Home Blog Page 369

‘ एमआयटी एडीटी ‘ विद्यापीठाला ‘ नॅक ‘ कडून ‘ अ ‘ दर्जा

पुणेः एमटी आर्ट , डिजाईन आणि टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी (एमआयटी एडीटी) , विश्वराजबाग , लोणी-काळभोर , पुणेला ‘ नॅक ‘ कडून एनएएसी (नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन कौन्सिल) पुढील चक्रात पुढील वर्षांसाठी ‘ अ ‘ (ए) ( सीजीपीए ३.११ ४.० स्केल) ‘ एमटी एडीटी ‘ विद्यापीठ गुणवत्तेवर उमटलेली ही अभिमानास्पद मोहर , अशी भावना विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डॉ. सुनिता मंगेश कराड (कार्यकारी संचालक डॉ. सुनिता मंगेश कराड) यांनी व्यक्त केली.

एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्राथमिक चर्चा पत्रकारात प्रा. डॉ. कराड बोलणे. राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ.राजेश एस. , प्र.कुलगुरू डॉ.रामचंद्र पुजेरी , डॉ.मोहित दुबे , कुलसचिव डॉ.महेश चोडे आदि मान्यवर उपस्थित होते.

कुलगुरु प्रा.डॉ.राजेश एस. पंतप्रधान म्हणाले , एमआयटी एडीटी विद्यापीठाचे मूल्यांकन करण्यासाठी नॅक दुखणे १० , ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाला भेट दिली . अध्ययन-अध्यापन प्रक्रिया , पायाभूत सुविधा , गुणवत्ता , संवर्धन व कृतिशीलता , चौकीचे कर्मचारी व व्यवसायाचे प्रमाण , समाजातील वंचित घटक मूलभूत शिक्षण पोचविण्याचा प्रयत्न अशा विविध निश्चित परिणामांवर आधारित मूल्यांकन ‘ एमटी एडीटी ‘ व्यावसायिक विद्यापीठ पाच वर्षांसाठी ‘ अ ‘ दर्जा प्रदान केला.

‘ एमआयटीटी ‘ विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी) लागू होण्याच्या पॉवरच्या सर्वांगीण विकास (हॉलिस्टिक डेव्हेलपमेंट) भर देत कौशल्य , गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. ‘ एमटीआयटी ‘ युनिव्हर्सिटी होणार नाही मुलंभूत गुणवत्तापूर्ण संवर्धन , नवीन शैक्षणिक ( एनईपी) नियमांसाठी घेतलेला लोकशाही आणि उद्योगक्षेत्र परस्पर संबंधातून व्यवहारासाठी उपलब्ध आहे . गौरवाने उल्लेख केला, अशी माहिती देखील कुलगुरू प्रा. डॉ.राजेश एस. यांनी दिली.

प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराडांचे बहुमोल मार्गदर्शन

कुलसचिव प्रा.डॉ. महेश चोपडे म्हणाले, लोकशाही अभियांत्रिकी गरजांची ओळख विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दादा. यांनी १९८४ येथे कोथरूड राजकीय अभियंता लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली. आणखी २०१५ साला प्रा. डॉ . विश्वनाथ दा. कराड यांच्याच मार्गदर्शन आणि प्रा. डॉ.मंगेश तु.करा यांच्या सक्षम नेतृत्वाने अधिकाऱ्यता डिझाईन तंत्रज्ञाने तंत्रज्ञान क्षेत्राचे कलाच कला आणि शिक्षण कौशल्य यासाठी वर्षभरात राज कपूर एम विश्वराज हा लेख सहवास लाभागेबात आयआयएआय ( MIT -ADT) स्थापना करण्यात आली. चंट नेव्ही , एरोस्पेस इंजिनियरिंग , डिजाईन , मॅनेजमेंट , संगीत , नृत्य , नाटक , अन्नशास्त्र ( फूड टेक्नॉलॉजी), नागरी सेवा परीक्षा ( यूपीएससी, एमपीएससी), कायदे , वैदिक शास्त्र , मानवशास्त्री लेखकांचे शिक्षक वापरकर्ते एक वैशिष्ट्यपूर्ण विद्यापीठ म्हणून ‘ एमआयटी एडीटी ‘ चा नावलौकिक सर्वत्र आहे.

क्युएस विद्यापीठ क्रमवारीत १५१-२०० अशी अक्षरली प्रभावी रँक बँड , एनआयआरएफ मध्ये निवडलेले मानांकन , यासह आता नॅकने पहिल्याच चक्रात दिले ‘ अ ‘ दर्जा या गोष्टीं विद्यापीठाच्या नावलौकिकात मानाचारा खोव पूर्ण आहेत. एमआयटी विद्यापीठाचे विद्यार्थी आज जगभर विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांचे बहरले कर्तृत्व हीच ‘ एमआयटी एडीटी ‘ च्या कार्याची खरी पावती आहे.

–             प्रा. डॉ.मंगेश कराड , कार्याध्यक्ष, एमआयटी विद्यापीठ, पुणे.

हिल टॉप हिल स्लोप,बी.डी.पी.उठविण्यासाठी नगरविकास राज्यमंत्र्यांनी गठीत केली रमाकांत झांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये डोंगरमाथा-डोंगरउतार (हिलटॉप- हिलस्लोप झोन) हा वापर विभाग प्रस्तावित असून जैववैविध्य उद्यान आरक्षण बायो-डायर्व्हसिटी पार्क (बी.डी.पी.) हे आरक्षण प्रस्तावित करण्यात आलेले आहे. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यामध्ये देखील डोंगरमाथा-डोंगरउतार (हिलटॉप- हिलस्लोप झोन) हा वापर विभाग प्रस्तावित करण्यात आलेला आहे. सदर हिल टॉप हिल स्लोप विभागात समाविष्ट असलेल्या जमिनी व बी.डी.पी. आरक्षणातील जमिनी या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असून आरक्षणातील जमिनींच्या मालकांकडून उक्त जमिनीवरील वापर विभाग / आरक्षण वगळून सदरहू जमिनी रहिवास विभागात समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने शासनाकडे अनेक वर्षे पाठपुरावा करण्यात येत होता.या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर माधुरी मिसाळ यांनी नगरविकास राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारताच मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार स्वतंत्र व्यक्तिगत प्रस्तावांवर निर्णय घेणे ऐवजी एकत्रित सर्वंकष निर्णय घेणेसाठी आणि पर्यावरणाचे संवर्धन व जतन करण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील सर्व पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्राच्या वेगवेगळ्या स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली एकत्र करुन एकच पर्यावरण पूरक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याकरिता पुणे महापालिकेचे माजी आयुक्त रमानाथ झा,निवृत्त आय.ए.एस अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली अभ्यासगट गठीत केलेला आहे.

रमाकांत झा यांनी अनेक महानगरपालिकात आयुक्त म्हणून तसेच एमएमआरडीए आयुक्त आणि काही आंतरराष्ट्रीय संस्थामध्ये नगर नियोजनात मोलाची कामगिरी बजावली आहे. सदर अभ्यासगटात त्यांचे सोबत आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे,महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे,सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, शहर अभियंता, पुणे महानगरपालिका, उपसंचालक, नगर रचना नागरी संशोधन घटक, पुणे यांचा समावेश आहे.

समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे असेल-

१.उपरोक्त गठीत अभ्यासगट याबाबत प्राप्त हरकती व सुचनांचे अध्ययन करून सदर मुद्यांवर शासनास उपाययोजना सुचविणार आहे.

२.उक्त अभ्यास गटाने सदर वापर विभाग/ आरक्षण याची अंमलबजावणी प्रत्यक्षात किती प्रमाणात झाली आहे? याचा, तसेच अंमलबजावणी न होण्यामागील कारणांचे / अडचणींचे विश्लेषण करण्याचे आहे.

३.शासन निर्णय ३, दि.२१.०२.२०२४ अन्वये नियुक्त केलेल्या पर्यावरण समितीच्या / अधिकाऱ्यांच्या शिफारशी व त्याआधारे शासनाने घेतलेले निर्णय अभ्यासून, प्रत्यक्षातील परिणामकारक अंमलबजावणीसाठी असे क्षेत्र जमीन वापर विभाग म्हणून निर्देशित करावे अथवा आरक्षण प्रस्तावित / कायम करावे, याबाबत शासनास शिफारशी करण्याच्या आहेत.

४.उक्त अभ्यास गटाने सदर क्षेत्र जमीन वापर विभाग दर्शविल्यास त्यामध्ये अनुज्ञेय करावयाचा विकास किंवा सदर क्षेत्र आरक्षण म्हणून दर्शविल्यास अशा आरक्षणाचे संपादन व त्यासाठी आवश्यक विविध संसाधने / आयुधे / आर्थिक तरतूद तसेच विकास करणेबाबतची कार्यपध्दती याबाबत शासनास शिफारशी करण्याच्या आहेत.

५.उक्त अभ्यास गटाने अशा क्षेत्रात समाविष्ट होणाऱ्या शासकीय / वन विभाग/ महानगरपालिका/ इतर निमशासकीय संस्था यांचे मालकीच्या जमिनींच्या सद्यःस्थितींचा आढावा घेऊन अशा जमिनींवर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हाती घ्यावयाच्या उपाययोजनांचा / प्रकल्पांचा कालबद्ध कृती आराखडा शासनास सुचविण्याचा आहे.

६.उक्त अभ्यास गटाने अशा क्षेत्रात समाविष्ट होणाऱ्या खाजगी मालकीच्या जमिनीच्या सद्यःस्थितीचा आढावा घेऊन अशा ठिकाणी सदर वापर विभाग / आरक्षण याची अंमलबजावणी करणेसाठी अवलंबवयाच्या उपाययोजना सुचविण्याच्या असून अशा क्षेत्रातील अधिकृत तसेच अनधिकृत विकास / बांधकामे याबाबत घ्यावयाच्या निर्णयासंदर्भाने शासनास ठोस शिफारशी करण्याच्या आहेत.

७.उक्त अभ्यास गटाने यासंदर्भातील मा. न्यायालय / हरित लवाद यांचे निर्णय विचारात घेऊन शासनास उचित शिफारशी करण्याच्या आहेत व हिल टॉप-हिल स्लोप व बायो-डायर्व्हसिटी पार्क (BDP) यामध्ये अनुज्ञेय करावयाचा वापर / विकास याबाबत प्रारूप सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याची आहे.

सदर समिती एका महिन्यात आपला अहवाल शासनास सादर करणार आहे.

रखडलेला विकास आणि पुणे शहराची पर्यावरण मूल्ये यांचा विचार करून ही समिती काम करेल. नागरिकांच्या हरकती आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचनांचा अभ्यास करून ही समिती शासनास अहवाल सादर करेल असा विश्वास आहे.

  • माधुरी  मिसाळ, नगरविकास राज्यमंत्री

महात्मा फुले यांचा अपमान सहन करणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा!

प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत उद्या पुण्यात आंदोलन होणार!

पुणे : म.जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित येणाऱ्या फुले या चित्रपटावर अनेक ब्राह्मण्यवादी संघटनांनी विरोध केल्याने ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा म.फुले चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे, तसेच सेन्सॉर बोर्डाकडूनही ह्या चित्रपटात अनेक सिनला कात्री लावण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेला अनुसरून महात्मा फुलेंच्या या अपमानावर आम्ही गप्प बसणार नाही. उद्या ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी फक्त त्यांची जयंती साजरी करणार नाही, तर पुण्यात सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरुद्ध निषेध आंदोलन करणार, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. या संदर्भातील ट्विट करत त्यांनी माहिती दिली.

उद्या सकाळी 11 वा. महात्मा फुले वाडा येथे हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत.म.फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या सिनेमात ऐतिहासिक दृष्ट्या अनेक महत्त्वाच्या सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेऊन ते काढायला सांगितले आहे, जे इतिहासाला धरून नाहीत. या संदर्भातील सेन्सॉर बोर्डाचे पत्र सुद्धा वायरल होत आहे.

गॅस दरवाढी विरोधात शिवसेना आक्रमक..महिलांनी चुलीवर भाकरी थापून केला सरकारचा निषेध…

पुणे :- अबकी बार महागाई ची सरकार” महागाई चा झटका लाडक्या बहिणींना फटका” अश्या घोषणानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे शहर वतीने कसबा पेठेत आंदोलनात घेण्यात आले,यावेळी शिवसैनिक महिलांनी रस्त्यावरच चूल पेटवून त्यावर भाकरी केल्या महागाई ची झळ आज गोरगरीब, सामान्य माणसाच्या चुलीपर्यंत पोहचली आहे, त्यामुळे एकेकाळी १० रुपये गॅस वाढला की केंद्र सरकार च्या विरोधात रस्त्यावर बसणारी भाजप नेता स्मृती इराणी हिचे पोस्टर लावण्यात आले आणि भाजपची इराणी तुझी स्मृती गेली कुठे ? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला.महागाई थांबवण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे त्यांनी लोकांना फसवून २०१४ सालापासून सरकार चालवले आहे लोकांना महागाई ने हैराण केले असताना भाजप सरकार लोकांमध्ये धार्मिक द्वेष निर्माण करत आहे असे शहरप्रमुख संजय मोरे बोलताना म्हणाले.

यावेळी आंदोलनास शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, रामभाऊ पारिख, उपशहर प्रमुख आबा निकम, उमेश वाघ, शहर संघटक राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, मकरंद पेठकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, निवडणूक समन्वयक निकिता मारटकर, विद्या होडे, विभागप्रमुख मुकुंद चव्हाण, चंदन साळुंके, राजेश मोरे, योगेश पवार, नंदू येवले, अनिल दामजी, भगवान वायल, महिला आघाडी उपशहर संघटिका अमृत पठारे, सलमा भाटकर, रोहिणी कोल्हाळ, सुनीता खंडाळकर, ज्योती चांदेरे, करुणा घाडगे, सुलभा तळेकर, पद्मा सोरटे, अंगणवाडी सेना शहरप्रमुख गौरी चव्हाण, सोनाली जुनवणे, रेणुका साबळे, गायत्री गरुड, सविता गोसावी, रुपाली जिंतीकर, नेहा कुलकर्णी, स्मिता पवार, पूजा खेडकर, नमिता चव्हाण, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, सनी गवते, समन्वयक युवराज पारिख, संदीप गायकवाड, रूपेश पवार, अमर मारटकर, हनुमंत दगडे, दत्ता घुले, आशुतोष मोकाशी, नागेश खडके, अमोल घुमे, नितीन निगडे, गणेश घोलप, सूरज मोराळे, बकुळ डाखवे, गिरीश गायकवाड, जुबेर तांबोळी, सूरज खंडगळे, बाळासाहेब गरुड, परेश राव, आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, मुकुंद काकडे, राहुल शेडगे, आशिष अढळ, बाळासाहेब क्षीरसागर, समीर खान, जुबेर शेख, गजानन बागडे, अरविंद जैन, विनायक मेमाने, सतीश कसबे, शिवा मेमाणे, संतोष हुडे, निरंजन कुलकर्णी, विकी धोत्रे, अनिल जाधव, आनंद बेंद्रे, इंद्रजीत शिंदे, सतीश कसबे, दिनेश निकम, तुषार भोकरे, अमित जाधव, अजय शिलखाने, प्रवीण रणदिवे, युवासेनेचे सोहम जाधव, चिंतामण मुंगी, अक्षय हबीब, गणेश काकडे, नीरज नांगरे, किशोर गिरमे, आदी उपस्थित होते.

ओब्जेक्ट-ओरिएंटेडप्रोग्रॅमिंग विषयावरील तज्ञांच्या व्याख्यानाचे आयोजन…

पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषेदेच्या अनंतराव पवार अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय, पुणे (APCOER) येथील इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (ACT) विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात, प्रा. भगवान दिनकर थोरात (सहाय्यक प्राध्यापक, AI&DS विभाग, VIT पुणे) यांनी “ओब्जेक्ट-ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग (OOP)” या विषयावर तज्ज्ञ व्याख्यान दिले.या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना सैद्धांतिक संकल्पनांसोबतच प्रत्यक्ष प्रोग्रॅमिंगमधील अनुभवात्मक दृष्टिकोन मिळाला प्रा. थोरात यांनी ओओपीमधील मूलभूत तत्त्वे, कोड पुर्नवापर (code reusability) आणि सॉफ्टवेअर डिझाईनच्या मुद्द्यांवर प्रगल्भ व सुसंगत मार्गदर्शन केले. शैक्षणिक आणि उद्योगस्नेही उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून तयार होऊन विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेसाठी नव्हे तर उद्याच्या डिजिटल जगात काहीतरी नाविन्यपूर्ण घडवण्यासाठी व विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी थेट संवाद साधता यावा यासाठी असे उपक्रम राबवले जातात. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये ओओपी विषयीची समज अधिक प्रगल्भ झाली. या व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. स्वाती गांधी विभागप्रमुख इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी यांनी केले. तर व्याख्यानाचे समन्वयक म्हणून डॉ. डॉ.हृषीकेश वंजारी यांनी काम पहिले.

या कार्यक्रमासाठी प्रा. भगवान दिनकर थोरात, डॉ. स्वाती गांधी, डॉ.हृषीकेश वंजारी, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाने या नवीन विषयावर व्याख्यानाचे आयोजन केल्याबदल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषेदेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

“भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा”

पारंपरिक वेशभूषेत जैन भाविकांचा सहभाग सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी घेतले भगवान महावीर यांचे दर्शन…

पुणे : श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने आज (दि. 10) तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या 2624व्या जन्म कल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या भव्य प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली.
“त्रिशला नंदन वीर की …. जय बोलो महावीर की,,, जय बोलो महावीर की” असा जयघोष करीत मंगलवाद्यांच्या सुरात शोभायात्रेची सुरुवात झाली.
श्री जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणेच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेस श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, श्री दिगंबर जैन समाज आणि स्थानिक संस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
श्री जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष अचल जैन, सचिव अनिल गेलडा, संपत जैन, समीर जैन, प्रचार प्रमुख सतीश शहा, विलास शहा, हरेश शहा, महावीर कटारिया, अल्पेश गोगरी यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.


शोभायात्रेला सकाळी ७.३० वाजता गुरुवार पेठेतील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर येथून भगवान महावीर यांचा जयघोष करीत सुरुवात झाली. पारंपरिक वेषभूषेत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित जैन बंधू-भगिनी उत्साहाने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. युवकांचा सहभाग मोठ्या संख्येने होता. शोभायात्रेत पुण्यातील विविध भागांमधून रथ सहभागी झाले होते त्याच प्रमाणे महिला मंडळांचाही सहभाग होता.
शोभायात्रा भांडी आळी, लालबहादूर शास्त्री चौक, बोहरी आळी, सोन्या मारुती मंदिर चौक, गणेश पेठ, गोविंद हवालई चौक, बुरडी पूल, पालखी विठोबा चौक, श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिर, रामोशी गेट, टिंबर मार्केट, मनमोहन पार्श्वनाथ मंदिर, सेव्हल लव्हज्‌‍ चौक, अप्सरा चौक, प्रभात प्रेस, कटारिया हायस्कूल, लक्ष्मी विलास, मुकुंदनगर, सुजय गार्डन, शिवशंकर सभागृह, सातारा रोडमार्गे आदिनाथ स्थानक येथे दुपारी 12:30 वाजता पोहोचली. ढोल-ताशाच्या गजरात उत्साहाने आणि भावपूर्णतेने या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.
आकर्षक फुलांच्या सजावटीने शोभायात्रेतील रथ सजविण्यात आले होते. शोभायात्रेच्या सुरुवातीस भगवान महावीर यांची प्रतिमा असलेला चांदीचा रथ होता. हा रथ भाविकांनी स्वत: ओढत नेला. भगवान महावीर यांच्या जन्माचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. महिलांनी महावीर जयंतीचे महत्त्व सांगणारे तसेच सामाजिक संदेश देणारे विविध फलक हाती घेऊन जनजागृती केली. सप्त अश्वांचा चंदेरी रथ, गजरथ, सिंहरथ यांच्यासह विविध बँड सहभागी झाले होते.
सोन्या मारुती चौकात भगवान महावीर आणि शोभायात्रेच्या अग्रभागी असलेले आचार्य विरागसागर सुरीश्वरजी महाराज आदि ठाणा यांचे दर्शन केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ, ना. चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप,अभय छाजेड, अजय खेडेकर, प्रवीण चोरबेले आदींनी घेतले.
समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नेत्र तपासणी, आरोग्य शिबिर घेण्यात आले. दुष्काळग्रस्त भागात पाण्याचे वाटप, पक्षांसाठी पाण्याची सोय करण्याकरीता मातीच्या भांड्यांचे वाटप करण्यात आले. वडगाव धायरी येथील वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले. भवानी पेठेत नि:शुल्क आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.
पोपटसेठ ओस्तवाल, राजेश शहा, सुनील कटारिया, नितीन जैन, निलेश शहा, भूपेंद्र शहा, भद्रेश बाफना, भरत सुराणा, संदीप भंडारी, अभय जैन या प्रसंगी उपस्थित होते.
अहिंसा रॅलीला प्रतिसाद
भव्य दुचाकी अहिंसा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात दादावाडी अहिंसा भवन येथे अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती. जय जिनेन्द्र प्रतिष्ठान (नाजुश्री भवन) येथे रॅलीची सांगता झाली.

‘भारतीय भाषेतील रामकथा’ व ‘ तुलसी रामायणाची भूमिका’ या ग्रंथाचे प्रकाशन

पुणे : ” संविधानात राम, श्री राम जय राम जय जय राम हे आधुनिक युगात रामचा खरा अर्थ सांगणारे वाक्य आहे. प्रत्येकाच्या जीवनात आरंभा पासून ते अंतापर्यंत श्री राम रूजलेला आहे. राम हेच जीवनाचे विश्व आहे. या नावातच मोठी महिमा आणि गोडवा आहे.” असे विचार ज्येष्ठ पत्रकार व दैनिक लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या विद्यमाने ख्यातनाम लेखक, गांधी जीवन साहित्य व तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘भारतीय भाषेतील रामकथा’ आणि ‘ तुलसी रामायणाची भूमिका’ या ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे ते बोलत होते.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे हे सन्माननीय विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच लेखक प्राचार्य डॉ. विश्वास पाटील, अथर्व प्रकाशनचे युवराज माळी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
विजय बाविस्कर म्हणाले,”आधुनिक काळात लहान मुलांच्या जीवनावर होणार्‍या दुष्पपरिणामाकडे पाहता यावर भाष्य करणार्‍या रामाचे नवे स्वरूप पुढे आहे. नुकतेच रामनवमीच्या निमित्ताने लहान मुलांच्या चुमने रामाचा अर्थ सांगतांना असे मांडले की अभ्यासात जो रमतो राम, ग्राउंडवर जो गाळतो घाम श्रीराम जय राम जय जय राम… पत्रकार हा समाजाचा घटक असल्याने त्यांनी आधुनिक युगात सकारात्मक पत्रकारिता करावी.”
“संपादक, पत्रकार यांना धावपळिच्या युगात बोलावून मनःशांतीचे धडे दिल्यास निश्चितच समाजात खूप मोठे बदल घडतील. ९० पुस्तकांची निर्मिती करणारे लेखक विश्वास पाटील यांनी आता महात्मा गांधी आणि राम यावर नव्या पुस्तकाचे लेखन करावे असे ही विजय बाविस्कर यांनी सांगितले. ”
डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले,” भारतीय संस्कृतीचे खरे तत्वज्ञान आणि परंपरेचे मूर्तीमंत प्रतिक श्री राम आहे. राम हा मार्यादा पुरूषोत्तम व एक वचनी आहे. मानव कल्याणासाठी रामाच्या जीवनाने जी चौकट आखली आहे ते सर्वोत्तम आहे. येणार्‍या काळात भारतीय तत्वज्ञान जगला दिशा देण्याचे कार्य करेल. यातूनच विश्वशांती निर्माण होईल.”
अरूण खोरे म्हणाले,” वर्तमान काळात आजच्या राजकर्त्यांंच्या अंतःकरणात खरा राम जागृत होने गरजेचे आहे. परंपरेतील सत्व तसेच ठेऊन नवे विचार काढले पाहिजे. पुस्तकाच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीचा चांगला विचार समोर आला आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने राम, गांधीजी आणि विनोबा हे एक सूत्र आहे हे समझले. प्रत्येकाच्या आयुष्यात रामाचे सत्व सापडायला हवे. भारतीय भाषेतील रामकथा, तुलसी रामायणाची भूमिका लेखकानी वेगळ्या प्रकारे मांडली आहे.”
प्राचार्य डॉ. विश्वास पाटील म्हणाले,” राम हे वैश्विक संस्कृतीचे रूप आहे. वाल्मिकी, कालिदास आणि तुलशीदास यांनी रामायण सांगितले. तसेच राम आणि कृष्ण हे जगाच्या संदर्भात पुजनीय आहेत. अहिल्याचा उद्धार झाल्यावर रामराज्याची स्थापना गंगेच्या काठेवर झाली. तसेच राम कथेची पहिली श्रोता ही जगदंबा आहे.”
कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागतपर भाषण डॉ. मिलिंद पात्रे यांनी केले.
डॉ. सचिन गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. निलवर्ण यांनी आभार मानले.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने ‘पुणे स्टार्ट अप एक्स्पो’चे मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. १० : आधुनिक काळात अनेक क्षेत्रांतील आव्हानांना नवकल्पना हेच उत्तर आहे. मात्र, त्यासाठी नवकल्पनांसाठी सातत्याने व्यासपीठे उपलब्ध झाली पाहिजेत. या व्यासपीठांचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. ज्यामुळे समाजाच्या तळागाळापासूनच्या नवकल्पना पुढे येऊ शकतील. पुणे स्टार्टअप एक्स्पो २०२५ हा उपक्रम अशा सर्वसमावेशक नवकल्पनांना पुढे नेणारा असल्याने तो महत्त्वाचा आणि औचित्याचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे माहिती-तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करीत असताना उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आज कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या प्रांगणात ‘पुणे स्टार्टअप एक्स्पो २०२५’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ॲड. शेलार बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डेस्टिनेशन को वर्किंग, पुणे बिझनेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप, टीडीटीएल, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ यांचे सहकार्य या प्रदर्शनाला लाभले होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, अधिष्ठाता प्रा. डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती, एक्स्पोच्या आयोजक अमृता देवगांवकर व मंदार देवगांवकर, डेटा टेकचे संचालक अमित आंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. याप्रसंगी सर्वोत्तम २४ स्टार्टअप्सना ॲड. आशिष शेलार तसेच डॉ. राहुल कराड यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रदर्शनातील सहभागींना गुंतवणूकदारांशी स्टार्टअपसंबंधी थेट चर्चा व सादरीकरणाची संधीही मिळाली.

ॲड. आशिष शेलार म्हणाले, “देशाच्या प्रत्येक नागरिकाला भारतीय राज्यघटनेने समान संधी आणि समान संरक्षणाची हमी प्रदान केली आहे. त्याला अनुसरुन शहरी तसेच ग्रामीण भागांतील नवकल्पनांना व्यासपीठ देणारा पुणे स्टार्टअप एक्स्पो हा उपक्रम कौतुकास्पद आहे. समान संधी आणि संरक्षण, प्रत्येकाला द्यायचे असेल, तर नवकल्पनांचेही विकेंद्रीकरण झाले पाहिजे. नागरी तसेच ग्रामीण भागांतील युवांच्या नवकल्पनांना व्यासपीठ आणि गुंतवणूकदार मिळायला हवेत. अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून तळागाळातील नवकल्पनांना पाठिंबा मिळेल, व्यापक अवकाश मिळेल, नवकल्पनांची वास्तवातील व्यावहारिकता पुढे येईल आणि अंतिमतः विकसित, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचे योगदान राहील.” पुण्यासारख्या विकसित, शैक्षणिक, उद्योजकीय आणि व्यावसायिकदृष्ट्या पुढारलेल्या शहरांत या प्रदर्शनाचे आयोजन अधिक औचित्यपूर्ण आहे, असेही ॲड. शेलार यांनी नमूद केले.

चंद्रकांत पाटील यांनी स्टार्टअपची संकल्पना कोविड संकटकाळात खऱ्या अर्थाने पुढे आली, याचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे कार्पोरेट क्षेत्र आणि वर्क फ्रॉम होम, यांच्यामधील दुवा म्हणून डेस्टिनेशन को वर्किंग काम करत असल्याचे सांगितले. डेस्टिनेशन को वर्किंगमध्ये कार्यरत सुमारे दीडशे व्यावसायिकांच्या वैचारिक आदानप्रदानातूनच स्टार्टअप एक्स्पोची संकल्पना पुढे आली आणि आज ती प्रत्यक्षात आली, असेही त्यांनी सांगितले.

पाटील पुढे म्हणाले, सामान्य नागरिक आज आपल्या नोकरीपलीकडे फारसा विचार करताना दिसत नसल्याने २०१४ साली पंतप्रधान झाल्यानंतर देशाला श्रीमंत बनवायचे असेल तर देशातील नागरिक श्रीमंत व्हायला हवेत हे नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आले. हे ध्येय साकारताना इनोव्हेशन्स अर्थात नवकल्पना यामध्ये महत्त्वपूर्ण वाटा उचलू शकत असल्याने त्यांना अनुरुप असे नवे शैक्षणिक धोरण, उद्योग क्षेत्राशी संलग्न प्रात्यक्षिक शिक्षण पद्धती त्यांनी आणली. यामध्ये मातृभाषेतील शिक्षणाचा प्राधान्यक्रमही वाढविला. या सर्वांमुळे आज २०२५ साली स्टार्ट अप आणि संशोधक या दोघांनाही चालना मिळत आहे. जागतिक पातळीवर विचार केला तर मागील काही वर्षात भारतातील महिला स्टार्ट अप्स हे जगात पहिल्या क्रमांकावर असून पुरुषांनी बनविलेले स्टार्ट अप्स हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यातून रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन, बचतीचे महत्त्व आणि उद्योजकीय मानसिकता घडवण्याचे कार्य होत आहे.”

डॉ. राहुल कराड यांनी एमआयटी सदैव नव्या शैक्षणिक संकल्पना उचलून धरत असल्याचे सांगितले. स्टार्टअप एक्स्पोला पाठिंबा देणे आणि सर्वतोपरी साह्य करणे, हे त्याचाच एक भाग आहे. एमआयटी नेहमीच विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, ऊर्जा हे व्यक्त होण्यासाठी पूरक असे उपक्रम आयोजित करते. भारतीय छात्र संसद हा उपक्रम यापैकीच एक असल्याचे कराड यांनी नमूद केले.

अमृता देवगांवकर म्हणाल्या, “या उपक्रमामुळे राज्याच्या विविध भागातील नवोदितांच्या स्टार्टअप्सना एक व्यासपीठ तर विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये दाखविण्याची संधी मिळणार आहे. या एक्स्पोच्या निमित्ताने काही स्टार्टअप्स उद्योजकांना आपल्या नवकल्पना सादर करण्याची, बाजारात आपली ओळख वाढवण्याची व आपल्या स्टार्टअपला गती देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देखील मिळेल.” मंदार देवगावकर, अमित आंद्रे यांनीही मनोगत मांडले. डॉ. गार्गी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

डीआरआय मुंबईने लातूरमधील छुप्या मेफेड्रोन कारखान्यावर छापा टाकून 11.36 किलो मेफेड्रोन केले जप्त, सात जणांना अटक

मुंबई-

मुंबईतील महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) त्यांच्या प्रादेशिक युनिट्सच्या समन्वयाने महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रोहिणा गावातील दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या एका छुप्या मेफेड्रोन उत्पादन कारखान्यावर छापा टाकला. 

1985 च्या अंमली पदार्थ आणि मनस्थितीवर परिणाम करणारे घटक (एनडीपीएस) कायदा अंतर्गत सूचीबद्ध केलेल्या मेफेड्रोन या सायकोट्रॉपिक पदार्थाच्या बेकायदेशीर उत्पादनात सहभागी असलेल्या एका सिंडिकेटबद्दलच्या विशिष्ट गुप्त माहितीवरून कारवाई करताना, डीआरआय अधिकाऱ्यांनी परिसरात सतत देखरेख ठेवली. 8 एप्रिल 2025 च्या पहाटे, संशयित ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. या शोध मोहिमेत 11.36 किलो मेफेड्रोन (8.44 किलो कोरड्या स्वरूपात आणि 2.92 किलो द्रव स्वरूपात), तसेच मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि या पदार्थाच्या निर्मितीत वापरली जाणारी मोठ्या-प्रमाणात प्रयोगशाळेतील उपकरणे जप्त करण्यात आली.

छुप्या पद्धतीने मेफेड्रोनच्या उत्पादनात थेट सहभागी असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलसह पाच जणांना अटक करण्यात आली. जलद आणि समन्वित पाठपुरावा करताना, वित्तपुरवठादार आणि वितरक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणखी दोघांना मुंबईत अटक करण्यात आली.

या सातही जणांनी मेफेड्रोनच्या वित्तपुरवठा, उत्पादन आणि तस्करीमध्ये आपली भूमिका कबूल केली आहे. अवैध बाजारात सुमारे 17 कोटी रुपये किंमत असलेले 11.36 किलो मेफेड्रोन, कच्चा माल आणि उपकरणे यांचा समावेश असलेली एकूण जप्ती एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार करण्यात आली.

“महिला आयोग आपल्या दारी” तीन दिवस पुणे जिल्ह्यात महिलांनी पुढे येऊन आपल्या तक्रारी मांडाव्या- रुपाली चाकणकर यांचे आवाहन

पुणे, दि. १० : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत पुणे जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी दि. १५ ते १७ एप्रिल, २०२५ या कालावधीत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर तीन दिवस पुणे जिल्हा दौरा करणार आहेत. यावेळी पुणे शहरातील तक्रारींची सुनावणी मंगळवार, १५ एप्रिल रोजी, तर पुणे ग्रामीणसाठी जनसुनावणी बुधवार, १६ एप्रिल रोजी होणार आहे. या दोन्ही जनसुनावण्या नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे सकाळी ११ वाजता होणार आहेत. तर गुरुवार, १७ एप्रिल रोजी दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृह, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे येथे सकाळी ११ वाजता पिंपरी-चिंचवडकरिता जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील होणा-या या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या जनसुनावणीला जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबईत येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करत आहे.’
०००००

अवघ्या चार तासांमध्ये नादुरुस्त रोहित बदलले ; मांजरीतील वीजग्राहकांना दिलासा

पुणे, दि. १० एप्रिल २०२५ : उका मूळ त्रस्त वीजग्राहकांची गैरसोय दिव्य दिव्यांगाय महावितरता व दक्षिणेच्या अधिकाऱ्यांची (९) ज्याजल्या १० अंशी नादुरुस्त ध्वनिध्ये वीज पेट पूर्ववत केला. स्वत: मांजरी लढाई मोठा दिलासा.

चालू माहिती अशी की, बंडगार्डन मांजरी झेड कॉरच्या शेजारी चिंतामणी विभाग कॉलनी, मांजरी-मुंढवा कृष्णा मुख्य ३० या कृष्णा कृष्णा विरुद्ध केव्हीए प्रकाशन रोहित्र (दि. ९) ज्याजनाच्या १० सीमा बंद. सुमारे १४०० आणि व्यावसायिक ग्राहक वीज खंडित झाली. महाअभियंता व जनमित्रांनी रोहित्राची पाहणी केली ते पूर्णतः नादुरुस्त व बदलणे आवश्यक असल्याचे सांगितल्या गेले. दुसऱ्या दिवशी भयंकर मार्ग आणि पर्यायी वीज उपलब्ध होऊ शकतील असे नागरिक आहेत.

या पोलीस अधीक्षक अभियंता (प्र.) श्री. रवींद्र बुंदेले यांनी सूचना देत स्पष्टपणे रोहित्र बदलण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे रोहित्राची फिटिंग करण्यासाठी ट्रक व क्रेनची मध्यरात्री व्यवस्था करण्यात आली. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी नवीन ६३० केव्हीए रोहित्र उपलब्ध करून दिले. आठ दिवसांत १२ च्या नादुरस्त रोहित्र हटवून नवीन रोहित्र त्याचे काम सुरू केले व पहाटे ४ च्या घटना ते पूर्ण झाले. या नंतर ४.३० सीट सुरळीत झाली. या राज्यामध्ये नागरिकांनी देखील महावितरणला नियुक्त केले.

अवघ्या चार तासांमध्ये वितरण रोहित्र बदलण्याची अतिरिक्त क्रिया अभियंता रामचंद्र लोंढे, सहायक अभियंता अभिज सांगळे, जनमित्र किरण कुंभार, लालू जगवार, पंकज टेकम, शुभम बोरवली, राजू जाधव, विशाल माने, स्वराज तायडे यांनी केली. तर अतिरिक्त कार्यक्षम अभियंता वैभव खटावकर, उपकार्यकारी अभियंता फुलचंद फड, गणेश शेळके, ओंकार कुलकर्णी यांनी जारी केले.

अजितदादांवर काकांची पुण्याई आहे हे स्पष्ट- विजय वडेट्टीवार

तहव्वूर राणाला भारतात आणाण्यासाठी 15 वर्षे का लागली? मुंबईत राजकारण करत पुन्हा मतांची पोळी शेकण्यासाठी उपयोग करतील
मुंबई-

अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांचा दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो बीडच्या भाषणातही त्यांनी केला आहे. पुण्याई कोणाची तर आई-वडीलांची आणि चुलत्याची असे ते बोलले आहेत म्हणजे स्पष्ट आहे की, अजितदादांवर काकांची पुण्याई आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, तहव्वूर राणाला भारतात आणाण्यासाठी 15 वर्षे का लागली, याचे उत्तर कोण देणार. बरोबर मनपा निवडणुकीच्या तोंडावर त्याचा मुंबईत उपयोग करतील. राजकारण करत पुन्हा मतांची पोळी शेकली जाणार, ते करू नका राणाला फाशी द्या, अशी मागणीही वडेट्टीवारांनी केली आहे. हिंदू-मुस्लीम करत हमने बहोत कुछ किया असे सांगितले जाईल.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, परिस्थितीनुसार सर्वच जण बदलत आहे. अनेकांना बदलावे लागते. आता भाजपसोबत असलेली मंडळी 3 वर्षांनंतर कुठे दिसतील, पुढची निवडणूक कुणासोबत लढवतील, याचा अंदाज हळूहळू यांना येऊ लागला आहे.

अजित पवार म्हणाले की, आम्हीसुद्धा आमच्या कुटुंबात कालही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत, असे अजित पवार म्हणाले. आज देशाला मोदींसाहेबांसारखा नेता मिळाला आहे. देशाची मान जगात उंचावत आहे. त्यांच्या पाठीशी कुठेतरी राहायला हवे. म्हणून आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला, असे म्हणत अजित पवार यांनी एकप्रकारे राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचे कारणही सांगितले.दरम्यान, यापूर्वीही अजित पवार यांनी बीड दौऱ्यावर असताना एका भाषणामध्ये शरद पवारांबाबत विधान केले होते. त्यावेळी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना आपल्या स्वागतासाठी कोणतीही शाल, हारतुरे किंवा स्मृतिचिन्ह न आणण्याची विनंती केली होती. आई-बापाच्या व चुलत्याच्या कृपेने आपले खूप चांगले चालले असल्याचे ते यासंबंधी बोलताना म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली होती.

मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला भारतात आणले:दिल्लीच्या पालम विमानतळावर विशेष विमान उतरवले

26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. हे हल्ले चार दिवस चालू राहिले. या हल्ल्यांमध्ये एकूण 175 लोक ठार झाले, ज्यात नऊ हल्लेखोरांचा समावेश होता आणि 300 हून अधिक लोक जखमी झाले.

मुंबई- मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणा याला अमेरिकेतून भारतात घेऊन येणारे विशेष विमान दिल्लीत पोहोचले आहे. हे विमान दिल्लीच्या पालम टेक्निकल विमानतळावर उतरले. येथून ते तहव्वूर राणाला थेट एनआयए मुख्यालयात नेले जाईल. एनआयए मुख्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.एनआयए आणि रॉ टीमच्या सुरक्षेत राणा आज दुपारी एका खास विमानाने दिल्ली विमानतळावर उतरला. तो भारतात पोहोचताच, एनआयए टीमने त्याला अधिकृतपणे ताब्यात घेतले. यानंतर, राणाला बुलेटप्रूफ कारमधून एनआयए मुख्यालयात नेले जाईल.यानंतर राणाला पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाऊ शकते. हजर होण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल. तहव्वुर राणाला दिल्लीतील तिहार तुरुंगातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल. तुरुंग प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, राणाच्या प्रत्यार्पणाबाबत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षालाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. यासोबतच विमानतळावर SWAT कमांडो देखील तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची (CAPF) सुरक्षा शाखा आणि स्थानिक पोलिस विमानतळाबाहेर उपस्थित राहतील.केंद्र सरकारने या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अधिवक्ता नरेंद्र मान यांची नियुक्ती केली आहे. त्यांना ही जबाबदारी तीन वर्षांसाठी किंवा खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत देण्यात आली आहे.तहव्वूरने भारतात येऊ नये म्हणून अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, जी फेटाळण्यात आली. त्यांच्या याचिकेत त्यांनी स्वतःला पार्किन्सन आजाराने ग्रस्त असल्याचे सांगितले होते आणि म्हटले होते की जर त्याला भारतात पाठवले गेले तर त्यांच्यावर अत्याचार होऊ शकतात.

तहव्वूर राणा याला 2009 मध्ये एफबीआयने अटक केली होती. राणा यांना अमेरिकेत लष्कर-ए-तोयबाला पाठिंबा दिल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. आतापर्यंत त्याला लॉस एंजेलिसच्या एका डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.

दरम्यान, राणाला भारतात आणण्यासाठी गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी गृह मंत्रालयात बैठक घेतली.
मुंबई हल्ल्यात भूमिका – हेडलीला मुंबईत कार्यालय उघडण्यास मदत केली.

मुंबई हल्ल्यातील ४०५ पानांच्या आरोपपत्रात राणाचे नाव आरोपी म्हणून सूचीबद्ध आहे. त्यानुसार, राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाचा सदस्य आहे. राणा हा हल्ल्याचा मुख्य आरोपी आणि सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला मदत करत होता.
राणानेच हेडलीला मुंबईत फर्स्ट वर्ल्ड नावाचे कार्यालय उघडण्यास मदत केली होती. त्याने आपल्या दहशतवादी कारवाया लपविण्यासाठी हे कार्यालय उघडले.
एका इमिग्रेशन कन्सल्टन्सीद्वारे, हेडलीने भारतभर प्रवास करण्यास सुरुवात केली, लष्कर-ए-तैयबा दहशतवादी हल्ले करू शकते अशा ठिकाणांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
त्याने मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील ताज हॉटेलमध्ये रेकी केली. नंतर येथेही हल्ले झाले.
अमेरिकन सरकारने म्हटले- राणाची भूमिका सिद्ध झाली

अमेरिकन सरकारने म्हटले आहे की, ‘हेडलीने म्हटले आहे की, मुंबईत फर्स्ट वर्ल्डचे कार्यालय उघडण्याच्या खोट्या कथेचे सत्य सिद्ध करण्यासाठी राणाने एका व्यक्तीला हेडलीसाठी कागदपत्रे तयार करण्याचे आदेश दिले होते.’ भारताला भेट देण्यासाठी व्हिसा कसा मिळवायचा याबद्दल राणानेच हेडलीला सल्ला दिला होता. या सर्व गोष्टी ईमेल आणि इतर कागदपत्रांद्वारे सिद्ध झाल्या आहेत.

अमेरिकन न्यायालयाने यापूर्वी प्रत्यार्पणाची याचिका फेटाळली होती

१३ नोव्हेंबर २०२४ रोजी राणाने कनिष्ठ न्यायालयाच्या प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील केले, जे २१ जानेवारी रोजी फेटाळण्यात आले. यापूर्वी त्याने सॅन फ्रान्सिस्को न्यायालयात अपील केले होते, जे फेटाळण्यात आले. दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवता येईल, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते.

तहव्वुरच्या प्रत्यार्पणासाठी भारताने उचलली ५ पावले

२०११ मध्ये, भारताच्या एनआयएने राणाविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.
भारताने सर्वप्रथम ४ डिसेंबर २०१९ रोजी राजनैतिक माध्यमातून राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली.
१० जून २०२० रोजी राणा यांच्या तात्पुरत्या अटकेची मागणी केली.
फेब्रुवारी २०२१ मध्ये, भारताने अधिकृतपणे अमेरिकेच्या न्याय विभागाला प्रत्यार्पणाची मागणी करणारा एक पत्र पाठवले.
२२ जून २०२१ रोजी अमेरिकेच्या संघीय न्यायालयात राणाच्या प्रत्यार्पणावरील सुनावणीदरम्यान भारताने पुरावे सादर केले.गेल्या वर्षी सरकारी वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला होता की तहव्वूर हा हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडलीचा बालपणीचा मित्र होता. तहव्वुरला माहित होते की हेडली लष्कर-ए-तोयबासोबत काम करत आहे. हेडलीला मदत करून आणि त्याला आर्थिक मदत देऊन, तेहव्वुर दहशतवादी संघटना आणि तिच्याशी संबंधित दहशतवाद्यांना पाठिंबा देत होता.

हेडली कोणाला भेटत होता आणि तो काय बोलत होता याची माहिती राणाकडे होती. त्याला हल्ल्याची योजना आणि काही लक्ष्यांची नावेही माहित होती. अमेरिकन सरकारने म्हटले आहे की राणा हा या संपूर्ण कटाचा भाग होता आणि दहशतवादी हल्ल्याला निधी देण्याचा गुन्हा त्याने केला असण्याची दाट शक्यता आहे.

तहव्वुर हा पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर होता, कॅनेडियन नागरिक होता.

६४ वर्षीय तहव्वुर हुसेन राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे. तहव्वुर हुसेन हे पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम करत होते. त्यानंतर १९९७ मध्ये ते कॅनडाला गेले आणि तिथे इमिग्रेशन सेवा देणारे व्यावसायिक म्हणून काम करू लागले.
कॅनडाहून तो अमेरिकेत गेला आणि शिकागोसह अनेक ठिकाणी फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस नावाची कन्सल्टन्सी फर्म उघडली. अमेरिकन न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, राणाने कॅनडा, पाकिस्तान, जर्मनी आणि इंग्लंडला अनेक वेळा भेट दिली. तो सुमारे ७ भाषा बोलू शकतो.
राणाला ऑक्टोबर २००९ मध्ये अटक करण्यात आली होती

ऑक्टोबर २००९ मध्ये, एफबीआयने तहव्वुर राणाला अमेरिकेतील शिकागो येथील ओ’हेअर विमानतळावरून अटक केली. मुंबई आणि कोपनहेगनमधील दहशतवादी हल्ले करण्यासाठी आवश्यक साहित्य पुरवल्याचा आरोप त्याच्यावर होता. हेडलीच्या साक्षीच्या आधारे, तहव्वुरला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

२०११ मध्ये, राणाला डॅनिश वृत्तपत्र मॉर्गेनाव्हिसेन जिलँड्स-पोस्टेनवर हल्ला करण्याचा कट रचल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. या वृत्तपत्राने २००५ मध्ये पैगंबर मुहम्मद यांच्यावरील १२ वादग्रस्त व्यंगचित्रे प्रकाशित केली होती. या हल्ल्यात एका व्यंगचित्रकाराचा शिरच्छेद करण्यात आला होता.

पुढच्याच वर्षी, ‘चार्ली हेब्दो’ नावाच्या फ्रेंच मासिकाने हे १२ व्यंगचित्र प्रकाशित केले, ज्याचा बदला म्हणून २०१५ मध्ये चार्ली हेब्दोच्या कार्यालयावर हल्ला करून १२ लोक मारले गेले.

शून्य साइड इफेक्ट्स असलेले नैसर्गिक, क्रांतीकारी, वजन कमी करणारे उत्पादन

नैसर्गिक जीएलपी – 1 सायन्सवर आधारितप्रती महिना २००० रुपयांच्या वाजवी किंमतीत उपलब्ध

मुंबई – भारत आरोग्याशी संबंधित एका महत्त्वाच्या समस्येच्या गंभीर दुष्परिणामांना सामोरं जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. देशात सर्व वयोगटात ओबेसिटी- स्थूलत्वाचा दर वेगाने वाढत असून त्यामुळे मधुमेह, हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे विकार यांच्याशी संबंधित लवकर मृत्यूचे प्रमाणही धोकादायक प्रमाणात वाढत आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार (NFHS-5) अंदाजे २४ टक्के स्त्रिया आणि २२.९ टक्के पुरुषांचा स्थूल गटात समावेश झाला आहे.

गुड बग या गट हेल्थ क्षेत्रात भारतातील पायोनियरिंग ब्रँडने क्रांतीकारी, नाविन्यपूर्ण वैज्ञानिक उत्पादन तयार केले असून ते वेटलॉस क्षेत्रात क्रांती घडवून आणेल. गुड बगचे अडव्हान्स्ड मेटाबॉलिक सिस्टीम हे विज्ञानातील नैसर्गिक जीएलपी – उत्पादन वजन कमी करण्यासाठी शाश्वत आणि वैज्ञानिक उपाय देणारे आहे. या क्रांतीकारी उत्पादनाला विज्ञानाचा आधार लाभला असून त्यासाठी करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचण्यांमधून ९० दिवसांत वजनात १२.०१ टक्के घट होतेकमरेचा घेर ९.६४ टक्क्यांनी कमी होतो आणि बीएमआयमध्ये १२.१४ टक्के घट होते असे दिसून आले आहे.

द गुड बगचे सह- संस्थापक केशव बियाणी म्हणाले, ‘आधुनिक मायक्रोबायोम संशोधनाद्वारे विकसित करण्यात आलेल्या अडव्हान्स्ड मेटाबॉलिक सिस्टीममध्ये वैद्यकीय पातळीवर चाचणी घेण्यात आलेले प्रोबायोटिक्स आणि नैसर्गिक जीएलपी – 1 द्वारे प्रीबायोटिक्स सक्रिय करणारे योग्य मिश्रण देण्यात आले आहे. या उत्पादनामुळे एरवी वजन कमी करणाऱ्या औषधांशी संबंधित इतर चुकीचे साइड- इफेक्ट्स होत नाहीत. या उत्पादनाच्या लाँचसह वैज्ञानिक वैद्यकीय चाचण्यांद्वारे सिद्ध करण्यात आलेले, जागतिक पातळीवर अशाप्रकारे  पहिले नाविन्यपूर्ण आणि ९० दिवसांत १२ टक्के वजन कमी करणारे उत्पादन सादर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. गट हेल्थ क्षेत्रातील पायोनियर कंपनी या नात्याने आम्ही स्थूलत्वामागे गट बायोम कंपोझिशनमधील असमतोल हे प्रमुख कारण असल्याचे ओळखून कित्येक वर्षांच्या संशोधनासह हे उत्पादन तयार केले. या उत्पादनामुळे जीएलपी – 1 आणि जीएलपी नैसर्गिकपणे वाढून वजन कमी होण्यास मदत होते. आमच्यासाठी हे मोठे वैज्ञानिक संशोधन असून ते पूर्णपणे भारतात शोधण्यात, विकसित करण्यात व बनवण्यात आले आहे. हे उत्पादन जागतिक क्षेत्रावरील वजन व्यवस्थापन क्षेत्राची समीकरणे नव्याने प्रस्थापित करेल.’

इतर फार्मास्युटिकल जीएलपी- 1 अगोनिस्टचे बरेच साइड इफेक्ट्स असतात व त्यावर अवलंबून राहावे लागते. गुड बगची अडव्हान्स्ड मेटॅबॉलिक सिस्टीम नैसर्गिकपणे शरीरातील जीएलपी – 1 पातळी वाढवते, दीर्घकाळापासून गटमध्ये असलेली जळजळ कमी करते. पर्यायाने भूक नियमित होते, सतत खाण्याची इच्छा कमी होते व वजन आणि आरोग्यात शाश्वत बदल होतात. हेल्थकेयर क्षेत्रातील व्यावसायिकांनी विश्वास दर्शवलेले हे उत्पादन वजन व्यवस्थापनासाठी शाश्वत आणि नैसर्गिक उपाय देणारे आहे. गुड बगने हे उत्पादन अमेरिकेसह इतर जागतिक बाजारपेठांत नेण्याचे ठरवले आहे.

मणीपाल हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार आणि ट्रायलचे प्रमुख इन्व्हेस्टिगेटर डॉ. एम. के. एन. मनोहर म्हणाले, ‘वैद्यकीय चाचणीमध्ये दिसून आलेल्या रिझल्ट्सची आकडेवारी लक्षणीय होतीच, शिवाय वैद्यकीयदृष्ट्या अर्थपूर्ण होती. त्यांची सध्या उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम औषधांशी तुलना करण्यासारखी आहे. यातील उल्लेखनीय गोष्ट म्हणजे खाण्याच्या सतत इच्छेत – क्रेव्हिंग्जमध्ये होणारी घट आणि वाढलेले समाधान. ९० टक्के सहभागींनी त्यांच्या क्रेव्हिंग्जमध्ये घट झाल्याचे सांगितले, तर ९५ टक्के जणांनी भूक कमी लागत असल्याचे मत नोंदवलेय यावरून सिथेंटिक जीएलपी- 1 औषधांने काय होते हे दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही प्रकारचे चुकीचे साइड इफेक्ट्स दिसून आले नाहीत. या चाचण्यांमध्ये भूक, समाधान व उर्जेत चांगली सुधारणा दिसून आली.’

ते पुढे म्हणाले, ‘स्थूलत्व ही निद्रिस्त महामारी बनली असून कोविडमुळे त्याला चालना मिळाली आहे. जीवनशैलीत केले जाणारे बदल आणि शस्त्रक्रिया यात मोठी दरी आहे. वैज्ञानिक पुराव्यांतून सातत्याने असे दिसून आले आहे, की गट मायक्रोबायोम हे मेटबॉलिक व शाश्वत वजन व्यवस्थापनाचा प्रमुख स्तंभ आहे. साइड इफेक्ट्स असणाऱ्या इतर सिंथेटिक उत्पादनांच्या तुलनेत द गुड बगसारखे संशोधनाअंती तयार करण्यात आलेले प्रोबायोटिक फॉर्म्युलनेशन गट बॅक्टेरिया व शरीराचे मेटाबॉलिझम पचनक्रिया यांच्यातील नैसर्गिक समतोल साधते.’

दरमहा २००० रुपये किंवा तीन महिन्यांसाठी ५००० रुपयांत उपलब्ध असलेले द गुड बगचे हे उत्पादन ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि रिटेल स्टोअर्समध्ये खरेदी करता येईल. संशोधनावर आधारित परिणामकारकता आणि पारदर्शकता यावर भर देणारे द गुड बग गट हेल्थ आणि एकंदर स्वास्थ्याची भूमिका नव्याने तयार करत आहे.

द गुड बगचे सह- संस्थापक प्रभू कार्तिकेयन म्हणाले, ‘मायक्रोबायोम सायन्सचा परिणाम केवळ पचनाच्या आरोग्यावरच होतो असे नाही, तर मेटाबोलिक आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य, कॉग्निटिव्ह स्वास्थ्य यांच्यावरही त्याचा परिणाम होत असतो. मायक्रोबायोम संशोधन आणखी सखोल होईल तसा आरोग्यसेवा क्षेत्राला नवा आयाम मिळेल. आम्ही या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी बांधील आहोत. आधुनिक प्रोबायोटिकच्या मदतीने ग्राहकांसाठी सातत्याने उत्पादने तयार करण्यासाठी, विज्ञानावर आधारित उत्पादनांच्या मदतीने आपल्या आरोग्यावर नियंत्रण मिळवणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही लाँच करत असलेल्या उत्पादनाचा देशातील ओबेसिटी परिस्थितीवर कशाप्रकारे परिणाम होतो यात आम्हाला मोठी संधी दिसून येत आहे.’

स्थूलत्व ही गंभीर समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अँटी- ओबिसिटी मोहीम लाँच केली. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) माहितीनुसार १८० दशलक्षांपेक्षा जास्त भारतीयांची २०२१ मद्ये जास्त वजन असेलले किंवा स्थूल म्हणून गणना करण्यात आली होती. ही आकडेवारी २०५० पर्यंत ४०० दशलक्षांपर्यंत जाईल असे अभ्यास अहवालांतून दिसून आले आहे.

२९९८.३३ कोटीचा महसूल मिळविला,५९९५ गुन्हे दाखल,५८९१ आरोपींना केली अटक: राज्य उत्पादन शुल्कची पुणे जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई

पुणे जिल्हयामध्ये अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुध्द राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाकडुन केलेली कारवाई.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसुली उत्पन्न, गुन्हा अन्वेषण व विविध अनुज्ञप्त्यांवर सन २०२३-२४ सालापेक्षा भरीव कामगिरी केली आहे.

डॉ. राजेश देशमुख (भाप्रसे), आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई व श्री. जितेंद्र डूडी (भाप्रसे), जिल्हाधिकारी, पुणे तसेच सागर धोमकर, विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने जमा महसुल मध्ये सन २०२४-२५ या वर्षामध्ये सन २०२३-२४ च्या तुलनेत ९.८५ % वाढ नोंदविलेली आहे. सन २०२३-२४ मध्ये पुणे जिल्हयाचा महसुल रु. २७२९.४४ कोटी इतका जमा झाला होता. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये रु. २९९८.३३ कोटी इतका महसुल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.

गुन्हा अन्वेषणाच्या कामगिरीमध्ये पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुलक विभागाने सातत्य राखले आहे. माहे एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या काळामध्ये अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री विरुध्द एकुण ५९९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ५८९१ आरोपींना अटक करण्यात आली असून ६२१ वाहने जप्त करण्यात आली. तसेच रु. २५.८० कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गत वर्षी विभागाने एकुण ३९८८ गुन्हे दाखल केले होते. एकुण ३६०४ आरोपीना अटक करुन त्यांच्या ताब्यातुन ४२२ वाहनासह रु. १८.४७ कोटी चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. चालु वर्षी गुन्हा अन्वेषणाच्या कामगिरीमध्ये मागील वर्षेच्या तुलनेत ४०% वाढ झालेली आहे.

तसेच विभागाने प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ नुसार सराईत गुन्हेगारांविरुध्द एकुण ५७७ प्रस्ताव संबंधित दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. तसेच सराईत गुन्हेगाराकडून चांगल्या वर्तणूकीचे एकुण २९९ बंधपत्र घेण्यात आलेले आहे. त्यापैकी २९९ प्रकरणामध्ये रु. २ कोटी १८ लाख किंमतीच बंधपत्र घेण्यात आलेले आहेत. तसेच एम.पी.डी.ए कायदा १९८१ अंतर्गत दाखल केलेल्या एकूण ०९ प्रस्तावांपैकी ०१ प्रकरणात सराईत गुन्हेगाराविरुध्द स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध अनुज्ञप्तींचे सखोल निरीक्षण करण्यात येते, जे अनुज्ञप्तीधारक ठरवुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर विभागीय गुन्हे नोंद केले जातात. सन २०२४-२५ मध्ये अशा एकुण ५६९ अनुज्ञप्तीविरुध्द विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये ०४ अनुज्ञप्त्या कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत. तसेच सदर विभागीय विसंगती प्रकरणामध्ये रु. १ कोटी ८६ लाखाचा दंड अनुज्ञप्तीधारकांकडून वसुल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ व ८४ नुसार अवैध धाब्यांवर मद्य विक्री करणाऱ्या विरुध्द तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकान विरुध्द एकुण ४५५ गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकुण १२५० आरोपींना अटक करण्यात आली आहे. मा. न्यायालयाद्वारे आरोपींना एकुण रु. ८,१९,०००/- द्रव्य दंड ठोठविण्यात आलेला आहे. यामुळे केवळ अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरुध्दच कारवाई न करता त्यासोबत सदर ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यां विरुध्द सुध्दा कारवाई करण्यात आलेली असल्यामुळे सदर अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांना सुध्दा चाप बसणार आहे.

पुणे जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री तसेच परराज्यातील मद्य/अवैध ढाबे/अवैध ताडी विक्री विरुध्द कारवाई कठोर कारवाई करण्यासाठी एकुण २१ पथकांना निर्देश देण्यात आलेले असून अवैध मद्य व्यवसाया विरुध्द कारवाई करण्यात येत आहे. सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांना अवैध मद्य निर्मिती/विक्री/वाहतुक किंवा मद्य वाटप इ. संबंधी माहिती/तक्रार दयावयाची असल्यास टोल फ्री क्रमांक. १८००२३३९९९९ व अधीक्षक कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक. ०२०-२६१२७३२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.