Home Blog Page 371

चार घरफोड्या करून लाखोचा ऐवज लंपास करणाऱ्या १९ आणि २० वर्षीय अशा दोन मुलांना पोलिसांनी केले गजाआड

पुणे- चार घरफोड्या करून लाखोचा ऐवज लंपास करणाऱ्या १९ आणि २० वर्षीय अशा दोन मुलांना पुणे पोलिसांनी पकडून गजाआड केले आहे . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक १६/०३/२०२५ रोजी पहाटे ३/०० वा. चे सुमारास संतोषी माता मंदीर, तिरुपती कॉलनी येथे तक्रादार यांच्या राहत्या घरी चोरी झाले बाबत आंबेगाव पोलीस ठाणे गु.रजि नंबर ४५/२०२५ बी.एन.एस. ३०५ (अ), ३३१(३), (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयांत आंबेगाव पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पो. हवा. हनमंत मासाळ व चेतन गोरे यांना मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे तपास पथाचे पो.उप.निरी कळमकर व टिमने इसम नामे १) आयुष संजय खरात वय २० वर्ष रा. सुखसागरनगर पुणे, २) आर्यन कैलास आगलावे वय १९ वर्ष रा. गोकुळनगर पुणे यांना यांना अटक करुन त्यांच्या कडुन खालील प्रमाणे गुन्हे उघकीस आले आहेत.
१. आंबेगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिक्रमांक ४५/२०२५ बी.एन.एस.३०५ (अ),३३१ (३), (४)
२. भारतीविदयापीठ पोलीस ठाणे गुन्हा रजिक्रमांक १९७/२०२५ बी.एन.एस.३०५.३३१(३) (४)
३. भारतीविदयापीठ पोलीस ठाणे गुन्हा रजिक्रमांक १०७५/२०२५ बी.एन.एस.३०३ (२)
४. मार्केडयार्ड पोलीस ठाणे गुन्हा रजिक्रमांक ६९/२०२५ बी.एन.एस ३०३(२)
सदर आरोपी कडुन २२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ०४ लॅपटॉप, मोटार सायकल, रिक्षा असा एकुण ४,६६,०००/-रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. यातील आरोपीत आर्यन आगलावे हा कोंढवा व मार्केटयाडे येथील घरफोडीच्या गुन्हयात WANTEDआरोपी आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास आंबेगाव पोलीस स्टेशन तपास पथकाचे पो.उप. निरी. मोहन कळमकर हे करत आहेत.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, (अतिरिक्त कार्यभार) मनोजकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, सहा. पो. निरी प्रियंका गोरे, पोलीस उप. निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शेलेद्र साठे, हनमंत मासाळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, यांच्या पथकाने केली आहे.

एकदा दोनदा चूक झाली तर समजून घेऊ:तिसऱ्या वेळी माफी नाही- अजितदादांचा इशारा

अजित पवार यांनी कोकाटे यांना घेतले फैलावर-या बैठकीला माणिकराव कोकाटे अर्धा तास उशिराने पोहोचले होते. तोपर्यंत राष्ट्रवादीचे इतर नेते देवगिरी बंगल्यावर दाखल होऊन बैठकीला सुरुवात देखील झाली होती. मात्र, माणिकराव कोकाटे उशिरा पोहोचल्याने अजित पवार यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. आधीच माणिकराव कोकाटे हे प्रसार माध्यमांमध्ये वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने पक्ष अडचणीत येताना दिसून येत आहे. त्यात अजित पवार यांच्या बैठकीला देखील माणिकराव कोकाटे उशिरा पोहोचले. पक्षाच्या वतीने आयोजित जनता दरबारात देखील ते हजर राहत नाहीत. या सर्व बेशिस्त वर्तवणुकीवरून अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना खडे बोल सुनावल्या ची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी अंतर्गत तयारीला सुरुवात केली आहे. यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आपली वेगळी रणनिती ठरवली आहे. यासाठी आता अजित पवार हे सोमवार ते बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहणार आहेत. तर गुरुवार ते रविवार अजित पवार महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याच्या माध्यमातून अजित पवार पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आता आठवड्यातून एक दिवस मुंबईत आढावा बैठक घेण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या या बैठकीत अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री माणिकराव कोकाटे यांना देखील चांगलेच फैलावर घेतले होते. त्यानंतर आता अजित पवार यांच्या पुढील कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट रणनीती ठरवण्यात आली आहे. त्यानुसार आता अजित पवार हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक आढावा बैठक लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली. अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील विविध प्रश्नांबाबत तसेच प्रत्येक आमदाराच्या विधानसभा मतदारसंघातील कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. निधी अभावी कामे रखडत कामा नये, लोकांची गैरसोय होऊ नये, अशा सूचना अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना केल्या आहेत. त्याचप्रमाणे अधिक कार्यक्षम होण्यासाठी अजित पवार यांनी सर्वांना आग्रह केला. या बैठकी बाबत अजित पवार यांनी स्वतः एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

करुणा व धनंजय मुंडे यांचे संबंध लग्नासारखेच:त्यांनी दोन मुलांना जन्म दिला, हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही; कोर्टाचे निरीक्षण

मुंबईमुंबई सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश दिलेत. कोर्टाने या प्रकरणी मुंडे यांनी दंडाधिकारी कोर्टाच्या आदेशांना दिलेली आव्हान याचिका फेटाळून लावली. करुणा व धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत. या दोघांनी 2 मुलांना जन्म दिला. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण कोर्टाने यासंबंधी नोंदवले आहे.

मुंबईतील वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने गत 4 फेब्रुवारी रोजी धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. मुंडे यांनी या आदेशांना सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्यात त्यांनी आपण करुणा शर्मा यांच्याशी लग्न केले नसून, त्यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होतो असा दावा केला होता. पण कोर्टाने या प्रकरणी शनिवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका फेटाळून लावली. त्यानंतर आत्ता कोर्टाचा विस्तृत आदेश पुढे आला आहे.

धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरुपाचे आहेत. त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहेत. करुणा व धनंजय यांच्यातील संबंध लग्नासारखे आहेत. त्यांनी दोन मुलांना जन्मही दिला आहे. एकाच घरात राहिल्याशिवाय हे शक्य नाही. एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच आहे. करुणा व त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी आपल्या आदेशांत म्हटले आहे.

कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळवण्यासाठी लग्नाचे प्रमाणपत्र आवश्यक नाही, तर संबंधांचे स्वरुप महत्त्वाचे असते, अशी पुस्तीही कोर्टाने या प्रकरणी जोडली. मुंडे यांनी करुणा यांचे वैवाहिक अधिकार फेटाळणे हे भावनात्मक हिंसाचाराच्या श्रेणीत येते. त्यामु्ळे करुणा यांना उदरनिर्वाह भत्ता व इतर दिलासा मिळाला पाहिजे, असेही कोर्ट या प्रकरणी म्हणाले आहे.

धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाच्या सुनावणीत करुणा शर्मा यांच्याशी लग्न केले नसल्याचा दावा केला होता. मी करुणा शर्मा यांच्यासोबत केव्हाही लग्न केले नाही. माझी व त्यांची ओळख एका राजकीय पक्षाच्या बैठकीवेळी झाली. त्यानंतर आमच्यात वैयक्तिक संबंध निर्माण झाले. या नात्यातून आम्हाला दोन मुले झाली. या मुलांना मी माझे नाव व आडनाव वापरण्याची परवानगी दिली. पण मी केव्हाही करुणा यांच्याशी विवाह केला नाही. माझा केवळ राजश्री मुंडे यांच्याशी कायदेशीर विवाह झाला आहे, असे ते म्हणाले होते.

पुण्यात महिलेचे अपहरण करून विनयभंग:2आरोपींना सहकारनगर पोलिसांनी केली अटक

पुणे-सध्या पुण्यात रहाणारी एक महिला तिच्या मुळ गाव बीड येथून पुण्यातील वाघाेली परिसरात सहा एप्रिल राेजी सायंकाळी साडेपाच वाजता आली हाेती. तेथून कॅबने ती वडगाव धायरी येथील राहते साेसायटीचे गेटवर आली असताना, तिचा दाेन अनाेळखी व्यक्तींनी तिचा चारचाकी गाडीतून वाघाेली येथून पाठलाग केला. साेसायटीचे गेटवर महिलेस अडवून बळजबरीने गाडीत बसवून तिला पळवून नेत तिच्याकडे खंडणीची मागणी करुन विनयभंग केल्याचा प्रकार घडला हाेता.याप्रकरणाची तक्रार सहकारनगर पोलिसांकडे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सदर गुन्हयाचा गांभीर्याने तपास करत दाेन आराेपींना गजाआड केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गाैड यांनी दिली आहे.

महेश माेहन रासकर (वय- 27) आणि किरण भाऊसाहेब ढगे (वय- 27, दाेघे रा. तळेगाव ढमढेरे, ता.शिरुर,पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. आराेपींनी महिलेचे अपहरण करुन तिला गाडीत पळवून नेत असताना, तिच्या गालाला हात लावून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य करत तिचा विनयभंग करत तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिचा माेबाईलचा पासवर्ड विचारुन, माेबाईलमधील फाेन पे खात्यावरुन 1400 रुपये एका दुकानदाराला ट्रान्सफर केले हाेते. त्यानंतर तिच्याकडून राेख रक्कम घेऊन आराेपी पसार झाले हाेते. या गुन्ह्याचा तपास सहकारनगर पोलिस करत असून त्यांना आराेपी महेश रासकर व किरण ढगे यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचा शाेध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याचे अनुषंगाने पोलिसांनी सखाेल तपास केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आराेपीच्या ताब्यातून राेख स्वरुपात घेतलेले 1400 रुपये, गुन्हा करण्यासाठी वापरलेली 4 लाख रुपये किंमतीची कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहे.

अध्यात्म आणि सकारात्मक विचारांची सांगड गरजेची-डॉ. सुनील साठे

सद्गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी महोत्सवात अध्यात्म आणि औषधोपचार या विषयावर व्याख्यान

पुणे : अध्यात्म आणि विज्ञान यांचा एकमेकांशी संबंध आहे. आपल्या संस्कृतीमध्ये हा संबंध अनेक वर्षांपासून सिद्ध झाला आहे. परंतु सध्याची तरुण पिढी आपल्या संस्कृतीपासूनच दूर जात असल्यामुळे अध्यात्म आणि सकारात्मक विचारांची सांगड घालता येत नाही. समाधानी आयुष्यासाठी अध्यात्म आणि सकारात्मक विचारांची सांगड घालता येणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनील साठे यांनी व्यक्त केले.

सद्गुरु श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३५ व्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये डॉ. सुनील साठे यांचे अध्यात्म आणि औषधोपचार या विषयावर व्याख्यान झाले. 

डॉ. सुनील साठे म्हणाले, अध्यात्म हे आपल्याला विचारांशी समतोल राहण्याचे सामर्थ्य देते. आपले विचार जर नकारात्मक असतील, तर त्याचा निश्चितच आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि आपले शरीर विविध व्याधींनी त्रस्त होते. अध्यात्माची जर सकारात्मक दृष्टीने आपल्या आयुष्यात सांगड घातली, तर निश्चितच आपले विचार सकारात्मक होऊन आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे आयुष्यात अध्यात्म आणि सकारात्मकतेची सांगड गरजेची आहे.

आजची तरुण पिढी ही भौतिक सुखाच्या मागे धावताना केवळ मॉडर्न आयुष्य जगण्याच्या शर्यतीमध्ये आपली संस्कृती आणि मूल्यांपासून दूर जात आहे. परंतु त्याचे दुष्परिणाम जे होत आहेत, त्याचे त्यांना भान राहिलेले नाही. चुकीच्या विचारांपासून त्यांना दूर नेण्यासाठी आणि त्यांना आपल्या संस्कृतीकडे आकर्षित करण्यासाठी आपल्या संस्कृतीतील मूल्ये विविध माध्यमांद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असेही डॉ. सुनील साठे यांनी यावेळी सांगितले.

मनसे नेते संदीप देशपांडेंना घरात घुसून मारण्याची धमकी

मुंबई-मुंबईत मराठी व अमराठी वाद पेटला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात तसेच महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर मनसे नेते व मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे की नाही यावर विचार करावा लागेल, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर संदीप देशपांडे यांनी धमकीचा कॉल आल्याचे समोर आले आहे.

संदीप देशपांडे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, रात्री सव्वा दहा वाजता मला अज्ञात नंबरवरून फोन आला. फोनवर फक्त शिव्या घालत होता. त्यानंतर पुन्हा फोन केला तेव्हा मी कॉल रेकॉर्ड केला. तुम्हाला घरी येऊन मारू वैगेरे धमकी देत होता. असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही. याबाबत मी पोलिस तक्रार केली आहे. कोणी जाणीवपूर्वक मुंबई आणि महाराष्ट्रातले वातावरण खराब करत आहे का याचा शोध घेतला पाहिजे. तसेच माझे राज ठाकरे यांच्याशी या प्रकरणावर बोलणे झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करण्याबाबत उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे हे हिंदूविरोधी आहेत, त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी सुनील शुक्ला यांनीयाचिकेतून केली होती. यावर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, भैय्या आमच्या पक्षाची मान्यता रद्द करणार असतील, तर त्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे की नाही, याचा विचार करावा लागेल, असे संदीप देशपांडे म्हणाले होते.

आई माता मंदीर जवळ दि बिलीयन्स हॉटेल नामक अवैध हुक्का पार्लरवर छापा

पुणे- मार्केट यार्ड ते बिबवेवाडी रस्त्यावरील आई माता मंदीर जवळ असलेल्या दि बिलीयन्स हॉटेल नामक अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा मारला .
दि.०७/०४/२०२५ रोजी रात्रीच्या दरम्यान वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, अति कार्यभार गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर हे त्यांचे ताबे पोलीस अंमलदार यांचेसह आई माता मंदीर जवळ दि बिलीयन्स हॉटेल नामक अवैध हुक्का पार्लरवर छापापोलीस स्टेशनच्या हद्दीमधील हॉटेलमध्ये अवैधरित्या सुरु असलेले हुक्का पार्लर चेकींग करीत असताना दि बिलीयन्स हॉटेल आई माता मंदीर जवळ, मार्केटयार्ड पुणे या ठिकाणी अवैधरित्या हुक्का पुरवला जातो अशी बातमी मिळाली.
त्यावेळी लागलीच पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व त्यांचा ताबे पोलीस स्टाफ असे बातमीबाबत वरिष्ठांना माहिती देवून हॉटेल दि बिलीयन्स या ठिकाणी छापा टाकुन कारवाई करुन हॉटेलमध्ये मिळुन आलेले हुक्का पिण्याचे साहित्य त्यामध्ये हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर, इतर साहित्य व रोख रक्कम असा एकुण ३२,०००/- रु. किं.चा मुद्देमाल जप्त करुन हॉटेल चालक नामे आरीफ शब्बीर शेख वय २४ वर्षे रा. साईबाबा नगर कोढवा खुर्द पुणे तसेच हॉटेल मधील ०३ वेटर कामगार यांचेविरुध्द सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) सन २०१८ कलम ४ अव २१ अ अन्वये कारवाई करुन मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन त्यांना पुढील कार्यवाही कामी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण अति. कार्यभार युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर, सपोनि. मदन कांबळे, पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे, प्रमोद टिळेकर, कानिफनाथ कारखिले, उमाकांत स्वामी व शेखर काटे यांचे पथकाने केली आहे.

पुण्यात भूतानच्या महिलेवर सामूहिक बलात्कार,1 राष्ट्रवादीचा पदाधिकारी ,१ वकील,एक डीजे अशा ९ आरोपींना अटक;३ दिवसांची पोलीस कोठडी …

पुणे – पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये भूतानमधील २७ वर्षीय परदेशी महिलेनं सात जणांनी सामूहिक बलात्कार करून तिला जबरदस्तीने वेश्याव्यसाय करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी एकूण ९ आरोपींना अटक केली आहे.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तिला लोनावळा, रायगड आणि पानशेत येथील विविध ठिकाणी, आरोपींनी आयोजित केलेल्या पार्ट्यांमध्ये लैंगिक अत्याचार करून वेश्याव्यसाय करून घेतला. अटकेतील आरोपींमध्ये विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती आहेत – एकजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी पदाधिकारी आहे, एक डीजे असून दुसरा वकील आहे.

प्रकरण असे कि, महिला २०२० पासून पुण्यात वास्तव्यास आहे. ती भारतात प्रथम २०२० मध्ये आली आणि सुरुवातीला बोधगयामध्ये राहिली. नंतर शिक्षण आणि नोकरीच्या हेतूनं ती पुण्यात आली, जिथे तिची ओळख आरोपी ऋषिकेश नवले याच्याशी झाली. त्याने तिची ओळख शंतनू कुकडे याच्याशी करून दिली. कुकडे याने तिला निवासाची आणि शिक्षणासाठी आर्थिक मदतीच्या नावाखाली तिच्या असहायतेचा गैरफायदा आरोपीने घेतला.

मात्र, आरोप आहे की, शंतनू कुकडे याने या संधीचा गैरफायदा घेत महिलेस लैंगिक शोषणासाठी वापरले. कालांतराने त्याने तिची ओळख आपल्या इतर मित्रांशी करून दिली आणि ‘मित्रत्वाच्या’ नावाखाली तिला विविध पार्ट्यांमध्ये सहभागी करून घेतले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी महिलेच्या विश्वासाचा गैरफायदा घेत वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करून पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली.

विविध ठिकाणी अत्याचार महिलेने सांगितले की, लोणावळा, रायगड व पानशेत येथील विविध ठिकाणी आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:

शंतनू कुकडे – राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी (त्याच्यावर याआधी दोन महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात, ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे, POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे), ऋषिकेश नवले, जलिंदर बड्डे, उमेश शाहणे, प्रतीक शिंदे, वकील विपिन बिडकर, सागर रसगे या व्यतिरिक्त तक्रारीमध्ये अविनाश सूर्यवंशी आणि मुदस्सीर मेमन(व्यवसायीक) या दोघांची नावेही नमूद आहेत, ज्यांची चौकशी सुरू आहे.

आरोपींना वानखेडे मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले. पोलीस पथकाने ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली. आरोपींच्या वतीने अॅड. तोसिफ शेख, अॅड. क्रांती साहाने, अॅड. स्वप्नील गिर्मे, अॅड. सूरज जाधव, अॅड. नेपा पिसे आणि अॅड. आदिल दतरंगे यांनी काम पाहिले. त्यांनी न्यायालयात सांगितले की, सदर गुन्हा २०२० मध्ये घडलेला असून तक्रार दाखल करण्यास अत्यंत उशीर झालेला आहे. एवढा विलंब झाल्यामुळे फिर्यादीचा कथनावर संशय निर्माण होतो, त्यामुळे आरोपींना मॅजिस्ट्रेट कोठडी (MCR) द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने सर्व आरोपींना १२ एप्रिल २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत (PCR) ठेवण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्राची निवडणूक हाच मोठा फ्रॉड- मल्लिकार्जुन खरगे

अहमदाबाद – भाजपने फ्रॉड करूनच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी केला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा आल्या. पण त्यानंतर भाजपने मतदार यादीत फेरफार करून तब्बल 50 लाख मतदार वाढवले. त्यानंतर भाजपच्या विधानसभा निवडणुकीत 150 पैकी 138 जागा निवडून आल्या. आता तुम्हीच सांगा ही कशी लोकशाही? हा कसा निवडणूक आयोग? ही कोणती मतदार यादी या लोकांनी तयार केली? सर्वकाही बोगस तयार करून हे जिंकले, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.

गुजरातच्या अहमदाबाद येथे काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू झाले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी या अधिवेशनाला उपस्थित नेत्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उपरोक्त आरोप केला. ते म्हणाले, केंद्र सरकार स्वतःला फायदा व विरोधी पक्षांना नुकसान व्हावे या दृष्टिकोनातून तंत्रज्ञान तयार करत आहे. पण आज नाही तर उद्या या देशातील तरुण जागे होऊन तुमचा हात पकडून आम्हाला ईव्हीएम नव्हे तर बॅलेट पेपरवर मतदान हवे असल्याचे ठणकावून सांगतील.

महाराष्ट्रात काय झाले? राहुल गांधी यांनी हा मुद्दा यापूर्वी संसद व माध्यमांपुढे उपस्थित केला. आम्ही सर्वजण बोललो. पण त्याचा सरकारवर कोणताही परिणाम झाला नाही. विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान 50 लाख मतदान वाढले. आत्ता तुम्हीच सांगा, ही कशी लोकशाही? हा कसा निवडणूक आयोग? ही कोणती मतदार यादी या लोकांनी तयार केली? सर्वकाही बोगस तयार करून हे जिंकले.

मल्लिकार्जुन खरगे पुढे म्हणाले, महाराष्ट्राची निवडणूक एक फ्रॉड असून, लोकशाहीला बसलेला मार आहे. हीच गोष्ट हरियाणातही झाली आहे. तिथे थोड्याफार प्रमाणात घोळ झाला, पण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात झाला. लोकसभेच्या निवडणुकीत आमच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. पण त्यानंतर तेथील मतदार यादीत खूप मोठा फेरफार करण्यात आला. त्याचा त्यांना विधानसभा निवडणुकीत फायदा झाला. मी केव्हाच असे ऐकले नाही किंवा पाहिलेही नाही.

भाजपने महाराष्ट्रात 150 जागा लढल्या आणि 138 जागा जिंकल्या. 90 टक्के रिझल्ट आला. देशात असे कधीच झाले नाही. आम्ही अनेक निवडणुका पाहिल्या. मी स्वतः 12-13 वेळा निवडणूक लढली. पण असे केव्हाच झाले नाही. जो फ्रॉड महाराष्ट्रात झाला, तो केवळ लोकशाहीला उद्ध्वस्त व तंग करण्यासाठी तथा विरोधकांना हरवण्यासाठी करण्यात आला. आपल्याला याविरोधातही लढायचे आहे.

मतदार यादीत होणारा फेरफार रोखण्यासाठी आमच्या नेत्यांनी व वकिलांनी मोठ्या प्रमाणात काम केले. पण त्यानंतरही आम्ही या प्रकरणी खूप मागे आहोत. आपण हे शोधून काढू. चोरी करणारा चोर आज नाही तर उद्या जरूर पकडला जातो. त्यामुळे आम्ही या प्रकरणी प्रयत्न करत आहोत.

मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी मध्यरात्री उशिरा वक्फ दुरुस्ती विधेयक तथा मणिपूर विधेयकासारखे महत्त्वाचे विधेयक पारित करण्याच्या मुद्यावरूनही नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, आज जे होत आहे तसे पूर्वी केव्हाच झाले नाही. जनतेशी निगडित महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्याऐवजी सरकारने जातीय ध्रुवीकरण करण्यासाठी मध्यरात्री 3-4 वाजेपर्यंत संसदेत चर्चा घडवून आली. मणिपूर सारख्या महत्त्वाच्या मुद्यावर मध्यरात्री उशिरा 4.30 वा. चर्चा सुरू झाली. मी अमित शहांना उद्या चर्चा करण्याची विनंती केली. या मुद्यांवर आम्हाला प्रकाश टाकायचा आहे. लोकांना मणिपूरमधील वस्तुस्थिती समजावून सांगायची आहे. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. याचा अर्थ सरकार जनतेपासून काही तरी लपवून ठेवत आहे.

सरकार आपले अपयश जनतेपासून लपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामु्ळे ते मध्यरात्री संसदेत अशा मुद्यांवर चर्चा करत आहे. पहाटे 5 वाजेपर्यंत संसद चालली. यावरून सरकार संसदेला किती गांभीर्याने घेते हे स्पष्ट होते. हे विधेयक पारित झाले तेव्हा संसदेत उपस्थित कुणी झोपत होते, कुणी बसलेले होते, तर कुणी इकडे-तिकडे पाहत होते. या स्थितीत मोदी सरकारने आपले विधेयक आणते. या माध्यमातून सरकार लोकशाही हळूहळू संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असे खरगे म्हणाले.

भूतानच्या तरुणीसोबत पुण्यातील नामांकित वकिलाचा अतिप्रसंग:विपीन बीडकर यांना अटक, पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शंतनु कुकडे याच्या विरोधात समर्थ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात पोलिस तपास करत असताना, भूतान येथील एका तरुणीने देखील सात ते आठ जणांविरोधात तक्रार दिल्याने आणखी नवीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील नामांकित वकील विपिन बीडकर यांना देखील पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल म्हणाले, शंतनु कुकडे प्रकरणाचा पोलिस तपास करत असताना, कुकडे याच्या फाउंडेशन मार्फत भूतानची एक तरुणी मागील अनेक वर्षापासून त्याच्या सोबत राहत होती. सदर तरुणीची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती कुकडे याच्या फाउंडेशनच्या माध्यमातून राहत असताना, कुकडे याच्या ओळखीतील अनेक जणांची ये-जा वेगवेगळ्या कारणाने, पार्टीकरिता सुरु असायची. यादरम्यान, एक वर्षापूर्वी विपिन बीडकर देखील सदर ठिकाणी येऊन त्यांनी तरुणीसोबत अतिप्रसंग केल्याची तक्रार तरुणीची आहे. त्यानुसार अॅड. बीडकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात आणखी सात ते आठ जणांवर ही विनयभंग व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास समर्थ पोलिस करत आहे.

सरकारकडून नागरिकांचा छळ,अवघ्या दीड किमीचा रस्त्यासाठी सुप्रिया सुळेंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पुणे-भोर तालुक्यातील रस्त्यासंदर्भात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. श्रीक्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे, तो लवकरात लवकर करावा ह्या मागणीसह सरकारी अनास्थेचा निषेध करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अजून झालेले नाही हे खूप दुर्दैवी आहे. ज्या शहरामध्ये करोडो रुपयांची मेट्रो होऊ शकते, करोडो रुपयांचे रस्ते नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देशभरात होत आहे. नितीन गडकरी यांच्याकडे कधीही कामासंदर्भात गेलो तर नाही म्हणत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वटीमच्या पाठपुराव्यामुळे सर्वच रस्ते झाले आहेत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बनेश्वर हे अस्थेचे ठिकाण आहे. दीड किमीचा हा रस्ता होत नाही, हे दुर्दैव आहे. गेले 6 महिने आम्ही यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहोत, किमान दुरुस्ती करावी अशी आमची मागणी आहे, पण सरकारकडून मोठा प्रोजेक्ट आहे असे सांगितले जाते पण हा प्लॅन आमच्या पदरात कधी पडणार असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेली अनेक वर्षे बनेश्वरला शाळांचा सहली जात असतात, लाखो भाविक जात असतात. पण आम्ही सर्व जणांनी ह्या रस्त्यासाठी पाठपुरावा केला असला तरी हा रस्ता होत नाही. मागच्या वेळी हा रस्ता करुण देणार असा शब्द प्रशासनाने दिला होता. दीड किमीच्या रस्त्यासाठी हे सरकार नागरिकांना छळत आहे. आपण काही नवीन रस्ता मागत नाहीये, त्यामुळे परवानगीचा काही संबंध येत नाही. किमान रस्त्यावरील खड्डेतरी बुजवले पाहिजे एवढीच आमची मागणी आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बनेश्वर ही आमच्या सर्वांच्या निष्ठेची जागा आहे. या विषयामध्ये आम्हाला रातकारण आणायचे नाही. तिथे अनेक जण कायम जात असतात, महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या श्रद्धचे स्थान आहे. नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला मदत केली आहे तर केलीच म्हणावे लागेल. पालखी मार्गाने आपण सर्व जण जातो आहोत, गडकरी यांच्याकडे कोणताही खासदार गेला तर त्याच्या मतदारसंघातील रस्त्याची कामे होतातच.

बनेश्वर देवस्थानचे विश्वस्त म्हणाले की, आमची केवळ एकच मागणी आहे. आमचा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे. आम्ही निवेदन देऊनही रस्ता झालेला नाही. तरी तो रस्ता जितक्या लवकर करता येईल तो करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मंगेशकर रुग्णालयाच्या निमित्ताने भाजपचे २ मंत्री विरुद्ध खासदार असा सामना रंगणार ?

पुणे- दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चे उपचार चांगले , डॉक्टर उत्तम पण प्रशासनाच्या उद्दाम पणामुळे सारे काही बिघडले भाजपच्या महिला अध्यक्ष हर्षदा फरांदे यांनी दिनानाठ्चे डॉक्टर घैसास यांच्या विरोधात केलील आंदोलन आणि त्यांच्या क्लिनिक ची केलेली मोडतोड यावर राज्यसभा सदस्य असलेल्या भाजपच्या कोथरूड च्या महिला नेत्या मेधा कुलकर्णी या संतप्त झालेल्या असल्याचे एकीकडे वृत्त झळकलेले असताना राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खुद्द मेधा कुलकर्णी यांच्या समोरच हर्षदा फरांदे यांनी केलेल्या आंदोलनाचे कौतुक केल्याने काल एका बैठकीतून मेधा कुलकर्णी यांनी तातडीने काढता पाय घेतला . यामुळे कोथरूड मधील या ३ नेत्यांमध्ये आता २ मंत्री विरुद्ध एक राज्यसभा सदस्य असा राजकीय सामना रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

काल रात्री भारतीय जनता पक्षाची एक अंतर्गत बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये भाजपा महिला आघाडीच्या हर्षदा फरांदे यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटणार याची कल्पना सुरुवातीपासूनच होती आणि झालेही तसेच. चंद्रकांत पाटील यांनी महिला आघाडीच्या आंदोलनाची उघड पाठराखण करत, ‘महिला आघाडीने केलेले आंदोलन त्यांच्या घरासाठी नव्हे तर संघटनेसाठी होते. आंदोलन करताना ते चुकीच्या पद्धतीने झाले देखील असेल, पण यामुळे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होता कामा नये’ असं म्हटलं आहे.तर दुसरीकडे फक्त चंद्रकांत पाटीलच नव्हे तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा महिला आघाडीच्या आंदोलनाची पाठराखण केली. ‘१९ वर्षांपूर्वी आंदोलन करताना माझ्याकडून तोडफोड झाली होती. ती चुकीचीच होती, पण कार्यकर्ता म्हणून पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला. तुम्ही जशास तसे उत्तर द्यायला शिका. एखादा पक्षाचा नेता चुकीचं सांगत असेल तर तुम्ही चुकीचं बोलताय असं म्हणायला शिका’. असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी आंदोलनाचं समर्थन केलं आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये आता दोन मंत्री विरुद्ध खासदार असा संघर्ष उभा राहतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.भारतीय जनता पक्षाची ही बैठक सायंकाळी साडेचार वाजता सुरू होणार होती. या बैठकीसाठी खासदार मेधा कुलकर्णी या चार वाजताच बैठक स्थळी उपस्थित राहिल्या. मात्र बैठक सुरू होण्यासाठी तब्बल साडेपाच ते पावणे सहा वाजले. या बैठकीनंतर मेधा कुलकर्णी यांचे काही नियोजित कार्यक्रम होते. या कार्यक्रमाचे कारण देत बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळातच मेधा कुलकर्णी बैठकीच्या बाहेर पडल्या. मात्र कुलकर्णी बैठकीतून बाहेर पडत असताना मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांचे भाषण बाकी होते.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधात भारतीय जनता पक्षाची महिला आघाडीने फक्त दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरच आंदोलन केलं नाही, तर या सगळ्या प्रकरणात ज्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता त्यांच्या कुटुंबीयांचं क्लिनिक देखील फोडलं होतं. या आंदोलनावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त करत शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहिलं आणि आंदोलकांना समज द्यावी असं म्हटलं होतं. या पत्रानंतर भाजपमध्ये उघड दोन गट पडल्याचे पाहायला मिळालं. आता याचेच पडसाद काल रात्री झालेल्या भाजपच्या अंतर्गत बैठकीत देखील उमटल्याचे चित्र होते.

पुणे विमानतळधावपट्टी विस्तारीकरणाचे काम आता ‘फास्टट्रॅक’वर : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

केंद्रीय मंत्री मोहोळ यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

पुणे –

पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढावी आणि मोठ्या आकाराच्या विमानांना ये-जा करता यावी, यासाठी आवश्यक असणाऱ्या धावपट्टी विस्तारीकरणाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामालाही वेग येणार आहे. कारण सदरील काम ‘फास्टट्रॅक’वर करण्याचे निर्देश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. तसेच यात लोहगावकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून पुणे महापालिका हवाई दलाशी समन्वय साधून हा रस्ता करणार आहे.

काहीच दिवसांपूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाला परवानगी मिळाली होती. त्यानंतर विस्तारीकरणासाठी आवश्यक असणारे भूसंपादन, लोहगावचा पर्यायी रस्ता करणे आणि इतर तांत्रिक बाबी याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सविस्तर बैठक बोलावून विविध निर्देश दिले. या बैठकीला विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विमानतळाचे संचालक संतोष ढोके, हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत धावपट्टी विस्तारीकरण ‘फास्टट्रॅक’वर करण्याचे निर्देश देऊन इतर बाबींचाही केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी आढावा घेतला.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पुणे विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात येणार असून यासाठी सैन्य दलाची आणि खासगी जागा प्रत्यक्षात किती लागणार आहे? याबाबत सविस्तर चर्चा केली. शिवाय हवाई दलाची विमानतळासाठी आवश्यक असणारी जागा ही विमानतळ प्राधिकरणाला मिळावी, या संदर्भातही चर्चा होत सदरील मागणीचा प्रस्ताव सैन्य दलाच्या मुख्यालयाकडे पाठवण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. हवाई दलाच्या या जागेत विमानतळाच्या व्यवस्थापनासंदर्भात यंत्रणा उभी करणे शक्य होणार आहे. तसेच या बदल्यात विमानतळ प्राधिकरणाकडून हवाई दलाला पर्यायी जागा देण्यात येणार असून याबाबतच्या आस्थापनेचा खर्च विमानतळ प्राधिकरणाकडून केला जाणार आहे.

‘महत्वाची बाब म्हणजे धावपट्टी विस्तारणीकरणामुळे विश्रांतवाडी ते लोहगाव हा विमानतळालगत असणारा रस्ता बाधित होणार असल्याने त्याला तातडीने पर्यायी मार्ग तयार करावा लागणार आहे. हा नियोजित पर्यायी रस्ता हवाई दलाच्या जागेतून जाणार आहे. या रस्त्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली आणि या पर्यायी रस्त्याचा खर्च पुणे महापालिका करणार आहे. महापालिका आणि हवाई दल याबाबत समन्वय ठेवणार असून वेगाने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे’, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.

धावपट्टी विस्तारीकरण ‘फास्टट्रॅक’वर…

पुणे विमानतळाची तातडीची गरज लक्षात घेता विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार वेगाने होणे आवश्यक आहे. म्हणूनच बैठक घेऊन ही प्रक्रिया ‘फास्टट्रॅक’ने करण्याचे निर्देश दिले आहेत. पुरंदर विमानतळाची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी पुणे शहर आणि परिसराची तातडीची गरज लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढणे हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच ही सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विस्तारासाठीचे भूसंपादन राज्य सरकारकडून वेगाने केले जाणार आहे, मात्र त्यासाठीची पूर्व पूर्तताही वेळेत होणे गरजेचे आहे. म्हणूनच या बैठकीत सविस्तर आढावा घेत वेगवेगळे निर्देश दिले आहेत.

  • मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

पालिकेच्या वारजे हॉस्पिटलला रक्षा मंत्रालयाचा हिरवा कंदील:आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या अथक पाठपुराव्याला यश

इसीए बेस फायनान्सिंगच्या भारतातल्या पहिल्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा –
मुख्यमंत्री कार्यालयाकडून मोलाचे सहकार्य,
पुणे -संवेदनशील रेड झोन असताना तो ज्ञात करून न घेता वारजे हॉस्पिटल चे तत्कालीन काळात भूमिपूजन तर झाले पण पुढे सुरु झाला खरा खडतर प्रवास आणि तो नजरेच्या टप्प्यात आणून सरते कठीण आणि जाचक प्रवास पूर्ण करत महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पालिकेच्या वारजे हॉस्पिटलला रक्षा मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविले आहे आता या रुग्णालयाच्या बांधकामाला महापालिका कधीही प्रारंभ करू शकणार आहे. राजेंद्र भोसले यांच्या पुण्यातील महापालिकेच्या कारकिर्दीतील हा महत्वाचा टप्पा ठरणार आहे
.

महापालिकेचे वारजे येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तावीत आहे, या प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडला होता, प्रत्यक्षात काम चालू करण्याच्या आधी या हॉस्पिटलच्या बांधकामाचा झोन हा रक्षा मंत्रालयाच्या अति संवेदनशील फनेल रेड क्षेत्रामध्ये येत होता, पालिकेला याबद्दलची कल्पना डॉ राजेंद्र भोसले रुजू झाल्यावर समजले आणि त्यामुळे काम चालू करायच्या आधी रक्षा मंत्रालयाची परवानगी मिळणे गरजेचे झाले होते, संवेदनशील रेड झोन पाहता त्याबद्दलची एनओसी रक्षा मंत्रालय कडून मिळणे फार किचकट व पाठपुराव्याचे काम होते, यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला, लोहगाव एअरपोर्ट बेस पुणे, त्यानंतर गांधीनगर रक्षा मंत्रालय बेस गुजरात, आणि त्यानंतर सरते शेवटी दिल्ली रक्षा मंत्रालय असा कठीण आणि जाचक प्रवास होता, पण आता ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यामुळे, बांधकामाचा पुढील मार्ग मोकळा झालेला आहे,
पुणे महानगरपालिकेच्या, वारजे येथील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, एक वर्षापासूनच्या मेहनतीच्या पाठपुराव्याला अखेरीस यश आलेले आहे, नुकतीच या प्रकल्पाला रक्षा मंत्रालयाची एनओसी मिळाली, आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी स्वतः ही एनओसी लवकर कशी मिळवता येईल यासाठी विशेष प्रयत्न केले होते, यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचे योगदान मोलाचे ठरले व तसेचउपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस,उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील आणि अजितदादा पवार,केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विशेष सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
या पुढील टप्पा हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या विहित बांधकामाच्या परवानग्या आल्यावर या प्रकल्पाचे काम चालू होणार आहे, हा प्रकल्प साधारणपणे २०२७ ला पुणेकरांच्या सेवेत रुजू करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट असून, यामध्ये लागणारी संपूर्ण गुंतवणूक ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट धोरणाच्या अंतर्गत नेदरलँड येथील निम शासकीय संस्था करणार आहे, या संपूर्ण प्रकल्पाला नेदरलैंड येथील शासकीय संस्थेचा इन्शुरन्स मिळालेला आहे, या संपूर्ण प्रकल्पाचा ड्राफ्ट डीपीआर रक्षा मंत्रालयात देण्यात आला.
या हॉस्पिटलमध्ये विशेष भर हा कॅन्सर आणि मदर अँड चाइल्ड केअर यावर देण्यात असून, महाराष्ट्रातील मदर अँड चाइल्ड केअर चे हे सर्वात मोठे हॉस्पिटल राहणार आहे, या प्रकल्पामध्ये जवळपास दहा ते वीस टक्के बेड हे गरजूंना रिझर्व राहणार आहे, राज्य शासनाच्या सर्व आरोग्य योजना, या प्रकल्पामध्ये राबवण्यात येणार आहेत, प्रकल्प चालू झाल्यावर दरवर्षी पालिकेला यामधून ठराविक उत्पन्न मिळणार आहे, संरक्षण मंत्रालयाचे ना हरकत मिळाल्यानंतर आता सदर हॉस्पिटल ची जागा या प्रकल्पासाठी उपयोगात येणार आहे, आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी हा प्रकल्प करत असलेल्या रुलर एनान्सर्स या संस्थेने संरक्षण मंत्रालयाची आणि इतर परवानग्या येईपर्यंत सदर जागेतील डायलिसिस सेंटर रुग्णांना गैरसोय होऊ नये म्हणून कार्यान्वित ठेवले होते.
प्रकल्प चालू झाल्यापासून कार्यान्वयीत होईपर्यंत परदेशी गुंतवणूक करणाऱ्या एफडीआय संस्था पालिकेला जवळपास साडे सतरा कोटी रुपयांची बँक गॅरंटी देणार आहे, तसेच हा प्रकल्प चालू झाल्यावर या संस्थेमार्फत पालिकेच्या माध्यमातून सुकाणू समिती या प्रकल्पावर देखरेख करेल, हा प्रकल्प आरोग्य व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रातील मानांकित हॉस्पिटल म्हणून लोकांमध्ये ओळखल्या जाईल.या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हा हॉस्पिटल प्रकल्प भारतातील पहिला इसीए फायनान्सिंग संकल्पनेवर आधारित असून, यानंतर महाराष्ट्रामध्ये आरोग्य व्यवस्थेचे जाळे निर्माण करण्यास फार मोठी मदत या माध्यमातून होणार आहे.

घोड्यांच्या रेसवर ऑनलाईन जुगार,फातिमानगरमध्ये छापा

पुणे- घोड्यांच्या रेसवर ऑनलाईन जुगार घेणाऱ्या फातिमानगर येथील अड्ड्यावर पुणे पोलिसांनी छापा मारला . या स्नाद्र्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.०६/०४/२०२५ रोजी श्रीराम नवमी बंदोबस्ताच्या अनुषंगाने व वरिष्ठांचे आदेशाने वानवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करणे व अवैध धंद्यांना प्रतिबंध करणेकामी वानवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक धनाजी टोणे व स्टाफ असे पेट्रोलिंग करीत असताना तपास पथकांना बातमी मिळालेल्या बातमीवरुन स.नं. १७, बालाजी दर्शन, चौथा मजला, प्लॅट नं.४०४, फातिमानगर, वानवडी, पुणे येथुन एक इसम हा त्यांचे ओळखीचे ग्राहकांकडुन रेसकोर्सच्या घोड्यांवर जुगार घेऊन त्याचे काम पाहणारे कामगारांकडुन यांचे करवी भारतात ऑनलाईन रिंगवर जुगार लावुन ते हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी भारतात चालणारे घोड्यांच्या रेसवर ऑनलाईन जुगार, व पैशाची देवाणा-घेवाण करताना मिळुन आल्याने व ते जुगार खेळत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे ताब्यातुन एकुण ५५,०००/-रु.कि.चे जुगाराकरीता वापरलेले मोबाईल व इतर मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द वानवडी पोलीस ठाणे, गुन्हा रजि. नं. १५६/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४ व ५ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. नमुद आरोपीना भा.न्या.सं. कलम २९ प्रमाणे नोटीस देण्यात आली असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक धनाजी टोण हे करीत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परि-०५ पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, धन्यकुमार गोडसे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, व पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव, वानवडी पो.स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, धनाजी टोणे, पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे, विष्णु सुतार, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, अभिजित चव्हाण व बालाजी वाघमारे या पथकाने केली आहे.