Home Blog Page 3647

सदस्यत्वाचे आवाहन करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची पुण्यात दुचाकी फेरी

0

पुणे :

“राष्ट्रीय समाज पक्षा’च्या झालेल्या “राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्या’त आवाहन केल्याप्रमाणे सदस्यत्वासाठी “रासप युवक आघाडी’ आणि “विद्यार्थी आघाडी’ यांच्या वतीने दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष रोहन आडे, विठ्ठल बोरकर, जेमीश पठाण, प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी झेंडा दाखविल्यानंतर या दुचाकी फेरीस प्रारंभ झाला. कोथरूड शिवाजी पुतळा, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, पुणे स्टेशन, मार्केटयार्ड असा दुचाकी फेरीचा मार्ग होता. मार्केटयार्ड येथे फेरीची सांगता झाली. या रॅलीमध्ये 50 दुचाकीस्वार सहभागी झाले होते. एक रूपया देऊन सदस्यत्व देण्यात येणार आहे.अशी माहिती यावेळी देण्यात आली.
1

मराठी चित्रपटांना न्याय देण्यासाठी मिडियानेच पुढाकार घ्यावा – अजय देवगण

0

पुणे – मराठी चित्रपट सृष्टी बहरत असताना तिचे पाय खेचण्याचेही प्रयत्न होत आहेत . मराठी चित्रपटांना सिनेमागृहे उपलब्ध होत नाहीत हि खरी महाराष्ट्रातील शोकांतिका आहे शासन आणि सर्व स्तरावर याबाबत मी चर्चा केली आहे , पण आता मराठी चित्रपटांना न्याय देण्यासाठी मिडिया नेच पुढाकार घेतला पाहिजे अशी भावना खुद्द बॉलीवूडचा स्टार अजय देवगण याने पुण्यात व्यक्त केली .
पुण्यात आपल्या ‘विटी दांडू ‘ या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेसाठी देवगण पुण्यात आले होते . यावेळी त्यांच्या समवेत लेखक क्रिएटीव्ह दिग्दर्शक विकास कदम अभिनेता अशोक समर्थ , रवींद्र मंकणी उपस्थित होते
यावेळी अजय देवगण म्हणाले , मराठी सिनेमा आता बहरतो आहे ,अत्यंत चांगले चित्रपट मराठीत येत आहेत , चांगली कथा आणि स्क्रिप्ट मिळाली तर मी आणि काजोल असे दोघे हि मराठीत नक्कीच काम करू , पण मराठी सिनेमाला सिनेमागृहे का मिळत नाहीत हा प्रश्न आहे .यामुळे ८० ते ९० सिनेमे तयार होवून धूळ खात पडले आहेत , शासन ,सिनेमागृह चालकांचे प्रतिनिधी अशा सर्व स्तरावर याबाबत चर्चा झाली आहे , शासनाने कायदा हि केला आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही , त्यामुळे आता महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने बलवान असलेल्या मीडियानेच याबाबत पुढाकार घ्यायला हवा . मिदिअने ठरवले तर काय होवू शकत नाही ? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला,
मराठी चित्रपटांना चांगले दिवस आहेत म्हणून हिंदीतल्या बड्या हस्ती मराठीत दाखल होत आहेत हिंदीला दिवस चांगले नाहीत असा मात्र त्याचा अर्थ कोणी काढू नये असेही ते म्हणाले ,मी लहानपणी मराठी सिनेमे पाहत असत . त्यानंतर खंड पडला विकास कदम हे मला नेहमी प्रदाशित झालेल्या चांगल्या मराठी सिनेमांची कथा ऐकवीत . काही चित्रपट मी पहिले देखील , आठ महिन्यापूर्वी या चित्रपटाची कथा त्याने मला ऐकविली आणि पाहता पाहता चं चित्रपट तयार हि केला मी स्वतः हा चित्रपट पहिला आहे मला या चित्रपटाच्या प्रदर्शनाला कुठेही अडचण आलेली नाही मात्र अनेक सिनेमे पडून आहेत त्यांना हि प्रदर्शनासाठी सिनेमागृहे मिळाली पाहिजेत अशीच माझी भूमिका आहे
पत्रकार परिषदेची आणखी काही छायाचित्रे पहा – (all photo by- shailendra sathe )
IMG_0754

IMG_0746

IMG_0741

IMG_0716

मनसे शहर कार्यकारिणीत फेरबदल करणार

0

पुणे :

विधानसभा निवडणुकीत पुण्यातील सर्व मतदारसंघांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सपशेल पराभव झाल्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी त्यांच्या ‘राजमहाल’ या निवासस्थानी कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभागनिहाय कार्यकर्त्यांशी समोरासमोर संवाद साधला. यावेळी राज यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. पक्षाचा झालेला पराभव त्यांनी गांभीर्याने घेतला असून, लवकरच शहर कार्यकारणीत बदल करण्याचे संकेत आज दिले.

राज ठाकरे सध्या पुणे मुक्कामी आहेत. शहरात मनसेची मोठी ताकद आहे. पक्षाचे २९ नगरसेवक पुणे महापालिकेत निवडून आले होते. तरीही मनसेचा एवढा मोठा पराभव कसा झाला, याची कारणे राज यांनी कार्यकर्त्यांशी बोलून जाणून घेतली. पुण्यातील पराभवाबाबत खूप लोकांचे फोन, पत्र, निरोप आले होते. या सर्व लोकांना मुंबईला बोलावणे ठीक नव्हते. त्यामुळे आपणच पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ४ – ५ वर्षांपूर्वीही अशाच प्रकारच्या कार्यकर्त्यांशी गाठी-भेटी घेतल्या होत्या.

आपल्या पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवकांनी इतर पक्षांचे कसे काम केले? गडबड कोणी केली? नुकसान कोणी केले? जुने पदाधिकारी काम करीत नाही का? अशा विविध प्रश्नांची माहिती राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी बोलून घेतली. पक्षाचे नुकसान करणार्‍या पदाधिकार्‍यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. इतरांची गाळणी ठेवण्यापेक्षा कार्यकर्त्यांशी समोरासमोर चर्चा सुरू आहे. कोथरूड, हडपसर, पर्वती, खडकवासला, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, विधानसभा मतदारसंघांतील आढावाही घेण्यात येणार आहे. मुंबईतील शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित आले होते. बर्‍याच वर्षांंनंतर हे दोघे भाऊ एकत्रित आल्याने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विचारणा केली असता, मराठी माणसाच्या हितासाठी दोघांनीही एकत्रित येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचाही एक मतप्रवाह पक्षात आहे. असे असतानाही मनसेची स्थापना झाल्यापासून पुणेकरांनी पक्षाला मोठी साथ दिली आहे. २00७ च्या पुणे महापालिका निवडणुकीत पक्षाचे केवळ ८ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर २0१२ च्या महापालिका निवडणुकीत तब्बल २९ नगरसेवक निवडून आले होते. विरोधी पक्षनेतेपदही मिळाले होते. तरीही पक्षाचा ज्या प्रमाणात महापालिकेत ठसा उमटायला हवा होता, तो दिसून आला नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रथमच राज ठाकरे यांनी थेटपणे कार्यकर्त्यांंशी संवाद साधला. त्यामुळे कार्यकर्त्यांंचा आत्मविश्‍वास कमालीचा वाढल्याचे दिसून आले. पक्षाचा पराभव झाला असला तरी यापुढील काळात आणखी जोमाने काम करणार असल्याचा विश्‍वास कार्यकर्त्यांंनी बोलून दाखविला.

ज्येष्ठांचा आदर करण्याची परंपरा कमी होतेय : उपमहापौर

0

अनुभवाची खाण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा आदर करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. मात्र, हा आदर आता दिवसेंदिवस कमी होत असल्याचे उपमहापौर आबा बागुल म्हणाले.
पुणे शहर कॉंग्रेस ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आज बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘प्रियदर्शनी इंदिरा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी कृष्णकांत जाधव होते. माजी आमदार मोहन जोशी, नीता रजपूत, नगरसेविका लक्ष्मीताई घोडके उपस्थित होत्या.
\आबा बागुल म्हणाले, मागील १५ वर्षांपासून आम्ही ज्येष्ठ नागरिकांना काशी यात्रा घडवितो. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठांना पीएमटी पास कमी दरात मिळण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे प्रय▪करण्यात येईल. तसेच ५00 रुपये देण्याच्या योजनेची तरतूद बजेटमध्ये करण्यात येणार आहे. प्रतिमा इंगोले (विदर्भकन्या), लिज्जत पापडच्या चेतना नहार, कबड्डी सुवर्णपदकविजेती किशोरी शिंदे, बॉक्सिंगचे जागतिक खेळाडू अजितसिंग कोचर, वृत्तपत्रविक्रेत्या चंपाताई करपे यांना ‘प्रियदर्शनी इंदिरा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. उत्तम भुमकर यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले.

PIBM चा ५वा दीक्षांत समारंभ संपन्न

0

पुणे- २०१२-२०१४ सालच्या बॅचचे पीआयबीएमचे विद्यार्थी यांचा ५वा दीक्षांत समारंभ १६ नोव्हेंबर रोजी पुण्यात संपन्न झाला.कार्पोरेट जगत मधील अधिकारी व्यक्ती या कार्यक्रमात उपस्थित होते. यामध्ये श्री पवन पंजवानी (एम. डी टेक्नॉलाजी, जे पी मॉर्गन चेस), अजित दत्ता (सीईओ, टाटा ग्रीन बॅटरीज्) आणि अन्य मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

या दीक्षांत समारंभात श्री पंजवानी यांनी कार्पोरेट जगतातील आपले अनुभव सांगितले आणि विद्यार्थ्यांना सांगितले की आपला हेतू साध्य करण्यासाठी कठीण परिश्रम करावेत.

श्री सतीश वारानसी रिलायन्स जे आय ओ चे अस्स्टेट केअर चे प्रमुख म्हणाले की तुम्ही मोठी मोठी स्वप्ने पाहा. श्री देवाशिष शर्मा, सायनी राय आणि आशिष गेहलोत यांना टॉप विद्यार्थीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पीआयबीएम या संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांना ४.७ लाख रुपये सरासरी सॅलरी पॅकेज प्राप्त झाले आहे.

यावेळी पीआयबीएमचे माननीय अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक रमण प्रीत म्हणाले की सर्व विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने आणि आपले हेतू साध्य करण्यासाठी कष्ट करावेत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.

कार्पोरेट जगतचे श्री पवन पंजवानी (एम. डी. टेक्नॉलाजी, जे. पी. मॉर्गन चेस), श्री शंतनू चौधरी (व्हीपी, एचआर ऍण्ड हेड, मंहिंद्रा लॉजिस्टीक), श्री दिनेश सोटा (सल्पाईज ऍण्ड डिस्ट्रीबूशन, एस्सार आईल, लिमिटेड), श्री मनीष रोहतगी (इंटर नॅशनल मार्केटिंग हेड, महिंद्र टू व्हिलर्स), श्री अजित दत्ता (सीईओ, टाटा ग्रीन बॅटरीज्), श्री सतीश वाराणसी (प्रमुख अस्स्टिेड केअर, रिलायन्स जे आय ओ), श्री झुल्फी अली भुत्तो (रिटेल हेड लेनेव्हो इंडिया स्मार्ट फोन्स) आणि श्री चार्ल्स वरगीज (व्ही पी न्यू इनिशिएटिव्ह डेटा व्हीजन सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रा. लि.) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली.

बिल्डरच्या स्वच्छतेकडील दुर्लक्षाने 20 जण डेंग्यूच्या तावडीत-नगरसेविका मानसी देशपांडे

0

वर्धमानपुरा सोसायटीतील अस्वच्छतेबद्दल बिल्डरवर
कारवाई करण्याचे नगरसेविका मानसी देशपांडे यांचे प्रशासनाला आदेश

पुणे :
मार्केटयार्डजवळील वर्धमानपुरा उच्चभ्रू सोसायटीतील अस्वच्छता, घाण, दूषित पाणी पाहून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बिल्डरवर कारवाई करावी, असे आदेश नगरसेविका सौ.मानसी देशपांडे यांनी रविवारी दिले. रविवारी सोसायटीतील रहिवाशांनी “स्वच्छ भारत अभियाना’चे आयोजन केले होते. “सुयोग ग्रुप’, “जैन आशापुरी ग्रुप’, “लिजेंड ग्रुप’, “कुबेर प्रॉपर्टीज’ यांनी संयुक्तपणे बांधलेल्या या सोसायटीमध्ये 300 फ्लॅट्‌स आहेत. बिल्डरनी सोसायटीला हस्तांतरण केलेले नाही. देखभालीसाठी कोट्यवधी रुपये गोळा केले आहेत. मात्र, अस्वच्छतेपोटी पालिकेने मागील आठवड्यात डेंग्यू आळ्या सापडल्याने 11 हजार रुपये दंड केलेला आहे. तरीही बिल्डरने दुर्लक्ष केल्याने सौ. मानसी देशपांडे यांनी या बिल्डर मंडळींवर कारवाई करावी, असे अधिकाऱ्यांना सांगितले. बंद पोहण्याचा तलाव, ठिकाठिकाणी साचून राहिलेले पाणी, अस्वच्छता यामुळे सोसायटीतील 20 जणांना डेंग्यूची लागण झालेली आहे, अशी माहिती रहिवासी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते शामसुंदर कलंत्री यांनी दिली.

यावेळी स्वच्छता अभियानाने स्वच्छतेस प्रारंभ करण्यात आला. श्यामसुंदर कलंत्री, हर्षद लोढा, अनिल पोरवाल, अमित मुनोत, राजू सुराणा, माणिक बोकरीया, मीना कलंत्री, रश्मी ढालावत, फुटरमल खिंवसरा, महेश खिंवसरा, अशोक खिंवसरा, सोहनलाल परमार, वालचंद कटारिया, माधुरी राठोड आदी 200 जणांचा सहभाग होता. बिल्डरवर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली.

श्रीमंत माधवराव पेशवे यांना २४१ व्या पुण्यतीथी निमित्त आदरांजली

0

3

2
पुणे- मराठी दौलतीचे प्रधानपंत माधवराव पेशवे यांच्या दोनशे एक्केचाळीसाव्या पुण्यतिथी निमित्त आज त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.यावेळी उपमहपौर आबा बागुल,नगरसेविका स्मिताताई वस्ते,अश्विनी कदम,क्रीएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,देवदेवेश्वर संस्थान चे उदयसिंह पेशवे,रमेश भागवत,डोक्टर प्रभाकर ताकवले,श्री.सुभाष बाठे ई.उपस्थित होते.या वेळी बोलताना श्री.ताकवले म्हणाले “माधवराव पेशवे हे प्रचंड कर्तुत्ववान प्रधानपंत होते.1761 ला पानीपत च्या लढाई नंतर पुढील 18 वर्ष त्यानी पुण्याचा धाक निर्माण केला.पुन्हा कोणी ललकारु नये अशी परिस्थिती निर्माण केली.त्यांच्याकडे गुणग्राहकता होती.त्यांच्याच काळात रामशास्त्रींसारखे न्यायमूर्ती कार्य करत होते.”त्यांच्या सारखा पेशवा होणे नाही,ज्यानी लढाई न लढता देखील धाक निर्माण केला.”

राज्यात सरकारच्या चाव्या शिवसेनेकडेच – संजय राऊत

0

मुंबई -शरद पवार यांनो अलिबागमध्ये मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी, राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची अजिबात शक्यता नाही. सरकार राहणार की जाणार याच्या चाव्या शिवसेनेकडे आहेत, असा दावा केला आहे. यामुळे शिवसेना – भाजप पुन्हा एकत्र येण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु झाली
खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, शरद पवारांनी यापूर्वी भाजपला स्थिर सरकारसाठी दिलेल्या पाठिंब्याबाबत वक्तव्य आठवावे. पवारांनी भविष्यवाणी केली असली तरी राज्यात मध्यावती निवडणुका होण्याची अजिबात शक्यता नाही. सरकार राहणार की जाणार याच्या चाव्या शिवसेनेकडे आहेत. पण निवडणुका होणार नाहीत याची खात्री आम्हाला आहे असे संजय राऊत म्हणाले . शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजप सरकारला दिलेल्या पाठिंब्यानंतर पवारांनी घेतलेल्या भूमिकेवर शिवसेनेने टीका केली आहे.

राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही ; भाजपकडूनच एमआयएमला प्रोत्साहन- शरद पवार

0

अलिबाग – राज्यातील जनतेने भाजप-सेना या विरोधी पक्षांना स्थिर सरकारसाठी मतदान केले मात्र त्यांच्यात एकत्र येण्याचे धाडस नाही. यामुळे सध्या राज्यातील राजकारणात दीर्घकालीन स्थैर्याची स्थिती दिसत नाही. अशा स्थितीत राज्यात पुन्हा केव्हाही निवडणुका होऊ शकतात तेव्हा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्यापासून पक्षबांधणीच्या कामाला लागावे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले.आहे.त्याचबरोबर एमआयएम या कट्टरवादी पक्षाच्या वाढत्या प्रभावावर बोलताना पवारांनी भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. भाजपमधील एक गट एमआयएमला प्रोत्साहन देत असल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला. या दोघांमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय चिंतन शिबीर आजपासून अलिबागमध्ये सुरू झाले. या शिबीराला पक्षाचे महत्त्वाचे 200 ते 250 नेते व पदाधिकारी उपस्थित आहेत. यावेळी ‘वेध भविष्याचा’ या चर्चासत्रात शरद पवार बोलत होते. शरद पवारांनी मार्गदर्शन करताना सध्याची राजकीय स्थिती व पक्षाने पुढे कसे काम करावे याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
पवार म्हणाले, नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. निकालाचा टक्का वाढला पण आपल्या पक्षाला अपेक्षित मतदानाची टक्के वाढल्याची दिसून आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. 17.5 टक्के आपल्याला मिळाली असली तरी काँग्रेसला 18 व शिवसेनेलाही 20 टक्क्यांच्या आतच मते मिळाली आहेत. भाजपला एका विशिष्ट परिस्थितीत यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला दमदार यश मिळाले त्याचा परिणाम विधानसभेतही दिसून आला. याचबरोबर आपल्या पक्षाने केवळ 130 जागांचीच तयारी केली होती. जागावाटपाचा पेच न सुटल्याने आपल्याला अनपेक्षित सर्व जागा लढाव्या लागल्या. स्वतंत्र निवडणुका लढण्याचे जसे तोटे झाले तसा फायदाही झाला. पक्षाला 41 जागावर विजय मिळाला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 56 जागांवर दुस-या क्रमांकावर तर 51 जागांवर तिस-या क्रमांकावर आहे. यातून एक आकडेवारी दिसून येते की 148 जागा जिंकण्याची आपली क्षमता आहे. पक्षाचा पराभव का झाला याचे चिंतन केले पाहिजे. सत्ताधारी काँग्रेस पक्षांसह विरोधी पक्षाने राष्ट्रवादीबाबत मतदारांत संभ्रम निर्माण केला. त्याचा फटका आपल्याला बसला. पण निवडणुकांत विजय-पराजय होतच राहतात. मात्र आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास दिला पाहिजे व ताकद दिली पाहिजे व जनतेच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे असे पवारांनी सांगितले.

भरतनाटयातून उलगडले संतांचे तत्वज्ञान

0

1
पुणे: नेहा भाटे, परिमल फडके आणि पवित्र भट या दिग्गज कलाकारांनी सादर केलेल्या भरतनाटयमच्या नृत्याविष्कारातून संतांच्या तत्वज्ञानाची अनुभूती रसिक प्रेक्षकांनी घेता आली. खडके फाउंडेशनच्या ‘देखिला देवो’ या संतांच्या रचनांवरील सी. डी. प्रकाशनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सुप्रसिध्द व्हायोलियनवादक प्रभाकर जोग यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे सी. डी. चे प्रकाशन करण्यात आले. श्री संत सेवा संघाचे संस्थापक संजय गुरुजी, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर, राज्याचे पर्यटन संचालक सतीश सोनी, प्रतिष्ठानचे संजय खडके यावेळी उपस्थित होते.

ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, श्रीनिळोबाराय या संतांनी रचलेले अभंग आणि वारकरी संप्रदायाला भक्तिरसात चिंब करणाऱ्या ‘गजरा’चा सी. डी. मध्ये समावेश आहे. संजय गुरुजी यांनी संहिता लेखन केले असून जीवन धर्माधिकारी यांनी संगीत दिले. पंडित रघुनंदन पणशीकर व जितेंद्र अभ्यंकर यांचा स्वर असून स्वर्णिमा यांनी निरुपण केले आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या भव्य प्रतिकृतीसमोर नेहा भाटे, परिमल फडके आणि पवित्र भट या कलाकारांनी भरतनाटयमच्या माध्यमातून संतांचे तत्वज्ञान उलगडून सांगितले. अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग होता.

‘अनुपम्य मनोहर, कासे शोभे पीतांबर’, ‘कैवल्याचा गाभा, व्यापूनिया ठेला नभा’, ‘लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त’ आदी संतरचनांचे निरूपण, सादरीकरण व नृत्याविष्कार आणि’जय जय विठोबा रखुमाई’, ‘ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानराज माऊली तुकाराम’ हा वारकरी संप्रदायाला प्राणाहून प्रिय असणारा गजर आणि पालखी, रिंगण, फुगडया, फेर ही वारीतील मनोहारी दृष्ये रसिकांना टिपता आली.

मारुती तुपे, ओमप्रकाश वाघमारे, दीपक राठोड या कार्यकर्त्यांना विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले.

संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिरात संजीवन समाधी दिन सोहळ्याचे आयोजन.

0

पुणे शहरातील प्रसिद्ध संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर, ज्ञानेश्वर पादुका चौक, येथे सालाबादप्रमाणे दिनांक २० नोव्हेंबर २०१४ रोजी संजीवन समाधी दिन सोहोळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न होणार आहे, दिवसभरतील कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत पाहटे ४.३० ते ६.३० वाजे पर्येंत काकड आरती, सकाळी ८ ते ९-३० वाजेपार्येंत माउलींच्या पादुकांचा महाअभिषेक व महाआरती, दुपारी ४ ते ६ ह. भ. प श्री अभयमहाराज टिळक यांचे प्रवचन सायंकाळी ६ ते ७ माउलींच्या पादुकांची दिंडी सहा मिरवणूक, ७ ते ८ कीर्तन, व ८ ते १० महाप्रसाद असे या सोहळ्याचे स्वरूप आहे. अशी माहिती संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिरचे मुख्य विश्वस्त श्री. संतोष उर्फ बापूसाहेब जगताप यांनी दिली. या सोहळ्यामध्ये भाविकांनी व भजनी मंडळानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान विश्वस्त श्री महेश क्षीरसागर व श्री दिलीप शेळके यांनी केले आहे. मंदिराचे विश्वस्त श्री. अमेय जगताप उत्सव प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.

दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर; अशा अवेळी असू नका रे एकमेकांपासून दूर; माय मराठी मना मनाचा चा आता तरी ऐका सूर

0

दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर;अशा अवेळी असू नका रे (मायमराठी )आईपासून दूर
10610896_10153383704670550_2148817905724878111_n
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर भेटीनं आज महाराष्ट्राच्या मायमराठी वातावरणात पुन्हा आशा पल्लवित झाल्या . शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवाजी पार्कवरून इतिहास घडवला, त्याच शिवतीर्थावर आज बाळासाहेबांच्या या दोन कट्टर भक्तांनी नव्या राजकीय भविष्याची चाहुल दिली आहे. ‘उद्धवदादू’च्या शेजारी बसून ‘राजा’नं त्याच्या पाठीवर आधाराचा हात ठेवला, तेव्हा शिवसैनिक-मनसैनिकांसह, तमाम मराठीजन सुखावले. ‘एकत्र या-एकत्र या उद्धव-राज एकत्र या’, अशी हळवी सादच त्यांच्या मनानं पुन्हा घातली. अर्थात, उद्धव आणि राज यांची ही भेट दबावतंत्राचा भाग असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. दोघांसाठीही सध्या ‘बुरे दिन’ सुरू असल्यानं ‘अच्छे दिन’वाल्यांना इशारा देण्यासाठीच त्यांनी हे गुफ्तगू केलं असावं, याकडे ते लक्ष वेधत आहेत .

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त आज सकाळपासूनच शिवाजी पार्कवर ‘स्मृतिस्थळा’चं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून हजारो शिवसैनिक येताहेत. ‘बाळासाहेब अमर रहे’च्या घोषणा शिवतीर्थावर घुमत आहेत. आपल्या लाडक्या नेत्यांचं स्मरण करताना, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना अनेकांचे डोळे पाणवताहेत. अशातच, दुपारी दीडच्या सुमारास राज ठाकरे शिवाजी पार्कवर आले . बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृतिदिनी, ‘कृष्णकुंज’पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘स्मृतिस्थळा’वर राज गेले नव्हते. त्यामुळे ते यंदाही शिवतीर्थावर जाणं टाळतील, असाच अंदाज होता. परंतु, राज आपल्या शिलेदारांसोबत तिथे गेले. त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी पुष्पांजली वाहिली आणि मग सगळंच अकल्पित घडलं.
राज यांनी उद्धवना भेटणं स्वाभाविकच होतं; पण हस्तांदोलनानंतर, रामदास कदम यांच्या आग्रहावरून, खासदार संजय राऊत यांनी त्यांना बसायला आपली खुर्ची दिली आणि मग दोन भाऊ अगदी आरामात शेजारी-शेजारी बसले. हे दृश्यं टिपण्यासाठी असंख्य कॅमेरे सरसावले असतानाच, राज यांनी उद्धव यांच्या पाठीवर आपला हात ठेवला आणि अनेकांना भरून आलं. राज-उद्धव अगदी मोळकेपणानं गप्पा मारत होते, हसत होते. संजय राऊत हे जणू या गप्पा फुलवण्याचं काम करत होते. ठाकरे कुटुंबाचे निकटवर्तीय रवी जसरा यांनीही हे दृश्य आपल्या मोबाइलमध्ये बंदिस्त करून घेतलं, या दोघांसोबत स्वतःचाही फोटो काढून घेतला. मग संजय राऊत यांनाही हा मोह आवरला नाही.
असंख्य मराठी माणसांना हवीहवीशी वाटणारी ही राज-उद्धव भेट साधारण दहा मिनिटं चालली. त्यात हे दोन भाऊ नेमकं काय बोलले, हे कळू शकलेलं नाही. पण त्यातून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. नातं वेगळं आणि राजकारण वेगळं, असं राज यांनी अनेकदा स्पष्ट केलंय. उद्धव यांच्या ऑपरेशनवेळी बाळासाहेबांनी राज यांना बोलावून घेतलं होतं. अलीकडेच, उर्वशीच्या अपघातानंतर उद्धव-रश्मी यांनी तिची भेट घेतली होती. परंतु, राज शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर या दोघांनी अशा गप्पा पहिल्यांदाच जाहीरपणे मारल्या. अर्थात, त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची शक्यता बिलकूलच नाही. परंतु, या दोघांच्या भेटीनं त्यांच्या विरोधकांचं धाबं नक्कीच दणाणलंय.
विधानसभा निवडणुकीनंतर मनसेची अवस्था बिकट आहे आणि भाजपनं शिवसेनेची गोची केली आहे. त्यामुळे राज आणि उद्धव यांनी एकप्रकारे ‘शक्तिप्रदर्शन’च केल्याचं बोललं जातंय. त्याचे राजकारणात कसे पडसाद उमटतात, शिवसेनेला अपेक्षित सन्मान मिळतो का, ही मनोमीलनाची नांदी ठरते का, याबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे.
या दोघांच्या देहबोलीतून स्पष्टपणे दिसून येत होते की, या दोन्ही बंधूंमध्ये आता कोणताही दुरावा नाही तसेच हे दोघे राजकीयदृष्ट्या एकत्र येऊ शकतात. दरम्यान, या भेटीबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना छेडले असता ते म्हणाले, आज आमच्या सर्वांसाठी दु:खाचा क्षण आहे. तरीही यातून काही आनंदाची वार्ता आली तर महाराष्ट्राचे व मराठी माणसाचेच भले होईल. नांदगावकर यांनी बोलण्यातून राज आणि उद्धव ठाकरे काही दिवसातच एकाच राजकीय मंचावर दिसतील असे संकेत दिले.

आनंदच्या तीन खंडावरील विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

0

3

2

4
आशिया, आफ्रिका व युरोप या तीनही खंडाच्या सर्वोच्च शिखरावर राष्ट्रगीत वाजवणारा एकमेव मानव.

विक्रमवीर आनंद बनसोडे याने सुरु केलेल्या “वर्ल्ड पीस सेव्हन समीट” मोहिमेतील चवथे शिखर नुकतेच ३ नोव्हेंबर रोजी त्याने सर केले असून त्याअंतर्गत ऑस्ट्रेलियातील माउंट कोसिस्झ्को व इतर ९ शिखरे सर करणाऱ्या पहिल्या भारतीय टीमचे नेतृत्व करण्यचा विक्रम त्याच्या नावे झाला आहे. ही मोहीम संपवून नुकतेच सिडनी मध्ये आगमन झाल्यावर “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’” ने आनंद ला एक सुखद आनंदचा क्षण देत त्याला त्याच्या मागच्या रेकॉर्ड ची नोंद “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये झाल्याचे मेलद्वारे कळवले. नुकतेच ऑस्ट्रेलिया मधील मोहीम पूर्ण करून सोलापुरात आलेल्या आनंद बनसोडे याने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आनंदने मे २०१२ मध्ये माउंट एव्हरेस्ट, जुलै २०१४ मध्ये युरोपातील सर्वोच्च माउंट एल्ब्रूस, ऑगस्ट २०१४ मध्ये आफ्रिकेतील सर्वोच्च किलीमांजारो व ३ नोव्हेंबर २०१४ रोजी ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च माउंट कोसिस्क्को हि शिखरे सर केली आहेत. या प्रत्येक शिखरावर भारताचे राष्ट्रगीत वाजवण्याचा विक्रम त्याने केला असून या प्रत्येक मोहिमा काहीतरी वेगवेगळ्या सामाजिक विषयांना समर्पित केल्या होत्या.

सातही खंडातील सात सर्वोच्च शिखरे सर करण्याची मोहीम एव्हरेस्टवीर आनंद ने हाती घेतली असून त्यांतर्गत त्याने जगातील सात खंडातील सर्वोच्च उंचीवर भारताचे राष्ट्रगीत वाजवण्याचा एक आगळा-वेगळा विक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ मे २०१२ रोजी एव्हरेस्टवरील कॅम्प-२ वर भारताचे राष्ट्रगीत वाजवून जगातल्या सर्वोच्च उंचीवर राष्ट्रगीत वाजवण्याचा विक्रम त्याने केला होता. त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली होती.तसे प्रमाणपत्र त्याला २०१३ मध्येच मिळाले होते. २०१४ यावर्षात जागतिक शांततेची मोहीम हाती घेवून त्याने १७ जुलै रोजी युरोपातील सर्वोच्च माउंट एल्ब्रूस, १५ ऑगस्ट रोजी आफ्रिकेतील सर्वोच्च माउंट किलीमांजारो हि शिखरे सर करून त्याच्या सर्वोच्च उंचीवर भारताचे राष्ट्रगीत वाजविले होते. याशिवाय या सर्व मोहिमा वेगवेगळ्या सामाजिक विषयांना समर्पित करून गिर्यारोहणाला एक आगळी-वेगळी सामाजिक बांधिलकीची जोड दिली. आता आनंदने वाजवलेल्या राष्ट्रगीताची नोंद “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स” मध्ये झाली असून रेकॉर्ड बाबतीत आगळी वेगळी गोष्ट म्हणजे त्याने केलेल्या सामाजिक विषयांच्या समर्पनाचीही इंडिया बुक ने रेकॉर्ड मध्ये नोंद केली आहे. या बाबतीतले पत्रही त्याला पाठवले असून लवकरच दिल्ली मध्ये या प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे. असे आनंद ने सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेस राजेश जगताप, स्वप्नपूर्ती चे सुरेश नारायणकर उपस्थित होते.

प्रायोजकांचे आभार-

युरोपातील माउंट एल्ब्रूस मोहीम ‘बहुजन हिताय संघ’, श्री.रत्नाकर गायकवाड व पुणे येथील सुहास गांधी यांनी प्रायोजक केली होती. आफ्रिकेतील मोहीम मुळचे सोलापूरचे असलेले उद्योजक श्री.प्रमोद साठे यांनी प्रायोजक केली होती. यांच्यामुळेच आज माझ्या मोहिमा यशस्वी झाल्या असून त्यांच्या विश्वासामुळेच आज देशाचे नाव उंचावू शकलो त्यामुळे हे यश त्यांचे आहे असे आनंद ने सांगितले.

ऑस्ट्रेलियातील मोहिमेबद्दल-

ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च १० शिखरे सर करणाऱ्या प्रथम भारतीय टीमचे नेतृत्व आनंद ने केले असून हि मोहीम यशस्वी करण्यापागे गुरु सुरेंद्र शेळके यांनी खूप मोठी साथ दिली आहे असे आनंद ने सांगितले. ११ गिर्यारोहाकांपैकी पैकी ८ जणांनी १० शिखरे सर करून ऑस्ट्रेलियन गिर्यारोहण क्षेत्रात एक इतिहास नोंदला आहे. त्यामुळे कॅनबेरा येथील भारतीय दुतावासानेही आनंद व टीमचे अभिनंदन केले होते. याशिवाय आनंदने युनायटेड नेशन्सच्या स्त्री-पुरुष समानतेच्या असलेल्या हिफोरशी या मोहिमेसाठी शिखरावर ३ जोडपी व इतर गिर्यारोहकांना समानतेची शपत दिली होती. १४००० फुटावरून फ्री फॉल करून हिफोरशी मोहिमेला समर्पक अशी कामगिरी आनंदने केली आहे. या मोहिमेतून ऑस्ट्रेलियातील १० सर्वोच्च शिखरे सर करण्याचा विक्रम प्रथम भारतीय आनंद व इतर ७ जणांच्या नावे झाला आहे.

ऑस्ट्रेलिया मधील १० सर्वोच्च शिखरे सर करण्याचा विक्रम करणारी प्रथम भारतीय टीम –

यांच्या नावे झाला विक्रम- आनंद बनसोडे (टीम लीडर), आकाश जिंदाल (दिल्ली), साची सोनी(जयपूर), मनीषा वाघमारे (औरंगाबाद), शरद व अंजली कुलकर्णी (मुंबई), श्रीकांत व रुपाली चव्हाण ( पुणे).

याशिवाय टीम मधील संजना दलाल(मुंबई) व महाराष्ट्र पोलीस मधील दिनेश व तारकेश्वरी राठोड हे ऑस्ट्रेलिया मधील ५ सर्वोच्च शिखरे सर करू शकले.

झी मराठीवरील ‘जय मल्हार’ मालिकेत हेगडी प्रधानांच्या भूमिकेत नकुल घाणेकर

0

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘जय मल्हार’ मध्ये हेगडी प्रधानांची भूमिका करणारे अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे आकस्मिक निधन झाले आणि अवघ्या मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली. आपल्या आवडीच्या कलाकाराच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला. अशा दुःखद प्रसंगात सहकलाकार आणि संपूर्ण टीमचं सावरणं खूप अवघड असतं, पण प्रेक्षकांना दिलेलं मनोरंजनाचं वचन पाळणंही तेवढंच गरजेचं असतं. अशा स्थितीत “शो मस्ट गो ऑन” म्हणत काही गोष्टींची नव्याने जुळणी आणि सुरुवात करावीच लागते. हेगडी प्रधानांच्या भूमिकेबाबतही आता हेच घडणार असून ही लोकप्रिय भूमिका आता नकुल घाणेकर साकारणार आहे.

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या खंडेरायांचे प्रधान असलेले हेगडी प्रधान हे विष्णूंचा अवतार होते. खंडेरायांच्या राज्यकारभारात आणि वैयक्तिक आय़ुष्यातही कायम साथ देणारी ही व्यक्तिरेखा त्यामुळे मालिकेतही त्यांची भूमिका तेवढीच महत्त्वाची होती. मालिका सुरू झाल्यापासून अतुल अभ्यंकर हेगडी प्रधान साकारत होते. पण त्यांच्या अकाली निधनाने ही भूमिका नकुल घाणेकर या तरूण अभिनेत्याला मिळाली. या भूमिकेबद्दल बोलताना नकुल म्हणाला की , “अतुलने साकारलेली हेगडी प्रधानांची ही भूमिका कमालीची लोकप्रिय झाली होती. आपल्या अभिनयातून त्यांनी हे पात्र एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. शिवाय या भूमिकेसाठी त्यांना झी मराठी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकाराचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या अचानक जाण्याने माझ्याकडे ही भूमिका आली. या भूमिकेकडून प्रेक्षकांच्या अनेक अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. ही भूमिका माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे असे मी मानतो. यासाठी मी जय मल्हार मालिकेचे जवळपास सर्व भाग आणि हेगडी प्रधानांची दृश्ये युट्युब आणि डिव्हीडीजवर वारंवार बघितली. त्यातील बारकावे टिपले. यासाठी माझ्याकडे खूप कमी वेळ होता पण मी माझ्यापरीने पूर्ण तयारी केली आहे. अगदी अतुल अभ्यंकरांसारखी भूमिका मी साकारेन की नाही हे मला माहित नाही पण त्याच्या जवळ जाण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन आणि प्रेक्षकांनाही तो आवडेल अशी आशा मी बाळगतो.”

झी मराठीवर सायंकाळी ७ वा. प्रसारित होणा-या जय मल्हार मधील हा बदल लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

उद्या राज ठाकरे उतरणार हेल्मेट विरोधात ?

0

पुणे : उद्या राज ठाकरे हे पुण्यात हेल्मेटच्या सक्तीला विरोध करतील आणि याबाबत आंदोलनाची घोषणा करतील अशी अनेक मनसे कार्यकर्त्यांची भावना झाली आहे कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर करण्याबरोबरच पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी जातीने पुढाकार घेतला. त्यासाठी उद्या दिनांक . १८ पासून ते शहराच्या आठही मतदारसंघांतील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी हा विषय काढण्याची अनेकांची इछ्या असल्याचे बोलले जाते
उद्या सकाळी राज ठाकरे सकाळी ९ वाजता कसबा गणपतीचे दर्शन घेतील आणि पुण्यात संवादाला प्रारंभ करतील ते २० तारखेपर्यंत पुण्यातच असतील असेही समजते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली. त्यातच गटबाजीला उधाण आले आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वतः राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरवात पुण्यापासून होणार आहे. चार दिवसांच्या दौऱ्यात एका दिवशी दोन मतदारसंघ असे आठही मतदारसंघातील गट अध्यक्ष, महिला अध्यक्ष, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना ते भेटणार आहेत. त्यासाठी वेळापत्रक तयार केले असून, या बैठकीत त्यांची बाजू ऐकून घेणार आहेत.
दरवेळेस पक्षाकडून पुण्याची जबाबदारी एका नेत्यावर देण्यात येते; परंतु नेमण्यात आलेल्या नेत्यांकडून शहर संघटनेत म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे राज यांनीच लक्ष घालण्याचे ठरविल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला. कसबा विधानसभा मतदारसंघापासून या भेटीला सुरवात होणार आहे. मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डासाठी स्वतंत्र वेळ देण्यात आला आहे. प्रत्यक्ष भेटीत साहेबांसमोर कार्यकर्ते काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे.