नवी दिल्ली- गरीबातल्या गरीब माणसापर्यंत आपल्या वाहनाचा कसा उपयोग होईल , ते कसे पोहोचेल? आणि दणकट टिकाऊ उत्पादन कसे निर्माण करता येईल या दृष्टीने देशाच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक विकासात मोलाचं योगदान देणारे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा हे आता भारतीय रेल्वेचा कायापालट करण्यासाठी सज्ज झाले आहेत. रेल्वे अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनानुसार, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी ‘कायाकल्प’ परिषदेची स्थापना केली असून तिचं अध्यक्षपद रतन टाटा यांना देण्यात आले आहे
देशभर विस्तारलेली रेल्वे गर्दीचा भार पेलून साफ वाकली आहे, बकाल झाली आहे. अस्वच्छता आणि असुरक्षिततेच्या गर्तेत अडकली आहे. हे चित्र बदलण्याच्या दृष्टीनंच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेत सुधारणा आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी काही नव्या शिफारशी आवश्यक आहेत. हे काम करण्यासाठी ‘कायाकल्प’ परिषदेची स्थापना करण्याचं सुरेश प्रभूंनी रेल्वे बजेटमध्ये जाहीर केलं होतं. त्या परिषदेच्या प्रमुखपदी एक मोठी व्यक्ती असेल, असंही त्यांनी सूचित केलं होतं. त्यानुसारच, हा पदभार रतन टाटा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. प्रभूंचे टाटांशी खास संबंध असल्यानंच हे शक्य झाल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. रेल्वे अर्थसंकल्पापूर्वीच प्रभूंनी टाटांना हा प्रस्ताव पाठवला होता. परंतु, त्यांचा होकार परवाच मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. टाटा यांच्यासोबत या समितीवर शिवगोपाल मिश्रा आणि एम. रघुवैया या रेल्वे युनियनच्या नेत्यांचीही निवड करण्यात आली आहे. तसंच, कॅगचे माजी प्रमुख विनोद रायही सदस्य म्हणून या परिषदेवर नियुक्त केले जाऊ शकतात.
दरम्यान, २००९ मध्ये एअर इंडियाच्या सल्लागार मंडळाचं अध्यक्षपद सांभाळण्यास रतन टाटा यांनी नकार दिला होता. पण रेल्वेला नवं रूप देण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार नक्कीच आशादायी आहे. टाटा हे विश्वासार्हतेचं दुसरं नावच मानलं जातं. त्यामुळे रतन टाटांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचा कायापालट होईल, असा विश्वास बाळगायला काहीच हरकत नाही.
रेल्वेचा कायाकल्प सुधारणार रतन टाटा …
पेट्रोलपंपावरील दरोड्याचा प्रयत्न -४ अटकेत -३ पळाले ;कात्रज जवळचा प्रकार
पुणे – पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीस भारती विद्यापीठ पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री जेरबंद केले. या टोळीतील चौघांना अटक केली असून, तिघे पसार झाले आहेत. त्यांच्याकडून कोयता, मिरचीपावडर, मोबाईल, दरोड्याचे साहित्य आणि दुचाकी जप्त केली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरात रात्रीची गस्त सुरू असताना शकुन टाइल्स दुकानासमोर तीन दुचाकींवर सातजण असून, ते बेलदरे पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. ही बाब समजल्यानंतर पोलिसांनी रात्री दीड वाजता छापा टाकला. अर्जुन जगत चौधरी (वय 27, रा. काळेवाडी), अविनाश धनाजी शिंदे (वय 27, रा. सुंदरनगर), महेश मधुकर पांडव (वय 19, रा. संतोषनगर, कात्रज) आणि प्रदीप राजदीप चौधरी (वय 24, रा. काळेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. तर, अक्षय चौधरी, नितीन पालखे आणि उल्हास असे तिघेजण पसार झाले आहेत. उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, हवालदार प्रदीप गुरव, प्रकाश मोरे, संजय गायकवाड आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. दरम्यान, आरोपींनी चार महिन्यांपूर्वी कात्रज डेअरी परिसरात एका व्यापाऱ्यास डोळ्यांत मिरचीपावडर टाकून रोकड लुटल्याचे निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांची बिनविरोध निवड
२७ मार्चला प्रदर्शित होणार “जस्ट गंमत”
मिलिंद अरूण कवडे यांचा म्युझिकल-सस्पेन्स-कॉमेडी “जस्ट गंमत” हा चित्रपट २७ मार्च २०१५ रोजी महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. नेहमीच काही तरी वेगळ करण्याचा अट्टहास बाळगत सिनेमा बनवणा-या मिलिंद अरूण कवडे यांनी कायम मनोरंजनासोबतच सामाजिक जाणिवतेचे भान राखत सिनेमे बनवले आहेत. जस्ट गंमत हा सिनेमा त्यापेक्षा वेगळा नाही. दैनंदिन जीवनातील गंमती जंमती सोबतच अंडरकरंट एक मेसेज देणारा हा सिनेमा सर्व वयोगटातील रसिकांना आपलंसं करणारा आहे.
दैनंदिन आयुष्यातील घटना एखाद्यावर मनावर किती गंभीररीत्या आघात करू शकते आणि त्यातून तो कोणत्या टोकाला पोहोचू शकतो, याचं उत्तम उदाहरण यात सादर करण्यात आलं असल्याचं दिग्दर्शक मिलिंद कवडे म्हणाले.जस्ट गंमत चं कथानक दोन मित्रांभोवती फिरतं. दोन जुने मित्र एका दिवशी अचानक भेटतात. सुरूवातीला आपापल्या संसाराबाबत बढाया मारणा-या दोघांच्याही घशाखाली मदिरा उतरल्यावर त्यांच खर दु:ख बाहेर पडतं. दोघेही आपापल्या पत्नीला, त्यांच्या स्वभावाला कंटाळलेले असतात. दोन समदु:खी जीव त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात त्यातून त्यांना एक कल्पना सुचते . ती खूप अचाट पण भयानक असते. पण दोघेही त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात जे वादळ उठतं ते या सिनेमात पाहायला मिळेल.
“तुझ्या विना सुने सुने..” या लव्ह सॉंगच्या जोडीला बेवडा, बेवडा हे आयटम सॉंग आणि सिनेमात दोनदा वाजणारं ” जस्ट गंमत” ला आयटम नंबरचा तडका देणारं आहे. या गीतांवर कोरिऒग्राफर राजेश बिडवे यांनी अचूक कोरिऒग्राफी केली
राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धूळ चारण्यासाठी काँग्रेस ने दिली भाजपसेनेला साथ
राज्यसभा सभागृहातील मच्छर छळतात-त्यांचा बंदोबस्त करा -जया बच्चन यांची आग्रही मागणी
नवी दिल्ली – राज्यसभा सभागृहातील मच्छर छळतात-त्यांचा बंदोबस्त प्रथम करा अशी मागणी खुद्द जया अमिताभ बच्चन यांनी केली आहे .सभापती पी.जे.कुरियन यांनी यावर , संबंधीत विभागाशी संपर्क करुन यावर लवकरच उपाय शोधला जाईल.असे आश्वासन त्यांना दिले आहे राज्यसभा सदस्यांनी सभापतींकडे मच्छरांची तक्रार केली आहे. बुधवारी सभागृहात चर्चा सुरु असताना समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सभापतींकडे तक्रार केली, की जेव्हा सभागृहाचे कामकाज सायंकाळी सहा नंतर सुरु असते तेव्हा मच्छराचा मोठा उपद्रव असतो.
पुण्यातल्या रांका आणि गाडगीळ सराफांमध्ये जोरदार रस्सीखेच – राजमल लखीचंद शर्यतीत हि नाही विद्या बालन ने केले रांका ज्वेलर्स च्या जगातील पहिल्या ५१ लाखांच्या सोन्याच्या पैठणीचे अनावरण
पुणे- पुणे तिथे काय उणे म्हणतात … याचा प्रत्यय पुण्याच्या सराफी मार्केट मध्ये नेहमीच येत आला आहे . कधी काळी जकातीच्या कारणावरून एकत्र येणारे सराफ आता एल बी टी च्या आणि नंतर आता सोने खरेदीला प्यान कार्ड च्या सक्तीला विरोध करायला एकत्र येतील हि … पण त्यांच्यातील व्यवसायिक रस्सीखेच मोठ्ठी च राहिली आहे ती कधीच कमी झाली नाही … पु. ना . गाडगीळ सराफ तसे भारताबाहेर हि पोहोचले आहे पण पुण्यात त्यांना व्यापारा साठी नेहमीच प्रचंड स्पर्धेला तोंड द्यावे लागते आहे . रांका ज्वेलर्सने विद्या बालन ला अम्बेसिडर बनवले तर आता गाडगीळ सराफांनी चक्क सलमान खान ला अम्बेसिडर बनवले आहे – वृत्तपत्रांमधून प्रचंड जाहिराती- सिने स्टार च्या झगमगाटांसाठी करोडोचा चुराडा करणारी हि मंडळी विशेष म्हणजे प्रत्येक सरकारी जाचक करा ला विरोध करण्यासाठी ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने एकत्र हि येतात हे वैशिष्ट्य आहे . पुण्यात राजमल लखीचंद ची एन्ट्री झाली तेव्हा पुण्यातील प्रस्थापितांना स्पर्धात्मक वातावरण त्यांनी निर्माण केले होते पण आता राजमल यास्पर्धेतून पूर्णतः बाहेर दिसत आहेत मराठी सिनेमासाठी चांगले स्क्रिप्ट अद्याप माझ्या नशिबी नाही, आणि म्हणावी तशी मी ही माझ्या बोलण्यात मराठी भाषेत सुधारणा केलेली नाही असे येथे हिंदी अभिनेत्री विद्या बालन हिने सांगितले ती पुण्यात रांका ज्वेलर्सच्या नवीन दालनाचे उदघाटना साठी आली होती. तसेच रांका ज्वेलर्सनी तयार केलेल्या सोन्याच्या पैठणीचेही अनावरण देखील यावेळी करण्यात आले. जगातील पहिलीवहिली सोन्याची पैठणी बनवल्याचा दावा रांका ज्वेलर्सनं केलाय. दीड किलो सोनं वापरुन ही पैठणी बनवण्यात आलीय. ३५ कारागिरांनी तीन महिने मेहनत करुन ही पैठणी साकारलीय. साडीच्या बॉर्डरवर, काठावर सोन्याची नक्षी पाहायला मिळते. तर साडीवरील बुट्ट्याही सोन्याच्या आहेत.या पैठणीची किंमत ५१ लाख रुपये इतकी आहे. एका ग्राहकाच्या मागणीवरुन ही पैठणी साकारण्यात आली. रांका ज्वेलर्सची ब्रँड अॅम्बेसेडर विद्या बालन हिनं या पैठणीचं लॉन्चिंग केलं.
मराठी चित्रपटात काम करण्याची माझी खूप इच्छा आहे. माझ्याकडे मराठी चित्रपटाच्या खूप ऑफर्स आहेत, पण मी चांगला रोल आणि स्क्रिप्ट च्या प्रतिक्षेत आहे. अस मत विद्या बालनने व्यक्त केलं. मराठी चित्रपट निर्मिती बद्दल विचारल असता विद्या म्हणाली. मराठी चित्रपट निर्मिती मध्ये अनेक हिंदी कलाकार येत आहेत. पण सध्या तरी तशी माझी कोणतीच इच्छा नाही. मला मराठी चित्रपटासाठी खूप ऑफर्स आल्याही पण तशी चांगली स्क्रीप्ट आणि भूमिका मला न मिळाल्याने सध्या शांत आहे. पण चांगली ऑफर येताच मी नक्की मराठी चित्रपटात काम करेन. माझं मराठी सुधरवण्यासाठी मी विशेष प्रयत्न करत आहे.महाराष्ट्रातली पैठणी मला खूप आवडते. मला जवळच्या व्यक्तीने मरूम कलरची पैठणी गिफ्ट केली होती ती मी आवर्जून नेसते.
युनायटेड नेशन्स वूमन तर्फे आनंद बनसोडेला युनायटेड नेशन्स वूमनचा “हीफॉरशी पर्सन”सन्मान
जगभर महिलांचे हक्क व विकासासाठी कार्य करणाऱ्या युनायटेड नेशन्सच्या वूमन विभागाने नुकतेच आनंद बनसोडेला त्याच्या मागील मोहिमाविषयी चर्चेसाठी बोलावले होते (ता.-१८). या चर्चेमध्ये स्त्री-पुरुष समानतेसोबतच इतर अनेक बाबतीत चर्चा केली गेली. यामध्ये आनंदचा “हीफॉरशी पर्सन” म्हणूनही गौरव केला गेला.
यापूर्वी भारताचा शिखरवीर , विक्रमवीर आनंद बनसोडे याने आपली प्रत्येक मोहीम एका सामाजिक विषयासाठी समर्पित केली होती. याद्वारे युरोपातील एल्ब्रूस मोहीम मुलीना व अनाथाना शिक्षणासाठी, आफ्रिकेतील किलीमांजारो मोहीम झाडे लावा व निसर्ग संवर्धन, ऑस्ट्रेलियातील माउंट कोस्कीस्झ्को मोहीन ही युनायटेड नेशन्सच्या स्त्री-पुरुष समानतेसाठी समर्पित केली होती. युनायटेड नेशन्स च्या हीफॉरशी मोहिमेसाठी समर्पित केलेल्या त्याच्या ऑस्ट्रेलिया खंडातील १० सर्वोच्च शिखरांच्या मोहिमेबद्दल नुकतेच युनायटेड नेशन्स ने त्याचे कौतुक केले असून नुकतेच दिल्ली येथील युनायटेड नेशन्सच्या ऑफिसमध्ये त्याला चर्चेसाठी व त्याचे अनुभव ऐकण्यासाठी निमंत्रित केले होते.यावेळी भारत,भूटान,मालदीव,श्रीलंका या देशांच्या युनायटेड नेशन्सच्या मुख्य रीप्रेझेंनटेटीव्ह अमेरिकेच्या डॉ.रिबेका तवारेस व आफ्रिकेच्या नोरोह नेको यांनी आनंदचे त्याच्या या कार्यासाठी अभिनंदन केले. याच वेळी डॉ.रिबेका तवारेस यांनी आनंदला हीफॉरशी चा बिल्ला लावून “हीफॉरशी पर्सन” म्हणून गौरवले.
गेल्या वर्षात युनायटेड नेशन्स ने जगभर स्त्री-पुरुष समानतेसाठी “हीफॉरशी” ही मोहीम सुरु केली होती. हॉलीवूड ची अभिनेत्री इमा वाटसन हिने या मोहिनेसाठी जगभरातील लोकांना एकत्र येण्यासाठी आवाहन केले होते. “आता नाही तर कधीच नाही, मी नाही तर कोणीच नाही” अशी साद देत या मोहिमेची जगभर सुरवात झाली होती. या मोहिमेअंतर्गत पुरुषांनी स्वतहून पुढे येवून स्त्रियांना समान वागणूक देण्याची शपत व त्याद्वारे इतरांनाही प्रेरित करण्यासाठी काम करावे असा या मोहिमेचा उद्धेश आहे. भारत तसेच इतर पुरुषप्रधान देशात या मोहिमेला अल्प प्रतिसाद आहे.
आनंदने गेल्या ऑक्टोबर महिन्यात युनायटेड नेशन्सला यासाठी संपर्क केला होता व त्याच्या ऑस्ट्रेलिया मोहिमेसाठी या हीफॉरशी साठी कार्य करण्याची परवानगी घेतली होती. या अंतर्गत तीन जोडपी व तीन मुलीनी ऑस्ट्रेलिया मधील सर्वोच्च शिखर माउंट कोस्झीस्को वर या सर्वांनी स्त्रीपुरुष समानते साठी शपत घेतली होती. तसेच सिडनी च्या आकाशात १४००० फुट उंचीवरून स्काय डायविंग करून आनंदच्या कल्पनेतील उपक्रम “हीफॉरशी” साठी केला होता. आनंदची ही स्टोरी लवकरच न्यूयोर्क(अमेरिका) व ऑस्ट्रेलिया येथील युनायटेड नेशन्सच्या ऑफिसमध्ये भारतातील ऑफिसमधून पाठवली जाणार असून तिथून ती जगभर पोहचणार आहे. आनंदला इथून पुढे हीफॉरशी अंतर्गत होणाऱ्या युनायटेड नेशन्सच्या कार्यक्रमांसाठी निमंत्रित केले जाणार आहे.
आई-वडिलांनी समानतेची वागणूक दिली- आनंद बनसोडे
“३ मुलीनंतर मुलगा नाही म्हणून माझ्या आईला नातेवाईकाकडून खूप त्रास झाला होता, तरीही माझ्या जन्मानंतर आई-वडिलांकडून मला कोणतीही विशेष वागणूक न देता माझ्या ३ बहिणींना व मला समान वागणूक मिळाली. माझी आई, ३ बहिणी, ९ भाच्या व असंख्य मैत्रिणीमुळे स्त्रियांविषयी समानतेची भावना रुजण्यास मदत झाली. आज युनायटेड नेशन्समध्ये जे काही सांगू शकलो ते फक्त आणि फक्त माझ्या आयुष्यातील सर्व महिलांमुळेच. “हीफॉरशी पर्सन” त्यांच्यामुळेच बनू शकलो.”
राज्यात 1 ऑगस्ट 2015 पासून एलबीटी रद्द,1 एप्रिल 2016 पासून राज्यात जीएसटी लागू- देशी दारूच्या उत्पादन शुल्कात २०० टक्क्यांनी वाढ
राज्यावर ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज-सन 2015-16 चा अर्थसंकल्पाच्या योजनांचे आकारमान रु. 54,999 कोटी
मुंबई – राज्य सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (बुधवार) अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला. यामध्ये राज्यातील स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याची महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही समाधान व्यक्त केले आहे.सुधीर मुनगंटीवार यांनी आज पहिला अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील तळीरामांना झटका दिला. देशी दारूच्या उत्पादन शुल्कात २०० टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्यामुळं देशी दारू प्रचंड महागणार आहे. राज्यात 1 ऑगस्ट 2015 पासून एलबीटी रद्द होणार आहे. तर, 1 एप्रिल 2016 पासून राज्यात जीएसटी लागू होईल असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
ठळक मुद्दे — 2022 पर्यंत राज्यात कोणीही बेघर राहणार नाही
– 2 लाख 23 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार
शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर स्माराकासाठी 100 कोटींची तरतूद- कर्करोगाच्या औषधांवरील कर माफ
– पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 174 कोटी रूपयांची तरतूद-नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी 197 कोटी रूपये
-मुंबई मेट्रो3 साठी 109 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद
– नाशिक येथील आगामी कुंभमेळ्यासाठी 2378 कोटींची तरतूद-स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबई येथे तर स्व. गोपीनाथ मुंडे यांचे औरंगाबाद येथे स्मारक उभारणार.
-अद्याप ज्या जिल्हास्थानावर नाट्यगृह नाहीत अशा ठिकाणी अद्ययावत नाट्यगृह बांधण्याचा मानस. पुढील पाच वर्षात -अद्ययावत नाट्यगृहाविना एकही जिल्हा राहणार नाही शासनाचा निर्धार. यासाठी यावर्षी 20 कोटी रुपयांची तरतुद.
-पुढील तीन वर्षात सर्व अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती बांधुन देणार.
-1 एप्रिल 2015 पासुन अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ.
– प्रयोगशाळा वही, आलेख वही, चित्रकला वही, आराखडा वही करमुक्त
– काजूच्या टरफलावर 5 टक्के कर लागणार
– एलईडी बल्बवरील कर 12.5 वरुन 5 टक्क्यांवर
– हॅण्डबॅगवरील वॅट 12.5 वरुन 5 टक्क्यांवर
– 10 हजारांपर्यंत मासिक वेतन असणाऱ्या महिलांना व्यवसाय कर लागणार नाही
– इको मार्कच्या पार्टिकल बोर्डावर 5 टक्के कर आकारणार
– संगणकीकृत कर प्रशासनाच्या दृष्टीने प्रयत्न
– करसंकलन पद्धतीत संगणकीकरण करणार
– शेतीचा विकासदर वाढेल यावर विश्वास
– कायदे, योजना, शासन निर्णयांचे मुल्यमापन, वर्गीकरण करणार
– 956 दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन करणार
– परमवीरचक्र विजेत्या सैनिकांचं मुंबईत स्मारक उभारणार
– 206 हुतात्मा स्मारकांची दुरुस्ती आणि नूतनीकरण करणार
– शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर स्मराकासाठी 100 कोटींची तरतूद
– राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृहांची उभारणी करणार
– सायबर क्राईम रोखण्यासाठी 18 कोटींची तरतूद
– प्रत्येक जिल्ह्यात सायबर क्राईम लॅब स्थापन करणार, प्रत्येक जिल्ह्यासाठी अंदाजे 50 लाखांचा खर्च अपेक्षित
– राज्यातील पोलिस वसाहतींमध्ये आधुनिक सुविधा पुरवणार
– संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेसाठी 1 हजार 451 कोटी 50 लाख निधी
– माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी 200 कोटींची तरतूद
– अंगणवाडीसेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ कऱणार
– भिवंडी, मालेगाव व मिरजसाठी विशेष योजना
– अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 6 हजार 490 कोटींचा निधी
– जे. जे. हॉस्पिटलमध्ये 1 हजार अधिक रुग्णखाटा वाढवणार
– 135 कोटी रुपये वैद्यकीय महाविद्यालयं बांधण्यासाठी देणार
– ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर‘ औरंगाबादमध्ये स्थापन करणार
– मुलींच्या प्रत्येक वसतिगृहाला 3 वर्षांत संरक्षक भिंत बांधणा
– जिल्हानिहाय क्रीडा संकुलासाठी 50 कोटींची तरतूद
– राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा संकुल उभारणार
– प्रमोद महाजन कौशल्य विकास योजन सुरु करणार
– ‘कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ हे ध्येय
– ‘महाराष्ट्र प्राणी संग्रहालय प्राधिकरण’ सुरु करणार
– प्रत्येक जिल्ह्यात हायटेक रोपवाटिकेसाठी 11 कोटी रूपयांचा निधी
– मुंबईमध्ये काही ठिकाणी फ्री-वायफाय सुविधा देणार
– सिंधुदुर्गात पर्यटनाच्या दृष्टीने प्रयत्न करणार
– सिंधुदुर्गातील प्रस्तावित ‘सी-वर्ल्ड’साठी निधी उभारण्यात येणार
– महाराष्ट्र राज्य नैसर्गिक पर्यटन विकास मंडळ स्थापन करणार
– रायगड किल्ल्यावर ‘रायगड महोत्सव’ आयोजित करणार
– नागपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि प्रशिक्षण केंद्र
– मिहान प्रकल्पासाठी 200 कोटींची तरतूद
– ‘मेक इन महाराष्ट्र’ हा नवा उपक्रम सुरु करणार
– जयगड बंदर रेल्वेशी जोडण्याच्या दृष्टीने प्रयत्न
– शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात स्व.मोतीराम लहाने कृषि समृद्धी योजना प्रायोगिक तत्वावर राबवणार
– वीज कंपन्यांचा खर्च कमी करुन वीजदर कमी करणार
– जलविद्युत प्रकल्पासाठी 900 कोटी
– 2 हजार 413 कोटी ग्रामीण रस्त्यांसाठी देणार
– मुख्यमंत्री ग्रामीण मार्ग योजनेसाठी यावर्षी 350 कोटी रूपयांची तरतूद
– फडणवीस सरकारची नवी योजना ‘मुख्यमंत्री ग्रामीण मार्ग योजना‘
– जेट्टी उभारण्यासाठी 120 कोटींची तरतूद
– 38 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा निर्धार – अर्थमंत्री
– 257 कोटी फलोत्पादन आणि कृषी विकासासाठी देणार
– द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांना गारपीटीपासून संरक्षण देणाऱ्या खास शेडनेटसाठी अनुदान देणार
– एका आमदाराने तीन गावे आदर्श करावीत
– केंद्राच्या धर्तीवर राज्यात आमदार ग्रामविकास योजना सुरू करणार
– सिंचन क्षेत्रासाठी ६० हजार २७२ कोटींची तरतूद
–
यंदाचा सातवा सीआयडीसी विश्वकर्मा पुरस्कार कुशल क्रेडाईला
पुणे : बांधकाम कौशल्य विकास या श्रेणीतील कामगिरीसाठी कुशल क्रेडाईला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार बांधकाम उद्योग विकास परिषद (सीआयडीसी) यांनी सुरु केले असून ‘कुशल’ यांना हा पुरस्कार मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. याच श्रेणीमध्ये त्यांना २०१२मध्ये पुरस्कार मिळाला होता.यातून ‘कुशल’ यांनी हाती घेतलेल्या आदर्श कामाचे आणि बांधकाम उद्योगाचे अग्रणी म्हणून २०१२ पासून त्यांनी घेतलेल्या आघाडीचे स्वरूप दिसून येते.
भारताचे माजी नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. किरीट पारीख यांच्या हस्ते हा पुरस्कार माजी कर्नल आणि कुशलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. आर. शर्मा यांना दिल्ली येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
एकच पुरस्कार दोनदा मिळविण्यातून ‘कुशल’ ने स्वीकारलेला बांधकाम उद्योगातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा मार्ग अधोरेखित केला आहे. ‘कुशल’च्या स्थापनेपासून चार वर्षांच्या काळात हा १२ वा पुरस्कार असल्यामुळे बांधकाम उद्योगातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याच्या ‘कुशल’च्या नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक पद्धतीचे वेगळेपण उठून दिसले आहे .
आयआयटीमधून काकोडकरांचा राजीनामा
नवी दिल्ली – अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी आज (बुधवार) मुंबईतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
काकोडकर यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ येत्या मे महिन्यात संपणार होता. मात्र केंदीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी या पदाचा कार्यभार मे नंतरही सांभाळण्याची खात्री दिली होती. अलिकडेच झालेल्या आयआयटी पटना, भुवनेश्वर आणि रोपर येथील संचालक मंडळाच्या निवडीबाबतच्या बैठकीनंतर काकोडकर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक मंडळाच्या निवडीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीमध्ये काकोडकर यांचाही समावेश होता. या समितीची पुढील बैठक 22 मार्च रोजी नियोजित करण्यात आली होती.
‘आयएमईडी’ मध्ये ‘मनुष्यबळ विकासातील योगदान विषयी’ परिसंवाद
पुणे :
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) च्या वतीने मानव संसाधन विकासामधील उत्तम संस्थात्मक योगदान याविषयी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाचे उद्घाटन व्ही. जे. राव (एमआयएनडीए इंडस्ट्रिज लि.चे अध्यक्ष) यांच्या हस्ते झाले. व्यवस्थापन शास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
अमित शर्मा (फिलिप्स इंडिया लिमिटेड, संचालक), बॉबी कुरीयाकोसे (संचालक, फोर्ब्स मार्शल ग्रुप, एचआर विभाग), नरेश कुमार पिनीशेटी (दीपक फर्टीलायझर अॅण्ड पेट्रोकेमिकल्स लि.), करण बक्षी (टीब्को सॉफ्टवेअर लि.) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
एचआर व्यवस्थापकाला संघटनात्मक वाढ आणि विकास साधून उत्तम निर्णय घेणे आवश्यक असते या विषयी या परिसंवादात मार्गदर्शन करण्यात आले. एमबीए अभ्यासक्रमाच्या एच. आर. विभागाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आणि बीसीए अभ्यासक्रमाच्या तिसर्या वर्षाच्या विद्यार्थी परिसंवादात सहभागी झाले होते.
प्रा.मकरंद पोळ (‘सीआरटी’चे प्रमुख), डॉ. नीलम लाल (एच आर विभागाच्या प्रमुख), प्रवीण माने, डेक्स्टर वूडवर्ड आणि प्रभात कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा मनमोहनसिंगांना पाठिंबा
दिल्ली :
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना कोळसा खाणवाटप गैरव्यवहारप्रकरणी समन्स जारी झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी त्यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांचा तुम्हाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, तारिक अन्वर, विजयसिंह मोहिते पाटील, अॅड. वंदना चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांनी मनमोहनसिंग यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या भेटीपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रॅली काढून मनमोहन सिंगाना पाठिंबा दर्शविला होता.
सेक्स ची इच्छ्या व्यक्त करणे -पोटाला भूक लागल्याचे सांगण्यासारखे ,,,राधिका आपटे चे खरमरीत उत्तर
मुंबई-मराठी तून लय भारी काम करीत हॉलीवूड पर्यंत पोहोचलेलि अभिनेत्री राधिका आपटे पुन्हा चर्चेत आली आहे. ‘बदलापूर’ सिनेमातील वरूण धवनसोबतचा बोल्ड सीन आणि काही आठवड्यांपूर्वी न्यूड सेल्फीमुळे वादात आल्याने राधिका हॉट टॉपिक बनली होती.आता तिने ‘सेक्स’बद्दल धारधार वक्तव्य करून प्रसिद्धी मिळविली आहे
आपल्या देशात ‘सेक्स’ची इच्छा व्यक्त केली की त्याचा मोठा मुद्दा बनतो. आणि त्यामुळेच चित्रपटांमधील विषयांमधून ‘सेक्स’ विकलं जातंय. ‘सेक्स’ चंही भूकेसारखचं आहे. आपल्याला भूक लागते त्याप्रमाणे ‘सेक्स’ ही एक शरीराची सामान्य गरजच आहे आणि आरोग्यसाठी हिताचं आहे’, असं राधिका आपटेनं सांगितलं.
राधिका आपटे, सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘हंटर’ हा सिनेमा येत्या शुक्रवारी २० मार्चला प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात राधिका ‘सेक्स अॅडिक्ट’ तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘हंटर’ची पोस्टर्स आणि ट्रेलरवरुन बघितल्यावर हा सिनेमा ‘सेक्स कॉमेडी’ किंवा ‘अॅडल्ट कॉमेडी’ वर आधारीत असल्याचं वाटतं. पण चित्रपट पूर्णतः वेगळा आहे. एका मधुर प्रेम कहाणीवर आधारीत असलेला हा सरळ-साधा सिनेमा आहे. प्रत्येकजण त्याच्याशी स्वतःला जोडेल, असं त्याचं कथानक आहे’, अशी माहिती राधिकाने दिली.
मोदी गुरुजींच्या शाळेत दांडीबहाद्दर मुंडे-महाजन कन्येची खरडपट्टी
नवी दिल्ली-नरेंद्र मोडी पंतप्रधान आहेत त्यांनी संसदेत वेळेवर दांडी मारणाऱ्या मुंडे-महाजन कन्येसह मेनका गांधी पुत्र वरूण सहा २० खासदारांची खरडपट्टी काढली पंतप्रधान नरेंद्र मोदींना बेशिस्तपणा, बेजबाबदारपणा, कामचुकारपणा अजिबात चालत नाही. कामात हयगय करणाऱ्यांचे कान उपटून ते त्यांना योग्य अद्दल कशी घडवतात, याचा प्रत्यक्ष अनुभव मुंबईच्या खासदार पूनम महाजन आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना आला. भूसंपादन विधेयक मंजुरीच्या वेळी लोकसभेत अनुपस्थित राहिलेल्या २० खासदारांना नरेंद्र मोदी आणि व्यंकय्या नायडूंनी साप्ताहिक बैठकीत उभं करून झापलं, त्यात या दोघीही होत्या. मोदींचे खडे बोल ऐकून त्यांना मान खाली घालावी लागली.
बहुचर्चित आणि बहुप्रलंबित, चर्चेच्या-वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं भूसंपादन विधेयक गेल्या आठवड्यात लोकसभेत मंजूर झालं. अर्थात, एनडीएकडे बहुमत असल्यानं विधेयक मंजुरीत काहीच अडचण नव्हती. बहुधा, हा विचार करूनच भाजपचे २० खासदार या मतदानावेळी गैरहजर राहिले. ही ‘दांडी’ त्यांनाचांगलीच महागात पडली आहे.
संपादन विधेयकावरील मतदानाला अनुपस्थित राहिलेल्या २० खासदारांची नावं संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज साप्ताहिक बैठकीत वाचून दाखवली आणि त्यांची कानउघाडणीही केली. दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन, बाबूल सुप्रियो, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे, वरुण गांधी यांचा त्यात समावेश होता. पक्षाने सादर केलेलं विधेयक तुम्हाला निरुपयोगी वाटत असेल, तर तुम्ही निवडणूक का लढवलीत, इथवर का आलात, असा खोचक सवाल त्यांनी केला. त्याचं कुणाकडेच काही उत्तर नव्हतं. सभागृहात शांतता पसरली. तेव्हाच मोदींचा आवाज आला. ‘तुम्ही २० जणांनी जागेवर उभे राहा, सगळ्यांना तुम्हाला पाहू दे’, असा आदेश देत त्यांनी एका वाक्यात सगळ्यांना चुकीची जाणीव करून दिली.




