Home Blog Page 3634

“शहरातील पर्यावरणाचा ह्रास थांबविण्यासाठी अॅक्शन प्लॅन करावा”: अॅड. असीम सरोदे.

0

 

पाणी बचत न केल्यास रेशनवर पाणी विकत घेण्याची वेळ येईल. पर्यावरणतज्ञांनी व्यक्त केली भिती

पुणे : “शहरातील पर्यावरणास हानीकारक ठरणारे प्रश्न व समस्यांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी नागरिक, प्रशासन, शासन व स्वयंसेवी संस्था स्तरावर एक सर्वसमावेशक अॅक्शन प्लॅन तयार करावा” असे मत कायदेतज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले.

साखर संकुल, शिवाजीनगर येथे’लायन्स इन्व्हॅारन्मेंट एक्स्पो’ तर्फे पर्यावरणावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये खासदार अॅड. वंदना चव्हाण, जल अभ्यासक राजेंद्र माहुलकर, स्वच्छ संस्थेच्या मंगल पगारे, महापालिका सहायक आयुक्त सुरेश जगताप, प्रांतपाल विक्रांत जाधव, महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळाचे सहायक सचिव पी.के.मिराशे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाचे दत्तात्रय देवळे यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन हसमुख मेहता, समन्वयक लायन बाळासाहेब पाथरकर उपस्थित होते.

देशभरातील पर्यावरणाची स्थिती अतिशय गंभीर व चिंताजनक आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण व विकास यासोबतच पर्यावरवरण प्रदुषण होत आहे. त्याचा परिणाम भावी पिढीवर अत्यंत धोकादायकपणे होऊ शकतो. त्यामुळे पर्यावरणाचा ढासलेला असमतोल सुरळीत करण्यासाठी आता जनतेमधून पर्यावरण जनजागृतीकरितीची व्यापक चळवळ उभी राहिली पाहिजे असे मत या परिसंवादात अनेक पर्यावरणतज्ञांनी व्यक्त केले.

अॅड.वंदना चव्हाण म्हणाल्या, “भावी पिढीस चांगले पर्यावरण मिळण्यासाठी भविष्याचा विचार करुन शाश्वत विकासास प्राधान्य देणे काळाची गरज बनली आहे. वातावरणातील होत असलेले बदल लक्षात घेऊन त्यास अपायकारक ठरणा-या लहान लहान घटकांची काळजी प्रत्येकांने घ्यायला हवी. तरच वातावरण व हवामानात होत असलेले बदल थांबतील. वातावरण व हवामानात होत असलेल्या बदलांमुळे येत्या काही दिवसात महाभंयकर प्रलंय ओढविले जाऊ शकतात. त्याचा परिणाम सर्व मानवजातीस सहन करावा लागेल. पर्यावरणाचा ह्रास थांबविण्यासाठी प्रत्येकांने आपल्यापासून सुरुवात करायला हवी.”

माहुलकर म्हणाले, “पुढील काही वर्षातील लोकसंख्येला पुरेल इतक्या पाणीसाठ्याची व्यवस्था पुणे महापालिका व शासनाने आज ही केली नसून त्याचे परिणाम येत्या काही दिवसात पुणेकरांना भोगावे लागतील. नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्ये समजून पाणी बचत करावी. मुळा-मुठा नदी, सांडपाणी व धऱणाचे पाणी यामुळे शहरात पाण्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. जगासमोर ब-याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने समोर आहे. तेव्हा, पाण्याची योग्य बचत न केल्यास आपणास ही पिण्याचे पाणी रेशनवर घेण्याची वेळ येऊ शकते.”

मंगल पगारे म्हणाल्या, “नागरिकांनी इच्छाशक्ती दाखविल्यास घनकचरा समस्याचे पुर्णपणे निर्मुलन होऊ शकते. डोळसपणे बघितल्यास कच-यातून व्यवसाय निर्मिती होऊ शकते. भविष्यात कचरा वेचक कच-याची समस्या नागरिकांच्या सहकार्याने समुळ नष्ट करतील.”

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पर्यावरणाथीमवर आधारित नृत्य, गीते व विविध कलांचे सादरीकरण केले. तसेच स्वच्छता, साफसफाई करण्याची यावेळी शपथ घेण्यात आली. शिवाय, प्रत्येकाने एक वृक्ष लागवड करावा व त्या वृक्षाचा दरवर्षी वाढदिवस साजरा करावा अशी उपस्थितांना शपथ दिली. नागरिकांना मोफत रोपांचे वाटप करण्यात आले.

आजच्या तरुण पिढीने वृक्षसंपदेकडून मिळणार्‍या लाभाचे देखिल ऑडिट करावे,’ – संगणक तज्ज्ञ डॉ.विजय भटकर

0

 

पुणे
पंचवटी भागातील वृक्षप्रेमी के.डी.गारगोटे व विद्या गारगोटे यांनी वेताळ टेकडीवर स्वत: लावलेल्या आणि जपलेल्या 3150 वृक्षांच्या यशस्वी प्रकल्पाला आज  पर्यावरण तज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ, खगोल शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर,संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर,  या तीन मान्यवर पुणेकरांनी भेट देऊन वेताळ टेकडीच्या स्वच्छता  अभियानात भाग घेतला.
      व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट के.डी.गारगोटे व विद्या गारगोटे (वित्त व लेखाधिकारी पुणे विद्यापीठ) यांनी पंचवटी (पाषाण)ला लागून असलेल्या वेताळ टेकडीवर ‘पंचवटी उद्यान’ येथे पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने वृक्ष लागवड व संवर्धन केले आहे.आज दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी  पंचवटी उद्यान, स्टेट बँक कॉलनीजवळ, पाषाण रोड,‘स्वच्छता अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता अभियानामध्ये शिवाजी झावरे , दिल्ली),  सत्यजित गुजर (मुख्य वन संरक्षक, पुणे),  वृक्ष अधिकारी मोहन ढेरे, उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे, डॉ. विद्या गारगोटे (वित्त व लेखाधिकारी पुणे विद्यापीठ). अनेक मान्यवर तसेच चार्टर्ड अकाऊंटंटचे शिक्षण घेणारे 200विद्यार्थी सहभागी झाले होते.
           ‘आज सर्व चार्टर्ड अकाऊंटंटचे विद्यार्थी उपस्थित आहेत. या आजच्या तरुण पिढीने वृक्षसंपदेकडून मिळणार्‍या लाभाचे देखिल ऑडिट करावे त्यामुळे मानवजातीला मिळणारे वरदान लक्षात येईल, आणि वृक्षसंपदा वाढविण्याचे प्रयत्न वाढतील. जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत व त्यांचे संवर्धन केले पाहिजे’. असे संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यावेळी बोलताना म्हणाले.
 ‘पुणे शहरात कचर्‍याची समस्या भयंकर आहे.वेताळ टेकडीवर वर आज आपण ‘स्वच्छता अभियाना’ साठी एकत्र आलो आहोत. या अभियानात जो कचरा गोळा केला जाईल तो येथेच जिरवावा. ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट खत तयार करुन येथेच जिरवले गेले पाहिजे’, असे पर्यावरण तज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ म्हणाले.
     खगोल शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर म्हणाले,‘  के.डी.गारगोटे आणि विद्या गारगोटे यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे.दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे, ज्याप्रमाणे हवेचे, ध्वनीचे प्रदूषण असते त्याप्रमाणे प्रकाशाचे देखिल प्रदूषण सध्या भेडसावत आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास करणार्‍यांना या प्रकाश प्रदूषणाचा त्रास होतो. त्यामुळे वृक्षसंपदाही जपली पाहिजे.’

दीपक मानकर- फारुख इनामदार विजयी

0
Deepak Mankarपुणे – कोथरूड भागातील केळेवाडी-रामबाग आणि हडपसरमधील काळेपडळ-महंमदवाडीमध्ये झालेल्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळविण्यात यश आले आहे. केळेवाडी-रामबाग प्रभागातून दीपक मानकर यांनी, तर काळेपडळ-महंमदवाडी प्रभागातून फारुख इनामदार यांनी विजय मिळविला आहे.
 
केळेवाडी-रामबाग व काळेपडळ-महंमदवाडी या महापालिकेच्या दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान झाले होते. केळेवाडी-रामबाग या प्रभाग क्रमांक 26-‘ब‘मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत एकूण 42.33 टक्के मतदान झाले होते. या प्रभागात राष्ट्रवादीकडून दीपक मानकर, शिवसेनेकडून किशोर सोनार, भाजपाकडून दिलिप उंबरकर, कॉंग्रेसकडून हनुमंत राऊत, मनसेकडून गणेश शिंदे, तर दोन अपक्ष असे एकूण सात जण निवडणूक रिंगणात होते. विधानसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागलेल्या मानकर यांनी या निवडणुकीत 3054 मतांनी विजय मिळविला. मानकर यांना 5610, उंबरकर यांना 2556 आणि राऊत यांना 856 मते मिळाली.
 
काळेपडळ-महंमदवाडी या प्रभाग क्र. 45 ‘अ‘ (काळेपडळ-महंमदवाडी)मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 48.04 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. येथेही राष्ट्रवादीकडून फारुख इनामदार, शिवसेनेकडून जयसिंग भानगिरे, भाजपाकडून जीवन जाधव, कॉंग्रेसकडून वैभव डांगमाळी, तर संजय घुले यांच्यात प्रमुख लढत होती. राष्ट्रवादीच्या इनामदार यांनी 2387 मतांनी विजय मिळविला.

मॅकडोनाल्ड रेस्टांरंटमधून गरीब मुलाला हाकलल्याच्या वृत्ताने संताप-मॅकडोनाल्ड चा खुलासा- चौकशी करून कडक कारवाई करू

0
पुणे –
पुण्यातील एका मॅकडोनाल्ड  रेस्टांरंटमधून एका रस्त्यावरील गरीब मुलाला हाकलून देण्याचा प्रकार पुढे आला आहे.यामुळे नागरिकत संताप पसरल्याचे चित्र सोशल मेडिया द्वारे दिसते आहे एका उच्चशिक्षीत महिला संबंधित गरीब मुलाला फैंटा फ्लोट पिण्यासाठी मॅकडोनाल्टमध्ये घेऊन गेली. मात्र, मॅकडोनाल्डमधील व्यवस्थापन व कर्मचा-यांनी त्या मुलाला बाहेर हाकलून लावले. दरम्यान, या घटनेमुळे वाद पेटला आहे. संबंधित महिलेने याबाबत सोशल मिडियावरून या घटनेची माहिती व फोटो शेअर केल्यानंतर हा प्रकार समोर आला.दरम्यान, या घटनेने वाद पेटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत याबाबत माहिती पोहोचली आहे

 संबंधित महिलेने  आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी माझ्या काही मित्रांसमवेत मॅकडोनाल्डमध्ये गेली होती. त्यावेळी आम्ही कोक फ्लोट आर्डर केला होता. त्याचवेळी आमच्याजवळ एक रस्त्यावरील गरीब मुलगा येऊन उभा राहिला. त्यामुळे मी त्याला मुलाला पैसे देऊन आणखी एक कोक मागवला. मात्र, त्या मुलाला तेथे बसायला सांगितल्यानंतर तेथील कर्मचा-यांनी या मुलाला बाहेर जाण्यास सांगितले व हाकलून दिले. अशा लोकांसाठी ही जागा नाही असे त्या कर्मचा-याने सांगितले. त्यामुळे तो कोक आम्ही त्या मुलाला बाहेर प्यायला दिला.

दुसरीकडे मॅकडोनाल्ड इंडियाचे म्हणणे आहे की, या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल. जर काही अशी घटना घडली असेल तर हा प्रकार सहन केला जाणार नाही. संबंधित कर्मचारी व व्यवस्थापकावर कारवाई केली जाईल.

 मॅकडोनाल्डने पुढे म्हटले आहे की, आम्ही समानतेसोबत प्रत्येका सन्मान व आदर करतो. जेव्हा आम्ही समानता हा शब्द वापरतो तेव्हा कोणासोबतही भेदभाव करू शकत नाही. अनाथ, गरीब मुलाबाबत असा प्रकार घडला असेल तर आम्ही खेद व्यक्त करतो. तसेच या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करू.

समाजकंटकांचा हैदोस – १० दुचाक्या जाळल्या

0

पुणे- धनकवडी येथील बालाजीनगरमधील काशीनाथ पाटील नगरच्या ओढा पुलावर पार्किंग केलेल्या दहा दुचाकी अज्ञातांनी जाळल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. रात्रीच्यावेळी पुलाच्या वापरात निर्माण होत असलेला अडथळा अथवा दहशत माजवण्याच्या उद्देशाने जाळपोळ केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तीन वर्षांपूर्वी गुन्हेगारी कारवायांनी अशांत झालेल्या बालाजीनगरमध्ये पोलिसांनी नियंत्रण मिळवल्यानंतर शुक्रवारी घडलेली जाळपोळीची घटना दुदैवी मानण्यात येत आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर सगळीकडे शांतता असताना, बालाजीनगर परिसरातील काशिनाथ पाटीलनगर येथे ओढापुलावर उभ्या केलेल्या दहा दुचाकींना आग लावण्यात आली. शुक्रवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास धूर आणि भडकलेल्या आगीने ताई कॉम्प्लेक्स व क्लासिक अपार्टमेंटमधील नागरिक जागे झाले. सुरक्षा रक्षक अकबर मोमीनसह संजय आळेकर यांनी पोलिस व अग्निशमन केंद्राला माहिती दिली. जमलेल्या नागरिकांनी बाजूच्या काही दुचाकींसह रिक्षा व मोटारीला आगीपासून दूर केले. नागरिकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. कात्रज अग्निशमन जवानांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान या आगीत सात स्कूटर आणि तीन दुचाकी जळून भस्मसात झाल्या होत्या. या घटनेत निलेश पांचाळ, संतोष मदभावे, पांडुंरंग गायकवाड, मगनलाल भाटी, गणेश कर्वे, उमेश रावलेकर, मिलिंद धर्माधिकारी, रवीकुमार नायर, संजय वैराट यांच्या दुचाकींची राख झाली आहे.

बॅंकेची मुख्य शाखा फोडून एक कोटी पळवले

0

धुळे – शहरात सुरू असलेल्या चोरट्यांच्या धुमाकुळाने आज (शनिवार) कळसच गाठला. येथील गल्ली नंबर पाचमधील बडोदा बॅंकेची मुख्य शाखा फोडून एक कोटी पळवून नेल्याचे उघड होत आहे. बॅंक अधिकारी व पोलिस तपास करीत असून, नेमका आकडा किती हे चौकशीअंती गुन्हा दाखल झाल्यावर समजेल.
धुळे शहरात चोरट्यांनी हैदोस मांडला असून, काल (16 जानेवारी ) एकाच रात्रीत भरवस्तीतून सहा दुकाने फोडली. त्यानंतरही पोलिसांनी हालचाली न केल्याने चोरांचे धाडस वाढल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत धुळे शहरातील सुस्तावलेली पोलिस यंत्रणा आणि जवळजवळ बंद झालेल्या “पेट्रोलिंग‘मुळे चोरट्यांचे फावत आहे.

अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेच्या पुणे शहर जिल्हा अध्यक्षपदी मनोज पटेलिया यांची नियुक्ती

0

manoj

अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेच्या पुणे शहर जिल्हा अध्यक्षपदी मनोज पटेलिया यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीचे पत्र अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपिन कुमार यांनी दिले .

  मनोज पटेलिया यांनी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष काम केले आहे . भारतीय सफाई कामगार स्वछ संघटन पुणे शहर अध्यक्षपदी काम केले आहे . मेहेतर वाल्मिकी विकास संस्था वधू – वर सूचक समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष , खान रोड बेडा पंचायत पंचप्रमुख आणि अन्य संघटनावर कार्यरत आहे . आदी संघटनावर काम केले आहे .

   त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांनी सांगितले , या पदाच्या माध्यमातून समाजासाठी विशेष कार्यरत राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली .  सफाई कामगाराचे प्रश्न सोडविणार आहेत , असे त्यांनी सांगितले .

0

<

‘कॅशलेस’चे उपचार करण्याबाबत रुग्णांची हेळसांड पुण्यात सुरूच …

0

पुणे –
‘कॅशलेस’चे उपचार करण्याबाबत  रुग्णांची हेळसांड पुण्यासारख्या प्रगत म्हणविणार्या शहरात सुरूच असून अद्याप सरकार त्यातून मार्ग काढू शकलेले नाही तब्बल सव्वा महिन्यांपासून हॉस्पिटलचालकांसह प्रसारमाध्यमांकडून संपर्क साधल्यानंतर विमा कंपन्यांचे अधिकारी दाद देत नव्हते. बैठकीनिमित्ताने प्रथमच आमने सामने आलेल्या हॉस्पिटल असोसिएशनचे डॉक्टर आणि विमा कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकीनंतर त्यांच्यात ‘कॅशलेस’च्या दर निश्चितीवरून वादावादी झाली. अखेर विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनीच आपल्याला बोलण्याचे अधिकार नाही असे म्हणून काढता पाय घेतला.
‘विमा कंपन्यांकडे असलेले तज्ज्ञ हे प्रॅक्टिसिंग डॉक्टर नसल्यानेच त्यांना वाटेल ते दर निश्चित करतात,’ असा आरोप करून ‘एम्स’च्या डॉक्टरांकडून दर ठरविले जातात का, असा सवालही डॉक्टरांनी विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना केला. त्यावर ‘आम्ही स्वतः दर न ठरविता कंपन्यांचे अधिकारी ठरवितात. देशातील दहा शहरांमध्ये अशा प्रकारचे दर निश्चिती करण्यात आली आहे. त्याच दरानुसार त्या ठिकाणी ‘कॅशलेस’ सेवा-सुविधा सुरू आहे. मग पुण्यात निश्चित केलेल्या दरानुसार हॉस्पिटलना ‘कॅशलेस’चे उपचार देण्याबाबत अडचण काय,’ असा सवाल विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
पत्रकार परिषदेनंतर प्रसारमाध्यमांनी विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. विमा कंपन्यांचे धोरण काय, हॉस्पिटलना ‘कॅशलेस’चे दर मान्य का नाहीत, असा सवाल अधिकाऱ्यांना केला. त्या वेळी ‘याबाबत आम्हाला भाष्य करण्याचे अधिकार नाहीत, विमा कंपन्यांच्या ध्येय-धोरण, दरनिश्चितीबाबत कंपनीचे अध्यक्षच माध्यमांशी बोलू शकतात.’ असे के. केदारेश्वरन यांनी सांगितले.
शहरातील ८० हॉस्पिटलकडून कॅशलेस सेवा स्वीकारण्यात आली आहे. त्यापैकी ४१ हॉस्पिटलशी आमचे करार झाले आहेत. अन्य काही हॉस्पिटलांनी सध्या अंमलबजावणी केली नाही, तर उर्वरित हॉस्पिटलकडून आम्हाला सहकार्य मिळत नसल्यानेच ‘कॅशलेस’चा वाद झाला. त्यामुळे वरिष्ठांकडून पुण्यातील ‘कॅशलेस’ सेवा खंडित करण्याचे आदेश देण्यात आल्याचे विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी जावडेकर यांना बैठकीत सांगितले.

चाळीस मायक्रॅानपेक्षा जास्त जाडीच्या प्लॅस्टिकवर सरकार कडक कारवाई करणारः जावडेकर

0

 

लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे आयोजित लायन्स इन्व्हॅारन्मेंट एक्स्पोचे उदघाटन संपन्न

1

पुणे : “चाळीस मायकॅानपेक्षा जास्त जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांची निर्मिती करणा-या उत्पादकांनी स्वतःहून उत्पादन बंद करावे अन्यथा सरकार त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करेल” असा इशारा केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिला. सध्या शहरात प्लस्टिकचा कचरा उग्र स्वरुप धारण करित आहे. चाळीस मायक्रॅानपेक्षा कमी जाडीचे प्लस्टिक वापरण्याचा कायदा आहे. मात्र, त्याची आजपर्यंत योग्य व कठोर अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी नमुद केले.

‘लायन्स क्लब इंटरनॅशल 2015’ तर्फे ‘साखर संकुल, ‘ येथे आयोजित ‘लायन्स इन्व्हॅारन्मेंट एक्स्पो’ चे उध्दघाटन प्रसंगी ते बोलत होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन हसमुख मेहता लायन, इंटरनॅशनल डायरेक्टर लायन राजु मनवानी, कार्यक्रमाचे समन्वयक बाळासाहेब पाथरकर, डिस्ट्रिक्ट गर्व्हेनर लायन विक्रांत जाधव, जलसंपदा अधिक्षक अभियंत अतुल कपोले, पर्यावरण नियंत्रण मंडळाचे सचिन दत्तात्रय देवळे, लायन चंद्रहास शेट्टी, लायन अशोक मिस्त्री, हे उपस्थित होते. ते म्हणाले, “लायन्स क्लब पर्यावरण प्रदर्शनामध्ये पर्यावरण प्रदुषण रोखण्यासाठीच्या अनेक नाविन्यपुर्ण वस्तु बनविलेल्या आहेत. कदाचित त्यातून एक चांगली पर्यावरण चळवळ उभी राहु शकेल. पुणे शहरात दररोज पंधरा हजार टन कचरा जमा होतो त्यापैकी केवळ नऊ टन कचरा उचलला जातो. सहा हजार टन कचरा प्रति दिन शिल्लक पडून राहिल्याने वर्षाभरात वीस लाख टन कचरा शहरात तसाच शिल्लक राहिला जात आहे. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक कचरा सर्वाधिक आढळतो. सर्वांना उपयुक्त व किफायतशीर अशा सोलर ऊर्जेच्या माध्यमातून एक लाख मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे ध्येय केंद्र सरकारने ठेवले आहे. दहा रुपयांमध्ये एलईडी बल्ब मिळवून देण्याची सुरुवात पंतप्रधानांनी केली असून तोही वीज बचतीचाच एक भाग आहे. लायन्स क्लब नेहमीच सेवाभावी कार्य करण्यासाठी सर्वात आगोदर पुढे येणारी संस्था आहे. त्यांना सरकार नेहमीच सोबत घेऊन काम करेल.”

ते पुढे म्हणाले, “प्रत्येक व्यक्ती, संस्था, सर्व स्तरावरील शासन, शासनकर्ते, स्वयंसेवी संस्था व प्रशासन यांनी आपल्या पासून पर्यावरण प्रदुषण कमी करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संवर्धन व जनजागृती करावी. पाणी, हवा, ध्वनी यासारख्या प्रदुषणाबाबत नागरिकांनी सतर्क रहावे. प्रदुषण नियंत्रणावरील नाविन्यपुर्ण व उपक्रमशील प्रयोग समोर यायला हवेत. त्यास शासन मदत व सहकार्य करेल. नवी स्मृतीवने व देवराई उभारणे काळाची गरज झाली आहे.” या प्रसंगी जावडेकर यांनी प्रदर्शनास पाहणी केली. प्लॅस्टिकच्या कच-यापासून तेल बनविणे, बटाट्यापासून वीजनिर्मिती, कच-यापासून इंधन निर्मिती यासारख्या प्रदर्शनामधील नाविन्यपुर्ण प्रयोगांची त्यांनी दखल घेतली. या प्रसंगी देबी गोएंगा(कॅान्झर्रवेशन अॅक्शन ट्रस्ट) व सुमैरा अब्दुलाई(आवाज फाऊंडेशन) या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले.

नागरिकांना पर्यावरणीय विषयांवर आधारित विद्यार्थी व स्वयंसेवी संस्था यांनी बनविलेल्या वस्तु आणि उपकरणे पाहण्याची संधी १७ व १८ तारखेपर्यंत प्रदर्शन साखर संकुल, शिवाजीनगर येथे असणार आहे.

लायन बाळासाहेब पाथरकर यांनी प्रस्ताविक केले. लायन हेमंत नाईक यांनी सुत्रसंचालन केले. लायन हसमुख मेहता यांनी आभार व्यक्त केले.

———————————————————————————————-

प्रकाश जावडेकरांच्या भाषणामधील ठळक मुद्देः

1) मुठा नदीमध्ये जल वाहतुक कधी सुरु होणार. असा प्रश्न त्यांनी महापालिकेला केला.

2) नदी सुधार योजना गेल्या पन्नास वर्षापासून मी ऐकत आलो आहे. मात्र, नदी सुधार काही झाली नाही. हजारो-करोडो रुपये फक्त त्यावर खर्च झाले.

3) हंजर, हंजर, हंजर…हंजर म्हणजे आता काही तरी जादु करणार असे वाटले होते. त्याकडे अनेकजण डोळे लावून बसले होते. पण कुठे आहे हंजर. तेच पळून गेले.

4) वारजे येथील मोकळ्या वन जमीनीवर नागरिकांच्या सहकार्याने मॅाडेल जंगल/वन निर्माण करण्याचे काम मी हाती घेणार आहे.

5) एक कलर, एक कोड व एक क्रमांक अशी माहिती असलेला फलक नागरिकांना हवा प्रदुषणाबाबत माहिती देण्यासाठी गल्लोगल्ली करण्यात येणार आहे.

६) कचरा उचलण्यासाठी कचरा कुंडी असली पाहिजे व ती आमच्या दारात नको, अशी आज सर्वांची अवस्था झाली आहे असे ते म्हणाले.

———————————————————————————————-

अंधश्र ध्दा पसरविणाऱ्या चित्रपटांना सरकारचा आशीर्वाद — सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांनी दिला राजीनामा

0

नवी दिल्ली-

सेन्सॉर बोर्डाने अडवलेल्या ‘एमएसजी: मेसेंजर ऑफ गॉड’ या वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनाला लवादानं मान्यता दिल्यानं संतापलेल्या सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
डेरा सच्चा सौदा या कथित अध्यात्मिक संस्थानाचे प्रमुख व स्वयंघोषित संत गुरमीत रामरहीम सिंग इन्सान यांनी ‘एमएसजी’ हा चित्रपट बनवला आहे. स्वत: राम-रहीम यांची यात भूमिका आहे. रामरहीम देव असल्याचा प्रचार यात असल्याने तसेच अनेक चमत्काराची पेरणी असल्यानं सेन्सॉर बोर्डानं चित्रपटास आक्षेप घेतला होता. हा चित्रपट अंधश्रद्धा पसरवतो तसंच त्यामुळं धार्मिक भावना भडकू शकतात, असं मत नोंदवत बोर्डानं हा चित्रपट लवादाकडं पाठवला होता.
लवादानं या चित्रपटाला हिरवा कंदील दाखवल्याचं वृत्त आहे. या वृत्तानंतर सॅमसन यांनी राजीनामा देण्याचं ठरवलं आहे. ‘एमएसजीच्या प्रदर्शनाला मंजुरी मिळाल्याचं मी ऐकलं आहे. त्याबाबत अद्याप लेखी माझ्यापर्यंत काहीही आलेलं नाही. हा निर्णय म्हणजे सेन्सॉर बोर्डाची थट्टाच आहे. मी राजीनाम्याचा निर्णय सरकारला कळवला आहे,’ असं सॅमसन यांनी सांगितलं.
सेन्सॉरच्या कामात सरकारी हस्तक्षेप, दबाव आणि भ्रष्टाचार हे राजीनाम्याचं कारण असल्याचं सॅमसन यांनी सांगितलं.
‘एमएसजी’च्या मंजुरीत सरकारची कोणतीही भूमिका नाही. सेन्सॉरच्या कामात सरकारच्या कोणत्याही व्यक्तीनं हस्तक्षेप केलेला नाही किंवा कोणताही दबाव आणलेला नाही. लीला सॅमसन यांचं तसं म्हणणं असेल तर त्यांनी पुरावा द्यावा,’ असं माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांनी सांगितलं. ‘सेन्सॉर बोर्डाच्या सर्व सदस्यांची नियुक्ती मागील सरकारच्या काळात झालेली आहे. आम्ही एकही नवा सदस्य नेमलेला नाही, असं ते म्हणाले. याउलट, लीला सॅमसन या अध्यक्षपदाची जबाबदारी गांभीर्यानं पार पाडत नव्हत्या. गेल्या काही महिन्यांत त्या फक्त एकदाच कार्यालयात आल्या होत्या, अशी आमची माहिती असल्याचंही राठोड यांनी स्पष्ट केलं.
पंजाबमध्ये एमएसजीवर बंदी
चित्रपट लवादानं एमएसजीला हिरवा कंदील दिल्याचे वृत्त असले तरी पंजाबमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर अघोषित बंदी घालण्यात आली आहे. पंजाबमधील चित्रपटगृहांनी एकमतानं हा निर्णय जाहीर केला आहे.

‘एलिझाबेथ’, ‘किल्ला’चा पिफमध्ये झेंडा

0
1
पुणे-  ‘एलिझाबेथ एकादशी‘ आणि ‘किल्ला‘ या चित्रपटांनी राज्य सरकारच्या ‘संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा‘वर, तर ‘बिहेवियर‘ने (क्‍यूबा) प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरले. तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची गुरुवारी उत्साहात सांगता झाली.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांत ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि ‘यलो’ या सिनेमांनी बाजी मारली. ‘एक हजाराची नोट’ सिनेमातील भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला
गेल्या आठवड्यापासून पुण्यात रंगलेल्या ‘पिफ‘चा समारोपही तितक्‍याच शानदार वातावरणात गुरुवारी झाला. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते महोत्सवातील या पुरस्कारांचे वितरण झाले. दिग्दर्शक डेनेक टीक (झेक प्रजासत्ताक) यांना ‘लाइक नेव्हर बिफोर‘ चित्रपटासाठी आणि अलेक्‍झांडर कॉट (रशिया) यांना ‘टेस्ट‘ या चित्रपटासाठी विभागून ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. तसेच, संगीतकार आनंदजी शहा यांना ‘एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कारा‘ने गौरविण्यात आले. महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, दिग्दर्शक ख्रिस्तोफ झानुशी (पोलंड), अभिनेते डॉ. मोहन आगाशे, नाटककार सतीश आळेकर, समर नखाते उपस्थित होते. 
तावडे म्हणाले, ‘‘मराठी चित्रपटांना पुढे आणण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. चित्रपटांसमोरील समस्या सोडविल्या जातील. दादासाहेब फाळके चित्रनगरीचे रूपही लवकरच बदलले जाईल. तेथे विविध भागांतील दिग्दर्शकांना चित्रपट निर्मितीसाठी योग्य वातावरण निर्माण केले जाईल.‘‘ 
शहा म्हणाले, ‘‘एस. डी. बर्मन यांचा लहानपणापासून मी चाहता आहे. त्यांचे गाणे डोळे बंद करून ऐकले तरी चित्र समोर उभे राहते, इतकी ताकद त्यांच्या गाण्यात होती. त्यांच्या नावाचा पुरस्कार खरोखरीच प्रेरणादायी आहे.‘‘ 
कल्याणजी- आनंदजी जोडीतील आनंदजी शहा यांची ओळख करून देणारी चित्रफीत या वेळी दाखविण्यात आली. त्यात त्यांच्या वेगवेगळ्या गाण्यांबरोबरच ‘पग घुंगरू नाचे…‘ या गाण्याचाही समावेश होता; पण ही चूक सांस्कृतिक मंत्री असलेले तावडे यांनी बरोबर ओळखली. ‘‘हे गाणे आनंदजी यांचे नसून बप्पी लहरी यांचे आहे. मी सांस्कृतिक मंत्री आहे, त्यामुळे मला या क्षेत्रातले कळते, हे आता तुम्हालाही कळले असेल,‘‘ अशी कोटीही तावडे यांनी केली. 
राज्य सरकारचे भरघोस अनुदान मिळणारा ‘पिफ‘ पुढील वर्षापासून मुख्यमंत्र्यांच्या शहरात, अर्थात नागपूरमध्येही भरणार आहे. डॉ. पटेल यांनीच तशी घोषणा केली. त्यानंतर तावडे यांनी नागपूरमध्ये महोत्सव होणार, ही चांगली बाब आहे. यासह अनेक शहरांत, तालुक्‍यांतील रसिकांनाही चित्रपटांची भूक असते, त्यांनाही यात कसे सामावून घेता येईल, याचा विचार व्हावा, अशी सूचना केली.
 
सर्वोत्तम पारितोषिके पुढीलप्रमाणे-

“फोक्‍सवॅगन इंटरनॅशनल स्टुडंट्‌स कॉम्पिटिशन- लाइव्ह ऍक्‍शन‘-
चित्रपट : “सनी‘ (जर्मनी)
दिग्दर्शन : सोफिया ग्विलर (रशिया)
छायाचित्रण : जू हुजी (चीन)
ऑडिओग्राफी : एफटीआयआय (पुणे)
भारतीय ऍनिमेशन चित्रपट : “मगरवासी‘
आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन चित्रपट : “हॅरॉल्ड‘ (जर्मनी)

“पिफ‘ विशेष पारितोषिक- एफटीआयआयच्या अंतिम वर्षाचा (दिग्दर्शन) विद्यार्थी सार्थक भसिन याला.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट दिग्दर्शक : भाऊराव खराडे (चित्रपट- ख्वाडा)
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी अभिनेत्री : उषा नाईक (चित्रपट- एक हजाराची नोट)

पिफ-2015 सर्वोत्तम मराठी चित्रपट (प्रेक्षकांची पसंती) : “सलाम‘

एमटीडीसी लघुपट स्पर्धा-
अ) कल्चर ऑफ महाराष्ट्र “ओडिसी-अनफोल्डिंग महाराष्ट्रा‘ (प्रथम), “संगीत गोविंद गौरव‘ (द्वितीय), “इन्स्पिरेशन ऑफ कोल्हापूर‘ (तृतीय)
ब) नॅचरल हेरिटेज
“निघोज‘ (प्रथम), “द एनिग्मा ऑफ लोणार‘ (द्वितीय), “द सिल्व्हर-गोल्डन बीच‘ (तृतीय)
क) मॅन मेड हेरिटेज “सिरेंडिपिटी‘ (प्रथम), “ऍडोरेबल लिटल हॅम्लेट-वाई‘ (द्वितीय), “केदारेश्‍वर टेंपल‘ (तृतीय)

स्पेशल ज्यूरी ऍवॉर्ड : टिझीटा हेगेअर (बालकलाकार, इथिओपिया)
द स्पेशल मेन्शन : सॅमन्था कॅस्टिलो (अभिनेत्री, व्हेनेझुएला) व मुश्‍फिक हातामोव्ह (निर्माता, अझरबैजान)

पिफ-2015 सर्वोत्तम जागतिक सिनेमा (प्रेक्षकांची पसंती) : “टेस्ट‘ (रशिया)

पालिकेतील अधिकाऱ्यांचे सोशल ऑडिट करा “सेव्ह पुणे इनिशिएटिव्ह’ ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

 

पुणे :
ओमप्रकाश बकोरिया यांच्या बदलीसाठी धावपळ करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेतील सर्वच अधिकाऱ्यंाच्या कामांचे, कार्यकाळाचे “सोशल ऑडिट’ करावे, अशी मागणी “सेव्ह पुणे इनिशिएटिव्ह’ ने केली आहे. संस्थेच्या वतीने अध्यक्ष दीपक बिडकर, सचिव ललित राठी यांनी ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पुणे महानगरपालिकेत अनेक अधिकारी आपल्या पदांवर वर्षानुवर्षे चिकटून आहेत. काही अधिकारी राजकीय व्यक्तींचे नातेवाईक, निकटवर्तीय म्हणून वावरतात, तर काही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रूजू न होता मूळ खात्यात काम करत राहतात. या सर्व प्रशासकीय अनागोंदीचे “सोशल ऑडिट’ करून आयुक्तांना तो जाहीर करण्याचे आदेश द्यावेत, असे या पत्रात म्हटले आहे.
“राजकीय पदाधिकाऱ्यांनी कार्यक्षम अधिकाऱ्यांना कामाची मोकळीक द्यावी, हितसंबंधांसाठी शहर हिताला वेठीस धरू नये’ असेही आवाहन संस्थेने पुण्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना केले आहे.

वृक्ष प्राधिकरणा वरील अपात्र नियुक्त्या ठरणार बेकायदेशीर २० सप्टेबर २०१३ नंतर झालेली वृक्षतोड बेकायदेशीर ठरणार अवमान याचिकेवर म्हणणे मांडण्यास पालिकेला उच्च न्यायालयाने दिली अखेरची संधी

0

 

 

पुणे :
वृक्ष प्राधिकरणा वरील सदस्य नियुक्ती प्रकरणी पुणे मनपाच्या वृक्ष प्राधिकरणाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याच्या याचिकेवर  ३१ जानेवारी पूर्वी आयुक्त आणि वृक्ष अधिकाऱ्याने प्रतिज्ञा पत्राद्वारे म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे .

पुण्यातील वृक्षप्रेमी दीपक वहिकर,विनोद जैन ,वैभव गांधी  यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे . . ए एस ओक आणि ए के मेनन यांच्या खंडपीठाने निर्णय दिला . दीपक वहिकर,विनोद जैन ,वैभव गांधी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याबद्दल ची जनहित याचिका दाखल केली होती . ६ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी आणि अंतिम निकाल होईल . एड राहुल बोरा आणि हर्षद मांडके यांनी जैन यांच्या वतीने बाजू मांडली

पुणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणावर १५ सदस्यांची समिती करावी ,त्यातील सात नगरसेवक शास्त्र विषय पदवीधर  असणाऱ्यांना प्राधान्य द्यावे ,विशेष ज्ञान असलेल्या सदस्यांना  घ्यावे, अशासकीय संस्था सामाजिक वनीकरण मध्ये नोंदलेल्या घ्याव्यात   हे ३ महत्वाचे आदेश २० सप्टेबर २०१३ ला उच्च न्यायालयाने दिले होते. हे तीन आदेश डावलून पालिकेने २७ सदस्यांचे वृक्ष प्राधिकरण तयार केले केले . त्यात अपात्र सस्न्था पदाधिकारी आणि सदस्यांची भरती बेकायदेशीर रित्या केली .

‘लय भारी’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर २५ जानेवारीला झी मराठीवर …

0

 

आपला हात भारी.. आपली लाथ भारी.. आपलं सगळंच लय भारी म्हणत अवघ्या महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकुळ घालणारा चित्रपट म्हणजे लय भारी’. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक गोष्टी मराठीमध्ये प्रथमच घडल्या. हिंदी चित्रपटसृष्टीतला लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखने याद्वारे मराठीत पदार्पण केलं. मराठीत पहिल्यांदाच बिग बजेट आणि अॅक्शनपॅक्ड सिनेमा बघायला मिळाला. मराठीत प्रथमच जिनिलीया डिसूझा-देशमुख एका गाण्यावर थिरकतांना दिसली तर बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान चक्क मराठीत डायलॉगबाजी करताना दिसला. या सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली गोष्ट म्हणजे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलेली रेकॉर्डब्रेक कमाई. मराठी चित्रपटांचे आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत या चित्रपटाने तब्बल चाळीस कोटी रूपयांची कमाई केली. एकंदरीत सर्वच बाबतीत लय भारी”  ठरलेल्या या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर येत्या  २५ जानेवारीला प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या “लय भारी” वाहिनीवर म्हणजेच झी मराठीवर सायंकाळी वा. तत्पूर्वी लय भारी’च्या मेकिंगची धम्माल दाखवणारा एक  कर्टन रेजरचा भागही ६.३० ला प्रसारित होणार आहे.

लय भारी”ही कथा आहे माऊलीची. यात रितेशने साकारलेल्या भूमिकेचं नाव माऊली आहे तसंच ही कथा त्याच्या माऊलीच्या म्हणजेच आईच्या प्रेमाची आहे आणि तेवढीच ती अवघ्या महाराष्ट्राची माऊली असणा-या विठु माऊलीच्या भक्तीचीही आहे. या दोन्ही माऊलींच्या सन्मानासाठी लढणारा नायक माऊली यातून प्रेक्षकांना बघायला मिळाला आणि अवघ्या महाराष्ट्राने या माऊलीला डोक्यावर उचलून धरले. यातला नायक जेवढा लोकप्रिय झाला तेवढीच लोकप्रियता यातील खलनायकालासुद्धा मिळाली. हा खलनायक साकारला होता हिंदी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेता शरद केळकरने. याशिवाय चित्रपटात तन्वी आझमी, उदय टिकेकर, संजय खापरे, आदिती पोहनकर आणि राधिका आपटे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.  चित्रपटात  अॅक्शनचा मसाला असला तरी तो नुसता अॅक्शनपट न उरता कथा आणि पटकथेच्या पातळीवरही तो आशयपूर्ण आणि प्रभावी बनवण्याचं काम दिग्दर्शक निशिकांत कामतने केलं. लय भारी’च्या डायलॉग्स आणि अॅक्शनइतकीच लोकप्रिय ठरली ती यातील अजय-अतुल यांनी संगितबद्ध केलेली गाणी. विशेषतः विठु माऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या वारक-यांच्या उत्कटतेचं दर्शन घडवणारं माऊली माऊली” या गाण्याने तर अवघा महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन निघाला.

एकंदरीत प्रेम, अॅक्शन, गाणी, नृत्य, मैत्री, भक्ती असा मनोरंजनाचा देमार मसाला असलेला हा लय भारी” चित्रपट आता छोट्या पडद्यावरही धुमाकुळ घालण्यास सज्ज झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख मिळवून देणा-या यालय भारी”चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयर रंगणार आहे  रविवारी २५ जानेवारीला सायंकाळी ७. वा. फक्त झी मराठीवर.