पुणे- येत्या बुधवारी( 4 तारीख) पुण्यात होऊ घातलेल्या मुस्लिम आरक्षण परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या आरक्षण परिषदेला एमआयएमचे खासदार असावुद्दीन ओवेसी हे हजर राहणार होते. ओवेसी हे धार्मिक व वादग्रस्त वक्तव्य करण्यास पटाईत असल्याने शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी ओवेसींच्या भाषणाला व सभेला विरोध केला होता. तसेच या सभेत हिंदूंविरोधात अपशब्द काढल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
पुण्यासह महाराष्ट्रातील धार्मिक ऐक्याला धक्का लागू नये, सामाजिक सलोखा बिघडू नये, या उद्देशानं वानवडी पोलिसांनी एमआयएमचे प्रमुख नेते असदुद्दीन ओवेसींच्या सभेला, मुस्लिम आरक्षण परिषदेला परवानगी नाकारली आहे. प्रक्षोभक, विखारी भाषणं करणाऱ्या ओवेसींनी हिंदू धर्माविरोधात चकारही काढल्यास त्यांची सभा उधण्याचा इशारा शिवसेनेनं दिल्यानंतर पोलिसांनी हा सावध पवित्रा घेतला आहे.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमिन (एमआयएम) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे ४ फेब्रुवारीला पुण्यात येणार होते. महाराष्ट्र कृती समिती आणि मूलनिवासी मुस्लिम मंचानं गोळीबार मैदानावर मुस्लिम आरक्षण परिषदेचं आयोजन केलं होतं आणि तिथे ओवेसींचं भाषण होणार होतं. आपल्या चिथावणीखोर वक्तव्यांसाठी, हिंदूविरोधी भाषणांसाठी ते ओळखले जात असल्यानं ही परिषद वादळी ठरू शकत होती. शिवसेनेनं शनिवारी ओवेसींना धमकावून तशी चा’हूल’ही दिली होती.
बुधवारी पुण्यात होणाऱ्या एमआयएमच्या सभेवरुन उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यातील या सभेत हिंदूंविरोधात अपशब्द काढल्यास सभा उधळून लावा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेत्यांना एका बैठकीत दिल्याचे समजते आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दोन आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या एमआयएमने महाराष्ट्रातील राजकारणात आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: मराठवाड्यात एमआयएमने ब-यापैकी लक्ष केंद्रित केले आहे. एमआयएमने आता आपला मोर्चा पुण्याकडे वळल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. हिंदू जनतेच्या भावना दुखावतील, असं जळजळीत मत ओवेसी मांडू शकतात. तसं झाल्यास आम्ही ते सहन करणार नाही. त्यांची आरक्षण परिषद आम्ही उधळून लावू आणि त्याला सर्वस्वी आयोजक जबाबदार असतील. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं खरमरीत निवेदन शिवसेना पुणे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी पोलीस आयुक्त सतीश माथूर यांना दिलं होतं. त्यावर, आरक्षणाचा विषय सामाजिक आहे, धार्मिक तेढ निर्माण करायचा आमचा उद्देश नाही, ओवेसींशिवायही अनेक मान्यवर या परिषदेत भाषणं करणार आहेत, असं सांगून आयोजकांनी सारवासारव करायचा प्रयत्न केला होता. परंतु, ओवेसींच्या भाषणामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, सामाजिक सलोखा बिघडू शकतो, असं नमूद करत वानवडी पोलिसांनी मुस्लिम आरक्षण परिषदेलाच परवानगी नाकारली आहे. हा ओवेसींसाठी मोठा झटकाच आहे. त्यांच्यावर पोलिसांचा विश्वास नसल्याचंच या निर्णयातून स्पष्ट होत असून त्यांच्या विखारी मनोवृत्तीलाच ही चपराक असल्याचं मानलं जातंय.
शिवसेनेचा दणका … पुणे पोलिसांचा हिसका… ओवेसी ची मुस्कटदाबी
रात्रीतून गाड्या फोडणाऱ्या कंटकांना वेसन घालणार कोण ? पुण्यातील समस्या गंभीर
पुणे -धनकवडीतील बालाजीनगर येथील वाहनांच्या जाळपोळी पाठोपाठ पंधरा दिवसांतच चव्हाणनगर परिसरात एका अज्ञाताने रविवारी पहाटे रस्त्याकडेला उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. रिक्षा, मिनी बस, मोटारी व स्कूल व्हॅन अशा चौदा वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.सहकारनगरकडून तीनहत्ती चौकातून धनकवडीकडे जाणाऱ्या चव्हाणनगरच्या मुख्य मार्गावर ही घटना घडली आहे. या मार्गाच्या कडेला रात्री दुतर्फा वाहने उभी केली जातात. रविवारी पहाटे पावणे तीन वजण्याच्या सुमारास मोठ्या आवाजाने नागरिक जागे झाले.
काहीजण धाडसाने बाहेर आले तेव्हा त्यांना तोंडाला रुमाल बांधलेला आणि हातात लोखंडी गज घेवून धावत असलेला तरुण दिसला. त्याचा पाठलाग केल्यानंतर तो शांतीनगरच्या बाजूने पळून गेला. दरम्यान, झांबरे पॅलेस समोरील या मार्गाकडेला दुतर्फा उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्याचे नागरिकांना निदर्शनास आले. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस आल्यानंतर त्यांनी शांतीनगर परिसरात शोधाशोध केली मात्र तो अज्ञात तरुण पळून जाण्यात यशस्वी ठरला. या घटनेत तीन रिक्षा, दोन प्रवाशी मिनीबस, दोन स्कूल व्हॅन, दोन साध्या व्हॅन, पाच मोटारींचे काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे. सहकारनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत शिंदे, बाळकृष्ण अंबुरे यांच्यासह उप आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी पहाटेच घटनास्थळी येवून माहिती घेतली. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उप निरीक्षक ए. बी. जगताप करत आहेत.
‘रैम्बो सर्कस’ चे शानदार उदघाटन

पुणे
” सर्कस ही लहान मुलांबरोबरच मोठ्यांचेही प्रमुख आकर्षण असते. सर्कसीतील वेगवेगळे चित्तथरारक प्रयोग पाहताना लहान मुलांना विशेष आनंद होतो. ‘रैम्बो सर्कस’ ने पुण्यात येऊन पुढील काही महिने पुणेकरांचे मनोरंजन करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद” असे गौरवोद्गार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी येथे काढले. डेक्कन येथील नदी पात्राच्या मैदानात उभारण्यात आलेल्या ‘रैम्बो सर्कस’ चे बापट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे उपस्थित होते.
महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी आपल्या भाषणात, पुणे शहर हे सांस्कृतिक वारसा जपणारे शहर आहे. त्यामुळेच सर्कसीच्या माध्यमातून होत असलेल्या कलेच्या जोपासनेसाठी या पुण्यनगरीने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे असे सांगून ‘रैम्बो सर्कस’ ला सदिच्छा दिल्या.
प्रारंभी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते फीत कापून आणि दीपप्रज्ज्वलन करून ‘रैम्बो सर्कस’ च्या पुण्यातील शुभारंभाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार विजय काळे, भाजपच्या नगरसेविका मुक्ता टिळक, नगरसेविका नीलिमा खाडे, दत्ता खाडे, संदीप खर्डेकर, मंजुषा खर्डेकर, प्रवीण तरवडे, राजा महाजन, आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर ‘रैम्बो सर्कस’ च्या प्रमुख कलाकारांनी वेगवेगळे चित्तथरारक प्रयोग करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
याप्रसंगी भारतीय सर्कसचे जनक विष्णुपंत छत्रे यांचे वारस अजय छत्रे व कल्पना छत्रे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्कस कलावंत दामू धोत्रे यांचे नातू व पणतू विलास धोत्रे व आनंद धोत्रे, मुन्नाभाई अब्रार, सिद्धार्थ जांभूळकर, बाळासाहेब शिंदे, नीना वाडेकर, दिलीप माने, आदी मान्यवर उपस्थित होते, प्रारंभी ‘रैम्बो सर्कस’ च्या वतीने प्रदीप अगरवाल यांनी स्वागत केले ‘रैम्बो सर्कस’ चे संस्थापक पी. टी. दिलीप आणि पार्टनर सुजित दिलीप यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. याप्रसंगी ‘रैम्बो सर्कस’ मधील देशी-परदेशी कलावंत आणि विदुषक मोठ्या संख्येने उपस्थित होते ‘रैम्बो सर्कस’ चा वातानुकुलीत तंबू प्रेक्षकांनी खचाखच भरून गेला होता.
‘रैम्बो सर्कस’ चा पुण्यात ४५ दिवस मुक्काम असून सोमवार ते शुक्रवार दुपारी चार आणि सायंकाळी सात असे प्रयोग होणार असून शनिवार, रविवार आणि सुट्टीचा दिवस यावेळी दुपारी एक, दुपारी चार आणि सायंकाळी सात असे तीन प्रयोग होणार आहेत. तिकिटाचे दर चारशे, तीनशे व दोनशे रुपये आहेत. तीन वर्षाखालील बालकांना मोफत प्रवेश आहे तसेच सामाजिक कृतज्ञता म्हणून अनाथ मुले, अंध व अपंग यांनही मोफत प्रवेश आहे.
सर्कसला लोकाश्रय असला तरी देशात १८ ते २० मोठ्या सर्कसी शिल्लक राहिल्या आहेत. मैदानाची भाडी बेसुमार वाढली असून वीज आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे मोठा आर्थिक बोजा वाढत आहे. वाघ, सिंह, अस्वल यांना सर्कसीत प्रयोग करण्यास बंदी घालण्यात आल्यामुळे उतरती कळा लागली आहे. त्याचबरोबर हत्तीवरही बंदी आणण्याचे प्रयत्न चालू असल्यामुळे भविष्यात सर्कस टिकेल कि नाही याची काळजी आहे. सर्कसीतील लहान मुलांना बालकामगार कायदा लागू केल्यामुळे त्यांना प्रशिक्षण देता येत नाही त्यामुळे भविष्यात सर्कस कलावंत तयार होतील कि नाही याची शंका आहे यासाठी सर्कस उद्योगाला केंद्र व राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी मदत केली पाहिजे असे याप्रसंगी सर्कसचे पार्टनर सुजित दिलीप यांनी सांगितले
किरण बेदींचा फोटो वापरला म्हणून ‘आप’ ला नोटीस
नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने निवडणुक प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचा फोटो वापरल्याने आचारसंहितेचा भंग झाला असून याप्रकरणी निवडणूक आयोगाने आपचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गुप्ता यांना याप्रकरणी सोमवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुलासा कळविण्यास सांगितले आहे. याप्रकाराची दखल घेतली नाही तर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे सतिश उपाध्याय यांनी किरण बेदी यांची परवानगी न घेता छायाचित्र प्रसाराकरिता वापरल्याची तक्रार आयोगाकडे केली होती. तसेच जाहीरातीमध्ये बेदी यांना “अवसरवादी‘ संधीसाधू म्हटले होते. दरम्यान याप्रकरणी शनिवारपर्यंत सार्वजनिक ठिकाणचे 1763 होर्डिंग हटविण्यात आले असून 138 तक्रारी दाखल करून घेण्यात आल्या होत्या. शनिवारी आचारसंहितेच्या भंगप्रकरणी विविध ठिकाणांहून एकूण 22,069 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर हत्यारांचे 598 परवाने जप्त करण्यात आले असून बेकायदेशीरित्या बाळगण्यात आलेली 28 हत्यारे आणि 1107 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
खबरदार , देशद्रोही वक्तव्ये कराल ; हिंदुविरोधी चकार शब्द काढाल तर हा हिंदुस्तान आहे पाकिस्तान नाही- शिवसेनेचा एमआयएम ला पुण्यातील सभा उधळण्याचा इशारा
पुणे- खबरदार , देशद्रोही वक्तव्ये कराल ; हिंदुविरोधी चकार शब्द काढाल तर हा हिंदुस्तान आहे पाकिस्तान नाही अशा स्पष्ट शब्दात पुण्यातील शिवसेनेने ओवेसी ला इशारा दिला आहे त्या अनुषंगाने आपल्या भडकाऊ भाषणांसाठीच ओळखले जाणारे एमआयएमचे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन) नेते असदुद्दीन ओवेसी यांची पुण्यात होणारी सभा उधळण्याची धमकी शिवसेनेनं दिल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. ओवेसींनी हिंदूविरोधी चकार जरी काढला, तरी आम्ही तो सहन करणार नाही, त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा पवित्रा शिवसेनेनं जाहीर केलाय आणि विशेष म्हणजे याबाबत पुण्याच्या पोलीस आयुक्तांना शिवसेना शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी पत्र देवून अगोदरच सूचित केल्याचे वृत्त आहे
महाराष्ट्र कृती समिती आणि मुलनिवासी मुस्लिम मंचानं येत्या ४ फेब्रुवारीला पुण्याच्या गोळीबार मैदानावर मुस्लिम आरक्षण परिषद आयोजित केली आहे. त्यासाठी त्यांनी अनेक मान्यवरांना आमंत्रित केलं असून त्यात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचाही समावेश आहे. मुस्लिम आरक्षण या विषयावर ते आपलं मत मांडणार आहेत. त्यामुळे पुण्यात सगळ्यांचेच कान टवकारले आहेत. चिथावणीखोर भाषणं करून हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचाच प्रयत्न ओवेसींनी अनेकदा केला आहे. हिंदूंना लक्ष्य करून मुस्लिमांना भडकवणारी भाषा ते सतत करताना दिसतात. त्यामुळे मुस्लिम आरक्षणावरचं त्यांचं भाषणही जहाल असू शकतं. हे ओळखूनच शिवसेना आक्रमक झाली आहे.
हिंदू जनतेच्या भावना दुखावतील, असं जळजळीत मत ओवेसी मांडू शकतात. तसं झाल्यास आम्ही ते सहन करणार नाही. त्यांची आरक्षण परिषद आम्ही उधळून लावू आणि त्याला सर्वस्वी आयोजक जबाबदार असतील. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं खरमरीत निवेदन शिवसेना पुणे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी पोलीस आयुक्त सतीश माथूर यांना दिलंय. त्याची दखल घेऊन, ओवेसींच्या सभेदरम्यान शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यादृष्टीनं पोलिसांनीही पूर्ण तयारी केली आहे.
दरम्यान, मुस्लिम आरक्षण परिषदेचा कार्यक्रम हा राजकीय विषय नसून तिथे एकट्या ओवेसींचंच भाषण होणार नसल्याचं आयोजकांनी नमूद केलंय. न्या. बी जे कोळसे पाटील हे या परिषदेतील प्रमुख वक्ते आहेत, तर आम आदमी पार्टी, रिपब्लिक युवा मोर्चा, छावा युवा संघटनेच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आरक्षणाचा विषय सामाजिक आहे, धार्मिक तेढ निर्माण करायचा आमचा उद्देश नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसं असलं तरी, ओवेसींचा शब्द न् शब्द शिवसेना कान देऊन ऐकणार आहे आणि तो न पटल्यास आपल्या ‘स्टाइल’नं उत्तर देणार आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरणात तणाव जाणवतोय.
विनर ऑफ द ‘बिग बॉस ‘ — गौतम गुलाटी ने मारली बाजी
मुंबई- ‘कलर्स’ चॅनलवर प्रसारित होणारा बहुचर्चित रियालिटी शो ‘बिग बॉस-8’च्या विजेत्याची घोषणा झाली. गौतम गुलाटी याने ‘बिग बॉस सीजन 8’ विजेतेपद पटकावले. गौतम याने करिश्मा तन्ना आणि प्रीतमला मात देऊन शो जिंकला. प्रीतम याने 25 लाख घेऊन शो अर्ध्यात सोडला. 135 दिवस चाललेला हा वादग्रस्त रियालिटी शोचे ‘ग्रॅण्ड फिनाले’ लोणावळा येथे झाले.
‘बिग बॉस-8’च्या विजेत्याची घोषणा शनिवारी रात्री 9 वाजता करण्यात आली. विजेता ठरलेल्या गौतमला 50 लाख रुपये आणि आलिशान कार बक्षिस मिळणार आहे. ‘बिग बॉस-8’च्या विजेत्याची शनिवारी घोषणा झाला. विजेता म्हणून गौतमच्या नावाची घोषणा होताच त्याची आई खूप भावूक झाली. ट्रॉफी घेताना गौतमने त्याच्या आईला व्यासपीठावर बोलावले. गौतमने आपला विजय आईला समर्पित केला.
दरम्यान, करिश्मा ही ‘बिग बॉस-8’ ची ‘फर्स्ट रनर अप’ ठरली ती प्रीतमने 25 लाख रूपये घेऊन शो अर्ध्यात सोडला. मात्र, प्रीतमच्या निर्णयावर त्याची आई आणि पत्नीने नाराजी व्यक्त केली आहे.
कॅम्पा कोलाची अनधिकृत घरे अखेर नियमित
मुंबई : वरळीच्या कॅम्पा कोला कम्पाउंडमध्ये असलेल्या सात इमारतींचे ३५ अनधिकृत मजले म्हणजे त्यावरील एकंदर १४५ सदनिका नियमित करण्याचा आदेश देऊन सर्वोच्च न्यायालयाने या रहिवाशांना शुक्रवारी मोठा दिलासा दिला. या निकालाचे वृत्त समजल्यानंतर यासाठी प्राणपणाने झुंजलेल्या कॅम्पा कोलातील रहिवाशांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते.
कॅम्पो कोलातील अनधिकृत सदनिका कायद्याच्या चौकटीत राहून नियमित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिले. राज्यातील नवे सरकार अनुकूल असल्यास कॅम्पा कोलामधील अनधिकृत सदनिका नियमित करण्याबाबत विचार होऊ शकतो. नव्या सरकारची मंजुरी असल्यास या निर्णयाचा फेरविचार होऊ शकतो, असे न्यायालयाने यापूर्वी म्हटले होते. आता चौकटीत राहूनच नियमित करण्याचे आदेशच न्यायालयाने दिले आहेत. कॅम्पा कोला कम्पाउंडमधील मिडटाऊन, आॅर्किड, शुभम् अपार्टमेंट, ईशा-एकता, पटेल, बी.वाय. अपार्टमेंट या सात इमारतींचे एकूण ३५ मजले अनधिकृत आहेत. महापालिकेने या सदनिका पाडण्याची कारवाई सुरू केल्यानंतर हे प्रकरण आधी उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात आले होते.
भाजपने घातला अण्णा हजारेंच्या प्रतिमेला पुष्पहार — दिली निवडणुकीचे महाभारत
नवी दिल्ली- दिल्लीतील निवडणुकीच्या महाभारतात आम आदमी पार्टीचे(आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रचारकी हल्ल्यासाठी बनविलेल्या व्यंगचित्राने भाजपाची अडचण वाढविली आहे. या व्यंगचित्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातलेला असल्याने वाद पेटला आहे. ‘आप’ने या मुद्द्यावरून लक्ष्य बनविताच भाजपाला उत्तर देणे अवघड झाले आहे. केजरीवाल मुुलांच्या डोक्यावर हात ठेवत शपथ घेत असतानाच काँग्रेसशी हातमिळवणी करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. अण्णांच्या प्रतिमेला हार दाखवत भाजपाने जणू त्यांची हत्या केली असून, त्याबद्दल भाजपाने माफी मागावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली
भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या जाहिरातीत आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य बनविताना एका जाहिरातीत समाजसेवक अण्णा हजारे यांच्या छायाचित्राला चक्क हार घातल्याने भाजप पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
भाजपने एका निवडणूक जाहिरातीत केजरीवाल हे मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेत आहेत असे दाखविले आहे. त्यांच्या बाजूला एका स्त्रीचे चित्र असून, तिच्या डोक्यावरील टोपीवर कॉंग्रेस असे लिहिले आहे. मागे अण्णांचे छायाचित्र असून, त्याला दिवंगत नेत्यांना घालतात तसा हार घातलेला दाखविला आहे. “सत्तेसाठी मी मुलांची खोटी शपथ घेईन व तरीही रात्रंदिवस प्रामाणिकपणाचा डांगोरा पिटेन‘ असे केजरीवाल म्हणताना यात दाखविले गेले आहेत.
नारायण राणे यांचे आणखी एक समर्थक शिवसेनेत
मुंबई -काँग्रेस नेते नारायण राणे यांना कोकणात आणखी एक धक्का बसला असून राणेंचे कट्टर समर्थक आणि कुडाळमधील प्रमुख पदाधिकारी संजय पडते शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. पडते मातोश्री निवासस्थानी दाखल झाले असून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले.
पुण्यातील राणेसमर्थक माजी आमदार विनायक निम्हण यांनी तीन दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला असताना आज राणे यांच्या भात्यातून आणखी एक तीर निसटला आहे. कोकणातील बदललेले वारे लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय पडते यांनी स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला आहे.
संजय पडते आपल्या समर्थकांसह आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. पडतेंचा शिवसेना प्रवेश राणे यांची अस्वस्थता वाढवणाराच ठरणार आहे. पडते हे राणे यांची सावलीच मानले जात होते. राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हापासून पडते राणेंसोबत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विशेषत: लोकसभा निवडणुकीतील नीलेश राणे यांचा पराभव आणि विधानसभा निवडणुकीतील नारायण राणे यांच्या पराभवाने वातावरण बिनसलं होतं. राणे यांच्या दोन्ही मुलांच्या कार्यपद्धतीवर पडते हे नाराज होते. त्यातूनच त्यांनी राणेंचा आश्रय सोडण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगण्यात येत आहे.
भाजपच्या राज्यात भांडवलदारांची चलती ;कामगारांचे बुरे दिन -अण्णा हजारे यांचा एल्गार होणार सुरु ? कामगार देणार साथ ?
सोनू निगम ची मराठीत मराठीत एंट्री
गेल्या काही महिन्यांपासून मराठी सिनेमांत कित्येक अमराठी गायक ठसक्यात मराठी गाणी गाताना दिसू लागलेत. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक सोनू निगम यांचे नावही ह्या यादीत समाविष्ट आहे. “हिरवा निसर्ग…” या लोकप्रिय गाण्यापासून ते अगदी हल्लीच्या “टिक टिक वाजते… ” या त्यांच्या सुमधुर आवाजातील गाण्यांना रसिक प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली. ‘स्विस एंन्टरटेण्मेंट‘ची मराठीतील पहिलीच निर्मिती असलेल्या आगामी अजय फणसेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘चीटर‘ या सिनेमात सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी पहिल्यांदाच मराठी सिनेमासाठी एकाच सिनेमात दोन मराठी गाणी गायली आहेत. मुंबई येथील एका स्टुडिओमध्ये सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजात दोन गाणी रेकॉर्ड करून या सिनेमाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला.
गेली ७-८ वर्ष सोनू निगम यांच्या शोजमध्ये विविध प्रकारची ताल वाद्य वाजविणाऱ्या अभिजित नार्वेकर ह्या तरुणाने या सिनेमासाठी संगीत दिले असून त्याचा हा संगीतकार म्हणून पहिलाच सिनेमा आहे. मी जेव्हा एका मराठी सिनेमासाठी संगीतकार म्हणून काम पाहणार असल्याचे सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांना सांगितले तेव्हा त्यांनी स्वतःहून मला तुझ्यासाठी गायला नक्की आवडेल असे सांगितले. त्या क्षणी मला आनंदाचा सुखद धक्का बसला.पहिलाच सिनेमा आणि त्यासाठी सोनूजी गाणार ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. एक गाणे रेकॉर्ड करून झाल्यावर मी त्यांना दुसऱ्या गाण्याबद्दल बोललो आणि त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता दुसऱ्या गाण्यासाठीही लगेच होकार दिला. दोन्ही गाणी ड्यूएट असून गायिका आनंदी जोशीने त्यांच्यासोबत ही दोन्ही गाणी गायली आहेत. सिनेमात एकूण चार गाणी असून चारही गाणी वेगळ्या पठडीतील आहेत. मला या सिनेमासाठी संगीतकार म्हणून पहिली संधी दिल्याबद्दल मी अजय फणसेकर यांचा आभारी असल्याचे संगीतकार अभिजित नार्वेकर यांनी आवर्जून नमूद केले.
“चीटर” या सिनेमाच्या एकंदरीत नावावरूनच आपल्याला सिनेमाचा विषय लक्षात येतोच पण त्याचसोबत या सिनेमातील अजून काही गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्हाला अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अजय फणसेकर यांचे असून लक्ष्मण बुवा हे या सिनेमासाठी कॅमेरामन म्हणून काम पाहणार आहेत. अभिनेते हृषीकेश जोशी, वैभव तत्ववादी, अभिनेत्री आसावरी जोशी, सुहास जोशी आणि पूजा सावंत अशी या सिनेमाची स्टारकास्ट असून या कलाकारांचा उत्तम अभिनय आपल्याला या सिनेमात पहायला मिळणार आहे. सध्या या सिनेमाचे शुटींग मॉरिशियस येथे सुरु झाले असून उर्वरित काही चित्रीकरण वाई येथे पार पडणार आहे
झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ ची यशस्वी पन्नाशी
“नको डोक्याला शॉक, चला हवा येऊ द्या” असं म्हणत मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांच्या युगात मनोरंजनाची नवी लाट घेऊन आलेला कार्यक्रम म्हणजे झी मराठीवरील “चला हवा येऊ द्या”. मराठी चित्रपट आणि नाटकांना तिकीटबारीवर चांगले दिवस आले आहेत. यशाचे आणि लोकप्रियतेचे एकेक टप्पे हे दोन्ही माध्यमं गाठत आहेत आणि आता प्रेक्षकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. या दोन्ही माध्यमांबद्दलचं हे चित्र सकारात्मक असलं तरी अनेकदा योग्य प्रसिद्धीअभावी या कलाकृती लोकांपर्यंत नीट पोहचत नसल्याचं मत या क्षेत्रामधून व्यक्त होत होतं. अशातच झी मराठीने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन पायंडा पाडणारा कार्यक्रम आपल्या प्रेक्षकांसाठी आणला. ज्यामध्ये आगामी प्रदर्शित होणा-या चित्रपटातील आणि रंगभूमीवर नव्याने आलेल्या नाटकातील कलावंत ‘चला हवा येऊ द्या’ या कॅफेत येऊन आपल्या चित्रपट किंवा नाटकाबद्दलची माहिती देऊ लागले. याला सोबत होती ती कॅफेचा मालक आणि निवेदक डॉ. निलेश साबळे आणि त्याच्या परीवारातील अतरंगी कलाकार म्हणजे भारत गणेशपुरे, कुशल बद्रीके, सागर कारंडे, मानसी नाईक, श्रेया बुगडे, विनित बोंडे आणि भालचंद्र (भाऊ) कदम यांची. कधी धम्माल स्किट्सच्या माध्यमातून या सर्वांनी प्रेक्षकांना हसवलं तर कधी काही हळव्या आठवणींनी प्रेक्षकांना भावूकही केलं. अल्पवधीतच तुफान लोकप्रिय झालेला हा कार्यक्रम आता आपल्या भागांची पन्नाशी पूर्ण करतोय. येत्या मंगळवारी ३ फेब्रुवारीला रात्री ९.३० वा.हा पन्नासावा भाग प्रसारित होणार आहे.
“चला हवा येऊ द्या” हा कॅफे आहे थुकरटवाडी या गावातला. या कॅफेत दर आठवड्याला मराठी मनोरंजन विश्वातील तारे तारका गप्पा मारायला येतात. निमित्त असतं ते त्यांच्या कलाकृतीच्या प्रमोशनचं. इथे हे प्रमोशन तर होतंच पण त्यासोबत तिथे घडतात अनेक धम्माल गोष्टी. थुकरटवाडीचे सरपंच भारत गणेशपुरे अनोख्या पद्धतीने पाहुण्यांचं स्वागत करतात तर निलेशचे बाबा भालचंद्र कदम विचित्र आणि ‘चुकीच्या’ पद्धतीने पाहुण्यांची ओळख करून देतात. चित्रपटाचा दिग्दर्शक बनण्याची हौस असलेला कुशल याच मंचावर आपली हौसही भागवून घेतो तर कधी लावणी नर्तीका, प्रत्येक गोष्टीत आक्षेप असणारी प्रेक्षक महिला बनून सागरही सर्वांना खो खो हसवतो. या अतरंगी कलाकारांसोबत पाहूणे म्हणून आलेले कलाकारही त्यांच्याच रंगात मिसळून जात एकच धम्माल उडवतात. ख-या अर्थाने मनोरंजक असलेला हा कार्यक्रम आज घराघरात लोकप्रिय झाला आहे. प्रत्येक आठवड्याला पाहूणे कोण? यासोबतच यात काय स्किट सादर होणार याबद्दलही प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असते. जी लोकप्रियता टीव्हीवरील भागांना मिळते तसाच प्रतिसाद याच्या युट्युबवर अपलोड झालेल्या भागांनाही मिळतो. ‘चला हवा येऊ द्या’ च्या जवळपास प्रत्येक भागाला युट्युबवर हजारोच्यावर हिट्स आहेत यातूनच या कार्यक्रमाची लोकप्रियता लक्षात येते. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणं आणि मराठी कलाकृतींना चांगली प्रसिद्धी देणं असा हेतू असलेला हा कार्यक्रम आपली पन्नाशी पूर्ण करतोय यानिमित्ताने याच्या सेटवर धम्माल सेलिब्रेशनही करण्यात आलं. येत्या मंगळवारी ३ फेब्रुवारीला हा पन्नासावा भाग रात्री ९.३० झी मराठीवरून प्रसारित होईल.
नागरी सहभागातून स्वच्छतागृह स्वच्छ राखण्याच्या उपक्रमाची वर्षपूर्ती.
पुणे-नागरी सहभागातून सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याच्या अभिनव उपक्रमास एक वर्ष यशस्वी रित्या पूर्ण झाले हे कौतुकास्पद असून शहारतील इतर बांधकाम व्यवसायिक व अन्य व्यापरी वर्गाने तसेच उद्योजकांनी ही पुढे यावे व प्रत्येकी एक एक स्वच्छतागृह दत्तक घ्यावे जेणेकरून शहारतील सर्वच ७०० ते ८०० सर्वजनिक स्वच्छतागृह कायम स्वच्छ राहातील आणी पुणे शहाराच्या सौंदर्या बरोबरच नाव लौकीकात ही भर पडेल,असे गौरवोदगार महापौर दत्तात्राय धनकवडे यांनी काढले.नळ स्टॉप चौकातील समुद्रा हॉटेल शेजारी व शौकीन पानस्टाल समोरील पुरुष स्वच्छतागृहास गत वर्षी बांधकाम व्यवसायिक संजय देशपांडे यांनी स्वच्छ ठेवण्याचा विडा उचलला,या उपक्रमास एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मा.महापौर बोलत होते.या वेळी खा.वंदना चव्हाण,आ.मेधा कुलकर्णी,स्थानिक नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,भाजप चे सरचिटणीस संदीप खर्डेकर,घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप,क्षेत्रीय आयुक्त सुनील केसरी,इ उपस्थित होते,श्री.संजय देशपांडे म्हणाले”रोज या ठिकानाहून जाताना येणारा घाणेरडा वास मला अस्वस्थ करत होता,याबाबत फक्त चर्चा न करता कृती करण्याचे ठरविले आणी या उपक्रमाने आकार घेतला. मी या उपक्रमाबाबत अनेक मित्रांशी चर्चा करत असतो,त्यातूनच श्री.आदीत्य जावडेकर व श्री,विक्रांत वर्तक यांनी ही प्रत्येकी एक स्वच्छतागृह दत्तक घेण्याचे मान्य केले आहे असे ही त्यांनी जाहीर केले.
गुरुकृपा आणि तार तरंगम हा शास्त्रीय संगीतद्वारे कथ्थक नुर्त्याचा कार्यक्रम सादर
विमानगरमधील सिंबोयोसिस इंटरनेशनल स्कूल कॅम्पसमधील सभागृहात गुरुकृपा आणि तार तरंगम हा शास्त्रीय संगीतद्वारे कथ्थक नुर्त्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला . यावेळी सृष्टी रे , पूजा बुधानी , समाह कोच्चर , अनुष्का गहलोत यांनी शास्त्रीय संगीतद्वारे कथ्थक नुर्त्य सादर केले . त्यांच्या गुरु श्रीमती योगिनी गांधी यांनी शास्त्रीय संगीतद्वारे कथ्थक नुर्त्य सादर करण्यास मार्गदर्शन केले . कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती वंदना , खयाल , दादरा , ठुमरी , तेराणा , रवींद्र संगीत आदी गाणी झाली . यावेळी प्रसिध्द बंगाली गायिका अनिता दे यांनी गाणी गायली. त्यांना तबल्याची साथ निखिल पाठक . गायन मृण्मयी पाठक , सितार अनिरुद्ध जोशी , बासरी सुनील अवचट , हार्मोनियम चिन्मय कोल्हटकर , ध्वनी संयोजन प्रदीप माळी , लाईटस तेजस देवधर यांनी केले होते .
यावेळी संजय गहलोत , किशोर बुधानी , नीरज कोच्चर , महाराणा रे व अन्य मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली कोठारी यांनी केले .
आपली विश्वासू ,
लीना गहलोत
मोबाईल – ९७६३३३८८२८
5 Attachments
Preview attachment IMG_9937.JPG
Preview attachment IMG_9930.JPGPreview attachment IMG_9919.JPGPreview attachment IMG_9908.JPGPreview attachment katthak news.docx



