Home Blog Page 3643

शेतीच्या शाश्‍वतीसाठी शेती महिलांच्या नावावर होण्याची गरज – उमाकांत दांगट

0

पुणे – शेतीचा शोध महिलेने लावला आणि आजही शेतात सर्वाधिक कष्ट करताना महिला दिसत आहेत. त्यांच्या या कष्टांना मान्यता देण्याची गरज आहे. कारण शेतीचा शोध लागेपर्यंत माणूस रानटी अवस्थेतच जगत होता. शेती पिकवण्याचा पर्याय त्याला महिलांनी उपलब्ध करून दिला. मात्र, दिवसेंदिवस शेती ही अशाश्‍वत होत असताना ती शाश्‍वत होण्यासाठी शेती महिलांच्या नावावर होण्याची गरज आहे असे मत राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी आज वनराईच्या कार्यक्रमात व्यक्त केले.

वनराईच्या ‘शाश्‍वत शेती’ या विषयावरील वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन ‘आदर्श गाव समिती’चे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार आणि दांगट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, विश्‍वस्त रोहिदास मोरे, सचिव श्रीराम गोमरकर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय मेहता, डॉ. प्रतिमा इंगोले, वसुंधरा एकात्मिक पाणलोट विकास यंत्रणेचे प्रमुख गणेश चौधरी, अंकाचे कार्यकारी संपादक अमीत वाडेकर, वनराईचे मुख्य प्रकल्प संचालक जयवंत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

दांगट पुढे म्हणाले, ‘‘पाणलोट व्यवस्थापनाचे मॉडेल महाराष्ट्राने देशाला दिले. तेच मॉडेल केंद्र सरकारने देशभर राबविले आहे. या उपक्रमात महाराष्ट्रात सध्या पन्नास लाख हेक्टर क्षेत्रांवर एकात्मिक पाणलोट विकासाचे काम सुरू असून, याद्वारे या चळवळीला वनराईने चांगले नेतृत्त्व दिले असून, शेतकर्‍यांना मार्गदर्शनही मिळत आहे. शाश्‍वत शेती अभियानासंदर्भात ते म्हणाले, जमिनीचे आरोग्य आणि पाण्याचे व्यवस्थापनाबरोबरच त्याला सेंद्रिय शेतीची जोड देणे आवश्यक आहे. शेतीचा शोध पन्नास हजार वर्षांपूर्वी महिलांनी लावला, त्याच महिला आजही शेतात सर्वाधिक कष्ट करत आहेत. काळाच्या ओघात अशाश्‍वत होत असलेली शेती शाश्‍वत करण्यासाठी शेतीची मालकी महिलांच्या नावावर होणे गरजेचे आहे.’’

पोपटराव पवार म्हणाले, ‘‘शेतीसाठी ठोस धोरण ठरविण्याची गरज निर्माण झाली. शेतीची सर्व अनुदाने बंद करा; पण त्यासाठीचे ठोस धोरण नक्की करा. उस्मानाबादसारख्या जिल्ह्यात एकीकडे 50 हजार टन उस गाळपाला जातो; तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचे टँकर फिरताना दिसतात. यावरून आपण नेमके कुठे चाललो आहोत, हे स्पष्ट होत नाही. राज्यात 82 टक्के शेतकरी 5 एकरावर आलेले आहेत. पाणी आणि खताचा अतिवापर यामुळे उसाची शेती निकृष्ट होत आहे. जमिनीत मुरणा-या पाण्याचा उपसा करून प्लास्टिकद्वारे शेततळी उभारून त्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पिभवन केले जात आहे. त्यामुळे पाण्याचा ताळेबंद करण्याची वेळ आता आली आहे. महाराष्ट्रात सुरू झालेली ‘आदर्श गाव योजना’ आता देशपातळीवर ‘सासंद आदर्श ग्राम योजना’ म्हणून राबविली जाते, याची सुरूवात सर्वप्रथम वनराई, विलास साळुंखे, अण्णा हजारे, विजय अण्णा बोराडे व हिवरे बाजारामध्ये आम्ही केली होती. एक कार्यकर्ता म्हणून याचे निश्‍चितच समाधान वाटते.

डॉ. मुजूमदार म्हणाले, ‘‘वनराईचा ‘शाश्‍वत शेती’ हा अंक नसून ग्रंथ आहे. त्यामुळे तो ग्रंथालयापर्यंत पोहोचल्यास अभ्यासकांपर्यंत जाईल. एखाद्या संस्थेचा संस्थापक होणे सोपे आहे, पण वारस होणे अवघड आहे, कारण वारसदाराला संस्थापकापेक्षा जास्त काम करून दाखवावे लागते. वनराईचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी हे काम या ग्रंथाच्या माध्यमातून करून दाखवले आहे.’’ या ग्रंथातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ‘ग्रामगीतेतील ओव्यांचा उल्लेख करून ते म्हणाले, ‘‘आजची आपली शेती ही शाश्‍वत नाही, असे संत तुकडोजी महाराजांनीच म्हटले आहे, कारण गावातून बुद्धी, समृद्धी, कला सर्व शहरांकडे गेल्याने शेती अशाश्‍वत झाली. मात्र, वनराईच्या माध्यमातून स्व. अण्णांनी शहरात गेलेल्यांना पुन्हा गावातील शेतीकडे आणण्याचे काम व त्यासाठीचे मार्गदर्शन केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय मेहता यांनी ‘शाश्‍वत शेती’ची संकल्पना स्पष्ट करून या संकल्पनेचा जन्म शेतीवर होणार्‍या टीकेतूनच झाला असल्याचे सांगितले. डॉ. प्रतिमा इंगोले यांनी या अंकातील लेखक व लेखांचे दाखले देत याची तूलना ‘गाथा सप्तशती’शी केली. शाश्‍वत शेतीला हातभार लावणे ही प्रत्येकाची गरज आहे. शेतीमुळे नवी पहाट उजाडेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वनराईचे सचिव श्रीराम गोमरकर यांनी केले. अंकाचे कार्यकारी संपादक अमित वाडेकर यांनी अंकाची संकल्पना स्पष्ट केली. सूत्रसंचालन वनराईचे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप आणि जयवंत देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमात गेली तीन वर्षे सातत्याने खडकवासला धरणातील गाळ काढण्याचे काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थेचे कर्नल सुरेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील वरंध गावात शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी वनराईचे सभागृह शाळेसाठी दिल्याचे पत्र मुजूमदार सरांच्या हस्ते संस्थाचालकांना देण्यात आले.

अनिष्ट प्रथांवर महापुरुषांची वेशभूषा केलेल्या कलाकारांचा “आसूड‘

0

पुणे – महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी रचलेला स्त्री शिक्षणाचा पाया, अस्पृश्‍यता- जातिप्रथेविरुद्ध लढा देत सर्वांना समान अधिकार देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य आणि संत गाडगे महाराज यांनी दिलेला स्वच्छतेचा वसा, अशा अनेक महापुरुषांचे प्रबोधनात्मक विचार एकपात्री कलाकारांनी शनिवारी जनतेसमोर मांडले. समाजातील शिक्षणाबद्दलची अनास्था, जाती- धर्मांमधील वैर, अनिष्ट रूढी- परंपरा, अशा अनिष्ट प्रथांवर महापुरुषांची वेशभूषा केलेल्या कलाकारांनी “आसूड‘ उगारला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त “प्रबोधन एकपात्री नाट्य संमेलन‘ आयोजित केले होते. प्रबोधन एकपात्री नाट्य परिषदेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलतोय‘ हा प्रयोग सादर करणारे गुलाब ओव्हाळ या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार ऍड. जयदेव गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. वृषाली रणधीर- मोरे यांनी “मी सावित्रीबाई फुले बोलतेय‘, तर प्रबोधनकार संभाजी पालवे यांनी “मी गाडगेबाबा बोलतोय‘, आरती आमराव यांनी “मी रमाबाई बोलतेय‘ आणि कुमार आहेर यांनी “मी जोतिराव फुले बोलतोय‘ हा एकपात्री प्रयोग सादर केला.
अस्पृश्‍यता, जातिप्रथा, अनिष्ट रूढी- परंपरा मोडण्याबरोबरच दलित समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक घटनाप्रसंग ओव्हाळ यांनी मांडले. कुमार आहेर व डॉ. वृषाली रणधीर- मोरे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुरोगामी विचार, शिक्षणाचा वारसा आणि आयुष्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी आपल्या अभिनयाद्वारे मांडल्या. गाडगे महाराज यांनी समाजाला पटवून दिलेले स्वच्छतेचे महत्त्व पालवे यांनी अधोरेखित केले. कलाकारांनी अर्ध्या तासामध्ये महापुरुषांचे कार्य उलगडण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता भारतीय राज्य घटनेच्या प्रास्ताविकाच्या वाचनाने झाली.

दत्त जयंतीनिमित अलिबाग ते श्रीक्षेत्र नारायणपूर येथे पायी दिंडी

0

प्रस्थान पुण्यातून उत्साहात

श्री दत्त जयंतीनिमित अलिबाग ते श्री . क्षेत्र नारायणपूर येथे जाणारे पायी दिंडी पालखीचे प्रस्थान पुण्यातून उत्साहात झाले . दरवर्षी अलिबाग वरून नारायणपुरला पायी काढण्यात येते . हि पालखी पुण्यात सोमवार पेठ येथील संत गाडगे महाराज धर्म शाळेत मुक्कामी होती . रास्ते वाडा येथील दत्त मंदिरात दत्त भक्त माउली जाधव यांनी सपत्नीक पालखीतील पादुकांची पूजा करण्यात आली यावेळी राकेश कटारकर यांनी मन्नूशाह मस्जिद जवळ नाष्टा दिला . तर पुणे कॅम्प भागात महात्मा गांधी रोडवरील चौकात निलेश कणसे यांनी पालखी दत्त भक्तांना चहा वाटप केले . तर वडकीनाला संदीप गरुड यांनी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला . या पालखीमध्ये राकेश कटारकर , निलेश कणसे , अनिल निंबाळकर , जितेंद्र बोत्रे , संतोष गायकवाड , अजिंक्य निंबाळकर , मोना राठोड ,रंजना कणसे , मोहिनी निंबाळकर , डॉ. राजेद्र देशमुख , दादा गौड , अशोक भागीवाडी ,संतोष फराटे , केदार धूत , प्रविण दुबे , बाळासाहेब आदी आणि मोठ्या संख्येने दिंड्या आणि दत्त भक्त सहभागी झाले होते .
18

ज्यांची बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी बांधिलकी नाही , त्यांनी बाबासाहेबाची जयंती साजरी केली नाही तरी चालेल- बाळासाहेब आंबेडकर

0

ज्यांची बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी बांधिलकी नाही , त्यांनी बाबासाहेनाची जयंती साजरी केली नाही तरी चालेल , असे स्पष्ट विचार माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडले . पुणे कॅम्प भागातील नेहरू मेमोरिअल हॉलमध्ये जवखेडा , सोनाई , खैरलांजी , पंढरपूर , खर्डा , जामखेड , शिर्डी , दलित आदिवासी अल्पसंख्याकावरील अत्याचाराविरोधात फक्त चर्चा नव्हे , कृतीशील आव्हान ? आत्म सन्मानासाठी युथ ओर्गनाइज्द युनिटतर्फे आयोजित” आत्मसवांद ” या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले कि , आंबेडकर जयंती परिवर्तनवादी विचारांनी साजरी झाली पाहिजे . फुले शाहू आंबेडकर यांचे विचार समाजात रुजले पाहिजे . त्यातून समाजाचे परिवर्तन होणे गरजेचे आहे . पूर्वीच्या प्रमाणे आंबेडकर चळवळ आता राहिली नाही , त्याचबरोबर धर्माची चिकित्सा झाली पाहिजे कोणाचेही वाभाडे काढून यातून चळवळीचा उद्देश काय साध्य होतो . आपण विचारांनीच लढले पाहिजे आज आपण कुठे आहोत याच्याशी आपण ” आत्मसवांद ” साधला पाहिजे . मी कुठे आहे मी माझ्या मनाशी विचारले पाहिजे , सामजिक लढा सशक्त केला पाहिजे . जाती अंत्याच्या लढयामध्ये आर्थिक टप्पा महत्वाचा ठरतो . त्यामागचे अर्थशास्त्र समजून घेतले पाहिजे , ते मांडले पाहिजे . जवखेडा , सोनाई , खैरलांजी , पंढरपूर , खर्डा , जामखेड , शिर्डी , दलित आदिवासी अल्पसंख्याकावरील हे हल्ले म्हणजे समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचे हेतूने केलेले आहे . भविष्यामध्ये आपण या हल्ल्यांच्या विरोधात संघर्ष केला नाही तर भविष्यामध्ये साहित्यिक , विचारवंत आणि चळवळीतील काम करणाऱ्यांवर हल्ले होतील . सत्तॆच्या राजकारणामध्ये चळवळ हि गुलाम झाली. सत्तेच्या भुताने मी काही करू शकतो हि उमेद सुद्धा हरविली आहे , आजचे राजकारण तडजोडीचे राजकारण आहे . असे त्यांनी स्पष्ट सांगितले .

दलित हत्याकांडाबद्दल प्रचंड अस्वस्थता असून किती व कासहन करायचं हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे असे उद्गार जेष्ठ सामाजिककार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी काढले. जवखेडाबाबत अट्रासिटी लढा म्हणतात. हे डॉ.आंबेडकरांच्या घटनेला आव्हान आहे. भारताला जातीयता, धर्मांधतेचा रोग जडलाआहे. त्यावर जालीम उपाय करायला पाहिजे. बजाजी निंबाळकर यांचा मुलगा वशिवाजी महाराजांचा जावईला लांद्याची कबर म्हणले जाते. शिवाजी महाराजांचीकन्या सखूचे स्मारक कुठेतरी कोपर्यात आहे. जातीयता, धर्मांधता अवैज्ञानिकआहे हे शाळेत शिकवले जात नाही. देशातले सर्व पक्ष संविधान मान्य करतनाहीत, तोपर्यंत देश घडणार नाही. भारतीय संविधानाला डावलून जायचं नाही हेठरवायला हवे. घटनेची शिकवण घरापासून करायला हवी.तसेच पत्रकार वैभवछाया म्हणाले की, समतेचे कार्यकर्ते एकमेकात संवाद करतनाहीत. वैचारिक, कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता नष्ट व्हायला हवी.मागासवर्गीयांच्या अत्याचारविरोधी जे उभे रहातात त्या सर्वाना बरोबरघ्यायला हवे. शोषक, शोशिताना जात नसते. शोषण हि वृत्ती आहे.अत्याचारांविरोधी आवाज उठ्वनार्याना नक्षलवादी व मुस्लिमांना दहशतवादीठरवले जाते. बाबासाहेबांना मानवतावादी बुध्द अपेक्षित होता. शाळेपासूनसंविधानाची शिकवण दिली पाहिजे. जे मेनेज होतात त्या रामविलास पासवान,रामदास आठवलेसारख्यांना मेनेज केले जाते.डॉ.दाभोलकारांसारखे मेनेज होतनाहीत त्यांना मारले जाते. जातीच्या अस्मिता कुरवाळणे बंद करायला हवे.

कार्यक्रमाचे उद्घाटन महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करून झाले. तसेचमुश्ताक पटेल यांच्याकडून संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करून सुरवातझाली. यावेळी पत्रकार वैभव छाया , कलमनामाचे संपादक युवराज मोहिते , डॉ. अमोल देवळेकर , रॉबिन घोष , संभाजी भगत, मुश्ताक पटेल , भोलासिंग अरोरा , पुष्पा गाडेपाटील , इकबाल अन्सारी , जावेद खान आदी मान्यवर व फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते .लोकशाहीर संभाजी भगत,डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे आदीही व्यासपीठावर होते. कार्यक्रमाच्या सुरुवात संभाजी भगत यांच्या विद्रोही जलसाने झाली . या कार्यक्रमात महात्मा फुलेनी यांच्या सत्य सुखाचा आधार , बाकी सर्व अंधकार हि प्रार्थना सर्वांनी सामुहिकपणे म्हणली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले तर आभार तेजस लोंढे यांनी मानले .

देश खऱ्या अर्थाने घटना ज्या दिवशी स्वीकारेल त्यावेळेस जातीय निर्मुलन होईल-डॉ. बाबा आढाव

0

देशात खऱ्या अर्थाने घटना ज्या दिवशी स्वीकारेल त्यावेळेस जातीय निर्मुलन होईल , असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी केले . पुणे कॅम्प भागातील नेहरू मेमोरिअल हॉलमध्ये जवखेडा , सोनाई , खैरलांजी , पंढरपूर , खर्डा , जामखेड , शिर्डी , दलित आदिवासी अल्पसंख्याकावरील अत्याचाराविरोधात फक्त चर्चा नव्हे , कृतीशील आव्हान ? आत्म सन्मानासाठी ” आत्मसवांद ” या कार्यक्रमात उद्घाटन डॉ. बाबा आढाव यांच्याहस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून करण्यात आले . त्यावेळी त्यांनी आपले विचार मांडताना सांगितले कि , खऱ्या अर्थाने शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल केले पाहिजे , घटनेच्या मार्गदर्शकात तत्त्वात विज्ञाननिष्ठा धोरण स्वीकारले पाहिजे , घटनेचे शिक्षण घरापासूनच दिले गेले पाहिजे , देश घडविण्याचे कार्यक्रम झाले पाहिजे , त्यामध्ये भारतीय नागरिक घडविण्यासाठी न्यायाची समानता नाही , त्यासाठी आपल्याला भारत घडवायचा आहे महात्मा फुलेनी त्यांच्या प्रार्थनेतून समतेचे विचार पटवून दिले आहे . महाराष्ट्रातील सर्व शाळामधून हि प्रार्थना म्हणली पाहिजे असे त्यांनी आवर्जून सांगितले .

या कार्यक्रमास पदमश्री मिलिंद कांबळे , पत्रकार वैभव छाया , कलमनामाचे संपादक युवराज मोहिते , डॉ. अमोल देवळेकर , रॉबिन घोष , संभाजी भगत, मुश्ताक पटेल , भोलासिंग अरोरा , पुष्पा गाडेपाटील , इकबाल अन्सारी , जावेद खान आदी मान्यवर व फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या सुरुवात संभाजी भगत यांच्या विद्रोही जलसाने झाली . या कार्यक्रमात महात्मा फुलेनी यांच्या सत्य सुखाचा आधार , बाकी सर्व अंधकार हि प्रार्थना सर्वांनी सामुहिकपणे म्हणली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले तर आभार तेजस लोंढे यांनी मानले .

अमित शहा यांच्याकडून ममता बॅनर्जीना उखडून टाकण्याचा इशारा -सारदा चिटफंडमधील पैसा हा काळा आहे की पांढरा?

0

कोलकाता-भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज रविवारी ‘आम्ही महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांत विजय मिळवला, मी तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून उखडून टाकण्यासाठीच येथे आलो आहे,’ अशा शब्दांत त्यांनी ममता यांना इशाराच दिला.
‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या वर्धमान स्फोटातील आणि सारदा चिटफंड घोटाळ्यातील आरोपींना पाठीशी घालत आहेत. या प्रकरणात राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे. संसदेत काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी आंदोलन केले होते. मग सारदा चिटफंडमधील पैसा हा काळा आहे की पांढरा आहे?,’ असा सणसणीत सवाल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी येथे केला.
आगामी महानगपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांची रविवारी कोलकात्यात झालेल्या जाहीर सभेत त्यांनी ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसवर सडकून टीका केली. शहा यांच्या या नियोजित सभेला तृणमूलची सत्ता असलेल्या कोलकाता महापालिकेने परवानगी नाकारल्याने वाद निर्माण झाला होता. हायकोर्टाने तीनदा कान पिरगळ्यानंतर अखेर महापालिका आणि अग्निशमन दलाने शनिवारी या सभेस परवानगी दिली होती.
‘राज्यातील विकासासाठी आता जनतेने बदल घडविण्याची गरज आहे. तृणमूल सरकारमुळे राज्यातील विकासाला खीळ बसली आहे. सारदा चिटफंडप्रकरणी आरोपींना शिक्षा देण्याऐवजी ममता त्यांना पाठीशी घालत आहेत. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी, ‘कोण अमित शहा?’ असा प्रश्न केला होता. आज त्या मला ऐकत असतील, पाहात असतील. नीट बघा मीच भाजपचा एक लहान कार्यकर्ता अमित शहा असून, राज्यातून तृणमूल काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला उखडून टाकण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये आलो आहे,’ असे शहा म्हणाले.
‘जनतेच्या अपेक्षांची पूर्तता केवळ भाजपच करू शकतो. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचे सरकार सत्तेवरून पायउतार होण्याचे काउंटडाऊन आता सुरू झाले आहे. आम्ही महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांत विजय मिळवला. झारखंड, दिल्ली व जम्मू आणि काश्मीरमध्येही ही विजयाची मालिका अखंड राहील. परंतु, पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन केल्याशिवाय आमचा विजयी मालिका पूर्ण होणार नाही,’ असे ते म्हणाले.

सोने अजून घसरले -२६हजार ७७० तोळ्याचा भाव

0

नवी दिल्ली: मागणी घटत असल्यानं सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ् बाजारात ११० रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा भाव २६,६७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातही घसरणीचा कल राहिला. चांदीचा भाव विक्रीच्या दबावानं ५५० रुपयांनी घटून ३६,२०० रुपये प्रतिकिलोवर आला.
बाजार जाणकारांनी सांगितलं की, जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्मात्यांची मागणीत घट झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड तेलाच्या दरातील घसरणीचा जागतिक सराफ्यावर परिणाम झाला.दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १० रुपयांनी घटून अनुक्रमे २६,६७० रुपये आणि २६,४७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यात गेल्या तीन दिवसांत १५० रुपयांची घट झाली आहे. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव १० रुपयांनी कमी होऊन २३,७०० रुपये झाला. तयार चांदीचा भाव ५५० रुपयांच्या घसरणीसह ३६,२०० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ४५० रुपयांनी घटून ३५,६१० रुपये प्रतिकिलो राहिला.
सिंगापूर इथं सोन्याचा भाव ०.९ टक्क्यांनी घटून ११८१.८४ डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भाव १.२ टक्क्यांच्या घसरणीसह १६.०५ डॉलर प्रतिऔंस झाला. ही गेल्या २० नोव्हेंबर रोजीची नीचांकी पातळी आहे. गुंतवणूक समभाग बाजारात वळती झाल्यानं सराफा बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात

0

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे. पेट्रोलच्या दरात ९१ पैसे तर डिझेलच्या दरात ८४ पैसे कपात होणार आहे. ही कपात आज रविवार दिनांक ३० नोव्हेंबर मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरून यापूर्वीच सरकारने नियंत्रण हटवलं आहे. म्हणून जागतिक घडामोडी तसेच कच्च्या तेलाच्या किमतीवरून पेट्रोल, डिझेलचे दर कमी जास्त होत असतात.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर खाली येत आहेत, यामुळे ऑगस्टपासून पेट्रोलच्या दरात सहा वेळेस, तर सप्टेंबरपासून डिझेलच्या दरात दोन वेळेस घट आली आहे.

पुणे शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद मुस्लिम समाजाला देण्याची मागणी

0

पुणे – नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले , त्यामुळे पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यांनतर पुणे शहरअध्यक्ष पद रिक्त आहे , या पदावर मुस्लिम समाजाला संधी देण्याची मागणी अस्लम बागवान यांनी केली .

या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश , महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे , माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , यांच्याकडे समक्ष अस्लम बागवान यांनी भेटून निवेदनाद्वारे मागणी केली आहे .अस्लम बागवान हे गेली ३५ वर्षापासून कॉंग्रेस पक्षाचे काम निष्ठावंतपणे करिता आहे . पुढील काळात मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाला अध्यक्षपद दिल्याने मुस्लिम समाज कॉंग्रेस पक्षापासून दुरावल्याने कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद देण्यात यावे , अशी मागणी अस्लम बागवान यांनी केली आहे . अस्लम बागवान यांनी कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस , पुणे शहर अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष ,भवानी ब्लॉक अध्यक्ष आदी पदांवर काम पाहिले आहे
aaslam

राष्ट्रीयस्तरावरील पुनर्विवाह परिचय मेळावा संपन्न

0

भारतीय जैन संघटनेच्यावतीने जैन समाजातील विधवा , विधुर , घटस्फोटीत , अपंग , अंध ,अविवाहित अशांचा राष्ट्रीयस्तरावरील पुनर्विवाह परिचय मेळावा संपन्न

pune-

भारतीय जैन संघटनेच्यावतीने जैन समाजातील विधवा , विधुर , घटस्फोटीत , अपंग , अंध ,अविवाहित अशांचा राष्ट्रीयस्तरावरील पुनर्विवाह परिचय मेळावा संपन्न झाला . महर्षीनगरमधील महावीर प्रतिष्ठानच्या सभागृहात हा मेळावा संपन्न झाला . या मेळाव्यामध्ये १०२ मुले तर २९ मुलीनी सहभाग घेतला होता . यामध्ये ७५ घटस्फोटीत , १७ विधवा आणि विधुर , ८ अपंग , १ अंध , ३० अविवाहित अशनी सहभागी घेयून आपला परिचय करून दिला . या मेळाव्यातील सहभागी झालेल्यांना परिचय पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.यावेळी सुरेखा बेताळ आणि मृदुला चोरडिया यांनी मेळाव्यात सहभागी झालेल्या मुला मुलींच्या मुलाखती घेतल्या . यावेळी महावीर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विजयकांत कोठारी , भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र सुराणा , नितीन जैन , श्रीपाल ललवाणी , विनोद सोलंकी , राकेश छाजेड आदी व भारतीय जैन संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते . भारतीय जैन संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले .

आजच्या मेळाव्यामध्ये घटस्फोटीतांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे . त्यामुळे वधू – वर मेळावा घेण्याची हि समाजाची गरज आहे , अशी माहिती भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्रीपाल ललवाणी यांनी दिली .

मराठी माणसाचे नशीब उजळणार कि काजळजळ होणार ? …आता पश्चिम रेल्वेचे मुख्यालयही गुजरातला हलवण्याची मागणी

0

मुंबई
पालघर येथील सागरी किनारा सुरक्षा मुख्यालय आणि रिझर्व्ह बँकेची काही खाती गुजरातला हलवल्यानंतर आता पश्चिम रेल्वेचे मुख्यालयही गुजरातला हलवण्याची मागणी झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार म्हणाले ,”केंद्र सरकार मुंबई व महाराष्ट्रावर कोणत्याही स्वरूपाचा अन्याय अ​जिबात करणार नाही. केंद्र सरकार हे महाराष्ट्र आणि मुंबईचे हीतच पाहणार. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यालय अहमदाबादला हलवा, ही मागणी केली आहे. त्यामुळे राजकारण करणाऱ्यांनी निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवावा
अहमदाबाद हे पश्चिम रेल्वेसाठी मध्यभागी असल्याने पश्चिम रेल्वेचे मुख्यालय अहमदाबाद येथे हलवावे, अशी मागणी भाजपचे अहमदाबादचे (पश्चिम) खासदार किरीट सोळंकी यांनी लोकसभेत केली आहे. या मागणीचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने या मागणीस प्रखर विरोध तर केलाच आहे, शिवाय सर्वसामान्य मुंबईकरांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
रेल्वे वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढून मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न करण्याएवजी मुख्यालय गुजरातला हलवण्याची मागणी म्हणचे आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे, अशी मुंबईकरांची भावना आहे.

प्रिन्स देशमुख बागडू लागले आपुल्या घरी …

0

11

12
मुंबई- माजी मुख्यमंत्री हसतमुख विलासराव देशमुख यांचा सुपुत्र अभिनेता रितेश देशमुख आणि सुनबाई जेनेलिया देशमुख यांच्या मुलाचे फोटो माध्यमां समोर आले आहेत. जेनेलियाने २५ नोव्हेंबर रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. शनिवारी (२९ नोव्हेंबर) तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे.आज रविवारपासून प्रिन्स देशमुख आपल्या घरी आप्तीयांसमवेत बागडू लागले आहेत .
रितेश जेनेलियाला घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. त्याच्यासोबत आई वैशाली देशमुख आणि सासू जेनेट डिसूजासुध्दा होत्या .

मशीद तोडून मंदिर बनवू पाहणारा भाऊ कसा?: उमर अब्दुला

0

श्रीनगर

‘आमची मशीद तोडून त्या जागेवर मंदिर बनवू इच्छिणारा आमचा भाऊ कसा होऊ शकतो? तो आमचा भाऊ नाही,’ असं उमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. उमर यांच्या या वक्तव्यामुळं काश्मिरातील निवडणूक प्रचाराला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.सज्जाद लोण हे मतांसाठी नरेंद्र मोदी यांचे बूट साफ करत आहेत. पण आम्हाला ते करण्याची गरज वाटत नाही,’ अशी बोचरी टीका त्यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भावासारखे आहेत, असे म्हणणारे एकेकाळचे फुटिरतावादी नेते सज्जाद लोण यांच्यावर टीका करताना त्यांनी हि वक्तव्ये केली

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सर्वशक्तिनिशी उतरला असून काही फुटिरतावादी नेतेही भाजपशी सलगी करू लागले आहेत. सज्जाद लोण यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर भाजपने लोण यांच्या पीपल्स काँग्रेसला काही जागांवर पाठिंबा दिला आहे. मोदी आणि लोण यांच्या या युतीमुळे उमर अब्दुल्ला संतापले आहेत. लोण यांचा बालेकिल्ला असलेल्या हंदवाडा येथील प्रचारसभेत शनिवारी बोलताना उमर यांनी हाच राग काढला. ‘सज्जाद लोण हे मतांसाठी नरेंद्र मोदी यांचे बूट साफ करत आहेत. पण आम्हाला ते करण्याची गरज वाटत नाही,’ अशी बोचरी टीका त्यांनी केली.

सज्जाद यांचे मन वळविणाऱ्या मोदींनाही उमर यांनी लक्ष्य केले. ‘लोण यांना मोदींमध्ये भाऊ दिसत आहे. पण हा भाऊ त्यांनाच लखलाभ असो. काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याच्या प्रयत्नात असलेला… खोऱ्यातून आमचा झेंडा उतरवू पाहणारा… शरियतचा कायदा बदलून समान नागरी कायदा आणू पाहणारा आणि आमची मशीद तोडून तिथे मंदिर उभारण्याची इच्छा बाळगणारा आमचा भाऊ कसा होऊ शकतो,’ असा सवाल उमर यांनी केला.

पराभवाच्या भीतीमुळेच…

उमर अब्दुल्लांच्या या वक्तव्यांचा सज्जाद लोण यांनीही समाचार घेतला. ‘निवडणुकीनंतर उमर अब्दुल्ला राज्यातील सत्तेतून हद्दपार होणार आहेत. त्यांचा स्वत:चाही पराभव होण्याची भीती त्यांना आहे. त्यामुळे त्यांना नैराश्याने ग्रासले असून त्यातूनच ते असली वक्तव्ये करत आहेत. उमर अब्दुल्ला यांचा पक्ष भाजपप्रणीत एनडीए सरकारमध्ये असताना मी जेलमध्ये होतो. माझ्या निष्ठेबद्दल संशय व्यक्त करण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाही, असे सज्जाद यांनी सुनावले.

विषारी वायू मुळे पिडीत २०० रुग्णांना रुग्णालयात केले दाखल :उल्हासनगर मधील घटना

0

उल्हासनगर /पुणे :

नाल्यातून वाहून आलेल्या अज्ञात पदार्थांमुळे निर्माण झालेल्या विषारी वायुमुळे उलट्या,डोखेदुखी ,अस्वस्थ वाटणाऱ्या २०० हून अधिक पिडीत रुग्णांना राज्य सरकारच्या महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्विस (एम ई एम एस) या रुग्णवाहिका सेवेने रुग्णालयात दाखल करून वेळीच उपचार उपलब्ध करून दिले .सर्वांची प्रकृती स्थिर आहे

महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्विस चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ ज्ञानेश्वर शेळके आणि ठाणे झोनल हेड डॉ विनय यादव यांनी हि माहिती दिली . शनिवारी सकाळी उल्हासनगर क्याम्प ४,साधू वासवानी नगर येथे हा प्रकार घडला . माहिती मिळताच ४ रुग्ण वाहिकांनी तातडीने पोचून वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली . रुग्णांना उल्हासनगर सेन्ट्रल हॉस्पिटल आणि नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले . एम ई एम एस च्या डॉ सस्मित जयस्वाल आणि टीमने यात मदतकार्य केले

शाळेतील विद्यार्थ्यांच्या समवेत नगरसेवक उदयकांत आंदेकर यांचा वाढदिवस साजरा

0

सोनाईदादा प्रतिष्ठानच्यावतीने पुणे कॅम्प भागातील सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या समवेत नगरसेवक उदयकांत आंदेकर यांनी आपला वाढदिवस उत्साहात साजरा केला . यावेळी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांनी केक कापला , त्यांना शाळेतील मुलांनी केक भरवून वाढदिवसाच्या शुभेछा दिल्या . यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ विधाते , अनुपमा कलकोटि , मोझेस कलकोटी , युवानेते वनराज आंदेकर , राजन नायर , अनिस शेख , राजेश राठोड , मोझेस गवारे , शिवाजी कांबळे , फिरोज शेख , प्रदीप नायर , मनोज परदेशी , अड. रवींद्र शिंदे , जमीर शेख , झाकीर शेख आदी उपस्थित होते .

त्यानंतर मंगळवार पेठ मधील कमला नेहरू रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली . त्यानंतर शांताबाई लडकत शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले . येरवडा मधील मनोरुग्णालयातील रुग्णांना फळेवाटप करण्यात आली .
aandekar