Home Blog Page 3638

पी के पाहिला; नाताळ एन्जॉय केला -संजय दत्तला च तेवढ्या सणावाराच्या सुट्ट्या … इतर कैद्यांना का नाही ? यावर गृहराज्यमंत्री म्हणाले चौकशी करणार …

0

मुंबई- अभिनेता संजय दत्तला दरवर्षी नाताळ व नविन वर्षाच्या काळातच कशी काय सुटी दिली जाते याबाबत चौकशी करणार असल्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे यांनी म्हटले आहे. संजय दत्तला तीन दिवसापूर्वी 14 दिवसाची फर्लो रजा देण्यात आली आहे. याबाबत काहींनी आक्षेप नोंदवला आहे. संजय दत्तला वारंवार व ठराविक कालावधीतच सुटी कशी काय मिळते? मग तोच न्याय इतर कैद्यांना लागू का होत नाही असा सवाल उपस्थित केला गेला आहे. याबाबत गृहराज्यमंत्री शिंदे यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.

शिंदे म्हणाले, संजय दत्तला मेहरबानी करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, संजय दत्तला देण्यात येणा-या रजा व इतर कैद्यांना देण्यात येणा-या रजा यात जर काही तफावत असेल त्याची तत्काळ दखल घेतली जाईल. मात्र, सामान्य कैद्यांप्रमाणेच दर संजय दत्तला सुटी दिली गेली असेल तर इतरांनाही ती दिली जाते का हे तपासावे लागेल, असे शिंदेंनी सांगितले.

संजय दत्तवर जर तुरुंग प्रशासन किंवा इतर यंत्रणांकडून कृपा होत असेल तर त्याबाबत कडक पावले उचलण्याचे शिंदेंनी संकेत दिले. मात्र, सर्वाप्रमाणेच संजयला रजा दिली असेल तर तो त्याचा हक्क असेल व तो केवळ सेलिब्रेटी आहे म्हणून त्याबाबत चर्चा करणे योग्य ठरणार नाही असेही शिंदेंनी अप्रत्यक्ष सुचित केले.

संजयला हवी आणखी 14 दिवस जोडून सुटी- संजय दत्त 23 तारखेला तुरुंगाबाहेर 14 दिवसाच्या सुटीवर आला आहे. त्यानंतर त्याने कुटुंबियांसोबत पीक चित्रपटाचा आनंद लुटला. फोटोग्राफर्स यांना खास पोज देत आपण 8 किलो वजन घडवल्याचे सांगितले होते. संजय दत्त गेल्या वर्षभरानंतर जेलबाहेर आल्याने त्याला आणखी 14 दिवसांची सुटी मंजूर करता येऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन संजय आणखी 14 दिवसाची सुटी मागणार असल्याचे कळते. आता येरवडा तुरुंग प्रशासन, विभागीय आयुक्त व राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष राहील

पेशावरमधील कट रचणारा मास्टरमाइंड सद्दामला कंठस्नान

0

पेशावर- पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड सद्दामला कंठस्नान घालण्यास पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. पाकिस्तानी जवानांनी जमरुद भागात केलेल्या कारवाईत क्रुरकर्मा सद्दामचा खात्मा करण्यात आला. जमरुदमधील गुंडी भागात सद्दामला ठार मारले असून त्याच्या एका साथीदाराला जिवंत पकडण्यात आले आहे. त्याचे नाव अद्याप समजू शकले नाही. पेशावरमध्ये खैबर एजेंसीचे पॉलिटिकल एजेंट साहब अली शाह यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

शाह म्हणाले, सद्दाम हा तहरीक-ए-तालिबानच्या (पाकिस्तान) तारिक गेदार गटाचा कमांडर होता. पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता. तालिबानी दहशतवाद्यांना सद्दाम यानेत प्रशिक्षण दिले होते. 2013 मध्ये खैबर पख्तून्ख्वामधील पोलियो टीमवर झालेल्या हल्ल्यात सद्दामचा हात होता. या हल्ल्यात 11 सुरक्षा जवान शहीद झाले होते. ‘ऑपरेशन खैबर-1’चा विस्तार करण्‍यात आला असून दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरु आहे.

दरम्यान, पेशावरमधील आर्मी स्कूलवर 16 डिसेंबरला झालेल्या दहशवादी हल्ल्यात 132 निरागस विद्यार्थ्यांसह 13 शिक्षकांचा मृत्यु झाला होता. सुरक्षा दलाच्या जवानांनी सात तालिबानी दहशतवाद्यांना ठार मारले होते.

राज्यातील पालकमंत्र्यांची नावं जाहीर, गिरीश बापट पुण्याचे तर दिलीप कांबळे जालन्याचे पालकमंत्री

0

असे आहेत पालकमंत्री —
मुंबई शहर- सुभाष देसाई
उपनगर- विनोद तावडे
ठाणे- एकनाथ शिंदे
पालघर – विष्णू सावरा
रायगड- प्रकाश मेहता
अहमदनगर- राम शिंदे
रत्नागिरी- रविंद्र वायकर
सांगली- कोल्हापूर- चंद्रकांत दादा पाटील
लातूर आणि बीड- पंकजा मुंडे
पुणे- गिरीश बापट
नाशिक, नंदुरबार- गिरीश महाजन
औरंगाबाद- रामदास कदम
जळगाव, बुलढाणा- जळगाव-एकनाथ खडसे
सिंधुदुर्ग- दिपक केसरकर
धुळे- दादाजी भुसे
सातारा- विजय शिवतारे
सोलापूर- विजयकुमार देशमूख
अमरावती- प्रविण पोटे
अकोला, वाशिम- डॉ. रणजित पाटील
यवतमाळ- संजय राठोड
नागपूर- चंद्रशेखर बावनकुळे
वर्धा, चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
भंडारा, उस्मानाबाद- डॉ. दिपक सावंत
गोंदिया- राजकुमार बडोले
गडचिरोली- राजे अंबरीशराव अत्राम
जालना- बबनराव लोणीकर
नांदेड, परभणी- दिवाकर रावते
हिंगोली- दिलीप कांबळे

‘एहसास’ या गझल अल्बमचा प्रकाशन सोहळा संपन्न!!

0

सामाजिक आशयाचा लळा आणि सामान्य माणसांच्या व्यथा वेदनांचा कळवळा असलेला संगीत गीतातील एक प्रकार म्हणजे गझल. गेली ४० वर्ष संगीत क्षेत्रात विविध वाद्य वाजवून आता संगीतकार म्हणून काम पाहत असलेल्या प्रशांत ठाकरे यांच्या ‘मिरॅकल्स ऑफ म्युझिक’ या कंपनीतर्फे ‘एहसास’ हा गझल गीतांचा अल्बम कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त श्री. रामनाथ सोनावणे यांच्या हस्ते नुकताच डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे प्रकाशित करण्यात आला.
‘एहसास’ या अल्बममध्ये एकूण आठ गझल गीतांचा समावेश करण्यात आला असून एक नज्म ही यात समाविष्ट करण्यात आली आहे. उर्दू साहित्यातील सर्वोच्च मानाचा ‘साहेब ए दिवान’ हा किताब पटकावलेल्या संदीप गुप्ते यांनी ह्या अल्बममधील गझल आणि एक नज्म लिहिली आहेत. संदीप गुप्ते हे सरकारी नोकरीत कार्यरत असून संगीताची त्यांना असलेली आवड त्यांनी चांगलीच जोपासली आहे. प्रसिद्ध गायिका गौरी कवी यांच्या आवाजात हा संपूर्ण अल्बम स्वरबद्ध करण्यात आला आहे.
गेली ४० वर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रशांत ठाकरे यांनी ‘एहसास’ या अल्बमचे संगीत आयोजन, संगीतकार म्हणून काम पाहिले आहे. प्रत्येक कडव्याला वेगळे संगीत देणे हे प्रशांत ठाकरे यांच्या संगीताचे एक खास वैशिष्ट्य आहे.
आठ वर्षापूर्वी ‘अजनबी शहर में…’ या अल्बमच्या निमित्ताने आमच्या तिघांची एका स्टुडिओमध्ये सहज भेट झाली. आपण या पुढे नक्की एकत्र काम करू असे आम्ही ठरविले. त्यानंतर ‘एहसास’ च्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो. गेली दोन वर्ष आम्ही या अल्बमसाठी काम करत होतो आणि आता हा अल्बम बाजारात रसिक श्रोत्यांसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच या अल्बममधील नज्म असलेल्या ‘इस तरह मेरी मोहोब्बत का ….’ चा व्हिडीओ ही लवकरच चित्रित करण्यात येणार असल्याचे संगीतकार प्रशांत ठाकरे यांनी सांगितले.

न संपणा-या शोधाची सुरूवात म्हणजे ‘लोकमान्य’ – सुबोध भावे

0

भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते आणि आपल्या जहालमतवादी भूमिकेने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वेगळा आयाम प्राप्त करून देणारे नेते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘लोकमान्य – एक युगपुरूष’ हा चित्रपट येत्या २ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय. यात लोकमान्यांच्या भूमिकेचा शिवधनुष्य पेलणारा अभिनेता सुबोध भावे सांगतो आहे त्याच्या भूमिकेविषयी..

प्रश्न – लोकमान्यांच्या आयुष्यावर आधारित पहिलाच चित्रपट येतोय आणि त्यात तू खुद्द लोकमान्यांची भूमिका करतोयस या विषयी काय सांगशील ?

सुबोध – लोकमान्य टिळकांसारख्या थोर व्यक्तिमत्वावर एकही चित्रपट बनू नये किंवा चित्रपटाच्या दृष्टीने तो विषय दुर्लक्षित राहिला याबद्दल माझ्या मनात नेहमी खंत होती. काही वर्षांपूर्वी मी त्यांच्या आयुष्यावर आधारित एक पुस्तक वाचलं आणि मला शाळेतील इतिहासाच्या पुस्तकापलिकडील टिळक जाणून घेता आले. ते पुस्तक वाचून मी टिळकांच्या कार्याने, देशभक्तीच्या विचारांनी पुरता झपाटून गेलो. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे पैलू सर्वसामान्यांपर्यंत चित्रपटाच्या रूपाने पोहोचावेत अशी माझी इच्छा होती. आणि तसे प्रस्ताव घेऊन मी अनेक निर्माते-दिग्दर्शकांकडे गेलो. त्यावेळी अशा चित्रपटात आपण भूमिका करावी हा विचारही डोक्यात नव्हता. लोकमान्यांचं चरित्र रूपेरी पडद्यावर यावं ही प्रांजळ भूमिका त्यामागे होती. त्यासाठीचे प्रयत्न सुरू असतानाच एके दिवशी अचानक ओम आणि नीनाताईंचा फोन आला आणि त्यांनी लोकमान्य चित्रपटाविषयी सांगितलं आणि यात लोकमान्यांची भूमिका मी करावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. खरं तर लोकमान्यांच्या आयुष्यावर चित्रपट येतोय हीच माझ्यासाठी आनंदाची बाब होती पण त्यांच्या भूमिकेविषयी मी कधीच विचार केला नव्हता. पण मग ओम राऊतशी भेट झाली त्याने चित्रपटाची कथा-पटकथा ऐकवली ती आवडली आणि मी या भूमिकेसाठी होकार दिला. पण त्यांनंतरही जवळपास सहा महिने मी मनाची तयारी करत होतो. मी स्वतः या भूमिकेसाठी तयार नव्हतो याचं कारण म्हणजे टिळकांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व मला पेलवेल की नाही याची भीती होती. हे खूप जबाबदारीचं काम होतं. शिवाय माझा स्वभाव किंवा दिसणं हे तसं मृदु आहे आणि मी आजवर ज्या भूमिका केल्या त्या साधारणपणे याच प्रकारात मोडणा-या होत्या. याउलट टिळकांचा स्वभाव, वागणं, बोलणं, दिसणं सगळंच माझ्या विरूद्ध होतं त्यामुळे मी थोडा साशंक होतो.

प्रश्न – पण मग ही शंका कशी दूर झाली ?

सुबोध भावे – ही शंका दूर होण्यामागचं श्रेय मी दिग्दर्शक ओम राऊत आणि रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना देईन. कारण मी लोकमान्य साकारू शकेन हा विश्वास ओमच्या मनात होता आणि मी लोकमान्यांसारखा दिसू शकेन याबद्दलचा विश्वास विक्रम गायकवाड बाळगून होते. खरं तर मी विक्रमजींना जादूगार मानतो कारण त्यांच्या बोटात अशी काही जादू आहे की ते तुमचं रूप पूर्णपणे पालटवून टाकतात. त्यांनी अतिशय बारकाईने एकेक गोष्ट निरखून लोकमान्यांशी साधर्म्य साधता येईल असा मेकअप केला. टिळकांच्या व्यक्तिमत्वाची विशेष ओळख असलेली मिशी, त्यांच्यासारखी चेहरापट्टी यावर मेहनत घेत मला त्या साच्यात बसवलं आणि टिळकांचं ते रूप साकार झालं. विक्रमजीं जेव्हा माझा मेकअप करत होते तेव्हा मी डोळे मिटून घेतले होते. पूर्ण मेकअप झाल्यानंतरच मी आरशात बघण्याचं ठरवलं होतं आणि जर आपला लुक लोकमान्यांशी जुळला तरच आपण ही भूमिका करायची हेही मनाशी ठरवलं होतं. मेकअप पूर्ण झाला आणि मी जेव्हा स्वतःला आरशात बघितलं तेव्हा क्षणभर माझाच माझ्यावर विश्वास बसला नाही आणि तिथे ख-या अर्थाने माझा ‘सा’ मला सापडला.

प्रश्न – मेकअपने आत्मविश्वास दिला पण देहबोली आणि संवादफेकीसाठी काय मेहनत घ्यावी लागली ?

सुबोध भावे – लोकमान्य साकारायचे म्हणजे मेहनत ही करावीच लागणार हे मनाशी पक्कं होतं. लोकमान्य जेवढे प्रभावी वक्ते होते तेवढंच प्रभावी त्यांचं व्यक्तिमत्व होतं. कुस्तीच्या आखाड्यात आणि दररोजच्या व्यायामातून त्यांनी शरीरयष्टी कमावली होती. तशा प्रकारची शरीरयष्टी कमावण्यासाठी मला तशाच पद्धतीचा व्यायाम करणं गरजेचं होतं. यासाठी आमचे फिटनेस ट्रेनर शैलेश परूळेकर सर यांची मदत झाली. हा व्यायाम,त्यातील विविध पद्धती त्यांनी समजावून सांगितल्या. आहाराचं वेळापत्रक बनवलं त्याचा मला खूपच उपयोग झाला आणि मी भूमिकेला साजेशी शरीरयष्टी कमवू शकलो. संवादफेकीसाठी आम्हाला टिळकांच्या काही ध्वनिफिती उपलब्ध झाल्या होत्या. टिळक त्याकाळी सभा घेत तेव्हा आजच्या सारखे माईक्स, लाऊडस्पिकर्स सारखी व्यवस्था नव्हती. पण टिळकांचा आवाज, संवादफेक एवढी जबरदस्त होती की सभेतील शेवटच्या माणसापर्यंत त्यांचा आवाज पोहोचायचा. तो आवेश, तो प्रखरपणा मी माझ्या संवादातून कसा येईल यावरही मेहनत घेतली. आज चित्रपटाच्या ट्रेलरमधील संवादातून, माझ्या वेशभूषेतून “मी टिळकांसारखाच दिसतोय” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विविध स्तरांतून मिळत आहेत त्यामुळे आम्हा सर्वांची मेहनत सार्थ झालीय असं वाटतंय.

प्रश्न – या चित्रपटातून प्रेक्षकांना लोकमान्यांचे कोणते विशेष पैलू बघायला मिळतील ?

सुबोध भावे – लोकमान्यांचं अफाट कार्य तीन तासांच्या चित्रपटात बसवणं तसं कठीण काम आहे. टिळकांच्या व्यक्तिमत्वाचा वेध आणि शोध घेण्यासाठी एक चित्रपट पुरेसा ठरणार नाही त्यामुळे हा चित्रपट म्हणजे या न संपणा-या शोधाची एक सुरूवात आहे असं मला वाटतं. हा चित्रपट लोकमान्यांच्या आयुष्यावर आधारित असला तरी तो चरित्रपट नाहीये तर लोकमान्यांचा विचारपट आहे. लोकमान्यांची देशभक्ती हा या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. ब्रिटीशांच्या विरोधात त्यांनी पुकारलेला जहालमतवादी लढा, चाफेकर बंधूंना दिलेली सशस्त्र क्रांतीची प्रेरणा, त्यांची पत्रकारिता, समाजसुधारणेबद्दलचे विचार, शैक्षणिक धोरण त्यामागे असलेली देशभक्तीची भावना यात बघायला मिळणार आहे. टिळकांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोचवणं या उद्देशातून हा चित्रपट बनवला आहे त्यामुळे त्यांच्या या विचारांवर या चित्रपटात भर देण्यात आला आहे.

प्रश्न – दिग्दर्शक ओम राऊत यांचा हा पहिलाच चित्रपट. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ?

सुबोध भावे – ओमची आणि माझी खुप जुनी ओळख आहे आणि आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. ओमचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असला तरी तो नवखेपणा चित्रपटात कुठेच जाणवत नाही. खरं तर पहिल्याच चित्रपटासाठी ऐतिहासिक विषय निवडणं हे खूप धाडसाचं काम आहे. त्यासाठी प्रचंड जिद्द, मेहनत आणि चिकाटीची गरज असते. मला वाटतं ओममध्ये हे सर्व गुण आहेत. लोकमान्यांची भूमिका जरी मी साकारत असलो तरी ती भूमिका कशी असेल? ती कशा प्रकारे सादर व्हावी? याचा सर्व आलेख ओमच्या तयार मनात होता. कोणताही कलाकार हा दिग्दर्शकाचा अभिनेता असतो. दिग्दर्शक म्हणेल त्याप्रकारची भूमिका त्याला साकारावी लागते. यासाठी दिग्दर्शकाच्या मनात भूमिकेते सर्व आराखडे पक्के असणं गरजेचं असतं आणि ते ओमच्या बाबतीत लागू होतं. केवळ माझीच नाही तर इतर सर्व व्यक्तिरेखा काय असतील ? कशा असतील ? त्या कथेत कशा प्रकारे येतील ? या सर्व बाबींचा ताळेबंद ओमच्या मनात पक्का होता त्यामुळेच सर्व कलाकार आपापल्या भूमिका व्यवस्थितपणे पार पाडू शकले.

HAPPY BIRTH DAY TO U SALMAN KHAN

0

BIRTH DAY 27/12/1965

Actress Shobhita Rana turned Sexy Santa

0

h

a

e
On December 25, Christians around the world will gather to celebrate Jesus’ birth. Joyful carols, special liturgies, brightly wrapped gifts, festive foods—these all characterize the feast today and the most important The Santa so here comes the stunning actress Shobhita Rana as sexy Santa this Christmas. She turned this cold Christmas into quite a hot one with her totally new and ravishing avatar. Shobhita Rana has done sexy santa photoshoot with Hitesh Kaneria and gave a marvelous Christmas gift for her fans. The actress looks super hot in her red outfit thus raising the temperature with her sexy moves. . She was seen wearing a Santa hat to match with her red dress. She further wished the viewers a merry Christmas by blowing a flying kiss toward the camera.

Actress Shobhita Rana said, “Christmas brings family and friends together. It helps us appreciate the love in our lives we often take for granted. May the true meaning of the holiday season fill your heart and home with many blessings. I really felt like Santa on the gorgeous set. This is a little gift for all my lovely fans.”

Photographer Hitesh Kaneria who has done many top model photoshoot said, “Shobhita Rana is really a very good actress and had done a sexy santa very well. she is really sweet and can do big in Bollywood.”

Neetu Chandra and Rohit Verma at a Christmas Party held for celebrating Sandip Soparrkar National Achievment Award

0

2

3

4

5

6

7

The United Sports Bar and Grill celebrated the National Achievement Award honour bestowed upon internationally renowned dancer choreographer Sandip Soparrkar in a unique Christmas style with bollywood actress Neetu Chandra as a special guest.

This is the first time in 22 years of the award that a western dancer has been given this honour. Very emotional about the same Sandip said, “This award is not for me, but for all my students who believed in my art. This award has brought in responsibility and I shall make sure I keep the purity of international dances alive all the time.”

Sandip’s friends and students from film and television world poured in to congratulate him on this special day. Designer Rohit Verma was seen hugging Sandip. Others present were Amit Dolawat, Jassi Kaur, Nakul Vaid, Amy Billimoria, Dev Balani, Prachi shah, Shraddha nigam, Mayank Anand, Nisha Jamvwal, Ruby Tandon and many more.

Anil Laroia, AVP – TUSBG who hosted the fun filled party for Sandip said “it’s an honor for us to felicitate and celebrate Sandip’s achievement in The United Sports Bar and Grill. The dance performance by Sandip’s troupe every week for our Mexican Festival was truly appreciated and loved by all our guests.”

The party started with a interactive dance session by Maestro Sandip Soparrkar himself followed by performance of his students, then santa claus danced and gifted chocolates and candies to one and all. The highlight of the evening was when Sushant Divgikar from the Big Boss fame who was the host for the evening made Sandip shake a leg with his super model wife Jesse Randhawa and bollywood actress Neetu Chandra. Jesse and Neetu both looked gorgeous in a white gowns and danced with grace and elegance matching steps with the master of dance.

Everyone was delighted with the Christmas gifts they received from Santa, while Sandip along with his parents, Jesse Randhawa, his friends and dancers enthusiastically cut the traditional cake. Christmas is all about smiles, friends, family and togetherness, there couldn’t have been a better way to celebrate this special honour.

लोकप्रतिनिधींनी उधळपट्टी थांबवावी – सजग नागरिक मंच

0

पुणे – “पुणेकरांच्या कराच्या पैशाचे आपण मालक नाही, तर विश्‍वस्त आहोत, ही जाणीव महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी ठेवावी,‘ असे आवाहन सजग नागरिक मंचने केले आहे. तसेच अनावश्‍यक महोत्सव किंवा प्रकल्पांवरील आर्थिक उधळपट्टी तातडीने थांबवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महापालिकेचे उत्पन्न यंदा घटणार आहे. एकट्या बांधकाम विभागाला अपेक्षित उत्पन्नापेक्षा सुमारे 450 कोटींचा तोटा येणार आहे. त्याचा फटका विकासकामांना बसणार आहे. मात्र तरीही स्थायी समितीने पैसे उधळण्याचा सपाटा लावला आहे. आधी महिला व यूथ महोत्सवासाठी 30 लाख व ऐतिहासिक वास्तू फलकांसाठी 57 लाखांची तरतूद केली आहे. गरज नसलेल्या अशा कामांवर उधळपट्टी करण्याचे निर्णय स्थायी समिती घेत आहे. एकीकडे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही म्हणून मालमत्ताकर व पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव आणायचा आणि दुसरीकडे ही उधळपट्टी करायची, असा महापालिकेचा कारभार सुरू आहे. त्यावर कोणाचाही अंकुश नाही, ही दुर्दैवाची बाब असल्याचे मंचचे विवेक वेलणकर आणि विश्‍वास सहस्रबुद्धे यांनी निवेदनात म्हटले आहे.

७ हजार व्यावसायिकांना एलबीटी वसुलीसाठी नोटीसा देणार

0

पुणे : महापालिकेच्या आर्थिक अंदाजपत्रकामध्ये मोठी तुट येत असल्याच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत एलबीटी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. किरकोळ व्यावसायिकांकडून एलबीटी भरण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने पहिल्यांदाचा त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांमध्ये ७ हजार किरकोळ व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत.

राज्य शासनाने मार्च अखेर एलबीटी बंद करण्याची घोषणा केल्याने व्यापाऱ्यांनी एलबीटी भरणेचे बंद केले आहे. तसेच बहुतांश व्यावसायिकांनी अद्याप एलबीटीची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे पालिकेला मोठा आर्थिक फटका बसत आहे. यापार्श्वभुमीवर एलबीटी वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे अशी माहिती पालिकेचे एलबीटी प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

एलबीटी न भरणाऱ्या व्यवसायिकांची तपासणी सुरु असतानाच किरकोळ व्यापारी हा कर भरत नसल्याचे प्रशासनाच्या निदशर्नास आले आहे; त्याची दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने त्यांच्या विरोधात खास मोहिम सुरु केली आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाले आहे, त्यानुसार पहिल्या टप्प्यात सात हजार किरकोळ व्यवसायिकांना नोटीसा बजाविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या नोटीशी तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, त्यानुसार संबधित व्यवसायिकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे विलास कानडे यांनी सांगितले.

खंडाळ्याजवळ ३ बस एकमेकांवर आदळून अपघात, ७ जखमी

0

पुणे, दि. २६ – मुंबई- पुणे हायवेवर खंडाळ्याजवळ तीन खासगी बसेस एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास हा अपघात झाला असूनत्यामुळे हायवेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर लांब रांगा लागल्याचे समजते. मुंबईकडे जाणा-या वाहतूकीवरही अपघातामुळे परिणाम झाला असून वाहतूक जुन्या मुंबई-पुणे मार्गावर वळवण्यात आली आहे.

कॅटी, एनी, सोफिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

0

डेक्कन जिमखाना क्लबतर्फे आयोजित १४ व्या २५ हजार डॉलर एनइसीसी आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत गुजरातच्या अंकिता रैना हिने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे आव्हान राखले. गेट्रब्रिटनच्या कॅटी डूóो हिने जागतिक १७५ मानांकन असलेल्या अग्रमानांकित अनास्तासिया वास्येलेयेव्हा हिचा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.

डेक्कन जिमखाना क्लबच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत, एकेरीमध्ये एकमेव भारतीय खेळाडू असलेल्या अंकिता रैनाने आपल्या कामगिरीचा चढता आलेख कायम ठेवला.

काल थायलंडच्या कमोनवान बोयामचा तिसर्‍या सेटमध्ये पराभव करणार्‍या अंकिताने आज विजयासाठी जास्त वेळ घेतला नाही. चौथ्या मानांकित अंकिताने सर्बियाच्या निना स्टोजानोव्हिक हिचा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

सहाव्या मानांकित कॅटी डूóो हिने आज सनसनाटी निकालाची नोंद केली. कॅटीने अग्रमानांकित अनास्तासिया वास्येलेयेव्हा हिचा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरी गाठली. फॉर्ममध्ये असलेल्या कॅटीने काल ग्रीसच्या डेस्पिना पापामिकेल हिचाही केवळ दोन सेटमध्ये पराभवकेला होता.

आजही कॅटीने पहिल्या सेटपासून अचूक खेळ करत अनास्तासियावर दबाव निर्माण केला. दुसर्‍या सेटमध्ये कॅटीने अनास्तासियला सामन्यात परतण्याची संधी दिली नाही व विजय मिळवला.

चुरशीच्या झालेल्या सामन्यात जॉर्जीयाच्या सोफिआ शातापावाने पोलंडच्या मॅगडेलेना फ्रेचचा ६-७ (१), ६-४, ६-२ असा पराभव केला. काल मॅरेथॉन सामन्यात सोफिआने प्रार्थना ठोंबरेवर ६-४, ६-७ (७-४), ७-६ (८-६) असा विजय मिळवला होता. आजही सोफिआला विजयासाठी तिसर्‍या सेटपर्यंत वाट पहावी लागली. रोमानियाच्या क्रिस्टीना एनीने स्विडनच्या एलन आल्गुरीन हिचा ६-४, ६-३ असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

आज झालेल्या दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऋतुजा भोसले व निधी चिलीमुला या खेळाडूंच्या पराभवामुळे भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले. ओक्साना कलाशिनिकोव्हा व अनास्तासिया वास्येलेयेव्हा यांनी ऋतुजा भोसले व निधी चिलीमुला यांचा ६-४, ७-६ (३) असा पराभव केला. अँना मॉरगिना व निना स्टोजानोव्हिक यांनी जपानच्या मियाबी इन्वा व मिकी मियामुरा या जोडीचा ६-१, ६-४ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.शुक्रवार, २६ डिसेंबर सकाळी १0 वाजता एकेरीचे उपांत्य फेरीचे सामने होणार असून दुपारी ३ वाजता दुहेरीचा अंतिम सामना होणार आहे.
26122014-md-pu-15-4405-2-large

नाताळ उत्साहाने साजरा

0

पुणे :
आकर्षक विद्युत रोषणाईने झगमगणारे चर्च, येशूच्या जन्मप्रसंगाचे परिसरात साकारलेले देखावे, तसेच सांताक्लॉजची भेट अशा वातावरणात गुरुवारी शहर आणि उपनगरांत नाताळचा सण साजरा करण्यात आला.

ख्रिसमसनिमित्त शहर आणि उपनगरांतील सर्व चर्च व त्याजवळील शाळांना विद्युत रोषणाई करण्यात आली होती. प्रामुख्याने शहरात पुणे स्टेशन, महात्मा गांधी रोड, सोलापूर रस्ता, खडकी, नळस्टॉप या भागासह शहराच्या विविध भागांमधील चर्च विद्युत रोषणाईबरोबरच ख्रिसमस ट्री, चांदण्या, घंटा, बेल्स यासारख्या वस्तूंनी सजले आहे. बुधवारी रात्री बारानंतर येशूजन्माच्या आनंदोत्सवास सुरुवात झाली.

येशूजन्माचा आनंद साजरा करण्यासाठी बुधवारी रात्री कॅम्प, आंबेडकर रस्ता या भागात गर्दीने रस्ते फुलले होते. मेथडिस्ट चर्च, सेंट झेविअर्स चर्च यांच्यासह लष्कर भागातील प्रमुख रस्ते रंगीबेरंगी फुगे, खेळणी, टोप्या विक्रेते यांनी फुलले होते.गुरुवारी सकाळपासून शहरातील अनेक चर्चमध्ये ख्रिस्तजन्माची सुमधूर गाणी ऐकण्यास मिळत होती. गुरुवारी दिवसभर ख्रिश्‍चन बांधव एकमेकांना भेटून नाताळ सणाच्या शुभेच्छा देत होते. नाताळसाठी त्यांनी घरावर चांदणी, आकर्षक विद्युत रोषणाई आणि नयनरम्य सजावट केली होती.
सांताक्लॉजच्या वेशातील युवतीकडून बुधवारी रात्री कॅबचालकांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. खडकीतील सेंट थॉमस चर्चवर आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

तसेच भारतर▪मौलाना आझाद सोशल एज्युकेशन अँंड स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे ख्रिसमसनिमित्त सर्मथ पोलिस चौकीचे उपनिरीक्षक विजय झंजाड यांच्या हस्तें गरीबांना चादर वाटप करण्यात आले.विद्युत रोषणाईने उजळले चर्च; बुधवारी रात्री १२ नंतर येशू जन्माच्या उत्सवास प्रारंभपुणे नवरात्रौ महोत्सव समितीच्या वतीने कै.वसंतराव बागूल उद्यानात ख्रिसमस संध्या या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवदर्शन सहकारनगर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सुमारे दोन हजारपेक्षा अधिक नागरिकांनी गर्दी केली होती. या उपक्रमाचे हे यंदाचे १६ वे वर्ष होते. या कार्यक्रमासाठी वसंतराव बागूल उद्यानात मोठे व्यासपीठ उभारण्यात आले होते. डान्स शोसह लहान मुलांचा आवडत्या सांताक्लॉजने बालगोपाळांचे मनोरंजन केले.

यावेळी माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, नगरसेविका लक्ष्मीताई घोडके, या उपक्रमाचे मुख्य संयोजक उपमहापौर आबा बागूल आदी उपस्थित होते.

या ख्रिसमस संध्या कार्यक्रमाचे सर्वधर्मसमभाव संदेश देणार्‍या व लहान मुलांचे आकर्षण ठरलेला ख्रिसमस संध्या या आनंद मेळाव्याचा अनेकांनी मनमुराद आनंद लुटला. यावेळी मुलांना विनामूल्य बग्गी राइड, उंटाची सवारी करण्यात आली. यावेळी लहान मुलांना सांताक्लॉजच्या हस्ते चॉकलेट, गोळ्या, बिस्कीट, पॉपकॉर्न आदी खाऊचे वाटप करण्यात आले. या ठिकाणी पाणीपुरी, भेळपुरी, रगडा पॅटिस,मसाला डोसा आदी खाद्यपदार्थांचा आनंद लुटला. या कार्यक्रमाचे संयोजन अमित बागूल, सागर बागूल, विकी खन्ना, महेश ढवळे यांनी यशस्वीपणे केले. या कार्यक्रमानिमित्त वसंतराव बागूल उद्यान सजविण्यात आले होते. त्यासाठी सगळीकडे विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

गुरुनानक पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

0

पुणे कॅम्प मधील गुरुद्वारा गुरुनानक दरबारजवळील गुरुनानक पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न झाले . नेहरू मेमोरिअल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमास पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे , शाळेचे अध्यक्ष प्रकाशसिंग घई , गुरुद्वाराचे अध्यक्ष सरदार हरमिंदरसिंग घई , शाळेचे सचिव सरदार तरमिंदरसिंग व्होरा , गुरुद्वाराचे सरचिटणीस चरणजीतसिंग सहानी , शाळेच्या व कॉलेजच्या मुख्याध्यापिका सोबीनकौर जग्गी , अडमिनिस्ट्रेटर भूपिंदरसिंग सहानी , सुपरवायझर वहिदा शेख , खजिनदार कुलजितसिंग चौधरी , दलजितसिंग रेंक आदी मान्यवर , विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होते .

कार्यक्रमाची सुरुवात अरदासने करण्यात आली . यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी पंजाबी भांगडा नृत्य , जागरण गोंधळ , जोकर नृत्य, राजस्थानी नृत्य, बेटी बचाव – स्त्री भ्रूण हत्यावरील बेटी बचाव जनजागृतपर नाटक , देशभक्तीपर नाटक , बालमजुरी थांबवा या विषयांवरील नाटक सादर केले . यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले कि , शाळेच्या जागेसाठी सर्वोपतरी प्रयत्न करू . दहावी आणि बारावीचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल त्यांनी शाळेचे अभिनदन केले . आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले . यावेळी महापौरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .

6

‘लोकमान्य – एक युगपुरूष’च्या ट्रेलरला अवघ्या अर्ध्या दिवसात दिड लाख हिट्स

0

पहिल्या टिझरपासूनच नेटीझन्समध्ये उत्सुकतेचा विषय बनलेल्या “लोकमान्य -एक युगपुरूष” चित्रपटाने सायबरविश्वात एक नवा विक्रम केला आहे. १५ डिसेंबरला यु ट्युबवर अपलोड झालेल्या या चित्रपटाच्या दुस-या ट्रेलरला अवघ्या अर्ध्या दिवसात दिड लाखांच्या वर हिट्स मिळाल्या आहेत शिवाय हजारो लोकांनी तो फेसबुक आणि ट्विटरवर शेअरही केला आहे. सोशल नेटवर्क साईट्सवर शेअर झालेल्या या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून हिट्सचा आकडा दोन लाखांच्या वर पोचला आहे. येत्या २ जानेवारीला प्रदर्शित होणा-या या चित्रपटाची निर्मिती नीना राऊत फिल्मस् ची आहे. चित्रपटात सुबोध भावे लोकमान्यांची मध्यवर्ती भूमिका साकारत असून ओम् राऊतने त्याचं दिग्दर्शन केलं आहे.

मागील आठवड्यात पुण्यातील शनिवारवाड्यावर ‘लोकमान्य – एक युगपुरूष’ चित्रपटाचा ‘फर्स्ट लुक’ हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत लोकार्पित करण्यात आला. त्याआधी चित्रपटाचा एक टिझर युट्युबवर टाकण्यात आला होता ज्यामध्ये लोकमान्यांच्या पूर्ण रुपातील सुबोध आणि त्याचा चेहरा दाखवण्याचं टाळलं होतं. शनिवारवाड्यावर पहिल्यांदाच सुबोध या रुपात प्रेक्षकांसमोर आला आणि प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर सुबोध भावेंच्या लोकमान्य रुपासहित आणि संवादासहित युट्युबवर टाकण्यात आला आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. त्यांच्या प्रतिसादाचा हा ओघ अजूनही सूरूच असून आता व्हाट्स अॅपच्या माध्यमातूनही हा ट्रेलर व्हायरल झाला आहे. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” अशी गगनभेदी घोषणा देणारे टिळक, “कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेऊन मी उभा राहिन” असा जबरदस्त निर्धार करणारे टिळक, चाफेकर बंधूंना प्रेरणा देणारे, आपल्या शाळेत आलेल्या ब्रिटीशांना “डॉग्स अॅंड ब्रिटीश आर नॉट अलाऊड” असे ठणकावून सांगणारे टिळक आणि त्यांचा करारी बाणा या ट्रेलरमधून बघायला मिळतोय. तरुण वर्गाचा या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळतोय हे विशेष.
येत्या २ जानेवारीला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणारा “लोकमान्य – एक युगपुरूष” हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नवीन वर्षाची खास भेट असणार आहे. यावर्षी ‘टाइमपास’, ‘फॅंड्री’, ‘लय भारी’,’ डॉ. प्रकाश बाबा आमटे’, आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ सारखे एकाहून एक हिटच चित्रपट देणा-या एस्सेल व्हिजनच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.