्त शिक्षण झाले नव्हते. ती घरातून शिवणकाम करीत होती. या दोघांच्या वडिलांचे निधन झाले असून ते आपापल्या आईसोबत राहात होते. यशोदा आणि अभिजित यांच्यात मागील काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, ती त्याच्याहून वयाने मोठी होती. विवाहाला विरोध होण्याच्या शक्यतेने दोघांनीही २ ऑक्टोबरपासून घर सोडले होते. ते दोघे बेपत्ता असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे
शिवसेना हा राजकीय शत्रू नाही – फडणवीस यांचा पुनरुच्चार तर राष्ट्रवादीचा पाठींबा कधीही घेणार नाही खड्सेंचे स्पष्टीकरण
मुंबई- शिवसेना हा राजकीय शत्रू नसल्याचे भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा म्हटले आहे दरम्यान भारतीय जनता पक्षाला या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणार असून, कोणाच्याही पाठिंब्याची आम्हाला गरज भासणार नाही असे भाजपचे दोन्ही विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व विनोद तावडे यांनी म्हटले आहे. मुंबईत ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकारांनी विचारले असता खडसे व तावडेंनी राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणत्याही स्थितीत घेणार नसल्याचे स्पष्ट केले. आम्हाला बहुमत मिळणार आहेच पण कदाचित नाही मिळाले तर आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नसल्याचे सांगितले.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळेल तसेच महाराष्ट्रातील येऊ घातलेले नवे सरकार बनविण्यात आमची प्रमुख भूमिका असेल असे पटेल यांनी म्हटले होते. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का याची चर्चा सुरु झाली होती. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही बुधवारी वाहिन्यांवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा कोणत्याही स्थितीत घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पंतप्रधान मोदींनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारवादी असल्याचे स्पष्ट केल्याने त्यांची साथ घेण्याचा प्रश्नच येत नाही. आम्हाला कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही. आम्ही स्वबळावर सत्तेत येऊ व स्पष्ट बहुमत मिळवू असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपसोबत कधीही जाणार नाही असे वारंवार स्पष्ट केले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, तरीही भाजप-राष्ट्रवादीत युती होईल अशी चर्चा माध्यमांत सतत केली जात आहे. राष्ट्रवादी आणि भाजपची विचारधारा पाहता हे दोन पक्ष एकत्र येतील अशी बिलकूल शक्यता नाही. या दोघांनाही एकमेंकाची सोबत परवडणारी नाही. त्यामुळे राष्ट्रवादी एक तर काँग्रेससोबत जाऊ शकतो अन्यथा शिवसेनेसोबत. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीकडे तेवढे संख्याबळ नसेल असे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेला 80 पेक्षा जास्त व राष्ट्रवादीला 60 पेक्षा जास्त मिळाल्यास या दोघांची एकत्र येण्याची शक्यता जास्त आहे.
दिवाळी भेट – डीझेल अडीच रुपये स्वस्त होणार
दिवाळी भेट – डीझेल अडीच रुपये स्वस्त होणार
नवी दिल्ली – डिझेलच्या दरात लवकरच कपात केली जाणार असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. प्रधान म्हणाले, डिझेलच्या दरात जवळपास अडीच रुपयांनी स्वस्त होईल, दोन राज्यातील आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच 19 ऑक्टोबरनंतर घोषणा होईल.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घट होत असल्याने डिझेलच्या किरकोळ विक्रीवरील नफा वाढला आहे. पेट्रोलियम कंपन्यांना 3 रुपये 56 पैसे प्रति लिटर नफा मिळत आहे. परिणामी डिझेलच्या दरात अडीच रुपयांनी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिझेलच्या दरात कपात झाली तर एवढी मोठी कपात होण्याची चार वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल.
देशात महाराष्ट्र आणि हरियाणा येथे विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच 19 ऑक्टोबरनंतर दर कपातीबाबत घोषणा होईल. यापूर्वी 8 सप्टेंबर 2010 रोजी डिझेल 3 रुपये 35 पैसे प्रतिलिटरने स्वस्त झाले होते.
पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी (14 ऑक्टोबर) पेट्रोलच्या दरात एक रुपयाने कपात केली. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. डिझेलच्या दरात कपात झाल्यास सणासुदीच्या दिवसांत देशातील जनतेला दिलासा मिळणार आहे. महागाई कमी होण्यास हातभार लागू शकेल. डिझेल दर कपातीलचा सकारात्मक परिणाम दळणवळण क्षेत्रात होत.
सरकारने पेट्रोलियम कंपन्यांवरील नियंत्रण हटवल्याने जानेवारी 2013 पासून डिझेलच्या दरात प्रति महिना 50 पैशाने वाढ केली जात आहे. मागील 20 महिन्यात डिझेलच्या दरात 19 वेळा वाढ झाली असून 11 रुपये 81 पैसे प्रतिलिटर प्रमाणे दर वाढले आहे.
रविवारी महिलांसाठी पुष्प रचना स्पर्धा व प्रदर्शन
पुणे – महिलांच्या कल्पकतेला व सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी ज्योती कुलकर्णी रिसर्च फाऊंडेशनतर्फे रविवारी (दि. १९) पुष्प रचना स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
म्हात्रे पुलाजवळील घरकुल लॉन्स येथे सकाळी नऊ ते अकरा या वेळेत ही स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांची कलाकृती सर्वांना पाहण्याची संधी मिळावी, या उद्देशाने पुष्प रचनांचे प्रदर्शनही आयोजित केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री व श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा लागू यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनच्या विश्वस्त भाग्यश्री कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
कुलकर्णी यांनी सांगितले की, या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेतींना अनुक्रमे १५ हजार, १० हजार व ५ हजार रूपये रोख व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा विनामूल्य असून १८ वर्षाच्या पुढील कोणत्याही वयोगटातील महिला यात भाग घेऊ शकतात. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणार्यांसाठी १८ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणीची मुदत आहे.
स्व. सौ. ज्योती कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ ज्योती कुलकर्णी रिसर्च फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. ज्योती कुलकर्णी स्वत: हरहुन्नरी तर होत्याच परंतु, समाजातील इतर महिलांनाही विविध संधी देण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले होते. त्यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी आम्ही ही फाऊंडेशनची स्थापना केली आहे.
महिलांच्या सुप्त कलागुणांना चालना देऊन सौंदर्यपूर्ण व सुवासिक निर्मिती त्यांच्या हातून घडावी हा या स्पर्धेमागील हेतू आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी यात सहभाग घ्यावा, तसेच इच्छुकांनी, ७७६७८०७९७९ या भ्रमणध्वनी अथवा ०२०-६६०४७१०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.
‘सोफोश’ च्या मदतीसाठी पुणेकर धावले …!
पुणे रनिंग कमिटीचा पुढाकार; ६ हजार पुणेकरांचा सहभाग
पुणे:- सोफोश या सेवाभावी संस्थेच्या मदतीसाठी तब्बल ६ हजार पुणेकर ‘पुणे रनिंग’ या स्पर्धेच्या माध्यमातून रस्त्यावर धावले. पुणे रनिंग कमिटी आणि दरोडे जोग प्रॉपर्टीज यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम पार पडला. या स्पर्धेत अनेक मुले, ज्येष्ठ, परदेशी तरुणांनी यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.
‘पुणे रनिंग’ या मैरथोन स्पर्धेला रविवारी सकाळी ५:३० ला बीएमसीसी च्या मैदानावरून सुरुवात झाली. विविध वयोगटानुसार ही स्पर्धा घेण्यात आली. यात २१ किलोमीटरच्या खुल्या गटातून शिल्पा फडके आणि अमित कुमार यांना प्रथम पारितोषिक , प्रमाणपत्र आणि टू व्हीलर देऊन सन्मानित करण्यात आले. तर संजय ढाका आणि इलिझी अल्फाईन यांनी १० किलोमीटर अंतराच्या महिला व पुरूष गटात प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेतील प्रमुख आकर्षण ठरला तो तिसरा गट. यात २१, १०, ५, ३ किलोमीटर मध्ये अपंग व्यक्तींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी पुणे रनिंग कमिटी च्या वतीने ३०० स्वयंसेवकांनी मदत केली. यात कमिटीच्या समीर शेख, निखिल शाह, अमोल अहिरे यांचा मोलाचा वाटा होता.
या स्पर्धेच्या माध्यमातून सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ससून हॉस्पिटल (सोफोश) या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीसाठी पुणेकरांनी पुढाकार घेतला. पुणे ‘रनिंग’ या उपक्रमामध्ये सर्वच वयोगटातील व्यक्तींनी हिरीरीने सहभाग घेऊन या संस्थेला आर्थिक सहाय्य करण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी पुणे रनिंग कमिटीच्या वतीने स्पर्धकास विशिष्ट शुल्क आकारण्यात आले होते व जमा झालेली रक्कम सोफोश या संस्थेला देण्यात आली. स्पर्धेच्या माध्यमातून जमलेले तब्बल पाच लाख रुपये सोफोश संस्थेचे सचिव डॉ. अरविंद हेर्लेकर यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू चंद्रकांत बोर्डे यांनी धावपटूंना मार्गदर्शन केले. यावेळी स्पर्धकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, समाजाप्रती असणारे आपले कर्तव्य आपण सर्वांनी पार पाडणे आवश्यक आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वांनी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही कौतुकास्पद बाब आहे.
यावेळी दरोडे- जोग प्रॉपर्टीचे संचालक सुधीर दरोडे व आनंद जोग म्हणाले, पुणे रनिंग हा उपक्रमामार्फत आम्हांला सामाजिक कार्यात सहभागी होता आले. यामुळे गोरगरिबांना आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल. आम्हाला खात्री आहे की, आम्ही उचलेल्या खारीच्या वाट्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद झळकेल.
आगामी काळात येणारा ‘प्यार वाली लव स्टोरी ‘ या चित्रपटातील सुप्रसिद्ध सिनेकलाकार स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, उपेंद्र लिमये यांनीही यावेळी विशेष उपस्थिती दर्शविली.
दिवाळीनिमित वृत्तपत्र विक्रेत्यांना दिवाळी शिधा किटचे वाटप
क्वार्टर गेट वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने दिवाळी निमित वृत्तपत्र
विक्रेत्यांना दिवाळी शिधा किटचे वाटप क्वार्टर गेट वृत्तपत्र विक्रेता
संघाचे अध्यक्ष अनंता भिकुले यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी क़्वाटर गेट
वृत्तपत्र विक्रेता संघाचे सदस्य राहुल निगडे , नंदू शेळके , सचिन ठिगळे ,
निलेश ख्रिस्ती , निलेश कवडे , मिलिंद कुलकर्णी , सुनील साळवी , रमेश शिंदे ,
अनिल देव , पांडुरंग धुमाळ , मुकुंद वायकर आदी उपस्थित होते . यामध्ये ८०
वृत्तपत्र विक्रेत्यांना दिवाळी शिधा वाटप करण्यात आले .
यामध्ये रवा , मैदा , साखर , १५ लिटर तेलाचा डबा , तूप , डाळ , शेंगदाणा ,
गुळ , सुकामेवा , साबण , उंटणे , चिवडा आदीचा समावेश होता .
एक्झिट पोलने अचंबित होण्याची वेळ
शिवसेनेलाच सर्वाधिक जागा मिळतील असे वाटणाऱ्या अनेकांवर वृत्त वाहिन्यांच्या एक्झिट पोलने अचंबित होण्याची वेळ आली आहे . अनेकांना असे वाटते आहे कि या पोल मध्ये भाजपला ज्या जागा दाखविल्या जातात त्या शिवसेनेला मिळतील आणि शिवसेनेला ज्या जागा दाखविल्या जातात त्या भाजपला मिळतील .
भाजपच नंबर एकचा पक्ष ठरणार असल्याचे भाकित सर्वच प्रमुख एक्झिट पोलने वर्तवले आहे. एकीकडे मतदानाचा टक्का वाढत असतानाच त्याचा भाजपलाच लाभ होणार असल्याचे ही आकडेवारी दर्शवते. २००९च्या विधानसभा निवडणुकीत ४७ जागांवरच थांबलेला भाजप तब्बल १०० ते १५० जागांवर झेप घेतील, असा अंदाज आहे. तर ४५ जागा मिळवलेली शिवसेना यंदा ७१ ते ८८ जागा मिळवेल, अशी अपेक्षा या चाचण्यांतून वर्तवण्यात येत आहे. भाजपखालोखाल दुसऱ्या स्थानी शिवसेनाच असेल, असे या पोलचे भाकित आहे. तर गेल्या वेळी ८२ जागा मिळवून पहिल्या स्थानी असलेला काँग्रेस यंदा तिसऱ्या स्थानी घसरून २७ ते ४५ जागा मिळवेल, तर २००९मध्ये ६२ जागा जिंकून दुसऱ्या स्थानी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस थेट चौथ्या क्रमांकावर घसरून केवळ २८ ते ३७ जागा जिंकेल, अशी शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत १२ जागा जिंकणाऱ्या मनसेचीही अवस्था यंदा बिकट असून हा पक्ष केवळ तीन जागांवरच जिंकेल असे चिन्ह आहे.
टाइम्स नाउ- सी-वोटर
‘टाइम्स नाउ’ आणि ‘सी-वोटर’ यांनी केलेल्या सर्वेमध्ये महाराष्ट्रात २८८ पैकी १२९ जागा जिंकून भाजप हा सर्वांच्या पुढे दाखवलाय. दुपारी तीन वाजेपर्यंतच्या मतदानाच्या टक्केवारीवर आधारित या सर्वेक्षणात शिवसेनेला ५६ जागा देण्यात आल्या आहेत. तर कॉग्रेस पक्षाला ४३ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ३६ जागा जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज ठाकरे यांचा मनसे एकूण १२ जागा जिंकणार असल्याचे टाइम्स नाउच्या सर्वेमध्ये म्हटलंय. इतर पक्ष एकूण १२ जागा जिंकतील असंही या सर्वेमध्ये म्हटलेलं आहेत.
एबीपी माझा- नेल्सन
एबीपी माझा आणि नेल्सनने केलेल्या सर्वेमध्ये भाजपला १२७ जागा देण्यात आलेल्या आहेत. या सर्वेनुसार शिवसेना ७७; कॉंग्रेस- ४०; राष्ट्रवादी ३४; मनसे ५ आणि इतर पक्ष- ५ जागा जिंकणार आहेत.
टुडेज चाणक्य
दरम्यान, टुडेज चाणक्यच्या सर्वेमध्ये एकूण २८८ जागांपैकी भाजपला १५१ जागा देण्यात आल्या आहेत. या सर्वेनुसार शिवसेना ७१, काँग्रेस २७, राष्ट्रवादी २८ आणि मनसे व अन्य पक्षांना ११ जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महावितरण ने मंगळवारी पुरविली सर्वाधिक वीज
गेले काही दिवस सातत्याने १६ हजार मेगावॉटपेक्षा अधिक वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणने मंगळवारी ३७०.९८ दशलक्ष युनिट एवढी वीज पुरवली. आजवरचा हा सर्वाधिक वीज पुरवठा आहे. ऑक्टोबर हिटमुळे विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
यापूर्वी, पाच ऑक्टोबर रोजी महावितरणने ३६४.५७ युनिट एवढ्या वीज पुरवठ्याचा विक्रम केला होता. तो मंगळवारी मोडला. दिवसभरात १७ हजार २०० मेगावॉट वीज पुरवण्यात आली, तर मागणी १७ हजार ५७३ मेगावॉट एवढी होती. ३७३ मेगावॉट एवढी तूट असल्याने काही प्रमाणात लोडशेडिंग करण्यात आले.
वातावरणातील बदल, कृषी पंपाचा वाढता वापर यामुळे या काळात विजेची मागणी वाढते. गेल्या वर्षी ती १७६९० मेगावॉटपर्यंत गेली होती. परंतु महावितरणने प्रथमच १७२०० मेगावॉटपर्यंत वीज पुरवठा केला. त्यात सर्वाधिक मागणीच्या वेळी महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पातून ५००० मेगावॉट, कोयना प्रकल्पातून १५०० मेगावॉट, उरणच्या गॅस प्रकल्पातून ४०० मेगावॉट, केंद्रीय कोट्यातून ५ हजार मेगावॉट, खासगी कंपन्यांबरोबरच्या करारातून ३४००मेगावॉट आणि आयत्या वेळी पॉवर एक्स्चेंजमधून खरेदी केलेली १५०० मेगावॉट राज्यास उपलब्ध झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
सर्वसाधारणपणे सुमारे ८० टक्के राज्य लोडशेडिंगमुक्त करण्यात आले आहे. २० टक्के भागात वीज बील वसुलीचे प्रमाण कमी असून विजेच्या गळतीचे किंवा चोरीचे प्रमाण अधिक असल्याने तेथे नियमानुसार लोडशेडिंग करण्याचे धोरण महावितरणने स्वीकारले आहे.
भाजपला ११८ जागा – पुणे प्राब चा अंदाज
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेसब्युरो’’(प्राब) च्या एक्झिट पोलमध्ये भाजप- 118, शिवसेना-79, काँग्रेस-42, राष्ट्रवादी-36 ,मनसे-7 आणि इतरांना 6 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एबीपी माझा- नेल्सन पोल :
नेल्सनच्या आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या पोलनुसार भाजपला 127, शिवसेना- 77, काँग्रेस-40, राष्ट्रवादी-34 आणि मनसेला पाच जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. तर अपक्षांचा वाट पाच जागांचा असेल अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सी वोटर-टाईम्स एक्झिट पोल :
टाईम्स गृप आणि सी वोट यांनी केलेल्या एक्झिट सी वोटरच्या सर्व्हेनुसार भाजप-129, शिवसेना- 56, काँग्रेस-43, राष्ट्रवादी-36 आणि मनसेला 12 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर अपक्षांना देखील 12 जागांवर विजय मिळेल असा अंदाज सी वोटरनं व्यक्त केला आहे.
टुडेज चाणक्य एक्झिट पोल :
चाणक्यनं भाजप- 151, शिवसेना-71 , काँग्रेस- 27 , राष्ट्रवादी – 28 तर मनसे आणि इतरांना- 11 जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
इंडिया न्यूज :
इंडिया न्यूजनं केलेल्या एक्झिट पोलमधून पुन्हा एकदा भाजपच्या बाजुनं कौल देण्यात आला आहे. या पोलनुसार देखील कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नसलं तरी, भाजप हाच सर्वात मोठा पक्ष बनेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भाजप – 103, शिवसेना-88, काँग्रेस-45, राष्ट्रवादी-35, मनसे-3 आणि अपक्षांना 14 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
टीव्ही-9 चा एक्झिट पोल :
टीव्ही 9 गृपच्या एक्झिट पोलमध्ये भाजप- 98-110, शिवसेना-84-93, काँग्रेस-43-48, राष्ट्रवादी-33-38 मनसे-3 आणि अपक्षा आणि इतरांना 10 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुण्यात 61 टक्के तर पश्चिम महाराष्ट्रात 70 टक्केपर्यंत मतदान, कोल्हापूरात उच्चांकी
पुणे-
महाराष्ट्रातील ऐतिहासिक विधानसभा निवडणुकीचे मतदान सायंकाळी 6 वाजता संपले आहे. राज्यात साधारण साठ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी चकमक झाली असून उर्वरित महाराष्ट्रात किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडले.
पुणे शहर व जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज शांततेत मतदान पार पडले. पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघातील एकूण ६४.०२ टक्के मतदान झाले आहे.सांगलीत अंदाजे 70 टक्के, साता-यात 65 टक्के, कोल्हापूरात 70 टक्के, तर सोलापूरात 65 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चुरशीच्या लढतींमुळे उच्चांकी मतदानाची नोंद झाली, तर पुणे व पिंपरी चिंचवडमधील अकरा मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या मतदानाच्या आसपास मतदान झाले. इंदापूरमध्ये सर्वाधिक 79 टक्के, तर पुणे शहरामध्ये कसबापेठेत 68 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील 21 मतदारसंघांमध्ये 61 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी बुधवारी मतदान झाल्यानंतर व्यक्त केला होता.
पुणे शहरात पंचरंगी लढती होत असताना, मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात काही ठिकाणी त्याचे रूपांतर तिरंगी लढतीत झाले होते. ग्रामीण भागात चुरशीच्या लढती आणि गावपातळीवरील सक्रिय कार्यकर्त्यांमुळे मतदानाची टक्केवारी वाढली. सर्व मतदारसंघांत 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. ग्रामीण भागातील मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानामध्ये सरासरी पाच टक्क्यांनी, तर लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शिवसेना नेते साबीरभाई शेख यांचे निधन
मुंबई- भगवत गीता ज्यांना तोंडपाठ होती , भगवत गीतेचे श्लोक आणि उत्तुंग म्हणता येईल असा वक्ता; ज्याने सुरुवातीच्या काळातच शिवसेना ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचे सामर्थ्यवान काम केले ते , शिवसेनेचे नेते व माजी कामगारमंत्री साबीर शेख यांचे आज दुपारी ठाण्याजवळील कल्याणच्या कोणगावात राहत्या घरी निधन झाले. साबीर शेख मागील तीन-चार वर्षापासून आजारी होते.शिवसेना हि मुस्लिम आणि दलित विरोधी नाही तर ती देशद्रोही मुस्लिम आणि तमाम देशद्रोह्यांच्या विरोधात डरकाळी फोडणारी संघटना आहे असा यशस्वी प्रचार करून १९७५ ते १९८५ या दशकात शिवसेना महाराष्ट्रभर पोहोचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता . पुण्याशी आणि अहमदनगर जिल्हयाशी त्यांची फारच जवळीक होती . ते मूळ पुणे जिल्ह्यातील रहिवासी होत
1995 मध्ये महाराष्ट्रात प्रथमच सत्तेत आलेल्या शिवसेना-भाजपच्या युतीच्या काळात शेख कामगार मंत्री होते. साबीर शेख शिवसेनेचा मुस्लिम चेहरा होते. बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून साबीर शेख यांची ओळख होती. साबीर शेख यांचे पुतणे अराफत शेख यांनी मनसेतून नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेनेचे लढवय्ये नेते आणि माजी कामगार मंत्री साबीरभाई शेख गेल्या तीन-चार वर्षापासून आजारी होते. पत्नीच्या निधनानंतर साबीर भाई एकटे पडले होते. एकुलती एक मुलगी आहे पण तिचे लग्न झाल्याने ती सासरी असते. त्यामुळे भाईंना पुतण्याशिवाय व शिवसैनिकांशिवाय आधार नव्हता. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नसल्याने मध्यंतरी त्यांना औरंगाबादच्या कल्पतरू युवाविकास मंचने औरंगाबाद येथील मातोश्री वृद्धाश्रमात हलवले होते. त्यांची काळजी कल्पतरू मंचने घेतली होती. मात्र शेख लगेच कल्याणमध्ये परतले होते. माझे शिवसैनिक माझी काळजी घेतील असे शेख यांनी त्यावेळी म्हटले होते.
आयुष्यभर शिवसेनेसाठी लढणा-या साबीरभाईंना उतारवयात मधुमेहाने त्रस्त केले होते. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून साबीरभाईंनी शिवसेना उभारणीसाठी जीवाचे रान केले. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार असल्याने तीन-चार वर्षापासून ते अंथरूणाला खिळून होते. कल्याणजवळील कोनगावात सध्या पुतण्या अराफतकडे ते राहत होते. प्रकृतीकडे विशेष लक्ष देण्यासाठी कोणी नसल्याने त्यांची प्रकृती खूपच खालावली होती.ज्ञानेश्वरीचे भाष्यकार, कीर्तन व प्रवचनात रमणारे, सह्याद्रीभ्रमण भूषणकार अशी अनेक बिरूदे साबीरभाईंना मिळाली होती. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून ते निवडून आले. 1995 मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात बाळासाहेबांनी साबीरभाईंना कामगार खात्याचे मंत्री केले. बाळासाहेबांनी साबीरभाईंना ‘शिवभक्त’ ही पदवी दिली होती

