Home Blog Page 3648

सलमान खानच्या बहिणीचे उद्या लग्न

0

मुंबईः अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता हिच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये रविवारी रात्री त्याची धाकटी बहीण अर्पिताच्या लग्नानिमित्त संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी शाहरुख खानने देखील हजेरी लावली . शाहरुखने अर्पिताला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सलमान खानचे भावोजी आणि दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री यांनी शाहरुख आणि सलमानचे अर्पितासोबतचे एक छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. या छायाचित्रात शाहरुख आणि सलमान अर्पिताला शुभेच्छा देताना दिसत आहेत. मंगळवारी हैदराबाद येथील फलकनुमा पॅलेसमध्ये अर्पिता तिचा बॉयफ्रेंड आयुषसोबत लग्नगाठीत अडकणार आहे.
अलीकडेच दिल्लीत गृहप्रवेशाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रविवारी मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मेंदी आणि हळदीचा कार्यक्रम झाला. यावेळी खान कुटुंब वास्तव्याला असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर फुलांची सजावट रोशनाई करण्यात आली होती.
अर्पिताचा मेंदी आणि हळदीचा कार्यक्रम खासगी होता. यामध्ये खान कुटुंबाचे निवडक मित्र आणि कुटुंबीय सहभागी झाले होते. एकीकडे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अर्पिताचा मेंदीचा कार्यक्रम सुरु असताना दुसरीकडे बाहेर सलमानच्या चाहत्यांची गर्दी जमली होती. गॅलेक्सीसमोरचा रोड जाम झाला होता. सलमानचे बॉडीगार्ड्स गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते. मुंबईतील वांद्रास्थित हॉटेल ताजमध्ये अर्पितासाठी संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकार सहभागी झाले होते.
2

पळते जंगल पाहूया…“मामाच्या गावाला जाऊया!”

0

पूर्णतः जंगलात चित्रीत झालेला मराठीतील पहिला सिनेमा

पूर्वी सुट्टय़ा लागल्या की आपण मामाच्या गावाला जाण्याची तयारी करायचो. आजी-आजोबा, मामा-मामींकडून होणारे लाड आणि भावंडांसोबत बैलगाडीची रपेट, नदीवर पोहायला जाणे तसेच डोंगर माचीवर हुंदडायची मजा काही औरच होती. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सानिध्यात रमत असू पण, आता ती धम्माल कालौघात विरून गेली आहे. विभक्त कुटुंब पद्दतीमुळे आजी-आजोबांच्या संस्कारापासून दुरावलेल्या लहान मुलांकडे लक्ष द्यायला नोकरदार आई-बाबांना इच्छा असून वेळ नाही. त्यात गॅझेट्स, शाळा, ट्युशन आणि होमवर्क या गर्तेत सापडल्यानेमुलांना मैदानी खेळ सोडाच पण साधं मोकळ्या हवेत बागडणेही दुरापास्त झाले आहे.

भौतिक सुखाच्या मोहापायी नातेसंबंध आणि निसर्गापासून दूर पळणाऱ्या आजच्या मानसिकतेला नातेसंबंधातील ओलावा तसेच निसर्गाबाबतीत सजग करणे ही काळाची गरज आहे. हाच धागा पकडून निर्माता पंकज छल्लाणी आणि लेखक-दिग्दर्शक समीर हेमंत जोशीयांनी‘मामाच्या गावाला जाऊया’ ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मामाच्या ओढीने निघालेल्या उच्चभ्रू कुटुंबातील तीन निरागस भावंडांच्या साहसी जंगल सफरीचा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे. मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट पंकज छल्लाणी फिल्म्स् ह्या कंपनीचा आणि पंकज छल्लाणींचा स्वतंत्र निर्माता म्हणून पहिला चित्रपट आहे.

पंचवीस दिवस जंगलातील शुटींग. त्यात लहान मूलं…तीही शहरातील…एकशे पंचवीस जणांचा चमू…शूटींगच्या सर्व साहित्यासह डोंगरमाथा चढणं आणि जंगलातील पायी प्रवास…वणवे, ऊन, वारा, गारा, पाऊस… वन्यजीव, कीटक, पक्षी तसेच वनसंपत्तीला जपत आणि त्यापासून संरक्षण ह्या सर्व गोष्टान राखत आणि जंगलातील बऱ्यावाईट गोष्टींचा सामना करत ह्या चित्रपटाचे शूटिंग पार पडले.

या चित्रपटात अभिनेता अभिजीत खांडकेकर, मृण्मयी देशपांडे यांच्यासह बाल कलाकार शुभंकर अत्रे, साहिल मालगे आणि आर्या भरगुडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचे संगीत आणि पार्श्वसंगीत प्रशांत पिल्लाई यांनीदिले असूनसंगीतकार अवधूत गुप्ते यांनी या सिनेमासाठी प्रमोशनल साँग तयार केले आहे. गीतकार संदीप खरे, वैभव जोशी आणि अवधूत गुप्ते यांनी गीते लिहीली आहेत. सिनेमॅटोग्राफर अभिजीत अब्दे यांचे छायाचित्रण असून नृत्य दिग्दर्शन जावेद सनादी यांचे आहे. श्रीरंग परिपत्यदार हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून सुचित्रा साठे यांनी संकलन आणि कला दिग्दर्शन संतोष संखद यांचे आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अनमोल भावे यांनी ह्या सिनेमाचे ध्वनीलेखन केले आहे आणि जंगलातील वातावरण आवाजाच्या माध्यमातून उभं करताना प्रचंड मेहनत घेतली आहे.

तीन अल्पवयीन भावंडांचे भावविश्व उलगडून दाखवणारा हा सिनेमा आहे. बॉलिवूडप्रमाणे सुनंदा काऴुसकर आणि समीर दीक्षित या अऩुभवी सिनेकर्मींनी सूपरवायझिंग प्रोड्युसरची जबाबदारी सांभाळली आहे. पिकल एंटरटेनमेंट चित्रपटाचे वितरक आहेत.
मामाच्या गावी केलेल्या धमाल, दंगामस्तीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांना निसर्ग, जंगलाची साहसी सफर घडविण्यासाठीमामाच्या गावाला जाऊया अवश्य पाहा. येत्या २१ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे..

गिरमे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली स्वछ राहण्याची सामुहिक शपथ

0

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित वानवडी बाजारमधील हरिभाऊ बळवंतराव गिरमे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वछ राहण्याची सामुहिक शपथ घेतली . यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस महेश जांभुळकर यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी होप आरोग्य रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अमोल देवळेकर यांनी विद्यार्थ्यांना ” शालेय जीवनातील विदयार्थ्यांचे आरोग्याचे महत्व ” या विषयावर व्याख्यान दिले . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माणिकराव शेंडे , उपमुख्याध्यापक चिंतामणी टिळेकर सुपरवायझर संजीव यादव , आशिष खरात उपस्थित होते .

यावेळी उपस्थितांचे स्वागत आणि सूत्रसंचालन विजया शिवरकर यांनी केले तर आभार स्मिता लोणकर यांनी मानले . शाळेतील शिक्षिका प्रतिभा रासकर यांनी विद्यार्थ्यांना स्वछ राहण्याची सामुहिक शपथ दिली .

4

सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेत मुलांना गुलाबपुष्प , खाऊ वाटप

0

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती अर्थात बालदिनानिमित युनिटी फॉर फ्रीडम फौंडेशनच्यावतीने पुणे कॅम्प भागातील सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेत मुलांना गुलाबपुष्प , खाऊ वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन युनिटी फॉर फ्रीडम फौंडेशनचे अध्यक्ष भगवान वायाळ यांनी केले होते . यावेळी सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ विधाते , अनुपमा कलकोटी , प्रतिभा वायाळ , राकेश कांबळे , दिलीप कदम , सोनल केमुस्कर , आशिष पवार , योगेश अहिर , सुरेश दरवडे , नितीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .
3

बालदिनानिमित अनाथ मुलांना आंघोळ घालून त्यांना नवीन कपडे

0

पंडित जवाहरलाल नेहरू जयंती अर्थात बालदिनानिमित पुणे कॅम्प भागातील एम. एस. व्ही. फाउडेशनच्यावतीने पदपथावरील अनाथ मुलांसमवेत बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी कॅम्प भागातील सेंट मेरी चर्चच्या चौकातील अनाथ मुलांना आंघोळ घालून त्यांना नवीन कपडे आणि उबदार स्वेटर घालून त्यांना गोड खाऊ देऊन मुलांसमवेत एम. एस. व्ही. फाउडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनजितसिंग विरदी यांनी बालदिन साजरा केला , यावेळी त्यांना सुरुवातीला आंघोळ घातली , त्यानंतर नवीन कपडे दिलि. त्यांनतर थंडी पासून बचावासाठी नवीन जाड उबदार स्वेटर घालण्यात आले . त्यानंतर त्यांना गोड खाऊ आणि गुलाबाची फुले देण्यात आली .

यावेळी एम. एस. व्ही. फाउडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनजितसिंग विरदी , मेजरसिंग कलेर , रिदिम्मा विरदी , भोलासिंग अरोरा , मनप्रित विरदी, सलमान शेख , सुरज अग्रवाल , राजू राठोड , भारत शेलार , रफिक शेख , सहेर विरदी , देशमुख चव्हाण आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले .

यावेळी मनजितसिंग विरदी यांनी सांगितले कि , भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालदिनानिमित बाल स्वछता अभियान संपूर्ण देशात राबवीत आहे , त्यामुळे एम. एस. व्ही. फाउडेशनने देखील रस्त्यावरील , चौका – चौकातील बालकांसाठी बाल स्वछता अभियान राबविले . त्यासाठी पुणे कॅम्प भागातील या मुलांना डेटोलच्या पाण्याने चांगली आंघोळ घालून त्यांना स्वछ करण्यात आले . त्यांनतर त्यांना नवीन कपडे देण्यात आली , थंडीपासून बचावासाठी नवीन उबदार स्वेटर घालण्यात आले . त्यानंतर गुलाबपुष्प आणि गोड खाऊ देण्यात आला , यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता . खरोखरच बालदिन खऱ्या अर्थाने साजरा केल्याचे त्यांनी सांगितले . तसेच विक्स वेपोरबची औषधे देखील देण्यात आली .

शाळे बरोबरच आपल्या घराचा परिसर ही स्वच्छ ठेवा-आ.प्रा.मेधा कुलकर्णी

0

विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी स्वच्छतेचा संकल्प करावा-सौ.मंजुश्री खर्डेकर
बाल दिना निमित्त पंडित दीनदयाळ शाळेत स्वच्छता अभियान कार्यक्रम
———————————————————————————————————
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी १४ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर”बाल स्वच्छता मिशन” मोहिमेचे आवाहन केले होते.यास अनुसरून शिक्षण मण्डल सदस्य सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी एरंडवना परिसरातील पुणे म न पा च्या पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत आज या उपक्रमाचे आयोजन केले होते.या अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वच्छ शाळा,स्वच्छ परिसर,स्वच्छ खेळाची मैदाने यासह वैयक्तिक स्वच्छतेवर ही भर द्यावा असे आवाहन सौ.खर्डेकर यांनी केले.यास अनुसरून शाळेतील बालवाडी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आज शाळेचा परिसर स्वच्छ केला.या वेळी आमदार मेधा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.त्यांनी ही विद्यार्थ्यांसह शाळेचा परिसर झाडून काढला.या वेळी प्रा.मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते शाळेची नियमित सफाई करणारया सफाई कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.आ.मेधा कुलकर्णी म्हणाल्या “शाळेच्या सफाई बरोबरच आपण आपल्या घरा भोवतीचा परिसर हे स्वच्छ ठेवला पाहिजे,यामुळे रोग राई ही दूर होते व परिसर प्रसन्न राहतो.”या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एलीझाबेथ काकडे,पर्यवेक्षिका रहिंज मॅडम,तसेच अमोल डांगे,सुधीर फाटक,सुमीत दिकोंडा,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष माटुंगे ताई व अनेक पालक उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना कायमच स्वच्छता राखण्याची शपथ देण्यात आली.
भावी काळात देखील स्वच्छतेचे महत्वा पटवून देणारे कार्यक्रम,व्याख्याने,तसेच स्वच्छ शौचालये व पिण्याचे स्वच्छ पाणी यासंदर्भातील मोहीम मतदारसंघातील सर्वच शाळांमधे राबविण्यात येतील असे आमदार प्रा.मेधा कुलकर्णी व शिक्षण मण्डल सदस्य सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी जाहीर केले.

पर्याय कसला शोधता ? भूलभुलय्या बंद करा … थेट एलबीटी रद्द करा

0

पुणे : महाराष्ट्रातील व्यापार्‍यांनी एलबीटी रद्द व्हावा, यासाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने सत्ता आल्यानंतर एलबीटी तत्काळ रद्द केला जाईल, असे आश्‍वासन दिले होते. त्याची पुर्तता करावी अशी मागणी पूना र्मचंट्स चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विक्रीकर कायदा जावून त्या जागी नव्याने मूल्यवर्धीत अर्थात व्हॅटचा कायदा १ एप्रिल २००६ रोजी राज्यात सुरू झाला. त्यावेळी जयंत पाटील अर्थमंत्री होते. पाटील यांनी यावेळी असे आश्‍वासन दिले होते की, व्हॅटचे उत्पन्न वाढल्यानंतर जकात रद्द करू. त्यावेळी व्हॅटचे उत्पन्न १८ हजार कोटी रुपये होते. ते आज ७५ हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अशावेळी दुसरा कर लावणे व्यापार्‍यांवर अन्यायकारक असल्याचे संचेती यांनी म्हटले आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लुटो बाटो टॅक्स असे केले होते. भारतीतील कोणत्याही राज्यात एलबीटी टॅक्स अस्तित्वात नाही. फक्त महाराष्ट्रात असल्याचेही संचेती यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
चेंबरच्या आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार वितरण समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपा सत्तेवर आला तर राज्यातील एलबीटी या कराचे कोणताही कर न लावता तत्काळ उच्चाटन केले जाईल असे म्हटले होते.
त्यामुळे राज्यातील व्यापार्‍यांची एकमुखी मागणी आहे की, एलबीटी कर कोणत्याही कराशिवाय ताबडतोब रद्द करण्यात यावा.पूना र्मचंट्स चेंबरचे मुख्यमंत्र्यांना निवेदनजकाती ऐवजी स्थानिक संस्था करास २0१३ मध्ये सुरुवात झाली. त्यामध्ये अनेक अडचणी आल्या. स्थानिक संस्था कर कायद्यामध्ये अनेक जाचक तरतुदी असल्यामुळे तो रद्द करावा, अशी एकमुखाने मागणी केली होती. महाराष्ट्र राज्य विधानसभेची नुकतीच निवडणूक झाली असून, त्यामध्ये जो पक्ष एलबीटी रद्द करेल अशाच पक्षास आम्ही मते देवू अशी उघड भूमिका सर्व व्यापार्‍यांनी घेतली होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी व्यापार्‍यांना एलबीटी रद्द करू असे लेखी आश्‍वासन दिले होते.

पुणे जिल्हाधिकार्‍यांना एक लाख रुपयांचा दंड

0

पुणे : वाघोली येथे स्टोन क्रशरने र्मयादेपेक्षा अधिक उत्खनन केल्याच्या प्रकरणात सुनावणीसाठी गैरहजर राहणार्‍या जिल्हाधिकार्‍यांना हरित न्यायाधिकरणाने एक लाख रुपये दंडाची रक्कम भरण्याचा आदेश दिला आहे. ही रक्कम राहुरीच्या कृषी विद्यापीठाकडे भरावी आणि त्यांनी तिचा उपयोग संशोधनासाठी करावा असे न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती विकास किनगावकर यांनी आदेशात म्हटले आहे.

याप्रकरणी वाघोली येथे राहणारे हरुभाई साबळे यांनी वाघोली येथे बेकायदा उत्खनन केल्यासंदर्भात हरित न्यायाधिकरणामध्ये एक याचिका दाखल केली आहे. वाघोली येथील o्रद्धा या स्टोन क्रशरच्या चालकाने तेथील परिसरात बेकायदा दगडाचे उत्खनन केल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. महसूल विभागाने परवानगी दिलेल्या क्षेत्रापेक्षा अतिरिक्त उत्खनन करून, त्यांनी कायद्याचा भंग केल्याचे म्हटले आहे. हे उत्खनन तातडीने बंद करण्यात यावे, असे साबळे यांनी याचिकेत म्हटले आहे. या याचिकेची न्यायाधिकरणाने दखल घेत यातील माहिती सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांना न्यायाधिकरणाने दिला होता. त्यावर सुनावणीसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने एका तारखेला अँड़ मूलचंदानी हे हजर झाले होते, परंतु आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी कोणतीही माहिती सादर केली नाही. यानंतर झालेल्या सुनावणीला जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या वतीने कुणीच हजर झाले नाही. यामुळे न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती विकास किनगावकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची ही रक्कम राहुरी कृषी विद्यापीठाकडे भरावी आणि ती रक्कम विद्यापीठाने संशोधन करण्यासाठी तिचा विनियोग करावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मातेने मुलाच्या जैविक पित्याचे नाव उघड केलेच पाहिजे

0

मुंबई – मातेने मुलाच्या जैविक पित्याचे नाव उघड करणे बंधनकारक आहे, अशी माहिती पासपोर्ट प्राधिकरणाने मुंबई उच्च न्यायालयाला दिली. चार वर्षीय लिसाने (नाव बदललेले) मातेच्या माध्यमातून दाखल केलेल्या याचिकेवर पासपोर्ट प्राधिकरणाने आपले उत्तर सादर केले. पासपोर्टमध्ये जैविक पित्याच्या नावाऐवजी सावत्र पित्याच्या नावाचा उल्लेख करून घेण्यासाठी लिसाने ही याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणी न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठासमोर यापूर्वी १ नोव्हेंबर रोजी परराष्ट्र मंत्रालयाने आपली भूमिका मांडली होती. कुमारी मातेने मुलाच्या जैविक पित्याचे नाव उघड करण्याची आवश्यकता नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर पासपोर्ट प्राधिकरणाची भूमिका नेमकी विरोधी आहे. लिसाच्या याचिकेला उत्तर देताना सहाय्यक प्रादेशिक पासपोर्ट अधिकार्‍यांनी ३ नोव्हेंबर रोजी लिसाला तिच्या जैविक पित्याच्या नावाचा उल्लेख बंधनकारक केला होता. लिसाने पासपोर्टसाठी अर्ज करताना जैविक पित्याऐवजी सावत्र पित्याच्या नावाचा उल्लेख वैध मानण्याची विनंती केली होती.

त्यासंदर्भात पासपोर्ट अधिकार्‍यांना निर्देश देण्याची मागणी लिसाने आपल्या याचिकेद्वारे केली आहे. तिच्या वतीने अँड़ निखिल कर्नावत आणि विराज मणियार यांनी तर केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि प्रादेशिक पासपोर्ट प्राधिकरणाच्या वतीने अँड़ सोमा सिंग यांनी न्यायालयात बाजू मांडली.

मेट्रोसाठी ४ एफएसआय देण्यास विरोध

0

पुणे :

‘सेव्ह पुणे इनिशिएटिव्ह संस्थेने’ मेट्रो सुनावणी मध्ये ‘इलेव्हेटेड मेट्रो’ला विरोध केला. नियोजनातील त्रुटी उघड केल्या आणि नव्याने सुधारित प्रस्ताव तयार करण्याची मागणी केली.
‘सेव्ह पुणे इनिशिएटिव्ह संस्थे’चे संस्थापक दीपक बिडकर यांनी नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांना या मुद्यांवरचे लेखी पत्र सादर केले. मेट्रोसाठी 4 एफएसआय देऊन प्रचंड अवाजवी बांधकाम होईल. त्याचा ताण पायाभूत सुविधांवर येईल. त्यालाही संस्थेने विरोध केला.

केवळ स्वातंत्र्य लढ्यात नाही तर देश घडविण्यातही पं नेहरूंचे योगदान

0

पुणे- पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान केवळ स्वातंत्र्य लढ्यात नाही तर देश घडविण्यातही मोठ्ठे आहे असे प्रतिपादन शहर काँग्रेस चे अध्यक्ष अभय छाजेड यांनी येथे केले .
सहकारनगर मधील बागुल उद्यानामधील भीमसेन जोशी कलादालनात पंडित नेहरू यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे यावेळी उप महापौर आबा बागुल , माजी राज्य मंत्री रमेश बागवे , चंद्रकांत छाजेड , अभिजित कदम मुक्तार शेख महेश वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते
इतिहासाला उजाळा देणे , तो नव्या पिढीपुढे मांडणे हे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचे कर्तव्य असून त्या दृष्टीने आता कार्यकर्त्यांनी सतर्कतेने काम करावे असे आवाहन हि यावेळी अभय छाजेड यांनी येथे केले पंडित नेहरुंचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग आणि देश उभारणीत सहभाग दर्शविणारी मोलाची छायाचित्रे येथे १६ नोव्हेंबर पर्यंत नागरिकांना पाहता येतील

अभिनेत्री ममता कुलकर्णी ला ड्रग्स तस्करी प्रकरणी केनियात अटक

0

अभिनेत्री ममता कुलकर्णी ला ड्रग्स तस्करी केनियात अटक
नवी दिल्ली-बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामीला केनिया पोलिसांनी अटक केली आहे. अमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप या दोघांवर असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.
१९९२ ते २००२ च्या दशकात .सबसे बडा खिलाडी , चायना गेट ,आशिक आवारा , करण अर्जुन, क्रांतिवीर, बाजी, आशिक आवारा यासारख्या काही गाजलेल्या चित्रपटात तिनं भूमिका साकारल्या.
बॉलिवूडच्या पडद्यावर ‘बोल्ड’ दृश्यं दिल्यानं ममता कुलकर्णी प्रकाशझोतात आली होती पण नंतर तिला फार चित्रपट मिळाले नाहीत. ड्रग्स माफिया विकी गोस्वामीशी लग्न करून तिनं सगळ्यांनाच धक्का दिला होता. १९९७ मध्ये अमली पदार्थ तस्करीप्रकरणी विकी दोषी ठरला होता आणि त्याला आजन्म कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली होती. परंतु, चांगल्या वर्तनाच्या आधारावर २०१२ मध्ये त्याला सोडण्यात आलं होतं.
गेली काही वर्षं ममता कुलकर्णी केनियात राहत होती. तिथल्या अमली पदार्थविरोधी पथकानं ड्रग्ज तस्करीचं एक मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं असून त्यात ममता आणि विकीलाही अटक झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे

दोनशे थिएटर्समधे झळकणार ‘एलिझाबेथ एकादशी’

0

बालदिनाची बच्चेकंपनीला मनोरंजनाची खास भेट

दुरचित्रवाणी, यु ट्युब आणि सोशल नेटवर्क साइट्सवरून झळकणारे ट्रेलर, व्हाट्स अॅप फेसबुक सारख्या माध्यमांतून शेअर होणारे पोस्टर्स यामुळे सर्व प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट उद्या बालदिनी सुमारे २०० थिएटर्समधून प्रदर्शित होणार असून दिवसाला साडेचारशेहून अधिक शोज् होणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रासोबतच कर्नाटक आणि गुजरातमधील काही शहरांतही तो झळकणार आहे. परेश मोकाशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मयसभा आणि एस्सेल व्हिजनने केली आहे.

नावातूनच उत्सकुता निर्माण करणारा ‘एलिझाबेथ एकादशी’ बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ठरला आहे. कोणताही प्रसिद्ध कलाकार किंवा नायक, नायिका या चित्रपटामध्ये नसले तरी यातील लहानगे कलाकार हेच या चित्रपटाचे ‘स्टार’ आहेत. पंढरपुरच्या मातीतील सायली भंडारकवठेकर आणि पुष्कर लोणारकर तर पुण्याचा निरागस छोकरा असलेला श्रीरंग महाजन हे तिघेही सध्या प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय झाले आहेत. ट्रेलरमध्ये दिसणारं ज्ञानेश म्हणजेच श्रीरंगचं प्रवचन, झेंडु म्हणजेच सायलीचं “गरम बांगड्या घ्या गरम बांगड्या” हा डायलॉग आणि गण्या म्हणजेच पुष्करच्या स्पेशल शिव्यामुळे सध्या हा ट्रेलर प्रचंड लोकप्रिय झाला आहे.. याशिवाय या तिघांवर चित्रीत केलेलं “दगड दगड” हे गाणंही सर्वांना आवडत आहे. पंढरपुरची पार्श्वभूमी आणि कार्तिकी एकादशीच्या उत्सवात घडणारी एक धम्माल गोष्ट या चित्रपटात बघायला मिळणार आहे.

‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’नंतर परेश मोकाशी यांनी ही दुसरी कलाकृती प्रेक्षकांसाठी आणली आहे. चित्रपटाची कथा मधुगंधा कुलकर्णी यांची असून अमोल गोळे यांचे छायांकन आहे. यावर्षी ‘टाइमपास’, ‘फॅंड्री’, ‘लय भारी’ आणि ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’ सारखे ब्लॉकबस्टर हिट चित्रपट देणा-या एस्सेल व्हिजनने खास बालदिनाच्या दिवशी ‘एलिझाबेथ एकादशीची’ भेट प्रेक्षकांसाठी आणली आहे. बच्चेकंपनीसोबतच मोठ्यांनाही आवडेल असाच हा चित्रपट १४ नोव्हेंबरपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

फिरसे भूलभुलय्या -एकीकडे हेल्मेट सक्ती दुसरीकडे दीड रुपयाने महागले पेट्रोल-डिझेल!

0

पुणे- सरकार कोणतेही येवू द्यात पुणे पोलिस आज्ञाधारक च असावेत असे वाटावे या पद्धतीने पुण्यात हेल्मेट सक्तीचा डाव रचला जात असताना दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या दारात आता दीड रुपयाने आली आहे मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात एक रुपयाने कपात होण्याचे संकेत मिळत असताना केंद्र सरकारने अबकारी करात वाढ केल्याने पेट्रोल-डिझेल प्रतिलिटर दीड रुपयाने महागले आहे. सरकारच्या कठोर न‍िर्णयामुळे सामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा भुर्दंड बसणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने आज (गुरुवारी) अचानक पेट्रोल- डिझेलवरील अबकारी करात जवळपास दीड रुपयाने प्रतिलिटर वाढ केली. अनब्रांडेड डिझेलवरीलअबकारी कर वाढवून 2.96 रूपये तर ब्रांडेड डिझेलवरीलअबकारी 5.25 रूपये केला आहे. तसेच अनब्रांडेड पेट्रोलवरीलअबकारी कर 2.70 रूपये तर ब्रांडेड पेट्रोलवरील अबकारी कर 3.85 रूपये केला आहे.
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने घसरत असल्याने पेट्रोलसह डिझेलचे दर गेल्या दोन महिन्यांपासून अनेक वेळा कमी झाले होते.

भाजपा पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्याउपाध्यक्षपदी रणवीर अरगडे

0

भारतीय जनता पार्टी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी रणवीर अरगडे यांची नियुक्ती करण्यात आली , या नियुक्तीचे पत्र भारतीय जनता पार्टी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष संतोष इंदुरकर यांनी नियुक्ती करण्यात आली .

रणवीर अरगडे हे सोलापूर बाजार येथे राहत असून पतित पावन संघटनेपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत , त्यांनी भारतीय जनता पार्टी पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड वार्ड क्रंमांक पाच , सोलापूर बाजार येथील अध्यक्षपदी काम केले पहिले आहे . तसेच जय भवानी मित्र मंडळच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत . त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांची हि नियुक्ती करण्यात आली आहे . त्यांच्या या नियुक्तीबद्दल राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे अभिनंदन केले आहे .
unnamed