Home Blog Page 3631

ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून विद्युत कायद्यात सुधारणा सूचवू – ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे

0

मुंबई,  :-

विद्युत अधिनियम 2003 मध्ये सुधारणा करण्याचे केंद्र शासनाने प्रस्तावित केलेले आहे. याबाबत

ग्राहकहित डोळ्यासमोर ठेऊन लवकरात लवकर राज्य शासनाकडून सूचना पाठविण्यात येणार आहेत, अशी

माहिती राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत दिली.

विद्युत अधिनियम 2003 मधील सुधारणांबाबत राज्याची भूमिका समजाऊन घेण्यासाठी खासदार

किरीट सोमय्या ना. बावनकुळे यांना मुंबईत भेटले. तेव्हा ना. बावनकुळे यांनी राज्याची भूमिका स्पष्ट केली.

“विद्युत सुधारणा बील 2014” च्या अनुषंगाने अभ्यास करून संसदेला अहवाल सादर करण्याची जबाबदारी

श्री. सोमय्या यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

याबाबत सविस्तर अभ्यास करून किमान वेळेत राज्याची भूमिका केंद्राकडे स्पष्ट केली जावी, असे निर्देशही ना.

बावनकुळे यांनी या बैठकीत प्रधान सचिव ऊर्जा आणि तिनही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिले.

या प्रसंगी ऊर्जा सचिव श्री. मुकेश खुल्लर, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ओम प्रकाश गुप्ता,

महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन श्रीमाळी व महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव

कुमार मित्तल इत्यादी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांनी महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपन्यांत सुरूं असलेल्या

विविध कामांचा आढावाही घेतला व कालबध्द मुदतीत ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

नवीन कृषीपंप वीजजोडणीच्या फर्म कोटेशनसाठी संपर्क करा

0

पुणे, : पुणे परिमंडलातील कृषीपंपाच्या नवीन वीजजोडणीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर

ज्या कृषीपंपधारकांना डिमांड नोट (फर्म कोटेशन) मिळालेली नाही त्यांनी संबंधीत उपविभाग

कार्यालयांत दि. 25 फेब्रुवारीपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन महावितरण केले आहे.

कृषीपंपाच्या नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करूनही अद्याप (डिमांड नोट) फर्म कोटेशन

मिळालेले नाही, अशा तक्रारी असणार्‍या कृषीपंपधारकांना फर्म कोटेशन देण्यात येणार आहे. त्यानंतर

कृषीपंपधारकांना शक्य तेवढ्या लवकर नवीन वीजजोडणी देण्याचा महावितरणकडून प्रयत्न करण्यात येणार आहे

कृषीपंपाच्या नवीन वीजजोडणीसाठी अर्ज सादर केल्याचा पुरावा (अर्जावरील महावितरणचा

शिक्का) सादर करणे आवश्यक आहे. पुणे परिमंडलातील अशा कृषीपंपधारक शेतकर्‍यांनी संबंधीत

उपविभाग कार्यालयात दि. 25 फेब्रुवारीपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्वर्गीय मंगला किसन मोतेवार यांच्या स्मरणार्थ ” कन्या धन योजना ” सुरु

0

समृद्ध जीवन फाऊडेशनवतीने

 स्वर्गीय मंगला किसन मोतेवार यांच्या स्मरणार्थ

गरीब . गरजू , होतकरू , अनाथ मुलीसाठी ” कन्या धन योजना ” सुरु

 

समृद्ध जीवन फाऊडेशनवतीने स्वर्गीय मंगला किसन मोतेवार यांच्या स्मरणार्थ ” कन्या धन योजना ” सुरु करण्यात आली . कन्या धन योजना चंद्रकांत वायकर यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आली .

   बिबवेवाडीमधील  प्रियदर्शिनी शिक्षण संस्थेमधील गरीब . गरजू , होतकरू , अनाथ मुलीचे शिक्षण चांगल्या पध्दतीने होऊन त्याचे शिक्षण उच्च पदवीधर होण्यासाठी आम्ही पहिलीमधील मुलींना प्रत्येकी २५० रुपये महिना असे आम्ही भरणार आहोत . दहा मुलींसाठी महिन्यास अडीच हजार  रुपये भरणार आहोत . बारावी पास झाल्यानंतर प्रत्येकीस एक लाख रुपये देण्यात येणार आहे . खऱ्या अर्थाने गरिबाचे शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून ते त्या मुलींचे भविष्य घडवू शकतात . हा संकल्प आज आम्ही समृध्द जीवन फाऊडेशनचे अध्यक्ष डॉ. महेश मोतेवार यांच्या आशीर्वादाने सुरु करत आहे . या कार्यक्रमास आमचे पालक म्हणून सौ. वर्षा वायकर , वैशाली जाधव , रंजना राठोड , ज्योती गायकवाड , तुळसा कदम , मोना राठोड  ,राजेश चव्हाण , शोभा बढेकर  तसेच , प्रियदर्शिनी शिक्षण संस्थेचे संस्थापक शशिकला कुंभार , महेश कुंभार  तसेच , सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब रासकर , दादासाहेब सांगळे उपस्थित होते .

वानवडी येथे अॅथलॅटिक्स स्पर्धा संपन्न- अठराशे खेळाडूंचा सहभाग

0

2 3

 

पुणे: शशी सेवा संघटना व मोगरे मित्रमंडळ यांच्यातर्फे अॅथलॅटिक्स स्पर्धेचे आयोजन वानवडी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या होतकरु खेळाडूंच्या पुढील शिक्षणाची जबाबादारी संघटनेने घेतली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना व खेळाडूंना खेळाचे व्यासपीठ मिळावे यासाठी या अॅथलॅटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक फोरमचे अध्यक्ष निवृत कमांडर एस.अग्रवाल, लक्ष्मण सरोदे, श्रीमती सुजाता गायकवाड, निवृत्त कर्नल एल.एस.शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

या स्पर्धेमध्ये परिसरातील अठराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. पन्नास मिटर, शंभर मिटर धावणे, बिस्किट खाणे, रिले, सायकल चालविणे, संगीत खुर्ची यासारख्या व इतर अनेक नाविन्यपुर्ण स्पर्धांचा सहभाग करण्यात आला होता.

स्पर्धेतील विजेते खेळाडूंचा सत्कार नगरसेविका डॉ.किरण मंत्री, नगरसेवक किरण गरमकर व माजी नगरसेवक मनिष साळुंके यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी विवेक शिंदे, विनोद मोगरे, तात्या शेंडकर, सलिम बागवान, सचिन मथुरावाला, अजय शिंदे उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या खेळांडूंना शालेय वस्तुंचे वाटप, महिलांना गृहपोयोगी वस्तु बक्षिस म्हणुन देण्यात आल्या. विद्यार्थी, नागरिक, महिला व ज्येष्ठ नागरिक यांनी या स्पर्धेस उत्साहाने अतिशय चांगला प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे संयोजन भाजप युवा मोर्चाचे उपशहराध्यक्ष अॅड. राहुल बोराडे यांनी केले होते.

दे धम्माल ‘कट्टी-बट्टी’ प्रदर्शनासाठी सज्ज

0

 

सध्या प्रसारमाध्यमांच्या विशेषत: टीव्ही वाहिन्या , इंटरनेट यांच्या वाढत्या प्रभावामुळे सध्या मुले अकालीच प्रौढ होत आहेत.या कळत्या – नकळत्या वयाच्या सीमा रेषेवर त्यांच्या भोवतीची आकर्षणही वाढता आहेत

पौंगडावस्थेतील मुलांना अनेक मानसिक व शारीरिक बदलांना सामोरे जावे लागते आणि त्या सगळ्या गोष्टीत ते त्यांचे बालपण हरवून बसतात,नवनवीन गोष्टीत गुंतण्याच्या ह्या वयात चांगल्या वाईटाचे भान सुटून जाते आणि आयुष्य घडवण्याच्या ऐन उमेदीच्या काळात ते मानसिकरित्या खचतात आणि ह्या सगळ्यातून त्यांना अलगद बाहेर काढणे हे खूप महत्वाचे असते.गाठ सोडवताना गुंता अधिक वाढणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते आणि नेमके ह्या परिस्थितीत पालक म्हणून आपली काय जबाबदारी आहे किंवा आपण काय भूमिका घेतली पाहिजे हे स्पष्टपणे मांडणारा ‘शिवम क्रिएशन’चा युवराज पवार निर्मित  राजेंद्र पवार दिग्दर्शित कट्टी-बट्टी हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

‘शाळा’ चित्रपटातून विशेष लोकप्रियता मिळालेल्या ‘सु-या’ म्हणजेच केतन पवारची  दे धम्माल भूमिका हे या चित्रपटाचे ठळक वैशिष्ट्य.त्याच्यासोबत प्रीतम भुजबळराव, प्राजक्ता यादव ही सध्या युवा रंगभूमीवर नावजलेली नवी जोडी आहे. तसेच त्यांच्यासोबत अरुण नलावडे,डॉ.विलास उजवणे,संजीवनी जाधव, जयराज नायर, दीपज्योती,प्रभाकर मोरे, महेंद्र अभंग, दिपाली कुलकर्णी असा अनुभवी कलाकारांचा संच आहे.

सुजित महतो यांचे छायांकन लाभलेल्या ‘कट्टी-बट्टी’ची गुरु ठाकूर यांनी लिहलेली सुरेल प्रसन्न गीते युवा संगीतकार प्रवीण कुंवर यांनी संगीतबद्ध  केली असून स्वप्नील बांदोडकर,केतकी माटेगावकर,प्रवीण कुंवर,योगिता चितळे, अभिजित सावंत. गंधार आणि वैशाली सामंत यांच्या सुरेल स्वरात ती स्वरबद्ध करण्यात आली आहेत. येत्या काही दिवसातच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित होईल.

प्रत्येक मुलाला आणि पालकांना आपला वाटेल असा हा नर्मविनोदी चित्रपट लोकप्रिय ठरले असा दृढ विश्वास या चित्रपटाच्या टीमला आहे.

कॉंग्रेस भवनाच्या अमृतमहोत्सवानिमित पुणे कॅम्प भागात ” प्रभात फेरी “

0

 

 1

     ऐतिहासिक कॉंग्रेस भवनाच्या अमृतमहोत्सवानिमित पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्यावतीने पुणे कॅम्प भागात ” प्रभात फेरी ” काढण्यात आली . या प्रभातफेरीची सुरुवात ईस्ट स्ट्रीटवरील व्हिक्टरी टोकीजपासून करण्यात आली . पुढे इंदिरा गांधी चौक , वोल्गा चौक , खाण्या मारुती चौक , ट्राय हॉटेल चौक , महात्मा गांधी रोड  , १५ ऑगस्ट चौक , मोहम्मद रफी चौक , कोहिनूर हॉटेल चौक , महावीर चौक , डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रभात फेरीची सांगता झाली .

  या प्रभात फेरीमध्ये पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय छाजेड , विश्वजित कदम , माजी गृहराज्यमंत्री  रमेश बागवे , नगरसेवक अविनाश बागवे , रमेश अय्यर , संगीता तिवारी , नगरसेविका लता राजगुरू , लक्ष्मी घोडके , नगरसेवक सुधीर जानजोत , मुख्तार शेख , असिफ शेख , सुजित यादव , केविन मेनवेल , विठ्ठल थोरात , क्लेमंट लाझरस , विनोद सोलंकी , अरुण गायकवाड , सादिक लुकडे , अझीम गुडाकुवाला . इस्माइल चौधरी , संगीता पवार , मंजूर शेख , मधुकर चांदणे , वाल्मिक जगताप , बाळासाहेब घोडके . लतेन्द्र भिंगारे व मोठ्या संख्येने कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते .

    यावेळी कॉंग्रेस पक्षाचे ध्वज , डोक्यावर पांढरी  टोपी घालून सार्वजन सहभागी झाले होते . यावेळी देशभक्तीपर गाणी गाण्यात आली .

लष्कराने लोखंडी अडथळे हटविले-घोरपडी भागातील बंद रस्ते खुले …

0

1

 

पुणे लष्कर भागातील घोरपडी भागातील लष्कराने बंद केलेले रस्ते आजपासून खुले करण्यात आले . घोरपडी बाजारातील हमारा उद्यानपासून सोलापूर रोडला जोडणारे अलेक्झांडर रोड ( अरुण खेत्रपाल मार्ग ) या रस्त्यावरील लष्कराने लावलेले लोखंडी अडथळे हटविण्यात आले .

   केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांना पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे भारतीय जनता पार्टीच्यावतीने निवेदन देण्यात आले होते . त्या निवेदनातून मनोहर परिकर यांनी केंद्राच्या रक्षा मंत्रालयातून बंद केलेले  रस्ते तातडीने खुले करण्याचे आदेश दिले . पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कर्मचारी हा रस्ता खुला केला . हा रस्ता खुला केल्यामुळे , सकाळी व्यायामास जाणारे नागरिक , विद्यार्थी , नोकरीसाठी जाणारे नागरिक , तसेच घोरपडी मधील रहिवाश्यांनी आनंद व्यक्त केला .

   यावेळी  पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या घोरपडी भागातील नगरसेविका डॉ. किरण तुषार मंत्री यांनी सांगितले कि , रस्ते खुले केल्यामुळे नागरिकांना  जाणे येणे सोपे झाले आहे , अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीने जनतेला दिलेले आश्वाशन पूर्ण होत आहे . त्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांचे आभार मानले . तसेच पुढील रस्ते हि लवकरात खुले करण्यात येतील . त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल .

 यावेळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष श्रीकांत मंत्री , घोरपडी गावचे माजी सरपंच मारुती गणेशकर , अजय पाटोळे , दीप्ती पाटोळे , उमेश सोनावणे , अरविंद पिल्ले , किशोर त्रावडन , उदय घिया , अनिल पिल्ले , राजेंद्र काळे , अस्लम खान , विजय गरसुंद , कांती   आगरवाल , नितीन लोखंडे , महेश ढवळे आदी उपस्थित होते .

गंगाणी यांच्या कथकविष्कारास पुणेकरांची भरभरून दाद

0
1
पुणे-  धत्, धत् उथान, थाई का कमाल, धा बेसिक, डगर अशा कथक नृत्यातील नानाविध अविष्कार सादर करून प्रसिद्ध कथक नृत्यकार राजेंद्र गंगाणी यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. निमित्त होते उद्गार संस्थेतर्फे झालेल्या डगर चलत या नृत्य व वादनावर आधारित मैफलीचे. 
 
शास्त्रीय संगीत व नृत्य यांची जोपासना करणाऱ्या उदगार संस्थेतर्फे ‘डगर चलत’ या शास्त्रीय मैफीलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफीलीचे उद्घाटन उदगार संस्थेच्या अध्यक्षा आसावरी पाटणकर यांच्या कथक नृत्याने झाले.  
 
राजेंद्र गंगाणी यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या खास नृत्य शैलीतून सादर केलेला २१ सलामीचा नृत्याविष्कार हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. ते मंचावर येताच रसिकांनी त्यांना उत्स्फुर्त दाद दिली. गुरु पंडिता रोहिणीताई भाटे यांना स्मरून ते म्हणाले की, “गुरू आपल्या आयुष्यात फार महत्वाची भूमिका बजावत असतात, ते आपल्याला त्यांचे ज्ञान वितरीत करून आपले आयुष्य फुलासारखे सुगंधित करतात”. 
 

विनायक निम्हण यांचा शिवसेनेत प्रवेश

0

पुणे-कॉंग्रेस नेते नारायण राणे यांचे समर्थक आणि माजी आमदार विनायक निम्हण यांची आज “घर वापसी‘ झाली. निम्हण यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निम्हण यांना पुणे शहरप्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे. माजी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या वेळी त्यांच्या सोबत काही शिवसेना नेते आणि कार्यकर्ते गेले होते, त्यांच्यात निम्हण यांचा समावेश होता.
विनायक निम्हण यांची तब्बल दहा वर्षांनी “घर वापसी‘ केली आहे. निम्हण 1999 ते 2014 अशी 15 वर्षे पुण्यात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते आणि नंतरचे पाच वर्षे ते कॉंग्रेसचे आमदार होते. त्यांचे पुत्र सनी निम्हण हे नगरसेवक असून, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. लवकरच त्यांचाही शिवसेना प्रवेश होण्याची शक्‍यता आहे.
निम्हण यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राणेंसोबत गेलेले तत्कालीन सर्व आमदार शिवसेनेत परतल्याचे चित्र आहे. निम्हण यांना यंदाच्या निवडणुकीत शिवाजीनगरमधून भाजपच्या उमेदवारांकडून पराभव पत्कारावा लागला होता. राणेंसोबत कॉंग्रेसमध्ये गेलेले पण पुन्हा शिवसेनेत परतलेल्या राणे समर्थकांत सदा सरवणकर, रवींद्र फाटक, जयवंत परब, श्रीकांत सरमळकर, राजेंद्र राऊत, सुभाष बने, गणपत कदम यांचा समावेश आहे. नारायण राणेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अभेद्य अवधूत गुप्ते रुपेरी पडद्यावर

0

 

 

कलाकारांच्या अभिनयरूपी वंशपरंपरेचा मोठा वारसा सिनेसृष्टीला लाभला आहे. आजवर बऱ्याच स्टारपुत्रांनी आपल्या माता-पित्याच्या पाऊलावर-पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केले. आपल्या परंपरेला साजेसा अभिनयाचा वारसा जतन करत रसिकांच्या मनावर अधिराज्याही गाजवले आहे. बॉलिवूडच नव्हे तर मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासाची पाने अशा स्टारपुत्रांच्या कारकिर्दीने सजली आहेत. अभेद्य गुप्तेच्या रुपात आता आणखी एक स्टारपुत्र मराठी सिनेरसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 
मराठीतील आघाडीचे संगीतकार-गायक-निर्माते-दिग्दर्शक असा नावलौकिक असलेल्या अवधूत गुप्ते यांचा मुलगा अभेद्य गुप्तेयाने  रईस ल्ष्करीया प्रोडक्शनच्या ‘एक तारा’ या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे .
अभेद्य गुप्तेने या सिनेमात ओमकार ज्ञानेश्वर लोखंडे नावाच्या एका लहान मुलाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. यापूर्वी कधीही कॅमेरा फेस न करणारा अभेद्य ‘एक तारा’च्या निमित्ताने प्रथमच कॅमेऱ्यासमोर आला आहे. कांदिवली येथील गुंडेचा एज्युकेशन अकॅडमीमध्ये शिकणारा अभेद्य नऊ वर्षांचा आहे. सुमधूर गीत-संगीतने सजलेल्या या सिनेमात अवधूत यांनी एका गायकाचा प्रवास पडद्यावर रेखाटला आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात स्ट्रगल करत स्टार बनणारा जातीवंत कलाकार आणि त्यानंतर स्टारडम टिकवून ठेवण्यासाठी त्याची चाललेली धडपड असा या सिनेमाच्या कथेचा ग्राफ आहे. आजच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणारा अभिनेता संतोष जुवेकर या सिनेमात मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत अभिनेत्री तेजस्विनी पंडित मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय उर्मिला निंबाळकर, सागर कारंडे, सुनील तावडे, मंगेश देसाई, चैतन्य चंद्रात्रे आदी कलाकारांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. शैलेश महाडिक यांनी ‘एक तारा’चे कला-दिग्दर्शन केले असून संकलन इम्रान महाडिक व फैझल महाडिक यांनी केले आहे. कलाकारांनी साकारलेल्या पात्रांना साजेशी वेशभूषा अश्विनी कोचरेकर यांनी केले आहे. ३० जानेवारीपासून महाराष्ट्रात सर्वत्र ‘एक तारा’ प्रदर्शित झाला आहे.

नरेंद्र मोदींच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले ओबामा यांनी …. तर ओबामांशी माझी मैत्री देशाला उपयुक्त -मोदींचे स्पष्टीकरण

0

अणुकरार अपघात झाल्यास नुकसानभरपाई वर तडजोड
नवी दिल्ली-पंतप्रधान मोदींचे अमेरिकेतील मॅडिसन चौकात बॉलिवूडच्या हिरोचे व्हावे तसे झोकात स्वागत झाल्याची आठवण सांगत ओबामांनी पंतप्रधानांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. ‘मोदी दोन-तीन तास झोपतात आणि उत्साहाने भरपूर वेळ काम करतात. त्यांचा हा गुण आत्मसात करायला आवडेल असेही ओबामा म्हणाले, तर मोदींनी बराक ओबामा यांच्याशी व्यक्तीगत पातळीवर चांगली मैत्री झाल्याचे सांगितले. नेत्यांची व्यक्तीगत मैत्री अनेकदा देशासाठी उपयुक्त ठरते, असेही मोदी म्हणाले.मोदी-ओबामा संयुक्त पत्रकार परिषेदत अध्यक्ष ओबामा यांनी नमस्ते आणि सगळ्यांना ‘प्यार भरा नमस्कार’ करत आपले औपचारिक भाषण केले. या भाषणात त्यांनी मोदी आणि आपल्यात झालेल्या ‘चाय पे चर्चा’चा उल्लेख केला आणि व्हाइट हाऊसमध्येही अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे सांगितले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नेतृत्वाखाली भारत-अमेरिकेदरम्यान झालेल्या चर्चेअंती नागरी अणुऊर्जा करारातील महत्त्वाचे अडथळे दूर झाले आहेत. भारतात या अमेरिकेच्या मदतीने चालवण्यात येणारे अणुऊर्जा प्रकल्प आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करतील. तसेच या प्रकल्पांमध्ये अपघात झाल्यास चार भारतीय विमा कंपन्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या १५०० कोटींच्या निधीतून नुकसानभरपाई दिली जाईल, असा निर्णय झाला आहे.

1 2

(राजघाट येथे बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांनी वाहिली महात्मा गांधी यांना आदरांजली )

राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर स्वीकारल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राजघाटावरील डायरीमध्ये ओबामांनी संदेशही लिहिला. तसेच राजघाटाच्या आवारामध्ये बराक ओबामांच्या हस्ते पिंपळाचे रोप लावण्यात आले. यानंतर बराक ओबामा हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान मोदींबरोबर शिखर चर्चेसाठी उपस्थित होते
अमेरिकेच्या मदतीने भारतात चालवण्यात येणा-या अणुऊर्जा प्रकल्पांची पाहणी करण्याचे अधिकार अमेरिकेला मिळावेत अशी मागणी होत होती. अमेरिकेची ही मागणी फेटाळताना आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या नियमांचे पालन करणार असल्याचे भारताने मान्य केले आहे. प्रकल्पांमध्ये अपघात झाल्यास भरपाई कोणी द्यावी यावरुन भारत आणि अमेरिकेत बरेच मतभेद होते. अखेर चार भारतीय विमा कंपन्यांना १५०० कोटींचा कायमस्वरुपी मदतनिधी उभारण्यासाठी अमेरिकेकडून ७५० कोटी रुपये आणि भारताकडून ७५० कोटी रुपये दिले जातील, अशी तडजोड झाली आहे. या तडजोडीनंतर दोन्ही देशांमधील मतभेदाची दोन प्रमुख कारणे दूर झाली आहेत. महत्त्वाचे मतभेद दूर झाल्यामुळे दोन्ही देशांनी नागरी अणुऊर्जा कराराच्या प्रशासकीय अंमलबजावणीला मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव सुजाता सिंह यांनी दिली.
याआधी संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी आणि ओबामा यांनी भारत-अमेरिका मैत्री आणखी दृढ होत असल्याचे संकेत दिले. यावेळी मोदी आणि ओबामा यांच्यात थेट हॉटलाइन सेवा सुरू करण्यात येत असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. आधीपासून अधिका-यांच्या स्तरावर भारत-अमेरिका यांच्यात हॉटलाइन आहे. आता देशाच्या सर्वोच्च नेत्यांच्या पातळीवर हॉटलाइन सुरू झाल्यामुळे थेट संवाद साधणे आणि महत्त्वाच्या प्रसंगी चर्चेतून तातडीने निर्णय घेणे सोपे होणार आहे.
भारत आणि अमेरिका दहशतवादाविरोधात लढण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणार आहेत. दोन्ही देशांदरम्यान विमान तंत्रज्ञान सहकार्याचाही करार होत आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्रातील गरजांचा विचार करुन मोदी सरकार अमेरिकेशी दहा वर्षांचा संरक्षण सहकार्य करार करणार आहे. सागरी संरक्षणासाठी भारत-अमेरिका एकमेकांना सहकार्य करणार आहेत. या व्यतिरिक्त सौरऊर्जा, प्रदूषण नियंत्रण, व्यवसायवृद्धी, उत्पादन आणि स्मार्ट सिटी प्रकल्प यातही अमेरिका भारताला तांत्रिक सहकार्य करणार आहे. अजमेर, अलाहाबाद आणि विशाखापट्टणम या तीन शहरांना स्मार्ट सिटी करण्यासाठी अमेरिका लवकरच भारताला सहकार्य करणार आहे.

बराक ओबामा भारतात … उत्सुकतेची बहार

0

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा प्रजासत्ताक दिन सोहळा

8de7c3f5-44d3-418e-8958-978c371d43e9wallpaper1 317326-obama-grab-25jn12s333 modi-obama1_650_012515103948 Barack_Obama_India2

नवी दिल्ली – काल रात्री निघालेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा आज सकाळी भारतात पोहोचल्या आणि भारतीय सरकारने मिडीयाने त्यांचे भार्बाहारून स्वागत केले -ओबामांच्या या भेटीने उत्सुकता कुतूहलता याला जणू भारतात बहारच आली असून , त्यांच्या उपस्थितीत होणारा उद्याचा प्रजासत्ताक दिन सोहळा आणि त्यापूर्वीचे कार्यक्रम भारतीय नागरिक मोठ्या कुतूहलाने पाहत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनरद्वारे औपचारिक स्वागत करण्यात आले. ओबामांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर ओबामा राजघाटाकडे रवाना झाले. सकाळी ओबामांचे आगमन झाले त्यावेळी पंतप्रधान मोदी स्वतः प्रोटोकॉल मोडून ओबामांच्या स्वागतासाठी हजर होते. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अधिकार्‍यांची उपस्थिती होती. विमानातून उतरताच ओबामा आणि हस्तांदोलनानंतर गळाभेट घेऊन दोघांनी एकमेकांची भेट घेतली.
भारत दौर्‍यात मोठ्या घोषणा करणार असल्याचे अमेरिकेेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती भवनात पत्रकारांशी बोलताना ओबामांनी ही घोषणा केली. या दौर्‍यात भारताने तुमच्याकडून काय अपेक्षा कराव्यात, असे पत्रकारांनी ओबामांना विचारले होते. दरम्यान, मोदी आणि ओबामा यांच्यात शिखर चर्चेला सुरुवात झाली आहे.
दुपारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनरद्वारे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर राजघाटावर जाऊन ओबामांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. भारतात करण्यात आलेल्या शानदान स्वागताबाबत त्यांनी आभरही मानले.
राजघाटावरून बराक ओबामा हैदराबाद हाऊसकडे रवाना झाले आहेत. त्याठिकाणी मोदी आणि ओबामा यांच्यात शिखर चर्चा होणार आहे. त्याआधी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबामांचे स्वागत केले होते. दरम्यान, ओबामांचा भारत दौरा सुर होताच व्हाइट हाऊसतर्फे जय हिंद असे ट्वीट करण्यात आले. हा दौरा भारत अमेरिका मैत्रीची नवी सुरुवात ठरेल असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
त्याआधी पंतप्रधान मोदी हे स्वतः प्रोटोकॉल तोडून ओबामांच्या स्वागतासाठी हजर होते. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अधिकार्‍यांची उपस्थिती होती. विमानातून उतरताच ओबामा आणि हस्तांदोलनानंतर गळाभेट घेऊन दोघांनी एकमेकांची भेट घेतली.
8.10 AM भारतीय आणि अमेरिकेचे अधिकारी पालम विमानतळावर पोहोचले. ओबामांच्या स्वागताची तयारी.
9.40 AM ओबामांचे विमान विमानतळावर उतरले.
9.45 AM ओबामा आणि मिशेल विमानतळातून बाहेर आले .
9.48 AM पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बराक ओबामा आणि मिशेल ओबामांचे केले स्वागत.
10.15 AM मौर्य शेरटनमध्ये पोहोचले बराक आणि मिशेल ओबामा.

मानवाधिकार असोसिएशनच्या मानवाधिकार जनजागृत कार्यकर्त्यांचा मेळावा

0

2

 
मानवाधिकार असोसिएशनच्या मानवाधिकार जनजागृत कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच पुणे कॅम्प मधील नेहरू मेमोरिअल हॉलमध्ये पार पडला . या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर मोहनसिंग राजपाल , गुन्हे शाखा वरिष्ठ पोलिस निरीषक प्रतिमा जोशी , अल्पसंख्यांक आयोग सदस्य डॉ. दत्तात्रय गायकवाड , लोकहित फाऊडेशनचे अध्यक्ष अझहर खान , माजी नगरसेवक संदीप लडकत , राष्ट्रीय अध्यक्ष परवेझ आलम , महाराष्ट्र सचिव अल्ताफ शेख , पुणे जिल्हा अध्यक्ष भोला सिंग अरोरा , शहरअध्यक्ष मुनाफ शेख , जिल्हा उपाध्यक्ष अनमोल सिग ,जोहेब जमादार , सरचिटणीस हबीब शेख , शहर सचिव इबाद शेख , जिल्हा उपाध्यक्ष फिरोज मुल्ला आदी मान्यवर आणि मानवाधिकार कार्यकर्ते उपस्थित होते . 
   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोलासिंग अरोरा यांनी केले तर सूत्रसंचालन अस्लम शेख यांनी केले तर  आभार हबीब शेख यांनी मानले . 
 यावेळी अल्पसंख्यांक आयोग सदस्य डॉ. दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले कि , अन्याय अत्याचार विरोधात मिळणारे संरक्षणाची माहिती दिली . तसेच मानाधिकार मिळणारे सरकारी अनुदानाची माहिती देण्यात आली 
  भारताचे संविधान सभ्यता संस्कृती सर्व मानाधिकार हितासाठी कार्य केले आहे . भारतीय संविधाननुसार मौलिक अधिकार (आर्टिकल १४ / ३५) नुसार प्रदान करण्यात आले आहेत , या अधिकारांचा मानवाधिकार मध्ये समावेश आहे . सर्व धर्मियांना या मानाधिकार मधून अधिकार प्राप्त झालेले आहेत . अशी माहिती मोहम्मद अस्लम पठाण यांनी दिली . 

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये संग्राम मानेला सुवर्णपदक

0

1
पुणे :
‘गन फॉर ग्लोरी अ‍ॅकॅडमी’ व ‘नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया’ यांच्या वतीने बालेवाडी (पुणे) येथे घेण्यात आलेल्या ‘ऑल इंडिया चॅम्पियनशीप’ नेमबाजी स्पर्धेत संग्राम उमेश माने याने सुवर्णपदक पटकावले आहे.

रायफल आणि पिस्टल या प्रकारामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये संग्राम माने याने 10 मी. ‘पिपनाईट एअर रायफल नॅनल रूल्स’ या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळविले, तर कनिष्ठ गटामध्ये सिल्व्हर मेडल मिळविले आहे. संग्राम माने हा ऑलिम्पिक विजेते गगन नारंग यांच्या ‘गन फॉर ग्लोरी अ‍ॅकॅडमी’मध्ये दोन वर्षांपासून सराव करतो आहे.

संग्राम हा ‘अभिनव विद्यालया’त शिकत असून, त्याच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला चाफेकर व क्रीडा शिक्षक संजय भालेराव यांनी त्याचे अभिनंदन केले.