Home Blog Page 3627

Actress Rati Agnihotri Launch Neha Lakdawala Jewellery Exhibition in Mumbai

0

1 2

Promising entrepreneur and owner of brand NL JEWELS  Neha Lakdawala’s jewellery collection was showcased on Friday Mumbai, Actress Rati Agnihotri  turned up to see the avant garde collection worth crores of rupees and hand-picked the pieces which caught her fancy. She said, “I love Jewellery though minimalistic but I’m extremely fond of style statement pieces and Neha had it all. It’s really an unique collection which attracts your soul your inner deep beauty” .

Neha’s collection Is about to change your lifestyle by her exquisite and customized, multipurpose and affordable Diamond/Gold Jewellery.  An array of necklaces, bracelets and earrings gave all patrons of luxury in city a real visual treat. After successfully holding up exhibitions of NL Jewels in Dubai, Ahemdabad, Now Mumbai will witness the innovative line showcases its creative edge with stately diadems, armlets and minaudieres.

“Each piece is a statement and has been exceptionally sculpted using rich colours; highlighted with rubies, emeralds, tanzanite and sapphires; elegantly punctuated with the rarest diamonds all depicting nature in her various forms”, said Neha.  Neha has been graduated in arts (B.A.) and done her Diamonds from GIA (Gemological Institute of America). Others present at the event were Nadeem Lakdawala with his wife Ayesha Lakdawala and Parvez Lakdawala with his wife Hafiza Lakdawala.

विविध साहित्य प्रवाह संमेलनात एकत्र येण्याची पर्वणी – संदीप खरे

0

1

: साहित्य संमेलनातून विविध साहित्य प्रवाह एकत्र येण्याची पर्वणी साधली जात असून, ते यशस्वी करण्यासाठी धडपडणाऱ्यांना समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे, असे मत कवी संदीप खरे यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने शाळा, महाविद्यालये आणि वाचनालयातून साहित्यिक आपल्या भेटीला या उपक्रमाचा शुभारंभ डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे करताना श्री. खरे बोलत होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, मुख्याध्यापक नागेश मोने, पर्यवेक्षिका मनिषा मीनोचा व्यासपीठावर उपस्थित होत्या.

श्री. खरे पुढे म्हणाले,’मराठीतील चांगल्या साहित्याची ओळख मुलांना करून देण्याची जबाबदारी मोठया व्यक्तिंची आहे. मुलांसाठी वेळ काढला पाहिजे. नवीन माध्यमांबरोबर मुलांना चांगली पुस्तके आणून दिली पाहिजेत. साहित्यिकांनीही थेट वाचकापर्यंत पोहोचून संवाद साधणे आवश्यक आहे.’

घुमान, पंजाब येथे होणाऱ्या संमेलनाचे निमंत्रण आणि माहिती दोन लाख कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे श्री. देसडला यांनी सांगितले.

‘अग्गोबाई, ठग्गोबाई,लागली कळ…..’ आणि  ‘कोण कोण वर्गांमध्ये हात करा वर….’ या खरे यांनी सादर केलेल्या गाण्यांना विद्यार्थ्यांनी टाळयांची साथ देत जोरदार प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांचे कला गुण हेरत संतोष वाघमारे, उन्मेष हर्डीकर अभिषेक हजारे या विद्यार्थ्यांकडून गाणी म्हणून घेतली.

‘पुणे शहर पर्यटन केंद्र व्हावे याबाबतच्या उपक्रमांना गती मिळावी’ : खा. वंदना चव्हाण

0

 पुणे: 

‘महानगरपालिकेच्या यावर्षीच्या अंदाजपत्रकात पुणे शहर पर्यटन केंद्र व्हावे याबाबतच्या उपक्रमांना गती मिळावी’, असे मत खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण व्यक्त केले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, हेरिटेज विभागाचे प्रमुख श्याम ढवळे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला. ही बैठक दिनांक 13 फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कार्यालयात झाली.

‘ब्रँडिग पुणे’ च्या धर्तीवर विश्रामबाग वाडा येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, बंडगार्डन ब्रिज येथे ‘आर्ट प्लाझा’, नानावाडा येथे ‘स्वातंत्र्य सैनिकांचे संग्राहलय’, पु.ल.देशपांडे उद्यान येथे ‘हेरिटेज व्हिलेज्’, पुण्यातील विविध उद्यानांमध्ये  विविध राज्यांमधील कलाकूसरीच्या वस्तुंचे  कायमस्वरूपी प्रदर्शन, हेरिटेज पर्यटन, ‘सायन्स पार्क’ ची उभारणी ‘दिल्ली हट’ च्या धर्तीवर ‘पुणे हट’ ‘बाजार प्रदर्शन’, पुणे दर्शन बस आकर्षक करणे, पर्यटकांसाठी माहिती केंद्र उभारणे अशा अनेक महत्वाच्या मुद्यांविषयी चर्चा या बैठकीत करण्यात आली.

या व अशा योजना पुढे नेण्याच्या संदर्भात कलाक्षेत्रातील तज्ज्ञ, वास्तूविशारद (अर्किटेक्ट) याबैठकीला उपस्थित होते. यावेळी ‘इन्टॅक्ट’च्या आरती किर्लोस्कर, पारूल मेहता, आदिती भेंडे, राजू सुतार, लिसा पिंगळे, भानूबाई नानावटी महाविद्यालयाचे प्राचार्य अनूराग कश्यप, भारती विद्यापीठ अर्किटेक्ट महाविद्यालयाचे किरण शिंदे यावेळी उपस्थित होते.

याबैठकीचे संयोजन रवी चौधरी, चंदा पाटील यांनी केले होते.

‘ब्रँडिंग पुणे’ साठी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा घडविली पाहिजे. ब्रँडिंगच्या वास्तू केल्या पाहिजेत आणि हेरिटेज पर्यटनाला चालना दिली पाहिजे. ‘सायन्स पार्क’ च्या उभारणी साठी गती देण्याबरोबर फुलपाखरू उद्यान, पुणे शहराची प्रवेशद्वारे, पेशवे पार्कचे उर्जा उद्यान पुन्हा सुरू करणे अशा मुद्यांवर अतिरिक्त आयुक्तांनी सकारात्क प्रतिसाद दिल्याचेे खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकाद्वारे सांगितले.

पर्यटन प्रकल्पांना पाठपुरावा करण्यासाठी विविध क्षेत्रातील पुणेकर नागरिकांची समिती स्थापन करण्याची सूचना अ‍ॅड.वंदना च्वहाण यांनी केली.

नदी पात्रात सातत्याने राडारोडा टाकला जात असल्याकडे खा.चव्हाण यांनी अतिरिक्त आयुक्तांचे लक्ष वेधले. कचरा व्यवस्थापनाचा आराखडा, ‘अ‍ॅमिनीटी स्पेस’चे मॅपिंग यावरही चर्चा झाली.

घुमान रेल्वे प्रवासासाठी 900 जागा शिल्लक: भारत देसडला संमेलनासाठी नाटय-चित्रपटातील मान्यवर सेलेब्रिटीजचीही हजेरी

0

पुणे: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घुमान (पंजाब) येथे होणाऱ्या 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या साहित्यप्रेमींची संख्या 1,400 पर्यंत गेली असून आणखी 900 जागांची नोंदणी करण्यासाठी येत्या 28 फेब्र्रूवारीपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे, अशी माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी सांगितली. विशेष महणजे या संमेलनाचे आणखी एक आकर्षण म्हणजे या संमेलनासाठी अनेक नामवंत नाटय-चित्रपट क्षेत्रातील सेलेब्रिटीजनीही सहभागी होण्याचे मान्य केले आहे, असेही त्यांनी जाहीर केले आहे.

संमेलनाला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाडयांसाठी प्रवास तसेच घुमानमध्ये निवास आणि भोजन व्यवस्थेसाठी प्रतिनिधी शुल्क म्हणून 3,000 रुपये आकारण्यात येणार आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या संमेलनासाठी या दोन रेल्वे गाडया अनुक्रमे मुंबईत वसईपासून तर दुसरी गाडी नाशिक रोड, नाशिक येथून 1 एप्रिल रोजी सोडण्यात येणार आहेत. या रेल्वे बोगींना विविध दिवंगत साहित्यिकांची नावेही देण्यात येणार असून त्या त्या बोग्यांमध्ये त्या साहित्यिकाने लिहिलेले साहित्यही ठेवण्यात येणार असल्याचे संमेलनाध्यक्ष देसडला यांनी सांगितले.

निमंत्रित, पत्रकार आणि स्वयंसेवकांच्या 300 जागा वगळता विशेष रेल्वे प्रवासासाठी अजूनही 900 जागा शिल्लक आहेत, असे सांगून ते म्हणाले की, प्रतिनिधी नोंदणी व अधिक माहितीसाठी 9665 055 055 या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्यावा.

तसेच www.sahityasammelanghuman.org या संकेतस्थळावर प्रतिनिधी शुल्क भरण्याचा अर्ज उपलब्ध आहेत.

संमेलनासाठी येणाऱ्या सेलेब्रिटीजमध्ये ज्येष्ठ अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष मोहन जोशी, तसेच गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, संगीतकार राहुल घोरपडे, अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावे, अभिनेत्री-नृत्यकार शर्वरी जेमेनिस, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्मिता तांबे, गायक त्यागराज खाडीलकर, उपेंद्र भट, अनुराधा कुबेर, अभिनेते संजय मोने, अश्विनी एकबोटे, भार्गवी चुरमुले, सुधीर गाडगीळ, वैभव जोशी, राजन पंडीत इत्यादींनीही संमेलनाला येण्याचे मान्य केले आहे.

संमेलनात सहभागी होण्यासाठी नांदेड येथून सचखंड एक्सप्रेसने 200 नागरिकांनी घुमान साहित्य संमेलनासाठी जाण्याचे निश्चित केले आहे, असे सांगून देसडला म्हणाले की, श्री संत शिरोमणी सावता महाराज साहित्य-कृषी दिंडीचे पंढरपूर ते घुमान आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीसाठी 350 साहित्य रसिकांनी नावनोंदणी केली आहे. तसेच इचलकरंजीवरून 250 साहित्य रसिकांनी संमेलनाला येण्याचे निश्चित केले आहे. नरसी नामदेव यांचे जन्मस्थळ असलेल्या हिंगोलीतून 100 साहित्य रसिकांनीही संमेलनाला येत असल्याचे कळवले आहे.

88व्या साहित्य संमेलनाचाच एक भाग म्हणून ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत विविध शाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालयातून दोन लाख कुटुंबांपर्यंत निमंत्रणे पाठविण्यात येत आहेत. तसेच राज्यातील सात हजार ग्रंथालयांना निमंत्रण पत्रेही यापूर्वीच धाडण्यात आली आहेत, असेही देसडला यांनी स्पष्ट केले.

‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचा शुभारंभ कवी संदीप खरे यांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे शुक्रवार, ता. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता करण्यात येत आहे.  या उपक्रमात अनेक साहित्यिकांना विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमंत्रित करण्यात आले असल्याचे देसडला यांनी सांगितले.

खोदाई दराबाबत लवकरच बैठक घेऊनतोडगा काढणार – खा. आढळराव पाटील

0

1

पुणे- : पुणे महानगरपालिकेने खोदाई दर वाढविल्यामुळे महावितरण कंपनीच्या पायाभूत आराखडा विकास कार्यक्रमाची कोट्यवधींची कामे सध्या ठप्प आहे. खोदाई दराबाबत तोडगा काढण्यासाठी लवकरच महावितरण व महानगरपालिकांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती पुणे जिल्हा विद्युत समन्वय समितीचे अध्यक्ष खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. आज ‘प्रकाशभवन’ येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत निरीक्षण शाखेच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा विद्युत समन्वय समितीची बैठक झाली. यावेळी खासदार श्री. आढळराव पाटील बोलत होते. या बैठकीला आमदार विजय काळे, आमदार गौतम चाबुकस्वार, आमदार सुरेश गोरे, आमदार सौ. मेधा कुलकर्णी, समितीचे सदस्य-सचिव व विद्युत निरीक्षक श्री. अंकुश रणवरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सर्वश्री भालचंद्ग खंडाईत, शिवाजी चाफेकरंडे, अंकुश नाळे, सतीश चव्हाण, अनिल भोसले, दिलीप पडळकर, महापारेषणचे अधीक्षक अभियंता श्रीमती विजया मुखेडकर, श्री. संजय भोळे तसेच ग्राहक प्रतिनिधी श्री. राजेंद्र पायगुडे, श्री. अशोक मोडवे आदींसह शासनाच्या विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीत पुणे जिल्ह्यातील वीजस्थिती, विविध कामे
व माहितीचे महावितरणच्या वतीने अधीक्षक अभियंता श्री. भालचंद्ग खंडाईत व महापारेषणच्या वतीने अधीक्षक अभियंता श्री. संजय भोळे यांनी सादरीकरण केले.
या बैठकीत रस्ता रुंदीकरणातील वीजयंत्रणा हटविणे, महावितरणची वीजयंत्रणा उभारण्यासाठी इतर शासकीय विभागांच्या जागा उपलब्ध करून देणे, कडूस आणि चाकण पाणीपुरवठा योजनेची थकबाकी भरून ती कार्यान्वित करणे, दुर्गम भागातील गावांत वीजयंत्रणांचे सक्षमीकरण, ग्रामपंचायतीकडून वीजबिलाचे वाचन व वाटप, विविध योजनांची अंमलबजावणी आदी मुद्‌द्यावर चर्चा करण्यात आली. याशिवाय वीजचोरीविरोधी मोहिमेसाठी महावितरणच्या दक्षता व सुरक्षा विभागासह महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील पोलीस दलाचे सहकार्य घेण्याची सूचना बैठकीत करण्यात आली.
यावेळी समितीचे अध्यक्ष खासदार श्री. आढळराव पाटील म्हणाले, ‘वीज ही मुलभूत गरज आहे आणि वीजप्रश्न सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत आहे. त्यामुळे महावितरण, महापारेषणचे विविध प्रश्न शासनाच्या इतर विभागांच्या समन्वयातून त्वरीत निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल’. यावेळी महावितरणच्या वीजचोरीविरोधी मोहिमेला उपस्थित लोकप्रतिनिधींनी पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले.बैठकीचे प्रास्ताविक समितीचे सदस्य सचिव श्री. अंकुश रणवरे यांनी केले तर कार्यकारी अभियंता श्री. आनंद रायदूर्ग यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. महावितरण व महापारेषणचे जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता, अधिकारी आदी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश . बापट यांची विविध प्रश्नांवर चर्चा
जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज महावितरणच्या ‘प्रकाशभवन’ कार्यालयास भेट दिली व पुणे शहरासह जिल्ह्यातील विजेच्या विविध
योजना, प्रश्नांवर चर्चा केली. आज झालेल्या विद्युत समन्वय समितीच्या बैठकीतील मुद्‌द्यांची तसेच जिल्हा नियोजन समितीकडून मिळणार्‍या निधीबाबत माहिती घेतली. महापालिकेने खोदाई दरवाढीवर लवकरच तोडगा काढण्याचे ना. श्री. बापट यांनी आश्वासन दिले. यावेळी पुणे जिल्हा विद्युत समन्वय समितीचे अध्यक्ष खासदार श्री. आढळराव पाटील यांच्यासह महावितरण व महापारेषणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स . प महाविद्यालयाचे प्राचार्य सेठ यांना अटक -पुण्यात खळबळ

0
पुणे- एसपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांना आज पोलिसांनी अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्यासह कॉलेजमधील तिघांना अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे.
पुण्याच्या समाजकल्याण विभागाने डॉ. दिलीप शेठ यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार दिली होती. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतल्याने शेठ यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी 2012 मध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आता अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
डॉ. दिलीप शेठ यांच्यासह तिघांना पुण्यातील कोर्टात सादर केले जाणार आहे. त्यानंतर पोलिस किंवा न्यायालयीन कोठडीचा निर्णय घेतला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांना सलामी देताना महिला फौजदार घेरी येवून पडली

0

1

नाशिक – नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीचा १११ व  दीक्षांत समारोह साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५४३पोलिस उपनिरीक्षकांना सन्मानित केले. समारंभापूर्वी नव्या उपनिरिक्षकांनी मुख्यमंत्र्यांनी सलामी दिली. त्या परेडमध्ये एक महिला उपनिरीक्षक घेरी येवून कोसळली आणि बेशुद्ध झाली . त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पहा रंग बेरंगी दुनिया … स्वतः अभिनेत्री असूनही १४ वर्षीय मुलीला अभिनेत्री बनविण्यासाठी शरीरसंबधास भाग पाडले । अभिनेत्रीचाच केला एका संस्थेने पर्दाफाश …

0

चेन्नई,  – अनेकवेळा मुलांना काम मिळत नाही मात्र मुलींना कामे कशी पटकन मिळतात अशी तक्रार नेहमीच सिने सृष्टीत ऐकायला येते या पार्श्वभूमीवर याहून धक्का देणारी गोष्ट उघडकीस आली आहे . सिनेसृष्टीत काम मिळवण्यासाठी स्वतःच्या १४ वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलणा-या एका अभिनेत्री आई ला चेन्नई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी  दिग्दर्शक, संबंधीत अभिनेत्री व एका महिला दलालाला अटक केली असून पिडीत मुलीची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

चेन्नईतील समाजसेवी संस्थेला दक्षिणेतील सिनेमांमध्ये काम करणा-या अभिनेत्रीने तिच्या पोटच्या मुलीलाच वेश्या व्यवसायात ढकलल्याची माहिती मिळाली होती. या संस्थेने पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा छडा लावला. संस्थेचे दोन कार्यकर्ते अभिनेत्रीच्या मुलीचे छायाचित्र घेऊन राजेश्वरी नामक महिलेकडे दिले. या मुलीसाठी दीड लाख रुपये मोजावे लागतील असे राजेश्वरीने सांगितले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दहा हजार रुपये दिले व उर्वरित पैसे मुलीला बघितल्यावर देऊ असे सांगितले. यानुसार राजेश्वरी त्या मुलीला घेऊन हॉटेलमध्ये दाखल झाली. मुलीची ओळख पटताच पोलिसांनी हॉटेलमध्ये धाड टाकून तिची सुटका केली.

पिडीत मुलीची आई अभिनेत्री असून मुलीनेही अभिनेत्री व्हावे असे तिला वाटत होते. हा प्रकार राजेश्वरी व दक्षिणेतील दिग्दर्शक सेंथामिल अरासू यांना समजला. त्यांनी अभिनेत्रीशी संपर्क साधून तिच्या मुलीला सिनेसृष्टीत काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यामोबदल्यात तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. या धक्कादायक प्रकारात अभिनेत्रीनेही राजेश्वरी व आरोपी दिग्दर्शकाला साथ दिली. पिडीत मुलीला सिनेसृष्टीत काम देण्याच्या बहाण्याने आरोपी दिग्दर्शकाने त्या मुलीला अनेकांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. तसेच त्यानेही पिडीत मुलीशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. पिडीत मुलीने दक्षिणेत सिनेमांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत.  तर तिच्या आईनेही दक्षिणेतील मालिका व काही सिनेमांमध्ये काम केले आहे.

‘अनबिटेबल डान्स अ‍ॅकॅडमी’ संघाने पटकाविले ‘राष्ट्रवादी बेस्ट डान्स 2015’ पारितोषिक

0

1

पुणे :

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर व साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘डान्स पुणे डान्स 2015’ या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘राष्ट्रवादी बेस्ट डान्स ग्रुप 2015’ हे पारितोषिक ‘अनबिटेबल डान्स अ‍ॅकॅडमी’(वारजे माळवाडी) या संघाने पटकाविले.
स्पर्धेच्या आयोजक  खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण आणि संयोजक सनी मानकर यांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेस महापौर दत्ता धनकवडे , सुभाष जगताप (सभागृह नेते), बापूराव कर्णे गुरुजी (स्थायी समिती अध्यक्ष) यांचे सहकार्य लाभले. ‘राष्ट्रवादी बेस्ट डान्स ग्रुप 2015’  रोख बक्षिस एक लाख रुपये व मानचिन्ह असे या बक्षीसाचे स्वरूप होते.

स्पर्धेची अंतिम फेरी बालगंधर्व रंगमंदिर येथे दि. 10 फेब्रुवारी रोजी पार पडली. या फेरीत 200 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून 80 स्पर्धकांची निवड करण्यात आली. यामध्ये समुह नृत्य स्पर्धेमध्ये लहान गट व मोठा गट, खुला गटामध्ये सोलो डान्स, ग्रुप डान्स, कल्चरल डान्स, क्लासिकल डान्स स्पर्धा घेण्यात आली होती. अंतिम फेरीत मराठी, हिंदी, कोळी गीतांचा सहभाग होता.

या स्पर्धेत  सोलो डान्स स्पर्धा प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यास सायकल, ग्रुप डान्स प्रथम विजेत्यास एल. सी.डी. टीव्ही, द्वितीय क्रमांकास 5.1 साऊंड सिस्टिम, तृतीयास 2.1 साऊंड सिस्टिम तर सोलो डान्स प्रथम, द्वितीय क्रमांकास टॅब, अशी बक्षिसे देण्यात आली.

यावेळी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, लक्ष्मीकांत खाबिया (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),  माजी नगरसेवक विकास दांगट, महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर,  मनाली भिलारे (पुणे शहर राष्ट्रवादी युवती अध्यक्ष), आनंद रिठे (सामाजिक न्याय विभाग, पुणे शहर अध्यक्ष),  अप्पा सुतार, मिलिंद वालवडकर, श्‍वेता होनराव, राहुल कुमठेकर आणि व्यंकटेश भोंडवे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी  व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————

व्हॉट्सऍप वापरताय मग वाचा या सुरक्षाविषयक सूचना

0

 

इसेट, गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून सक्रीय सुरक्षेच्या बाबतीत जगात अग्रस्थानी असून, व्हॉट्सऍपचा वापर करणाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक चॅट्सवर सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षाविषयक सर्वोच्च सूचना युजर्सना देत आहेत. व्हॉट्सऍपने अलिकडेच घोषित केले आहे की त्यांचे ७०० दशलक्षहून अधिक सक्रीय सदस्य आहेत, आणि एका महिन्यात एकंदर ३० बिलीयन संदेश पाठवित असतात. वैयक्तिक माहिती पाठविण्याचं हे प्रमाण महाप्रचंड आहे, आणि व्हॉट्सऍप आपले सर्व संदेश आणि डेटा आता एनक्रीप्ट करत असले तरीही, आपल्या चॅट्सच्या बाबतीत सुरक्षित राहणे फायद्याचे ठरते. व्हॉट्सऍप सुरक्षेविषयक अत्यंत महत्वाच्या सूचना पुढे दिल्या आहेत.

व्हॉट्सऍप लॉक करणे

एक सर्वात उत्तम उपाय म्हणजे व्हॉट्सऍपला एक पासवर्ड किंवा पिनद्वारे सुरक्षित करणे. व्हॉट्सऍप स्वतःहून असा पर्याय देत नाही, परंतु काही तृतिय पक्षांचे ऍप्स अशी सुविधा देतात. हे कदाचित त्रासदायक वाटू शकते, परंतु आपला फोन हरवला तर, अन्य कोणी व्यक्ती आपल्या चॅट्स पाहू शकणार नाही. मेसेंजर आणि चॅट लॉक, लॉक फॉर व्हॉट्सऍप आणि सिक्युअर चॅट हे तीन अँड्रॉईड ऍप्स अशी सुविधा देतात.

व्हॉट्सऍप फोटोज फोटोरोलमध्ये येण्यास प्रतिबंध करणे

आपली व्हॉट्सऍपवरील संभाषणांचं स्वरूप काहीवेळेस अतिशय ‘वैयक्तिक’ होऊन जातं हे आपण सहजच समजू शकतो. आपण आपल्या महत्वाच्या व्यक्तिंसोबत इमेजेस शेअर करत असाल तर, त्या इमेजेस आपल्या सर्वसाधारण फोटोस्ट्रीम येऊ नयेत अशीच आपली इच्छा राहील, अन्यथा तुमचा मित्र तुमच्या हॉलीडे स्नॅप्समध्ये स्वाईप करताना ती त्याला दिसतील.

iPhone वर, हे सहजपणे करता येतेः आपल्या फोनच्या सेटींग्ज मेन्यूमध्ये जा, नंतर ‘प्रायव्हसी’, ‘फोटोज’, मध्ये जा आणि फोटोस्ट्रीममध्ये ज्यांच्या इमेजेस फीड होतात त्या ऍप्सच्या यादीतून व्हॉट्सऍप काढून टाका.

अँड्रॉईड युजर्सना थोडंसं बुरख्याखाली जावं लागेल. ES फाईल एक्स्प्लोररसारखं एखादं फाईल एक्स्प्लोरर ऍप वापरून, व्हॉट्सऍपचे ‘इमेजेस’ आणि ‘व्हिडीओज’ फोल्डर्स शोधा. प्रत्येकामध्ये ‘.nomedia’ नावाची एक फाईल तयार करा. म्हणजे अँड्रॉईडची गॅलरी त्या फोल्डरचे स्कॅनिंग करणे थांबवेल.

दुसरं, आपण आपल्या फोटोरोलमधून व्हॉट्सऍप इमेजेस वगळल्या, आणि ऍप वरीलप्रमाणे लॉक केले तर, तुमचा फोन चोरीला गेला किंवा हॅक झाला तर सुरक्षेचा आणखी स्तर पुरविला जातो – परंतु हा १०० टक्के सुरक्षित उपाय नाही.

 

 

लास्ट सीनटाईमस्टँप हाईड करणे

तुम्ही ऑन आणि ऑफलाईन केव्हा येता हे लोकांना कळले पाहिजे किंवा नाही याची खात्री नाही का? ही काही महत्वाची माहिती असणार नाही, परंतु एखाद्या स्कॅमरला तुमच्याबाबत काही गोष्टी आधीच माहिती असतील तर, संदर्भयुक्त माहितीचा हा शेवटचा धागा जोडण्यामुळे त्यांना उपयुक्त ठरू शकते – मग तुम्ही जागे असाल अथवा नाही; घरी असाल किंवा परदेशी; चित्रपट गृहाच्या बाहेर येत असाल किंवा विमानातून उतरत असाल. किंवा तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट्सना – विशेषतः सहकारी, किंवा तुमचा बॉस – तुम्ही तुमच्या डेस्कवर व्हॉट्सऍप चेक करत आहात हे माहिती होऊ न देण्याची इच्छा असेल. व्हॉट्सऍपच्या प्रोफाईलमध्ये तुमची ‘लास्ट सीन’ वेळ निष्क्रीय करू शकता किंवा ती कोण पाहू शकेल त्यावर निर्बंध घालू शकता; अँड्रॉईड, iOS, विंडोज किंवा ब्लॅकबेरीमध्ये ‘प्रायव्हसी’ मेन्यू. तरी लक्षात घ्या, की तुम्ही ते ऑफ केले तर, तुम्ही इतर युजर्सचे ‘लास्ट सीन’ वेळादेखील पाहू शकणार नाही.

प्रोफाईल चित्राचा ऍक्सेस निर्बंधित करणे

तुमच्या प्रोफाईलचा फोटो तुम्ही अन्यत्र वापरला आहे का – लिंक्डइन, फेसबुक किंवा ट्विटरवर? तो तुमच्या कंपनीच्या वेबसाईटवर देखील कुठेतरी असू शकतो. तसं असेल तर, तुमचे व्हॉट्सऍप शेअरींग सार्वजनिक राहील, तुम्ही ज्या कोणाशी बोलाल त्यांसाठी – मग तुम्ही एखाद्या अनावश्यक संदेशाला उत्तर दिले असले तरीही. – ते तुमच्या व्हॉट्सऍप प्रोफाईलवरून तुमचे चित्र डाऊनलोड करू शकतात, आणि गुगल इमेज सर्च वापरून, तुमच्याबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात. प्रायव्हसी मेन्यूमध्ये प्रोफाईल पिक्चर शेअरींग “कॉन्टॅक्ट्स ओन्ली” असे शेअर करा.

स्कॅम्सबाबत दक्ष राहा

व्हॉट्सऍप कधीही या ऍपद्वारे तुमच्याशी स्वतःहून संपर्क साधणार नाही. तसेच, व्हॉट्सऍप चॅट्स व्हॉईस मेसेजेस पेमेंट बदल, फोटोज, किंवा व्हिडीओजबाबत ईमेल्स पाठवत नाही, आपण त्यांच्या मदत कक्ष आणि सपोर्टला इमेल केलेला असल्याखेरीज. कोणीही मोफत सबस्क्रीप्शनची ऑफर दिली, आणि व्हॉट्सऍपकडून आल्याचा दावा केला किंवा तुम्हाला तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी लिंक्स घेण्यास प्रोत्साहन दिले तर तो नक्कीच स्कॅम असेल आणि त्यावर विश्वास ठेवू नये.

तुम्ही तुमचा फोन हरवला तर व्हॉट्सऍप अकार्यान्वित करणे

तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तुमचे खाते नियंत्रणात ठेवण्यासाठी सोप्या आणि प्रभावी सुरक्षाविषयक सूचना व्हॉट्सऍप युजर्सना देते. तुमच्या नेटवर्क पुरवठादाराच्या माध्यमातून तुमचे सीम कार्ड लॉक करण्यासोबतच. व्हॉट्सऍप शिफारस करते की तुम्ही सीम रिप्लेस करून अन्य फोनवरून त्याच फोनक्रमांकाद्वारे व्हॉट्सऍप कार्यान्वित करा.  हे ऍप केवळ एका क्रमांकाद्वारे एकावेळी एका उपकरणावर वापरता येते, त्यामुळे असे करण्याद्वारे तुम्ही त्याचा वापर तुमच्या जुन्या फोनवर होण्यास तत्काळ प्रतिबंध घालू शकता. असे करणे शक्य नसेल तर, व्हॉट्सऍप तुमचे खाते अकार्यान्वित करेल.

 

 

तुम्ही काय बोलत आहात त्याबद्दल काळजी घ्या

शेवटी पण अत्यंत महत्वाचे म्हणजे, कोणत्याही डिजीटल कम्युनिकेशनबाबत आपण वापराल तसंच तारतम्य इथेही बाळगा. तुम्ही शक्यतो टाळू शकत असाल तर वैयक्तिक माहिती पाठवू नका – पत्ते, फोन क्रमांक, ईमेल पत्ते – आणि कधीही तुमचा बँक, सामाजिक सुरक्षा किंवा क्रेडीट कार्ड तपशील, किंवा तुमचा पासपोर्ट किंवा अन्य ओळखीचा तपशील पाठवू नका.

‘आप ‘च्या ६७ आमदारांत एक मराठी आमदार

0

दिल्लीतील जंगपुरा विधानसभा मतदारसंघात आम आदमी (आप) पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आलेले प्रवीणकुमार देशमुख हे मूळचे  मराठी आहेत. अण्णा हजारे यांच्या  आंदोलनावेळी प्रविणने नोकरी सोडून दिली. त्यानंतर केजरीवाल यांनी आपची स्थापना केल्यानंतर प्रवीण आपमय झाला. दिल्लीत 2013 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपसाठी प्रविणने जोरदार काम केले. त्यानंतर आपच्या पहिल्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री झालेल्या मनीष सिसोदिया यांचे ओएसडी म्हणून काम पाहिले आहे. प्रवीणकुमारने आपला विजय हा प्रामाणिक व सत्य याचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे. प्रवीणने टीआयटी कॉलेजमधून वर्ष 2008 मध्ये MBA केले आहे. भोपाळमधील अयोध्या बायपासजवळ प्रकाशनगर येथे त्यांचे कुटुंब राहते. एका चांगल्या नोकरीसाठी प्रविण दिल्लीत गेला होता. नोकरी चांगली मिळाली पण अण्णांच्या आंदोलनात सहभागी होत नोकरी सोडून दिली.प्रवीणचे वडील पी एन देशमुख भोपाळमधील एका पुलाच्या खाली टायर रिमोल्डिंग आणि पंक्चर काढण्याचे दुकान चालवतात. आता भोपाळमधील त्यांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी रांग लागली आहे. प्रवीणचे आई-वडिल यांनी महिनाभर झाले दिल्लीत तळ ठोकला आहे. आता ते केजरीवाल यांचा शपथ ग्रहण समारंभ पूर्ण करून परतणार नाहीत.रवीण कुमार याच्याकडे खूपच तोकडी संपत्ती आहे. त्याच्याकडे रोख 20 हजार रुपये आहेत. तर, 6 हजार रुपये वसंत कुंज येथील आयसीआयसीआय बॅंकेत तर भोपाळमधील सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया यात 1 हजार रुपये जमा आहेत. 2 लाख रुपयाची एलआयसी पॉलिसी आहे. याशिवाय भोपाळमध्ये त्याच्या नावावर 600 स्क्वेअर फूटाचा एक प्लॉट आहे. ज्याची बाजारकिंमत 5 लाख रूपये आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रविणकुमारने ही माहिती दिली आहे.

भाजपाचे खडसे च सारे करतात -मी काय नावाचाच मंत्री आहे काय ? शिवसेनेच्या राज्य मंत्र्यांचा सवाल

0
मुंबई-  मी घेतलेला निर्णय खडसे बदलतात -फिरवून टाकतात मग मी काय केवळ नावाचाच- मिरवायला मंत्री आहे काय असा सवाल करीत शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी राज्यामान्त्रीपादाचा राजीनामा पक्षाकडे पाठविला आहे .
त्यांच्या खात्याचे कॅबिनेटमंत्री एकनाथ खडसे हे आपल्याला काम करण्याची संधी देत नसल्याचे सांगत  आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव यांनी सर्व आमदार-खासदारांची बैठक पुढील दोन दिवसात मातोश्रीवर बोलावली असून त्यानंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, आम्हाला फक्त लाल दिव्याची गाडी दिली गेली आहे. महसूल राज्यमंत्री असूनही मदत व पुनर्वसन खाते दिलेले नाही. महसूल खात्यातही खडसेंनी कोणतेही काम करण्याची संधी दिली नाही. मी घेतलेल्या निर्णय अधिका-यांना फिरवण्यास सांगतात. त्यामुळे मी फक्त नावालाच मंत्री आहे असे मला वाटू लागले आहे. जर अशीच वागणूक देणार असेल तर आपण मंत्री म्हणून काम करण्यास इच्छुक नाही. त्यापेक्षा एक शिवसैनिक म्हणून लोकांची कामे करण्यास मला आवडेल असे संजय राठोड यांनी म्हटले आहे.

ओबामाही कमळात प्राण फुंकू शकले नाही – उद्धव ठाकरे

0

मुंबई,

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना वाजतगाजत दिल्लीत आणण्यात आले. मात्र ओबामाही भाजपाच्या कमळात प्राण फुंकू शकले नाही असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. मोदींचे ब्रह्मास्त्र आणि अमित शहांची जादू दिल्लीत चालली नाही असा पुनरुच्चारही उद्धव ठाकरे यांनी केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला कानपिचक्या दिल्या आहेत.भाजपाला बोटावर मोजता येतील ऐवढ्याच जागा मिळाल्या असून याचे खापर फक्त किरण बेदींवर फोडून चालणार नाही असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.  फक्त घोषणा व भाषणांवर निवडणूक  जिंकता येत नाही असे त्यांनी भाजपाला सुनावले आहे. प्रत्येक वेळेला पक्ष कार्यकर्त्यांवर बाहेरुन आणलेला उमेदवार लादून चालणार नाही आणि मतदारांना गृहीत धरता येत नाही हे दोन धडे भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीतून शिकायला हवे असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला.

जगभरातील प्रसिद्धी माध्यांमध्ये अरविंद केजरीवालांबाबत चर्चा

0

गार्डियन लंडन, वॉशिंग्टन पोस्ट, न्यू यॉर्क टाइम्स, डॉन, डेली स्टार आणि डेली मिरर श्रीलंका यासारख्या नामांकित प्रसिद्धी माध्यमांनी दिल्ली निवडणूक निकालाचे वृत्तांकन केले. तसेच बांग्लादेशमधील डेली स्टार या वृत्तपत्राने आपल्या विशेष संपादकीयमध्ये या विजयाची मीमांसा केली आहे.

द वॉशिंग्टन पोस्ट:

दिल्लीचा निकालाने मोदी आणि सत्ताधारी पक्षाची पिछेहाट

जवळपास वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन टीकेचे धनी झालेल्या केजरीवाल यांनी या विधानसभा निवडणुकीत झोकात पुनरागमन करीत जोरादार मुसंडी मारली. ७० पैकी ६७ जागा जिंकून ऐतिहासिक विजयाला ‘आप’ने गवसणी घातली आहे.

द न्यू यॉर्क टाइम्स:

आम आदमी पक्षाचा दिल्ली निवडणुकीत विजय

काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदींनी मिळविलेला ऐतिहासिक विजयानंतर काल राजधानी दिल्लीमध्ये नुकताच उदयास आलेला भ्रष्टाचार विरोधी पक्ष ‘आप’ने देखील राजकीय भूंकप घडवला आहे.

 

डॉन:

नरेंद्र मोदींनी दिल्ली निवडणुकीतील पराभव केला मान्य

दिल्ली निवडणूक निकालाचे कल पाहता ‘आम आदमी पक्ष’ दिल्ली काबीज करणार हे स्पष्ट झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराभव मान्य केला आहे. तसेच केजरीवाल यांना फोन करुन शुभेच्छा देखील दिल्या. तसे ट्विट देखील त्यांनी केले आहे.

द गार्डियन:

भ्रष्टाचार विरोधी पक्षाचा नरेंद्र मोदींना जोरदार धक्का, दिल्ली निवडणुकीत क्लीन स्विप…

या निकालाचा भाजपला जोरदार फटका बसला आहे. २०१४ मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभेत अभूतपूर्व विजय मिळविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत मात्र पराभवाची चव चाखावी लागली आहे.

डेली स्टार: (विशेष संपादकीय)

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने अभूतपूर्व असा विजय संपादन केला असून केंद्रात असणाऱ्या सत्ताधारी भाजपला चांगलाच धक्का दिला आहे.

या निकालांनी राजकीय पक्षांनाच नव्हे तर अनेक राजकीय तज्ज्ञांना देखील चक्रावून सोडले.

डेली मिरर श्रीलंका:

दिल्ली निवडणुकीत ‘आप’चा एकहाती विजय

नरेंद्र मोदींचा विजयी रथ रोखत ‘आम आदमी पक्षा’ने एकहाती विजय मिळवित भाजप आणि काँग्रेसला क्लीन स्वीप दिली आहे.

 

सच्चे का बोलबाला … वाहः दिल्ली व्वा । दिल्लीकरांना सलाम …

0

दिल्ली की 70 में से 67 पर आप जीत रहे हैं.;ये दिल्ली की जीत है.बस अब खुद में अहंकार लाये बिना दिल्ली की सेवा करनी है!जय हिन्द!— अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली, – अवघ्या देशभराचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला भक्कम आघाडी मिळाली आहे. दिल्लीत आप तब्बल ६६ जागांवर आघाडीवर असून भाजपा फक्त ३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. दरम्यान केजरीवालांच्या नेतृत्त्वात दिल्ली आता जागतिक दर्जाचे शहर बनेल अशी अपेक्षा असे वक्तव्य किरण बेदी यांनी केले आहे तसेच तसेच उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी  भाजपचे आभार मानून  विजयाबद्दल अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केले आहे यामुळे राजकीय समीक्षक बुचकळ्यात पडले असले तरी ‘ सच्चे का बोलबाला . झुठे  का मुह काला ‘ या उक्तीचा अनुभव आज देशात आला तमाम दिल्लीकरांना संपूर्ण भारताने जणू या निकालानंतर मनोमन सलाम केला आहे असे सोशल मिडीयावर चित्र होते . ‘हा अदभुत  विजय दिल्लीतील जनतेचा आहे. मात्र, विजयाचा अहंकार बाळगू नका. कारण याच अहंकारामुळेच भाजप, काँग्रेसचा पराभव झाल्याचे ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. केजरीवाल यांनी म्हटले आहे.दिल्लीतील भ्रष्टाचार आणि व्हीआयपी कल्चर संपुष्टात आले आहे. मी जनतेचा मुख्यमंत्री बनणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.

उत्कंठा वाढविणा-या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा फैसला आज झाला आहे. राजधानीतील तख्तासाठी भाजपा आणि आम आदमी पार्टी यांच्यात थेट लढत झाली . सकाळी ८ वाजता १४ केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. दिल्लीतील ७० जागांसाठी ६७३ उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीतील ६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.विविध वाहिन्यांच्या एक्झिट पोल्समध्ये आम आदमी पक्षाला कौल देण्यात आला होता. अपेक्षेप्रमाणे मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यापासून आम आदमी पक्षाने आघाडी घेतली. मतमोजणीच्या तासाभरानंतरच आपने बहुमताचा आकडा ओलांडत भाजपाला धक्का दिला.  चांदनी चौक या मतदारसंघात भाजपाच्या वाटेला फक्त ९१ मतं आली असून या मतदारसंघात भाजपा सध्या तिस-या स्थानावर आहे. विशेष बाब म्हणजे याच मतदारसंघाने लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नेते डॉ. हर्षवर्धन यांना भरभरुन मतं दिली होती.

१५ वर्ष दिल्लीत सत्तेवर असलेल्या काँग्रेसला २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत एकाही जागेवर विजयी मिळवता आलेला नाही. काँग्रेसच्या दृष्टीने ही अत्यंत निराशाजनक बाब असून या पराभवानंतर ‘प्रियंका गांधींना आणा, काँग्रेसला वाचवा’ अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. दिल्लीत शीला दिक्षीत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सत्तेवर होता. तब्बल १५ वर्ष दिल्लीचे तख्त काँग्रेसकडेच होते. मात्र २०१३ विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासारख्या नवख्या पक्षाने काँग्रेसच्या नाकी नऊ आणले. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत  काँग्रेस ८ जागांसह थेट तिस-या स्थानावर फेकला गेला. तर आम आदमी पक्षाने २८ जागांवर विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस अजय माकन यांच्या नेतृत्वाखाली उतरला होता. काँग्रेस पक्षनेतृत्वानेही दिल्लीत प्रचारसभा घेतल्या असल्या तरी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह नव्हता. याचे पडसाद निवडणुकीतही दिसून आले आहे. यंदाच्या निवडणूकीत काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही.