पुण्यातील महाराष्ट्र कोस्मोपोलीटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस ) मध्ये सुद्धा २१ जून रोजी ‘योग दिवस ‘ साजरा करण्यात येणार असून योगासनांचा सराव सुरु आहे
पुण्याचा शहर नव्हे तर स्मार्ट प्रदेश म्हणून विकास करा
क्रेडाईचे पुणे मेट्रोचे पंतप्रधानांना पत्र, शहराच्या जमेच्या बाजूंवर भर
पुणे – पुणे शहर हे केवळ स्मार्ट शहर म्हणून नव्हे तर स्मार्ट शहर आणि प्रदेश म्हणून विकसित करता येऊ शकते. पुणे हे केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवरही राहण्यासाठी व व्यवसायासाठी सर्वोत्तम शहर म्हणून मान्यता पावले आहे. पुण्यातील पायाभूत सोईसुविधांमध्ये गुंतवणूक केल्यास महाराष्ट्राच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्याही आर्थिक विकासाला त्वरित चालना मिळेल, असे क्रेडाई पुणे मेट्रोने म्हटले आहे. संघटनेने पंतप्रधानांना या संदर्भात पत्र लिहिले आहे.
क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी लिहिलेल्या या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष पुण्याच्या आर्थिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञानात्मक आणि औद्योगिकदृष्ट्या जमेच्या बाजूंकडे आणि ते महाराष्ट्र व पश्चिम भारताचे चैतन्यशील हृदय कसे बनू शकते, याकडे वेधण्यात आले आहे.
या पत्रात पुणे शहराला केंद्रस्थानी ठेवून पुणे शहर व आसपासच्या प्रदेशाचा विकास कसा करता येईल, याबाबत क्रेडाई पुणे मेट्रोने मुद्दे मांडले आहेत. “शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी आणि निवृत्तीनंतर येणार्या ज्येष्ठ नागरिक, अशा सर्व वयोगटातील लोकांना पुणे आकर्षित करते. यामुळे एक शाश्वत व्यवस्था तयार झाली आहे. पुण्याच्या शहरी भागाच्या साक्षरतेचा दर (91.42%) हा देशातील 10 प्रमुख शहरी भागांमध्ये सर्वोच्च आहे. साक्षरतेच्या बाबतीत पुणे देशात 5 क्रमांकावर आहे. देशात येणाऱ्या एकूण परदेशी विद्यार्थ्यांपैकी 45% विद्यार्थी पुण्याची निवड करतात. साक्षरतेच्या या उच्च पातळीमुळे पुण्याचे लोक स्मार्ट सिटी ही संकल्पना समजून घेऊन तिचा स्वीकार करू शकतात आणि त्यामुळे तिची अंमलबजावणी अधिक सोपी व अधिक कार्यक्षम होऊ शकते,” असे या पत्रात म्हटले आहे.
पुण्याच्या एकूण लोकसंख्येमध्ये मध्यमवर्गीयांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांची क्रयशक्ती जास्त असल्याची बाब या पत्रात अधोरेखित केली आहे. या सशक्त अर्थव्यवस्थेमुळे शेजारील गाव व खेड्यांमधील लोकांना रोजगार मिळू शकतो.
पुण्यातील मोठे वाहन उद्योग व अभियांत्रिकी कंपन्या, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, विक्रेत्यांचे सशक्त जाळे आणि मुंबईच्या बंदराशी जवळीक यांमुळे पुणे हे पांरपरिकरित्या निर्मितीचे केंद्र आहे. हे देशातील ई-व्यवहारांमध्ये सर्वात मोठ्या केंद्रांमध्ये 9व्या स्थानी असून जागतिक पातळीवर दुसरे सर्वाधिक आश्वासक आणि उभरते केंद्र म्हणून मानले गेले आहे. येथील माहिती तंत्रज्ञान व आयटी संबंधित सेवा कंपन्यांची एकूण निर्यात 3.5 अब्ज डॉलर्सची असून या कंपन्या 2.5 लाख अभियंत्यांना रोजगार पुरवितात,” या वस्तुस्थितीकडे पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे विस्तारित पुणे शहर प्रदेशासाठी अगोदरच एक खिडकी प्राधिकरण अस्तित्वात आले असून सध्याच्या 3500 चौ. किमीवरून या प्रदेशाची हद्द दुप्पट होऊन 7000 चौ. किमी इतकी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पुण्याचा विकास म्हणजे पुण्याच्या सभोवती 800 हून अधिक गावे व खेड्यांचा विकास, असा युक्तिवाद क्रेडाई पुणे मेट्रोने सादर केला आहे.
याशिवाय पत्रात म्हटले आहे, की या शहराला कला आणि संस्कृतीची मोठी परंपरा आहे त्यामुळे या शहराला विशिष्ट ओळख मिळाली आहे. येथील जीवनमान आणि भक्कम आर्थिक क्षमतेमुळे, या शहराचा केवळ शहर म्हणून नाही तर स्मार्ट प्रदेश म्हणून विकास करण्याची आवश्यकता आहे, असेही पत्रात म्हटले आहे.
लघुपटांसाठीचा अभिनय आणि निर्मिती या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
पुणे :
“चॉईस फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’तर्फे “लघुपटांसाठीचा अभिनय आणि पारितोषिक विजेत्या लघुपटाची निर्मिती’ या विषयी मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये “शामियाना शॉर्ट फिल्म क्लब’चे संस्थापक सायरस दस्तुर मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा दिनांक 28 जून 2015 रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत “चॉईस फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट प्रा.लि., मॅकडोनाल्डच्या मागे, करिष्मा चौक, कर्वेरोड (कोथरूड), पुणे-38 येथे होणार आहे, अशी माहिती “चॉईस फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’चे संचालक प्रा. राजू भोसले यांनी दिली.
“शॉर्ट फिल्म मेकिंग’, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्कार विजेत्या लघुपटाची निर्मिती, लघुपट निर्मितीतून उत्पन्न मिळविणे, अभिनयाचे पैलू, लघूपट निर्मितीचे विविध प्रकार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची माहिती, आंतरराष्ट्रीय स्तरावरील फेस्टिव्हलसाठी लघुपट पाठविण्याची पद्धत या विषयी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी 9325101629 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा contact@ cftipune.com या ई-मेल वर संपर्क साधावा.
दहावीच्या परीक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार
पुणे:
दहावीच्या परीक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या “महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या “अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल’च्या विद्यार्थिनींचा “महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी.ए.इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
“अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल’मध्ये शेख आयेशा रफिक95.80 टक्केमिळवून हायस्कूलमध्ये प्रथम आली. तर तंबोली तस्कीन झाकीर हुसेन 94.16 टक्केगुण मिळवून दुसरी, खान बझिला फारूक 94 टक्केगुण मिळवून तिसरी आली आहे. तसेच बारा विद्यार्थिनींना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.
यावेळी संस्थेचे सचिव लतिफ मगदूम, स्कूल कमिटीचे संस्थापक हाजी अब्दुल कादीर कूरेशी, स्कूल कमिटीचे सदस्य एस.ए.इनामदार, अलिया इनामदार, गव्हर्निंग बोर्ड सदस्य मजीद उस्मान, शेख मोहम्मद हनिफ, प्राचार्य आयेशा शेख.
एल. बी. टी. स पुणे कॅम्प मर्चंट असोंसिएशनने दर्शविला विरोध
पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या भागात लागू झालेल्या एल. बी. टी. स पुणे कॅम्प मर्चंट असोंसिएशनने विरोध दर्शविला असून एल. बी. टी.च्या विरोधात बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी केला आहे.
पुणे कॅम्प मधील भोपळे चौकाजवळील राजस्थान भवनमध्ये पुणे कॅम्प मर्चंट असोंसिएशनने सर्व व्यापाऱ्यांची एल. बी. टी. बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीस दि फेडरेशन ऑफ ट्रेड असोंसिएशनस ऑफ पुणे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल , खजिनदार फतेचंद रांका , सचिव महेद्न पितळीया , पुणे कॅम्प मर्चंट असोंसिएशनचे अध्यक्ष आनंद कोच्चर , उपाध्यक्ष पराग शहा , जयंत शेटे , अरविंद बुधानी , कावस पंडोल , किशोर संघवी , मनोज सेठी , संजीव फडतरे , विजय ओसवाल , महेंद्र चावला , गिरीश पटेल , अमित व्होरा , सागर शहा , राहुल काळे , मनेश मेहता , बोमन भरुचा , सुनील आठवानी , रोहन खंबाटा , प्रकाश ओसवाल , राहुल रांका व मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते .
यावेळी फतेचंद रांका यांनी सांगितले कि , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या भागात लागू झालेल्या एल. बी. टी. विरोधात सर्व व्यापाऱ्यांनी एकजुटीने विरोध दर्शविला पाहिजे , देशात ६२ कॅंटोन्मेंट बोर्ड असताना फक्त पुणे कॅंटोन्मेंट बोर्डास एल. बी. टी. का लागू करण्यात येत आहे , त्यामध्ये केंद्र सरकार सत्तेवर येण्या अगोदर त्यांनी एल. बी. टी. रद्द करण्याचे सांगण्यात आले होते परंतु त्यांनी या एल. बी. टी. ची सुरुवात पुणे कॅंटोन्मेंट बोर्डापासून केली आहे , याला संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे . त्या साठी दि फेडरेशन ऑफ ट्रेड असोंसिएशनस ऑफ पुणे व पुणे कॅम्प मर्चंट असोंसिएशनने यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर परिकर , स्थानिक खासदार अनिल शिरोळे , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , प्रकाश जावडेकर , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे . त्यामध्ये खासदार अनिल शिरोळे यांनी एल. बी. टी. रद्द करण्याचे आश्वासन व्यापारी बांधवाना दिले आहे . पुण्यामध्ये खडकी कॅंटोन्मेंट बोर्डास एल. बी. टी. लागू नाही तसेच देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड भागात आजही जकात घेण्यात येत आहे . त्यामुळे फक्त पुणे कॅंटोन्मेंट बोर्डास एल. बी. टी. का लागू करण्यात येत आहे. हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला . यासाठी व्यापारयानी एकजूटीने विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले . त्यामध्ये राज्यात १ ऑगस्ट पासून राज्य शासन एल. बी. टी. रद्द करणार आहे आणि केंद्र सरकारने पुणे कॅंटोन्मेंट बोर्डास एल. बी. टी. का लागू केली हि विसंगती व्यापाऱ्यांमध्ये शंका निर्माण करणारी आहे .
यावेळी पोपटलाल ओस्तवाल , पराग शहा , रतन किराड , जयंत शेटे, आनंद कोच्चर , अरविंद बुधानी , किशोर संघवी या व्यापारयानी मनोगते व्यक्त केली .
1ली ते 9वी च्या विद्यार्थ्यांसाठी “ई-लर्निंग’ची सुविधा
पुणे:
“एस. एस. अगरवाल इंग्लिश मिडीयम स्कूल’ दत्तवाडी येथील शाळेचा दिनांक 18 जून 2015 रोजी 9 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या वर्धापनदिनापासून 1ली ते 9 वी च्या विद्यार्थ्यांना “ई-लर्निंग’ सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये 1ली ते 9 वी च्या वर्गांमध्ये ” प्रोजेक्टर’ बसविण्यात आले आहेत. चित्रफितींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विषय समजून सांगितले जातील, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी रासकर यांनी दिली.
या “ई-लर्निंग सुविध’चे उद्घाटन विजय जालान (संस्थापक), डॉ. सुरेश अगरवाल (सचिव), लीली बी. पटेल यांच्या हस्ते झाले.
यावेळी विजय जगदीशचंद्र अगरवाल (उपसंस्थापक), सदस्य जयभगवान गुप्ता, प्रमुख सद्स्य रामनिवास एल.अगरवाल, आर.एल.अगरवाल, शुभांगी रासकर (मुख्याध्यापिका), तसेच शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सभासद आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होतेे.
मुंबईत १०८ रुग्णवाहिका सेवा हाय अलर्टवर
जुन्या मराठी सिनेमांचे रिमेक आणि जुन्या मराठी गाण्यांची पुनर्निर्मिती करून मराठी सिनेमाला जागतिक बाजारपेठेत सादर करणार
भुजबळ प्रकरणी पवारांचे मौन संशय वाढविणारे
दरम्यान , महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी अनेकदा सरकारे बदलली, मात्र ज्या पद्धतीने मला व माझ्या कुटुंबाला देवेंद्र फडणवीस सरकारकडून टार्गेट केले जात आहे, तसे यापूर्वी कधीही घडले नव्हते. मला व माझ्या कुटुंबाला गाडून टाकण्याचा प्रयत्न करू नका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कारवाईसंदर्भात व्यक्त केली.
ज्या प्रकरणांबात माझ्या विरोधात गुन्हे नोंदविले जात आहेत, ते निर्णय तत्कालीन मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतले होते. ज्याचे अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री होते. या प्रकरणांमध्ये जर मी गुन्हेगार असेन तर त्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला जे उपस्थित होते ते सर्वजण गुन्हेगार आहेत, असे भुजबळ म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ही सर्व कारवाई कोर्टाच्या निर्देशानुसार सुरू असल्याचे म्हटले आहे. त्यावर बोलताना, कोर्टाने या प्रकरणांमध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले होते. माझ्यावर वा माझ्या कुटुंबीयांवर एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले नव्हते, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि कलिना येथील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या उभारणीत असलेल्या अनियमिततांची चौकशी एसीबी करत असून, त्यातील आरोपींच्या निवासस्थानांची शनिवारपासून झडती सुरू झाली आहे. यात राज्याचे माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्यासह सार्वजनकि बांधकाम विभागांच्या अनेक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या घोटाळ्यात जात्यात असलेले तत्कालीन सार्वजनकि बांधकाममंत्री छगन भुजबळ, त्यांचे पुत्र पंकज, पुतण्या समीर यांच्या मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक येथील मालमत्तांवरही मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एसीबीने छापे घातले. यामध्ये १०० अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. या छाप्यांमध्ये भुजबळ कुटुंबीयांच्या नावे चारही शहरांत असलेल्या स्थावर मालमत्तांचा तपशील उघड झाला. मात्र छाप्यांमध्ये अधिकाऱ्यांना दोन्ही घोटाळ्यांशी संबंधति एकही कागदपत्र अथवा पुरावा सापडलेला नाही. बेहशिेबी संपत्ती, पैसे यांची मोजणी करण्यासाठी सर्व साहित्य घेऊन ैकर्मचारी या मालमत्तांवर धडकले होते, परंतु, ज्ञात मालमत्तेपलीकडे एसीबीला भुजबळ कुटुंबीयांच्या नावे काहीही सापडलेले नसल्याचे समजते.
मला तर शरद पवार ,प्रफुल्ल पटेल, राजीव शुक्लांनी हि मदत केली – ललित मोदी
(सर्व फोटो-संग्रहीत )
नवी दिल्ली-आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांना केवळ सुषमा स्वराज , वसुंधरा राजेच नाही तर शरद पवार प्रफुल्ल पटेल , पत्रकारितेतून राजकारणात गेलेले राजीव शुक्ला यांनी मदत केल्याचे बाहेर येते आहे – मात्र पवार यांनी हे खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे
यूपीए सरकारमध्ये मंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी आपल्याला मदत केल्याचा गौप्यस्फोट करत ललित मोदींनीच विरोधकांना उघडे पाडले आहे.
मोंटेनेग्रामध्ये सध्या सुट्ट्या एन्जॉय करत असलेल्या ललित मोदी यांच्याशी ‘इंडिया टुडे’ने संपर्क साधला असता त्यांनी अनेक धक्कादायक बाबी उजेडात आणल्या. पवार, पटेल, आणि शुक्ला यांनी आपल्याला ट्रॅव्हल पेपर मिळवून देण्यासाठी मदत केली होती, असा दावा ललित मोदी यांनी केला. मात्र पवार आणि शुक्ला या दोघांनीही मोदींचा दावा फेटाळला आहे. मी ललित मोदी यांना कधीही मदत केलेली नाही. गेल्या तीन वर्षांपासून मी त्यांना भेटलेलो नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे तर पवार यांनी आपण ललित मोदींना भारतात परतून चौकशीस सामोरे जाण्यासंबधी सांगितले होते. त्याशिवाय आपला त्यांच्याशी काहीही संबंध नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुधरा राजे यांनी इंग्लंडममध्ये मी केलेल्या इमिग्रेशन अर्जाचे लिखित स्वरूपात समर्थन केले होते. दोन वर्षांपूर्वी पोर्तुगालमध्ये पत्नीवर कॅन्सरचे उपचार केले त्यावेळी वसुंधरा हजर राहिल्या होत्या, असा दावाही ललित मोदी यांनी केला.
ललित मोदी प्रकरणात ईडीच्या तपासालाही वेग आला असून वसुंधरा राजे यांचा मुलगा खासदार दुष्यंत सिंह यांच्या मालकीच्या कंपनीच्या खात्यात ललित मोदी यांनी २००८ मध्ये ११ कोटी ६३ लाख रुपये ठेवले होते, अशी माहिती समोर येत आहे.
सुषमा स्वराज यांच्याशी आमचे घरोब्याचे संबध आहेत. सुषमा यांचे पती आणि मुलीने आपल्याला एकही पैसा न घेता कायदेशीर मदत पुरवली होती असे हि ललित मोदी याने म्हटले आहे
छगन भुजबळांची प्रॉपर्टी -कुठे । कुठे?
भुजबळांकडे एवढी तर आणखी कोणा कोणाकडे किती असेल … राज्यात आयुष्यभर राब राबून निवृत्तीनंतर बड्या मुश्किलीने एखादे घर घेता घेता अनेकांच्या नाकीनवू येते … चल पाहू यात भुजबळांची काय कोणती मालमत्ता चर्चेत आहे –
सुखदा को.ऑ.हौ.सो. वरळी छगन भुजबळ २००० चौ.फुटांचे घर, टोयोटा कॅमरी कार
मिलेशिया अपार्टमेंट, माझगाव छगन भुजबळ ६०० चौ.फुटांची तीन घरे
माणेक महल, ५वा मजला पंकज भुजबळ १२०० चौ. फुटांचे घर
माणेक महल, ७वा मजला मिना छ. भुजबळ १२०० फुटांचे घर (भाड्याने दिलेले)
सागर मंदिर को.ऑ.हौ.सो., हिराबाई मगन भुजबळ ६०० चौ. शिवाजी पार्क फुटांचे घर
साईकुंज बिल्डिंग, दादर (पू.) विशाखा भुजबळ १५०० चौ. फु. घर, शेफाली भुजबळ (१२०० चौ. फू.), हिराबाई भुजबळ (१५०० चौ.फू.), मिना भुजबळ (१२०० चौ.फू.),
ग्रोथ इन्फ्रा, दुकान (१५०० चौ.फू.)
सॉलिटेअर बिल्डिंग, समीर भुजबळ संपूर्ण पाचवा माळा, एस.व्ही. रोड, सांताक्रूझ २५०० चौ.फू.घर
पंकज भुजबळ सातवा माळा, २५०० चौ.फू. घर
मिना भुजबळ आठवा मजला २५०० चौ.फू. घर
ठाणे
पी एच ७, मारुती पंकज भुजबळ १३५० चौ.फू. घर, एनक्लेव्ह को. ऑ. सो. तसेच ए विंगमध्ये भुजबळ ग्रुप कंपनीचे एक घर
मारुती पॅराडाइज को.ऑ.हौ. दुर्गा भुजबळ १३०५ चौ.फू.घर
सो.बी-विंग. सीबीडी बेलापूर
मारुती पॅराडाइज को.ऑ. हौ. भुजबळ ग्रुप एकूण नऊ गाळे, सी-विंग. सीबीडी बेलापूर त्यातील दोन भाड्याने तर सात बंद.
एव्हरेस्ट को.ऑ.हौ. पंकज भुजबळ १३०० चौ.फू.घर
सोसायटी सीबीडी बेलापूर
लाजवंती बंगला, मिना भुजबळ १३०० चौ.फू. घर
सीबीडी बेलापूर
पुणे
लोणावळा, मु.पो. आवतन पंकज भुजबळ, २.८२ हेक्टरजागेत समीर भुजबळ सहा बेडरूमचा अलिशान बंगला, परदेशी फर्निचर, प्राचीन मूर्ती, स्विमिंग पूल, हेलिपॅड, शेततळे, तीन नोकरांची घरे, सुरक्षा रक्षकांकरिता पाच खोल्या, अंदाजे पाच कोटी किमतींची फळझाडांची लागवड.
ग्राफीकॉन आर्केड, समीर भुजबळ घर
संगमवाडी फ्लॅट नं. २०८,
तिसरा माळा, प्लॉट नं. १५३,
नाशिक
चंद्राई बंगला, भुजबळ फार्म मिना भुजबळ ४००० चौ.फू. बंगला
भुजबळ पॅलेस, भुजबळ पंकज भुजबळ ४६५०० चौ.फू. बंगला. किंमत अंदाजे १०० कोटी. २५ खोल्या, स्विमिंग पूल व जीम.
येवला
पंकज भुजबळ ५००० चौ.फू. ११ खोल्या
मनमाड
येथे बंगला-
पाच खोल्या
, ऑफिस ३००० चौ.फू., पाच खोल्या
राम बंगला समीर भुजबळ १५०० चौ.फू.
यशस्वी मुस्लीम विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत-
“महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि “मुस्लीम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशन’च्या वतीने मुस्लीम समाजातील दहावीत 90 टक्क्यांहून अधिक गूण मिळविणाऱ्या यशस्वी आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक मदत आणि व्यवस्था करण्यात येणार आहे.
तरी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी 9326264044 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शब्बीर अत्तार यांनी केले आहे.
सक्तीच्या मतदानासाठी गुजरात मध्ये कायदा …
गांधीनगर-सक्तीचे मतदानासाठी गुजरात मध्ये कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून उद्या (बुधवारी) होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत या कायद्याला अंतिम स्वरुप मिळण्याची शक्यता आहे.
या कायद्याने मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ होऊ शकते. दरम्यान, गुजरात पॅटर्न यशस्वी झाला तर देशभरात राबविला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शारदा ग्रुपने दिलेली रक्कम मिथुनने केली परत
नवी दिल्ली–अभिनेता आणि तृणमूल कॉंग्रेसचा खासदार मिथुन चक्रवर्ती याने शारदा ग्रुपचा “ब्रॅण्ड ऍम्बेसेडर‘ म्हणून स्वीकारलेली 1 कोटी 19 लाख रुपयांची रक्कम अंमलबजावणी संचालनालयाला परत केली आहे.
मिथुन चक्रवर्तीने शारदा ग्रुपचा ब्रँड अम्बेसेडर होण्यासाठी करार केला होता. त्याबदल्यात तब्बल १ कोटी १९ लाख रुपये देखील त्याला मिळाले होते. मात्र या ग्रुपचे नाव चिट फंड घोटाळ्यात समोर आल्यानंतर त्याने हे सगळे पैसे ईडीकडे परत करण्याचा निर्णय जाहीर केला होता. आपल्या वाढदिवसच्या दिवशी आपण सारे पैसे परत करू असेही त्याने सांगितले होते. त्याप्रमाणे आज ६५ व्या वर्षात पदार्पण करताना मिथुनने देशाच्या जनतेला दिलेले वचन पूर्ण करून एक अनोखा आदर्श बॉलिवूड अभिनेत्यांसमोर ठेवला. ईडीने केलेल्या चौकशीच्या वेळी त्यांनी संपूर्ण सहकार्य करत शारदा ग्रुपच्या माध्यमातून आपल्याकडे आलेली रक्कम आपण परत करू असे स्पष्ट केले होते. तसेच शारदाच्या प्रमोशन व्हिडिओ आणि जाहिरातीत काम केल्याचेही त्याने ईडीसमोर सांगितले. तसेच हा कराराचा भाग असल्याचेच स्पष्ट केले.



