Home Blog Page 3582

मध्यरात्रीनंतर च्या ‘ सलमान उवाच’ ने उडविला याकुब च्या फाशीबाबत गदारोळ

0

मुंबई-
मध्यरात्रीनंतर च्या ट्विट्वरील  ‘ सलमान उवाच’ ने देशभर याकुब च्या फाशीबाबत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत गदारोळ उडविला. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला अभिनेता सलमान खानने विरोध केला आहे. सलमानने याकूबच्या बचावासाठी तब्बल १४ ट्विट्स केले असून टायगर मेमनच्या गुन्ह्यासाठी त्याचा भाऊ याकूबला फाशी कशासाठी?, असा थेट सवाल करत त्याने न्यायव्यवस्थेलाच आव्हान दिले.
सलमानने रात्री १ वाजून ५२ मिनिटांनी ‘टायगरला फासावर लटकवा’, असा ट्विट केला. त्यानंतर २ वाजून ४१ मिनिटांपर्यंत एकामागून एक ट्विटची मालिका सलमानने सुरु ठेवली
दरम्यान सलमान उवाच ऑन  ट्विट च्या बातम्या देशभर गाजत असताना एकीकडे माध्यमांनी त्यावर झोड उठविली तर साताऱ्यात सलमानच्या पोस्टर ला काळे फासण्यात आले आणि सलमानचे वडील सलीम खान यांनी सलमान ची हि बकवास असल्याचे म्हटले असताना दुसरीकडे अभिनेता सलमान खाननं ट्विट केल्यानंतर बॉलिवूड व राजकारणातील ४० दिग्गजांनी स्वत:च्या स्वाक्षरीचं एक पत्रच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना लिहिलं असून,  याकूब मेमनची फाशी रद्द करण्याची मागणी केली आहे.  

shatrughan_sinha_1342782301_460x460 nasseer20140110100125605 mahesh-bhattmmaaiiinnn

याकूबची फाशी रद्द करा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. निर्माते महेश भट्ट, अभिनेते नसिरुद्दीन शहा, भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा, ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी, माकप नेते सीताराम येचुरी, प्रकाश करात, वृंदा करात यांच्यासह ४० मान्यवरांच्या या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत.
१९९३च्या बॉम्बस्फोटात याकूब मेमनचा सहभाग सिद्ध होऊन त्याला सर्वोच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. राष्ट्रपतींनी त्याचा दयेचा अर्जही फेटाळला असून महाराष्ट्र सरकारने याकूबच्या फाशीची तारीखही निश्चित केल्याचं समजतं. याकूबचे परतीचे सर्व कायदेशीर दोर कापले गेले असताना ‘भाईजान’ सलमानच्या टविटमुळं भावनांचं राजकारण रंगलं आहे.

18_Judge_P_D_Kode_Indian_Judiciary
‘सलमान खानने आपली ट्विट्स मागे घेणं अपेक्षित- न्यायमूर्ती पी.डी कोदे

याकूब मेमनच्या समर्थनात अभिनेता सलमान खानने केलेले ट्विट हे त्याचं वैयक्तिक मत आहे. आणि घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. ‘माहिती असताना किंवा नसताना विविध विषयांवर मत मांडण्याची काहींना सवय असते’, पण सलमानच्या ट्विटचा याच्याशी काय संबंध आहे? हा प्रश्न इथे उपस्थित होतो, असं मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोट मालिकेची सुनावणी करणारे न्यायमूर्ती पी.डी कोदे यांनी सांगितलं. तसंच ‘सलमान खानने आपली ट्विट्स मागे घेणं अपेक्षित आहे असं कोदेंनी सांगितलं.
‘याकूबच्या फाशीप्रकरणी माहिती असूनही जे विरोधी मत व्यक्त करत आहेत त्यांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. पण ज्यांना काही माहितचं नाही आणि ते मत मांडताहेत त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. असेही ते म्हणाले
305005-rna-salim-khan-sq
‘सलमाननं केलेली ट्विट्स अर्थहीन व बकवास -सलीम खान

याकूब मेमनच्या फाशीविरोधातील ट्विटमुळं टीकेच्या ‘रडार’वर आलेल्या सलमानला वाचवण्यासाठी त्याचे वडील  निर्माते-दिग्दर्शक सलीम खान ‘सलमाननं केलेली ट्विट्स अर्थहीन व बकवास पुढं आले आहेत. ‘सलमाननं केलेली ट्विट्स अर्थहीन व बकवास आहेत. त्याकडं दुर्लक्ष करा,’ असं आवाहन सलीम खान यांनी केलं आहे.
सलमाननं चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं आहे. त्यानं असे टविट्स करायला नको होते. त्याच्या वक्तव्यांना फार महत्त्व देऊ नका,’ असं सलीम यांनी म्हटलं आहे.
याकूबला फाशी नको!
सलीम यांनी सलमानचा बचाव केला असला तरी याकूबला फाशी होऊ नये असंच त्यांचंही मत आहे. ‘याकूबला फाशी देण्याऐवजी त्याला तुरुंगातच ठेवलं पाहिजे. त्याला आयुष्यभर तुरुंगात बंद ठेवणं ही त्याच्यासाठी फाशीपेक्षाही मोठी शिक्षा असेल,’ असं सलीम यांनी म्हटलं आहे
.

Ujjwal Nikam 2611 TFM_49171 43440653.cms ramdev_2

विशेष सरकारी वकील उज्वल निकम , तसेच भाजपचे एकनाथ खडसे ,आणि रामदेवबाबा यांनी हि सलमान उवाच ला आक्षेप घेत माध्यमांकडे प्रतिक्रिया नोंदविल्या याकूब मेमनला आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे त्यामुळेच या निकालावर जर सलमान खानने मतप्रदर्शन केलं असेल तो न्यायालयाचा अवमान ठरतो, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.
अभिनेता सलमान खानने याकूब मेमनच्या फाशीला विरोध करण्यासाठी तब्बल १४ ट्विट्स केली आहेत. त्यात याकूब निष्पाप आहे आणि टायगर मेमनच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला भोगावी लागत आहे, असा दावा सलमानने केला आहे. सलमानच्या या ट्विट्सवर प्रतिक्रिया देताना निकम यांनी सलमानने हे ट्विट्स तत्काळ मागे घ्यायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची पुण्यात निदर्शने

0
राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून राधा मोहन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी 
b
पुणे :
केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत अवमानकारक विधाने केल्याच्या निषेधार्थ रविवारी सकाळी  राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या पुणे शहर शाखेने शहराध्यक्ष अजित बाबर यांच्या नेतृत्वाखाली सिटी प्राईड सातारा रस्ता चौकात जोरदार निदर्शने केली
शेतीचे प्रश्न माहित नसणारे आणि गांभीर्य नसलेले केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे प्रेम प्रकरण आणि इतर अनेक कारणे असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या वेदनांची थट्टा केली आहे ,त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा ‘ अशी मागणी शहराध्यक्ष अजित बाबर यांनी यावेळी बोलताना केली
यावेळी केंद्रीय सरकार विरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या . राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे पर्वती  विधानसभा अध्यक्ष सतीश वाघमारे ,शशिकला कुंभार ,नितीन कदम ,प्रसाद खमितकर ,निलेश माझिरे ,पवनराजे बम्बुळगे ,राजेंद्र दळवी ,अतुल हिंगमिरे ,श्रीकांत मेमाणे ,सुशांत बाबर ,वैभव कोठुळे ,रोहित मोरे ,उपस्थित होते
a

पुणे सहकारी बँकेच्या बाणेर शाखेचा ६ वा वर्धापन दिन संपन्न

0

पुणे –
पुणे सहकारी बँक गेली कित्येक वर्ष नव्या नव्या सुविधा देत ग्राहकांशी विश्वासाच नात दृढ करू पाहत आहे. स्थानिक लोकांची आपली बँक अशी भावना  पुणे सहकारी बँकेच्या  सभासद-खातेदार वर्गात आहे . शुक्रवारी २४ जुलै रोजी बँकेच्या बाणेर शाखेचा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी बँकेच्या वतीने नव्याने देण्यात येणाऱ्या सेफ लॉकर आणि Multi-utility Machine चे उदघाटन करण्यात आले. या वेळी पुणे सहकारी बँकेच्या आत्तापर्यंतची वाटचाल आणि येत्या काळातील ग्राहकांसाठीच्या धोरणांबाबत अधिक माहिती बँकेचे अध्यक्ष  बाबा शेख यांनी दिली.
यावेळी पुणेसहकारी बँकेच्या वतीने उद्दोजक पुरस्कार आदर्श उद्दोजक दत्तात्रय तापकीर, प्रकाश बेंद्रे, तुळशीदास वाबळे, अवधूत लोखंडे, लक्ष्मण बालवडकर यांना देण्यात आला. त्याच प्रमाणे युवा उधोजक पुरस्कार अप्पासाहेब भूमकर, गणेश मुरकुटे, विशाल पारखे, संदीप पायगुडे, सुशील देशमुख यांना देण्यात आला. त्याच प्रमाणे महिला उद्दोजक म्हणुन रोहिणी सायकर , आणि वसुंधरा अभिमान गौरव पुरस्कार वसुंधरा अभिमान समुह ग्रुप यांना प्रदान करण्यात आला. या वेळी बँकेचे नवनियुक्त संचालक राहुल पारखे व १० वी १२ वी च्या गुणवत्त विद्ध्यार्थांचाही सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी खंडेराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणपत बालवडकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, उद्दोजक अशोक मुरकुटे, मारुती भूमकर, पुणे शहर राष्ट्रवादी अध्यक्ष-अल्पसंख्यांक विभाग ईकबाल शेख . प्रसिध्द वकील एकनाथ जावीर , बँकेचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष प्रेमचंद मेहता, व संचालक मंडळ उपस्थित होते.18319_1006159736071287_2629680707944164527_n 11693889_1006159756071285_2321594011913582598_n 11742646_1006159686071292_7771288169545139149_n 11742665_1006159709404623_3541122462938968533_n 11755099_1006159706071290_4901330488495513163_n 11755846_1006159702737957_5991548028793230542_n 11760071_1006160356071225_6028601069063275967_n11796414_1006160419404552_3663324477035134454_n

 

कचरा व्यवस्थापनासाठी नवा कायदा हवा – अजित पवार

0

पुणे-

स्वारगेट, धनकवडी, हडपसर या ठिकाणी उड्डाणपूल, खडकवासला ते पर्वती बंद नळाची योजना, मैला शुद्धीकरण प्रकल्प, सहा उद्याने असे विविध प्रकल्प तीन वर्षात महापालिकेच्या माध्यमातून मार्गी लावल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेप्रमाणे पुण्यात स्पष्ट बहुमत नसल्याने कामांना वेग देता आला नाही, तसेच बाह्यवळण मार्ग (रिंग रोड) आणि मेट्रो हे दोन महत्त्वाचे प्रकल्प आमच्याकडून वेळेत झाले नाहीत, याची खंत असल्याची कबुलीही त्यांनी दिली.

महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्तेला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने पक्षाने महापालिकेच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांच्या कार्यअहवालाचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. महापौर दत्तात्रेय धनकवडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विेनी कदम, सभागृह नेते बंडू केमसे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला बहुमत मिळाल्यामुळे विकासाचे निर्णय तातडीने घेऊन अंमलबजावणी करणे शक्य झाले. मात्र, पुण्यात दोन्ही वेळा सहकारी पक्षांबरोबर काही मर्यादा आल्या, असे पवार यांनी सुरवातीलाच नमूद केले. रिंग रोड व्हावा आणि मेट्रोचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी राजकारण न करता महापालिका केंद्र आणि राज्य सरकारबरोबर सहकार्य करण्यासाठी तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मेट्रोचे काम तातडीने सुरू व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. मेट्रो भुयारी असावी, असे मला पूर्वी वाटत होते. परंतु, व्यावहारिक भाग बघितला तर, सध्याच्या प्रकल्प अहवालानुसार मेट्रो होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांचाही कल प्रकल्प अहवालाच्याच बाजूने असल्याचा दावा पवार यांनी केला.

स्थानिक संस्था कर (एलबीटी) राज्य सरकारने जवळपास बंद केला आहे. मात्र, मुंबईला त्यातून वगळले आहे. राज्यात मुंबई खालोखाल पुण्याचे सर्वाधिक उत्पन्न आहे. शहराचे 70 टक्के उत्पन्न आता कमी होणार असून अनुदान कसे देणार, हेही अजून निश्चि त झालेले नाही. त्यामुळे याचा महापालिकेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अर्थमंत्री असताना व्हॅटवर अधिभार लावण्याचा प्रस्ताव होता. परंतु, ग्रामीण भागातील रहिवाशांवर विनाकारण कर का लावायचा, असा प्रश्नॅ उपस्थित झाल्यामुळे तो निर्णय घेतला नव्हता, असेही त्यांनी सांगितले.

शहरालगतच्या गावांमध्ये कचरा प्रकल्पांसाठी जागा देण्यास नेहमी विरोध होतो. त्यामुळे शहरालगत कचऱ्याला जागाच उपलब्ध होत नाही ही गंभीर समस्या बनली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय एखादी जागा ताब्यात घेण्यासाठी नवा कायदा व्हायला हवा, अशी मागणी राज्य सरकारकडे केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. प्रकल्पांसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी, प्रांत यांना द्यायला हवा. राज्य सरकारने असा कायदा केला तर जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्या निर्णयाला पाठिंबा देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीने महापालिकेच्या माध्यमातून खूप विकासकामे केली आहेत. नागरिकांना त्याची माहिती व्हावी, यासाठी हा अहवाल प्रसिद्ध करीत असल्याचे खासदार वंदना चव्हाण यांनी यावेळी सांगितले तर महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले

‘मुंबई अॅव्हेंजर्स’ या कांदबरीवर आधारित ‘फँटम’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज… पहा …

0

दिग्दर्शक कबीर खान यांचा बहुचर्चित चित्रपट ‘बजरंगी भाईजान’ ने रसिकांची माने जिंकली असतानाच  त्यांच्या आगामी ‘फँटम’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सैफ अली खान   यात गुप्तहेराच्या तर कतरिना कैफ फोटो जर्नलिस्टच्या भूमिकेत आहे.सैफ अली खान पहिल्यांदाच कबीर खानसोबत सिनेमा करत आहे, तर कतरिनाने यापूर्वी कबीरसोबत ‘न्यू यॉर्क’ आणि ‘एक था टायगर’मध्ये काम केलं आहे. सैफ आणि कतरिनाची केमिस्ट्री यापूर्वी रेस चित्रपटात पाहायला मिळाली होती. फँटमचं शूटिंग काश्मीरमध्ये झालं असून हा चित्रपट लेखक हुसैन झैदी यांच्या ‘मुंबई अॅव्हेंजर्स’ या कांदबरीवर आधारित आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच मुंबईवरील हल्ल्याचं दृश्य दिसतं. त्यानंतर 26/11 हल्ल्याचा आरोपी हाफिज सय्यदचा व्हिडिओ असून त्यात ‘मुंबईवरील हल्ला मी केल्याचं सिद्ध करु शकलात का? मग 6 वर्ष काय झक मारलीत का?’ असा प्रश्न हाफिज विचारताना दिसतो. चित्रपटातल्या एका दृश्यात सैफ म्हणतो, ‘जर अमेरिका ओसामाला घरात घुसून मारते, तर आपण का नाही?’

 

 

५ दिवस १७ कॉलेज, १ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांसोबत सवांद.. मराठीतला दबंग हिरो भूषण पाटीलचे जोरदार प्रमोशन…

0

1 2 3 5 6 7 8

लेहर एंटरटेनमेंट, हर्षादीप सासन निर्मित आणि शीतल राजवीर सहनिर्मित, जमील खान दिग्दर्शित ओळख माय आयडेंटिटी हा मराठी चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून चित्रपटाचा दबंग नायक भूषण पाटील, अलका कुबल-आठल्ये आणि खुशबु तावडे यांनी पाच दिवसात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात १७ महाविद्यालयातील सुमारे १ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांशी सवांद साधला.
मराठीतही होतील दबंग हिरो… 

भूषण पाटील म्हणाला , मराठीतही या पुढे स्टायलिश आणि  दबंग हिरो दिसतील … आता तो काळ  आला आहे . धुळ्यातील शेतकरी कुटुंबातून आलेला ,अभियंता झालेला, अभिनय क्षेत्रात दाखल झालेला भूषण पाटीलने अलका कुबल आणि खुशबू तावडे या दोन नायीकांसमवेत संपूर्ण महाराष्ट्र या चित्रपटाच्या प्रमोशन साठी पिंजून काढला प्रत्येक ठिकाणचे उत्तुंग गर्दीचे फोटो पाहाल तर दंग व्हाल .
आता मराठीत लोकांना दबंग हिरो ची प्रतीक्षा होतीच हा माझा समज लोकांनी महाराष्ट्र भर दिलेल्या उत्तुंग प्रतिसादामुळे आणखी गडद झाला आहे . मी केलेली मेहनत वाया  जाणार नाही.चित्रपट क्षेत्रात करियर करताना खूप संघर्ष आणि मेहनत करावी लागते हे मला चांगले ठाऊक आहे येथे यशासाठी सातत्य ठरवावे लागते ध्येय निश्चित करूनच यावे लागते.  मी सिक्स पैक दबंग  नायक देण्याचा सातत्याने प्रयत्न करेल . सातत्याने जिम सुरु होती आणि आहेच शिवाय मी नाशिकच्या पोलिस अकादमीत हि सराव केला. मराठीत आता एक्शन हिरो हवा आणि मी तर तो देणारच , कुस्तीचे डावपेच हि मला दिग्दर्शक जमील खान यांच्याकडून शिकता आले असेही  भूषण म्हणाला . तारक मेहता का उलटा चष्मा मधील बुलबुल म्हणजेच खुशबू तावडे या चित्रपटाची नायिका आहे , ती म्हणाली, अभिनय हा विषय आता मौजमजेचा राहिलेला नाही , इथे एनर्जी खूप लागते आणि पेशन्स ठेवून जे टिकतात तेच उरतात हे मला ठावूक आहे . अलका कुबल -आठल्ये सांगतात की, मराठीत वास्तववादी  कथा हवी असली तरी बदलत्या काळानुसार त्यात आता बदल ही  होत आहेत . रडणे , हसणे हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे तसेच कोटुंबिक कथांना स्वप्नांचा मुलामा हि असतोच कि स्वप्नरंजन वाईट नाहीच . पण ‘ओळख’ हा चित्रपट तरुणाईचा वास्तववादी संघर्ष अधोरेखित करणारा असाच सिनेमा आहे . तरुणाईचा हा सिनेमा तरुणाई ला बळ देणारा च आहे असेही त्या म्हणाल्या.

‘मुलांना काहीतरी विकायला सांगा’ – डीएसके

0

1

डीएसके फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

पुणे : परीक्षेत उत्तम गुण मिळविण्यासाठी जी मेहनत घेतो त्याच बरोबर व्यावहारिक दृष्टीकोनाचा विकास होण्याकरिता मुलांनी कुठल्याही कामाची लाज न बाळगता काहीतरी विकायला पहिजे. मग ते फटाक्यांच्या दुकानात फटाके विकणे असो किंवा सकाळी उठून पेपर विकण्याचे काम असो. मुलांचा यामुळे आत्मविश्वास वाढेलच पण त्याचबरोबर या छोट्या छोट्या गोष्टींमधून जगाकडे बघण्याच्या दृष्टीकोनही विकसित होईल असा सल्ला प्रसिद्ध उद्योजक डीएसके अर्थात डी. एस. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दिला. 
डीएसके फाउंडेशनच्या वतीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून १०वीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या शिक्षकांचा सत्कार सोहळा २५ जुलै रोजी मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्स येथे पार पडला. यावेळी डीएसके यांचे सुपुत्र अमित कुलकर्णी फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. अ.ल. देशमुख, विवेक वेलणकर, अॅड. प्रमोद आडकर तसेच श्याम भुर्के हे उपस्थित होते. 
गुणवत्तेच्या स्पर्धेमध्ये मुलांना कधीही ढकलू नका, परीक्षेत गुण किती आहेत यावर सर्वस्व अवलंबून नसतं त्यापेक्षा त्याला जर व्यवहार शिकवला तर तो नक्कीच यशस्वी होईल असे डीएसके पालकांना उद्देशून बोलत होते. त्याच प्रमाणे मुलाने एकपरी अभ्यास केला नाही तरी चालेल पण बाहेर जाऊन खेळायला शिकवा. खो खो, कबड्डी यासारखे ग्राउंड वर खेळणाऱ्या खेळांमुळे मुलं खिलाडू वृत्तीचे होतात व त्यांची प्रकृती देखील उत्तम राहते असेही ते बोलत होते.
वेलणकर म्हणाले, “आपल्याला आयुष्यात पुढे काय करायचे आहे याचा अभ्यास आतापासूनच सुरु करा. सगळे ज्या मार्गाला जातात म्हणून आपणही तिकडेच जायला पाहिजे असे करू नका. कुठलेही क्षेत्र निवडताना त्याआधी त्याचा अभ्यास करा, त्याविषयीची पूर्ण माहिती घ्या आणि मगच त्यामध्ये शिक्षण घ्या. ” 
यावेळी विविध शाळेतील १२० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये ८० टक्के आणि त्याहूनही अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. डॉ. अ. ल. देशमुख,  अॅड. प्रमोद आडकर तसेच श्री. श्याम भुर्के यांनीही विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम भुर्के यांनी केले.

‘डबल सीट ‘ … रंगला संगीत प्रकाशन सोहळा

0

mail.google.1com

मायानगरी मुंबईच्या गर्दीत एकमेकांना लोटत, वाट काढत माणसं जेंव्हा पुढे सरकत असतात तेव्हा त्यांच्या सोबत पुढे सरकत असतात ती त्यांची स्वप्ने. सतत धावणारं शहर अशी या मुंबईची ओळख. पण हे शहर कशामागे धावतं? असा प्रश्न विचारलं तर एकच उत्तर मिळेल.. स्वप्नांच्या मागे. इथे जणू स्वप्नांची एक स्पर्धाच चाललेली असते. ही स्पर्धा असते या शहरात आपली ओळख निर्माण करण्याची, या शहरात नाव कमावण्याची आणि या स्पर्धेत आपल्या स्वप्नाचं अस्तित्व कसं टिकून राहील याची. स्वप्नांचा हा प्रवास या शहरात दिवस रात्र अविरत चालत असतो. कधी तो एकट्याचा असतो तर कधी कुणाला सोबत घेऊन. या शहरातील अशाच एका स्वप्नाची आणि एका अनोख्या प्रवासाची गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार ‘डबल सीट’ या आगामी मराठी चित्रपटातून. अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांच्या सहजसुंदर अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय समीर विद्वांस या आजच्या पिढीच्या तरूण दिग्दर्शकाने. रणजीत गुगळे यांचे ह्युज प्रॉडक्शन्सची निर्मिती आणि अनिश जोग यांच्या प्रतिसाद प्रॉडक्शन्स ची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाची प्रस्तुती एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्सची आहे. यावर्षी ‘लोकमान्य-एक य़ुगपुरूष’, आणि ‘टाइमपास २’ सारख्या सुपरहिट चित्रपटांसह ‘किल्ला’ सारख्या आशयघन चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती करणारे एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स ‘डबल सीट’ हा नवा चित्रपट येत्या १४ ऑगस्टला प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.  या चित्रपटाच्या संगीत प्रकाशनाचा शानदार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी चित्रपटाच्या टीमसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘डबल सीट’ या चित्रपटाची कथा आहे मुंबई शहराची आणि या शहरात राहणा-या अमित आणि मंजिरी या मध्यमवर्गीय नवदाम्प्त्याच्या स्वप्नांची. अमित एका कुरिअर कंपनीत नोकरीला आहे तर मंजिरी लाईफ इन्शुरन्स एजंट. मुंबईतील अनेक कुटुंबाप्रमाणे लालबाग-परळ भागातील एका जुन्या चाळीत एकत्र कुटुंबात राहणारं हे जोडपं. मुंबईच्या गर्दीत रोजच्या धकाधकीच्या जीवनात जगण्याची एक विचित्र शर्यत सुरू असते. या शर्यतीत प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे अमित आणि मंजिरीही सहभागी आहेत. खरं तर या शर्यतीत प्रत्येकालाच पुढे रहायचं असतं आणि जिंकायचंही असतं. यात जिंकण्यासाठीचं कुणाचं ध्येय असतं ते चांगली नोकरी, कुणासाठी एखादा व्यवसाय तर कुणासाठी स्वतःचं हक्काचं घर. मुंबईसारख्या मायानगरीत अगदी उपनगरांत का होईना पण स्वतःचं घर असावं जिथे आपल्याला आपली ‘स्पेस’ जपता येईल असं स्वप्नं बघणारी लाखो जोडपी या शहरात आहेत. अमित आणि मंजिरीचंही असंच एक स्वप्न आहे, स्वतःच्या घराचं. कोणताही लांबचा पल्ला गाठायचा असेल तर त्यासाठी प्रवास करण्याची तयारी असणंही तेवढंच गरजेचं. अशाच एका प्रवासासाठी अमित आणि मंजिरी निघाले आहेत. हा प्रवास आहे त्यांच्या स्वप्नांचा. या प्रवासात काय अडचणी येतात? कोणती संकटे येतात? त्यावर ते मात करतात की माघार घेतात ? या प्रवासात ते एकटे पडतात की त्यांना सहप्रवासीही मिळतात? याचीच कथा म्हणजे ‘डबल सीट’ हा चित्रपट.

या चित्रपटात अमितची भूमिका साकारलीये अंकुश चौधरीने तर मंजिरीच्या भूमिकेत आहे मुक्ता बर्वे. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर एकत्र आली आहे. याशिवाय चित्रपटात विद्याधर जोशी, वंदना गुप्ते, शुभंकर तावडे, संदीप पाठक, आसावरी जोशी आणि पुष्कर श्रोत्री हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाची अतिशय साधी सरळ पण तेवढीच प्रभावी अशी कथा आणि पटकथा आहे क्षितीज पटवर्धन आणि समीर विद्वांस यांची तर संवाद क्षितीज पटवर्धन यांचे आहेत . चित्रपटाचं संकलन केलंय चारूश्री रॉय यांनी तर कला दिग्दर्शन सिद्धार्थ तातुसकर यांचं आहे. धावणा-या मुंबईला आपल्या छायाचित्रणात सुरेखपणे टिपलंय छायालेखक अर्जुन सोरटे यांनी. या चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती संगीतबद्ध केली आहेत हृषिकेश-सौरभ –जसराज या संगीतकार त्रयींनी. यात मुंबईचं वर्णन करणारं ‘मोहिनी’ आणि रित्या सा-या दिशा हे भावस्पर्शी गीत लिहिलय क्षितीज पटवर्धन यांनी, ‘मन फिरूनी फिरूनी’ हे भावपूर्ण गीत शब्दबद्ध केलंय समीर विद्वांसने तर ‘किती सांगायचंय मला’ हे प्रेमाच्या अबोल भावना व्यक्त करणारं गीत लिहिलंय स्पृहा जोशीने. याशिवाय चित्रपटात ‘मन सुद्ध तुजं गोष्ट हाये प्रिथवी मोलाची’ हे सुप्रसिद्ध गाणं नव्या शैलीत ऐकायला मिळणार असून ते सुप्रसिद्ध संगीतकार – गायक अजय गोगावले यांनी गायलं आहे. ही गाणी व्हिडिओ पॅलेसच्या माध्यमातून श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत.

स्वप्नांची नगरी असलेल्या या मुंबापुरीची आणि यातील एका सर्वसामान्य जोडप्याची, त्यांच्या कुटुंबाची कथा आणि त्यांच्या स्वप्नांचा ‘डबल सीट’ प्रवास येत्या १४ ऑगस्टपासून एस्सेल व्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

 

 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे लिखाण राष्ट्रीय तेढ निर्माण करणारे – दिग्विजयसिंह

0
पुणे –
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला इतिहास तोडून-मोडून सांगण्याची सवय असून  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणामुळे जातीय तणाव वाढला असून, पुरंदरेंचे लिखाण राष्ट्रीय तेढ निर्माण होण्यास पूरक ठरल्याचे, मत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी व्यक्त केले.
पुण्यात आज (रविवार) एका कार्यक्रमात बोलताना दिग्विजयसिंह यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल हे वक्तव्य केले. महाराष्ट्र सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराविरोधात नुकतेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केले होते. आता दिग्विजयसिंह यांनीही पुरंदरे यांना पुरस्कार देण्यावरून टीका केली आहे.
दिग्विजयसिंह म्हणाले, की जेम्स लेनला बाबासाहेब पुरंदरेंनी प्रोत्साहन दिले. पुरंदरेचे लिखाण राष्ट्रीय तेढ निर्माण होण्यास पूरक ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त हिंदूचा राजा बनविण्यात आले. महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन काम केले होते.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी बाबासाहेब पुरंदरे यांना विरोध करणारी अधिकृत आणि जाहीर अशी भूमिका घेतली नसली  तरी त्यांच्या नेत्याकडून सातत्याने याबद्दल वादग्रस्त विधाने केली जात आहेत मोहिमा राबविल्या जात आहेत ज्यामध्ये जितेंद्र आव्हाड आणि दिग्विजयसिंह आघाडीवर आहेत . शिवसेना आणि मनसे मात्र याबाबत भाजप आणि संघाच्या भूमिकेशी सुसंगत असल्याचे दिसते आहे . शिवसेना आणि म नसे हे दोघे हि पक्ष बाबासाहेब पुरंदरे यांच्या पाठीशी खंबीर पणे पूर्वी ही उभे होते आणि आज -उद्याही राहतील मात्र सध्या दोघांनी या विषयावर मौन बाळगले आहे असे राजकीय सामिक्षकांचे म्हणणे आहे

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ.स्मिता कोल्हे यांना आंतरराष्ट्रीय पालकदिना निमित्त महापालक सन्मान प्रदान

0
पुणे :
 
मेळघाट परिसरात वैद्यकीय आणि सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ रवींद्र कोल्हे ,डॉ स्मिता कोल्हे यांचा डॉ भा ल ठाणगे , रामभाऊ इंगोले यांच्या हस्ते ‘सर फाऊंडेशन’ आणि ‘डीपर’ या स्वयंसेवी संस्थांच्या वतीने पालक दिनी पुण्यात महापालक सन्मान सोहळ्यात महापालक सन्मान देवून सत्कार करण्यात आला
यशवंत राव चव्हाण नाट्य गृहात हा कार्यक्रम झाला  सामाजिक कार्यकर्ते  डॉ भा ल ठाणगे ,रामभाऊ इंगोले यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा झाला . स्मृतीचींह ,एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र, शाल-श्रीफळ असे या सन्मानाचे स्वरूप आहे.
. पालकदिनाचे महत्त्व रुजविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या सोहळ्याचे तिसरे वर्ष आहे
सामाजिक कार्यकर्ते डॉ कुमार सप्तर्षी ,डॉ उर्मिला सप्तर्षी ,अविनाश सावजी ,डॉ व्ही  बी गायकवाड ,एड . प्रेमचंद पंडित ,लक्ष्मीकांत वरंगवकर ,विवेक वेलणकर ,डॉ श्रीराम गीत ,रोहिणी बुटले ,संदीप बर्वे ,साधना कुलकर्णी ,प्रवीण मोतेवार उपस्थित होते
‘ मेळघाट परिसरात जनहितार्थ सामाजिक काम करून कुपोषित माणसे जगविणारे कोल्हे दाम्पत्य हेच खरे साधू आहेत .  . त्यांनी मनात आणले असते तर शहरात मोठे इमले उभे केले असते . त्यांचा आदर्श डॉक्टर मंडळीनी घेतला पाहिजे ‘ असे प्रतिपादन रामभाऊ इंगोले यांनी केले
‘दुर्गम भागात तज्ञ डॉक्टर मंडळी काम करण्याचे प्रमाण अजून कमी असून मेळघाट मध्ये अजून डॉक्टरांच्या कामाची गरज आहे ‘ असे प्रतिपादन डॉ रवींद्र कोल्हे यांनी केले

आधीच्या वर्षीचे पुरस्कार विजेते पुढील वर्षीच्या पुरस्कार्थींची निवड करतात. 2013 चे पुरस्कार्थी डॉ. प्रकाश आमटे, व डॉ. मंदाकिनी आमटे आणि 2014 चे पुरस्कारार्थी डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. उर्मिला सप्तर्षी यांनी कोल्हे दांपत्याची निवड केली आहे.

या सन्मान सोहळ्यात पालकत्त्वाला वाहिलेल्या ‘तुम्ही आम्ही पालक’ या मासिकाचा दुसरा वर्धापन दिन निमित्त  तृतीय वर्षाच्या पहिल्या अंकाचा प्रकाशन झाले

‘डीपर’चे 10 व्या वर्षात पदार्पण होत असून, वैद्यकीय व इंजिनिअरींगच्या सीईटीमध्ये प्रथम येणार्‍या डीपरच्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजू विद्यर्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी साहाय्य प्रदान करण्यात आले . तसेच यावेळी स्कॉलरशिप सराव परीक्षा महाएक्झामध्ये प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला

‘साद माणुसकीची-संपत्ती सहयोग ते संपत्ती दान’ चर्चासत्र 

 दुपारच्या सत्रात ‘साद माणुसकीची-संपत्ती सहयोग ते संपत्ती दान’ या चर्चासत्राचे आयोजन  2 ते 6 या वेळेत करण्यात आले होते . हे चर्चासत्र‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’ जे.पी.नाईक सेंटर, कुंबरे पार्क शेजारी, ‘एकलव्य पॉलिटेक्निक’च्या मागे, कोथरूड येथे झाले  चर्चासत्रा विषयीच्या संकल्पनेचे सादरीकरण हरीश बुटले (संस्थापक डिपर व सर फाऊंडेशन)  यांनी  तसेच अरूण कुंभार संकल्पनेच्या तांत्रिक बाबी सांगितल्या . यामध्ये प्रदीप लोखंडे (संस्थापक रूरल रिलेशन्स, पुणे), नरेश झुरमुरे (उपव्यवस्थापकीय संचालक, यशदा), डॉ. गिरीश कुलकर्णी (स्नेहालय अहमदनगर), विवेक वेलणकर (अध्यक्ष सजग नागरिक मंच), अ‍ॅड.असीम सरोदे, डॉ. अविनाश सावजी (संस्थापक प्रयास व सेवांकुर, अमरावती), अनिल धनेश्‍वर हे मान्यवर सहभागी झाले . डॉ. श्रीराम गीत, बाबासाहेब माने यांनी  चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले
———————————-

वेठीस धरल्या जाणाऱ्या श्रद्धा विसर्जित करून मानवी मुल्यांची प्रतिष्ठापना व्हावी :गिरीश कुलकर्णी

0
शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल 2015’ ला चांगला प्रतिसाद 
 पुणे :
‘वळू ‘ ही समाजातील वेगवेगळ्या स्वरूपातील दावी सोडवू इच्छिणाऱ्या उन्मुक्त वृत्तीचे प्रतिबिंब आहे .,तर ‘विहीर ‘ मध्ये पौगंडावस्थेतील मुलांची अवस्था मांडणारा चित्रपट असल्याने विशेष कौतुक झाले , ‘देऊळ ‘  मध्ये श्रद्धा विकायला निघालेल्या समाजाचे प्रतिबिंब  असल्यानं भावला ,मात्र प्रत्येक चित्रपटात संकल्पना संहिता चांगली असेल तरच यश आणि समाधान मिळते ‘ ,असे प्रतिपादन अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी केले
मुक्त अर्थव्यवस्थेचे स्थित्यंतर देऊळ मध्ये पडले ,त्याच बरोबर ग्रामीण भागावर झालेला चुकीचा परिणाम या चित्रपटात लोकांना दिसला . प्रत्येक गोष्टीची दुकानदारी मोडून काढण्याचा विचार यात होत्या ,त्यामुळे धमक्याही आल्या . देव प्रत्येकाचा वेगळा असतो ,मीही तो अनेक ठिकाणी शोधतो ,मात्र त्यासाठी मंदिरात जावे लागतेच असे नाही . श्रद्धेचे पेकेजेस धार्मिक ठिकाणी झालेली आहेत ,त्याचा बाजार होणे गंभीर आहे . ज्या श्रद्धा वेठीस धरून राजकारण ,बाजार होतो ,त्या श्रद्धाच विसर्जित केल्या पाहिजेत ,त्या ऐवजी मानवी मूल्यांचे जतन व्हायला हवे
उमेश कुलकर्णी आणि माझी जोडी निंदकाचे घर वाढीला पोषक ठरणारा आहे असेही ते म्हणाले
‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’ आणि ‘व्यंकटेश्‍वरा हाऊसिंग ग्रुप’ या संस्थांच्यावतीने पिरंगुट येथे ‘शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल-2015’ या दोन दिवसीय सांस्कृतिक, कला व चित्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . त्यात वरदा जाधव यांनी गिरीश कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला .
 शनिवार 25 जुलै व रविवार 26 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पावसाळ्याच्या आल्हाददायक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर पिरंगुटच्या निसर्गरम्य परिसरात सांस्कृतिक, कला व चित्र तसेच रॅपलिंग, झिपलाईन सारख्या विविध साहसी खेळांचे या उत्सवात आयोजन करण्यात आले होते
आषाढी वारीनिमित्त भजनाच्या कार्यक्रम ,गायिका सायली पानसे आणि अपर्णा केळकर यांचा ‘अमृतघन’ हा वर्षाऋतु वरील संगीताचा कार्यक्रम सादर केला .
 ,  चारुहास पंडीत यांनी  ‘चिंटू गँग’ ची स्केचेस रेखाटली . ‘शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल-2015’ या उत्सवाला आबाल वृद्धांचा चांगला प्रतिसाद

भानुप्रताप बर्गे यांच्या वाढदिवसानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

mail.google.com

    एम. एम. जी. सोशल फाउंडेशनच्यावतीने भानुप्रताप बर्गे यांच्या वाढदिवसानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमामध्ये मंगळवार पेठमधील कमला नेहरू रुग्णालयातील रुग्णांना फळे फाउंडेशनचे संस्थापक सतिश लालबिगे यांच्याहस्ते वाटप करण्यात आली . शिवाजीनगर बालगंधर्व चौकात मोफत दुचाकी व चारचाकी वाहनाची  पी यु सी चाचणी शिबीर घेण्यात आले .  या शिबिराचे उदघाटन स्थानिक नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्याहस्ते करण्यात आले . घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनमध्ये अभिष्टचिंतन सोहळा पार पडला . या कार्यक्रमाचे संयोजन एम. एम. जी. सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा परविन लालबिगे , अक्षय लालबिगे , सिद्धान्त लालबिगे यांनी केले होते . कार्यक्रमयशस्वी करण्यासाठी स्वीकृत नगरसेवक विनोद निनारीया  संभाजी देशमुख , बाबा गोनेवार , साजन त्रिभुवन , सुनिल पवार , जयंत मोडक , अजय मापारे आदींनी विशेष परिश्रम घेतले .

ईदच्या शुभेच्छा देणार्‍या ‘दिल की बात’ गझल कार्यक्रमासोबत शीरखुर्मा-पुरणपोळीचा स्वाद!

0

 

पुणे :
पुण्याच्या सर्वधर्मीय, सर्वपक्षीय, सर्व स्तरीय सामंजस्याचे प्रतिक मानल्या जाणार्‍या ‘आझम कॅम्पस’ मधील ‘ईद मिलन’ कार्यक्रमाला सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. या ईद मिलन कार्यक्रमात ‘दिल की बात’ या गझल कार्यक्रमासोबत शीरखुर्मा आणि पुरणपोळीचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. सर्वधर्मीय बांधवांनी मुस्लिम बांधवांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या.
शुक्र्रवारी सायंकाळी आझम कॅम्पस परिवारातील ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’, ‘हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट’, ‘गोल्डन ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट’ आणि ‘डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट’ या संस्थांनी ‘ईद मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी स्वागत केले.
‘साज पुणे’ या ग्रुपचा ‘दिल की बात’ हा गझल रंग कार्यक्रम शशीकला शिरगोपीकर, गायत्री सप्रे-ढवळे, श्रृती करंदीकर, नीरजा आपटे यांनी सादर केला. त्याला चांगली दाद मिळाली.
माजी खासदार सुरेश कलमाडी, सामाजिक कार्यकर्ते सय्यद भाई, बिशप थॉमस डाबरे, मोहिंदरसिंह कंधारी, डॉ. एस.एन.पठाण, अशोक धिवरे, पुरुषोत्तम खेडेकर, डॉ. सतीश देसाई, अ‍ॅड. अभय छाजेड, समाजवादी नेते मधुकर निरफ राके, रवींद्र माळवदकर, कमल व्यवहारे, प्रा. शमसुद्दीन तांबोळी, प्रशांत जगताप, नगरसेविका नंदा लोणकर, सुनंदा गडाळे, खडकी कॅण्टोन्मेंट उपाध्यक्ष सुरेश कांबळे, भाईजान काझी, पुरुषोत्तम वाडेकर, रवींद्र सुर्वे, संदीप बर्वे, सुनील मगर, पोलीस अधिकारी बरकत मुजावर, संजय गायकवाड, डॉ. परवेझ इनामदार उपस्थित होते.
पी. ए. इनामदार, आबेदा इनामदार, मुन्नवर पीरभॉय, लतिफ मगदूम, डॉ. एन. वाय. काझी, वाहिद बियाबानी यांनी स्वागत केले.

सलाम मुंबई आणि संस्थाच्या तंबाखू विरोधी अभियानात खा. सुप्रिया सुळे सहभागी …

0

औरंगाबाद‬- येथे आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, सलाम मुंबई फौंडेशन, मुंबई, जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू विरोधी पदयात्रा घेण्यात आली. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे हा यामागचा उद्देश होता.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

11745808_997209986977665_8064454097903943970_n 11755095_997209663644364_1480439322255130829_n

 

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी केला सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव

0

सातारा (जिमाका) : खूप कमी वेळामध्ये अद्भूत आणि आश्चर्यकारक काम सातारा जिल्ह्यामध्ये झाले आहे. सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शाश्वतपणे करण्यात आलेल्या कामासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचे कष्ट कौतुकास्पद आहे, अशा शब्दात राजस्थानच्या मुख्यमंत्री श्रीमती वसुंधरा राजे यांनी श्री. मुद्गल यांचा गौरव केला आहे.
राज्य शासनाने हाती घेतलेले जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सातारा जिल्ह्यात झालेल्या कामांची माहिती देण्यासाठी श्री. मुद्गल हे राजस्थानमधील जयपूर येथे गेले होते. यावेळी त्यांनी तासाभाराच्या संगणकीय सादरीकरणात जिल्ह्यामध्ये झालेल्या पाझर तलाव मोहिम, गाळ काढणे, लोकसभाग, प्रशासनामार्फत इंधन पुरवठा, गूळंब चांदक ओढाजोड प्रकल्प, जाखणगाव पॅटर्न, रानमळा, माण खटाव तालुक्यात झालेली कामे, प्रसारमाध्यमांनी घेतेली दत्तक योजना, विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सहभाग आदीबाबत विस्तृतपणे माहिती सादर केली. हे करता असताना सातारा जिल्ह्याचे प्राकृतिक, भौगोलिक रचना सांगून जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन करण्यात आलेले वॉटर बजेट आणि कामांचे नियोजन याचा प्रामुख्याने समावेश होता. जलसंधारणाच्या कामांमध्ये सातारा छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी असल्याचे आर्वजून त्यांनी मराठीतून उल्लेख केला. त्याचबरोबर साताऱ्याचे ऐतिहासिक महत्व आणि शिवकालिन पाणी पुरवठ्याबाबतही अभिामानाने माहिती सांगितली आणि सातारा जिल्हा भेटीचे उपस्थितांना आग्रहाचे निमंत्रण दिले.
जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांनी केलेल्या सादरीकरणानंतर भारावून राजस्थानचे मुख्य सचिव सी.एस. राजन यांनी राजस्थानची प्राकृतिक माहिती सांगितली. ते म्हणाले, राजस्थानच्या 2/3 भाग वाटवंट आहे आणि येथील पर्जन्यमान 400 मिलीमिटर पेक्षा कमी आहे. यासाठी उपययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. यावर श्री. मुद्गल यांनी स्थानिक रहिवाशी त्यामध्ये असणारे ज्येष्ठ नागरीक यांच्याकडून पाण्याची परिस्थिती का खालवत चालली याबाबतची माहिती गोळा करण्याविषयी सुचविले.
जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख यांनी सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीकोनातून जलयुक्त शिवार अभियान का राबविण्यात येत आहे. त्याचे फायदे त्याबरोबर कसे राबविण्यात आले याची विस्तृत माहिती दिली.
मुख्यमंत्री श्रीमती वसुंधरा राजे यावेळी म्हणाल्या, महाराष्ट्राच्या धर्तीवर राजस्थानमध्येही जिल्हाधिकारी केंद्रभूत करुन अशा पद्धतीने अभियान राबवावे आणि या अभियानामध्ये अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी जोखून देऊन काम करावे. महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना विशेष धन्यवाद देते. अत्यंत चांगल्या पद्धतीने कमी वेळेत दर्जेदार काम करुन त्याचे सादरीकरणही प्रभाविणे तितकेच दर्जेदारपणे केले आहे. माझे गाव सातारमधीलच आहे. सातारा जिल्ह्याविषयी मला चांगली माहिती आहे. सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कष्ट करुन आश्चर्यकारक बदल घडवून आणला आहे. त्यांचे हे काम निश्चितपणे प्रेरणा देणारे आहे आणि कौतुकास्पद आहे, अश शब्दात जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांच्या कार्याचा गौरव केला.