Home Blog Page 3651

“ सामुदायिक तुळशी विवाह “ थाटामाटात संपन्न

0

m1

पुणे लष्कर भागात नवा मोदीखाना भागात सर्व धर्मीय नागरिकांच्या सहभागाने सामुदायिक तुळशी विवाह थाटामाटात संपन्न झाला . पारंपारिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला . यावेळी तुळशीचा विवाहासाठी खाण्या मारुती मंदिराचे प्रविण महाराज यांनी मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराना तोरण लावून विद्यत रोषणाईची सजावट करण्यात आली होती. त्यांनतर पुरोहिताकरवी गणपती आणि मातृका पूजा करण्यात आली . यानंतर लक्ष्मी नारायणाची मूर्ती आणि तुळशीपत्रासोबत सोने आणि चांदीची तुळस आसनावर ठेवण्यात आली होती . त्यांनतर गोरज मुहूर्तावर देवाचे (वराचे ) पूजन करण्यात आले . मंत्रोच्चारासहित कन्येस ( तुळशीस ) दान करण्यात आले . यानंतर हवन आणि अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करण्यात आली . नंतर वस्त्रे आणि आभूषणे घालण्यात आली . शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावण्यात आला . यावेळी ” शुभमंगल सावधान ” चे सूर घुमले . यावेळी झेंडूंच्या माळांनी सजावट करण्यात आली होती . यावेळी मंगलाष्टका प्रविण महाराज यांनी गायली .

या सामुदायिक तुळशी विवाहामध्ये रुक्मिणी यादव , शोभा यादव , शारदा यादव , रंजना यादव , सोनाली भिंगवाड , कमल प्यारम , रतन गाडेकर , सुरेखा गाडेकर , मनकरना पुरम , नीता बंकेवार , लक्ष्मी यादव , कांचन कांबळे , छाया तांबे , अपर्णा कदम या प्रमुख महिलांनी मार्गदर्शनाखाली सामुदायिक तुळशी विवाह थाटामाटात संपन्न झाला . या विवाह सोहळ्यासाठी शशीधर पूरम , मोहनीश यादव , दिलीप प्यारम , राहुल यादव , सागर रैन्नक , विनोद यादव , दुर्गेश यादव , राजू लिंगवत यांनी विशेष परिश्रम घेतले . सर्वांनी शेवटी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला .

भाजपमध्ये बहुजन विरुद्ध उच्चवर्णीय असा सामना ?

0

मुंबई – भाजपची सत्ता आल्यानंतर भविष्यात भाजपमध्ये बहुजन विरुद्ध उच्चवर्णीय असा सामना रंगणार असल्याची चुणूक दिसू लागली आहे , पुण्यातून विक्रमी साडेतीन लाखाच्या मताधिक्याने लोकसभेत निवडून गेलेल्या अनिल शिरोळे तसेच पर्वतीतून विधानसभेला विजय मिळवणाऱ्या माधुरी मिसाळ यांच्याकडे पक्षाचे दुर्लक्ष होत आल्याचा आरोप मराठा आणि बहुजन समाजातून होवू लागला आहे त्यातला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बहुजन समाजाचा नेता हवा होता, या महसूलमंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याने या चर्चेला अधिक वाव मिळतो आहे विशेष म्हणजे शपथविधीनंतर अवघ्या दोन दिवसात खडसेंचे हे वक्तव्य प्रसारित झाले आहे . एकंदरीत ‘मोदी -शहा बोले महारष्ट्र भाजप डोले’ अशा स्थितीत भाजपचे ज्येष्ठ -वरिष्ठ नेते कार्यकर्ते भाजपची सत्ता येवूनही दुर्लक्षित होत असल्याने नाराजीचा सूर दिसत आहे
भाजपच्या १२२ आमदारांपैकी ४८ ओबीसी, १९ मराठा, १९ अनुसूचित जाती, ६ अनुसूचित जमाती, २७ खुल्या गटाचे आमदार असताना नैसर्गिक न्यायाने बहुजन समाजाचीच व्यक्ती मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसायला हवी होती, असा सूर पक्षाच्या वर्तुळात उमटतो आहे. यामुळे सत्तेवर विराजमान होऊन तीन एक दिवस झाले नसताना भाजपमध्ये दोन तट पडल्याचे दिसत आहे आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत फडणवीसांबरोबर एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार व पंकजा मुंडे होत्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने उरलेल्या चारपैकी सर्वात नाराज दिसत आहेत ते खडसे. शपथविधी सोहळ्यातही खडसेंची देहबोली निराश असल्याच्या भावना दाखवत होती. पंढरपूरला सोमवारी कार्तिकी एकादशी निमित्त पांडुरंगाची पूजा खडसेंच्या हस्ते झाली. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंनी मुख्यमंत्रिपदावर बहुजनांचा सूर आळवून आपला हक्क होता, असे बोलून दाखवले.
खडसे हे भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते असून त्याचा सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष म्हणून काम करतानाचा अनुभव दांडगा आहे. विधिमंडळात खडसेंच्या मागच्या बाकावर बसून फडणवीसांनी कामकाजाचे धडे गिरवले. विशेष म्हणजे फडणवीसांना विधिमंडळातील सर्वोत्तम आमदाराचा पुरस्कार मिळाला होता.
दरम्यान विश्वनाथ प्रताप सिंह हे पंतप्रधान असताना मंडल आयोगाचा प्रश्न सुटला होता, असे विचार ओबीसी चळवळीतील नेते नितीन चौधरी यांनी मांडले.

वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर ठाम; एलबीटी ला पर्याय शोधू -मुख्यमंत्री

0

नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत वेगळ्या विदर्भाच्या आपल्या वचनावर भाजप ठाम असून एलबीटी बाबत योग्य पर्याय शोधला जात असल्याचे म्हटले आहे. विदर्भाबाबत केंद्र सरकार आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर नागपुरात मिनी मंत्रालय थाटण्याचा विचार सुरू असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
विदर्भ राज्याच्या मागणीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप आपल्या वचनावर कायम आहे. केंद्र सरकार आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व यासंबंधात योग्य निर्णय घेणार आहे.
मंत्रालयाचे कामकाज पूर्णपणे संगणकीकृत करण्याचा सध्या सरकारचा विचार सुरू आहे. सरकारी कामकाजासाठी ई प्लॅटफॉर्म तयार झाल्यानंतरच मिनी मंत्रालयाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवता येणार आहे. त्यासाठी आयटी विभागाची बैठक बोलावली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
विदर्भातील मुद्दे सोडवण्यासाठी विधानसभेचे नागपुरातील हिवाळी अधिवेशन अधिक काळ चालवणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे अजेंड्यावर येणा-या विषयांबाबत चर्चा पूर्ण होईपर्यंत अधिवेशन सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एलबीटीबाबतच्या पर्यायाचा सरकार विचार करत आहे. गुंतवणूकदार आणि व्यावसायिक यांच्याशी चर्चा करून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. असेही ते म्हणाले

भाजप- शिवसेना धुसफूस सुरूच

0

मुंबई -तडजोडी सफल होईनात ,एकमेकांवर विश्वास बसेना अशा अवस्थेत सध्या भाजपा-शिवसेनेतील सत्ता स्थाप्नाबाबाटची स्थिती असून विश्वासदर्शक ठरावाआधी मंत्रिमंडळात स्थान देण्याची शिवसेनेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुडकावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून मुख्यमंत्र्यांच्या या ताठरपणाला शिवसेना सरकारविरोधात मतदान करून प्रत्युत्तर देण्याची शक्यता नाकारता येणारी नसल्याचे बोलले जाते
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्या विनंतीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले होते. त्यामुळे भाजपचा जीव भांड्यात पडला, असे वाटत होते. मात्र, शिवसेनेने भाजप सरकारला पाठिंबा देण्याबाबत अद्यापही पत्ते उघड केलेले नाहीत. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह सत्तेत एक तृतियांश वाटा हवा असून त्याबाबत जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत भाजपला झुलवत ठेवण्याचे शिवसेनेने ठरवल्याचे दिसत आहे. भाजपकडून अरुण जेटली यांची शिवसेनेशी बोलणी सुरू असल्याचे कळते. मात्र, भाजपसोबत फरफटत जायचे नाही, असाच बाणा शिवसेनेने अंगिकारला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेची घाई नाही, असे सांगून भाजप नेत्यांना योग्य तो संदेश दिला आहे.
यापार्श्वभूमीवर आता चेंडू भाजपच्या कोर्टात असल्याचे दिसत असून सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेला साकडे घालण्याच्या मनस्थितीत सध्या तरी भाजप नाही आहे. ६ वा ९ नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. यावेळी शिवसेनेचे मंत्री शपथ घेतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत सिद्ध झाल्याशिवाय मंत्रिमंडळ विस्तार नाही, असे आता ठणकावल्याचे कळत आहे. याबाबत अधिकृतरीत्या कोणीही काहीही बोण्यास तयार नसल्याचे हि दिसते आहे

” बॉलीवूड नाईट ” संपन्न

0

4

5

दिवाळीनिमित द रॉयल कॅनोट बोट क्लब आणि राजपाल इन्व्हेस्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ” भव्य बॉलीवूड नाईट ” उत्साहात संपन्न झाली . या बॉलीवूड नाईटमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले . यामध्ये मराठी लावणी , लोकनृत्ये , हिंदी मराठी गीते झाली . या सांस्कृतिक कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घेतला . यामध्ये द रॉयल कॅनोट बोट क्लबचे चेअरमन गोपाल डावरा ,राजपाल इन्व्हेस्टमेंटचे चेअरमन अमितसिंग राजपाल , अजितसिंग राजपाल , संतसिंग मोखा , डॉ. प्रभाकर पालवे , लकी जगवानी , धनश्री कोतवाल , मुश्ताक जानी , बाळा हेगडे , किशोर पंजाबी , प्रकाश केदारी , प्रविण नाईक , रमेश ढोलेपाटील , रणजीत हुडा , रगबीर राजपाल , अड. अमर केन्त , द्वारका मित्तल , अड. गुलशन जोहर , सुनिता थदानी आदी मान्यवर सहभागी झाले होते .

यावेळी सर्वांचे स्वागत द रॉयल कॅनोट बोट क्लबचे चेअरमन गोपाल डावरा यांनी राजपाल इन्व्हेस्टमेंटचे चेअरमन अमितसिंग राजपाल , अजितसिंग राजपाल यांनी केले .

उद्धव ठाकरे ६३ आमदारांसह उद्या एकवीरा देवीच्या दर्शनाला

0

पुणे- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या घराण्याची कुलदैवत कार्ल्यातील एकवीरा देवीच्या दर्शनाला मंगळवारी येत आहेत. त्यांच्यासमवेत विधानसभेत निवडून आलेले सर्व ६३ आमदारही एकवीरा देवीचे दर्शन घेतील, अशी माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी येथे दिली.
उद्धव ठाकरे यांनी रविवारीच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन नवस फेडला. विधानसभेत चांगले यश मिळू दे, निवडून आलेल्या सर्व आमदारांना तुझ्या दर्शनाला घेऊन येईन असे उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई व कार्ल्यातील एकवीरा देवीला नवस केला होता. विधानसभेत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नसले तरी एकट्याच्या बळावर चांगलेच यश मिळाले असे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेचे १८खासदार निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्या सर्वांना एकवीरा देवीच्या दर्शनाला आणले होते.
विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी कोल्हापूरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला ठाकरे यांनी साकडे घातले होते. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी६ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. त्या सर्व आमदारांना घेऊन ठाकरे यांनी रविवारी सपत्नीक अंबाबाईचे दर्शन घेतले.

डेंग्यू मुक्त अभियान-२६८जणांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

0

पुणे-

डेंग्यू मुक्त अभियान अंतर्गत पुणे कॅम्प मधील कुरेश नगरमध्ये कुरेश मेडिकल अन्ड एज्युकेशनल फ़ाउडेशनतर्फे २६८जणांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले क़ुरेशी मस्जिदच्या सभागृहात झालेल्या या शिबीराचे उद्घाटन अप्पर पोलिस आयुक्त अब्दुल रेहमान यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . यावेळी झेड.व्हि . एम. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचेप्रमुख डॉ युसुफ तळवी ,कुरेश मेडिकल अन्ड एज्युकेशनल फ़ाउडेशनचे अध्यक्ष हाजी सलाम कुरेशी ,उप्पाध्य्क्षआरिफ चौधरी ,सरचिटणीस हाजी अब्बास कुरेशी ,सहसचिव हाजी शकील कुरेशी ,खजिनदार असिफ शेख ,सदस्य हाजी झुल्फिकार कुरेशी ,अनिश कुरेशी ,अंजुम कुरेशी ,हारून रशीद कुरेशी ,हाजी कदिर कुरेशी ,हाजी फकीर मोहम्मद चौधरी ,झाकीर कुरेशी ,अझिम गुडाकुवाला आदी मान्यवर उपस्थित होते .
या आरोग्य शिबिरासाठी झेड.व्हि . एम. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलनेविशेष सहकार्य केले.

नाशिक मनसे मध्ये राजीनामे सुरु

0

मनसेला धक्क्यावर धक्के बसत असून मनसेच्या नाशिकच्या गडातले खंदे शिलेदार वंसत गीते आणि सचिन ठाकरे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. नाशिक महापालिकेत सत्ता असतानाही विधानसभा निवडणुकीत मनसेचा झालेला पराभव, हेच या दोघांच्या राजीनाम्याचे कारण असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्यावेळी १३ आमदार निवडून आणणाऱ्या राज यांच्या झोळीत केवळ एका आमदाराचे दान यावेळी पडले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या राज ठाकरे यांनी पराभवाच्या कारणांची शोधाशोध सध्या सुरू केली आहे. . राज ५ नोव्हेंबरला नाशकात येणार आहेत. त्याआधीच आज मनसेचे प्रदेश सरचिटणीस वसंत गीते आणि जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. त्यांच्यापाठोपाठ मनसेचे नाशिकमधील आणखीही प्रमुख पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
द रम्यान, ‘मी पक्ष सोडणार नाही. पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहणार आहे’, असे गीते यांनी सांगितले.

भाजप सोडण्यासाठी हुसेन यांना दुबई मधून धमकी

0

नवी दिल्ली-‘भाजप सोड, नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा. नरेंद्र मोदीही तुला वाचवू शकणार नाहीत’, अशा धमकीचा फोन भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांना दुबईहून आल्यानं त्यांचे कुटुंबीय, समर्थक हादरले असून पक्षनेत्यांमध्येही काळजीचा सूर ऐकू येतोय. या फोनसंदर्भात हुसेन यांनी संसद मार्ग पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केली आहे.
दुबईतील एका नंबरवरून शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्याला दोन फोन आले. तेव्हा आपण पाटण्याहून दिल्लीत पोहोचलो होतो आणि विमानतळावरून घरी जात होतो. पलीकडची व्यक्ती अत्यंत अर्वाच्य भाषेत बोलत होती. विविध वाहिन्यांवरून मोदी सरकारचं समर्थन केल्याबद्दल त्यानं शिवीगाळ केली आणि भाजप सोडण्याची धमकी दिली, असं शाहनवाज हुसेन यांनी तक्रारीत म्हटलं आहे. पक्षातून बाहेर न पडल्यास मोदीही वाचवू शकणार नाहीत, असंही त्यांना बजावण्यात आलंय.
या तक्रारीची गंभीर दखल घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. हा फोन नेमका कुणी केला असावा, यावरून वेगवेगळे कयास बांधले जात आहेत.

ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर काळाच्या पडद्याआड

0

मुंबई-ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे आज पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या ६४ व्या वर्षी फुफ्फुसाच्या संसर्गाने निधन झाले. गेले अनेक दिवस अमरापूरकर यांची प्रकृती चिंताजनक होती. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ११ वाजता मुंबईतील भाईदास हॉलमध्ये अंत्यदर्शनसाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे.
चतुरस्त्र अभिनेता ओळख असणाऱ्या अमरापूरकर यांनी कायमच विविध भूमिकांमधून आपला खास ठसा उमटविला होता. उत्तम चरित्र, खलनायक, विनोदी अभिनेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. आजवर त्यांनी ३०० सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. ‘आमरस’ या मराठी सिनेमातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र बॉलिवूडमध्ये ‘खलनायक’ म्हणून अमरापूरकर यांनी आपल्या अभिनयाची चांगलीच छाप पाडली होती.
हँड्स अप’ हे त्यांचं गाजलेलं नाटक होतं. अर्धसत्य, सडक चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही अमरापूरकर यांची विशेष ओळख होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ‘जनलोकपाल’ मागणीच्या आंदोलनाला त्यांनी जाहिर पाठिंबा दर्शविला होता. तसेच डॉ. नरेद्र दाभोळकर यांची हत्या म्हणजे हे राज्य अराजकतेकडे चालले आहे, असेच समजावे लागेल. आता तरी सरकारने जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करून त्यांना श्रद्धांजली वाहावी, अशी भूमिका अमरापूरकर यांनी मांडली होती.
सदाशिव अमरापूरकर यांना पंतप्रधान मोदी यांनी भावपूर्ण शब्दांत श्रद्धांजली वाहिली. ‘या चतुरस्त्र अभिनेत्याच्या आठवणी सदैव आमच्या मनात राहतील. जुन्या आणि नव्या पीढीचे ते लोकप्रिय अभिनेते होते. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे’, असे ट्विट मोदी यांनी केले आहे. कोलकात्यात असलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांनीही ट्विटरच्या माध्यमातून अमरापूरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ‘जेव्हा तुमचा जवळचा सहकारी तुम्हाला कायमचा सोडून जातो तेव्हा एकप्रकारची पोकळी निर्माण होते. काहीशी अशीच अवस्था अमरापूरकर यांच्या जाण्याने झाली आहे. अमरापूरकर यांच्यासोबत घालवलेले अनेक क्षण आज डोळ्यासमोर तरळत आहेत. उपजत गुणवत्ता असलेला एक गुणी कलावंत आपण गमावलाय. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो’, अशा भावना अमिताभ यांनी व्यक्त केल्या.
खासदार सुप्रिया सुळे – चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे निधन झाल्याचे पहाटे समजले आणि अत्यंत वाईट वाटले.
अर्धसत्य ते सडक अशा अनेक चित्रपटांत अत्यंत चोख खलनायक वठवणारे, ऑंखे, इश्क आशा अनेक चित्रटांत कॉमेडीतून आपला ठसा उमटवणारे तात्या अर्थात सदाशिव अमरापूरकर यांचे निधन हे चटका लावणारे आहे. त्यांचे कुटुंबिय आप्त आणि मित्रमंडळी यांच्या दुःखात मी सहभागी आहे. चित्रपटसृष्टी एका हरहुन्नरी, चतुरस्त्र कलाकाराला मुकली आहे…
भावपूर्ण श्रद्धांजली.
शरद पवार – सशक्त अभिनय परंपरेशी नाळ असलेले कलावंत सदाशिव अमरापूरकर यांचे निधन ही दुःखद घटना असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. दिवंगत अमरापूरकर यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. चतुरस्र अभिनयाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणं हासुद्धा सदाशिव अमरापूरकर यांचा पिंड होता. विविध चळवळी आणि सामाजिक आंदोलनांशी एक कलावंत आणि व्यक्ती म्हणूनही त्यांनी बंध टिकवून ठेवला होता. या मनस्वी कलावांताला भावपूर्ण श्रद्धांजली…

मुख्यमंत्र्याकडे राज ठाकरे यांच्या मागण्यांचे पहिले निवेदन सादर

0

मुंबई-आज मनसे अध्यक्ष .राज ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृह येथे भेट घेतली… कालच मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी अहमदनगर जिल्ह्या पाथर्डी तालुक्यातील जावखेड खालसा ह्या गावात जाऊन तिहेरी हत्याकांड झालेल्या जाधव कुटुंबियांची भेट घेतली…जाधव कुटुंबियांना भेटल्यावर राज यांनी त्यांचा दौरा अर्ध्यावर सोडून तत्काळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेतला. या भेटी दरम्यान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून पुढील गोष्टी निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे, जाधव कुटुंबियांच्या हत्याकांडात असलेल्या दोषींना कठोर शासन झाले पाहिजे, तसेच अश्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी द्रुतगती न्यायालये- विशेष न्यायालये उभारायला हवीत, पोलिस यंत्रणेमध्ये सुधारणा यायला हवी असून पोलिसांना अधिक अधिकार द्यायला हवेत, समाजातील द्रुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना कायमचा धाक कसा बसवता येईल याचा विचार करायला पाहिजे. या निवेदनाबरोबर राज ठाकरे यांनी उस उत्पादक शेतक-यांना प्रतीटन पहिला हप्ता रु.२५००/- आणि अंतिम दर रु..३०००/- मिळाला पाहिजे या मागणीचे निवेदनसुद्धा दिले आहे… मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये महाराष्ट्रातील विविध विषयासंदर्भात सुमारे २०-२५ मिनिटे चर्चा झाली, सुरवातीला राज ठाकरे यांनी गुलाबांचा पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले… या चर्चे दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, आमदार शरद सोनावणे, मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर आदी उपस्थित होते…
rajj

राजेश दर्शले खून प्रकरणाचा सूत्रधार पकडला- मारेकरी लवकरच जाळ्यात

0

पुणे-शिवसेनेचे ताथवडे-पुनावळे विभागप्रमुख राजेश ऊर्फ राजू सखाराम दर्शले यांचा खून प्रकरणी मुख्य आरोपी सचिन कुदळे याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना कर्नाटकातील गुलबर्गा येथे अटक करण्यात आली आहे . त्यांच्याकडून दोन पिस्तूल ताब्यात घेण्यात आले आहेत. पूर्वीच्या प्रेमसंबंधास विरोध केल्याने कुदळे याने दर्शले यांचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. असे हिंजेवाडी पोलिसांचे म्हणणे आहे
सचिन सुदाम कुदळे (वय ३१, रा. माळवाडी-पुनावळे), शाहरूख ऊर्फ पाप्या रशिद शेख (वय २०, रा. भेलकेवाडी, भोर) आणि गौतम श्रीराम मोरे (वय ३३, रा. नेहरूनगर, विठ्ठलगनर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. दर्शले यांच्या खुनामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेले मोहन ऊर्फ बाबु जनार्दन मुजुमले (रा. जमदाडे चाळ, भुजबळवस्ती, वाकड) आणि प्रकाश डोंगरे (रा. डिलक्स टॉकिजजवळ, पिंपरी) या दोन आरोपींना लवकरच पकडण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
शिवसेनेचे ताथवडे-पुनावळे विभागप्रमुख राजेश दर्शले यांचा १८ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास पुनावळे-जांबे रस्त्यावरील ईस्टेरा या बांधकाम साईटवर गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमधील फुटेज तपासले होते. त्यामध्ये भोर येथील गुन्हेगारी प्रवृत्तीचा शाहरूख ऊर्फ पाप्या शेखला पोलिसांच्या खबऱ्याने ओळखले. त्यानंतर पोलिसांना शाहरूखबद्दल अधिक माहिती घेतली असता तो , सचिन कुदळे आणि त्याचा मित्र आदर्श खुनाच्या घटनेच्या अगोदर व घटनेच्या दिवशी पुनावळे परिसरात आले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तसेच सचिन कुदळे हा एका खुनाच्या गुन्ह्यांमध्ये जेलमध्ये असताना मित्र आदर्शमुळे आरोपी शाहरूखबरोबर त्याची ओळख झाल्याचे पोलिसांच्या तापासात निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी भोरमध्ये जाऊन आरोपी शाहरूखची माहिती घेतली असता तो तेथे नसल्याचे व काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचा बीड, उस्मानाबाद, सातारा, वाई, पंढरपूर व सोलापूर येथे शोध घेतला. मात्र तो कर्नाटकातील गुलबर्गा येथे गेल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुलबर्गा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सापळा रचून सचिन कुदळे, शाहरूख ऊर्फ पाप्या शेख आणि गौतम मोरे या तिघांना पकडले. या तिघांचीही झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्तुल मिळाले.
या आरोपींच्याकडे अधिक चौकशी केली असता सचिन कुदळे याच्या सांगण्यावरून शाहरूख ऊर्फ पाप्या शेख, प्रकाश डोंगरे, बाबु मुजुमले या तिघांनी कट रचून शिवसेनेचे विभागप्रमुख राजेश दर्शले यांचा गोळ्या झाडून खून केल्याची कबुली दिली आहे. राजेश दर्शले यांनी पूर्वीच्या प्रेमसंबंधास विरोध केल्याने तसेच गावातील जमिनी बांधकाम व्यावसायिकांना विकसित करण्यास दिल्यामुळे व माथाडी कामगारांची कामे मिळू दिली नाहीत म्हणून त्याचा राग मनात धरून कुदळे यांनी त्यांचा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी कुदळे याच्यासह शाहरूख शेख, मोहन मुजुमले व प्रकाश डोंगरे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विश्वजित खुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दर्शले यांच्या खुनातील आरोपींना पकडले.

दिलीप कांबळे आदिवासी विकास, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री

0

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह,-नगर विकास, गृहनिर्माण आणि आरोग्य खाती स्वतःकडे ठेवली आहेत. ज्या खात्यांची जबाबदारी कुणावरही सोपवण्यात आलेली नाहीत, अशी खातेही फडणवीस यांच्याकडेच राहणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

आज झालेले खातेवाटप –

एकनाथ खडसे – महसूल, अल्पसंख्याक आणि वफ्त, कृषी, पशु संवर्धन, दुग्ध, मत्स व्यवसाय, उत्पादन शुल्क.

सुधीर मुनगंटीवार – अर्थ आणि नियोजन, वन खात्याची जबाबदारी

विनोद तावडे – शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक खाते, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकिय शिक्षण, मराठी भाषा.

पंकजा मुंडे – ग्रामविकास, जलसंवर्धन, महिला आणि बालकल्याण.

प्रकाश मेहता- उद्योग, खाण आणि संसदीय कामकाजमंत्री.

चंद्रकांत पाटील – सहकार, विपणन, टेक्सटाईल आणि सार्वजनिक बांधकाम.

विष्णू सवरा – आदिवासी विकास, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य.

दिलीप कांबळे – आदिवासी विकास, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री.

विद्या ठाकूर – ग्रामविकास विभागाच्या राज्यमंत्री.

दहा वर्षात बदलणार विमानांची दुनिया

0

windowless-airplane-oled-touchscreen-walls-cpi-3

windowless-airplane-oled-touchscreen-walls-cpi-1

windowless-airplane-oled-touchscreen-walls-cpi-2
जगातील पहिले खिडकीविरहित पारदर्शक विमान उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. एक ब्रिटिश विकसक लवकरच त्याची चाचणी घेणार आहे. आजूबाजूचे दृश्य पाहण्याची संधी या विमानातून प्रवाशांना मिळणार आहे. हे विमान पारदर्शक स्क्रीन बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आकाश आणि आजूबाजूच्या अवकाशातील दृश्य प्रवाशांना पाहणे शक्य होणार आहे. अशी माहिती सीपीआय च्या सूत्रांनी प्रसिध्द केली आहे येत्या दहा वर्षात जगात अशी विमाने अवकाशात उडताना दिसतील असाही दावा त्यांनी केला आहे गेल्या पाच दिवसांपूर्वी याबाबतची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे अधिक माहिती uk-cpi.com (h/t: mashable) यावर मिळू शकेल असे हि म्हटले आहे
UK-based tech innovation company Center for Process Innovation (CPI)
या सूत्रांच्या म्हणण्यानुसार प्रवाशांच्या सीटजवळ एक स्विच देण्यात येणार आहे. त्याद्वारे ते आजूबाजूचे दृश्य पाहायचे किंवा स्क्रीन ऑफ ठेवायचा याचा निर्णय घेऊ शकतील. स्क्रीनवर इंटरनेट सर्फिंगही करता येणार आहे.
सेंटर फॉर प्रोसेस इनोव्हेशन (सीपीआय) संस्थेतील संशोधक आणि इंजिनीअर यांनी या पृष्ठभागाचे नाव ‘द विंडोलेस केबिन विथ अ व्ह्यू’ असे ठेवले आहे.
विमानात बसून एका छोट्याशा प्लास्टिकच्या खिडकीतून जगाकडे पाहण्याचे दिवस लवकरच इतिहासमा होतील. भविष्यातील विमानांमध्ये संपूर्ण पारदर्शी काचा बसविलेले पृष्ठभाग असतील. अतिलवचिक, उच्च दृश्यमानता असलेले तंत्रज्ञान विकसित करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. या स्क्रीनवर एक्सटर्नल कॅमेऱ्यांतून प्रत्यक्ष दृश्ये दाखविण्यात येतील,’ असे या संस्थेच्या संशोधकांनी सांगितले.
या स्क्रीनमध्ये ओएलईडी तंत्रज्ञान बसविण्यात येणार आहे. या पारदर्शक वजनाने हलक्या पृष्ठभागामुळे विमानाचे एकूण वजनही कमी होण्यास मदत होणार आहे.
विमानाचे वजन हा इंधन बचतीच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असतो. विमानाचे वजन एक टक्क्याने कमी झाल्यास इंधन ०.७५ टक्के कमी लागते. वजन कमी झाल्यास, इंधन कमी लागते आणि परिणामी कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जनाचे प्रमाणही कमी होते. त्याच प्रमाणे वाहतूक खर्चही कमी होतो.
सध्याच्या खिडक्या तयार करण्याचा खर्च जास्त आहे.;ओएलईडी डिस्प्लेसारखे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान संकल्पनेतून प्रत्यक्ष उत्पादनात आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
अन्य छायाचित्रे –
airbus-2050-concept-600x307

‘जात, पैसा आणि गुन्हेगारी हेच राजकारण- नितीन गडकरी

0

पुणे – ‘जात, पैसा आणि गुन्हेगारी हेच राजकारण झाले आहे. लोकांना हे बदलायचे आहे, जातीपातीचे बंध तोडायचे आहेत. परंतु, राजकारण्यांना हा बदल घडू द्यायचा नाही. गरिबांसाठी काम करणे हेच खरे राजकारण. आपल्या संस्कृतीचे ते तत्त्वज्ञान आहे, तेच जैन समाज करीत आहे,‘‘ असे गौरवोद्‌गार काढताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण्यांवर टीका केली.
बालेवाडी- म्हाळुंगे येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात आयोजित “भारतीय जैन संघठन‘च्या राष्ट्रीय अधिवेशात ते बोलत होते. संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा, खासदार अनिल शिरोळे, दिलीप गांधी, संजय काका पाटील, आमदार चैनसुख संचेती, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख आदी या वेळी उपस्थित होते. पुणे व अन्य जिल्ह्यांतील नवनिर्वाचित आमदारांचा या वेळी गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गडकरी म्हणाले, “”शरीरावर शस्त्रक्रिया करायची तेव्हा चांगला डॉक्‍टर लागतो. निवडणूक आली की मात्र जातीचाच कोणी पाहिजे; परंतु कोणताही राजकारणी त्याच्या जातीचा उद्धार करीत नाही, असे माझे ठाम मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी अशा राजकारणाला छेद दिला आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकांमध्ये आम्हाला सवर्णांच्या जातीचे “कार्ड‘ही वापरता आले असते; परंतु आम्ही तसे केले नाही, कारण आम्ही जातपात मानत नाही.‘आपल्याकडे गरिबी, कुपोषण या समस्या अजूनही आहेत. देश “धनवान‘; पण जनता गरीब आहे, कारण चांगले काम करणाऱ्यांची संख्या कमी आहे. राजकारणीही समाजकारणाकडे दुर्लक्ष करतात. संघटनेच्या माध्यमातून तुम्ही केवळ जैनांसाठी नव्हे; तर अन्यही शोषित, पीडित समाजासाठी काम करीत आहात. धर्माची शिकवण सत्यात आणत आहात, या भावनेतून काम करीत राहिलात, तर समाज आणि देश बदलेल.‘‘
मुथा म्हणाले, ‘देशात चांगला बदल घडविण्याची क्षमता जैन समाजात आहे. आम्ही सेवा करण्यासाठी नेहमी पुढे असतो. गुजरात, किल्लारी, अंदमान यांसह विविध ठिकाणी उद्‌ध्वस्त झालेला प्रदेश पुन्हा उभा करण्याचे, शाळा उभारणीचे काम संघटनेने केले. मेळघाट, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी पुण्यात आणून त्यांना पदवीपर्यंत शिक्षण देण्याचे काम केले. सरकारकडून शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष होत असल्याने मूल्य शिक्षण आणि शाळा दर्जा सुधार कार्यक्रम संघटनेने सुरू केला आहे, ते “मोड्यूल‘ राष्ट्रनिर्माणासाठी देशातील सर्व राज्यांना देणार आहे.‘‘