परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प असण्याची गरज – नितीन गडकरी
डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो २६ जुलैला सायंकाळी ७.०० वा.
गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा हा अतिदुर्गम जंगलातील भाग. जिथे शहरातील माणूसच काय पण सूर्यकिरणंही पोहचणं अवघड होतं. जगाची गोष्ट तर दूरच पण महाराष्ट्राच्या नकाशावरही अशा गावाचे पुरावे मिळणं कधी काळी अशक्य होतं. अशा ठिकाणी जाऊन शहराचे सुखवस्तू जीवन नाकारून आयुष्याची एक नवी सुरुवात करणं ही कल्पनाही अशक्यच. पण ही कल्पनाच नव्हे तर ते स्वप्न उराशी बाळगून एक अवलिया आपल्या पत्नी आणि सहका-यांसह तिथे जातो…. आपल्या निस्सीम, निःस्वार्थ सेवेने आदिवासींच्या जीवनात नंदनवन फुलवतो आणि हेमलकसाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवतो. हा अवलिया म्हणजे ज्येष्ठ समाजसेवी डॉ. प्रकाश बाबा आमटे. समर्पण या शब्दाला जागणारे नव्हे तर जगणा-या डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटेंची ही कथा “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो” या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आली आणि तिने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अनेक मानाच्या पुरस्कारांवर मोहोर उमटवलीच शिवाय प्रेक्षकांचेही भरभरून प्रेम मिळवले. नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या सहजसुंदर अभिनयाने सजलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीस येतोय झी मराठीवरून. येत्या रविवारी, २६ जुलैला सायंकाळी ७.०० वा. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमियर झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.
भारतामध्ये समाजसेवकांची एक मोठी परंपरा आहे. स्वतःच्या सुखवस्तू आय़ुष्याचा त्याग करत दिवसरात्र समाजासाठी काम करणारे अनेक थोर समाजसुधारक महाराष्ट्रात होऊन गेले. ती परंपरा तो वारसा आजही अनेकजण निस्वार्थीपणे चालवत आहेत. यात एक महत्त्वाचं नाव आहे ते आमटे कुटुंबियांचं. बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करून त्यांच्या आयुष्यात आनंदवन फुलवलं तर त्यांचा मुलगा डॉ. प्रकाश आणि सून डॉ. मंदाकिनी आमटे यांनी हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवांसींच्या आयुष्यात आरोग्य आणि शिक्षणाचं नंदनवन फुलविलं. या व्रतस्थ दाम्पत्याची, त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या जिद्दीची कथा यापूर्वी अनेक पुस्तके, लेख, आणि लघुपटांच्या माध्यमातून जगासमोर आली होती. रेमन मॅगससे सारख्या अतिशय मानाच्या पुरस्काराने गौरविल्या गेलेल्या या दाम्पत्यांच्या कार्याची दखल जगभरातून अनेकांनी घेतली. त्यांच्या याच यशाची गाथा “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो” या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि त्यांचं ‘लार्जर दॅन लाईफ’ कार्य आणि व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी पद्धतीने प्रेक्षकांसमोर आलं. समृद्धी पोरे यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात चतुरस्र अभिनेता नाना पाटेकर यांनी डॉ. प्रकाश आमटे यांची भूमिका साकारली होती तर मंदाताईंच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी ही बहुगुणी अभिनेत्री होती. या दोघांच्या संयत आणि प्रभावी अभिनयाने आणि आमटे दाम्पत्याच्या कथेने प्रेक्षकांना हेलावून सोडले. शहराच्या चकचकीत वातावरणात जगणा-या आणि सर्व सोयी सुविधा मिळत असूनही सतत तक्रार करणा-या अनेकांना या कथेने अंतर्मुखही केले. प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, माणुसकी आणि प्रेम यांच्या जोरावर केवळ आदिवासीच नाही तर हिंस्त्र प्राण्यांनाही कसं आपलंसं करता येतं हे डॉ. आमटेंच्या जीवनप्रवासातून उमगलं. हाच अनुभव प्रेक्षकांना पुन्हा एकदा देण्यासाठी “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो” हा चित्रपट त्यांच्या भेटीस येतोय येत्या रविवारी २६ जुलैला सायंकाळी ७.०० वा. झी मराठीच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर मधून.
कृषिपंपाचा प्रत्यक्ष वीजवापर व वितरण हानीचा – अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित
पुणे-
वीजहानीचे योग्यरितीने निर्धारण आणि कृषिपंपाच्या वीजवापराचे मूल्यांकन करण्यासाठी म.रा.वि.म. सूत्रधारी कंपनीने
त्रिसदस्यीय समिती गठित केली असून या समितीने कामकाजास सुरुंवात केली आहे. ही समिती दि. 31 डिसेंबर 2015
पर्यन्त आपला अहवाल सादर करणार आहे.
राज्य शासन कृषिपंपधारक ग्राहकांना परवडेल अशा दराने वीजपुरवठा करण्यासाठी वीज देयकात लक्षणीय
अनुदान देते. कृषिपंपाचा जोडभार व वीजवापर जास्तीचा दाखवून त्याद्वारे वीज वितरण हानी नियंत्रित करण्यात येत
असून कृषिपंपाचा एकूण वीजवापर वाढविण्यात आला आहे. वीज चोरीच्या माध्यमातून वीजहानीची भरपाई केली जात
आहे. अशा प्रकारचे आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. या बाबींचा अभ्यास करूंन त्यावर उपाययोजना
सूचविण्यासाठी सूत्रधारी कंपनीने तज्ञांची त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे.
या समितीचे अध्यक्ष श्री. विश्वास पाठक असून या समितीत वीज ग्राहक संघटनेचे श्री. प्रताप होगाडे व आशिष चंदाराणा
यांचा समावेश आहे. या समितीद्वारे महावितरणकडून कृषिपंपांना दिला जाणारा वीजजोडभार व वीजबील पध्दतीचा
अभ्यास केला जाणार आहे. तसेच नमुना म्हणून निर्धारित करण्यात येणार्या 100 कृषिवाहिन्यांची प्रत्यक्ष पाहणी
करण्यासाठी त्रयस्थ संस्थेच्या नियुक्तीची शिफारस करण्यात येणार आहे. या त्रयस्थ संस्थेच्या कामकाजावरही ही
त्रिसदस्यीय समिती देखरेख ठेवणार आहे.
आकाशवाणी नाबाद 88 ; आज विविध कार्यक्रम
सातारा -(जि.मा.का): “This is all india radio… यह आकाशवाणी है..! हे आकाशवाणी आहे…” भारतातील सर्व भाषा व बोली भाषेतून श्रोत्यांशी संवाद साधणाऱ्या आणि खास करुन ग्रामीण भागातील श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आपल्या आकाशवाणीला 88 वर्षे उद्या पूर्ण होत आहेत. याच वर्धापन दिनानिमित्त उद्या गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता श्री. छ. शाहू कला मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संगीत, लोकसंगीत, समुहगीत यांच्यासह ‘काचेपलीकडील वास्तव’ हा आकाशवाणी उद्घोषकांतर्फे सादर केला जाणारा कार्यक्रम खास आकर्षण असेल, अशी माहिती आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी गोविंद मोकाशी यांनी दिली.
23 जुलै 1927 ला मुंबई आणि कलकत्ता येथे प्रसारण सेवेला सुरुवात झाली. 1936 मध्ये भारतीय प्रसारण सेवेचे ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण झाले आणि 1957 मध्ये आकाशवाणी असे नाव करण्यात आले. 23 नोव्हेंबर 1991 ला सातारा केंद्रची सुरुवात करण्यात आली. आकाशवाणीच्या 88 व्या वर्धापनदिनानिमित्त पश्चिम क्षेत्राचे अतिरिक्त महासंचालक एम.एस. थॉमस यांनी उद्या गुरुवारी राज्यातील सर्वच आकाशवाणी केंद्रातर्फे विविध कार्यक्रमांची मेजवानी श्रोत्यांसाठी ठेवली आहे.
गेल्या 88 वर्षांपासून आकाशवाणी बहुजन हिताय बहुजन सुखाय या घोषवाक्याप्रमाणे सर्वांच्या जीवनाशी निगडीत झालेली आहे. चारशे हून अधिक केंद्रातून अगदी कारगीलपासून कन्याकुमारीपर्यंत आणि भूजपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत 99 टक्के भारतीय भूभागातील जनसामान्यांचे ज्ञानरंजनातून मनोरंजन करीत आहे. आपत्तकालीन काळात मदत कार्यालयात अग्रभागी असणारी आकाशवाणी जागातील मोठी सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे. भारतातील सर्व भाषा आणि बोली भाषेतून श्रोत्यांशी संवाद साधणाऱ्या आकाशवाणीला 88 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आकाशवाणीतर्फे विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यामध्ये सूरवर्धिनी संगीत विद्यालयातर्फे सूरमयी सांज, विजयकुमार गायकवाड आणि सहकारी प्रस्तुत लोकसंगीत, कन्या शाळेतर्फे समुहगीत आणि काचेपलीकडील वास्तव हा कार्यक्रम आकाशवाणीचे उद्घोषक सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता श्री. छ. शाहू कला मंदिर येथे होणार आहे. हा कार्यक्रम विनामुल्य असून जास्तीत जास्त सातारकरांनी याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन श्री. मोकाशी यांनी केले आहे.
गजेंद्र चौहान विरोधात आता दिल्ली त ही आंदोलन सुरु करण्याचा निर्धार
पुणे :आर एस एस चा स्पष्ट पाठींबा मिळालेले एफटीआयआय चे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात सुरू केलेले आंदोलन आता पुण्याबरोबर थेट दिल्ली दरबारीदेखील सुरु करण्याचे भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी ठरविले आहे. हे आंदोलन अधिक परिणामकारक करण्यासाठी आंदोलक विद्यार्थी आता संसदेसमोर ठाण मांडून बसणार आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असल्यामुळे त्यानिमित्त राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळविण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय, या आंदोलनामध्ये ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा‘ आणि ‘आयआयटी-दिल्ली‘च्या विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाईल,‘‘ असे विद्यार्थ्यांतर्फे सांगण्यात आले
‘‘एफटीआयआय सोसायटी‘ विसर्जित करण्याची प्रमुख मागणी मागे घेतल्याशिवाय सरकार कोणत्याही संवादासाठी पुढाकार घेणार नाही,‘ असे संचालक प्रशांत पाठराबे यांच्यामार्फत सरकारने विद्यार्थ्यांना कळविले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘एफटीआयआय‘च्या विद्यार्थ्यांची पत्रकार परिषद आज (बुधवार) झाली. “येत्या 3 ऑगस्ट रोजी दिल्लीत आंदोलन होणार असले, तरीही पुण्यातले आंदोलनही सुरूच राहणार आहे. केंद्र सरकारवर अधिक दडपण आणण्यासाठी दिल्लीत आंदोलन करण्याचा विचार आम्ही केला. दिल्लीत जाऊन आमचा आवाज अधिक ‘व्यापक‘ होईल. विविध पक्षांच्या खासदारांना आम्ही पाठिंब्यासाठी पत्र पाठविले आहे. त्यांच्याकडूनही मदतीची अपेक्षा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तान कडून ईद निमित्त आंब्याची पेटी भेट
नवी दिल्ली- एकीकडे भारतीय लष्कराने ईद निमित्त दिलेली मिठाई यंदा पाकिस्तानी लष्कराने नाकारण्याची घटना घडली असताना ईदनिमित्त पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंब्याची पेटी पाठविली आहे, अशी बातमी येथे आली आहे गेल्या वर्षी देखील शरीफ यांनी पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आंबे पाठवले होते.
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाचे वातावरण आहे.आणि दोन्ही देशांमधील मैत्री बाबत मोदी आणि शरीफ यांच्यामध्ये सकारात्मक हालचाली दिसत असल्या तरी प्रत्यक्षात पाकिस्तान कडून होणारी आगळीक वाढतेच आहे असे दिसत आले आहे ईद ला दोन्ही देशांदरम्यान मिठाई देण्याची परंपरा आहे. मात्र, गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराने भेट म्हणून दिलेली मिठाई पाकिस्तानी लष्कराने नाकारली होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.
कारची दोन दुचाकींना धडक-तीन विद्यार्थी ठार तर दोघे जण गंभीररीत्या जखमी
पुणे
मुंबई-पुणे मार्गावरील निगडी नाक्याजवळ भरधाव कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात देहूरोड येथील आयआयटी एमआर या शैक्षणिक संस्थेतील तीन विद्यार्थी ठार तर दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. काल रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. कारचालकाणे दारूच्या नशेत कार चालवून हा अपघात केल्याची प्राथमिक माहिती आहे कारचा चालक मयूर घुमटकर याला अटक करण्यात आली असून त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.
किरण दिलीप दहाने (सातारा), संकेत कमलाकर समेळ (खोपोली), शुभम संभाजी भालेकर (पारनेर-अहमदनगर) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही देहूरोड येथील आयआयटी एमआर या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी होते. अपघातात जखमी झालेल्या अविनाश बबन माने आणि शिनो जॉन विद्यायती या दोघांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे पाचही जण दोन दुचाकींवरून चहा पिण्यासाठी निगडी नाक्याजवळ आले होते. चहा घेतल्यानंतर घरी परतत असतानाच मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या कारने दोन्ही दुचाकींना मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही दुचाकी बरेच अंतर फरफटत गेल्या. अपघातानंतर तातडीने स्थानिक लोकांनी मदतकार्य केले मात्र तिघांचा जागीच मृत्यू झाला.
अजित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना फळे व खाऊ वाटप
‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’ आणि ‘व्यंकटेश्वरा हाऊसिंग ग्रुप’च्या वतीने ‘शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल 2015’ चे आयोजन
घरापासून लांबचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थी/विद्यार्थिनींसाठी एक शेवटच्या फेरीचे आयोजन करावे–भाजयुमो ची मागणी
बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देणे हा देशाचा अपमान -दिग्विजय सिंह
नवी दिल्ली- शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देणे हा देशाचा अपमान आहे, असे म्हणून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे.
त्यांनी हे विचार ट्विटरहून मांडले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला आहे असेही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या विरोधात सांगली येथे जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. या हल्ल्याचाही दिग्विजय सिंह यांनी निषेध केला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या ‘संघटन शक्ती ‘वर्षाची घोषणा
पुणे मेळाव्यातील निर्धार
सद्गुरू शंकर महाराज उड्डाणपुल.. पहा फोटो
पुणे- धनकवडी येथील बालाजी नगर चा सातारा रस्त्यावरील भाग म्हणजे अपघातग्रस्त परिसर . कित्येक अपघातात कित्येक जणांचे बळी गेलेळे . या पार्शभूमीवर येथे रस्ता रुंदीकरण -अतिक्रमणे यावर सातत्याने चर्चा होत गेली आणि अखेर पर्याय निघाला तो उड्डाण पुलाचा … खडकवासल्याच्या खासदार सुप्रिया सुळे , माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आणि स्थानिक नेत्यांनी हा उड्डाण पुला लवकर व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न केले तो आता पूर्णत्वास येतो आहे
शहरातील सर्वात जास्त लांबीचा म्हणजे १२९६ मीटर आणि १५.८० मीटर रुंदी असलेला हा पूल आहे सातारा रस्त्यावरील चव्हाण नगर ची कमान ते भारती विद्यापीठ मार्ग या दरम्यानच्या या उड्डाण पुलाला सद्गुरू शंकर महाराज उड्डाणपुल असे नाव देण्यात आले आहे आज महापौर दत्ता धनकवडे , महापालिका आयुक्त कुणालकुमार तसेच विशाल तांबे ,अप्पा रेणुसे आणि महापालिका अधिकारी सुरेश जगताप , विजय दहिभाते , श्रीनिवास बोनाला , सुनील गायकवाड आदींनी भेट देवून पुलाची पाहणी केली .
समता सामाजिक संस्थेच्यावतीने विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न
पुणे-
समता सामाजिक संस्थेच्यावतीने “गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा ” कार्यक्रम नुकताच संपन्न झाला .तसेच एकपात्री नाटक ” मी रमाई बोलतेय ” हे नाटक स्नेहा गायकवाड यांनी सादर केले . पुणे कॅम्प मधील जान मोहम्मद स्ट्रीटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या या सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे पुणे महानगरपालिका शिक्षण अधिकारी माध्यमिक आणि तांत्रिक विभाग शिक्षण अधिकारी सौ. मीनाक्षी राऊत , लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीषक बरकत मुजावर , एज्युकेशन सोसायटी माजी मुख्याध्यापिका मीरा ससाणे , नगरसेवक दिलीप गिरमकर , मनजितसिंग विरदी , महेश जांभुळकर , वाहिद बियाबानी , देवीप्रसाद जोशी , संदीप भोसले , अतुल माने , संजय खोले , उषा माळी , दिलीप भिकुले , भगवान वायाळ , ज्ञानेश्वर कांबळे , वसंत मजदे , बबलू नाईकनवरे , शफिक शिकलकर , युसुफ शेख , विशाल ओव्हाळ , संदीप रेड्डी , महेद्र गायकवाड , अभिषेक भोसले , अनिकेत भोसले , मोना राठोड आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत समता सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जनार्दन भोसले , तर सूत्रसंचालन विकास भांबुरे आणि आभार दिनेश कांबळे यांनी मानले . यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .








