Home Blog Page 3625

विद्यार्थी चित्रपट महोत्सव – नायर, तनेजा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणार

0

पुणे- माहिती आणि प्रसारण मंत्रालय, फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) यांच्या वतीने आयोजित तिसरा राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट पुरस्कार आणि विद्यार्थी चित्रपट महोत्सव २४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.

या महोत्सवात देशविदेशातील २२ संस्थांमधील ६६ चित्रपट स्पर्धा विभागासाठी निवडण्यात आले असून, महोत्सवात साडेतीनशेपेक्षा जास्त लघुपट बघण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती एफटीआयआयचे संचालक डी. जे. नारायण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

चित्रपटाचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केले जाते. मागील वर्षीचा महोत्सव सत्यजित रे एफटीआयआय कोलकाता येथे झाला होता.

याविषयी बोलताना नारायण म्हणाले, महोत्सवाचे उद््घाटन २४ फेब्रुवारीला अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि दिग्दर्शक अदुर गोपालकृष्णन यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता एफटीआयआय येथे होणार आहे. महोत्सवात एकूण ३७५ चित्रपट, लघुपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. एफटीआयआय प्रीव्ह्यू थिएटर, मेन थिएटर येथे चित्रपट दाखविले जाणार आहेत महोत्सवामध्ये २५ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता क्र.१ च्या स्टुडिओमध्ये सुफी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मदन गोपाल सिंग, प्रीतम घोशाल, दीपक कॅस्टेलिनो आणि गुरुमितसिंग खोखार सादर करतील. २७ फेब्रुवारीला सायं. ६ वाजता याच ठिकाणी ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर हे एका बेन्जामिन ग्रुपबरोबर यादी हे नाटक सादर करणार आहेत.राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने गुरूंचा सन्मान म्हणून यावर्षीपासून एफटीआयआयमध्ये विद्यार्थी घडविणार्‍या शिक्षकांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. १९६२ ते नव्वदच्या दशकापर्यंत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना सिनेमॅटोग्राफीचे प्रशिक्षण देणारे के. पी. आर. नायर आणि १९६७ पासून आजपर्यंत विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे देणार्‍या रोशन तनेजा यांना पहिला जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

प्रशासकीय सेवेत बदल करणे आवश्यक — पृथ्वीराज चव्हाण

0

2 3 4

पुणे- नागरी विकासाच्या विभागासमोर वाढत्या नागरीकरणाचे फार मोठे आव्हान आहे. आताची

प्रशासकीय सेवा ही ब्रिटीशकालीन आहे. शहरांच्या वाढत्या नागरीकरणाच्या समस्येबरोबरच,

सांडपाणी, घनकचरा अशी अनेक आव्हाने आहेत. या समस्यांची सोडवणूक करण्याकरीता

प्रशासकीय सेवेत मोठे बदल करणे आवश्यक आहे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

यांनी व्यक्त केले.

पुणे महानगरपालिका व उपमहापौर आबा बागुल यांच्या पुढाकाराने बालगंधर्व रंगमंदिर येथे

‘लोकसखा’हा कृतज्ञता सोहळा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. १९५२ पासून ते आत्तापर्यंतच्या

पुणे महानगपालीकेत उपमहापौरपद भूषविलेल्या माजी उपमहापौरांचा विशेष सत्कार मानाचा फेटा,

शाल, मानपत्र, व त्यांचे रेखाचित्र प्रदान करून करण्यात आला. जुन्या काळातील उपमहापौर,

हयात नसलेल्यांचे कुटुंबीय याने भरलेले  व्यासपीठ, जेष्ठ नेत्यांनी जागविलेल्या आठवणी, प्रत्येक

उपमहापौराने आपल्या कारकिर्दीत केलेले पुण्याच्या विकासाठीचे योगदान अशा आठवणींना उजाळा

यानिमित्ताने दिला गेला आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या या माजीमहापौरांना व त्यांच्या

कुटुंबीयांनाही कृत्य-कृत्य झाल्यासारखे वाटले. यावेळी आत्तापर्यंतच्या सर्व उपमहापौरांची थोडक्यात

माहिती देणारी चित्रफित दाखविण्यात आली. माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते सर्व

माजी उपमहापौरांच्यावतीने आबा बागुल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी उपमहापौरांची

रेखाचित्र तयार करणाऱ्या अभिनवच्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जेष्ठ नेते उल्हास पवार, आमदार शरद

रणपिसे, आमदार दीप्ती चवधरी, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, माजी आमदार मोहन जोशी,

म्हाडाचे माजी अध्यक्ष अंकुश काकडे, उपमहापौर आबा बागुल, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.

विश्वजित कदम तसेच माजी महापौर व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महानगरपालिका हा लोकशाहीचा आत्मा आहे. नगरविकासाचे काम

यामाध्यमातूनच होत असते. विकासाचे नियोजन करणे, अर्थकारण, या सर्व गोष्टी याठिकाणी

केल्या जातात. ही कामे चांगल्या पद्धतीने करण्यासाठी जनता विश्वास टाकते व त्यामुळे

अनेकजन उपमहापौर पदापर्यंत पोहचले आहेत. प्रदूषण, वाहतुकीचे प्रश्न अशा इतरही समस्या

महानगरपालिकेसमोर आहेत. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक व्यापारीकरण

व औद्योगीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे मोठी  आव्हाने झपाट्याने वाढत आहेत.

त्याचा सामना करण्यासाठी चुका होवू न देणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

पुण्याच्या विकासात आजपर्यंतच्या सर्व उपमहापौरांनी भर टाकली आहे.  प्रत्येक उपमहापौराने

पुणेकरांची व आपापल्या पक्षाची सेवा केली आहे. आताच्या पिढीला आठवण होईल असे काम

केले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व पदाला सन्मान देण्यासाठी असा सोहळा

करणे आवश्यक आहे असेही चव्हाण यांनी नमूद केले.

गिरीश बापट म्हणाले, महानगरपालिकेतील राजकारणात रुसवे, फुगवे, मान, अपमान, खुन्नस

अशा सर्व गोष्टी असतात. परंतु त्याही पलीकडे जावून प्रत्येकाने एकमेकांना प्रेम दिले हे पुणे

महानगरपालिकेचे वैशिष्ट्य आहे. पक्षाची भूमिका मांडताना सभागृहात एकमेकांशी भांडत असलो

तरी नंतर कौटुंबिक वातावरण असते हा पुण्याचा सांस्कृतिक ठेवा आहे. राज्यात किंवा देशात

अशा प्रकारचे वातावरण बघयला मिळणार नाही. जास्तीत जास्त चांगले काम करणारा उपमहापौर

म्हणून उदाहरण द्यायचे झाल्यास आबा बागुल यांचेच उदाहरण द्यावे लागेल असे सांगून गिरीश

बापट म्हणाले, आबा बागुल यांनी सर्व माजी उपमहापौरांना एकत्र आणण्याचे कठीण काम केले

आहे. त्यामुळे आजचा हा सोहळा आगळावेगळा सोहळा आहे.

उल्हास पवार यांनी आपल्या भाषणात अनेक महापौरांच्या काळातील किस्से, प्रत्येकाच्या

व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये, त्यांची काम करण्याची हातोटी याच्या आठवनींना उजाळा दिला.

डॉ. सतीश देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, पुण्याच्या सार्वजनिक इतिहासात अशा

प्रकारचा हा पहिला कार्यक्रम असल्याचे सांगून आबा बागुल यांचे कौतुक केले.

दीपक मानकर म्हणाले, उपमहापौर हा केवळ आभार मानण्यासाठी नको. त्याला त्याची भूमिका

स्पष्ट मांडता आली पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची निवड ज्या पद्धतीने केली जाते त्या

पद्धतीने दिलेल्या योगदानाची व कार्याची दिशा घेवून महापौर व उपमहापौर पदाची निवड

व्हायला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

आबा बागुल आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाले, पुण्याच्या विकासात आजपर्यंत ज्या

उपमहापौरांनी योगदान दिले त्यांची उर्जा पुन्हा एकदा एकत्रित करावी हा या सोहळ्यामागचा हेतू

आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती ही पदे जशी घटनात्मक पदे  आहेत. तशीच महापौर व उपमहापौर हे

पडे आहेत. दोन्ही पदांना निवडून यावे लागते.त्यामुळे उपमहापौर पदही तितकेच महत्वाचे असून

त्याला अधिकार मिळणे आवश्यक आहे. पुण्यामध्ये पहिले  महापौर बाबुराव सणस यांचा पुतळा

आहे. त्याचप्रमाणे पहिले महापौर बापूसाहेब पारगे यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प आबा बागुल

यांनी यावेळी  व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक गोपाल तिवारी

यांनी केले.

एका सूटला चार कोटी रुपये मिळत असतील तर ..मोदींनी त्यांच्या कपड्याचा रोज लिलाव करावा – उद्धव ठाकरे

0
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका सूटला चार कोटी रुपये मिळत असतील तर मोदींनी त्यांच्या कपड्यांचा दररोज लिलाव करावा. या लिलावातून काळा पैसा बाहेर पडू शकेल असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूटवरुन उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखात उपरोधिक भाष्य केले आहे. महात्मा गांधींनी गरीबांच्या अंगावर पुरेशी वस्त्र नाहीत हे ब्रिटिशांना दाखवण्यासाठी साधा पंचा नेसला. त्या देशाचा पंतप्रधान ऐवढा महागडा सूट घालतो यावर नाहक टीका झाली असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. मोदींनी एकदाच घातलेल्या सूटला ऐवढे पैसे मिळत असतील तर त्यांनी दररोज नवनवे कपडे घालून त्याचा लिलाव करावा असा टोलाही त्यांनी लगावला.
सूटवरुन टीका करणा-या विरोधकांनाही उद्धव ठाकरेंनी धारेवर धरले आहे. राहुल गांधींनी त्यांचे कपडे, चपला, कंगवा, लालूप्रसाद यादव यांनी त्यांची पिकदाणी, मुलायमसिंह यादव यांनी त्यांची धोतर, अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे मफलर विकायला काढावे, त्याला किती मोल मिळेल हे त्यांनी बघून घ्यावे असे त्यांनी म्हटले आहे

कॉ . गोविंद पानसरे अखेर गेले … झुंज संपली

0

मुंबई -ज्येष्ठ विचारवंत, डाव्या चळवळीचे लढवय्ये नेते अॅड. गोविंदराव पानसरे (८२) यांची गेले पाच दिवस मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर शुक्रवारी रात्री अपयशी ठरलीपानसरे यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.  . आयुष्यभर विवेकाने विचारांची लढाई लढणाऱ्या पानसरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचा खंदा आधारस्तंभ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. पानसरे यांचे पार्थिव आज, शनिवारी सकाळी १०.३० वाजता कोल्हापुरात नेण्यात येणार असून, दुपारनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सोमवारी (ता. १६) सकाळी कोल्हापुरातील सागरमाळ परिसरात त्यांच्या घरासमोरच अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात त्यांच्यासह पत्नी उमा पानसरेंही जखमी झाल्या होत्या. हल्लेखोरांनी पानसरेंच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या. उपचारासासाठी पानसरे दाम्पत्याला अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. गेले चार दिवस सुरु असलेल्या उपचारांना पानसरे चांगला प्रतिसाद देत होते. त्यांच्यावरील अवघड शस्त्रक्रियाही यशस्वी झाल्या होत्या. प्रकृती स्थिर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मुंबईत हलविण्याचा निर्णय घेतला. सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मुंबईला हलविण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार दुपारी अॅस्टर आधारमधील डॉक्टरांच्या संमतीनंतर त्यांना एअर अॅम्बुलन्सने ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
रात्री दहाच्या सुमारास पानसरे यांच्या फुफ्फुसात रक्तस्राव सुरू झाला. तसेच त्यांच्या हृदयाचे कार्य थांबले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करूनही पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर पावणेअकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्यावरील उपचारांवर देखरेख करणारे डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

कॉ . गोविंद पानसरे लिखित
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील काही लिखाण आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

2

शिवाजीला सुद्धाज्ञानेश्वर, तुकाराम, म. गांधी यांच्यासारखं विकृत करायचा कार्यक्रम बराच काळ सुरू आहे. सध्याही चालू आहे. शिवाजी वतने देण्याच्या विरुद्ध हाेता. त्याने आयुष्यभर वतने देण्याचे टाळले. आताचे प्रस्थापित शिवभक्त नवी नवी वतने तयार करीत आहेत. वतनदारांना सांगत आहेत की तुमच्या वतनात तुम्ही हवं ते करा. रयतेला हवं तसं लुटा. खा, प्या, मजा करा. आमचे राज्य चालवायला आम्हाला मदत करा म्हणजे झालं. म्हणजे आम्हीसुद्धा रयतेला लुटू. तुम्ही थोड्या प्रमाणात लुटा. आम्ही मोठ्या प्रमाणात लुटू. तुम्ही हजारांत, क्वचित लाखांत खा. आम्ही कोटींत खाऊ.
शिवाजीच्या काळातील वतने आता नाहीत हे खरे. पण नवी वतने आणि नवे वतनदार वाढताहेत. झेड.पी.ची वतने सर्व जिल्ह्यात आहेत. साखरसम्राट म्हणजे नवे वतनदारच आहेत. वेगवेगळी कार्पाेरेशन्स म्हणजे वतनदाऱ्या आहेत. मोठ्या सहकारी संस्था, म्युनिसिपालट्या, आमदारक्या, खासदारक्या यांना वतनाचे स्वरूप आले आहे आणि या वतनदाऱ्या आता वंशपरंपरेने दिल्या घेतल्या जात आहेत…

रयतेच्या पोरीबाळींवर या नव्या वतनदारांचा डोळा आहे की नाही? बलात्कार होताहेत की नाही? रयतेच्या भाजीच्या देठालासुध्दा हात लावू नका म्हणून शिकवून गेलेल्या शिवाजीच्या महाराष्ट्रात नव्या राजांची, सरदारांची अन् वतनदारांची सरबराई करण्यात रयत रंजीस येते की नाही? आणि हे सारं “शिवाजी महाराज की जय’ म्हणत सुरू असतं. हे अगदीच भयानक. शिवाजी हे सारं पाहायला असता तर? त्यानं काय केलं असतं? तो नाही हे खरं आहे. तो स्वत: येणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. पण त्याची शिकवण आहे ना? त्याची शिकवण अंगी बाणून नव्या वतनदारांवर प्रहार करणं हेच खरं शिवाजीचं स्मरण करणं होय.
आज शिवाजीच्या नावानं आणि शिवाजीच्या जयघोषात हिंदू-मुसलमान दंगे होत आहेत. या धर्मांधांना सांगायला पाहिजे की शिवाजी धर्मांध नव्हता. हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवीत होता. पण मुसलमान धर्माचा द्वेष करीत नव्हता. श्रद्धावान होता पण अंधश्रद्ध  नव्हता.

 

श्री. पंडित उर्फ वसंत विष्णुपंत दामले यांचे दुःखद निधन

0
2
‘प्रभात’ फिल्म कंपनी निर्मित ‘संत तुकाराम’ या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपटात संत तुकारामांच्या मुलाची – महादूची भूमिका सकारणारे श्री. पंडित उर्फ वसंत विष्णुपंत दामले यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने वयाच्या ८७ व्या वर्षी दुःखद निधन झाले.  ‘संत तुकाराम’ बरोबरच ‘प्रभात’ च्या इतर चित्रपटांतही त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. प्रभात च्या कारकीर्दीचा आढावा घेणारे ‘प्रभात समयो पातला’ या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले होते.
वडील श्री. विष्णुपंत दामले यांनी चित्रपट क्षेत्रातील अनिश्चितता ओळखून श्री. पंडित दामले यांना इंजिनीअरिंग चे शिक्षण दिले. इंजिनीअर झाल्यावर त्यांनी सेवानिवृत्तीपर्यंत एअर इंडिया मध्ये चीफ ग्राउंड इंजिनीअर म्हणून काम पहिले. १ ल्या प्रभात पुरस्कारांच्या वेळी त्यांना ‘प्रभात चे शिलेदार’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

‘आयएमईडी’च्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव ‘एक्सप्रेशन 2015’ ची सांगता

0

पुणे :

‘भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव ‘एक्सप्रेशन 2015’ ची सांगता नुकतीच झाली. महोत्सवातील स्पर्धांमध्ये 45 महाविद्यालयातील 150 संघातून एकूण 1800 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते ‘एक्सप्रेशन 2015’ महोत्सवातील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

यावेळी प्रा.अनिल केसकर (अ‍ॅकॅडमिक्स सिम्बायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठाचे अधिष्ठाता) , सौ.केसकर, डॉ.ए.एम.गुरव (व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता, शिवाजी विद्यापीठ) आदी मान्यवर उपस्थित होते.

या महोत्सवाचे उद्घाटन ‘सायबर सेल’चे पुणे पोलिस उपायुक्त डॉ. संजय शिंदे आणि प्रकाश लिमये यांनी केले होेते. महोत्सवाला हेमंत अभ्यंकर, डॉ. भारत भूषण संकाय, माजी पोलीस अधिकारी प्रकाश लिमये, प्रभात कुमार, बलजित, श्री. महादे उपस्थित होेते.

महोत्सवाचे तांत्रिक, व्यवस्थापन, ललित कला आणि सादरीकरण या चार विभागात विभाजन करण्यात आले होते . या महोत्सवाला पी.एन.जी., पुणे फुटबॉल क्लब, बिग बझार, मदर्स रेसीपी, बँक ऑफ महाराष्ट्र, 1960 रेस्टॉरंट, डायनॅमिक्स पार्लर यांचे सहकार्य लाभले होते.

डॉ. शिंदे यांनी पहिल्या दिवसाच्या सत्रात राष्ट्रीय मालमत्ता, पायाभूत सुविधांचे ‘सायबर वॉर’मुळे नुकसान होत असेल, तर त्यापासून देशाला वाचविणे कसे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सचिन वेर्णेकर यांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थापनशास्त्र संस्थांनी ग्रामीण भागात, अविकसित भागात उद्योजकता वाढवून शाश्‍वत विकासाकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले.

या महोत्सवात सांस्कृतिक स्पर्धा, पोस्टर मेकिंग, फॅशन शो, फेस पेंटींग, रांगोळी, मेहंदी, अ‍ॅड मॅड शो असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

महोत्सवाचे विनय थापलिया, छबी, अरूणवा दत्ता, नेहा जसपाल, केतन यांनी संयोजन केले.

‘सकारात्मक,नावीन्यपूर्ण कल्पनांवर काम करा’ : डॉ.संजय बसू

0

पुणे :

‘भारतातील प्रगती दरडोई उत्पन्नामधून प्रतीत होत आहे. भारतीय कंपन्या जगात पुढे जाऊ शकतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारतातील विद्यार्थी, उद्योजक आणि मध्यमवर्गाने जागतिक भान ठेऊन सकारात्मक आणि नावीन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांवर भर द्यावा’ असे आवाहन ‘सँडविक एशिया लि.’चे कार्पोरेट सल्लागार डॉ.संजय बसू यांनी शुक्रवारी केले.

‘चेकमेट -15’ या 7 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ तर्फे  करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी.ए.इनामदार हे अध्यक्षस्थानी होते.

.‘व्यवस्थापनातील प्रभावी आणि नाविन्यपूर्ण पद्धती’ या विषयावरील ‘चेकमेट 15’ ही दोन दिवसीय परिषद शुक्रवार दि. 20 फेब्रुवारी व शनिवार 21 फेब्रुवारी 2015 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ऑडिटोरियम (आझम कॅम्पस ) येथे सुरु आहे. ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ चे संचालक डॉ. आर. गणेसन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर डॉ.रोशन काझी, प्रा.जावेद खान उपस्थित होते. भाग्यश्री चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ.बसू म्हणाले, ‘बाजारपेठेच्या गरजेनुसार नावीन्यपूर्ण कल्पना जन्माला येतात आणि बाजारपेठेला उपयुक्त वाटल्या तरच त्यांना वाव मिळतो. हे लक्षात घेतले तर भारतातील प्रबळ अशा उद्योजक, मध्यमवर्ग आणि विद्यार्थ्यांना जागतिकस्तरावर चमकण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोण ठेऊन नावीन्यपूर्ण कल्पनांचा पाठपुरावा केला पाहिजे. भारतातील खासगी क्षेत्र जागतिक स्पर्धेत उतरले असून अग्रस्थानी आहे. भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या चांगली कामगिरी नोंदवत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना पी.ए.इनामदार म्हणाले, ‘भारतीय व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांच्या प्रगतीत पैसा हा अडथळा नाही तर कष्ट करण्याची प्रवृत्ती, प्रामाणिकपणा आणि संशोधक वृत्ती मात्र प्रगतीसाठी आवश्यक आहे.’

‘सँडविक एशिया लि.’चे कार्पोरेट सल्लागार डॉ. संजय बसू हे या आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रा.एस. रंगनाथन, दीपक नंदा, किरण भट, अपूर्व नागपाल, तरुण मालविया, अमित अगरवाल, डॉ.दीपक मल्होत्रा, डॉ.रणजीव मानराव, झुबीन पूनावाला, संदीप दवे, पंकज कुमार हे वक्ते परिषदेत मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत.

तर विविध चर्चासत्रांना डॉ. प्रशांत गुंडावार, डॉ.डी.बी.भारती, डॉ.ए.यू.खान, डॉ.सचिन कदम, डॉ. अमोल गोजे, डॉ.ए.बी.राव हे अध्यक्षस्थान भूषवित आहेत.

राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या त्रिकुटाच्या अभिनयाने सजलेला “मनातल्या उन्हात”!! लवकरच सिनेमागृहात!!

0

स्वप्न ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात पाहिलेली असतात. या स्वप्नांमध्ये प्रत्येकाला रमायला आवडते. आपण पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरीने प्रयत्नांची पराकाष्टा करत असतो. काही जणांची स्वप्न पूर्ण होतात तर काही जणांच्या पदरी निराशा येते. आजची पिढीला आपण भावी आयुष्यात पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांचा त्यांना खंबीरपणे पाठींबा असतो.  आपली स्वप्न पूर्ण झाली नाहीत म्हणून आपले आई वडील खचून न जाता आपल्या मुलांच्या पदरी अशी वेळ येऊ नये यासाठी आज जीवाचे रान करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी आजच्या या महागाईच्या जगात राबताना आपल्याला दिसतात. आज कालची मुलं ही आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या धावपळीत असतात त्यामुळे आपल्या आई वडिलांची काही स्वप्न होती का? त्यांनी पाहिलेली त्यांची स्वप्न पूर्ण झाली, की नाही झाली? जर नसतील झाली तर ती आपण ती पूर्ण करू शकतो का? अशीच एक आगळी-वेगळी स्वप्नांची कथा असलेला “मनातल्या उन्हात” हा सिनेमा लवकरच आता आपल्या भेटीस येणार आहे. आनंदसागर सिनेनिर्मिती संस्थेच्या विजयश्री पाटील यांची पहिली-वहिली सिनेनिर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन पांडुरंग के. जाधव यांनी केले आहे.
संजय पाटील यांनी या सिनेमाची कथा मला जेव्हा ऐकवली तेव्हा ती मला खूप आवडली. आजच्या पिढीतील मुलांना एक उत्तम संदेश देणारी अशी या सिनेमाची कथा असून ती सर्वाना नक्की आवडेल असे मला वाटत असल्याचे दिग्दर्शक पांडुरंग के. जाधव यांनी सांगितले.
“मनातल्या उन्हात” या सिनेमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय पारितोषिक विजेते अभिनेते किशोर कदम, अभिनेत्री मिताली जगताप आणि बालकलाकार हंसराज जगताप या सिनेमात एकत्र आले असून रंगभूमीवर गाजत असलेल्या “शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहोल्ला” या नाटकातून आपल्याला अभिनयाचा ठसा उमटविणारा कैलास वाघमारे मुख्य भूमिकेतून या सिनेमात आपल्या भेटीस येणार आहे. तसेच अभिनेते नागेश भोसले, समीर धर्माधिकारी अभिनेत्री रुचिता जाधव, छाया कदम आणि बालकलाकार मंथन पाटील, ओविशिखा पाटील यांचा उत्तम अभिनय ही आपल्याला या सिनेमात पहायला मिळणार आहे. सिनेमाची कथा संजय पाटील यांची असून पटकथा विद्यासागर अध्यापक, पांडुरंग के. जाधव यांनी एकत्रितपणे लिहिली आहे तर संवाद विद्यासागर अध्यापक यांचे आहेत. नागराज दिवाकर यांनी या सिनेमाचे उत्तम छायांकन केले असून निलेश नवनाथ गावंड यांनी या सिनेमाचे संकलन केले आहे. विश्वराज जोशी यांनी लिहिलेल्या गाण्याला राहुल मिश्रा यांचे सुमधुर संगीत लाभले असून सिनेमातील गाणी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि गायिका रंजना जाधव- माने यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत तर पार्श्वसंगीत अश्विन श्रीनिवासन यांचे लाभले आहे.
काहीशा वेगळ्या धाटणीच्या विषयावर भाष्य करणारा “मनातल्या उन्हात” आता लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

शहरात विविध कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी

0

पुणे :

शिवजयंतीनिमित्त महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल व महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सकाळी प्रथम पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती व तांबडी जोगेश्‍वरीमातेचे पूजन केले. त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी असणार्‍या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापौर आणि उपमहापौरांनी एसएसपीएमएस शाळेतील व लालमहाल येथील राजमाता आणि शिवाजी महाराज यांचा पुतळा, कोथरूड येथील अश्‍वारूढ पुतळ्यास, तसेच सभागृहाजवळील त्यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवजयंती उत्सवानिमित्त लाल महाल येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम झाला.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. पक्ष कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते शफी मामू शेख यांच्याहस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. खासदार अँड़ वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी आनंद रिठे, शंकर शिंदे, शालिनी जगताप, समीर निकम, संजय लाड, आनंद कारंडे, सुरेश पवार, बाळासाहेब आहेर, दिनेश खैरे, योगेश वराडे, अविनाश वेल्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कॉंग्रेस भवन येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नीता राजपूत, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, श्ांकर राठोड, उमेश कंधारे, रामचंद्र भुवड, अतुल कारले, शशी बिबले, रविंद्र म्हसकर, राजू गायकवाड उपस्थित होते. पुणे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांनी महाराजांना पुष्पहार अर्पण केला. यावेळी सीमा सावंत, स्वाती कथलकर, गीता गारू, जया पारख, आरती गायकवाड आदी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.शिवजयंतीनिमित्त गुरुवारी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शिवरायांच्या अश्‍वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.शुक्रवार, २0 फेब्रुवारी २0१५पुणेशिवसंग्राम पुणे शहर व जिल्हा यांच्या विद्यमाने शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. महात्मा जोतिबा फुले यांनी सर्वांत प्रथम १८७४ साली शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक हिराबागेतून सुरू केली, त्याच ठिकाणाहून यंदाच्या मिरवणुकीचा प्रारंभ झाला. यावेळी तुषार काकडे, शिवराज मोरे, रविंद्र भोसले, स्वप्नील खडके, भोलाशेठ वांजळे, सचिन कांबळे, तानाजी गंभीरे, सागर फाटक, संजय ढोले यांनी परिश्रम घेतले.
कोथरूड ब्लॉक काँग्रेस कमिटी व अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्या हस्ते मार्केट यार्ड परिसरातील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रमुख पाहुणे युवराज बेलदरे-पाटील होते. नामदेव मानकर, अनिल मारणे, मीना जाधव, युवराज दिसले उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली. बीसीयुडीचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी व्याख्यान आयोजित केले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे लाल महाल येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास लीगल सेलच्या अध्यक्षा डॉ. चित्रा जानगुडे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महेश शिंदे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, वसंत बनसोडे, शांतिनाथ चव्हाण, हलिमा शेख, बंडू वाघमारे उपस्थित होते. शिवछत्रपती प्रतिष्ठान व टुडेज यूथ यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. किल्ले सिंहगड ते किरकीटवाडी अशी शिवज्योतीची मिरवणूक महिलांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी मशाल पेटवण्याचा मान महिलांनाच देण्यात आला होता. पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. मिरवणुकीच्या समारोपाच्या वेळी उपस्थित महिलांनी पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा केला.महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमधील २९ शैक्षणिक संस्थांच्या दहा हजार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी आज सकाळी शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढून शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. मिरवणुकीचे उद््घाटन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड़ अभय छाजेड, संभाजी ब्रिगेडचे संस्थापक-अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, डॉ. एन. वाय. काझी यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी एस. ए. इनामदार, अझीम गुडाकुवाला, मजिद उस्मान दाऊद, खालिद अन्सारी, अरीफ सय्यद, शराफत पानसरे, वाहिद बियाबानी, बद्रुद्दीन शेख, प्रा. डॉ. व्ही. एन. जगताप, डॉ. किरण भिसे, डॉ. शैला बूटवाला, मुमताज सय्यद, दानीश शेख, तसेच सर्व शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य व पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणुकीमध्ये संस्थेच्या कला महाविद्यालयाने सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावरील जन्मोत्सवाचा देखावा विशेष आकर्षण ठरला. दरबार बँडची दोन पथके, ढोल-ताशा, इंग्रजी माध्यम शाळेचे बँजो पथक सहभागी झाले होते. या उपक्रमांचे यंदाचे बारावे वर्ष आहे. मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी केले.

छ. संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील “छावा” 1 मार्च पासून रंगमंचावर

0

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा वादळी जीवनपट उलगडून सांगणारे छावा हे नवीन नाटक येत्या 1 मार्च रोजी रंगमंचावर येत आहे. गणेश कला, क्रीडा, मंच येथे सकाळी 10.30 वाजता या नाटकाचा शुभारंभ पार पडणार आहे. अशी माहिती शिवसुर्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष रामदास हरगुडे यांनी  दिली.
छ.संभाजी ही प्रमुख भूमिका साकारणारे डॉ.अमोल कोल्हे, ज्येष्ठ कलाकार रवी पटवर्धन, ;लेखक, दिग्दर्शक महेंद्र महाडिक, गायिका किर्ती पाठक, सत्यशिल दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शिवसुर्य परिवार निर्मित, राजदीप प्रॉडक्‍शन प्रस्तूत छावा या दोन अंकी ऐतिहासिक नाटकाच्या ध्वनीफितीचे प्रकाशन करण्यात आले. सात्विक ठकार यांनी हे गीतलेखन केले असून देवेंद्र भोमे यांनी संगीत दिले आहे.
शंभुराजांच्या प्रेरणादायी इतिहासाला तेवत ठेवण्याच्या उदेशाने सुरु करण्यात आलेल्या या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचे उदघटन खासदार उदयनराजे भोसले, युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव पाटील, आदी उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर आता संभाजीराजांच्या भूमिकेत काम करताना वाटलेल्या बदलाविषयी बोलताना डॉ.कोल्हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी व संभाजी या दोन्ही भूमिका प्रचंड आव्हानात्मक आहे. आवाज, शरीरयष्टी, संवाद, देहबोली, हालचाल, यासाजया गोष्टींमध्ये त’ावत आढळते. तरुणांनी एका युथ आयकॉनला सामोरे ठेवून वाटचाल करण्यासाठी संभाजीराजांचे विचार प्रत्येक तरुणापर्यंत पोहचविणे गरजेचे वाटते.छावा च्या निमिताने नाटयगृहात सादर होणाऱ्या नाटकात प्रथमच दुमजली किल्ल्‌याची व जहाजाची प्रतिकृती तयार करण्यात आल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगीतले. 

1

 

विमानाच्या स्वच्छतागृहातून दीड कोटींचे सोने हस्तगत?

0

मुंबई : मुंबईहून मस्कतला जाणार्‍या इंडिगो विमानातील स्वच्छतागृहात १ कोटी ४९ लाख रुपयांचे सोने सीमाशुल्क विभागाने हस्तगत केले आहेत. या विमानातून मोठय़ा प्रमाणात सोन्याची तस्करी होणार असल्याच्या माहितीवरून मुंबई विमानतळावर ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नाही. दुबईहून मस्कतला निघालेले इंडिगो कंपनीचे ६ ई ८१ हे विमान कोलकाता- मुंबईमार्गे मस्कतला जाणार होते. मात्र या विमानातून मोठय़ा प्रमाणात सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मुंबईच्या सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. ही माहिती कोलकाता सीमा सुरक्षा विभागाला देण्यात आली. कोलकाता विमानतळावर या विमानाची झडती घेण्यात आली. मात्र वेळेत हे विमान मुंबईला रवाना करायचे असल्याने सीमाशुल्क विभागाने विमानात काही न आढळल्याचे मुंबई विमानतळावरील अधिकार्‍यांना कळवले.

हे विमान मुंबई विमानतळावर दाखल होताच सीमाशुल्क अधिकार्‍यांनी विमानाच्या कसून तपासणीला सुरुवात केली. अखेर विमानातील तीन स्वच्छतागृहांतील बेसिनच्या मागे ६ किलो सोन्याच्या लगडी चिकटवून ठेवल्याचे आढळले. अधिकार्‍यांनी हस्तगत केलेल्या सोन्याची किंमत

१ कोटी ४९ लाख रुपयांएवढी असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नाही

स्वाइन फ्लूने पुण्यात दोन मृत्यू

0

पुणे-  शहरात आतापर्यंत तब्बल १७८ रुग्णांना याची लागण झाली असून, १६ जण अत्यवस्थ आहेत. आज शहरात हडपसर भागातील अमित दाभाडे (वय ३५) तर घोरपडी येथील किशोर बोराटे (वय ५५) यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.

गेल्या दीड महिन्यात शहरात स्वाइन फ्लूने तब्बल २0 बळी गेले आहेत. पुण्यासह राज्यातही स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढू लागला आहे. गुरुवारी राज्यात स्वाइन फ्लूचे १0९ नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर येथे स्वाइन फ्लूचे सर्वांत जास्त २२ बळी गेले आहेत. पुणे शहरात आतापर्यंत तब्बल १७८ जणांना याची लागण झाली असून, १६ जण अत्यवस्थ आहेत. महापालिकेतर्फे आतापर्यंत चार हजारांहून अधिक टॅमिफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. शहरात टॅमिफ्लूच्या गोळ्यांचा पुरेसा साठा असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य विभागप्रमुख एस. टी. परदेशी यांनी दिली. स्वाइन फ्लूचा प्रतिकार करण्यासाठी ‘त्रिगुणी ही लस सीरम इन्स्टिट्यूटतर्फे गेल्यावर्षी विकसित करण्यात आली होती. या लसीची मुदत संपल्याने डिसेंबरमध्ये सुमारे दीड लाख डोस नष्ट करण्यात आले; पण आता त्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पुढील १५-२0 नवीन बॅचमध्ये उत्पादन करण्यात येणार आहे, असेही सीरम इन्स्टिट्यूटतर्फे कळविण्यात आले आहे.

Actress Shrishti Sharma kisses her co-star Sudhanshu Agrawal during the promotion of their upcoming movie Monsoon

0

2 3 4 5 6 7 8 9

Mumbai has witnessed a full swing promotion of Bollywood producer Mahendra Dhariwal, Jitendra Gulati, Exective Producer Chirag Dhariwal, and Director Suzat Iqbal Khan, actors Sudhanshu Agrawal, Shawar Ali and Shrishti Sharma for their upcoming movie “Monsoon” which is going to release on 20th February. During the promotion event actress Shrishti Sharma looked gorgeous in a western dress. Later actress Shrishti Sharma raised the temperature of this winter season by kissing her co-star Sudhanshu Agrawal during the promotion event and leaving the lipstick mark on his chick. She said, “I am playing a grey shade character in the movie and I am sure that this character would be loved by the audience.” Bollywood actor turned producer Shawar Ali who is playing a grey shade character in the movie was seen joining the photoshoot session with actress Shrishti Sharma and actor Sudhanshu Agrawal, Shawar Ali Said, “I play a grey shade character in the movie which will be totally fresh for the audiences to watch.” Elaborating further, he said, “One interesting thing about this character is that it is much different from what I have done previously. I enjoyed a lot while doing this role.”

While talking to the media, Producer of the movie Mahendra Dhariwal said, “It is a comic story of a 15 year old boy who falls in love with his teacher. As he enters the teenage he faces various changes in his personality and this is what the whole concept is all about. This incident must have happened in each and every individual’s life and so we have brought this concept in a comic manner which the audiences will surely enjoy.” The movie also stars Vijay Singh, who’s touted to be Mallika Sherawat’s ex. They met on the show, The Bachelorette India Meri Khayalon Ki Mallika, where Vijay Singh was one of the contestants. He came out winning the show. Editor Honey Sethi was also seen at the event.

‘मराठा’ राज ठाकरेंचे नवे वृत्तपत्र येणार

0

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता आपल्या पक्षाचे मुखपत्र काढणार असून ‘मराठा’ नावाने हे मुखपत्र प्रकाशित होणार असल्याचे वृत्त आहे. राज ठाकरे स्वतः या मुखपत्राचे संपादक होणार असून राज ठाकरेंच्या या नव्या गोष्टीकडे  सर्वांचेलक्ष लागण्याची शक्यता आहे.  मनसेचे मुखपत्र ‘मराठा’ सुरु झाल्यानंतर शिवसेनेसमोर एक नवे आव्हान उभे राहाणार आहे.महापालिका निवडणुकीत ‘मराठा’ विरुद्ध ‘सामना’ असा नवा संघर्ष पाहायला मिळतो काय? हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःवर होणा-या टीकेचे उत्तर देण्यासाठी मार्मिक हे व्यंगचित्र साप्ताहिक आणि सामना हे वृत्तपत्र सुरु केले होते. बाळासाहेबांचे सडेतोड विचार शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यात या दोन्ही माध्यमांनी मोलाची भूमिका बजावली होती. बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे हेदेखील पक्षाचे मुखपत्र काढणार आहेत. ‘मराठा’ हे आचार्य अत्रे यांनी सुरु केलेले अग्रगण्य दैनिक होते.संयुक्त महाराष्ट्र लढ्यात आचार्य अत्रेंनी मराठामधून घणाघात केला होता.  पण आचार्य अत्रे यांच्या निधनानंतर हे दैनिकही बंद पडले. राज ठाकरेंनी आचार्य अत्रे यांच्या कन्येकडून ‘मराठा’ नावाचे कायदेशीर हक्क मिळवत याच नावाने दैनिक काढण्याची तयारी सुरु केली आहे. मराठा हे मनसेचे मुखपत्र असेल असे सूत्रांनी सांगितले

आर आर पाटील यांना अखेरचा निरोप -अंत्यदर्शन -काही छायाचित्रे ….

0

सांगली-/मुंबई-

आर. आर. पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्मगावी अंजनी( सांगली)येथे हेलिपॅड मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या मुलाने पार्थिवाला मुखाग्नी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षांचे प्रमुख नेते यावेळी त्यांच्या अंत्य संस्कारासाठी उपस्थित होते.सकाळी सुमारे 7.30 च्या सुमारास आबांचे पार्थिव तासगावात दाखल झाले. तासगावातील प्रमुख चौकातून आबांच्या अंत्ययात्रेला अंत्ययात्रेला सुरुवात झाली. भिलवडी नाका चौकातून निघालेली ही यात्रा सिद्धेश्वर मंदिर, गणपती मंदिर आणि विटा नाका मार्गे मार्केटयार्ड येथील मैदानात आबांचे पार्थिव आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंजनीत दाखल झाले.याठिकाणी सकाळपासूनच अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची रांग लागली होती. याठिकाणी अनेक महत्ताचे नेतेही आबांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. त्यासाठी कडक सुरक्षेसर खास व्यवस्था करण्यात आली होती.

Aaba Mother R R Patil RR Aaba's Antyayatra RR Aaba's Antyayatra3

 

 

2 3 4 5 6 7 8 9