Home Blog Page 3635

काव्यमय प्रेमाचा उत्कट आविष्कार असलेला ‘चंद्रकोर’ २३ जानेवारीला प्रदर्शित होणार!!

0

 
‘प्रेम’  या एका शब्दातच संपूर्ण जग सामावून गेलेलं आहे. प्रेम कथा वाचणे, पाहणे आणि ऐकणे ही मानवी स्वभावाची आवड आहे. प्रेमकथेवर आधारित असाच एक नवा कोरा  सिनेमा  आता लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. चितशक्ती पिक्चर्सच्या मीना खंडाळे, राजेश विठ्लानी यांची पहिलीच निर्मिती असलेला आणि अशोक विठ्लानी  यांची प्रस्तुती असलेला ‘चंद्रकोर’ हा सिनेमा येत्या २३ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. काव्यमय आणि उत्कट प्रेमकथा असलेल्या या ‘चंद्रकोर’ सिनेमाचे दिग्दर्शन राजेश बाळकृष्ण जाधव यांचे आहे.
लहानपणापासून मला स्वतःला वाचनाची खूप आवड आहे. आजवर अनेक कादंबऱ्या मी वाचल्या आहेत. ‘लावण्याची चंद्रकोर’ ही कादंबरी काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आली.  सरळ साधी अशी असलेली प्रेमकथा मला खूप आवडली. या कथेवर आपण एखादी कलाकृती तयार  करावी असे मी ठरविले आणि त्यातूनच ‘चंद्रकोर’ सिनेमाची निर्मिती झाली असे सिनेमाच्या निर्माती मीना खंडाळे यांनी सांगितले.
‘चंद्रकोर’ सिनेमाची कथा निंबाजी हिवरकर यांची आहे तर पटकथा आणि संवाद शरद बजरंग दोरके  यांचे असून काही दिवसांपूर्वीच त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.  या सिनेमात अभिनेत्री मनीषा केळकर, जितु गोस्वामी, उदय सबनीस, जयराज नायर, गणेश यादव, प्राजक्ता केळकर, होनाजी चव्हाण, अशोक पाडवे, मीना सोनावणे, राजेश  उबाळे  आदी कलाकारांच्या भूमिका या सिनेमात पहायला मिळणार आहेत. राजा फडतरे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून   सुदर्शन सातपुते यांनी संकलन केले आहे.

‘चंद्रकोर’ सिनेमात एकूण पाच गाणी असून पाचही गाणी वेगळ्या पठडीतील आहेत. निर्मात्या मीना खंडाळे यांनीच या सिनेमातील गाणी लिहिली असून विजय गटलेवार यांचे संगीत लाभले आहे. सुप्रसिद्ध गायिका उत्तर केळकर, साधना सरगम, जयश्री करंबेळकर, विजय गटलेवार आणि मिलिंद शिंदे यांच्या आवाजात सिनेमातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. कवी राम कदम फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट गीतकार म्हणून प्रदान करण्यात येणारा ‘तापी-पूर्णा पुरस्कार’ मीना खंडाळे यांना मिळाला असून ५४व्या अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनतही उत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांना या सिनेमासाठी मिळाला आहे.

” ‘बायोस्कोप’ चित्रपट हा मराठीतील एक आगळा वेगळा प्रयोग”

0

” ‘बायोस्कोप’ चित्रपट हा मराठीतील एक आगळा वेगळा प्रयोग”
पुणे-
”वेगवेगळ्या कवितांमधील आशयाचा समान धागा शोधून काढून चार निरनिराळ्या कथांवरती ‘बायोस्कोप’ हा एकच चित्रपट निर्माण करून मराठीमध्ये एक आगळा वेगळा प्रयोग करण्यात आला आहे असे असे या चित्रपटाचे दिग्दर्शक सर्वश्री गजेंद्र अहिरे आणि गिरीश मोहिते यांनी सोमवारी पुण्यात सांगितले. तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी विभागात ‘बायोस्कोप’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे त्यानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना गजेंद्र अहिरे आणि गिरीश मोहिते यांनी सांगितले की, एक वेगळी संकल्पना घेवून ‘बायोस्कोप’ ची निर्मिती करण्यात आली असून या एकाच चित्रपटामध्ये चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या चार स्वतंत्र कथा पहावयास मिळणार आहेत.
‘बैल’ (दिग्दर्शक – गिरीश मोहिते ), ‘मित्र’ ( (दिग्दर्शक – रवि जाधव), ‘एक होता काऊ’ ((दिग्दर्शक – विजू माने ), आणि ‘दिल-ए-नादान’ ((दिग्दर्शक – गजेंद्र अहिरे) हे ते चार चित्रपट अनुक्रमे लोकनाथ यशवंत, संदीप खरे, किशोर कदम आणि मिर्झा गालिब या कवींच्या कवितांवर आधारित आहेत. याप्रसंगी या चित्रपटाचे निर्माते अभय शेवडे, अभिनेत्री नेहा पेंडसे, संदीप खरे,संगीतकार सलील कुलकर्णी हेही उपस्थित होते. अभिनेत्री नेहा पेंडसे या चित्रपटाद्वारे प्रथमच निर्मातीच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रारंभी लेखक व पत्रकार राज काझी यांनी ‘बायोस्कोप’ च्या टीमचे स्वागत करून सूत्रसंचालन केले.
” भळभळत्या हृदयातील वेदना’ या समान आशयावर आधारित या चार स्वतंत्र कथा असून प्रत्येक कथेत स्वतंत्र कलाकार पहावयास मिळतील असे सांगून गिरीश मोहिते म्हणाले की, या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे या ‘बायोस्कोप’ बद्दल काय वाटते यासंबधी प्रसिद्ध कवी गुलजार यांचे चित्रपटाच्या सुरुवातीला मनोगतही आहे त्यामुळे रसिकांनी या चित्रपटाची सुरुवात चुकवू नये असे आवाहनही त्यांनी केले. निर्माते अभय शेवडे म्हणाले की, या चित्रपटाची संकल्पना मला खूप आवडली त्यामुळे व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता मी या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. तर संगीतकार सलील कुलकर्णी यांनी या वेगळ्या प्रयोगाचा आपण एक भागीदार झाल्याचा आनंद यावेळी आपल्या मनोगतामधून व्यक्त केला. अभिनेत्री नेहा पेंडसे, तसेच ‘मित्र’ कथेत भूमिका करणारे संदीप खरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

”प्रकाश बाबा आमटे….” लवकरच हिंदीत प्रदर्शित होणार

0

”प्रकाश बाबा आमटे….” लवकरच हिंदीत प्रदर्शित होणार

पुणे,
” प्रकाश आमटे यांचे अलौकिक असे सामाजिक कार्य केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील लोकांसमोर जावे या एकाच हेतूने मी ”प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो ” या चित्रपटाची निर्मिती केली त्यामागे व्यावसायिक दृष्टीकोन मुळीच नव्हता मात्र माझा हेतू साध्य झाला कारण या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला असे या चित्रपटाच्या लेखिका, निर्मात्या आणि दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी सोमवारी पुण्यात सांगितले. तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी स्पर्धा विभागात ”प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो ” हा चित्रपट प्रदर्शित होत आहे त्यानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना समृद्धी पोरे यांनी सांगितले की प्रकाश आमटे यांचे सामाजिक कार्यच एवढे मोठे होते की मला ते पडद्यावर साकार करताना फार सायास पडले नाहीत. त्यांच्या कार्याची इतरांनीही प्रेरणा घ्यावी या हेतूने मी हा चित्रपट तयार केला आणि माझ्या सुदॆवाने तो असंख्य प्रेक्षकांनी स्वीकारला याचेच मला जास्त समाधान आहे. हा चित्रपट भारतातील इतर प्रेक्षकांनी पाहावा यासाठी त्याची हिंदी आवृत्तीही लवकरच प्रदर्शित केली जाणार आहे असेही त्यांनी जाहीर केले.  याप्रसंगी ”प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो ” या चित्रपटात ‘बाबा आमटे’ यांची भूमिका करणारे अभिनेते डॉ. मोहन आगाशे हेही उपस्थित होते. प्रारंभी लेखक व पत्रकार राज काझी यांनी उभयतांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले.
दिग्दर्शिका समृद्धी पोरे पुढे म्हणाल्या की. या चित्रपटात नाना पाटेकर, सोनाली, डॉ. मोहन आगाशे यांच्यासारखे दिग्गज कलाकार मनाजोगते मिळाले त्यांच्यामुळेच या चित्रपटाला घवघवीत यश मिळाले. हा चित्रपट तयार झाल्यानंतर तो पाहून स्वत: प्रकाश आमटे यांनी ”तू काय माझ्या जन्मापासून कैमेरा माझ्यावर ‘ऑन’ करून ठेवला होतास काय? ” या शब्दात प्रशस्तिपत्र दिले असेही त्यांनी सांगितले.
डॉ. मोहन आगाशे यांनी यावेळी बोलतांना, बाबा आमटे यांची भूमिका माझ्याकडे चालत आली आणि त्यांचे सामाजिक कार्य लक्षात घेवून कोणताही मेकअप न करता ‘मला उमगलेले बाबा’ ची मी छोटीशी भूमिका केली असे नम्रपणे सांगितले.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या नुतनीकृत कार्यालयाचे मंगळवारी उद्घाटन

0

मुंबई:
महायुतीमधील लक्षवेधी पक्ष ठरलेल्या ‘राष्ट्रीय समाज पक्षा’च्या फोर्ट परिसरातील नुतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते मंगळवार दि. 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष महादेव जानकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे. 1/बी/35 हमाम स्ट्रीट, अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट भागातील standard Charters bank समोर असलेल्या इमारतीमध्ये हे कार्यालय आहे. त्याचे नुतनीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती प्रवक्ते दीपक बिडकर, युवक आघाडी अध्यक्ष राजू कोकरे, प्रदेश उपाध्यक्ष दशरथ राऊत यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत पक्षाने 5 जागा लढविल्या होत्या. त्यातील दौंड येथील जागेवर राहुल कुल यांनी विजय मिळविला. दोन ठिकाणी पक्षाचे उमेदवार दुसर्‍या स्थानावर राहिले. या सर्व उमेदवारांना देखील कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहे
rsp

इम्याजिका मधील राईड्सना मनोरंजनाची झालर

0

im3

im 1

im2
मुंबई पासून जवळच असलेल्या रायगड जिल्यातील खालापूरमध्ये एडलब्स IMAGICA थीम पार्कमध्ये चित्तथरारक राईड्ससोबत बच्चे कंपनीच खास मनोरंजन करण्याऱ्या वेगवेगळ्या व्यक्तीरेखांची परेडही लक्ष्यवेधी आहे. पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी दररोज होण्याऱ्या या परेडने साहसी राईड्ससोबत मनोरंजनाची किनार लागली आहे.

मुंबई पुणे महामार्गावर खोपोली परिसरात असणारे हे थीम पार्क पर्यटकांसाठी एक पर्याय म्हणून उपलब्ध झाले आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी IMAGICA थीम पार्क हौशी पर्यटकांच्या पसंतीत उतरले आहे. पार्कमध्ये वेगवेगळे साहसी खेळ आणि मनोरंजन खेळ आहेत. त्याचबरोबर सायंकाळी परेडला सुरुवात होते मोग्याम्बो, टबी, राजासोरस अशी विविध पात्रे या परेडमध्ये सहभागी होतात. वेगवेगळ्या कवायती, देखावे पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्याऱ्या ठरताहेत.

या थीम पार्कमध्ये स्क्रीम मशीन, निट्रो, डीप स्पेस, डेअर टू ड्राप आणि फमिली रोलर कोस्टर ह्या साहसी राईड्स आहेत शिवाय काही आणखी मनोरंजक राईड्स आहेत त्यापैकी
मि. इंडीया, व्राथ ऑफ अ गौडस, आय फोर इंडीया, मोशन बॉक्स थिएटर, सिनेमा ३६० प्रिन्स ऑफ द डार्क वाटर्स आणि खास मुलांसाठी हैप्पी व्हील्स, हम्पटीज फौल, व्यागन ओ ओ व्हील, टबी टेक्स ऑफ आणि द म्याजीक कारॊ सेल या आहेत.

पुणे मनपा आदर्श मनपा करू : खासदार वंदना चव्हाण

0

ww
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने पुणे शहरातील मनपा विकासकामांचा आढावा आणि नियोजन विषयावर कार्यशाळा

पुणे :

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्यावतीने पुणे शहरातील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यासाठी पुणे मनपा विकासकामांचा आढावा आणि नियोजन विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा आज दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत हॉटेल रॉनदेवू येथे पार पडली.
‘राज्यात आता सत्ता नसली तरी महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदांमध्ये आपली सत्ता अढळ राहावी या उद्देशाने राष्ट्रवादी तयारी करीत आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांना देण्यात येणारी माहिती ही जनतेपर्यंत पोहचविण्याचा पक्षाचा उद्देश असून आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही तयारी सुरू आहे. जाहिरनाम्यात सांगितलेल्या कामांचा उहापोह केला पाहिजे. पुढील दोन वर्षातील कामांचे नियोजन कसे असावे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. स्थानिकांना विश्‍वासात घेऊन सहभागी करून प्रत्येक प्रभागातील कामांची पुर्तता करून पुणे मनपा आदर्श मनपा करू’, असे कार्यशाळेत प्रास्ताविकात बोलताना खासदार अँड़ वंदना चव्हाण म्हणाल्या. तसेच त्यांनी 2017 च्या निवडणुकी तयारीसाठी महापालिकेने राबविलेल्या योजना, समस्या याबाबत माहिती दिली.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्राच्या सुरूवातीला संजय आवटे यांनी राजकीय सद्यस्थिती, नगरसेवकांच्या प्रतिनीधी म्हणून भूमिका, नवीन पिढीने कशाप्रकारे आपली भूमिका मांडावी याबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. कीरण शिंदे यांनी पर्यटन व्यवसाय वाढीसाठी पुणे शहराचा विकास कशाप्रकारे करता येईल, इतर शहरांतील पर्यटन व्यवसायाप्रमाणे पुण्यातील पर्यटन व्यवसाय वाढीबाबत मार्गदर्शन केले. संजय कुलकर्णी यांनी पुणे ब्रँडिंग, ब्रँड म्हणजे काय, नगरसेवकांनी याबाबत काय काळजी घ्यावीयाविषयी मार्गदर्शन केले.

शाम ढवळे यांनी पुणे शहरातील पर्यटन विकास आणि शहराचे ब्रँडिंग याबाबत बोलताना हेरिटेज आणि आजची सद्यस्थिती, पुणे शहर आणि हेरिटेज याची योग्य सांगड कशी घालावी याविषयी मार्गदर्शन केले.

पालिकेचे अधिकारी मंगेश दिघे नदी सुधार नदी काठचा परिसर शास्त्ररित्या सुधारणे याविषयी मार्गदर्शन केले आणि आत्तापर्यंत कशाप्रकारे सुधारले याचे सादरीकरण केले. पी.के.दास मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणी केलेले सौंदर्यीकरण व विकासाचे सादरीकरण केले, नदी सुशोभिकरण इतर देशातील नदी स्वच्छता कार्यशैली, पुण्यातील मुळा-मूठा नदीपात्र सुधार, वॉक-वे प्रकल्प याबाबत माहिती दिली.
पुणे शहरातील विविध समस्यांवर मंथन करण्यात आले त्यामध्ये पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह अनेक अधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले.

महापौर दत्तात्रय धनकवडे, सुभाष जगताप, बापूसाहेब कर्णेगुरूजी, अंकूश काकडे , अशोक राठी, अप्पा रेणूसे, दिलीप बराटे, रवी चौधरी, नंदा लोणकर, मोहनसिंग राजपाल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पुणे शहरातील सर्व नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्ष मुंबई प्रदेश प्रमुखपदी अजित पाटील

0

bidkar
पुणे : ‘राष्ट्रीय समाज पक्षा’च्या मुंबई प्रदेश प्रमुखपदी चेंबूरचे सामाजिक कार्यकर्ते अजित पाटील यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ राऊत आणि प्रवक्ते दीपक बिडकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
रविवारी गोवंडी येथे झालेल्या पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात हे पत्र देण्यात आले. रा. स. प. महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश प्रमुखपदी सौ. राधिका धेंडे यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी संजय कांबळे, जिल्हा अध्यक्ष संतोष चव्हाण, दक्षिण मुंबई लवटे, चेंबूर तालुकाध्यक्षपदी सुखदेव निरगुडे, चेंबूर तालुका उपाध्यक्षपदी संतोष वरक यांची नियुक्ती करण्यात येऊन नियुक्ती पत्रे देण्यात आली.
राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्वांना न्याय देणारा पक्ष असून, महानगरांमधील समस्या सोडवून सामान्यजनांचे जीवन सुखकर करण्यासाठी कटीबद्ध आहे. महानगरांमधील संघटन वाढविण्यात येणार असून, त्यासाठी मुंबईवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे पक्ष प्रवक्ते दीपक बिडकर यांनी यावेळी सांगितले.
प्रस्थापित आणि पारंपरिक सत्ता समीकरणे मोडून राष्ट्रीय समाज पक्ष सत्ता आणि समतेचे नवे समीकरण तयार करेल, असे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ राऊत यांनी सांगितले.
दत्ता सुरनरे, यांनी सूत्रसंचालन केले. दाजी मार्कंड यांनी आभार मानले. यावेळी लेंगरेमामा, अण्णासाहेब काळे, संतोष कांबळे, संपत ढेबे, मिलींद वरक तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऊसदराच्या आंदोलनाला हिंसक वळण साखर संकुलात तोडफोड

0

पुणे – ऊसदराच्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. शेतकऱयांच्या ऊसाला ‘एफआरपी’नुसार भाव द्यावा, अशी मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यातील साखर संकुलात तोडफोड केली. दरम्यान, ऊसदर प्रश्नी सरकारने जबाबदारी झटकलेली नाही, याविषयावर चर्चा करण्याचे आश्वासन राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलन केले. ऊसदरावरून आक्रमक झालेल्या कार्यकर्त्याकडून साखर संकुलाची तोडफोड केली.
या आंदोलनाविषयी माहिती देताना राजू शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्याला न्याय देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्यामुळे आम्ही भाजपला पाठिंबा दिला. आमच्या सहकार्यामुळेच राज्यात सत्तापरिवर्तन झाले आहे. नव्या सरकारने ऊस दर निश्चितीसाठी समिती स्थापन केली आहे. या समितीत माझाही समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकार किमान प्रयत्नशील असल्याचे दिसते. मागील सरकार हेसुद्धा करत नव्हते.
सरकारच्या योग्य निर्णयाची आम्ही वाट पहात आहोत. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’नुसार दर देण्याचे आदेश देऊनही कारखानदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारने या कारखानदारांवर कारवाई करावी. जर सरकारने याकडे दुर्लक्ष केले तर आम्ही सरकारविरोधात रस्त्यावर उतरू, काँग्रेसप्रणीत सरकारला खाली खेचण्यासाठी १५ वर्षे लागली. मात्र, भाजपप्रणीत सरकार १५ महिन्यात खाली खेचू असा इशाराही शेट्टी यांनी सरकारला या वेळी दिला.
दरम्यान, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असून, ऊसदराबाबत उद्यापासून चर्चा करण्याचे आश्वासन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
try1

अवघ्या २८ दिवसांच्या भारतीय चिमुरडीने जिंकले २४ लाखांचे दागिने!

0

दुबई : कोणाचे नशीब कधी, कुठे, कसे फळेल, हे सांगता येत नाही. संयुक्त अरब अमिरातीमधील अवघ्या २८ दिवसांच्या एका भारतीय मुलीला ज्ॉकपॉट लागला असून, दुबई शॉपिंग फेस्टिव्हलमधील एका लकी ड्रॉ योजनेत तिने तब्बल २४ लाख रुपयांचे सोने-हिर्‍यांचे दागिने जिंकले आहेत.

नितेरा जनार्दन असे या मुलीचे नाव असून, अजाणत्या वयातच तिला ही दागिन्यांची लॉटरी लागली आहे. नितेराचे वडील अनिल जनार्दन यांनी सांगितले की, आम्ही केरळी असल्याने मूल जन्माला आल्याच्या २८ दिवसांनंतर उत्सव साजरा करत असतो. त्यानुसार माझी मुलगी २८ दिवसांची झाल्यानंतर आम्ही तिच्या नावे काही सोने खरेदी केले. दुबईतील चलनानुसार आम्ही २ हजार दिरहमची (सुमारे ३४ हजार रुपये) सोन्याची साखळी आणि कडे घेतले. दुबईत १ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत शॉपिंग फेस्टिवल सुरू असल्याने एक लकी ड्रॉ योजनेअंतर्गत आम्ही मुलीच्या नावे काही कूपनही भरून दिले. या कूपन्सला सुमारे २४ लाख रुपयांच्या सोने-हिर्‍यांच्या दागिन्यांचे बक्षीस लागल्याचे समजले. सुरुवातीला आम्हाला कोणीतरी चेष्टा करत असल्याचे वाटले; परंतु नंतर आमच्या मुलीने खरेच २४ लाखांची आभूषणे जिंकल्याचे कळल्यानंतर आम्हाला आनंदाने वेड लागण्याची वेळ आली होती, असे जनार्दन म्हणाले. या योजनेत एकूण तीन विजेते असून, त्यापैकी दोन भारतीय आहेत. विनय वर्गीस या भारतीयानेही सुमारे २ लाख रुपयांची एक अंगठी जिंकली आहे.

रेडी रेकनरमध्ये केलेल्या वाढी विरोधात क्रेडाई कोर्टात जाणार ।

0

पुणे
पुणे महानगर क्षेत्रात सदनिकांच्या मूळ किंमती सात-आठ टक्क्यांनी, तर जमिनीच्या किंमती पाच ते पंधरा टक्क्यांनी वाढल्या, परंतु रेडी रेकनरमध्ये सदनिकांच्या किंमती पंधरा ते पंचवीस टक्क्यांनी, तर जमिनीच्या किंमती वीस ते शंभर टक्क्यांनी वाढविण्यात आल्याची टीका क्रेडाई पुणे मेट्रोने केली आहे. रेडी रेकनरच्या दरात करण्यात आलेल्या या वाढीवर क्रेडाई पुणे मेट्रोने आक्षेप घेतला असून, त्याविरोधात कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा इशारा देण्यात आला आहे.’टीडीआर’च्या शक्यतांचा वापर करून जमीन विकासासाठी अतिरिक्त २५ टक्के मूल्यांकन करण्यामुळे घरखरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसण्याची भीती आहे. गृहबांधणी क्षेत्रावर अशा पद्धतीने कर लावण्याच्या दरानुसार प्रत्येक भारतीयाला घर पुरविण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहील, असे ‘क्रेडाई’ने म्हटले आहे.
गेल्या काही काळात बांधकाम व्यवसायातील मंदीच्या पार्श्वभूमीवर यंदा रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ करण्यात आल्याने घर खरेदी करणाऱ्यांवर मोठा बोजा पडणार आहे. यापूर्वीच बांधकामाचा खर्च, अर्थपुरवठ्यावरील बंधने, कर्जाचे भरमसाट दर, याबरोबरच गेल्या काही काळात व्हॅट, एलबीटी, सेवाकर यांचा बोजा ग्राहकांवर पडत आहे. मुद्रांक शुल्क तार्किक पातळीवर ठेवण्याची हमी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेचा लाभ घेताना राज्य सरकारने केंद्र सरकारला दिली होती. रेडी रेकनरच्या मूल्यांकनात भरघोस वाढ करून पुन्हा मागच्या दाराने भाववाढ करण्यात येत असल्याची टीका ‘क्रेडाई’ने केली आहे. ‘विकसकांनी आकारलेल्या सदनिकांच्या किंमतीनुसारच रेडी रेकनरच्या दरात वाढ झाल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे, मात्र, मूल्यांकनात वाढीव घटक जोडण्याची काय गरज आहे,’ असा प्रश्न ‘क्रेडाई’ने विचारला आहे.
पूर्वीच्या चटई क्षेत्रावर आधारित वाढीव घटक आणि त्याच्या जोडीला प्रकल्पाच्या भूखंडाचा आकार आणि सदनिकेच्या आकारावर आधारित नव्याने आणलेल्या वाढीमुळे बहुतांश प्रकरणांमध्ये दहा टक्के अधिक स्टँप ड्युटी भरण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती ‘क्रेडाई’ने व्यक्त केली आहे. ‘टीडीआर’च्या शक्यतांचा वापर करून जमीन विकासासाठी अतिरिक्त २५ टक्के मूल्यांकन करण्यामुळे घरखरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसण्याची भीती आहे. गृहबांधणी क्षेत्रावर अशा पद्धतीने कर लावण्याच्या दरानुसार प्रत्येक भारतीयाला घर पुरविण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहील, असे ‘क्रेडाई’ने म्हटले आहे. यामुळे शहरातील बांधकाम क्षेत्रावरील नकारात्मक परिणामांकडे पाहता सरकारच्या या निर्णयास आक्षेप घेण्यात येणार असून, त्यासाठी सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना विसंगती दाखवून देणे, रेडी रेकनर निश्चित करण्यासाठी सरकारला रचनात्मक बदल सुचविणे आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी सदस्यांसाठी नव्या अटी तयार करण्यात येणार आहेत.

रेल्वेभरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करणार! केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू

0

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
रेल्वेच्या विकासात देशाचे रूप बदलण्याची क्षमता रेल्वेमध्ये आहे. रेल्वेभरतीमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असून होणारा भ्रष्टाचार बंद करण्यासाठी आता रेल्वेभरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. तसेच सर्वसामान्य माणसाला अपेक्षित असा रेल्वेचा विकास करणार आहे, असे केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना सांगितले. देवगड येथे सुरेश प्रभू यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी नागरी सत्कार समिती अध्यक्ष विद्याधर माळगावकर, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री प्रभू म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणार्‍या गोष्टींसाठी आम्ही प्रय▪करीत आहोत तसेच नागरिकांसाठी ई-पोस्टल, नॅशनल हेल्पलाईनच्या माध्यमातून प्रत्येक प्रवाशाला आपली तक्रार नोंदवता येऊन त्याचे उत्तरदेखील देण्याचा आमचा या माध्यमातून प्रय▪असणार आहे. रेल्वे घडवू शकलो तर भारत घडवू शकू, असा विश्‍वास प्रभू यांनी व्यक्त केला. रेल्वेकडून काढण्यात येणार्‍या कोठल्याही कामाचे टेंडर रेल्वे मंत्र्याकडे सहीसाठी जाणार नसून त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होऊन त्यापासून त्याच्या खिशातून जाणारा पैसा हा त्याच्याकडेच राहील. तसेच एखाद्या मंत्र्याची अपॉइंटमेंट घेण्यासाठी घेतले जाणारे पैसे यामध्ये पूर्णत: पारदर्शक करून मंत्री झालेल्या दीड महिन्यांच्या कालवधीत कोणत्याही गोष्टीचा भ्रष्टाचार केला जाणार नाही, यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले.
देवगडचा जगप्रसिध्द हापूस आंबा हा फक्त देवगड तालुक्यातच मिळत असल्याचे सांगितले. फळभाज्यांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागत असला तरी ३४ ते ४0 टक्के फळे फुकट जातात. ही फ ळे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक यंत्रणा सक्षम क रणे आवश्यक आहे, असे मंत्री प्रभूंनी सांगितले. महिलांना खर्‍या अर्थाने समाज सेवेत वाटा द्यायचा असेल तर तो आर्थिकदृष्ट्या वाटा दिला पाहिजे. महिलांना घरात राहून कसे उत्पन्न वाढले पाहिजे. यासाठी प्रत्येक गावात स्वयंसहाय्यता गट स्थापन करण्याची गरज आहे. कोकण रेल्वेमध्ये महिलांना बचत गट निर्माण करून दिल्यास बचतगटांनी बनविलेल्या पदार्थांना चांगल्या प्रकारची बाजारपेठ निर्माण होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. आतापर्यंत आपण पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली नाही. त्यामुळे आपल्या प्रगतीचा आलेख खाली आला आहे.

बेपत्ता झालेली बोट पुणेकरांसह दीडशे प्रवासी घेवून किनाऱ्यावर सुखरूप पोचली.

0

पुणे – बंगालच्या उपसागरामध्ये गंगासागरच्या दर्शनासाठी गेलेली दीडशे जणांची बोट रविवारी बेपत्ता झाली होती. यामध्ये पुणे व नागपूरमधील दीडशे जणांचा समावेश होता. मात्र, पाच तासांच्या प्रतीक्षेनंतर बेपत्ता झालेली ही बोट सर्व दीडशे प्रवाशांसह लामखाना येथील किनाऱ्यावर सुखरूप पोचली.
कोलकता शहरापासून लामखाना समुद्रकिनारा तब्बल 150 किलोमीटरवर आहे. या किनाऱ्यापासून गंगासागर हे ठिकाण समुद्रात एक ते दीड तासाच्या अंतरावर आहे. पुण्यातील ओम टुरिझम ही पर्यटन कंपनी पुणे, नागपूरमधील दीडशे प्रवाशांना बोटीने घेऊन गंगासागरच्या दर्शनासाठी आज सकाळी अकरा वाजता बोटीने गेली. येताना साडेचार वाजता ते परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, मार्ग चुकल्याने बोट भरकटली. त्यामुळे एक ते दीड तासाच्या प्रवासाला तब्बल सहा तास लागले. सर्व प्रवासी सुखरूप असून, रात्री पावणेबारा वाजता तीन बसमधून सर्वजण कोलकताच्या दिशेने निघाल्याचे या टुरिझम कंपनीचे प्रमुख राजेश आरगे यांनी सांगितले. आरगे स्वत: पर्यटकांबरोबर आहेत. उद्या भुवनेश्‍वरला जाणार असून, सहल संपल्यानंतर 16 जानेवारीला रात्री पुण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू

0

punya
पुणे

थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्री शेकोटी पेटवून झोपलेल्या कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. नारायण पेठेतील कबीरबागेजवळ ही घटना घडली. मृतांमध्ये २२ वर्षांच्या एका तरुणीसह तिच्या आई-वडिलांचा समावेश आहे. गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय असून, पोलिस सर्व शक्यतांचा तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

भगवान धोंडिबा घारे (५५), त्यांची पत्नी मंगला (५०) आणि मुलगी पौर्णिमा (२२) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. घारे यांचे कबीरबागेसमोर दुमजली घर आहे. घारे कुटु​बीयांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. घराच्या तळमजल्यावर त्यांचे वर्कशॉप आहे, तर वरच्या मजल्यावर ते राहतात. त्यांचा मुलगा धीरज हा भिवरा लॉजजवळील जुन्या घरी राहण्यास आहे. धीरज वर्कशॉपमध्ये आपल्या वडिलांना मदत करतो, अशी माहिती ‘परिमंडळ एक’चे उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी दिली.

घारे यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. पहिल्या मजल्यावर बांधलेल्या खोल्या छोट्या आहेत. त्यात हे तिघे जण झोपले होते. झोपण्याच्या खोलीमध्ये कॉटखाली कोळसा पेटवलेली शेगडी ठेवण्यात आली होती. पोलिसांना घटनास्थळी ही शेगडी आढळली आहे. घारे यांच्या वर्कशॉपमधील कामगार सकाळी आठच्या दरम्यान आले, तेव्हा त्यांनी घारे यांना हाक मारली.

घरातून कोणतीही हालचाल झाली नाही, म्हणून त्यातील एका कामगाराने घराचा दरवाजा ठोठावला. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी धीरजला फोन केला. धीरजसुद्धा घरी आल्यानंतर दरवाजा ठोठावत होता; मात्र प्रतिसाद ​न मिळाल्याने तो वरच्या मजल्यावरील खिडकीतून घरात गेला. तेव्हा बेडरूमचे दार बंद होते. अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता तिघेही बेशुद्धावस्थेत आढळले. भगवान कॉटवर, तर मंगला आणि पौर्णिमा जमिनीवर अंथरुणावर झोपलेल्या होत्या.

पोलिसांनी दरवाजा उघडला तेव्हा धूर कोंडला गेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. तिघांनाही जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच तांबडे यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अक​स्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असला, तरी सर्वच बाजूंनी या घटनेचा तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

‘जपानला जाण्याचे पौर्णिमाचे स्वप्नच राहिले’

या दुर्घटनेत मरण पावलेली पौर्णिमा ग्रॅज्युएट असून, ती जपानी भाषा शिकली आहे. ‘पौर्णिमाला जपानला जायचे होते. त्यासाठी तिने पासपोर्टकरिता अर्जही केला होता. पासपोर्ट आल्यानंतर ती लगेचच जपानला जाणार होती. परंतु ते तिचे स्वप्नच राहिले,’ अशी भावना त्यांचे शेजारी सचिन गरूड यांनी व्यक्त केली.

पुण्यात कॅंटोन्मेंट मध्ये भाजप, तर खडकीत कॉंग्रेस ला बहुमत —राष्ट्रवादी, शिवसेनेचा सफाया

0

पुणे – पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पाच जागा मिळवून कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले, तर खडकीत पाच जागा जिंकलेल्या कॉंग्रेसने आपला गड राखला. पुण्यात कॉंग्रेसला दोन, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. खडकीत एक भाजप, तर दोन जागा अपक्षांच्या पदरात पडल्या. दोन्ही बोर्डांत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले.
पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वॉर्ड क्रमांक एकमधून विद्यमान सदस्य शैलेश बिडकर यांच्या पत्नी रूपाली या अपक्ष म्हणून विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या अनिता सोनटक्के यांचा पराभव केला. वॉर्ड दोनमधील लढतीत कॉंग्रेसचे अशोक पवार यांनी बाजी मारली. त्यांनी अपक्ष मेहेर इराणी यांचा पराभव केला, तर तीनमधून भाजपचे दिलीप गिरमकर यांनी अपक्ष प्रसाद केदारी यांचा पराभव केला. चारमध्ये भाजपचे अतुल गायकवाड यांनी कॉंग्रेसच्या करण मकवानी यांना धूळ चारली. पाचमध्ये भाजपचे विवेक यादव यांनी बोर्डाच्या माजी उपाध्यक्ष व कॉंग्रेसच्या आरती महाजन यांच्यावर विजय मिळविला. सहामधून कॉंग्रेसचे विनोद मथुरावाला यांनी भाजपच्या सचिन मथुरावाला यांचा पराभव केला. सातमध्ये भाजपच्या डॉ. किरण मंत्री यांनी कॉंग्रेसच्या सुरेखा कवडे यांचा पराभव केला, तर आठमध्ये भाजपच्या प्रियांका श्रीगिरी यांनी कॉंग्रेसच्या साबीरा शेख यांच्यावर विजय मिळविला.
खडकीतील वॉर्ड एकमधून कॉंग्रेसच्या सुरेश कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या विशाल गायकवाड यांचा पराभव केला. वॉर्ड दोनमध्ये कॉंग्रेसच्याच कमलेश चासकर यांनी भाजपच्या अनिल मेहता यांना धूळ चारली. तीनमध्ये मनीष आनंद यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्ञानेश्‍वर यादव व भाजपच्या संगीता गवळी यांचा पराभव केला, तर आनंद यांच्या पत्नी पूजा आनंद यांनी वॉर्ड चारमध्ये भाजपच्या किरण त्यागी यांना पराभवाची धूळ चारली. अतिशय अटीतटीच्या लढतीत भाजपच्या कार्तिकी हिवरकर यांनी वॉर्ड पाचमध्ये संतोषी वेणुगोपाल यांच्यावर अवघ्या 14 मतांनी विजय मिळविला. सहामध्ये अनपेक्षितरीत्या अपक्ष उमेदवार वैशाली पहिलवान यांनी कॉंग्रेसच्या काश्‍मिरा हिवाळे यांचा पराभव केला. सातमध्ये अपक्ष व कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार दुर्योधन भापकर यांनी कॉंग्रेसच्या अंजुम मणियार यांच्यावर विजय मिळविला, तर आठमध्ये कॉंग्रेसच्या अभय सावंत यांनी माजी नगरसेविका वंदना बालगुडे यांना हरविले.

चित्रपटांसारख्या माध्यमातून भारत आणि अल्जेरिया मैत्रीसंबंध वृद्धिंगत होतील — समीद मोहम्मद आदिलर

0

चित्रपटांसारख्या माध्यमातून भारत आणि अल्जेरिया मैत्रीसंबंध वृद्धिंगत होतील — समीद मोहम्मद आदिलर
पुणे
” भारत आणि अल्जेरिया यांचे मैत्रीसंबंध चांगले आहेतच मात्र चित्रपटांसारख्या आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हे मैत्रीपूर्ण संबंध आणखी वृद्धिंगत होतील अशी आशा अल्जेरियाच्या वकिलातीमधील मंत्री समीद मोहम्मद आदिलर यांनी रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अल्जेरियाचे सहा चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, त्यानिमित्त समीद मोहम्मद आदिलर पुण्यात आले असून पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, अल्जेरियामध्ये चित्रपटसृष्टी आता चांगली प्रगत झाली असून त्याचा आविष्कार पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिसत आहे. प्रारंभी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे चेअरमन डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले. याप्रसंगी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील निवड समितीचे सदस्य समर नखाते हेही उपस्थित होते.
प्रारंभी फ्रेंच वसाहतीपैकी एक असलेला अल्जेरिया हा देश १९६२ साली स्वतंत्र झाला अशी माहिती देऊन समीद मोहम्मद पुढे म्हणाले. तेथील नागरिकांमध्ये भारतीय चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असते. यासंदर्भात त्यांनी ‘मदर इंडिया’, ‘आन’ या चित्रपटांचा आवर्जून उल्लेख करून दिलीप कुमार, शम्मी कपूर, शशी कपूर आदी कलावंत तसेच लता मंगेशकर. आशा भोसले, मोहम्मद रफी हे गायक-गायिका अल्जेरियामध्ये खूप लोकप्रिय असल्याचे सांगितले. शशी कपूर आणि शर्मिला टागोर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ”आ गले लग जा’ हा चित्रपट आपणास खूप आवडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अल्जेरियन नागरिक संगीताचे मोठे भोक्ते असून तेथील संगीतामध्ये तबला,आदी भारतीय वाद्यांचा सर्रास वापर केला जातो अशी माहिती त्यांनी दिली.
आपल्या पहिल्याच भेटीत पुणे शहर आवडल्याचे त्यांनी यावेळी प्रशस्तीपत्रही दिले तसेच पुढील वर्षी अल्जेरियामधील प्रमुख लेखक, दिग्दर्शक आणि कलावंतांना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त पुण्यात आणले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.