‘नरेंद्र मोदी यांच्याविरोधात माझा राग नाही. असे सांगत उद्धव ठाकरे यांनी , त्यांना आम्ही संपूर्ण देश दिला. पण आता आमचा महाराष्ट्र आम्हाला देण्याची दिलदारी त्यांच्यात नाही. मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही साथ दिली. मात्र साथ दिल्यानंतरही ते जर अशी लाथ मारणार असतील, तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद कोणाच्या पाठीशी आहेत, ते महाराष्ट्र तुम्हाला दाखवून देईल’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.चहावाला पंतप्रधान झाला याचा आनंद आहे गुजरात दंगलीनंतर सारा देश मोदींच्या विरोधात गेला तेव्हा अडवाणी यांनी मुंबईत येवून बाळासाहेबांकडे विचारणा केली होती ‘ ये मोदी का क्या करे ?तेव्हा सेनेने त्यांची पाठराखण केली , नर्मदा सरोवर प्रकरणी एकट्या पडलेल्या मोदीला सेनेनेच साथ दिली होती . कोण होते मोदी ? असा सवाल करीत ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला उद्धव म्हणाले, शिवाजी महाराजांना संपवायला कुतुबशाह, निजामशाह, आदिलशाह आले. परंतु त्यांचे काय झाले ते सगळ्यांना ठाऊक आहे. (गर्दीतून अमित शहा यांचे नाव पुकारण्यात आले) उगाचच घाई करू नका. माझ्या तोंडून नको ते नाव येईल असे म्हणत त्यांनी अमित शहा यांचे नाव टाळले. मोदी लाट होती तर उत्तर प्रदेश, बिहारमध्ये भाजप का हरली?असा सवाल हि त्यांनी केला .
जागा ,जागा , काय करता , काय मागता? विधानसभेच्या सर्व २८८ जागा देतो आणि त्याबरोबर लोकसभेच्या ४८ जागाही आम्ही तुम्हाला देऊन टाकतो, पण … मात्र त्याअगोदर पाकिस्तान आणि चीनच्या ताब्यातील जागा घेऊन या. कर्नाटकमध्ये असलेला महाराष्ट्राचा भूभाग परत आणा. जागेची काय किंमत असते हे काश्मिरी पंडितांना विचारून पाहा.आणि सीमाभागातील मराठी बांधवांना जाऊन विचारा आणि मग निवडणुकीतील जागा मागा असेही ते म्हणाले .
(उद्धव ठाकरे यांच्या भाषणात अमिताभ बच्चन यांच्या ‘दिवार ‘या सिनेमाच्या संवादाचा बराच प्रभाव असावा असे जाणवले , ‘ जाओ पहले उस आदमी का साईन लावो … फिर मेरे भाई , तुम जिस कागज पार कहते हो उस पे साईन करुंगा … यावर हा भाषणातला मुद्दा होता तर , मेरे पास बंगला है , मोटार ही … क्या है तुम्हारे पास ? …मेरे पास शिव छत्रपती जीन्का आशीर्वाद है … ही स्टाईल त्यांच्या भाषणात जाणवली )
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती तुटल्यानंतर झालेल्या पहिल्याच जाहीर सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी त्यांचा पहिलाच वार अपेक्षेनुसार भाजपवर केला. ‘मोगलांच्या मस्तवाल हत्तीशी दोन हात करणारे मावळे जसे शिवरायांकडे होते, तसेच महाराष्ट्रावर चालून येणाऱ्या मस्तवाल हत्तींच्या सोंडा कापून त्यांना परत पाठविण्यास शिवसेना समर्थ आहे’ या शब्दांत भाजपला लक्ष्य करीत त्यांच्याविरोधात उद्धव यांनी रणशिंग फुंकले. ‘शिवसेना-भाजप युती तोडण्यास मी कारणीभूत नसलो तरीही मला महाराष्ट्राने माफ करावे. महाराष्ट्राला दिलेल्या वचनाला शिवसेना जागणार असून, लाट काय असते ते शिवसेना दाखवून देईल. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आणून दाखवेन’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ महालक्ष्मी रेसकोर्स येथे शनिवारी वाढवण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतच्या वाटाघाटींचा लेखाजोखा सर्वांपुढे मांडला. ‘युती तोडण्याचे भाजपने बहुदा आधीच ठरवले होते. युती टिकविण्याचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला; मात्र अधिकच्या ३५ जागा मागितल्या जात असतील तर त्या देणे कुणालाही अशक्यच ठरले असते. मी माझ्या आणि त्यांच्या वाट्याच्या १९ जागा सोडल्या होत्या. मात्र त्याउपर जागा सोडणे शक्य नव्हते’, असे उद्धव म्हणाले. ‘शिवसेनेने घाम गाळून, प्रसंगी रक्त आटवून ज्या जागा आजवर मिळवल्या, टिकवल्या त्या सहजासहजी द्यायला आम्ही काय जागांचे गोडाऊन काढले आहे का? भूमिपुत्रांच्या आणि हिंदूंच्या रक्षणासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. भाजपने हिंदुत्वाची युती तोडली आहे, त्यांना हिंदू कधीही माफ करणार नाही’, अशी तोफही त्यांनी डागली.
‘बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी रामदास आठवले यांना माझे जाहीर आवाहन आहे. सगळेच मित्रपक्ष पळून गेले आहेत. माझ्याकडे आत्ता आहे तो विश्वास’, असे म्हणत रामदास आठवले यांना उपमुख्यमंत्रिपदाची जाहीर ऑफर उद्धव यांनी पुन्हा दिली.
मुंडे-महाजन यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध होते आणि ते पुढेही राहतील. पंकजाला मी बहीण मानले असून एक भाऊ म्हणून मी तिच्याविरोधात कसा लढणार? त्यामुळे पंकजा आणि प्रितम मुंडे यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार देणार नाही, असे उद्धव यांनी यावेळी जाहीर केले.( मात्र या संपूर्ण भाषणात त्यांनी आपला भाऊ राज ठाकरे यांचा नामोल्लेख अगर साधा स्पर्श हि म न से ला केला नाही)
विरोधकांचा समाचार घेताना, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मला अनुभव नसल्याचे सांगताहेत. मग तुम्हाला अनुभव असताना फायली का नाहीत हलल्या, असा टोला उद्धव यांनी लगावला. भ्रष्टाचार करण्याचा वा कामच न करण्याचा अनुभव मला नसेल तर हे चांगलेच आहे. मंगळावर यान गेल्यानंतर तिथले फोटो प्रसिद्ध झाले आहेत. आपल्याकडच्या शरद पवारांनी तिथेही कदाचित आधीच जमिनी घेऊन ठेवल्या असतील, असा चिमटा त्यांनी काढला.
युती तुटल्याचे सांगण्याची जबाबदारी एकनाथ खडसे यांच्यावर देण्यात आली. त्यावर मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचा खडसे यांनी प्रयत्न केला. मात्र आम्ही मांजर नसून वाघ आहोत. २५ वर्षे मैत्री केली असली तरी या वाघाचे मांजर झालेले नाही. तुम्ही जी घंटा गळ्यात बांधलीत, ती अख्ख्या महाराष्ट्रात नेऊन हिंदूंचा काय घंटानाद असतो, ते तुम्हाला दाखवून देऊ, असे उद्धव म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एक ऑडिओ कॅसेट काढण्यात आली असून त्यात शिवसेनेला विजयी करण्याचा संदेश देण्यात आला आहे. ही कॅसेट भाषणाच्या शेवटी सर्वांना देत उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना वचनबद्ध केले.
मुख्यमंत्रीपदासाठी मी युती तोडली असे आता कोणी म्हणेल, पण मग तुम्ही ज्या जागा वाढवून मागत होतात, त्या मंत्रालयात सागरगोट्या की लगोऱ्या खेळण्यासाठी अशा शब्दांत त्यांनी भाजपचे नाव न घेता उद्धव यांनी तोफ डागली. मी उगाच खुर्चीची स्वप्ने पाहत नाही, मात्र मी जबादारीपासून पळतही नाही. शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील मायबाप जनतेच्या मदतीने मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आणून दाखवेनच. पूर्ण बहुमताने सत्ता आली, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस म्हणेल त्या बालेकिल्ल्यात मी उभा राहीन आणि निवडून येईन, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले शिवसेनेने हिंदुत्वाची कास कधीही सोडली नाही. मुंबईत दंगली पेटल्यानंतर आम्ही गुजराती, मारवाडी, जैन वा मराठी-अमराठी असा वाद केला नाही, प्रत्येकाला आम्ही मदत केली. शिवसेना रस्त्यावर मदतीसाठी उतरली, तेव्हा बाकीचे कुठे गेले होते, असा सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्र कधीच दिल्लीसमोर झुकणार नाही …
गेली २५ वर्षे राज्याच्या राजकारणात नैसर्गिक मित्रपक्ष असलेल्या व आता विधानसभेच्या तोंडावर वेगळा घरोबा करणाऱ्या भारतीय जनता पक्षावर शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनीही शनिवारी चौफेर टीकेची झोड उठवली. ‘महाराष्ट्र कधीच दिल्लीसमोर झुकला नाही, त्यामुळे भाजपने आम्हाला दिल्लीची मिजास दाखवू नये,’ असा खणखणीत इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.
युतीतून स्वतंत्र झाल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रचारसभा शनिवारी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. मात्र तत्पूर्वी शिवसेनेच्या इतर नेत्यांनी आपल्या भाषणात भाजपची ‘कमळाबाई’ अशी निर्भर्त्सना करत त्यांच्या फुटीच्या भूमिकेवर कठोर टीका केली. ‘आमचे आजपर्यंत मिशन १५० होते, आता २५० असेल. जिथे भगवा आहे तेथे छत्रपती आहेत. महाराजांचा महाराष्ट्र इकडे तिकडे जाणार नाही. आम्हाला दिल्लीची मिजास दाखवू नका, महाराष्ट्राने औरंगजेबासारख्या दिल्लीश्वराला पाणी पाजले आहे,’ असे खासदार संजय राऊत यांनी भाजपला ठणकावून सांगितले. ‘आजपर्यंत आम्ही हमाली केली, यापुढे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकरणार नाही,’ असा इशाराही राऊत यांनी दिला.
२५ वर्षांच्या संसारातून आता कमळाबाई निघून गेली आहे. पण सौभाग्य आमच्याकडे आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरच्या लढाईत विजय शिवसेनेचाच होईल, असे म्हणत राऊत यांनी कमळाबाईबरोबर शिवसेनेची अडीच दशकांची युती नव्हती, ते लफडं होतं, या शब्दात भाजपवर हल्ला चढवला. कर्माने मरणाऱ्यांना धर्माने मारण्याची गरज नाही. यापुढे महाराष्ट्राचे राज्य मातोश्रीवरून चालेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीश्वरास मुजरा करणाऱ्यांतला महाराष्ट्र नाही. दिल्लीने अनेकदा महाराष्ट्र वार केले. या वेळी आमच्याकडे बाळासाहेबांच्या पुण्याईचे बख्तर आहे. आगामी निवडणुकीत शिवसैनिक विरोधकांचा मतरुपी वाघनखाने कोथळा बाहेर काढतील, असा आशावाद शिवसेनेचे उपनेते व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौर स्नेहल आंबेकर यांचेही या वेळी भाषण झाले.
महाराष्ट्र आमचाच …. उद्धव ठाकरे
विधानसभेसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी
जुन्नर – गणपत फुलवडे
आंबेगाव – संध्या बानखेले
खेड-आळंदी – वंदना सातपुते
शिरूर – अरविंद ढमढेरे
दौंड – पोपटराव ताकवणे
बारामती – अॅड आकाश मोरे
पुरंदर – संजय जगताप
मावळ – किरण गायकवाड
चिंचवड – कैलास महादेव कदम
पिंपरी – मनोज कांबळे
भोसरी – हनुमंतराव भोसले
वडगावशेरी – चंद्रकांत छाजेड
पर्वती – अभय छाजेड
कोथरुड – उमेश कंधारे
हडपसर – बाळासाहेब शिवरकर
इंदापूर- हर्षवर्धन पाटील
भोर – संग्राम धोपटे
शिवाजीनगर- विनायक निम्हण
पुणे छावणी- रमेश बागवे
कसबा पेठ -रोहित टिळक
धुळे ग्रामीण – कुणाल पाटील
भुसावळ – पुष्पा सोनावणे
काटोल – दिनेश ठाकरे
हिंगणा – कुंदा राऊत
उमरेड – संजय मेश्राम
यवतमाळ – राहुल ठाकरे
किनवट – नामदेव केशवे
मालेगाव बाह्य – डॉ राजेंद्र ठाकरे
सिन्नर – संपतराव काळे
उल्हासनगर – प्रकाश कुकरेजा
श्रीवर्धन – उदय काटे
अकोले – सतीश भांगरे
कोपरगाव – नितीन औताडे
नेवासा- दिलीप वाघचौरे
शेवगाव – अजय रक्ताटे
राहुरी – अमोल जाधव
पारनेर – डॉ. भास्करराव शिरोळे
श्रीगोंदा – हेमंत ओगले
कर्जत-जामखेड – किरण पाटील
गेवराई – सुरेश हत्ते
माजलगाव – सर्जेराव काळे
बीड – सिराज देशमुख
केज – अंजली घाडगे
परळी – राजेसाहेब देशमुख
अहमदपूर – विठ्ठलराव मखने
माढा – कल्याण काळे
कणकवली – नितेश राणे
कागल – संतान बारदेसकर
नंदुरबार- कुणाल वासवे
धुळे शहर- साबीर शेख
चोपडा- ज्ञानेश्वर भडाळे
जळगाव शहर- राधेश्याम चौधरी
जळगाव ग्रामीण- दिलीप गणपतराव पाटील
अमळनेर – गिरीश पाटील
एरंडोल – डॉ. प्रविण वाघ
चाळीसगाव – अशोक हरी खलाने
पाचोरा – प्रदीपराव पवार
मुक्ताईनगर – योगेंद्र पाटील
मलकापूर – डॉ. अरविंद वासूदेव कोलते
सिंधखेड राजा – प्रदीप नगरे
मेहकर – लक्ष्मणराव घुमारे
जऴगाव (जमोड) – राम विजय बुरंगऴे
अकोला पश्चिम – उषा जगदिशसिंग विरक
अकोला पूर्व – डॉ. सुभाषचंद्र कोरपे
मूर्तीजापूर – शवन शेकुजी इंगळे
वाशिम – सुरेश इंगळे
कारंजा – ज्योती गणेशपुरे
वडनेरा – सुलभा संजय खोडके
अमरावती – आर. डी. शेखावत
दर्यापूर – सिद्धार्थ पांडुरंद वानखेडे
मोर्शी – नरेशचंद्र ठाकरे
हिंगणघाट – उषा अरुण थुटे
वर्धा – शेखर शेंडे
कामथी – राजेंद्र मुळक
भंडारा – युवराज वासनिक
अर्जुनी-मोरगाव – राजेश नंदगवळी
तिरोरा – पी जी कटारे
अहेरी – मुक्तेश्वर गावडे
चंद्रपूर – महेश मेंढे
बल्लारपूर – घनश्याम मुलचंदानी
वरोरा – डॉ. आसावरी देवतळे
दिग्रस – देवानंद पवार
अरणी – शिवाजीराव मोघे
पुसद – सचिन नायक
लोहा – डॉ. श्याम तेलंग
नायगाव – वसंतराव चव्हाण
वसमत – अब्दुल हफीज अब्दुल रेहमान
परभणी – खान इरफान उर रेहमान
गंगाखेड – हरीभाऊ शेळके
पाथरी – सुरेश वरपुडकर मोरे
कर्जत – शिवाजी खरीक
महाड – माणिक जगताप
आष्टी – मिनाक्षी पाटील
उदगीर – रामकिसन सोनकांबळे
उस्मनाबाद – विश्वास शिंदे
परांडा – प्रशांत छेडे
करमाऴा – जयवंतराव जगताप
बार्शी – सुधीर गाडवे
मोहोळ – गौरव खरात
पंढरपूर – भारत भालके
माळशिरस – राजेश गुजर
सांगोला – जगदीश बाबर
फलटण – दिगंबर अवघडे
वाई – मदन भोसले
कोरेगाव – विजयराव कणसे
माण – जयकुमार गोरे
कराड उत्तर – धैर्यशील कदम
पाटण – हिंदुराव पाटील
सातारा – रजनी दिपक पवार
दापोली – सुजीत झिम्हण
गुहागर – संदीप सावंत
चिपळूण – रश्मी कदम
रत्नागिरी- रमेश कीर
सावंतवाडी- चंद्रकांत गावडे
चंदगड- भरमु पाटील
राधानगरी- बजरंग देसाई
शाहुवाडी- करणसिंग गायकवाड
मिरज- सिद्धेश्वर जाधव
इस्लामपूर – जितेंद्र पाटील
शिराळा- सत्यजीत देशमुख
तासगाव-कवठे महांकाळ- सुरेश शेंडगे
जत – विक्रमसिंग सावंत
घनसावंगी- संजय पाटील
बदनापूर- सुभाष मगरे
भोकरधन- सुरेश गवळी
कन्नड- नामदेवराव पवार
औरंगाबाद मध्य- एम एम शेख
पैठण- रविंद्र काऴे
गंगापूर- शोभाताई खोसरे
नांदगाव- अनिलकुमार आहेर
बागलान- जयश्री बरडे
कळवण- बी के गांगुर्डे
चांदवड- शिऱीषमल कोतवाल
येवला- निवृत्ती लहरे
निपड- राजाराम पानगव्हाणे
दिंडोरी- रामदास चरोसकर
नाशिक पूर्व- उद्धव निमसे
नाशिक पश्चिम- दशरथ पाटील
देवळाली- गणेश उनावणे
डहाणू- रमेश पडवळे
विक्रमगड- अशोक पाटील
भोईसर- भुपेंद्र मडवी
नालासोपारा- अशोक पेंढारी
भिवंडी ग्रामीण- सचिन शिंगदा
शहापूर- पद्माकर केवारी
भिवंडी पूर्व- अन्सारी मोहम्मद फाजील
कल्याण पूर्व- विजय मिश्रा
कल्याण पश्चिम- सचिन पोटे
मुरबाड- राजेश घोलप
कमलाकर सुर्यवंशी
डोंबिवली- संतोष केणी
कल्याण ग्रामिण- शारदा पाटील
मिरा भाईंदर- याकुब कुरेशी
कोपरी-पाचपखाडी- मनोज शिंदे
मुंब्रा-कळवा- यासीन कुरेशी
अक्कलकुवा – अॅड. के. सी पाडवी
शहादा – पद्माकर वळवी
नवापूर – सुरुपसिंग नाईक
साखरी – धनाजी अहिरे
शिंदखेडा – श्यामकांत सनेर
शिरपूर – काशिराम पवार
रावेर – शिरीष चौधरी
जामनेर – ज्योत्स्ना विसपुते
बुलडाणा – हर्षवर्धन सपकाळ
चिखली – राहुल बोंद्रे
खामगाव – दिलीपकुमार सानंदा
अकोट – महेश गणगणे
बाळापूर – सय्यद खतीब
रिसोड – अमित झणक
धामनगाव रेल्वे – विरेंद्र जगताप
तिवसा – अॅड. यशोमती ठाकूर
मेळघाट – केवलराम काळे
अचलपूर – अनिरुद्ध देशमुख
आर्वी – अमर काळे
देवळी – रणजीत कांबळे
सावनेर – सुनील केदार
नागपूर दक्षिण-पश्चिम- प्रफुल्ल गुडदे
नागपूर दक्षिण – सतिश चतुर्वेदी
नागपूर पूर्व – अभिजीत वंजारी
नागपूर मध्य – डॉ. अनिस अहमद
नागपूर पश्चिम- विकास ठाकूर
नागपूर उत्तर – डॉ. नितीन राऊत
रामटेक – सुबोध मोहिते
तुमसर – प्रमोद तितीरमारे
साकोली – सेवक वाघये
गोंदिया – गोपालदास अग्रवाल
आमगाव – रामरत्न बापू राऊत
आरमोरी – आनंदराव गेडाम
गडचिरोली- सगुणा ताळंदी
राजुरा – सुभाष धोटे
ब्रम्हपुरी- विजय वडेट्टीवार
चिमूर- अविनाश वार्जुरकर
वणी- वामनराव कासावार
राळेगाव- प्रा. वसंत पुरके
उमरखेड – विजयराव खडसे
हदगाव – माधवराव पवार
नांदेड उत्तर – डी. पी. सावंत
नांदेड दक्षिण – ओमप्रकाश पोखर्णा
देगलूर – रावसाहेब अंतापूरकर
मुखेड – हणमंतराव पाटील
कळमनुरी – संतोष तारफे
हिंगोली – भाऊराव पाटील
जिंतूर – रामप्रसाद बोर्डीकर
जालना – कैलास गोरंट्याल
सिल्लोड- अब्दुल सत्तार
फुलंब्री -कल्याण काळे
औरंगाबाद पश्चिम -जितेंद्र देहाडे
औरंगाबाद पूर्व – राजेंद्र दर्डा
वैजापूर- दिनेश परदेशी
मालेगाव मध्य -शेख असिफ शेख रशीद
नाशिक मध्य – शाहू खैरे
इगतपुरी – निर्मला गावित
पालघर – राजेंद्र गावित
वसई- मायकल फुर्ताडो
भिवंडी पश्चिम – शोएब खान
ओवळा माजिवडा – श्रीमती प्रभात पाटील
ठाणे – नारायण पवार
दहीसर- शीतल अशोक म्हात्रे
मुलुंड- चरणसिंह सप्रा
जोगेश्वरी पूर्व – राजेश शर्मा
दिंडोशी – राजहंस सिंह
चारकोप – भारत पारेख
मालाड पश्चिम – अस्लम शेख
वर्सोवा- बलदेव शेखा
अंधेरी पश्चिम- अशोक जाधव
अंधेरी पूर्व- सुरेश शेट्टी
विले पार्ले-कृष्णा हेगडे
चांदिवली- नसिम खान
घाटकोपर पश्चिम -प्रविण छेडा
चेंबूर- चंद्रकांत हंडोरे
कलिना- कृपाशंकर सिंह
वांद्रे पश्चिम- बाबा सिद्दीकी
वांद्रे पूर्व – संजीव बागाडी
धारावी – वर्षा गायकवाड
माहिम – प्रविण नाईक
वरळी – दत्ता नवघरे
शिवडी – मनोज जामसूतकर
शीव-कोळीवाडा- जगन्नाथ शेट्टी
वडाळा- कालीदास कोळंबकर
भायखळा – मधुकर चव्हाण
मलबार हिल- सुशीबेन शहा
मुंबादेवी -आमिन पटेल
कुलाबा -अॅनी शेखर
उरण- महेंद्र घरत
पेण- रविंद्र पाटील
अलिबाग -मधुकर ठाकूर
संगमनेर – बाळासाहेब थोरात
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
श्रीरामपूर- भाऊसाहेब कांबळे
अहमदनगर शहर-सत्यजीत तांबे पाटील
लातूर ग्रामीण-धीरज देशमुख
लातूर शहर-अमित देशमुख
निलंगा-अशोक पाटील निलंगेकर
औसा-बसवराज पाटील
उमरगा-किसन कांबळे
तुळजापूर-मधुकरराव चव्हाण
सोलापूर उत्तर- विश्वनाथ चाकोते
सोलापूर मध्य- प्रणिती शिंदे
अक्कलकोट- सिद्धाराम म्हेत्रे
सोलापूर दक्षिण-दिलीप माने
कराड दक्षिण-पृथ्वीराज चव्हाण
राजापूर- राजेंद्र देसाई
कुडाळ- नारायण राणे
कोल्हापूर दक्षिण -सतेज पाटील
कोल्हापूर उत्तर -सत्यजीत कदम
करवीर-पी एन पाटील
इचलकरंजी -प्रकाश आवाडे
शिरोळ -सा रे पाटील
हातकणंगले- जयवंत आवळे
सांगली – मदन पाटील
पलूस – पतंगराव कदम
खानापूर – सदाशिवराव पाटील
हृदयनाथ मंगेशकरांना ‘महर्षी ‘ पुरस्कार
पुणे नवरात्रो महोत्सवात ख्यातनाम संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला , आ वंदना चव्हाण , उपमहापौर आणि महोत्सवाचे आयोजक आबा बागुल आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते
भोंडल्यात रंगल्या ‘आजीबाई’

पुणे, ता. 27 : ‘ऐलमा पैलमा गणेश देवा…’, ‘श्रीकांता कमल कांता….’, ‘कार्ल्याचा वेल लाव सुने…..’ अशा वर्षानुवर्षे चालत आलेल्या भोंडल्याच्या गाण्यांवर फेर धरताना ‘निवारा’ वृध्दाश्रमातील निराधार महिला रंगून गेल्या होत्या. निमित्त होत सुयोग मित्र मंडळ व चतु:शृंगी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या ‘आजीबाईंचा भोंडला’ या कार्यक्रमाचे. लहानपणच्या आठवणींच्या स्मरणरंजनात त्या हेलावून गेल्या होत्या. त्यांनी फुगडया घातल्या आणि झिम्मा खेळण्याचा आनंदही लुटला. देवीच्या दर्शनानंतर त्यांच्या चेहऱ्यावर कृतार्थतेची भावना होती. अपर्णा अनगळ, दीपा सुपेकर, अश्विनी आदवडे, पल्लवी शर्मा यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
स्थानिकांना विश्वासात न घेता सरकारने विकास आराखडा लादला -गिरीश बापट
पुणे: आमच्याकडे सत्ता दिल्यास आम्ही शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबवून शहर विकासाला गती देण्याचे काम करू त्यातून मोठ्या प्रमाणात रहिवाशांचा त्रास कमी होईल. रस्ते रुंदीकरण व विकास आराखड्याच्या नावाखाली आघाडी सरकारने सामान्याच्या घरांची पाडापाड केली आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता सरकारने विकास आराखडा लादला असल्याने रहिवाशांच्या समस्यात व प्रश्नात भर पडली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाला निवडून द्या, असे आवाहन आज कसबा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचार पदयात्रे दरम्यान काढले.
कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी आज आपल्या प्रचाराचा पदयात्रा काढून शुभारंभ केला. भारतीय जनता पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यासोबत सकाळी दहा वाजता कसबा पेठ भागातील सूर्या हॉस्पिटलपासून या पदयात्रेला सुरवात झाली. त्यानंतर पवळे चौकातून मुस्लिम बहुल भाग दर्गा रोड, कागदी पुर्यात जाऊन गिरीश बापट यांनी मुस्लिम समाजाच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर भोई आळी, सात तोटी चौक, तांबट आळी, शिंपी आळी, झांबरे चावडी, गावाकोस मारुती आळी भागात घराघरात जाऊन बापट यांनी रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. गल्ल्या-वस्त्याचा दौरा करून मतदारांशी गप्पा मारल्या, तसेच, या ‘रोड शो’ मध्ये प्रत्येकाला व्यक्तीगत भेटून व हस्तांदोलन करून स्थानिकांशी बापट यांनी संवाद साधला. रविवार पेठेतील शनि मारुती मंदीराजवळ पदयात्रेचे समापन करताना स्थानिकांचे प्रश्न समजून घेऊन आपल्या भागाच्या व पुण्याच्या विकासाठी भाजपाला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या पदयात्रेत मोठ्या संख्येने महिला व युवक सहभागी झाले होते.
यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश ऐनपुरे, संजयमामा देशमुख, छगन बुलाखे, आनंद मालेगांवकर, विजय मरळ, भारत निजामपूरकर, अरविंद कोठारी, सतीश निजामपूरकर, दादा खत्री, प्रमोद कोंढरे, दीपक पोटे, राजेश परदेशी, प्रभागाचे अध्यक्ष गणेश पाचेरकर, योगेश समेळ, सुहास कुलकर्णी, पुष्कर तुळजापूरकर, अभय जगताप, देवा जांभुळकर, नामदेव माळवदे, अमित कंक, प्रशांत मुंदडा, शेखर नायडू, निलेश वैराट, नितीन पंडीत, बापू नाईक, संजय तिकवणे, निलेश कदम, महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभाताई गोखले, शाबाना देशपांडे, सीमा जांभुळकर, चारू शिंदे, क्रांती खंडारे, वर्षाताई धोंगडे, मृणाल घोळे, कल्पनाताई जाधव आदी उपस्थित होते
बिस साल बाद … २८ किलो सोने, ८९६ किलो चांदी, १० हजारहून अधिक साड्या, ७५० चपलांचे जोड, ९१ महागडी घड्याळांनी नेले कारागृहात ….
ए . राजा , कानिमोळी , लालूप्रसाद यादव , कलमाडी नंतर आता जयललिता ….
————————————————————-
१९९१ ते १९९६ या कालावधीत त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कारकीर्दीत ज्यांच्याकडे साडेसहासष्ट कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली होती. त्यात २८ किलो सोने, ८९६ किलो चांदी, १० हजारहून अधिक साड्या, ७५० चपलांचे जोड, ९१ महागडी घड्याळे सापडली होती. या बेहिशोबी मालमत्तेबद्दल १९९६ मध्ये तमिळनाडू सरकारच्या दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.मुख्यमंत्रिपदावर असताना (त्यावेळेची किंमत ६६.कोटी ६५ लाख )रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना बेंगलोर विशेष न्यायालयाचे न्यायाधिश जॉन मायकल डिकुन्हा यांनी दोषी ठरविलेअसून चार वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार असून, आमदारकीचाही राजीनामा द्यावा लागेल.
तब्बल १८ वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला. या निकालामुळे जयललितांचा पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. पंरतु तामिळनाडूतील विरोधी पक्ष डीएमकेचे कार्यकर्ते मात्र आनंदला असून, त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून राज्यभर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यत आली आहे. जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन, त्यांची पुतणी इलावारसी आणि जयललिता यांचा दत्तकपुत्र सुधाकरन यांच्यावरही या प्रकरणात आरोप आहेत. विशेष न्यायाधीश जॉन मायकेल डिकुन्हा यांनी हा निर्णय जाहीर केला.
तमिळनाडूत हा खटला नि:पक्षतेने चालणार नाही ही शक्यता लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने तो चेन्नईहून बंगळुरू येथील विशेष न्यायालयात वर्ग केला होता. कोणाही राजकीय पुढाऱ्याविरुद्ध दीर्घकाळ चाललेला पहिलाच खटला असावा. यादरम्यान देशाने पाच लोकसभा निवडणुका पाहिल्या तर तामिळनाडूने तीन विधानसभा निवडणुकांना तोंड दिले. एवढ्या प्रदीर्घ काळात हा खटला चालविणारे डिकुन्हा हे पाचवे न्यायाधीश आहेत.
निकालामुळे जयललिता यांच्या राजकीय भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याआधी २००१ मध्ये ‘तानसी’ म्हणून ओळखल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात जयललिता यांना दोषी ठरविले होते. तेव्हा दोषी व्यक्तीने मुख्यमंत्रिपदावर राहणे योग्य नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. मात्र पुढे त्या निकालास स्थगिती मिळाली व त्यांचा राजकीय विजनवास टळला होता. (१९९६ मधील फोटो या बातमी साठी वापरला आहे )
अभिनेता मंगेश देसाई ला ‘राजवाडा ‘ भोवला ?
अनेक गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या सुपर पॉवर कंपनीच्या दीपक पारखेने मराठी चित्रपट अभिनेते मंगेश देसाई यांचीही सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पारखेने निर्माण केलेल्या ‘राजवाडा’ या चित्रपटाचे सहा लाख रुपये मानधन त्याने दिलेच नाही. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (२६ सप्टेंबर) देसाई यांचा जबाब नोंदवला.
मंगेश देसाई ने तक्रार स्वतः हून नोंदविली कि पोलिसांनी त्याच्याकडे याबाबत विचारणा केली आणि त्यानंतर त्याचा जबाब नोंदविला गेला याबाबत काही माहिती मिळू शकली नाहीसुपर पॉवर कंपनीतील घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी दीपक पारखे याने घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी ‘राजवाडा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिनेते मंगेश देसाई यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटासाठी देसाई यांचे मानधन आठ लाख रुपये ठरले होते. त्यापैकी एक लाख रुपये चेकद्वारे, पन्नास हजार रोख व चाळीस हजार त्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात आले. उर्वरित सहा लाख दहा हजार रुपयाचे चेक त्यांना देण्यात आले आहेत. हा चित्रपट २७ दिवस चित्रीकरण करून पूर्ण करण्यात आला. मात्र त्यांना देण्यात आलेले चेक बाऊंस झाले आहेत. इतर गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे. त्या अनुषंगाने मंगेश देसाई यांचा जबाब नोंदवल्याची माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.
विधानसभेचे भाजप उमेदवार
(पुणे जिल्हा)
शिरूर : बाबूराव पाचर्णे,
बारामती : बाळासाहेब गावडे,
पुरंदर : संगीता राजे निंबाळकर,
मावळ : आ. संजय भेगडे,
चिंचवड : लक्ष्मण जगताप,
पिंपरी : अमर साबळे,
वडगाव शेरी : जगदीश मुळीक ,
कोथरूड : प्रा. मेधा कुळकर्णी,
खडकवासला : आ. भीमराव तापकीर,
पर्वती : आ. माधुरी मिसळ,
हडपसर : योगेश टिळेकर,
पुणे (कॅन्ट.) : दिलीप कांबळे,
कसबापेठ : आ. गिरीश बापट,
खेड-आळंदी – शरद बुट्टे-पाटील
भोर- शरद ढमाले
(मुंबई व परिसर)
बोईसर : जगदीश धुडी,
नालासोपारा : राजन नाईक,
भिवंडी (ग्रामीण) : सीताराम पाटील,
शहापूर : अशोक एर्नक,
भिवंडी (पूर्व) : संतोष शेट्टी,
मुरबाड : किसन काथोरे,
उल्हासनगर : आ. कुमार इयलानी,
डोंविवली : आ. रवींद्र चव्हाण,
मीरा-भाईंदर : नरेंद्र मेहता,
मुंब्रा-कळवा : अशोक भोईर,
बेलापूर : मंदा म्हात्रे,
बोरीवली : आ. विनोद तावडे,
दहिसर : मनीषा चौधरी,
नागोठाणे : हेमेंद्र मेहता,
मुलुंड : आ. सरदार तारासिंग,
जोगेश्वरी (पूर्व) : उज्ज्वला मोडक,
दिंडोशी : मोहीत कांबोज,
कांदिवली (पूर्व) : अतुल भातखळकर,
चारकोप : आ. योगेश सागर,
मालाड (पश्चिम) : डॉ. राम बारोट,
गोरेगाव : विद्या ठाकूर,
अंधेरी (पश्चिम) : अमित साटम,
अंधेरी (पूर्व) : सुनील यादव,
विलेपार्ले : ऍड. पराग अळवणी,
चांदीवली : सीताराम तिवारी,
घाटकोपर (पश्चिम) : आ. राम कदम,
घाटकोपर (पूर्व) : आ. प्रकाश मेहता,
अणुशक्तीनगर : संदीप आसोलकर,
कुर्ला : विजय कांबळे,
कलिना : अमरजितसिंग,
वांद्रे (पूर्व) : महेश पारकर,
वांद्रे (पश्चिम) : ऍड. आशीष शेलार,
धारावी : दिव्या ढोळे,
सायन-कोळीवाडा : कॅप्टन तमिळ सेल्व्हन,
माहीम : विलास आंबेकर,
वरळी : सुनील राणे,
शिवडी : शलाका साळवी,
भायखळा : मधू चव्हाण,
मलबार हिल : आ. मंगलप्रभात लोढा,
मुंबादेवी : अतुल शाह,
कुलाबा : ऍड. राज पुरोहित,
पनवेल : प्रशांत ठाकूर,
उरण : महेश बैदी,
अलिबाग : राजू साळुंके,
(नाशिक जिल्हा)
नांदगाव : अद्वय हिरे,
मालेगाव (बाह्य) : पवन ठाकरे,
बागलाण : दिलीप बोरसे,
चांदवड : डॉ. राहुल अहेर,
सिन्नर : माणिकराव कोकाटे,
निफाड : भागवत बोरास्ते,
नाशिक (पूर्व), बाळासाहेब सानप,
नाशिक (मध्य) : देवयानी फरांदे,
नाशिक (पश्चिम) : सीमा हिरे,
देवळाली : कॅप्टन कुणाल गायकवाड,
इगतपुरी : परशुराम वाघेरे,
डहाणू : पास्कल धनागरे,
विक्रमगड : आ. विष्णू सावरा,
पालघर : दीपा संके,
(सोलापूर जिल्हा)
मोहोळ : संजय क्षीरसागर,
सोलापूर शहर उत्तर : आ. विजयराव देशमुख,
अक्कलकोट : आ. सिद्धरामप्पा पाटील,
सोलापूर दक्षिण : सुभाष देशमुख,
कराड दक्षिण : अतुल भोसले,
सातारा : दीपक पवार,
(कोकण)
रत्नागिरी : सुरेंद्र (बाळ) माने,
कणकवली : आ. प्रमोद जठार,
सावंतवाडी : अतुल काळसेकर,
गुहागर : डॉ. विनय नातू,
(कोल्हापूर जिल्हा)
कोल्हापूर दक्षिण : अमर महाडिक,
करवीर : केरबा चौगुले,
कोल्हापूर उत्तर : महेश जाधव,
इचलकरंजी : आ. सुरेश हळवणकर,
(सांगली जिल्हा)
मिरज : सुरेश खाडे,
शिराळा : शिवाजीराव नाईक,
पळूस-कडेगाव : पृथ्वीराज देशमुख,
खानापूर : गोपीचंद पडाळकर,
तासगाव-कवठे महांकाळ : अजित घोरपडे
(मराठवाडा व नगर)
अकोले : अशोक भांगरे,
नेवासा : बाळासाहेब मुरकुटे,
राहुरी : आ. शिवाजीराव कर्डिले,
श्रीगोंदा : आ. बबनराव पाचपुते,
कर्जत जामखेड : आ. प्रा. राम शिंदे,
गेवराई : ऍड. लक्ष्मण पवार,
माजलगाव : आर. टी. देशमुख,
परळी : पंकजा मुंडे- पालवे,
लातूर (ग्रामीण) : रमेश कराड,
लातूर (शहर) : शैलेश लाहोटी,
अहमदपूर : गणेश हाके,
निलंगा : संभाजी पाटील निलंगेकर,
औसा : पाशा पटेल,
तुळजापूर : संजय निंबाळकर,
भोकर : डॉ. माधव किन्हाळकर,
लोहा : मुक्तेश्वर धोंडगे,
नायगाव : राजेश पवार,
मुखेड : गोविंद राठोड,
वसमत : ऍड. शिवाजी जाधव,
हिंगोली : तानाजी मुटकुले,
परभणी : अजय गव्हाणे,
परतूर : बबनराव लोणीकर,
बदनापूर : नारायण कुचे,
सिल्लोड : सुरेश बनकर,
फुलंब्री : हरिभाऊ बागडे,
औरंगाबाद (पश्चिम) : मधुकर सावंत,
गंगापूर : प्रशांत बंब,
वैजापूर : एकनाथ जाधव,
शाहदा : उदयसिंह कचरू पडवी
नंदुरबार : डॉ. विजयकुमार गावित
नवापूर : अनिल मोहन वसावे,
साकरी : मंजुळा गावित,
धुळे शहर : अनिल गोटे,
सिंदखेडा : आ. जयकुमार रावल,
शिरपूर : डॉ. जितेंद्र ठाकूर,
चोपडा : जगन्नाथ बाविस्कर,
रावेर : हरिभाऊ जावळे,
भुसावळ : संजय सावकारे,
जळगाव शहर : राजुमामा भोळे,
जळगाव ग्रामीण : पी. सी. आबा पाटील,
अंमळनेर : अनिल भाईदास पाटील,
एरंडोल : मच्छिंद्र पाटील,
जामनेर : आ. गिरीश महाजन,
मुक्ताईनगर : आ. एकनाथराव खडसे,
मलकापूर : आ. चैनसुख संचेती,
चिखली : सुरेशअप्पा खाबुतारे,
सिंदखेडराजा : डॉ. गणेश मंते,
जळगाव जामोद : आ. डॉ. संजय कुटे,
आकोट : प्रकाश भारसाकळे,
अकोला पश्चिम : आ. गोवर्धन शर्मा,
मूर्तिजापूर : आ. हरीश पिंपळे,
वाशीम : आ. लखन मलिक,
कारंजा : डॉ. राजेंद्र पाटणी,
धामणगाव रेल्वे : अरुण अडसड,
बडनेरा : तुषार भारतीय,
अमरावती : डॉ. सुनील देशमुख,
तिवसा : निवेदिता चौधरी,
दर्यापूर : श्रीकृष्ण बुंदले,
मेळघाट : प्रभुदास भिलावेकर,
मोर्शी : डॉ. अनिल बोंडे,
आर्वी : आ. दादारावजी केचे,
देवळी : सुरेश वाघमारे,
हिंगणघाट : समीर कुणावार,
उमरेड : आ. सुधीर पारवे,
नागपूर (दक्षिण-पश्चिम) आ. देवेंद्र फडणवीस,
नागपूर (पूर्व) : आ. कृष्णा खोपडे,
नागपूर (मध्य) : आ. विकास कुंभारे,
नागपूर (पश्चिम) : आ. सुधाकर देशमुख,
नागपूर (उत्तर) : डॉ. मिलींद माने,
कामठी : आ. चंद्रशेखर बावनकुळे,
तुमसर : चरण वाघमारे,
साकोली : बाळा काशीवार,
अर्जुनी मोरगाव : आ. राजकुमार बडोले,
गोंदिया : विनोद अग्रवाल,
आमगाव : संजय पुरम,
अहेरी : राजे अंबरीश महाराज,
राजुरा : संजय धोटे,
बल्लारपूर : आ. सुधीर मुनगंटीवार,
ब्रह्मपुरी : आ. अतुल देशकर,
चिमूर : कीर्तिकुमार भांगडिया,
यवतमाळ : मदन येरावार,
उमरखेड : राजेंद्र नजरधने,
भाजपची दुसरी यादी –
अक्कलकुआ- विजय पराडके
धुळे ग्रामिण – मनोहर भदाणे
शिर्डी – राजेंद्र पिपाडा
कोपरगाव – स्नेहल कोल्हे
पारनेर – बाबासाहेब रामभाऊ तांबे
अहमदनगर – अभय आगरकर
उदगिर – सुधाकर भालेराव
उमरगा – कैलाश शिंदे
उस्मानाबाद – संजय पाटील-दुधगावकर
बार्शी – राजेंद्र मिरगणे
वाई – पुरुषोत्तम जाधव
दापोली – केदार साठे
सांगली – सुधीर गाडगीळ
नांदेड उत्तर- सुधाकर पांढरे
नांदेड दक्षिण- दिलीप कंदाकृती
नसावंगी- विलास खरात
जालना- अरविंद चव्हाण
औरंगाबाद मध्य- किशनचंद तनवानी
मालेगाव मध्य- हाजी मोहम्मद
कल्याण- यशवंत गवळी
येवला – शिवाजी मानकर
वसई- शेखर धुनी
भिवंडी पश्चिम- महेश चौगुले
कल्याण ग्रामीण- रमेश पाटील
ओवळा-माजिवडा- संजय पांडे
भांडूप पश्चिम- मनोज कोटक
वर्सोवा – भारती लव्हेकर
कर्जत – राजेंद्र येनुकर
महाड – सुधीर महाडिक
जुन्नर – नेताजी डोके
आंबेगाव – जयसिंग येरांडे
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
अचलपूर – अशोक बनसोड
वर्धा- पंकज भोयार
कटोल- आशिष देशमुख
सावनेर – सोनबा मुसळे
हिंगना – समीर मेघे
नागपूर दक्षिण- सुधाकर कोल्हे
रामटेक – माल्लिकार्जुन रेड्डी
भंडारा – रामचंद्र अवसारे
अरमोरी- कृष्णा गजबे
वणी – संजीव रेड्डी
राळेगाव – प्रा. अशोक उके
डिग्रस – अजय दुबे
अरणी – राजू तोडसम
जिंतूर – माणिक मुंडे
मी धंदेवाईक नाही तर पूर्णवेळ स्वयंसेवक- बापट ; कोणाशी लढत नाही,मतदारांच्या हक्कासाठी लढतो – टिळक
पुणे – विद्यमान आमदार गिरीश बापट यांनी पुन्हा एकदा भाजपतर्फे, तर रोहित टिळक यांनी कॉंग्रेसतर्फे कसबा विधानसभा मतदारसंघातून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बापट म्हणाले , मी धंदेवाईक नाही पूर्णवेळ स्वयंसेवक आहे तर टिळक म्हणाले , कोणाशी लढत देण्यासाठी मी उभा नाही , मी मतदारांचे हक्क मिळवून देणे नागरी समस्या सोडविणे यासाठी लढतो आहे
कसबा गणपती मंदिरापासून पदयात्रा काढून आज सकाळी बापट यांनी अर्ज दाखल केला. त्या वेळी त्यांच्या सोबत गिरिजा बापट, नगरसेवक अशोक येनपुरे, किरण सरदेशपांडे, राजेंद्र येनपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तर टिळक यांनी केसरीवाडा येथे श्रीगणेशाची आरती करून आणि मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांसह जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी नगरसेवक मिलिंद काची, माजी नगरसेवक श्याम मानकर, वीरेंद्र किराड, नीता रजपूत, सुधीर काळे, उल्हास भट उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी बापट आणि टिळक एकाचवेळी आल्याने त्यांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या.
बापट म्हणाले, “”युतीच्या माध्यमातून गेली वीस वर्षे मी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. महायुती तुटल्यामुळे मी दु:खी झालो आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून मी आजपर्यंत काम करीत आलो आहे. अद्यापही मतदारसंघातील काही प्रश्न प्रलंबित आहेत. मी धंदेवाईक नसून पूर्णवेळ स्वयंसेवक आहे. माझी लढत सर्वांबरोबरच आहे. जनता सुज्ञ आहे. मी कोणत्याही उमेदवारावर वैयक्तिक टीका करणार नाही. जनताच योग्य काय तो निर्णय घेईल.‘‘
तर टिळक म्हणाले, “”गेल्या वेळेस जनतेचा विश्वास संपादन करण्यात मी कमी पडलो. परंतु गेल्या पाच वर्षांत मी मतदारसंघात काम करीत आहे. राज्यात आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकोपयोगी कामे केली आहेत. त्यांच्या बळावर मी निवडणूक लढवीत आहे. माझी लढत ही कोणाशी नसून, मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मी उभा आहे. मतदार योग्य तोच निर्णय घेतील, असा विश्वास मला आहे.‘‘
५ वर्षात केलेल्या कामाचा अहवाल लोकांपुढे ठेवणे माझे कर्तव्य- वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील यांनी प्रकाशित केलेल्या विकासपर्व या पुस्तिकेवर टीका करताना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले होते, की राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवत असल्याप्रमाणे हा अहवाल छापला आहे. याला प्रत्युत्तर देताना वळसे पाटील म्हणाले, गेली पाच वर्षे विधानसभेचा अध्यक्ष असलो, तरी माझी पहिली जबाबदारी आपल्या मतदारसंघाची होती. त्याचा एकूण गोषवारा लोकांपुढे ठेवणे, हे माझे कर्तव्य आहे. त्यामागे माझी भावना अत्यंत विनम्रपणाची आहे. ज्यांनी मला विश्वासाने व प्रेमाने पाच वेळेस निवडून दिले, त्यांचा विश्वास खरा ठरला की नाही हे जाणण्याचा त्यांना हक्क आहे. त्यामुळे केवळ कर्तव्य भावनेमधून आणि आपल्या भागात काय झाले आहे, काय होणार आहे, हे लोकांना कळण्यासाठीच अहवाल दिला आहे, असे पाटील म्हणाले.
मी नेहमी कामाच्या आधारे जनतेचा कौल मागितला. या पाच वर्षांत अनेक योजना यशस्वी केल्या. शेती, शिक्षण, आरोग्य आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये केलेल्या कामातून मतदारसंघाचे रूप कसे पालटले आहे, हे दाखविणे हा प्रयत्न विकासपर्व प्रसिद्ध करण्यामागील आहे. जनतेच्या प्रेमाचा उतराई होण्यासाठीच कामाचा अहवाल प्रसिद्ध केला असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
त्यामागची भावना ज्यांना समजलेली नाही ते राष्ट्रपती निवडणुकीचा संदर्भ जोडून खिजवत आहेत. यातून ते मतदारांबद्दल अनादर व्यक्त करून राष्ट्रपती पदाचीही अप्रतिष्ठा करत आहेत. ते पुढे म्हणाले, की वास्तविक ही कामे आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. त्यांची केवळ आठवण व्हावी, म्हणून अहवाल सादर केला आहे
भाजपच्या 172 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
पुणे- आज भाजपनं 172 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली या मध्ये पर्वती – माधुरी मिसाळ , हडपसर -योगेश टिळेकर , पुणे लष्कर – दिलीप कांबळे , खडकवासला – भीमराव तापकीर , कोथरूड – मेधा कुलकर्णी , वडगावशेरी -जगदीश मुळीक , पिंपरी– अमर साबळे , चिंचवड -लक्ष्मण जगताप , मावळ- संजय भेगडे , पुरंदर- संगीताराजे निंबाळकर , बारामती- बाळासाहेब गावडे , शिरूर बाबुराव पाचारणे देण्यात आली आहे या यादीत बबनराव पाचपुते(श्रीगोंदा) , लक्ष्मण जगताप(चिंचवड ) , राम कदम(घाटकोपर -वेस्ट ) या नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचाही समावेश आहे दरम्यान आज आ , गिरीश बापट यांनी आहे कि , आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपती चे आशीर्वाद घेऊन मी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पुण्यातील सर्व नागरिकांचे प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमीच मिळत आला आहे. हे प्रेम असेच मिळत राहणार याबद्दल मला विश्वास आहे.कसबा मतदारसंघातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासास याही वेळी मी पात्र ठरेन याबद्दल मला अजिबात शंका नाही.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादीचे सुभाष जगताप, काँग्रेसचे अभय छाजेड, अपक्ष सचिन तावरे आणि बहुजन समाज पक्षाचे राम पालखे, शिवलाल भोसले यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.
त्यातील मिसाळ व पालखे यांनी अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडला असून, इतर उमेदवारांनी अजून एबी फॉर्म जोडलेले नाहीत. आजपर्यंत ८ उमेदवारांनी १७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील बहुतेक सर्वांनी एक अपक्ष व एक पक्षाचा असे दोन अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती कदम यांनी दिली.
अँड़ रमेश धर्मावत व आबा वाघमारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारपर्यंत एकूण ७७ अर्ज नेण्यात आले आहेत.
,
उद्धव आणि राज दोघे आमचे दोन डोळे – बाळा नांदगावकर
ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री व्हावा अशी माझी प्रामाणिक इछ्या आहे .असे झाले तर मला आनंदच होईल उद्धव आणि राज यांनी एकत्र यावे हि माझी आणि कार्यकर्त्यांची हि भूमिका आहेच. दोघे भावू समंजस आहेत अशी प्रतिक्रिया म न से आमदार बाळा नांदगावकर यांनी दिल्याने आता खळबळ उडाली आहे
दोघे भावू संपर्कात आहेत पण राजकारणाबद्दल तेच आपसात निर्णय घेतील मी सुरुवातीपासून ठाकरे घराण्याशी प्रामाणिक आणि निष्ठेने राहिलो आहे आणि राहील अगदी कोणी मला मुख्यमंत्रीपद दिले तरी मी ठाकरे घराण्यालाच प्राधान्य देईल मी ते पद स्वीकारणार नाही उद्धव आणि राज दोघे आमचे दोन डोळे आहेत असेही बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे
उद्धवराज महाराष्ट्रात येणार काय ? बाळासाहेबांचे स्वप्न साकार होणार काय ?
मराठी माणसाला एकत्र आणण्याची ताकद केवळ ठाकरे बंधूंमध्ये असून हे बंधू एकत्र येवून त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला तर तमाम मराठी माणूस एकत्र येवू शकतो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकू शकतो असा विश्वास सेना -मनसे च्या अनेक कार्यकर्त्यांना असून गेल्या १८ सप्टेंबरलाच अमित शहा यांनी मांडलेली वेगळी चूल लक्षात घेवून या अनुषंगाने अनेक मान्यवरांनी आपापले विचार प्रवाहित करण्याचा प्रयत्न केला होता . उद्धव आणि राज यांनी सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत आपापला योग्य सहभाग नोंदवून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करावे अशी हि मागणी काहीजणांनी केली आहे , युती आणि आघाडीचा घटस्फोट झाल्यानंतर राज्यात लगेचच या नुसार नव्या गणितांची जुळवाजुळव सुरू झाली असून शिवसेना आणि मनसेचे नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याची जोरदार हवा राजकीय वर्तुळात पसरली आहे. योगायोग म्हणजे गेल्या आठवडाभरात आजारपणाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात दोन वेळा फोनवरून बोलणंही झाल्याचं सांगण्यात येत आहे. राज आणि उद्धव यांची युती होणार की नाही याचं उत्तर येणारा काळचं देईल पण या दोघांमध्ये नव्याने संवाद सुरू झाल्याची मात्र पक्की बातमी मिळाली आहे.उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची मुंबई वगळता राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. मोजक्या लोकांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. तर, मनसेने बहुतेक उमेदवारांचे एबी फॉर्म वाटप थांबवले आहे. राज यांनी काल सायंकाळीच 153 जागांवर उमेदवार जाहीर केले. मनसे आज किमान 50-60 जागांवर उमेदवार जाहीर करणार होते मात्र ही यादी थांबविण्यात आल्याचे कळते आहे.उद्धव ठाकरे मातोश्रीवर शिवसेनेच्या उमेदवारांची नावे निश्चित करीत आहेत. तसेच राज यांच्याशी वारंवार संपर्कात आहेत. त्यामुळे आज रात्रीपर्यंत या दोघांत काही चर्चा होऊ शकते. कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ 24 तास शिल्लक आहेत. दुसरीकडे, सेना-मनसेत निवडणूकपूर्व युती होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, निवडणुकीच्या काळात ते एकमेंकांच्या उमेदवारांना सहकार्य करू शकतात. तसेच निवडणुकीनंतरही ते एकत्र येऊ शकतात. अशी हि शक्यता आहे
नाते संबंधावरील गणितावर भाष्य करणारा ”सिद्धांत”
सिनेमा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यातून सामाजिक संदेश समाजातील लोकांपर्यंत पोहचवून सकारात्मक बदल घडवून आणण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न मराठीतील एक सिनेनिर्मिती संस्था करत असून त्यांच्या या प्रयत्नांना रसिक प्रेक्षकांची ही तेवढीच वाहवा मिळत आहे. आजवर शाळा, अनुमती, फॅन्ड्री अशा एकाहून एक सरस कलाकृतीतून तयार करून केवळ मनोरंजनात्मक नव्हे तर सामाजिक संदेश दिणारी सिनेनिर्मिती संस्था म्हणजे ‘नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल’.
नवलखा आर्ट्स आणि होली बेसिलच्या निलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांच्यासोबत अमित अहिरराव यांनी ‘सिद्धांत’ या आगामी सिनेमाची निर्मिती केली असून ‘सिद्धांत’ सिनेमाची निवड मानाच्या समजल्या जाणाऱ्या १६व्या ‘मामी’ फिल्म फेस्टिवलच्या ‘इंडिया गोल्ड २०१४’ विभागात करण्यात आली आहे. येत्या १४ ऑक्टोबरपासून २१ ऑक्टोबर दरम्यान हा सोहळा रंगणार आहे.
गणित हा एक असा विषय आहे जो प्रत्येकाच्या पचनी पडत नाही. पण अभ्यासातील या गणिताचा आयुष्यातील नात्यांशी ही तेवढाच जवळचा संबंध आहे. नाती जमतात म्हणून गणित सुटतात, का गणित सुटतात म्हणून नाती जमतात, त्यामुळेच गणित हा विषय जरी आवडत नसला तरी आयुष्यातील नाती टिकविण्यासाठी गणिता सारख्या पद्धातीशी मैत्री करण्याशिवाय काही पर्याय नाही. एकंदरीतच नाते संबंधातील गणितावर भाष्य करणारा असा ‘सिद्धांत’ सिनेमा असून सिनेमाचे दिग्दर्शन विवेक वाघ यांनी केले आहे. सिने दिग्दर्शनातील त्यांचे हे पहिलेच पाऊल असून ‘शाळा’ सिनेमाची निर्मिती तसेच आजवर अनेक सिनेमांसाठी क्रिएटीव्ह हेड म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
‘सिद्धांत’ सिनेमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, गणेश यादव, किशोर कदम, स्वाती चिटणीस, नेहा महाजन, सारंग साठे, माधवी सोमण आणि बालकलाकार अर्चित देवाधर अशी या सिनेमाची स्टारकास्ट असून यांचा उत्तम अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेखर ढवळीकर यांनी या सिनेमासाठी पटकथा- संवाद लिहिले असून सिनेमातील गाणी सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी लिहिली आहेत. संगीतकार शैलेंद्र बर्वे यांनी या सिनेमाला संगीत दिले असून नुकतेच सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात या सिनेमातील एक गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे.
नुकत्याच सोशल साईट्सवर पोस्ट करण्यात आलेल्या ‘सिद्धांत’ सिनेमाच्या पोस्टरने मनोरंजन क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली असून रसिक प्रेक्षकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
झी मराठीवर वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीयरमध्ये ‘टाइमपास’

रविवार या शब्दातच एका अर्थाने टाइमपास हा शब्द दडलेला असतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत रविवार म्हणजे हक्काची सुट्टी आणि टाइमपास करण्यासाठीचा हक्काचा दिवस. प्रत्येक रविवार हा तसा खासच असतो पण २८ सप्टेंबरचा रविवार हा जरा जास्तच स्पेशल असणार आहे कारण या दिवशी साजरा होणार आहे “वर्ल्ड टाइमपास डे” ज्यासाठी निमित्त असणार आहे यावर्षीचा ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट “टाइमपास”. यावर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत यशाचे सर्व विक्रम मोडणारा आणि नवे विक्रम रचणारा “टाइमपास” हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबरला रविवारी रात्री ७ वा. झी मराठीवरून प्रसारीत होणार आहे.
“आई बाबा आणि साई बाबाची शप्पथ”… “चला हवा येऊ द्या”… “नया है वह” सारखे तुफान धमाल संवाद, “मला वेड लागले प्रेमाचे”, “दाटले रेशमी धुके” सारखी रोमॅंटीक गाणी, दगडु-प्राजक्ताची इनोसंट लव्ह स्टोरी , प्राजुच्या वडील लेलेंचा त्याला विरोध, त्यातून येणारी जुदाई , प्रेमाची परिक्षा असा सगळा मसाला या चित्रपटात होता. टाइमपास म्हणून सुरू झालेल्या प्रेमात दगडू सिरीयस होतो आणि त्यातून मिळणा-या आनंदाची आणि दुखःचीही कथा म्हणजे टाइमपास हा चित्रपट. वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकच धमाल उडवली होती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण या चित्रपटाचे फॅन बनले होते. चित्रपटाचे संवाद, गाणी सोशल नेटवर्क साइट्सवरून मोठ्या प्रमाणात शेअर झाले होते. यात दगडूची भूमिका प्रथमेश परबने तर प्राजक्ताची भूमिका केतकी माटेगावकरने साकारली होती. याशिवाय वैभव मांगले, भाऊ कदम, भूषण प्रधान, उर्मिला कानेटकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘बालक पालक’ सारखे सुपरहीट चित्रपट देणा-या रवी जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते.
झी मराठीवरून या चित्रपटाचा आता वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीयर होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेंव्हा अनेकांनी चित्रपटगृहांत जाऊन तो बघितला होता. याशिवाय हा चित्रपट अनेकवेळा बघणा-या प्रेक्षकांची संख्याही खूप जास्त होती. ज्यांनी तेव्हा बघितला त्यांना अजून एकदा आनंद देण्यासाठी आणि ज्यांना त्यावेळी बघता नाही आला अशा प्रेक्षकांसाठी ही खास मेजवानी असणार आहे. झी मराठीचे प्रेक्षक केवळ राज्यातच नव्हे तर देशात आणि परदेशातही आहेत. अशा सर्व मराठी प्रेक्षकांसाठी टाइमपासचा टीव्ही प्रिमीयर हा खास नजराणा ठरणार आहे. येत्या २८ सप्टेंबरला सायंकाळी ७ वा. टाइमपासचा हा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीयर झी मराठीवरून प्रसारीत होणार आहे.


