कान्हे फाटा येथे निसर्गरम्य परिसरात साकारलेला भव्य प्रकल्प
पुणे, दि. २४ सप्टे : ‘अनंतसृष्टीच्या पहिल्या (फेज १) आणि दुसऱ्या टप्प्याच्या (फेज २) यशस्वीतेनंतर ‘दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’तर्फे ‘अनंतसृष्टी’च्या तिसऱ्या (फेज ३) टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. कान्हे फाटा परिसरातील निसर्गरम्य वातावरणामध्ये, ३५ एकरच्या परिसरामध्ये वसलेल्या फेज ३ प्रकल्पाचा शुभारंभ येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. यावेळी फ़्लॅट बूक करणाऱ्यांना स्व. दाजीकाका गाडगीळ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’तर्फे १ लाख रुपयांपर्यंतचे ‘पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स’चे वाऊचर भेट म्हणून देण्यात येणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास ‘पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स’ तसेच ‘दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ हे उपस्थित राहणार आहेत, ‘पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स’च्या संचालिका वैशाली गाडगीळ, ‘दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’च्या संचालिका राधिका गाडगीळ, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल ताविलदार व प्रसिद्ध बांधकाम विषयक लेखक आणि ब्लॉगर रवी करंदीकर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्ताने कान्हे फाटा येथे २७ आणि २८ सप्टेंबरला विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. अनंतसृष्टीच्या या प्रकल्पास भेट देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’च्या मॉडेल कॉलनी येथील कार्यालयातून, खास वाहन व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्याठिकाणी निसर्गरम्य परिसराच्या अनुभवाबरोबरच सँपल फ़्लॅट, शो फ़्लॅट व प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, अल्पोपहाराचीही सोय करण्यात आली आहे.
प्रमुख माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्या, अनेक महत्त्वपूर्ण उत्पादन उद्योग व नामवंत शैक्षणिक संस्था असणाऱ्या तळेगाव-कान्हे फाटा भागामध्ये निसर्गाच्या सहवासात ‘अनंतसृष्टी’ हा प्रकल्प वसलेला आहे. क्लब हाउस, प्रशस्त मोकळी जागा आणि पुणे-मुंबई महामार्गाशी कनेक्टीव्हिटी हे अनंतसृष्टीचे वेगळेपण आहे. आजूबाजूला रुंद व मोकळे रस्ते आणि सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असा ‘अनंतसृष्टी’ प्रकल्प गुंतवणूकदारांसाठीसुद्धा एक सुवर्णसंधी आहे. थोडक्यात, ‘अनंतसृष्टी म्हणजे निसर्ग व अत्याधुनिक सुखसोयी यांचा सुंदर मिलाफ आहे.
दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्सतर्फे ‘अनंतसृष्टी’ गृहप्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे शनिवारी उद्घाटन
मुंडेंच्या मृत्यूचा मुद्दा बनणार निवडणुकीचा मुद्दा?
मुंबई- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूबाबत केंद्र सरकारने मुंडेंच्या मृत्यूची चौकशी सीबीआयद्वारे केली पाहिजे अशी भूमिका राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी मांडली. ते म्हणाले , राज्याच्या लोकांत आजही अनेक शंका आहेत. ती शंका दूर करण्यासाठी व लोकांच्या भावनांची दखल घेत केंद्र सरकारने मुंडेंच्या मृत्यूची चौकशी सीबीआयद्वारे केली पाहिजे यामुळे मुंडेंच्या मृत्यूचा मुद्दा निवडणुकीचा मुद्दा बनणार काय याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
काँग्रेसने राष्ट्रवादीला देऊ केलेल्या 128 जागांबाबत पक्ष असमाधानी आहे. तसेच राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळालेच पाहिजे अशी जोरदार फटकेबाजीही पाटील यांनी केली. जयंत पाटील एका वृत्तवाहिनीवर बोलत होते.जयंत पाटील पुढे म्हणाले, काँग्रेसने राष्ट्रवादीला 128 जागा देऊ केल्या आहेत. त्यापेक्षा अधिक जागा दिल्या पाहिजेत. राष्ट्रवादीची राज्यात मोठी ताकद आहे. 2004 साली राज्यातील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी बनला. तरीही काँग्रेसला आम्ही आग्रहास्तव मुख्यमंत्री दिले. समविचार पक्षांनी एकत्र राहावे व धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आम्ही काँग्रेससोबत 15 वर्षापासून राहिलो. गेली 15 वर्ष काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा जो प्रस्ताव ठेवला आहे तो योग्य आहे. आताही काँग्रेससोबत आघाडी व्हावी अशी राष्टवादीची इच्छा आहे. मात्र काँग्रेस चर्चेलाच तयार नाही. चर्चा केली नाही तर प्रश्न कसा सुटणार आणि आमचे म्हणणे कसे पटवून सांगणार असे जयंत पाटील यांनी सवाल उपस्थित केला.
बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विसर्जन
पुणे: राष्ट्रीय कला अकादमी आणि सुयोग मित्र मंडळाच्या वतीने सर्वपित्री अमावस्येनिमित्त बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विधिवत पूजन करुन आज संगम घाटावर विसर्जन करण्यात आले.
बेवारस मृतदेह तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस ससूनच्या शवागारात ठेवता येत नाहीत, त्यानंतर कैलास स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत त्यांचे दहन केले जाते. अस्थींचे एक महिना जतन केले जाते. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांना मृतदेह ताब्यात मिळाला नाही, तरी किमान अस्थी मिळण्याची सोय होते. ओळख न पटलेल्या मृतदेहांच्या अस्थींचे दर महिन्याच्या अमावस्येला विसर्जन केले जाते. गेली तीन वर्षे हा उपक्रम सातत्याने सुरु आहे.
मंदार रांजेकर, विजय बढे, मुकेश खामकर, नीलेश राखुंडे, पराग कानिटकर, सदाशिव कुंदेल, अक्षय माने यांनी संयोजन केले. महापालिकेचे आरोग्य अधिकारी दत्तात्रय महाडीक, धर्मेंद्र लांडगे यांचे विशेष सहकार्य लाभले.
दिलीप वळसे पाटील उद्या भरणार उमेदवारी अर्ज
घटस्थापनेच्या मुहूर्तावर आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील गुरुवारी (दि. २५) घोडेगाव येथे दुपारी १ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी मंचर येथील बाजार समितीच्या आवारात सकाळी ११ वाजता जाहीर सभा होणार आहे. नेत्याचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गावोगाव मोढा (काम बंद) पाळून ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे जाहीर सभेसाठी आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत.
उद्या गुरुवारी सकाळी ९ वाजता अवसरी खुर्द येथे भैरवनाथ मंदिरात श्री काळभैरवनाथ देवाचे दर्शन घेऊन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यानंतर मंचर बाजार समितीच्या आवारात त्यांची जाहीर सभा होणार आहे. जाहीर सभेला जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांनी सभेसाठी जय्यत तयारी केली आहे. त्यादृष्टीने मोठय़ा संख्येने ग्रामस्थ सभेत आपल्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात मात्र पाण्याचा सुकाळ अनुभवलेले शेतकरी नेत्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहणार आहेतअसे कार्यकर्ते सांगत आहेत सभा संपल्यानंतर घोडेगाव येथे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ढोल, लेजीम, ताशे इत्यादी पारंपरिक वाद्यांच्या साक्षीने वाजत गाजत ते जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय आंबेगाव-शिरूर मतदारसंघात असणे शक्यच नाही, असा कार्यकर्त्यांचा दावा आहे
भयंकर पुरातही जन्माला आली ३५०० बालके
श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील भयंकर पुरामुळे २५0 लोकांचा बळी गेला असला तरी येथील सरकारी रुग्णालयांत अशा कठीण प्रसंगातही ३ हजार ५00 बालकांनी सुखरूप जन्म घेतल्याची सुखद माहिती पुढे आली आहे. ४ ते २0 सप्टेंबरदरम्यान काश्मीरच्या विविध रुग्णालयांत जवळपास २ हजार ३00 बालकांनी नैसर्गिकपणे, तर १ हजार २६0 बालकांनी शस्त्रक्रियेद्वारे जन्म घेतला, अशी माहिती अधिकार्यांनी दिली आहे. २0 सप्टेंबर रोजी संपलेल्या पंधरवड्यात संपूर्ण काश्मीर खोर्यातील जिल्हा रुग्णालयांत सुमारे ५ लाख ७७ हजार ५९५ रुग्ण आले होते. त्यातील ३४ हजार ६00 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी १ हजार ४३५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली, तर १ लाख ३ हजार १६0 रुग्णांची प्रयोगशाळा चाचणी करण्यात आली, असेही या अधिकार्याने स्पष्ट केले. पूरस्थितीदरम्यान स्थापन करण्यात आलेल्या १४५ वैद्यकीय शिबिरे स्थापन करण्यात आली. यापैकी ६२ शिबिरे श्रीनगरमध्ये लावण्यात आली होती.
रस्ते धोरणामुळे सिमेंट कंपन्यांची होणार भरभराट

नवी दिल्ली : देशातील सर्व प्रमुख रस्ते डांबराऐवजी सिमेंटचे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे देशात सिमेंटच्या मागणीत प्रचंड वाढ होवून सिमेंट कंपन्यांची भरभराट होणार आहे रेल्वे प्रकल्पाविषयी केंद्र सरकारने आपले धोरण बदलले आहे. सरकारच्या धोरणातील बदलामुळे देशातील सिमेंट कंपन्यांचे मात्र फावणार आहे. नव्या धोरणानुसार आता देशातील सर्व प्रमुख रस्ते डांबराऐवजी सिमेंटचे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे देशात सिमेंटच्या मागणीत प्रचंड वाढ होईल. या पार्श्वभूमीवर सिमेंट उत्पादन व्यवसायातील कंपन्यांची भरभराट होणार आहे. तसेच आता मान्सून देखील संपला असल्यामुळे सिमेंटच्या मागणीत वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. परिणामी, सिमेंट कंपन्यांचा नफा वाढण्याच्या अपेक्षेने त्यांचे शेअर्स वधारण्याची शक्यता आहे.
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ऐतिहासिक घोषणा करताना देशातील राष्ट्रीय राजमार्ग सिमेंटचे करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मजबूत, स्वस्त आणि टिकाऊ राजमार्ग मिळू शकतील. डांबराच्या तुलनेत सिमेंटचे हायवे २0-२५ टक्के स्वस्त असतील. गडकरी यांनी पर्यायी इंधनावर धावणार्या वाहनांच्या माध्यमातून पर्यावरण वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. अशा वेळी पाऊस लवकर समाप्त होण्याचे संकेत मिळाले असून देशात बांधकाम हंगाम लवकरच सुरू होऊन सिमेंटच्या मागणीत वाढ होणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासही वाव मिळणार आहे.
पुणे नवरात्रौ महोत्सव गुरुवार दि. २५ पासून

पुणे:
कला, संस्कृती, गायन, वादन आणि नृत्य यांचा मिलाफ असणार्या व पुणेकरांच्या नवरात्र महोत्सवाचे खास आकर्षण असणार्या ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’ला २५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती उपमहापौर व महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागूल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवानिमित्त यंदाचा श्री लक्ष्मीमाता कला संस्कृती पुरस्कार दै. पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे (पत्रकारिता), अभिनेते अनंत जोग (चित्रपट), प्रकाश मोहन मुलाबागल (उच्च शिक्षण), दीपाली सय्यद (लावणी), डॉ. नितीन बोरा (सामाजिक क्षेत्र), मोतीलाल निनारिया (सामाजिक) यांना प्रदान करण्यात येणार आहे. अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
महोत्सवाचे यंदा २0 वे वर्ष असून, येत्या गुरुवारी या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. महोत्सवाचे उद््घाटन गणेश कला क्रीडा मंच येथे दि. २५ रोजी सायं, पाच वाजता अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आ. उल्हास पवार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी खासदार सुरेश कलमाडी, आमदार मोहन जोशी, शरद रणपिसे, अभय छाजेड, कमल व्यवहारे, मनपा आयुक्त कुणाल कुमार आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
दहा दिवस चालणार्या या महोत्सवातील कार्यक्रमांची माहिती देताना बागूल म्हणाले की, घटस्थापनेच्या दिवशी सकाळी ७.३१ वाजता श्री लक्ष्मीमाता मंदिरात घटस्थापना होणार आहे. यावेळी मंदिराचे सुशोभिकरण फुलांच्या माळांनी व आक र्षक विद्युत रोषणाईने करण्यात येणार आहे. याच दिवशी विविध क्षेत्रांतील व्यक्तींना कला संस्कृती पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
महोत्सवाच्या आयोजनात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागूल, सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख राजेंद्र बागूल व राजेंद्र बडगे यांचा पुढाकार आहे. महोत्सवाच्या उद््घाटन समारंभाचे निवेदन सुधीर गाडगीळ करणार असल्याचे महोत्सवाचे सदस्य अमित बागूल नंदकुमार बानगुडे यांनी सांगितले.
कौशल्या रामचंद्र बिडकर यांचे अल्पशा आजाराने निधन
पुणे कॅम्प भागातील गवळी वाडा भागातील कौशल्या रामचंद्र बिडकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . त्या ९० वर्षांच्या होत्या . त्यांच्यामागे चार मुले , चार मुली , सुना , जावई , नातवंडे , पणतू असा परिवार आहे . त्यांच्यावर गंज पेठमधील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . भोपळे चौकातील रामकिसन डेअरीचे मालक हिरामण रामचंद्र बिडकर यांच्या मातोश्री होत्या व तसेच वृत्तपत्र छायाचित्रकार मनोज बिडकर यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या अंत्यसंस्कार समयी वीरशैव लिंगायत गवळी समाजबांधव आणि समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होते . (महेश जांभूळकर न्यूज )
पुणे जिल्हास्तरीय हज कमिटीच्या सदस्यपदी नदीम मुजावर यांची नियुक्ती
पुणे – पुणे जिल्हास्तरीय हज कमिटीच्या सदस्यपदी नदीम मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्रालयाचे मंत्री आरिफ (नसीम ) खान दिली .
नदीम मुजावर हे पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तसेच , महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष आहेत . या दोन्ही पदाच्या माध्यमातून त्यांनी अल्पसंख्याक समाजबांधवांचे प्रश्न सोडविले आहेत
हज यात्रेकरुंसाठी सर्वोपतरी मदत करणार , हज यात्रेकरूच्या समस्या सोडविणार असल्याचे त्यांनी आपल्या नियुक्तीनंतर सांगितले .
मुख्यमंत्रीपदापेक्षा जनतेचं प्रेम मला महत्त्वाचं……

“मला मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा नाही, “निवडणुकांच्या तोंडावर मला आशिर्वाद देण्यासाठी आणि शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी वारकरी ‘मातोश्री’वर आले.यांच्यासारख्यांचं प्रेम आणि आशिर्वाद हे माझ्यासाठी पुरेसे आहेत. मला मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा नाही”,मुख्यमंत्रीपदापेक्षा जनतेचं प्रेम मला महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले
महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी वारकऱ्यांच्या या शिष्टमंडळाने ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.यावेळी ते बोलत होते , ते म्हणाले ,सध्या प्रत्येकजण मुख्यमंत्रीपदासाठी लढताना दिसत आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा मुकुट माझ्या डोक्यावर नको,
अशी माझी इच्छा आहे. पण मी मुख्यमंत्री व्हावं, ही लोकांची इच्छा आहे. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान मानतो. त्यांचं हेच प्रेम माझ्यासाठी सर्वस्व आहे,
असंही उद्धव यांनी यावेळी नमूद केलं.“शिवसेना आणि वारकऱ्यांचा विचार एक आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेला पाठिंबा देत आहोत”, असं यावेळी वारकऱ्यांनी सांगितलं.
सत्य आणि चांगुलपणाचा ‘राखणदार’ २६ सप्टेंबर ला
देवाच्या इच्छेशिवाय एक पानही हलत नाही, इथपासून जगात खरंच देव आहे का, इथपर्यंत वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं आपल्या अवतीभवती बघायला मिळतात. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या न्यायाने देवाच्या अस्तित्वाचे पुरावे मागणारे नास्तिक असोत वा हवा जशी दिसत नाही, पण ती असते, तसाच देवही दिसत नाही, पण तो असतो, असं मानणारे आस्तिक असोत, दोघेही आपापल्या जागी योग्यच असतात. पण या प्रश्नांच्या गुंत्यापलिकडे जात एका प्रेमकथेच्या माध्यमातून देवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा अनोखा प्रयत्न निर्माता दिग्दर्शक डॅा. मृणालिनी पाटील यांनी ‘राखणदार’ या चित्रपटातून केला आहे.
‘कगार’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती आणि ‘मंथन एक अमृत प्याला’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केल्यानंतर डॅा. मृणालिनी पाटील यांनी ‘राखणदार’ची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते चित्रपटाच्या संगीताचं अतिशय थाटात अनावरण मुंबईत करण्यात आलं. त्याप्रसंगी चित्रपटातले प्रमुख कलावंत तसेच तंत्रज्ञ उपस्थित होते. यावेळी चित्रपटाच्या ट्रेलरचंही अनावरण करण्यात आलं.
सदानंद हा एक अतिशय साधा आणि प्रामाणिक मुलगा त्याच्या साधेपणामुळेच वारंवार अडचणीत सापडतो. अडचणीतून बाहेर पडण्याचे मार्गही त्याला गवसतात. पण प्रत्येक टप्प्यावर त्याच्याही नकळत एक दैवी शक्ती त्याला मदत करत असते. अर्थात तो तिला ओळखण्यात कमी पडतो. ती दैवी शक्ती वेळोवेळी त्याची सत्वपरीक्षाही घेते. अखेरीस सदानंदला या दैवी शक्तीची प्रचीती येते का, देवाला ओळखण्यात तो यशस्वी ठरतो का, हे ‘राखणदार’मध्ये बघायला मिळणार आहे.
आपण आयुष्यभर देव, देव करत राहातो, मंदिरांमध्ये देवाचा शोध घेत राहातो, पण अवचितपणे समोर येऊन उभ्या ठाकलेल्या देवाला ओळखण्यात मात्र कमी पडतो, हे ‘राखणदार’चं सूत्र आहे. अजिंक्य देव, जीतेंद्र जोशी, अनुजा साठे यांच्या प्रमुख भूमिका असून यतीन कार्येकर, सतीश पुळेकर, रवींद्र महाजनी, हंसराज जगताप आणि अनुप चौधरी यांनी त्यांना भक्कम साथ दिली आहे. आनंद मोरे लिखित या चित्रपटाचं छायालेखन जहांगीर चौधरी यांनी केलं असून फ. मु. शिंदे आणि प्रकाश राणे लिखित गीतांना कनकराज आणि समीर फातर्पेकर यांनी संगीतबद्ध केलं आहे.
‘राखणदार’ २६ सप्टेंबर रोजी राज्यभरात प्रदर्शित होत आहे.
प्रेमाची नवी परिभाषा उलगडणारा ‘बावरे प्रेम हे’ २६ सप्टेंबर रोजी
प्रेमकथा हा चित्रकर्त्यांना चिरंतन आव्हान देणारा विषय. प्रेमाचे विविध पैलू तपासून, त्याच्या विविध कंगो-यांचा धांडोळा घेण्याचे प्रयत्न वर्षानुवर्षे सुरू आहेत, मात्र तरीही प्रेम दशांगुळे उरतेच. त्यामुळेच प्रेम हा विषय सर्जनशील चित्रकर्त्याला सतत खुणावत असतो. म्हणूनच ‘लग्न पहावं करून’ या आपल्या पहिल्याच दिग्दर्शकीय प्रयत्नानंतर दिग्दर्शक अजय नाईक पुन्हा एकदा प्रेमाचा एक अनवट पैलू शोधू पाहाणारा ‘बावरे प्रेम हे’ हा संगीतमय प्रेमपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.
अनन्या शिरोडकर (उर्मिला कानेटकर-कोठारे) आणि नील राजाध्यक्ष (सिद्धार्थ चांदेकर) यांची ही प्रेमकहाणी गोव्याच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर हळुवारपणे उलगडते. प्रेमकथेला असतात तशीच अनपेक्षित वळणे याही कथेला आहेत. सोबत आहे ‘या प्रेमकथेचा शेवट आनंदी होणार की दुःखी’, हा लाखमोलाचा सवाल.
चित्रपटाची कथा अजयचीच असून पटकथा-संवाद चिन्मय केळकर आणि अजय नाईक यांचे आहेत. गोव्याचे सौंदर्य टिपले आहे छायालेखक सलील सहस्त्रबुद्धे यांनी. अजयनेच लिहिलेल्या गाण्यांना स्वरसाज चढवला आहे शंकर महादेवन, शान, बेला शेंडे, हृषिकेश रानडे आणि अपेक्षा दांडेकर यांनी. स्पृहा जोशीनेही यातील एक गीत लिहिले आहे. याशिवाय, ‘मार्गारेट्स थीम’ हा इन्स्ट्रुमेंटल पीस असून त्यात माउथ ऑर्गन, व्हॅायलीन व अॅकॅार्डियन यांचा समावेश आहे. ७२ वर्षांचे किशोर नाईक यांनी हल्ली क्वचित वापरले जाणारे माउथ ऑर्गन वाजवले आहे.
प्रेमकथेला सुमधूर संगीताची साथ असली की ती प्रेमकथा वेगळ्या उंचीवर जाते, अविस्मरणीय ठरते. संगीताची ही बाजू सांभाळली आहे स्वतः दिग्दर्शक अजय नाईक याने. ‘सतरंगी रे’, ‘लग्न पहावं करून’ नंतर तो पुन्हा एकवार संगीतकार म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे. मुंबईत अलिकडेच एका शानदार सोहळ्यात चित्रपटातील कलावंत व गायकांच्या उपस्थितीत चित्रपटाच्या संगीताचे अनावरण करण्यात आले.
ट्रायो एंटरटेनमेंट्स प्रस्तुत मैत्री प्रॅाडक्शन्स व शिवतारा एंटरटेनमेंट प्रॅाडक्शन या बॅनर्सअंतर्गत निलेश सिंग, निमेश रमेश देसाई, वीरेंद्र नरहरी चव्हाण, किशोर नाईक व जयदीप येओले यांनी ‘बावरे प्रेम हे’ची निर्मिती केली असून २६ सप्टेंबर रोजी हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होत आहे.
आई श्री तुळजाभवानीचे आशीर्वाद घेऊन काँग्रेस करणार प्रचाराचा शुभारंभ

तुळजापूर – कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानीचे आशीर्वाद घेऊन काँग्रेसच्या प्रचाराचा मंगळवारी (३० सप्टेंबर) तुळजापुरात शुभारंभ होणार असून, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उद्योगमंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आफ्रिका फिल्म फेस्टिवल मध्ये वीणा जामकर सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेत्री

‘इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ अफ्रिका’ (इफ्सा) या पुरस्कार सोहळ्यात मराठी अभिनेत्री वीणा जामकर यांना ‘टपाल’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘मैत्रेय मास मिडीया’ची पहिलीच निर्मिती अन् हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात सिनेमॅटोग्राफर ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन असलेला ‘टपाल’ हा चित्रपट प्रसिद्ध लेखक मंगेश हाडवळे यांच्या लेखनातून साकारलेला आहे. या चित्रपटात अभिनेत्री वीणा जामकर यांनी पोस्टमास्तरची पत्नी असलेली ‘तुळसा’ची भूमिका अतिशय कुशलतेने साकारली आहे. इफ्सा पुरस्काराच्या रुपाने त्यांच्या अभिनयकौशल्याचा गौरव झाला आहे. यासोबतच ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनाही ‘अस्तु’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एकूण 15 भारतीय भाषांमधील चित्रपटांना इफ्साचे पुरस्कार प्रदान केले जातात. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित केला जातो. यामध्ये ‘टपाल’ला मिळालेले यश मराठी चित्रपटसृष्टीसाठी गौरवास्पद आहे.
महाराष्ट्र म्हणजे भारताला समृध्दते कडे नेणारी भूमी -अभिनेता मुकेश तिवारी

साहित्य -संस्कृती -देशभक्ती अशा सर्वच पातळीवर महाराष्ट्र म्हणजे भारताला मिळालेली एक अमुल्य देणगी आहे जी भारताला समृद्धतेकडे नेत राहील असे प्रतिपादन येथे प्रसिध्द अभिनेता मुकेश तिवारी यांनी केले ऍड.उज्ज्वल निकम हि देखील महाराष्ट्रानेच भारताला दिलेली एक देणगीच आहे आणि त्यांच्या जीवनावरिल मराठी चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे असेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले . ‘आदेश – पॉवर ऑफ लॉ ‘ या मराठी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी तिवारी येथे आले होते त्यावेळी ते बोलत होते . हा चित्रपट मराठी त असला तरी नंतर तो तमिळ , तेलगु आणि बंगाली भाषेत हि डब करून प्रसारित केला जाणार आहे असे यावेळी लेखक आणि निर्माते संविधान आंग्रे यांनी सांगितले .
मुकेश तिवारी यावेळी बोलताना पुढे म्हणाले ,”महाराष्ट्राला संतांची भूमी आहे असे म्हटले जाते , येथेच साहित्य आणि संस्कृती या परंपरेचा मूळ स्त्रोत आहे भारतात कुठे हि नाही अशी येथे .चित्रपट आणि नाटक याबाबतची धोरणे राबविली जातात .हिंदी सिनेमाची देखील महाराष्ट्र हीच कर्मभूमी आहे . जुने चित्रपट ,नाटके , संगीत येथे कधी हि कालबाह्य होत नाही . कितीही खडतर अवस्था आली तरी त्यामुळे येथील रंगभूमी जिवंतच राहील रंगभूमी हाच सिनेमा सृस्तीचा आत्मा आहे सध्या शॉर्ट फिल्म मोठ्या संख्येने होत आहेत . फायदा -तोटा याचा विचार न करता चित्रपट -नाटक आणि रंगभूमी वेगाने पुढे जाते आहे येथील रसिकता च त्याला कारणीभूत आहे प्रशिक्षण घेवूनच अभिनय करावा किंवा या सृष्टीत उतरावे असे काही नाही इच्छ्याशक्ती मनापासून आहे तो येथे आज न उद्या यश प्रस्थापित करतोच करतो नाना पाटेकर -कमाल हसन हि उदाहरणे यासाठी देता येतील आज सिनेमा क्षेत्रात हि चांगले परिवर्तन मला जाणवते आहे पूर्वी मराठी सिनेमा २५ लाखात होत आता तो २ करोड च्या पुढे कधी सरकला हे समजले हि नाही प्रत्येकाची इमेज हि आता बदलते पूर्वी चित्रपटात एक -दोन विनोदी कलाकार असत , तसेच खलनायक असत आणि नायक असत , आता जो नायक आहे तोच कॉमेडीयन हि असू शकतो आणि तोच काह्ल्नायक हि असू शकतो लाईफ स्टाईल बदलते आहे तसा सिनेमाही बदलतो आहे आणि पारंपारिक दर्शक हि बदलतो आहे भोजपुरी सिनेमांवर मात्र यावेळी मुकेश तिवारी यांनी टीका केली केवळ आयटम सॉंग साठी पेट्रोल पंप विकून सिनेमा काढणारी प्रवृत्ती किती दिवस तग धरेल असे ते म्हणाले
ते पुढे म्हणाले ,1993 पासून शासनाचे विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहणाऱ्या उज्व्वल निकम यांनी दहशतवाद्यांविरुद्ध सन 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट खटला, कल्याण लोकल रेल्वे बॉम्ब स्फोट खटला, गेट वे ऑफ इंडिया व झवेरी बाजार बॉम्ब स्फोट खटला व नुकताच हॉटेल ताज, ओबेरॉय येथे झालेला दहशतवादी हल्ल्याचा पाक अतिरेकी अजमल कसाब यांचा खटला, वेगवेगळे संवेदनशील खटले अतिशय कर्तव्यदक्षपणे हाताळून भारतीय कायद्याचे आणि भारताचे रक्षण करण्याचेच काम केले आहे ऍड. निकम यांनी आतापर्यंत चालविलेल्या विविध खटल्यात एकूण 628 कुख्यात आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा तर 37 गुन्हेगारांना मृत्यू दंडाची शिक्षा झालेली आहे.ऍड. निकम यांनी यापूर्वी देखील एक डिसेंबर 10 ला संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा बैठकीत “दहशतवाद’ या विषयावर भारत सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठातर्फे (पुणे) माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते कायदा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डॉक्टरेट ही पदवी नुकतीच बहाल करण्यात आली आहे. तसेच त्यांना वेगवेगळ्या संघटनांमार्फत आतापर्यंत एकूण 65 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.आज आपल्यात नसलेल्या देशभक्तांवरील चित्रपटात मला कामे करण्याची संधी मिळाली पण आज हि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बनविलेल्या घटनेचे आणि त्याद्वारे भारताचेच प्रामाणिकपणे आणि कौशल्याने रक्षण करणाऱ्या उज्ज्वल निकामांवरील चित्रपटात वकिलाची भूमिका करण्याचे काम मला करण्याची संधी मिळाली याचा विशेष आनंद आहे . सह निर्माता दिनेश पुजारी , योगेश वणवे यांनी सांगितले कि संविधान आंग्रे यांनी या चित्रपटाच्या निर्मिती साठी काही वर्षे मेहनत घेतली . अशा प्रकारे सरकारी वकिलाच्या जीवनावर येणारा हा पहिलाच चित्रपट आहे दिवाळी पर्यंत तो प्रदर्शित करण्याचा आमचा प्रयत्न आहे काही मोजक्या खटल्यांचा यात समावेश करण्यात आला असून अवास्तववादाला टाळून तो करण्यात येतो आहे त्यामुळे ऐक्शन – थ्रिलर यांचा अति वापर येथे नसेल मात्र केसेस च्या कथानाकाप्रमाणे १ आयटम सॉंग आणि अन्य २ गाणी यात असतील ती अजून चित्रित व्हायची आहेत सुमारे ८० टक्के चित्रीकरण पूर्ण झाले आहे . दीपक सवाखंडे या चित्रपटाचे सहदिग्दर्शक असून सिनेमोटोग्राफी दिलीपकुमार डोंगरे यांची आहे अशोक शिंदे , अनंत जोग ,मिथिला नाईक , हेमंत वनारसे यांच्या यात भूमिका आहेत संविधान आंग्रे हे स्वतः उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारत आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची भूमिका प्रथमच पुण्यातील पत्रकार शरद लोणकर साकारीत आहेत





