Home Blog Page 3649

…आता जनता तुम्हाला माफ करणार नाही!

0

(लेखक — प्रथमेश नारविलकर)
‘भ्रष्टाचार करने वालो, जनता माफ नही करेगी’ या आशयाचे कँपेन मोदींच्या बीजेपीने लोकसभा निवडणुकीत चालवले. त्याची जोरदार चर्चा झाली, प्रतिसादही मिळाली. परंतु महाराष्ट्रातील आजची एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता ‘आता हीच जनता तुम्हाला येत्या काळात माफ करणार नाही’ असं म्हणावं लागतय.

खरतर महाराष्ट्राच्या जनतेसाठी आजचा दिवस दुर्दैवीच म्हणावा लागेल. कारण ज्या भ्रष्ट राष्ट्रवादीला नाकारून जनतेने बीजेपीला डोक्यावर घेतले त्याच बीजेपीने आज जनतेकडे सत्तेच्या लालसेपोटी दुर्लक्ष केले आहे. राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने आज लाखो प्रश्‍न सामान्यांना पडले असणार. परंतु त्याचं एकमेव उत्तर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे आणि त्यांच्या सरकारकडे आहे; ते उत्तर असे की, ‘महाराष्ट्राच्या विकासासाठी जे आम्हाला पाठिंबा देतील, आम्ही त्यांच्या सोबत जाऊ’

अरे मग, निवडणुकीआधी तुम्हीच ओरडून सांगत होतात ना, की आघाडी सरकारनी विशेषत: राष्ट्रवादीने महाराष्ट्राचा कसलाही विकास केला नाही. तुमचे सर्वोच्च नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर म्हणत होते, ‘राष्ट्रवादी इज नॅच्युरली करप्ट पार्टी’ मग आता काय एक महिन्यात त्यांनी सज्जनतेचं ‘सोवळ’ नेसलं, का अचानक तुम्हाला साक्षात्कार झाला की, तुमच्या सोबत येऊन राष्ट्रवादी महाराष्ट्राचा विकास करू शकते?

देवेंद्रजी,
खरतर जनतेला तुमच्याकडूनच अपेक्षा होत्या, परंतु आज प्रकर्षानं हे स्पष्ट झालं की महाराष्ट्रातलं सरकार तुम्ही चालवणार नाहीत तर त्याची सुत्र दिल्लीतून हलविली जातील आणि नेतृत्त्व करतील महाराष्ट्राचे एकमेव ‘साहेब’…
लक्षात ठेवा कुबड्यांवर उभे राहीलेले हे तुमचे सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि ज्यावेळी पुन्हा निवडणुका होतील त्यावेळी ‘जनता तुम्हाला माफ करणार नाही…!’
– प्रथमेश नारविलकर
—-

राज्यपालांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी काँग्रेस चे पाच आमदार निलंबित

0

मुंबई- ‘बहुमत नसतानाही राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं रेटून नेणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारविरोधात शिवसेना व काँग्रेसनं एल्गार पुकारला आहे. ‘विश्वासदर्शक ठराव पुन्हा घ्यावा, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. तर, अल्पमतातलं हे सरकार घटनाविरोधी असून या सरकारच्या बरखास्तीच्या मागणीसाठी राज्यपालांकडे जाण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे.असे असताना दुसरीकडे
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केलाच्या आरोपावरून कॉंग्रेसच्या पाच आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पाचही आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्‍यात आले आहे. राहुल बोंद्रे (चिखली), अब्दुल सत्तार अब्दुल नबी (सिल्लोड), वीरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), जयकुमार गोरे (माण), अमर काळे (आर्वी) या निलंबनाची कारवाई झालेल्या आमदारांची नावे आहेत.
राज्यपाल सी विद्यासागर राव आपल्या अभिभाषणाला विधिमंडळात प्रवेश करत असताना कॉंग्रेसच्या 12 आमदारांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप सत्तारुढ भाजपने केला होता. व्हिडिओ क्लिपमध्ये कॉग्रेसचे ‘ते’ बारा आमदार दिसत असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. तसेच कॉंग्रेसच्या आमदारांना निलंबित करण्‍याची मागणी खडसे यांनी केली होती. दुसरीकडे,आज भाजप आणि कॉंग्रेस आमदारांमध्ये चांगलीच जुंपली होती. अध्यक्षांच्या दालनासमोरच कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि भाजपचे आमदार गिरीश महाजन हे दोघे आपापसात भिडले. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. राज्यपालांची गाडी रोखल्याबद्दलचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला. संबंधित प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी विरोधीपक्षनेते एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात केली. मात्र, नंतर सत्तारुढ आमदारांनीही सभागृहात प्रचंड गदारोळ केला आहे. कॉंग्रेसच्या 12 आमदारांच्या निलंबनाची मागणी एकनाथ खडसे यांनी लावून धरली होती.
कॉंग्रेसचे निलंबित आमदार अब्दुल सत्तार हे प्रति‍क्रिया देताना म्हणाले, कॉंग्रेसच्या पाच आमदारांवर निलंबनाची कारवाई म्हणजे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे वेळ मागितला होता.लोकशाही पद्धतीने मतदान करण्याची मागणी राज्यपालांना केली होती. मात्र, कॉंग्रेसच्या आमदारांना राजपालांनी वेळ दिला नाही. भाजपला सत्तेची गुर्मी आली असून हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे निधन

0

झी मराठीवरील’ ‘जय मल्हार’ या लोकप्रिय मालिकेतील हेगडी प्रधान यांची भूमिका साकारणारे अतुल अभ्यंकर (४२) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि आई असा परिवार आहे. ‘जय मल्हार’ मालिकेतील भूमिकेसाठी त्यांना नुकताच झी मराठी अॅवॉर्डस् 2014 चा सर्वोत्कृष्ट सहाय्यक पुरुष व्यक्तिरेखेचा पुरस्कार मिळाला होता.
आज दुपारी ३.३० वा. त्यांच्यावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले
hegdi

निसर्ग संवर्धनासाठी पुणे शहरात ” पर्यावरण जनजागृती पदयात्रा ” संपन्न

0

4

7

पुणे धर्म प्रांताच्यावतीने पर्यावरणाच्या रक्षणासाठी , निसर्ग संवर्धनासाठी पुणे शहरात ” भव्य पर्यावरण जनजागृती पदयात्रा ” उत्साहात संपन्न झाली .

या भव्य पर्यावरण पदयात्रेची सुरुवात सकाळी ९ वाजता , क्वार्टर गेट चौकातील ऑर्नेला हायस्कूलपासून सुरुवात झाली . लक्ष्मी रोड , सिटी चर्च , साचापीर स्ट्रीट , इस्ट स्ट्रीट , इंदिरा गांधी चौक , व्होल्गा चौक , मोहम्मद रफी चौक , महात्मा गांधी रोड , कोहिनूर चौक , भोपळे चौक , बाबाजान चौक , कॉन्व्हेन्ट स्ट्रीट या मार्गे काढण्यात येउन सेंट व्हीन्सेट शाळेच्या मैदानावर या पदयात्रेचा समारोप करण्यात आला . या पदयात्रेचे उद्घाटन जेष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते वृक्षास पाणी घालून करण्यात आले . यावेळी पुणे धर्म प्रांताचे बिशप राईट रेव्हरंड थॉमस डाबरे, शिलॉंग येथील आर्क बिशप डॉमनिक झाला , पुण्याचे चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे बिशप राईट रेव्हरंड अंडरयु राठोड ,फादर माल्कम सिक्वेरा , मुस्लिम समाजाचे अभ्यासक अनिस चिस्ती , मुस्लिम वेल्फेअर एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी , नितीन डिसोझा , जेम्स पॉल, केविन मेनवेल , ख्रिस्ती साहित्यिक अशोक आंग्रे , फादर गोडविन सलढाना , फादर जेम्स लुईस , फादर आयरिस फर्नाडिस , डॉ. कॉलीन लुझाडो ,फादर अंडरयु फर्नाडीस,फादर डायगो आल्मेडा आदी मान्यवर आणि २८ शाळा सुमारे आणि२ महाविद्यालयामधील दोन हजार विद्यार्थी तसेच सर्वधर्मीय लोक सहभागी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . या पदयात्रेत निसर्गाचा ऱ्हास थांबवा , हवा पाणी दुषित करू नका , जिथे आहे स्वछता , तिथे वसे देवता असे निसर्गाचे जनजागृतीपर संदेशाचे फलक घेऊन विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते .

समारोपाच्या वेळेस सेंट व्हिन्सेट शाळेच्या मैदानावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे पर्यावरण जनजागृतीपर नृत्ये विद्यार्थ्यांनी सादर केली . यावेळी पुणे धर्म प्रांताचे बिशप राईट रेव्हरंड थॉमस डाबरे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश पृथ्वीला वाचविण्याचा संदेश दिला , सर्व विद्यार्थी मनापासून पदयात्रेत सहभागी होऊन पदयात्रा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल आभार मानले .

यावेळी सर्व उपस्थितांचे स्वागत फादर गोडविन सलढाना यांनी केले तर सूत्रसंचालन सिनी डेव्हिड यांनी केले तर आभार फादर माल्कम सिक्वेरा यांनी मानले . या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली .

कचरा व्यवस्थापन नियमावलीत नमूद केलेल्याच बकेट विकत घ्या . खासदार वंदना चव्हाण यांची पालिका आयुक्तांकडे मागणी.

0

पुणे शहरात कचरा व्यवस्थापन उत्तम पद्धतीने व्हावे व नागरिकांनी ओला व सुका कचरा विभाजन करून ठेवावा, जेणे करून महानगरपालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या वाहनामध्ये हि ओला सुका कचरा वेगळा वेगळा देता येईल या उद्देशाने पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागामध्ये सोसायटी, बंगले व नागरिकांना पांढर्या व हिरव्या रंगाच्या बकेट कचरा साठवण्यासाठी दिल्या जातात. परंतु अनेक ठिकाणी या बकेट चा वापर कचरा सोडून इतर कारणांसाठी केला जातो.

शासनाच्या महानगरपालिका कचरा व्यवस्थापन नियमावली मध्ये या संदर्भात स्पष्ट सब्दात मार्गदर्शन करण्यात आल आहे. त्यामध्ये या बकेट कशा असाव्यात याचे ‘डिझाईन’ देखील देण्यात आले आहे. परंतु पालिकेच्या वतीने पुन्हा जुन्याच बकेट खरेदी करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. लाखो रुपये खर्च करून घेतल्या जाणार्या या बकेट नियमावली मध्ये नमूद केल्या प्रमाणेच असाव्यात.

तसेच रस्त्यावर ठेवण्यात येणारे कंटेनर हे बंद दरवाज्याचे असावेत असेही या नियमावली मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचे हि पालन पालिका प्रशासना कडून होताना दिसत नाही. या दोन्ही गोष्टी शासनाच्या महानगरपालिका कचरा व्यवस्थापन नियमावली प्रमाणेच झाल्या पाहिजेत अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्येकडे केली आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकी मध्ये नगरसेवक चेतन तुपे यांनीहि सदर बकेट नियमावली प्रमाणेच असाव्यात या साठी आग्रह केला.

‘मिस मॅच’ सिनेमाचा फर्स्ट लूक आणि म्युझिक लॉंन्च सोहळा दिमाखात संपन्न!!

0

गिरीश वसईकर यांचे ‘मिस मॅच’ सिनेमातून सिनेदिग्दर्शनात पदार्पण!!

‘मिस मॅच’ १२ डिसेंबरपासून सिनेमागृहात!!

अभिनेता भूषण प्रधान आणि मॉडेल मृण्मयी कोलवालकर या फ्रेश जोडीचा ‘मिस मॅच’!!

सध्या मराठी सिनेमांमध्ये अनेक नवनवीन चेहरे पहायला मिळत आहेत. पूर्वीसारखे अमुक एक सिनेमात अमुक एक हिरोईन असली की सिनेमा चालतो हा प्रकार आता मोडीत निघाला आहे. ‘गोल्ड कॉईन एंन्टरटेण्मेंट’ च्या आलोक श्रीवास्तवा यांची निर्मिती असलेला आणि यु. के. फिल्म्सच्या रेहबर खान, अश्मित श्रीवास्तवा यांची प्रस्तुती असलेल्या ‘मिस मॅच’ सिनेमात ‘मृण्मयी कोलवालकर’ हा नवा चेहरा आपल्या भेटीस येणार आहे. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लूक आणि म्युझिक लॉंन्च सोहळा गायक, संगीतकार अवधूत गुप्ते आणि अभिनेते उदय टिकेकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी सिनेमातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.
‘गोल्ड कॉईन एंन्टरटेण्मेंट’ च्या आलोक श्रीवास्तवा यांची मराठीतील पहिली-वहिली निर्मिती असलेल्या ‘मिस मॅच’ सिनेमाचे दिग्दर्शन आजवर अनेक सिरिअल्ससाठी दिग्दर्शक म्हणून काम पाहणाऱ्या गिरीश वसईकर यांचे असून मराठी सिनेदिग्दर्शनातील त्यांचे हे पहिलेच पाऊल आहे.
हिंदी सिनेसृष्टीत मातब्बर मंडळींसोबत काम केल्यावर मराठी सिनेनिर्मितीतील माझा हा पहिलाच सिनेमा असून नवीन कलाकारांना ब्रेक देण्याचे मी ठरविले होते. यासाठी मी मॉडेल मृण्मयीची निवड केली. मृण्मयीने याआधी लॉरेल, गार्डन सारीज, दिनेश सुटिंगस यासाठी मॉडेल म्हणून काम केले असून ‘मिस मॅच’ हा तिचा पहिलाच सिनेमा आहे. आजवर अनेक सिरिअल्ससाठी दिग्दर्शक म्हणून काम पाहणाऱ्या गिरीश वसईकर यांची दिग्दर्शकीय दृष्टी उत्तम असल्याने मी त्यांची निवड केली तसेच या सिनेमाचे गीतकार आणि संगीतकार यांनाही मी या सिनेमाच्या निमित्ताने ब्रेक दिला असून सिनेमाची गाणी उत्तम झाल्याचे निर्माते आलोक श्रीवास्तव यांनी नमूद केले.
या सिनेमातील यो यो… हे गाणे माझ्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे. जेव्हा या गाण्याची ऑफर माझ्याकडे आली तेव्हा संगीतकार नवीन असल्याचे समजले. या संगीतकाराला माझ्या आवाजाची पट्टीची जाण आहे का, हे जाणून घेण्यासाठी मी या गाण्याचा ट्रॅक मागवून घेतला. जेव्हा तो ट्रॅक मी ऐकला तेव्हाच तो मला आवडला आणि मी लगेच होकार दिला. नवोदित संगीतकारांना ही संगीताची उत्तम जाण असल्याचे यावरून लक्षात आल्याचे गायक अवधूत गुप्ते यांनी सांगितले.
सुरुवातीला हा सिनेमा करताना थोडे दडपण माझ्यावर होते परंतु संपूर्ण टीमने मला उत्तम सहकार्य केले. दिग्दर्शक गिरीश वसईकर, माझा हिरो भूषण प्रधान, अभिनेते उदय टिकेकर यांनी वेळोवेळी दिलेल्या टिप्सचा मला खूप फायदा झाला यासाठी मी खरोखरच त्यांची आभारी असल्याचे मॉडेल, अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर हिने आवर्जून नमूद केले.
सिनेदिग्दर्शनातील माझे हे पाऊल असून निर्माते आलोक श्रीवास्तवा यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला संधी दिली यासाठी मी त्यांचा आभारी आहे. मृण्मयीला एखादी गोष्ट सांगितल्यावर ती त्याचे आकलन लगेच उत्तमप्रकारे करते. भूषण सोबत यापूर्वी काम केल्याने आमचे ट्यूनिंग चांगले आहे. डॉ. आशिष पानट यांनी लिहिलेली गाणी उत्तम असून नीरज यांनी त्या गीतांना सुमधुर संगीत दिले आहे. एकंदरीतच संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा अनुभव छान असल्याचे दिग्दर्शक गिरीश वसईकर यांनी सांगितले.
‘मिस मॅच’ या सिनेमाच्या टायटल वरूनच आपल्याला हा सिनेमा प्रेम, लग्न या विषयावर भाष्य करणारा असल्याचे समजते. ही कथा आहे एका श्रीमंत घराण्यातील बिझनेसमनच्या मुलीची. आपल्या मुलीचे लग्न हे आपल्या पसंतीच्या तसेच श्रीमंत घराण्यातील अशा मुलाशी व्हावे अशी वडिलांची इच्छा असते. परंतु अरेंज मॅरेजवर आपला विश्वास नसल्याने आपण स्वतःच आपल्या पसंतीचा मुलगा शोधणार आणि त्याच्याशीच लग्न करणार असा हट्ट तिचा असतो. यासाठी ती मुलगी वडिलांकडून दोन वर्षाचा कालावधी घेते. या दोन वर्षात तिला तिच्या पसंतीचा नवरा मिळतो का ? की ती अरेंज मॅरेज करते? या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘मिस मॅच’ हा सिनेमा पाहावा लागणार आहे.
सिनेमाची कथा-पटकथा- संवाद अशी तिहेरी भूमिका नितीन दिक्षीत यांची आहे. डॉ. आशिष पानट यांनी सिनेमातील गाणी लिहिली असून नीरज यांचे संगीत लाभले आहे. या सिनेमात चार वेगळ्या धाटणीची गाणी असून सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, बेला शेंडे, गायक हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते यांच्या सुमधुर आवाजात सिनेमातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. भरणी कानन यांनी सिनेमासाठी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून कोरिओग्राफर म्हणून गणेश आचार्य यांनी काम पाहिले आहे. अभिनेता भूषण प्रधान, मृण्मयी कोलवालकर यांच्यासोबत उदय टिकेकर, भाऊ कदम, जयवंत भालेकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहेत.
एकंदरीतच या ‘मिस’ ला तिचा परफेक्ट ‘मॅच’ मिळतो, की ‘मिस मॅच’ हे जाणून घेण्यासाठी १२ डिसेंबरपर्यंत थोडी वाट पहावी लागणार आहे.

तिळवण तेली समाज कार्यालयात भगत कुटुंबियाच्यावतीने तुळजाभवानी मातेचा महाप्रसादाचे आयोजन

0

सालाबादप्रमाणे यंदाच्याकारशी देखील भगत कुटुंबियाच्यावतीने तुळजाभवानी मातेचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . पुणे लष्कर भागातील महात्मा गांधी रोडवरील तिळवण तेली समाज कार्यालयात हा कार्यक्रम झाला . यावेळी तुळजाभवानी मातेची पूजा करण्यात येउन आरती करण्यात आली , त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .

भगत कुटुंबियाच्यावतीने तुळजाभवानी मातेला दसरा आणि कोजागिरी पौर्णिमेला पालखी आणण्याचे काम भगत कुटुंबीय करीत असतात , त्यावेळी आरादी लोक (परडी घेणारे आणि पोत घेणारे) यांच्यातर्फे भगत कुटुंबियांना मान देतात त्यावेळी आरादी लोक परडीत जोगवा जमा करतात , तो मिळालेला जोगवा प्रसाद स्वरुपात पुण्यात सर्व देवी भक्तांना दिला जातो . त्यानिमित भगत कुटुंबियाच्यावतीने तुळजाभवानी मातेचा महाप्रसादाचे आयोजन केले जाते . अशी माहिती दिनेश भगत यांनी दिली .

यावेळी जगदीश भगत , रामकृष्ण भगत , उमेश भगत , अरविंद भगत , सचिन भगत , जयंत भगत , जितेंद्र भगत , योगेश भगत , आदित्य भगत , अक्षय भगत , आनंद भगत , प्रकाश भगत , पंकज भगत , घनश्याम भगत , निरज भगत , तिळवण तेली समाजातील विश्वस्त मंडळी आणि भगत कुटुंबिय उपस्थित होते .

यावेळी नगरसेवक उदयकांत आंदेकर , प्रसाद केदारी , दिलीप गिरमकर , माउली व्हावळ , राजेंद्र गिरमकर आदी मान्यवर उपस्थित होते .

2

आवाजी मतदानाने भाजप सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर — मतदान न घेता ठराव मंजूर म्हणजे शुध्द फसवणूक –काँग्रेस /शिवसेना

0

मुंबई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप सरकारने आवाजी मतदानाने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यात यश मिळवले असले, तरी मतविभाजन घेण्याची विरोधी पक्षांची मागणी टाळून आपल्याच पक्षाबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण केल्याचे चित्र आहे. सर्वसाधारणपणे विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला जात नाही. विरोधकांकडून मतविभाजनाची मागणी केल्यावर अध्यक्षांकडून मतविभाजन केले जाते, अशी संसदीय लोकशाहीतील परंपरा आहे. मात्र, ही परंपरा पायदळी तुडवत फक्त आवाजी मतदानाने ठराव मंजूर करून घेण्याचे काम भाजपने केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्यानंतर शिवसेनेने लगेचच मतविभाजन घेण्याची मागणी केली. मात्र, नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्याला मंजुरी दिली नाही. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहात घोषणा देत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याचवेळी अध्यक्षांनी शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड केल्याची घोषणा केली. दरम्यान, यानंतरही शिवसेना नेत्यांनी गोंधळ घालणे सुरूच ठेवले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदारही सभागृहात उपस्थित होते. विधानसभा अध्यक्षपदी हरिभाऊ बागडे यांची एकमताने निवड झाल्यानंतर लगेचच भाजपकडून शेलार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यावर आवाजी पद्धतीने मतदान घेण्यात आले. यानंतर अध्यक्षांनी लगेचच विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. त्याचवेळी शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनी ठरावावर मतविभाजन घेण्याची मागणी केली. मात्र, अध्यक्षांनी त्यांची मागणी मंजूर केली नाही.
विश्वासदर्शक ठराव फक्त आवाजी मतदानाने मंजूर करून घेतल्यांमुळे भाजपने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशीही मागणी विरोधकांनी केली.करून घेण्यात यश मिळवले असले, तरी मतविभाजन घेण्याची विरोधी पक्षांची मागणी टाळून आपल्याच पक्षाबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण केल्याचे चित्र आहे. सर्वसाधारणपणे विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला जात नाही. विरोधकांकडून मतविभाजनाची मागणी केल्यावर अध्यक्षांकडून मतविभाजन केले जाते, अशी संसदीय लोकशाहीतील परंपरा आहे. मात्र, ही परंपरा पायदळी तुडवत फक्त आवाजी मतदानाने ठराव मंजूर करून घेण्याचे काम भाजपने केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्यानंतर शिवसेनेने लगेचच मतविभाजन घेण्याची मागणी केली. मात्र, नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्याला मंजुरी दिली नाही. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहात घोषणा देत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याचवेळी अध्यक्षांनी शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड केल्याची घोषणा केली. दरम्यान, यानंतरही शिवसेना नेत्यांनी गोंधळ घालणे सुरूच ठेवले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदारही सभागृहात उपस्थित होते. विधानसभा अध्यक्षपदी हरिभाऊ बागडे यांची एकमताने निवड झाल्यानंतर लगेचच भाजपकडून शेलार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यावर आवाजी पद्धतीने मतदान घेण्यात आले. यानंतर अध्यक्षांनी लगेचच विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. त्याचवेळी शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनी ठरावावर मतविभाजन घेण्याची मागणी केली. मात्र, अध्यक्षांनी त्यांची मागणी मंजूर केली नाही.
विश्वासदर्शक ठराव फक्त आवाजी मतदानाने मंजूर करून घेतल्यांमुळे भाजपने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशीही मागणी विरोधकांनी केली.

हरलेले ‘ गांधी ‘…. ?

0

अण्णांनी टेकला माथा ‘धन्य धन्य देश माझा ‘
आता बस्स … जनहितासाठी खूप लढलो पण जनहित काही दिसेना ……
पुणे- कलियुग म्हणतात ते हेच बघा … अण्णा हजारेंसारखे थकले , म्हणाले खूप केले ,खूप वर्षे लढलो ,पण लोकांना काही फायदा मिळत नाही … तेव्हा आता बस्स … एकीकडे दिल्लीत लढलेले केजरीवाल यांच्या पदरी पडलेली मानहानी , अवमान पाहता त्यांनाही असा प्रश्न पडला असेलच कशासाठी -कुणासाठी केला होता एवढा अट्टाहास ? त्यांना बहुमत न देताच जनतेने त्यांनाच दोषी धरले , त्यांनी कॉंग्रेसचा पाठींबा घेवून सरकार हि स्थापन केले होते पण यातून आपण काही जनहित साधू शकणार नाही हे लक्षात येताच त्यांनी सत्ता त्याग केला , हि वास्तवता विसरून त्यांना लोकसभेत भयाण अपमान पचवावा लागला . आणि आता अन्ना हजारे यांनी काळ व्यक्त केलेली उद्विग्नता या गोष्टी कलियुगाने सत्यावर कधीच मात केल्याचे स्पष्ट करीत नाहीत काय ?
काल ‘भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या बरखास्त केलेल्या समित्यांची सध्या तरी पुन्हा स्थापना करण्यात येणार नाही,’ असे स्पष्ट करतानाच ‘एवढी वर्षे आंदोलने करूनही खऱ्या अर्थाने लोकांना फायदा मिळत नसेल तर आता बस्स… झाले एवढे काम पुरे झाले,’ अशी उद्विग्नता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. ‘केवळ पदांसाठी काम करू नका, अशा कार्यकर्त्यांनी माझे नावही वापरू नये,’ असेही त्यांनी संतापून सांगितले . (जणू आभाळच फाटले -ठिगळ तरी कुठे कुठे लावणार ? अशीच उद्विग्नता त्यामागे असावी )
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या शिबिराचा समारोप राळेगणसिद्धी येथे झाला. त्यावेळी हजारे बोलत बोलत होते. या शिबिरात बोलताना अनेक कार्यकर्त्यांनी बरखास्त केलेल्या समित्या पुन्हा स्थापन करून तालुकानिहाय पदाधिकारी नियुक्त करण्याची सूचना मांडली. हजारे यांनी फेटाळली. ते म्हणाले, ‘माझे नाव वापरणाऱ्यांचा आता तिटकारा आला आहे. समित्या बरखास्त केल्या तरी माजी पदाधिकारी म्हणून अनेक जण मिरवत आहेत. माझे वय आता ७५ वर्षे आहे. आतपर्यंत ३७ वेळा विविध कारणांसाठी राज्याचा दौरा केला. संघटन आणि कायद्याचा प्रचारासाठी फिरलो. पण त्याचा फारसा उपयोग होत नाही, असे दिसते. कायदा करण्यासाठी आंदोलन, कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आंदोलन, त्याचा प्रचार करण्यासाठी आंदोलन, त्याला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात आंदोलन, अशी आंदोलने तरी कशाकशासाठी करायची, असा प्रश्न आज उभा राहतो आहे. त्यामुळे एकवेळ असे वाटते की, आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात आपण जनतेसाठी जे केले, ते पुरे झाले.’
कार्यकर्त्यांना ते म्हणाले, ‘पुढील तीन महिने कोणतेही पद न घेता काम करा. माहितीचा आधिकार, ग्रामसभेला अधिकार, दप्तर दिरंगाई विरोधी कायदा व दारुबंदी कायदा यांचा प्रसार करा, तीन महिन्यानंतर स्वतःच्या आपल्या कामाचे मूल्यमापन करा, त्यानंतर आपण समित्यांचा निर्णय घेऊ.’ ३४ जिल्ह्यांतील आलेले कायकर्ते या शिबिरात सहभागी झाले होते.
अण्णांनी माहिती अधिकार कायदा आणून क्रांती केलीच ,एकेक भ्रष्टाचाराविरुद्ध यशस्वी लढा दिला ,पण या गोष्टी हि देशाला सुराज्याकडे नेण्यास पूर्णतः सबळ ठरू शकत नाहीत असे दिसल्यावर जनलोकपाल कायद्याची लढाई त्यांनी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांना बरोबर घेवून आरंभली
अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या जनलोकपाल कायद्याच्या देशव्यापी आंदोलनाने देश ढवळून निघाला होता एक आशेचा किरण दिसू लागला होता , देशात चैतन्य सळसळू लागले होते
बऱ्याच वर्षांनी; पहिल्यांदाच, चांगल्या कामासाठी देशभरात एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं दिसलं . देशातली तरुणाई मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरली. जात-धर्म-भाषा-प्रांत-राजकीय पक्ष अशी बंधनं झुगारुन देशाच्या सर्व भागात लोक लाखोंच्या संख्येनं अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सामिल झाल्याचं चित्र दिसलं . पण हे सारे क्षणभंगुर ठरले , एक स्वप्न पडून विरघळून जाव असे झाले , केजरीवालांचा एकाकी लढा हि दमछाक झालेला दिसला जणू कलियुगाने आपला करिष्मा त्यांना दाखविला . ब्रिटिशांनी १५० वर्षे भारतावर राज्य केले तेव्हाही त्यांच्या दिमतीला सैन्यात -सत्तेत भारतीय नागरिक होतेच कि … इथे सत्ता कोणाची हि येवू द्यात त्या सत्तेचा उदोउदो करणारे आज हि आहेत काल हि होते … तरीही केजरीवाल तसेच अन्नांसारखे ‘गांधी ‘ निर्माण होतात हेच या देशाचे वैशिष्ट्य मानावे लागेल
अण्णा -केजरीवाल यांनी उभारलेल्या लढ्याने देशातील बॉलीवूड च्या बड्या हस्तींनाही आकर्षित केले होते त्यापैकी कित्येकांनी या लढ्यात आपला सहभाग नोंदविण्याचा प्रयत्नही केला … पण आता … ? कुठे आहे तो कारवा ? कुठे आहे ती आशा ? कुठे गेले ते दिवस – एक दिवास्वप्न ठरले सारे जे संपूर्ण भारताला पडलेले स्वप्न होते . ते साकार करण्यासाठी आता लढणारा जणू कोणी न उरला अशी स्थिती झाली आहे
—————————————-
फ्ल्याश ब्याक – विचार करायला लावणारी हि छायाचित्रे
—————————————

15kejriwal6

62429b1e-b277-43c1-99a0-35547a6ca469WallpAutoWallpaper2

129403-dia-mirza-urmila-matondkar-and-shabana-azmi-support-anna-hazare.jpg

aamir_anna

9782269.cms

cap6

iamanna

Diya Mirza

d78650c5-7546-4a0d-8027-8081b491fe25WallpAutoWallpaper2

iamannaf

amitabh_kejriwal

ऑस्ट्रेलियातील भारतीय राजदुतावासाकडून आनंद व टीम चे अभिनंदन.

0

2

3

भारताचा एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याने पूर्ण केलेल्या ऑसी-१० या ऑस्ट्रेलिया खंडामधील १० सर्वोच्च शिखराची चढाई मोहीम नुकतीच पूर्ण केली आहे. या मोहिमेमुळे आनंद ने नेतृत्व केलेली टीम ही १० शिखरे सर करणारी पहिली भारतीय टीम बनली आहे. या शिवाय आनंद ने शिखरावर राष्ट्रगीताची धून वाजवून विक्रमही केला आहे.अनेक बाबतीत विशेष ठरलेल्या या मोहिमेचे कौतुक भारतीय राजदुतावासाकडून केले आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी असलेल्या कैनबेरा येथील भारतीय राजदुतावासाकडून आनंद व त्याच्या टीम चे कौतुक केले असून टीम ला चहा-पाण्यासाठी निमंत्रित केले गेले होते. भारताचे ऑस्ट्रेलियातील उपउच्चायुक्त सुरिंदर दत्ता यांनी भारतीय दुतावासात आनंद व त्याच्या टीम ला बोलावून त्यांचे अभिनंदन केले.

आनंद व टीममधील इतर १० सदस्यांनी ऑसी-१० हे आव्हान स्वीकारून पूर्ण केल्या बद्दल ऑस्ट्रेलियातील प्रमाणित कंपनीचे प्रमाणपत्रही आनंद व टीमला उपउच्चआयुक्त श्री.सुरिंदर दत्ता यांच्या हस्ते दिले गेले. या वेळी गिर्यारोहणातील अनेक प्रश्न विचारून श्री. दत्ता यांनी टीमला पुढील कामगिरीसाठी सुब्बेछां दिल्या. टीमसोबत खूप वेळ गप्पा मारून आपुलकीने विचारपूस केली. युनायटेड नेशन्स च्या “हिफॉरशी” मिशनद्वारे जागतिक पातळीवर स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत हि मोहीम आनंदने केली गेली. “ऑसी-१०” हे १० शिखरांचे आव्हान दिल्ली येथील “मिशन आउटडोअर” कंपनीद्वारे आयोजित केली गेली होती.

“मी करत असलेल्या सात खंडातील सात सर्वोच्च शिखरांच्या जागतिक शांततेसाठीच्या मोहिमेच्या चवथ्या टप्प्यात ऑस्ट्रेलियातील भारतीय दुतावासाने केलेले कौतुक म्हणजे माझ्या आयुष्यातील खूप मोठा क्षण होता. या मोहिमेसाठी युनायटेड नेशन्सच्या नोराह नेको यांनी दिलेली संमती व उपउच्चआयुक्त श्री सुरींदर दत्ता यांनी केलेल्या कौतुकाने या मोहिमेकडे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी मोहीम आहे असे मला वाटत आहे. आता असेच देशाचे नाव उंचावत ठेवण्याची जबाबदारी हजारो पटीने वाढली आहे.”

“सिडनीच्या आकाशातून आनंदने विमानातून १४००० फुट उंचावरून मारली “फ्री-फॉल स्कायडायव्हिंग” उडी.

0

“सिडनीच्या आकाशातून आनंदने विमानातून १४००० फुट उंचावरून मारली “फ्री-फॉल स्कायडायव्हिंग” उडी.

गिर्यारोहणासाठी सध्या ऑस्ट्रेलिया खंडात असलेल्या भारताच्या आनंद बनसोडे याने नुकतेच सिडनी च्या आकाशातून १४००० फुट उंचीवर उडत असलेल्या विमानातून उडी मारून एक आगळा वेगळा विक्रम केला. ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च १० शिखरे सर करून आनंद नुकताच सिडनी मध्ये आला असून लगेच एक आगळे वेगळे साहस त्याने केले आहे. त्याच्या सोबत त्याच्या टीममधील इतर ३ जोडपी शरद व अंजली कुलकर्णी, श्रीकांत व रुपाली चव्हाण, दिनेश व तारकेश्वरी राठोड, साची सोनी, मनीषा वाघमारे यांनीही फ्री-फॉल उडी घेत “हिफॉरशी” मिशन अर्थपूर्ण बनवत आम्ही सर्व काही करू शकतो हे दाखवून दिले.

उडत्या विमानातून उडी मारून करत असलेल्या वेगवेगळ्या कसरतीना स्काय डायव्हिंग असे म्हणतात. ऑस्ट्रेलिया मधील सिडनी मध्ये आनंदने स्काय डायव्हिंग करण्याचा निर्णय घेतला, ऑस्ट्रेलियातील मित्र व गाइड रॉब याच्या मदतीने या साहसाची आखणी केली गेली. विमान १४००० फुट उंचीवर गेल्यावर जवळपास २०० किमी प्रति तास वेगाने खाली येत पक्षाप्रमाणे आकाशात विहार करण्यचा चित्तथरारक अनुभव आनंदने घेतला.

२०११ मध्ये अमेरिकेतील प्रशांत महासागरात स्कूबा डायविंग , याशिवाय अनेक शिखरे सर केली असून आता आनंदच्या कार्यात अजून एका साहसाची भर पडली आहे.

“अमेरिकेतील प्रशांत महासागरात स्कूबा डायविंग केले, बर्फाचे पर्वत चढलो पण आता हे हवेतील साहस मला खूप आनंद देवून गेले.विमानातून उडी मारताना थोडी भीती वाटली पण त्या वेळी आईचे सकारात्मक विचार आठवले. व क्षणाचाही विलंब न करता १४००० फुटावरून ढगात झेप घेतली व २०० किमी या वेगाने जमिनीकडे निघालो. हा अनुभव खूप काही शिकवून गेला. ढगांच्या मध्ये उडताना व पृथ्वीला इतक्या वरून पाहताना खूप विस्मयकारक आहे.”

कर्नाटकातून पुण्यात आलेले ११ लाखाचे भेसळयुक्त पनीर पकडले

0

पुणे – गंजलेल्या पत्र्यांच्या डब्यातून विक्रीसाठी आणलेला११लाख ६७हजार रुपयांचे पनीर आणि मलईचा साठा रविवारी जप्त करून नष्ट करण्यात आला. कर्नाटकातून पुण्यात अन्नपदार्थ विक्रीसाठी आणणारी नवीन साखळी निर्माण होत असल्याची धक्कादायक माहिती अन्न व औषध द्रव्य प्रशासनाच्या (एफडीए) या कारवाईतून पुढे आली आहे.
बुधवार पेठेतील श्रीनाथ चित्रपटगृहाजवळ बेकायदा भेसळयुक्त अन्नपदार्थ घेऊन ट्रक येणार असल्याची माहिती “एफडीए‘ला मिळाली होती. त्या आधारावर सकाळी साडेसहा वाजता येथे सापळा रचण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या क्रमांकाचा ट्रक तेथे येताना मालाची तपासणी सुरू केली. त्यात गंजलेल्या पत्र्यांच्या डब्यांमध्ये पनीर ठेवले होते; तर प्लॅस्टिकच्या कंटेनरमधून मलईची वाहतूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत “एफडीए‘च्या पुणे विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे म्हणाले, की या कारवाईत ११ लाख ६७ हजार ६६०रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यात सहा हजार ४७८किलो पनीर आणि६६४ किलो मलईचा समावेश आहे. हा सर्व साठा नष्ट केला आहे. या अन्नपदार्थांचे नमुने राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येतील. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल.
“एफडीए‘चे सहायक आयुक्त दिलीप संगत म्हणाले, की कर्नाटकातील हूडची या गावातून पनीर आणि मलई ट्रकने आणली होती. त्याची कोणतीही बिले नाहीत. विक्री होण्यापूर्वीच हा साठा नष्ट करण्यात आला. सहायक आयुक्त संजय नारागुडे यांच्यासह अन्नसुरक्षा अधिकारी योगेश ढाणे, राजेंद्र काकडे आणि बाळासाहेब कोतकर यांनी ही कारवाई केली.

डॉ सायरस पूनावाला यांचा पुण्यभूषण ने सन्मान

0

पुणे

उद्योजकतेला वाव देताना सरकारने आपल्या जबाबदाऱ्या चे सुलभीकरण करावे ,हस्तक्षेप कमी करून धोरण ठरवावे ,त्यामुळे रोजगार वाढेल ,संपत्ती निर्मिती होईल ,योजनांची नीट अंमलबजावणी होईल आणि त्यातून नागरिकांना कर देणे सोपे होईल ,मात्र त्यासाठी प्रामाणिक राजकारणी आणि नोकरशाहीची गरज आहे ‘असे प्रतिपादन इन्फोसिस चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आज केले

पुण्यभूषण फौन्डेशन (त्रिदल )च्या वतीने आज २६ वा पुण्यभूषण सन्मान सिरम इंस्तीत्युत चे संस्थापक डॉ सायरस पूनावाला यांना नारायण मूर्ती ,माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला ,त्यावेळी नारायणमूर्ती बोलत होते

इतरांना जे दिसत नाही ते उद्योजकांना दिसते ,त्या कामातून जनतेच्या चेहऱ्यावर समाधान आणणे हे त्यांचे काम असते . सायरस पूनावाला यांनी ते केले आहे ‘ अशा शब्दात नारायण मूर्ती यांनी डॉ सायरस पूनावाला यांचा गौरव केला

सोन्याचा नांगर फिरवणारे शिवाजी महाराजांची पुरस्कार प्रतिकृती ,एक लाख रुपयांची थैली देवून सायरस पूनावाला यांचा बालगंधर्व रंगमंदिर येथे सन्मान करण्यात आला . अध्यक्षस्थानी डॉ रघुनाथ माशेलकर होते .डॉ सतीश देसाई , पिनाकल ग्रुप चे गजेंद्र पवार ,उप महापौर आबा बागुल व्यासपीठावर उपस्थित होते

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविद्यालयीन काळातील सायरस यांच्यासम्वेतच्या आठवणीना उजाळा दिला . ‘बालकांच्या रोग निवारणासाठी लसनिर्मिती करून समस्येला जागतिक उत्तर देण्याचे मोठे काम पूनावाला यांनी केले . जगात तीन पैकी दोन बालकांना सिरम ची लस उपयुक्त ठरते . नव्या पिढीच्या उभारणीसाठी हे योगदान महत्वाचे आहे.दातृत्व देखील दाखवले अशा कर्तुत्व वान व्यक्तींचा सन्मान करून पुण्यभूषण ने राज्य आणि देशात आदर्श निर्माण केला आहे ‘ अशेही ते म्हणाले

डॉरघुनाथ माशेलकर,सायरस पूनावाला यांनीही मनोगत व्यक्त केले

पुरस्काराची लाखाची रक्कम आणि त्यात पूनावाला यांच्या दहा लाखाची भर टाकून कष्टकरी महिलांच्या कल्याणासाठी हि रक्कम डॉ बाबा आढाव यांच्या हाती सुपूर्द करण्यात आली

महापौर दत्ता धनकवडे यांनी प्रास्ताविक केले . डॉ संदीप बुटाला यांनी आभार मानले

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहू शकले नाहीत मात्र त्यांनी व्ही डी ओ संदेशाद्वारे पूनावाला यांच्या कार्याचा गौरव केला
यावेळी पाच स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात आला . त्यात मधुकर फडणीस ,शांता रानडे ,गजाभाऊ पिंगळे ,देवीचंद राठोड ,एकनाथ कोठावदे यांचा समावेश होता

राहुल सोलापूरकर यांनी सूत्र संचालन केले

विकासासाठी जास्तीत जास्त वेळ देणार- राज्यमंत्री दिलीप कांबळे

0

पुणे – महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघात नागरिकांशी सवांद साधला . शंकरशेठ रोड येथील धोबी घाटपासून त्यांनी नागरिकांशी सवांद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या . येथील नागरी समस्या जाणून घेतल्या . त्यानंतर त्यांनी नवा मोदीखाना , कृष्णकुंज सोसायटी , सोलापूर बाजार येथील नागरिकांशी सवांद साधला . यावेळी त्यांनी नागरिकांशी सवांद साधताना सांगितले कि , आपण मला बहुमताने निवडून दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे , पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या सर्वागीण विकासासाठी जास्तीत जास्त वेळ देणार . आज प्रत्येक कुटुंबीयात जातीचा दखला काढावा लागतो , त्यासाठी आपण सामाजिक न्याय खात्याच्यावतीने शिधापत्रिकेप्रमाणे एकच कुटुंबातील सर्वांचा जातीचा दाखला देणार आहोत त्यामुळे पुन्हा पुन्हा तहसीलदार कचेरीवर जातीचे दाखले काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागणार नाही . उत्पन्नाचा दाखला देखील कुटुंबियाच्या प्रमुखांच्या नावाने काढणार , आपण मतदार संघाच्या विकासाबरोबरच राज्याचा विकास करणार आहोत . आपण मतदारसंघात महिन्यातील एक रविवार पूर्ण वेळ देणार आहोत , तरुणांना रोजगारासाठी महामंडळामार्फत कर्ज देण्यापेक्षा व्यवसाय उभा करून देणार.

यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे कॅंटोन्मेंटबोर्ड विभागाचे अध्यक्ष संतोष इंदुरकर , प्रविण जाधव , बालम परदेशी , जितेंद्र शिंदे , अतुल गायकवाड , प्रवीण गाडे , शशिधर पूरम , माजी नगरसेवक मनीष साळुंखे , सुनील सोळंकी , सागर शहा , महेंद्र भोज , मयुर सावंत , तन्वीर सय्यद , रणवीर अरगडे , ईश्वर कांकरिया , मोहनीश म्हेत्रे , राजाभाऊ झारखंडे , अजय पाटोळे आदी उपस्थित होते .