Home Blog Page 3655

सारसबागेत रंगली दिवाळी पहाट

0

पुणे : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सारसबागेत नृत्य-गीतांच्या बरसातीत दिवाळी पहाट रंगली. दिवाळीच्या उत्साहात सामाजिकतेची जाणीव ठेवून या वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई)च्या पुणे विभागाने या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बासरीवादक रोहित वनकर, व्हायोलिनवादक तेजस उपाध्ये व तबलावादक मिलिंद उपाध्ये यांच्या जुगलबंदीला भैरवी रागाने प्रारंभ झाला. प्रसिद्ध कथक कलावंत मनीषा साठे यांच्या शिष्या शांभवी देशपांडे आणि त्यांच्या सहकारी कलावंतांनी वर्षाऋतूवर आधारित नृत्याविष्कार सादर केला. तेजस्विनी साठे दिग्दर्शित आणि विक्रम घोष यांच्या संगीतावर आधारित फ्युजनवर नेहा कर्वे, शर्वरी भिडे, भक्ती झळकी व ऐश्‍वर्यासाने या कलावंतांनी सादर केलेल्या कथक नृत्याने रसिकांची मने जिंकून घेतली.
प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरूक व त्यांच्या सहकार्‍यांनी रसिकांना ‘गीतों का सफर’चा अनुभव दिला. विजय कुलकर्णी, माधवी देसाई, सौरभ सांळुके, अली हुसेन, धनश्री गणात्ना, जितेंद्र भुरुक यांनी गाणी सादर केली.
शांतिलाल सुरतवाला यांनी प्रास्ताविक केले. महापौर दत्ता धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित निंबाळकर, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, माजी नगरसेवक गोपाळ चिंतल उपस्थित होते. मोनिका जोशी यांनी सूत्नसंचालन केले. आनंदऋषीजी ब्लडबँकेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरांत १५२ दात्यांनी रक्तदान के

मेडिक्लेम पॉलिसी प्रकरणी दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला ग्राहक मंचाचा दणका

0

पुणे : उपचार करणारे डॉक्टर हे बीएएमएस असून, त्यांना अँलोपॅथिक उपचार करण्याचा अधिकार नसल्याच्या कारणावरून विमा कंपनीने क्लेम नाकारला होता. वैद्यकीय अधिकारी मान्यताप्राप्त असतानाही चुकीच्या पद्धतीने विमा नामंजूर केल्याने विमा कंपनीने तक्रारदाराला ३७ हजार ८२९ रुपये देण्याचा ग्राहक मंचाने आदेश दिला.
विलास शिवाजी खंडागळे (मु. पो. उरुळी कांचन, तुपे वस्ती, ता. हवेली) यांनी दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे, पुणे-मुंबई रस्ता, वाकडेवाडी, शिवाजीनगर यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. खंडागळे व त्यांच्या पत्नी हे निसर्ग उपचार आश्रम ट्रस्ट, उरुळी कांचन येथे २००० पासून कायमस्वरूपी स्वयंपाकी विभागात काम करीत आहेत. त्यांच्या संस्थेने कामगार व त्यांच्या कुटुंबाची ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी काढलेली आहे. ही पॉलिसी १२ वर्षांपासून असून, दर वर्षी नूतनीकरण केले जाते. दरम्यान, वडिलांचा मृत्यू झाला म्हणून जुलै २०१२ मध्ये खंडागळे हे शेतीच्या कामासाठी सोलापूर येथील माढा गावी गेले होते. त्या वेळी त्यांना माढा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. या उपचाराचा खर्च मिळविण्यासाठी त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून बिलाच्या रकमेच्या प्रतिपूर्तीसाठी निसर्ग आश्रम ट्रस्टतर्फे मेडिक्लेमसाठी अर्ज केला. मात्र, ओरिएंटल कंपनीने खंडागळे यांनी ज्या डॉक्टराकडे उपचार घेतले ते डॉक्टर बीएएमएस असून, त्यांना अँलोपॅथिक उपचार करण्याचा अधिकार नाही, या कारणावरून २९ हजार ८२९ रुपयांचा क्लेम नामंजूर केला. मात्र, खंडागळे यांनी राज्य शासनाचे राजपत्र दाखल केले. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने २५ नोव्हेंबर १९९२पासून महाराष्ट्र प्रॅक्टीशनर अँक्ट, १९६१ लागू केलेला असून, सर्व बीएएमएस डॉक्टरांना अँलोपॅथिक उपचार व औषधांचा वापर करण्यास परवानगी दिलेली आहे. हे कागदपत्र जोडलेला असतानाही क्लेम नाकारला.ग्राहक मंचाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकले. कंपनीच्या मते ज्या वैद्यकीय अधिकार्‍याकडे उपचार घेतले आहेत तो वैद्यकीय अधिकारी राज्य मेडिकल कौन्सिल किंवा केंद्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तक्रारदार यांनी ज्या वैद्यकीय अधिकार्‍याकडे उपचार घेतले आहेत, हे बीएएमएस आहेत व त्यांनी मेडिकल कौन्सिलकडे नोंदणीही केलेली आहे. राजपत्रानुसार ते अँलोपॅथिक व्यवसाय करू शकतात. त्यामुळे त्यांनी दूषित सेवा दिलेली आहे. तक्रारदारांच्या बिलाची २९ हजार ८२९ रूपये, मानसिक त्रासासाठी ४ हजार व तक्रारीच्या खर्चासाठी ४ हजार रूपये देण्याचा मंचाने विमा कंपनीला आदेश दिला.

विद्यार्थिनीची पेटवून घेऊन आत्महत्या

0

पुणे- भोर तालुक्याच्या हद्दीत पुणे-सातारा महामार्गावरील एका वाडीत राहणाऱ्या १५ वर्षाच्या विद्यार्थिनीने प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध असल्यामुळे पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता शिंदेवाडी येथे तिने पेटवून घेतले असून, तिच्या घरच्यांनी मृत्यूची माहिती पोलिसांना न देता तिच्यावर अंतिम संस्कार केले. पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर अंत्यविधी उरकण्यात आल्यामुळे प्रकरणाबाबत संशय वाढला आहे याविषयी राजगड पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. मात्र पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे सांगितले आहे.
प्राजक्ता (वय १५) असे पेटवून घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेत भाजून तिचा मृत्यू झाला. गुरुवारी या परिसरात या प्रकाराची वार्ता पसरल्यामुळे तेथे ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली. पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राजक्ता इयत्ता नववीत शिक्षण घेत होती. घराशेजारी राहणारा तरुण रवि (वय २१) या तरुणासोबत तिचे गेल्या दीड महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणाला तिच्या आईवडिलांचा विरोध होता आणि त्यांनी प्राजक्ताला प्रेमप्रकरण संपवण्याबाबत दोन-तीन वेळा समज दिली होती.रवि हा एका खासगी कंपनीत नोकरी करीत असून, बुधवारी सायंकाळी ते एकमेकांशी गप्पा मारत बसले होते. हे प्राजक्ताच्या आईने पाहिले. यानंतर तिने रविच्या कुटुंबीयांना घरी बोलावून घेतले होते. त्यांनी प्राजक्ताला हे वय प्रेम करण्याचे नसून वयात आल्यानंतर लग्न लावून देण्याचे आश्‍वासन दिले. ही चर्चा सुरू असतानाच प्राजक्ता शेजारच्या खोलीत गेली आणि तिने अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेतले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली व रात्री साडेनऊच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. हा प्रकार घडल्यानंतर तिच्या आईवडिलांनी याची माहिती पोलिसांना देणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी कोणालाही काही न सांगता त्याच रात्री साडेबारा वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

पोलिस रेकॉर्ड वर २८८ पैकी १६५ आमदारांवर गंभीर गुन्हे

0

मुंबई –
महाराष्ट्र विधानसभेतील २८८ नवनिर्वाचित आमदारांपैकी तब्बल १६५ जणांवर वेगवेगळे गुन्हे दाखल असून त्यातील ११५ आमदारांवर चक्क हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, दरोडा व अपहणाचाही ठपका आहे, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थेच्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. पक्षनिहाय आकडेवारी पाहिल्यास ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणविणारा भाजप गुन्हे दाखल असलेल्या आमदारांच्या यादीत आघाडीवर आहे. भाजपच्या १२२ आमदारांपैकी ४६जणांवर गुन्ह्यांची नोंद आहे. तर शिवसेनेच्या ६३ पैकी ३५ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. संख्येच्या बाबतीत भाजप पुढे असला तरी गुन्हे दाखल असलेल्या आमदारांच्या टक्केवारीत शिवसेना पुढे आहे. शिवसेनेमध्ये सर्वाधिक ५६ टक्के आमदार ज्य्च्यावर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादीचे ४४ टक्के तर काँग्रेसच्या २४ टक्के आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.
नवनिर्वाचित २८८ आमदारांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास करून ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थेने हा अहवाल सादर केला आहे. २००९च्या तुलनेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आमदारांचा टक्का वाढल्याचं चित्र आहे.

आता खेळ सत्ता स्थापनेचा…

0

मुंबई- उंदरा -मांजराचा ; मान पानाचा खेळ ; अफजलखान-निजामशाहीच्या वक्तव्यांचा खेळ मतमोजणीनंतर संपला असून आता सत्ता स्थापनेचा खेळ सुरु झाला आहे शिवसेना -भाजप सत्तेसाठी पुन्हा एकत्र येत आहेत तर नरेंद्र मोदी ‘वन म्यान शो ‘आणि अमित शहा त्याचा उजवा हात असलेली भाजप ने गडकरी यांच्या समर्थकांचाही आवाज बंद केला आहे आता भाजपा शिवसेनेला १४ मंत्रीपदे देण्यास तयार झाल्याचे वृत्त आहे . ४३ मंत्रीपदाचे वाटप दोनास एक या प्रमाणात मंत्रीपदाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार भाजपाच्या वाट्याला २८ तर शिवसेनेच्या वाट्याला १४ मंत्रीपदे येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपद भाजपाकडे राहाणार असून उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय अजून झालेला नाही. शिवसेना उपमुख्यमंत्रीपद मागत असली तरी भाजपा नेते त्यासाठी तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अशी माहिती सूत्रांनी येथे दिली
राज्यातील अनेक आमदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री करण्यासाठी फील्डिंग लावल्यामुळे निर्माण झालेली गोंधळाची स्थिती गुरुवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निवळली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी गडकरी वाड्यावर जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर ‘आपण दिल्लीतच खुश असून केंद्र सरकारमध्येच काम करण्यास उत्सुक आहोत’, अशी स्पष्टोक्ती खुद्द गडकरी यांनीच दिली. दरम्यान, शिवसेनेनेही भाजपला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी होण्याचे मान्य केल्याने राज्यात भाजप- शिवसेनेचेच सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे.
फडणवीस हे माझे सहकारी असून दिवाळीनिमित्त ते आपणाला भेटण्यासाठी आले होते, असे गडकरी यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर आपण दिल्लीतच खुश असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. या भेटीनंतर दोनच तासांनी नागपुरातील विदर्भ विभागीय भाजप कार्यालयात गडकरी व फडणवीस या दोन्ही नेत्यांसह पक्षाचे प्रमुख नेते व पदाधिका-यांची दिवाळीनिमित्त स्नेहमिलन झाले. यावेळी गडकरी व फडणवीस या दोन्ही नेत्यांनी पदाधिका-यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा केल्या.
भाजपच्या विजयाचा आनंदही साजरा केला. याआधीही गडकरी यांनी दिल्लीत खुश असल्याचे सांगितले होते मात्र आपण राज्याच्या राजकारणात परतायचे की नाही, याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घ्यायचा आहे, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची आपली तयारी आहे, अशी जोड दिली होती. पक्षाचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना अनुकूल असल्याचे सूत्रांनी सांगितले. २८ तारखेला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपला पाठिंबा देण्यास शिवसेनाही तयार झाली आहे. शिवसेना प्रवक्ते अनिल देसाई म्हणाले, एकत्र सत्ता स्थापनेबाबत एकमत झाले असून मंत्रीपदाबाबत अजून आमची चर्चा सुरु झालेली नाही. दिवाळीनंतर रविवारी किंवा सोमवारी याबाबत चर्चा सुरु होईल. कोणताही प्रस्ताव भाजपाला दिलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पंतप्रधानांनी रविवारी आयोजित केलेल्या स्नेहभोजनास शिवसेना गटनेते आणि अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना उपस्थित राहाण्यास उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिल्याची माहिती अनिल देसाई यांनी दिली. उद्धव ठाकरेही स्नेहभोजनाला उपस्थित राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
भाजपा गृह, अर्थ, सार्वजिनक बांधकाम, पाटबंधारे, ऊर्जा ही महत्वपूर्ण खाती आपल्याकडे ठेवणार असून दुग्धविकास, महिला बाल विकास, आदिवासी अशी मंत्रीपदे शिवसेनेला दिली जातील. उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेला हवीत 14 मंत्री पदे

0

नवी दिल्‍ली -शिवसेनेने नव्या सरकारमध्ये१४ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. भाजपने मात्र केवळ 9 मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्‍ट्रात सरकारन स्थापन करण्यासाठी शिवसेनेने भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींतर्फे एनडीए नेत्यांसाठी आयोजित केलेल्या डिनसमध्ये सहभागी होणार आहेत. शिवसेना आणि भाजप दोघांचाही उद्देश राज्यात स्थिर सरकार देणे हा असल्याचेही शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
भाजपबरोबर सत्ता स्थापनेच्या संदर्भात शिवसेनेकडून अनिल देसाई हे प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. भाजप २:१ चा फॉर्म्युला ठरवत असल्याने आमचे१४मंत्रि असू शकतात अशी शक्यता देसाईंनी व्यक्त केली आहे. पण हा केवळ अंदाज असून याबाबतचा अंतिम निर्णय २७ ऑक्टोबरला उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात भेट झाल्यानंतरच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांबाबतच्या प्रश्नावर त्यांना अधिक जागा मिळाल्या असल्याने हा निर्णय त्यांच्याकडे असेल असे देसाई म्हणाले.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार याचा फैसला २७ ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर संसदीय पक्षाचा नेता निवडल्यानंतर २८ ऑक्टोबरला शपथविधी होण्याची शक्यता आहे.

गोखलेनगरमध्ये जंजीरा किल्ल्याची प्रतिकृती

0

2

पुणे, ता. 23 : गोखलेनगरमधील सुयोग मित्र मंडळाने दिवाळीनिमित्त जंजीरा या सागरी किल्ल्याची प्रतिकृती साकारली असून, तो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. गणेश ओरसे, अक्षय माने, शुभम वाईकर, निलेश मांडवकर, निरंजन गोरडे, अथर्व जोशी, अभिषेक पवार, विकास मापुसकर, आशीष माने यांनी किल्ला साकारण्यासाठी विशेष परिश्रम केले.

बिशप थोमस डाबरे यांच्या वाढदिवसानिमित काश्मीर पूरग्रस्तासाठी आर्थिक मदत निधी

0

1
पुणे धर्मप्रांताचे बिशप थोमस डाबरे यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित आज त्यांच्या बिशप हाउसमध्ये त्यांना शुभेछा देण्यासाठी गर्दी केली होती . सेंट पेट्रीक्स चर्चच्या आवारातील बिशप हाउसमध्ये त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी
पुणे धर्मप्रांताचे विकार जनरल फादर माल्कम सिक़्वेरा , नितीन डिसोझा ,विद्याभवन शाळा आणि महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक रेव्हरंड फादर गोडविन सलढाणा ,शीतल डिसोझा, फादर व्ही. लुइस , सिस्टर्स , तसेच विद्या भवन शाळेमधील विद्यार्थी , शिक्षक वर्ग आणि ख्रिस्त बांधव उपस्थित होते .
यावेळी पुणे धर्मप्रांताचे बिशप थोमस डाबरे यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित पुणे धर्मप्रांताच्या अंतर्गत असलेल्या २८ शाळा आणि २ महाविद्यालयामधून विद्यार्थीकडून काश्मीर मधील पूरग्रस्तासाठी आर्थिक मदत निधी गोळा करण्यात आला . हा जमा झालेला आर्थिक निधी काश्मीर मधील कारीतारा इंडिया या सामाजिक संस्थेकडे देण्यात येणार आहे . त्या संस्थेच्या माध्यमातून काश्मीर मधील पूरग्रस्ताना मदत देण्यात आहे , अशी माहिती पुणे धर्मप्रांताचे विकार जनरल फादर माल्कम सिक़्वेरा यांनी दिली .
यावेळी पुणे धर्मप्रांताचे बिशप थोमस डाबरे यांनी आपले वाढदिवसानिमित आणि दीपावलीनिमित शुभेछा देताना सांगितले कि , दिवाळीचा सण , सत्याचा प्रकाश देऊन येत असतो , सत्याची प्रेरणा , हे दिवाळीचे प्रमुख उद्दिष्ट . प्रकाश हे सत्याचे प्रतिक आहेत , आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सत्याला प्रथम स्थान देतो , हाच दिवाळीचा संदेश आहे . विषमता , स्त्रियांवरील अत्याचार , मुलांचे कुपोषण आणि मुलांच्या जडण घडणीकडे दुर्लक्ष , समाजातील भीषण गरिबी आणि भ्रष्टाचार एकूण नैतिकतीचे अधिपतन हे सारे सत्याशी आणि दिवाळीची मूळ प्रेरणेशी विसंगत आहे आणि आपण निपटून काढण्यासाठी पुढे येऊ या . प्रभू येशु ख्रिस्ताची प्रेरणा हि सगळ्यांना मदत करण्याची आहे , त्यासाठी पुणे धर्मप्रांताच्या अंतर्गत असलेल्या २८ शाळा आणि २ महाविद्यालयामधून विद्यार्थीकडून काश्मीर मधील पूरग्रस्तासाठी आर्थिक मदत निधी गोळा करण्यात आला . हि मदत करताना समाजासाठी असणारी आपली सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचे ऋण आपण फेडत आहोत .यावेळी पुणे धर्मप्रांताचे विकार जनरल फादर माल्कम सिक़्वेरा यांनी पुणे धर्मप्रांताचे बिशप थोमस डाबरे यांना दीर्घायुष्य लाभो , यासाठी प्राथर्ना केली .

पहाटेच्या काकड आरतीचे स्वर गुंजू लागले कानी

0

भवानी पेठ मधील भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिरात पहाटेच्या काकड आरतीचे सूर घुमत असल्याने पहाटेचे वातावरण भक्तिमय व प्रसन्न होत असून, दीपावलीच्या सणात रंग भरले जात आहेत. येथील संत सावतामाळी भजनी मंडळाचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी कोजागरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा या कालावधीत सर्वच ठिकाणी या आरतीचे आयोजन होत असल्यामुळे फार पूर्वीपासून होत असलेल्या या काकडारतीला विशेष महत्त्व असल्याचे वारकरी संप्रदायातील काही जाणकरांकडून सांगण्यात येते.विठ्ठल मंदिरात संत सावतामाळी भजनी मंडळाची काकडारती झाली . यावेळी सर्वाच्या कपाळाला चंदनाची उटी आणि बुक्का लाऊन स्वागत करण्यात येत होते . यावेळी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीस तुळशी फुलांचे हार घालून सजावट करण्यात आली होती .

यामध्ये विणेकरी दीपक चव्हाण , मंडळाचे अध्यक्ष ज्ञानोबा घोड , टाळकरी नंदकुमार जगताप , दत्तात्रय घोड , पंढरीनाथ कोंढरे , राहुल कोंढरे , अशोक साळुंके , चंद्रशेखर चिंचवडे , गुलाबराव जगताप , सुधीर पाटील , प्रमोद बेंगरूट , दत्तात्रय गोळे , महिला भजनकरी ताराबाई बेंगरूट, चंद्रकला भोसले , ताराबाई क्षीरसागर , कुंदा बेंगरूट , छाया कोलते , शशिकला राउत , ज्योती कोंढरे , सरस्वती ढमाले , उज्वला कोरे , मयुरी कोंढरे , अश्विनी कोंढरे आदी सहभागी झाले होते .

या काकडारतीमध्ये तुझीआण वाहिण गा देवराया …. , बहु आवडीसी जीवा पासोनिया । कर जोडोनी विनविता तुम्हा । तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा …. , करुनी विनवणी पापी ठेवितो माथा । परिसावी विनंती माझी पंढरीनाथ तारा … या अभंगाचे गायन करण्यात आले . शेवटी सर्वाना प्रसाद देण्यात आला .

दीपावलीनिमित स्वराज्य ग्रुपच्यावतीने उभारला किल्ला

0

killa

दीपावलीनिमित पुणे कॅम्प मधील जुना मोदीखाना भागातील स्वराज्य ग्रुपच्यावतीने भव्य किल्ला बांधण्यात आला . हा किल्ला स्वराज्य ग्रुपचे बाल कार्यकर्ते प्रथमेश जाधव , एल्ड्रिक डायस , अभिजित वाघमारे , फ़ेवियन करवालो , महिमा शिरसाठ आदींनी उभारण्यासाठी विशेष परिश्रम घेतले . या किल्ल्यावर विविध चित्रे मांडण्यात आली आहे . पुणे कॅम्प भाग कॉस्मोपोलीटन भाग असल्याने हा किल्ला बांधण्यासाठी सर्व धर्मातील बाल कार्यकर्ते सहभागी झाले होते .छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांना बरोबर घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले . त्याच पद्धतीने पुणे कॅम्प भागात छत्रपती शिवाजी महाराज माहिती सर्वांना समजण्यासाठी किल्ला उभारला आहे .

‘कैलास’मध्ये साजरी झाली दिवाळी

0

kailas diwali

पुणे, ता. 22 : राष्ट्रीय कला अकादमी आणि सुयोग मित्र मंडळाने कैलास स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसोबत उत्साहपूर्ण वातावरणात दिवाळी साजरी केली. मंगलमय वातावरणाची निर्मिती करणारे सनईचे सूर, नेत्रदीपक आकर्षक, भव्य रांगोळी, आसमंत उजळून टाकणारा पाच हजारहून अधिक पणत्यांचा झगमगाट आणि सेवकांसाठी मिठाई व भेटवस्तूंचे वाटप असे या कार्यक्रमाचे स्वरुप होते.

महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, सहायक आयुक्त संदीप ढोले, आरोग्य निरीक्षक नीलिमा काकडे, रूबी हॉल क्लिनिकच्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. प्राची साठे, इंडियाआर्टचे संचालक मिलिंद साठे यांची प्रमुख उपस्थिती. या वेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ससूनच्या शवागारातील कर्मचारी व स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा कृतज्ञतापूर्वक ह्द्य सन्मान करण्यात आला. मंदार रांजेकर, अतुल सोनावणे, नीलेख राखुंडे, विकास मापुसकर, मंगेश तडके, सचिन देसाई, यशवंत नेटके यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

प्रविण दरेकरांचा मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा

0

मुंबई
– राज ठाकरेंचे विश्वासू व मनसेचे सरचिटणीस प्रविण दरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज मनसेप्रमुखांकडे सोपवला. दरेकर यांचा मुंबईतील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. आमदरांनी कामे न केल्यामुळे आमच्या आमदरांचा पराभव झाला असे वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केल्याने दरेकर नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी मनसेचा राजीनामा दिल्याचे पुढे येत आहे. राज ठाकरे यांची आज दुपारी भेट घेऊन दरेकर यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, राज ठाकरेंनी तो स्वीकारला की नाही याबाबत माहिती पुढे आली नाही. दरेकर यांचा राजीनामा राज स्वीकारणार का याकडे लक्ष लागले आहे. मनसेच्या पराभवाबाबत राज यांनी अद्याप मौन सोडलेले नाही.

विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करण्याकरिता राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांची बैठक कृष्णकुंज निवासस्थानी मंगळवारी बोलावली होती. या बैठकीत विश्लेषण पूर्ण चर्चा झाली चर्चेतील सूर वेगळाच जाणवल्याने नाराज झालेल्या प्रविण दरेकर यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. अखेर आज त्यांनी राज यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला.
२००९ साली दरेकर यांनी मागाठाणे येथून निवडणूक जिंकली होती. यंदा मात्र तेथे त्यांचा शिवसेनेच्या प्रकाश सुर्वे यांनी पराभव केला. दरेकर यंदा तिस-या स्थानावर फेकले गेले. दोन नंबरवर भाजपचे हेमेंद्र मेहता राहिले. त्यामुळे दरेकर निराश झाले आहेत. राज ठाकरेंचे अतिशय विश्वासू असलेल्या दरेकरांना दारूण झालेला पराभव जिव्हारी लागला आहे. मात्र, पक्षातंर्गत वादही राजीनाम्यामागे असल्याचे कळते.

काळ्या पैशांवरून आम्हाला ब्लॅकमेल करु नका, नावे जाहीर करा-काँग्रेस

0

नवी दिल्ली – काळ्याधनाच्यामुद्यावरून काँग्रेस आणि भाजप समोरासमोर आले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी परदेशात काळेधन साठवून ठेवलेल्यांची नावे उघड केली तर, काँग्रेसची नाचक्की होईल, असे वक्तव्य केले होते. त्याचा काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. सरकारने परदेशात काळेधन साठवून ठेवणार्‍यांचे एक-एक नाव जाहीर करावे, काँग्रेसला ब्लॅकमेल करु नये, असे काँग्रेस नेत्याने ठणकावले आहे. काळ्याधनाच्या मुद्यावर भाजप सरकार देशातील नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
केंद्र सरकार पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात परदेशातील बँकांमध्ये काळेधन जमा करुन ठेवलेल्यांची नावे उघड करणार आहे. केंद्राकडून२७ ऑक्टोबर रोजी पुरवणी शपथपत्र सादर केले जाईल, यात एकूण ८०० पैकी १३६ खातेधारकांची नावे बंद पाकिटात देण्यात येतील. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मिळून घेतला असल्याचे कळते. ही यादी बंद पाकिटात सुप्रीम कोर्टात सादर केली जाईल. त्यानंतर ही नावे केव्हा उजेडात आणायची आणि त्यांच्याकडून किती टॅक्स वसूल करायचा हे कोर्ट ठरविणार आहे.

कॉंग्रेसला गतवैभव आणून आपण जोमाने कामाला लागणार — रमेश बागवे

0

कॉंग्रेसला गतवैभव आणून आपण जोमाने कामाला लागणार असल्याचे माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांनी सांगितले .
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रमेश बागवे यांनी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक , पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती . तेव्हा त्यांनी बैठकीत सांगितले कि , आपण सार्वजन लोकशाहीला मानणारे कार्यकर्ते आहोत , निवडणुकीमध्ये सर्वांनी मेहनत घेतली आहे . परंतु , नशिबाने आपल्याला साथ दिली नाही , मोदी लाटेमध्ये उमेदवार निवडून आले . आपण पुन्हा कामाला जोमाने लागू , कार्यकर्त्याश्या पाठीशी अखेर पर्यंत राहू , कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये , असेआवाहन कातून कॉंग्रेसचा शिपाई म्हणून आपण तुमच्या पाठीशी उभे राहू आय विल कम बेक असे सांगून आपण सर्व जन कामाला लागू .
यावेळी स्थायी समिती माजी अध्यक्ष रशीद शेख यांनी सांगितले कि , निवडणुकीमधील ई. व्ही. मशीन घोळ झाल्याने आपला पराभव झाला आहे .अशा प्रकारचा घोळ पुण्यातील सर्व विधानसभा मतदार संघात झाला आहे , आणि अनेक उमेदवार या ई. व्ही. मशीन घोळ बाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे .
यावेळी स्थायी समिती माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी सांगितले कि , कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये , पक्षाची ध्येय धोरण जनते पर्यंत पोहचवून पक्ष बळकट करावा , तसेच पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी रमेश बागवेच्या पाठीशी ठाम पणे उभे राहणार .
यावेळी विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे , नगरसेवक अविनाश बागवे , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक विनोद मथुरावाला , करण मकवानी , प्रसाद केदारी , मंजूर शेख , संगीता पवार , निझाम काझी ,नगरसेवक सुधीर जानजोत , नगरसेविका लता राजगुरू , लक्ष्मी घोडके , माजी महापौर रजनी त्रिभुवन , शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी ,हाजी नदाफ , रमेश अय्यर , जोस्वा रत्नम , रशीद खिजर , कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष असिफ शेख , राजाभाऊ चव्हाण , वाल्मिक जगताप , भगवान धुमाळ पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते . या बैठकीचे सूत्रसंचालन विठ्ठल थोरात यांनी केले .

कोण बाजी मारणार ?

0

मुंबई – मुंडे नाहीत आता गडकरीही महाराष्ट्रात नको अशी भूमिका काहींनी घेतल्याचे भाजप वर्तुळात बोलले जाते आहे . पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष शहा यांचा नितीन गडकरींना मुख्यमंत्रीपदी बसविण्यास विरोध असल्याचे पुढे येत आहे. राज्यात गडकरी डोईजड होतील व भविष्यात संघाच्या मदतीने आपल्या वर्चस्वाला हादरा लावू शकतील अशी भीती मोदींना वाटत आहे. याऊलट फडणवीसांना मुख्यमंत्री बसविल्यास त्यांच्यापासून कोणताही धोका नसल्याचे त्यांना ठाऊक आहे. फडणवीस नवखे आहेत, अभ्यासू, मेहनती आहेत. मोदी सांगतील ते फडणवीस ऐकू शकतील अशी स्थिती आहे. याउलट गडकरी मोदींना शह कसा देईल याच्याच खेळ्या ते मुंबईत बसून करीत राहतील अशी भीती मोदी-शहा जोडीला आहे. त्यामुळे गडकरींना दिल्लीतच अडकवून ठेवून त्यांच्यावर बारीक नजर ठेवायची अशी रणनिती मोदींची आहे. मात्र, गडकरींनी ऐन मोक्याची वेळी आपले समर्थक मुनगुंटीवर यांच्या माध्यमातून आमदारांचे शक्तीप्रदर्शन करून मोदी-शहांना संदेश देण्याचा प्रयत्न केला. आता मोदी-शहा कोणत्या खेळ्या करतात याकडे लक्ष आहे.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उघडपणे उतरले आहेत. मंगळवारी सायंकाळी नागपूरात गडकरींचे जंगी स्वागत करण्यात आले. याचबरोबर विदर्भातील सुमारे 40 आमदारांनी गडकरी वाड्यावर धाव घेत तुम्हीच मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी याचना केली. त्याआधी मंगळवारी दुपारी भाजपचे नेते व माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी गडकरींनीच मुख्यमंत्री व्हावे अशी आमच्या सर्व भाजप नेत्यांची इच्छा असल्याचे सांगत त्यांच्या नावाने लॉबिंग केले.
अखेर गडकरींनी मौन सोडले व पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असे सांगत राज्यात परतण्याचे संकेत दिले. दुसरीकडे, गडकरींना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवण्यासाठी मोदी-शहा हे प्रयत्नशील असल्याचे कळते आहे. यासाठीच मोदींनी हरयाणातील पक्षाचा नेता निवडला असला तरी महाराष्ट्रातील निवडला नाही. दिवाळीनंतर म्हणजेच रविवारनंतरच आता राज्यातील घडामोडींनी वेग येईल. तोपर्यंत मधल्या चार-पाच दिवस मोदी-शहा कोणत्या खेळ्या करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. गडकरींना दूर ठेवण्यासाठी फडणवीस-मुंडे गटाला विरोध करायला लावणे, भविष्यातील गरज म्हणून शिवसेनेला सोबत घेणे व शिवसेनेकडून फडणवीसांच्या नावावर एकमत करवून फडणवीसांनाच मुख्यमंत्रीपदी बसविणे आदी खेळ्या मोदी करू शकतात. मात्र यात आक्रमक मोदी यशस्वी होतात की मुरब्बी गडकरी बाजी मारतात हे लवकरच कळेल.
गडकरींना राष्ट्रवादीने पाठिंबा देण्यामागे व्यावसायिक कनेक्शन असल्याचे कळते आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील व मोठे राज्य आहे. आगामी काळात मुंबईसह महाराष्ट्रात अनेक मोठे प्रकल्प होऊ घातले आहेत. मुंबई-बंगलोर औद्योगिक कॉरिडॉर असो की नागपूरमधील मिहान प्रकल्प असो, याचबरोबर नवी मुंबई, चाकण येथील भव्य व हजारो कोट्यावधीचे प्रकल्प असो यात राष्ट्रवादीला व्यावसायिक भागीदारी आहे. नितीन गडकरी राज्यात आल्यास या माध्यमातून आपले हित साधले जाऊ शकते याची जाणीव पवारांना आहे. त्याचमुळे राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देऊन गडकरींना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. गडकरींचे समर्थक सुधीर मुनगुंटीवर यांनी मंगळवारी केलेले वक्तव्य त्याचेच द्योतक मानले जाते. राष्ट्रवादी जर बिनशर्त पाठिंबा देत असेल तर तो पर्याय स्वीकारला पाहिजे. कोणत्याही अटीशिवाय ते जर पाठिंबा देत असतील त्याचे स्वागतच केले पाहिजे असे मुनगंटीवर यांनी म्हटले आहे. आता गडकरींचा डाव मोदी-शहा जोडी कसा उधळून लावते हे पाहणे रंजक ठरणार आहे.