पहा या चित्रपटाचा ट्रेलर
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी ‘कोर्ट ‘ ने मारली बाजी
नारायण राणेंना पाठींबा नाही -आणि वांद्रे पोटनिवडणूक लढविणारही नाही -मनसे
मुंबई-वांद्रे पोटनिवडणुकीसाठी नारायण राणेंना पाठींबा देण्या ऐवजी तटस्थ रहाण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे . त्यामुळे स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही पाठिंबा मिळवण्याचा काँग्रेस नेते नारायण राणेंचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तत्वाचा मुद्दा पुढे करून राणेंना पाठिंबा देण्यास नकार दिलाय.भाजपा नाही आणि मनसे नाही त्यामुळे आता थेट राणे विरुध्द शिवसेना अशी लढत होणार आहे ज्यामध्ये एमआयएम ने दिलेला उमेदवार आणि एमआयएम ची भूमिका निर्णयांक ठरण्याची चिन्हे आहेत . वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाचीच लढाई आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आमदार बाळा सावंत यांनी तिथे दोनदा भगवा फडकवला. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे आणि त्याच्या पत्नी तृप्ती सावंत यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. असं असतानाही, शिवसेनेला ‘जोर का झटका’ देऊन आपली ताकद दाखवण्याचा निर्धार कट्टर प्रतिस्पर्धी नारायण राणेंनी केला आहे. त्यामुळे हा सामना भलताच लक्ष्यवेधी आणि रंगतदारठरतो आहे. राणेंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणेंनी राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवला आहे. त्यासाठी परवाच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती आणि उमेदवार न देण्याची विनंती केली होती. त्यानंतर, भाजपनंही वांद्र्यात उमेदवार न देण्याचं जाहीर केलं होतं. शिवसेना विरुद्ध राणे यांच्यात काँटे की टक्कर होण्याची चिन्हं दिसत होती. परंतु, मुस्लिम मतदारांची मोठी संख्या असलेल्या या मतदारसंघात एमआयएमनं सिराज खान यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना, भाजपच्या खालोखाल त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. त्यामुळे राणेंच्या अडचणी वाढल्यात. मुस्लिम मतं एमआयएमकडे जाण्याची दाट शक्यता असल्यानं राणेंसाठी एकेक मत मोलाचंहोईल असे बोलले जाते आहे. दरम्यान नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नीतेश राणे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. आमचे कौटुंबिक संबंध असल्याने मी राज ठाकरे यांची भेट घेतली. जातीयवादी शक्तींच्या विरोधात लढणाऱ्या धर्मनिरपेक्ष शक्तींचा विजय व्हावा, यासाठी आम्ही राज ठाकरे यांचा पाठिंबा मागितला आहे. परंतु, राज यांनी राणेंना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. आजारपण वा अपघातात विरोधी पक्षाच्या सदस्याचे निधन झाल्यास संबंधित ठिकाणी निवडणूक न लढविण्याचे आमचे धोरण आधीपासूनच ठरलेले आहे. त्यामुळे अशा वेळी कोणाला पाठिंबा देणे हे आमच्या धोरणांशी प्रतारणा केल्यासारखे होईल, असं राज यांनी स्पष्ट केलंय. मनसेचा हा पवित्रा राणेंसाठी किंवा शिवसेनेसाठी फायद्याचा ठरणार हे मतदानानंतर-निकालानंतरच स्पष्ट होणार आहे
अल्पसंख्यकांबाबतचा केंद्राचा दृष्टीकोन चुकीचा : खासदार अॅड. वंदना चव्हाण
पुणे :
‘मोदी सरकारने निवडून आल्यावर अल्पसंख्यकांबाबत बाळगलेला दृष्टीकोन चुकीचा असून, चर्च वरील हल्ले, ननवरील हल्ले, मदर तेरेसांविषयी उद्गार यातून हा दृष्टीकोन व्यक्त होत आहे, अशी टीका ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी आज केली.
आज त्या ख्रिश्चन समुदायाच्या पुण्यात निघालेल्या मोर्चात सहभागी झाल्या. त्यानंतर पत्रकाद्वारे त्यांनी आपल्या या विषयावरच्या भावना व्यक्त केल्या.
मोदी सरकार सत्तेत आल्यावर जातीयवादी शक्तींना बळ मिळाले आहे. पंतप्रधान मोदींचा मूक पाठिंबा या शक्तींना असल्याचे चित्र दिसत आहे हे दुर्देवी आहे. अल्पसंख्यकांच्या विकासाबात सरकारकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. सर्वधर्म समभाव हे लोकशाहीतील महत्त्वपूर्ण मूल्य असून, त्याकडे हे सरकार दुर्लक्ष करीत आहे, हे चुकीचे आहे, असे खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी म्हटले आहे.
सोमनाथ महाराज चौधरी (आळंदी) यांना ‘वारकरीभूषण’ पुरस्कार
पुणे :
हिंजवडी – माण या माहिती-तंत्रज्ञान नगरीत असलेल्या भव्य विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा पाचवा वर्धापन दिन गुरुवार, दि. 26 मार्च 2015 रोजी साजरा होत असून, यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सोमनाथ महाराज चौधरी (आळंदी) यांना ‘वारकरी भूषण’ पुरस्कार जाहीर केला आहे.
26 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता होणार्या कार्यक्रमात ‘राष्ट्रीय समाज पक्षा’चे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती समितीच्या वतीने बाळूमावशी धुमाळ यांनी दिली.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये (माण (गवारेवाडी), बापूजीबुवा मंदिराजवळ, विठ्ठल रुखुमाई मंदिर, ता.मुळशी, जि.पुणे) वर्धापनदिनानिमित्त काकड आरती, होमहवन, हरिपाठ, महाप्रसाद, संगीत भजन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शिवसेनेत मानसन्मान नाही -वाडेकर स्वगृही …
पुणे -विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्यामुळे नाराज होऊन शिवसेनेत गेलेले रिपब्लिकन पक्षाचे माजी शहराध्यक्ष परशुराम वाडेकर पुन्हा स्वगृही परतणार आहेत.शिवसेनेत मानसन्मान मिळत नसल्याने ‘आरपीआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची भेट घेऊन वाडेकर यांनी पुन्हा पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी मी पहिल्यापासून मनाने ‘आरपीआय’मध्येच होतो. आंबेडकरी विचारांचा पगडा मनावर असल्याने शिवसेनेत मन लागत नव्हते. त्यामुळे पुन्हा ‘आरपीआय’मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते रामदास आठवले यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे. असे परशुराम वाडेकरयांनी स्पष्ट केले आहे
विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये फूट पडल्याने ‘आरपीआय’च्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या निवडणुकीच्या काळात वाडेकर यांनी विधानसभेचे तिकीट मिळण्यासाठी ‘आरपीआय’ला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश करून सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. निवडणुकीनंतर शिवसेनेच्या शहर कार्यकारिणीमध्ये त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात न आल्याने ते नाराज होते. त्यांनी पुन्हा आपल्या जुन्या घरी, ‘आरपीआय’मध्ये येण्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी पक्षाचे अध्यक्ष आठवले यांची भेट घेतली.
आठवले यांनी त्यांना ‘कामाला लागा,’ अशा सूचनाही दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मुंबई येथे जाऊन वाडेकर यांनी आठवले यांची भेट घेतली. त्या वेळी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, अशोक शिरोळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
अबब तब्बल ९ दिवस बॅंकाना सुट्ट्या … बोंबला …
या दिवशी राहतील बॅंक बंद
28 मार्च- रामनवमी
29 मार्च- रविवार
30 मार्च- बॅंक उघडेल
31 मार्च- आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस. यामुळे बॅंक ग्राहकांची कामे करु शकणार नाही.
1 एप्रिल- वार्षिक क्लोजिंग
2 एप्रिल- महावीर जयंती
3 एप्रिल- गुड फ्रायडे
4 एप्रिल- महिन्याचा पहिला शनिवार असल्याने अर्धा दिवस काम.
5 एप्रिल- रविवार
अभिनेता शशी कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर जाहीर
‘स्माईल’च्या ‘चेंजमेकर्स’उपक्रमात 125 गटांचा सहभाग
फुल२टाइमपास…म्युझिक लाँच” सोहळा दिमाखात
‘झी टॉकज‘ कडून आयोजत केलेला फुल२टाइमपास हा भव्य दिव्य सोहळा पुण्याच्या कला-क्रिडा संकुलात मोठ्या जल्लोषात पार पडला. याच सोहळ्याचे औचित्य साधत सध्याचा सगळ्यात चर्चेत असलेला चित्रपट “टाईमपास २” चा म्युझिक लाँच” सोहळासुध्दा दिमाखात पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत हा म्युझिक लॉंच चा सोहळा संपन्न झाला. ‘नटरंग‘, ‘बालक-पालक‘ यासारखे दर्जेदार आणि वेगया धाटणीचे चित्रपट देणार्या प्रतिथयश दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘टाइमपास‘ या चित्रपटाने चित्रपटसृष्टित एक नवा अध्याय सुरु केला आहे. वेगळ्या प्रकारचे कथानक, धमाल संवाद, उकृष्ट संगीत यांनी या चित्रपटाला चार चांद लावले. ‘टाइमपास‘ चित्रपटाच्या धमाकेदार यशानंतर लगेचच टाईमपास २ ची घोषणा केली गेली होती. या वेळेपासूनच समाजाच्या प्रत्येक स्थरातील प्रेक्षक ‘टाइमपास २‘ ची आतुरतेने वाट पाहत आहे. टाइमपास मधील देखणी जोडी केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब यांच्या नितांत सुंदरयानंतर ‘टाइमपास २ ‘ मध्ये त्यांच्या तरुणपणीचा रोल कोण करणार याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण करण्यात आली होती. पण आता ही उसुकता संपली आहे. एस्सेल व्हिजन आणि अथांश कम्युनिकेशन निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास २‘ हा सिनेमा १ मे २०१५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
झी टॉकीजच्या या ‘फुल्ल2टाइमपास‘ या कार्यक्रमात नावाप्रमाणेच खुप धमाल आली. यावेळी मराठी-हिंदीतील अनेक कलाकारांनी आपले परफॉमंस सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी ‘टाइमपास‘ ची जोडी केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब तसेच ‘टाइमपास २‘ चा मोठ्या दगडुची व्यक्तिरेखा साकारणारा प्रियदर्शन जाधव यांचे परफॉमंस हे मुख्य आकर्षण ठरले. ‘फुल्ल2टाइमपास‘ या कार्यक्रमाची सुरुवात प्रसिध्द अभिनेत्री आणि नृत्यांगना उर्मिला कानेटकरच्या नृत्याने झाली. पंचतुंड नररुंडमालधर आणि नटरंग या गायांवर तिने सादर केलेया नृत्याने सारे सभागृह मंत्रमुग्ध झाले. यानंतर स्वप्निल बांदोडकरने ‘मला वेड लागले प्रेमाचे‘ गाऊन पुन्हा एकदा रसिकांच्या मनावर आपल्या सुरेल स्वरांची मोहनी घातली. टाईमपास मधील जोडी प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर अभिनयाबरोबरच सुंदर नृत्यही करतात. यांनी ‘फुलपाखरु आणि कल्ला‘ या गीतांवर नृत्य सादर केले. प्रेक्षकांनीही त्यांना भरभरून दाद दली. अभिनेत्री अमृता खानविलकर ‘शिट्टी वाजली‘ या गीतावर नृत्य सादर करत संपूण सभागृहाला थिरकायला लावले.
यानंतर ‘टाईमपास२‘ या सिनेमाच्य म्युझिक लॉंचचा सोहळा पार पडला. दिग्दर्शक रवी जाधव, केणी, यांच्या हस्ते ‘टाईमपास२‘ च्या म्युझिक सीडिचे अनावरण करयात आले. या कार्यक्रमात सगळ्यात आकर्षण ठरला तो ‘टाईमपास२‘ चा ‘हिरो‘, सगळ्यांचा लाडका दगडू, म्हणजेच प्रियदर्शन जाधव याचा परफॉमंस. पेपरविक्या दगडूचा आता डॅशिंग ‘रॉकी‘ झाला आहे. नवा दगडू “रॉक‘ म्हणजेच प्रियदर्शन जाधवच्या ‘वॉव वॉव‘ या नृयाने एकाच धमाल उडवून दली. ‘टाईमपास‘ प्रमाणेच ‘टाईमपास२ मधील गाणीही अत्यंत श्रवणीय आहेत. मला वेड लागले आणि हि पोळी साजूक तुपातली‘ या गाण्यांनी नवीन बाज स्वीकारत ‘टाईमपास२ ‘ मध्येही आपली जादू कायम ठेवली आहे. बेला शेंडे, महालक्षमी अय्यर, शाल्मली खोलगडे, अपेक्षा दांडेकर, आदर्श शिंदे यांनी गायलेल्या सुमधुर गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. सोनाली कुलकर्णी हिच्या मदन पचकारी आणि नवीन ही पोळी साजूक तुपातली या तुफान नृत्याने संपूर्ण प्रेक्षकांना थिरकायला लावले.
झी टॉकिजच्या इतर सोहळ्यांप्रमाणेच हा सोहळाही अतिशय दिमाखदार झाला. या सोहळ्याचे प्रक्षेपण ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजताहोईल.
बच्चन कुटुंबियासह मराठी कलावंतांनी १०० फुटी उभारली म नसे गुढी
(पहा १५ फोटो )


मुं बई- मनसेच्या वतीने जुहू-चोपाटी येथे मराठी नववर्षाचे जोरदार स्वागत केले गेले. मनसेच्या वतीने 100 फुटांची गुढी उभारण्यात आली आहे. ही गुढी जुहूमध्ये आकर्षण ठरत आहे. हिंदू नववर्ष गुढी पाडवाच्या निमित्ताने आज सकाळी जुहु चौपाटीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी १०० फुट उंच गुढी उभारून ढोलताशांच्या गजरात हत्तीवरून साखर वाटप करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अमित राज ठाकरे ,पुष्कर श्रोत्री , अनिकेत विश्वासराव राजेश श्रुंगारपुरे, अनंत जोगउपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची मुस्लिम आरक्षण रद्द निर्णय विरोधी निदर्शने
अल्पवयीन मुलींचे लैगिंक शोषण-आयएएस अधिकाऱ्याला अटक -कोर्टात नगरसेविकांनी घातला चपलांचा हार
पुणे – अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला न्यायालयात हजर करत असतानाच म न से च्या नगरसेविकांनी त्याच्या गळ्यात चपलांचा हार घातला. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी शिवाजीनगर कोर्टासमोर घडली.मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मारूती सावंत याला आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार होते. दरम्यान न्यायालयात हजर करीत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका अस्मिता शिंदे, रुपाली पाटील, अर्चना कांबळे, संगीता तिकोने, युगंधरा चाकणकर, अनिता डाखवे, आशा साने यांनी निदर्शने केली. त्यावेळी अनिता डाखवे, आशा साने या नगरसेविकांनी त्याच्या गळ्यात चपलेचा हार घातला. याप्रकरणी त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे व्यवसाथपकीय संचालक, समाज कल्याण विभागाचे माजी संचालक भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) वरिष्ठ अधिकारी मारुती हरी सावंत (वय 58) हे इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या दोन, तसेच तिसरी आणि सातवीमध्ये असलेल्या प्रत्येकी एक अशा चार मुलींसोबत अश्लील चाळे करीत होते. सावंत याचे कुटुंबीय शिवाजीनगर येथे वास्तव्यास असून, ते गेल्या दोन वर्षांपासून सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या हद्दीत फ्लॅटमध्ये एकटेच राहतात. ते आठवड्यातून दोन दिवस येथील फ्लॅटवर येत होते. इमारतीच्या आवारात खेळणाऱ्या मुलींना कधी चॉकलेट, तर कधी पैशाचे आमिष दाखवून घरात बोलावत असे. त्यांना मोबाईल आणि संगणकावर अश्लील चित्रफित दाखवित असे. पीडित मुलींनी शाळेतील समुपदेशक महिलेस त्यांच्यासोबत होत असलेला प्रकार सांगितला. ही बाब भाजपचे नगरसेवक श्रीकांत जगताप यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन घडलेली घटना गंभीर असल्याचे लक्षात आणून दिले.सावंत हे पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात राहतात. त्यांच्या सदानिकेशेजारी असलेल्या तिसरी पाचवीच्या वर्गातील मुली खेळण्यासाठी इमारतीच्या पार्किंगमध्ये येत असत. या मुलींना चॉकलेट, खाऊचे आमिष दाखवून सावंत त्यांच्या घरात घेऊन जात असे. त्यानंतर मुलींना अश्लील फोटो चित्रफित दाखवून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे पुण्याचे पोलिस आयुक्त सतिश माथूर यांनी सांगितले. न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. चपलेचा हार घातल्याप्रकरणी अनिता डाखवे आणि आशा साने या नगरसेविकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शाहीर कृष्णराव साबळे यांचे निधन
मुंबई-‘गर्जा महाराष्ट्र माझा‘, ‘जय जय महाराष्ट्र माझा।।‘ हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे – ‘महाराष्ट्राची लोकधारा‘ या कार्यक्रमामधून घराघरांत पोहोचलेले शाहीर कृष्णराव साबळे यांचे वृद्धापकाळाने आज (शुक्रवार) परळ येथे राहत्या घरी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.
शाहीर साबळे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर म्हणून त्यांचे मोठे योगदान होते. दिग्दर्शक केदार शिंदे हे साबळे यांचे नातू होत. ‘गर्जा महाराष्ट्र माझा‘, ‘जय जय महाराष्ट्र माझा।।‘ हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पोहोचवले होते. ‘सह्याद्रीचा सिंह गर्जतोऽऽ‘ या ओळी ऐकताना त्यांच्या पहाडी आवाजाचा प्रत्यय येत होता.
शाहीर साबळे यांचे पसरणी (ता. वाई, जि. सातारा) हे मूळ गाव. जात्यावर ओव्या गाणारी आई आणि भजनं गाणारे वारकरी वडील यांच्याकडून त्यांना गायनाचे बाळकडू मिळाले होते. शालेय शिक्षणासाठी अंमळनेरला असताना साने गुरुजींशी त्यांचा संपर्क आला. तेथे त्यांच्यावर राष्ट्रीयत्वाचे संस्कार झाले. महाराष्ट्राच्या अनेक सामाजिक व राजकीय घडामोडींत एक कलावंत-कार्यकर्ता म्हणून शाहीर साबळेंची कामगिरी नेहमीच मोलाची राहिली. 1942ची चळवळ, गोवा व हैदराबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांसह दारूबंदीचा प्रचार, लोककलाकारांचा सांभाळ, लोकगीतांचे पुनरुज्जीवन अशा अनेक विधायक कामांतही त्यांचा मोठा वाटा आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देताना त्यांच्या कलापथकाने दौरे केले. शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांची स्वतःची अन् त्यांच्या ‘आंधळं दळतंय‘ या प्रहसनाची भूमिका मध्यवर्ती होती.
सिद्धार्थ जाधव बनला ९२.७ बिग एफ एम चा आर. जे.
९२.७ बिग एफ एम चा नंबर वन शो “मसाला चहा” या शो चे सिद्धार्थ जाधव याने खास गुढी पाडवा साठी होस्टिंग केले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. हा गुढी पाडवा स्पेशल शो सिद्धार्थ जाधव बरोबर खास तुमच्यासाठी ९२.७ बिग एफ एम आणत आहे रविवारी सकाळी ८ ते १० या वेळात, तेव्हा सिद्धर्थ जाधव बरोबर गुढी पाडवा साजरा करा फक्त ९२.७ बिग एफ एम वर.




