गुरुवार पेठमधील पवित्र नाम देवालयाचा १३० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला . वर्धापन दिनानिमित पवित्र येशु नामाचा उत्सव , पूर्व संध्येचा कार्यक्रम , प्रिती भोजन व कोवाडीज हा धार्मिक चित्रपट दाखविण्यात आला . वर्धापनदिनानिमित केक कापण्यात आला . या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बिशप राईट रेव्हरंड अंडरू राठोड , डेव्हिड पिल्ले , चर्चचे धर्मगुरू रेव्हरंड राजन पिल्ले , अनिल गडकरी , विकास उमापती , मनोज येवलेकर , अविनाश सूर्यवंशी , मायकल डिसोझा , विजया इंदुरकर , नितीन डिसोझा आदी मान्यवर व ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी विशेष मान्यवर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला . या वर्धापन दिनास खासदार सुप्रिया सुळे , खासदार वंदना चव्हाण नगरसेवक संजय बालगुडे , नगरसेवक विष्णू हरिहर , निलेश बोराटे आदींनी शुभेछा देण्यात आल्या
डामिलोला ठरली ३००वी परदेशी ‘आयव्हीएफ’ माता – रुबी हॉलमधील डॉ. तांदूळवाडकरांच्या प्रयत्नांना यश.
पुणे, – नायजेरियातील डामिलोला एकेरवूसी आणि त्यांच्या पतीने अनेक वर्षे संततीसाठी अनेक प्रयत्न केले…अनेक उपचार करून पाहिले, अगदी अमेरिकेतही उपचार झाले…पण निराशाच पदरी आली. मात्र या दांपत्याचे स्वतःच्या बाळाचे स्वप्न साकार होतेय ते पुण्यात– रुबी हॉल क्लिनिकच्या प्रयत्नांमुळे. ती रुबी हॉल मधील परदेशी रुग्णांपैकी ३०० वी यशस्वी आयव्हीएफ उपचार घेणारी माता ठरली आहे. तसेच रुबी हॉल आता परदेशी रुग्णांसाठीही आशेचे किरण बनले आहे.
आज ३६ वर्षांच्या असलेल्या डामिलोला या कृतज्ञतेने सांगतात, “आम्ही जवळ जवळ सात वर्ष स्वतःचे मुल होण्याकरिता प्रयत्नशील होतो. आमच्या जीवनातील तो अत्यंत कठीण काळ होता. अगदी न्यूयॉर्कमध्येही उपचार करून पाहिले परंतु ते अपयशी ठरले. कोणीतरी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही इथे आलो व आज माझं स्वप्न पूर्ण होतंय.”
रुबी हॉलमधील आयव्हीएफ आणि इंडोस्कोपी केंद्र प्रमुख डॉ. सुनिता तांदूळवाडकर यांनी डामिलोलाच्या तपासण्या करून त्यांना एंड्रिमेट्रियोसिस असल्याचे निदान केले. गर्भाशयाच्या अस्तराशी संबंधित हा आजार जगातील दर दहापैकी एका महिलेला होतो आणि त्यामुळे प्राणदायक वेदना तसेच वंध्यत्व येऊ शकते. त्यामुळे गर्भधारणा होण्यात अनेक अडचणी येतात आणि अनेक महिलांचे मातृत्वाचे स्वप्न या आजारामुळे अपूर्णच राहते.
“एंड्रिमेट्रियोसिसचे निदान झाल्यानंतर तिला आयव्हीएफ उपचार घेण्यासाठी सल्ला देण्यात आला, ज्यामध्ये स्त्रीच्या ओटीपोटी बाहेरील वातावरणात अंडी व शुक्राणूंचा संयोग घडवून आणला जातो व एम्ब्रियो तयार केला जातो. त्यानंतर तिच्या एंड्रिमेट्रियोसिस आजारावर औषधोपचार करण्यात आले. हा आजार बरा झाल्यावर बाहेरील वातावरणात वाढविलेला एम्ब्रियो तिच्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आला. आज ती सात आठवड्यांची गर्भवती आहे.” अशी माहिती डॉ. तांदूळवाडकर यांनी दिली.
“प्रत्येक दाम्पत्याचे स्वतःची संतती असावी, हे स्वप्न असते आणि ते त्या स्वप्नांपासून वंचित राहू नयेत, असे आम्हाला वाटते. डामिलोला ही रुबी हॉलमधील ३००वी यशस्वी आयव्हीएफ उपचार घेणारी परदेशी नागरिक ठरल्याचा आम्हाला आनंद होत आहे. रुबी हॉलमध्ये अत्याधुनिक यंत्रणा, अनुभवी डॉक्टर्स,तंत्रज्ञ आणि प्रशिक्षित नर्सेस असल्यामुळे गंभीर केसेस सुद्धा चांगल्या रीतीने हाताळता येतात. त्याचा चांगला परिणाम रुग्णाना दिसून येतो व रुग्ण समाधानी होऊनच येथून बाहेर पडतो. येथील जागतिक दर्जाच्या सोई आणि किफायतशीर उपचार, यांमुळे जगभरातील रुग्णांचे हे पसंतीचे ठिकाण बनले आहे,” असे रुबी हॉल क्लिनिकचे कार्यकारी अधिकारी बोमी भोटे म्हणाले.
आपल्या भावना व्यक्त करताना डोमिलोला म्हणाल्या, “गेल्या आठवड्यात आम्ही पहिल्यांदा बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकले आणि आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. येथील डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला जो आनंद दिला आहे, त्याची पैशात गणना करता येणार नाही.”
सामनाच्या वेबसाईटचे उद्घाटन
पुणे-सामनाच्या वेबसाईटचे उद्घाटन आणि सामना कर्मचाऱ्यांच्या पतपेढीची वार्षिक सभा असा आनंदसोहळा पुण्यात रॅडिसन ब्ल्यू येथे पार पडला. कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांच्या हस्ते वेबसाईटचे उद्घाटन झाले. याप्रसंगी सामनाचे ग्रुप सीईओ श्री. राजेंद्र भागवत, मुख्य वितरक बाजीराव दांगट, धनंजय लेंडे, दोपहर का सामनाचे कार्यकारी संपादक प्रेम शुक्ल, सामनाचे सहसंपादक अतुल जोशी, प्रभाकर पवार, सुरेंद्र मुळीक, सामनाचे मुख्य व्यवस्थापक दिपक शिंदे,अरुण निगवेकर, मनोज रानडे , विठ्ठल जाधव आणि मुंबई, पुणे, संभाजीनगर आवृत्त्यांमधील सहकारी उपस्थित होते.
सीसीटीव्ही प्रणालीचे लोकार्पण
पुणे तसेच पिंपरी चिंचवड येथील सीसीटीव्ही प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री यांनी प्रत्यक्ष नियंत्रण कक्षात बसून जवळजवळ संपूर्ण शहराचे आवलोकन केले. ते म्हणाले ,’कानाकोपऱ्यात निगराणी करता येणारा हा उपक्रम जागतिक दर्जाचा तयार झाला आहे, हे सांगताना मला आनंद होतो. मुंबई, नाशिक, औरंगाबाद , नागपूर ही शहरं सुद्धा आता आम्ही सीसीटीव्ही यंत्रणा विकसित करणार आहोत. स्मार्ट सिटी प्रकल्प राबवितांना शहरातील सुरक्षा , माणसं ,वाहानं यांचा योग्य समन्वय हवा वरच ही शहरं खऱ्या अर्थाने स्मार्ट होणार आहेत. पालकमंत्री श्री गिरीश बापट , श्री राम शिंदे , श्री विजय शिवाथारे उपस्थित होते.
ससून रुग्ण- नातेवाईकांसाठी विश्रांतीगृहाचे उद्घाटन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने पुण्याच्या ससून रुग्णालयात उभारण्यात आलेल्या रुग्ण नातेवाईकांसाठी विश्रांतीगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले. यासंदर्भात मुख्यमंत्री यांनी असे म्हटले आहे कि ,’गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमामुळे वातावरण भारावले होते. भाविक मंदिरांमध्ये जो पैसा दानात टाकतात, तो पैसा प्रसादाच्या रूपाने जनतेलाच परत करण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हा रुग्णालये असावीत , ही सरकारची इच्छा आहे. या हेतूने पीपीपी धर्तीवर अशा संस्था पुढे येत असतील तर राज्य सरकार याचे स्वागतच करेल. डॉक्टरांना ग्रामीण भागात सेवा देण्याचे आवाहन केले. पालकमंत्री श्री गिरीश बापट ,श्री विनोद तावडे ,श्री राम शिंदे, श्री दिलीप कांबळे आदी मंत्री उपस्थित होते.
महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक तक्रारींची चौकशी करण्यासाठी विशाखा समित्या कालबाह्य-खा.वंदना चव्हाण
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्यात बीडीपी निर्णयाचे स्वागत
कारगिल संघर्षातील शहिदांप्रती समाज-शासन कृतज्ञ : मुख्यमंत्री
कारगिल संघर्षादरम्यान शहीद झालेल्या भारतीय संरक्षण दलातील जवानांना सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी आज मानवंदना दिली. वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, युद्धात अपंगत्व आलेले जवान, उल्लेखनीय कामगिरी केलेले जवान यांना पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, आमदार राज पुरोहित, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव प्रमोद नलावडे, सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल सुहास जतकर, रिअर ॲडमिरल एम.एस. पवार, मेजर जनरल राजू एडवर्ड, ग्रुप कॅप्टन भारद्वाज तसेच सैनिक कल्याण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
कारगिल युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्याचा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे, असे सांगून श्री.फडणवीस म्हणाले, देशासह देशवासियांचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा देत असतात. त्यावेळी तो स्वत:सह कुटुंबाचाही विचार करीत नाही. देशासाठी प्राणार्पण केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासह त्यांची जबाबदारी उचलणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.
सैनिकांनी केलेल्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन श्री. देसाई म्हणाले, सैनिकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून त्यांच्या विकासासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविण्यासह त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल. यावेळी डॉ. पाटील म्हणाले, सैनिकांच्या कुटुंबासाठी शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
याकूबच्या फाशीचा बदला घेईन- टायगर मेमन
मुंबई- “मै उनको नहीं छोडूंगा, इसकी किमत चुकवाऊंगा”,असा धमकीचा इशारा आहे मुंबईवरील 1993 च्या स्फोटाचा आरोपी टायगर मेमनचा ; आणि तो चक्क हे स्वतःच्या आईजवळ बोलला आहे अशी माहिती आता पुढे आली आहे गेल्या 22 वर्षांपासून जो भारतासाठी मोस्ट वॉन्टेड आहे, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवून जो लगेच पसार झाला, त्या कुख्यात डॉन टायगर मेमनचा आवाज मुंबई पोलिसांनी पुन्हा ऐकला.नागपूर जेलमध्ये 30 जुलैला जेव्हा याकूब मेमनला फाशी दिली जात होती, त्याच्या केवळ 40 मिनिटे आधी टायगर मेमननं आपल्या आईशी बातचीत केली होती. तसंच यावेळी तो बदल्याची भाषाही करत होता. ‘इकॉनॉमिक्स टाईम्स’ या दैनिकाने याबाबतची बातमी दिली आहे
मेमन कुटुंबीयांच्या लँडलाइन नंबरवर पोलिसांचं बारीक लक्ष होतं. ३० जुलैला पहाटे ५.३५ वाजता हा फोन वाजला. मेमन कुटुंबातील एका सदस्यानं तो उचलला. टायगरनं ओळख न सांगताच इकडच्या व्यक्तीनं त्याला ओळखलं. थोडं संभाषण झाल्यानंतर टायगरनं आईला फोन द्यायला सांगितलं. सुरुवातीला ती फोनवर येत नव्हती. तेव्हा एकानं, ‘भाईजान’चा फोन आहे… बोल, असं सांगितलं. ती हुंदके देतच फोनवर आली. तिचा हे रडणं ऐकून टायगर बदल्याचीच भाषा करू लागला. त्यावर, हनिफा चिडल्या. आता पुरे झालं, अशी विनवणीच त्यांनी केली. पण त्यानंतरही टायगरनं धमकी दिलीच. आपला फोन ट्रेस होऊ नये म्हणून टायगरनं हा कॉल वॉईस इंटरनेट प्रोटोकॉलने केला होता. ठरावीक सेकंदांनी त्याचा आयपी अॅड्रेस बदलत होता. त्यामुळे तो नेमका कुठून केला होता, हे शोधून काढणं अत्यंत कठीण आहे. पण त्याचे इरादे या फोनमुळे कळू शकले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी. छोटा शकीलनं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला फोन करून ही धमकी दिली होती. त्यानंतर आता टायगरनंही तशीच भाषा केल्यानं गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस सतर्क झालेत.
कसाब व नावेदने घेतले एकाच ठिकाणी प्रशिक्षण-नावेद पाकिस्तानी नागिरकच पित्याकडे झाली शहानिशा
नवी दिल्ली- पाकिस्तानमध्ये सन 1995 मध्ये जन्म झालेला नावेद ने पाचवीमधून शाळा सोडल्यानंतर छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या. वडील मारत असल्यामुळे घरातून तो पळाला आणि दहशतवादी बनला . मुंबईवरील हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याने ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याचे प्रशिक्षण घेतले होते त्याच ठिकाणी पाकिस्तानचा दहशतवादी कासीम खान ऊर्फ महंमद नावेद याने प्रशिक्षण घेतले आहे, अशी माहिती पुढे आली आहे.दरम्यान उधमपूर हल्ल्याप्रकरणी जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी मोहंमद नावेद हा पाकिस्तानी नागिरकच असल्याची माहिती उघड झाली आहे. “मीच तो नावेद चा दुर्दैवी बाप आहे,” अशी कबुली मोहंमद याकूब या पाकिस्तानी नागरिकाने कुबली दिली आहे.
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे पाकिस्तानचा दहशतवादी नावेदला जिवंत पकडण्यात आल्यानंतर पाकिस्तानातील मानशेरा येथे लष्कराच्या शिबीरामध्ये प्रशिक्षण घेतल्याचे त्याने सांगितले. पाकिस्तानमधून 2 जून रोजी चौघांनी भारतात प्रवेश केला होता. नोमान, ओकाश पख्तून व मोहम्मद भाई अशी तिघांची नावे आहेत. काश्मीरमधील स्थानिक दुकानदारांनी आपल्याला मदत केल्याचे नावेदने चौकशीदरम्यान सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पाकिस्तानमध्ये सन 1995 मध्ये नावेदचा जन्म झाला आहे. पाचवीमधून शाळा सोडल्यानंतर छोट्या-मोठ्या नोकरया केल्या. वडील मारत असल्यामुळे घरातून तो पळाला होता. सन 2014 मध्ये जमात उद दावा या दहशतवादी संघटनेमध्ये तो सहभागी झाला. लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये काश्मीरशी संबंधित व्हिडिओ दाखविले जात होते. काश्मीरमध्ये मुस्लिमांची संख्या कमी होत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे काश्मीरविरुद्ध लढण्यास तयार झालो, अशी माहिती नावेदने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.तर दुसरीकडे त्याचे पिता याकुब यांनी , ‘मला मारून टाकतील. लष्कर-ए-तैयबा आमच्या मागावर आहे, आणि पाकिस्तानी लष्करही आमच्या मागावर आहे,‘ असे एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. अटकेतील दहशतवादी नावेद याने तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यावर त्याच्या वडिलांनी पंजाबी भाषेत संवाद साधत वरील कबुली दिली. ‘तुम्ही भारतातून कॉल करीत आहात. आम्हाला मारून टाकतील. मीच तो दुर्दैवी बाप,‘ असे याकूब यांनी सांगितले. ते बोलताना उदासीन व घाबरलेले होते. ‘लष्कर-ए-तैयबा आमच्या मागावर आहे. हल्ला केल्यावर त्यामध्ये नावेद (भारतात) मारला जावा, आणि जिवंत सापडू नये अशी त्यांची इच्छा असेल. कृपया त्याला सोडा,‘ असेही ते म्हणाले.
कचरा निर्मूलन नागरिकांची चळवळ झाली पाहिजे – कुणाल कुमार
आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवाव्यात – मुख्यमंत्री
मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्त्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा कायद्यान्वये स्वस्त दरात धान्य आणि राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ दिला जात आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या दोन्ही योजना यशस्वीरित्या पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्यातील पावसाची स्थिती, पीक परिस्थिती, पाणी साठा आदीबाबत समग्र आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाने खास बाब म्हणून शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी स्वस्त दराने गहू, तांदुळ पुरविणे तसेच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. ज्या जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत सहभागी रुग्णालयांची संख्या कमी असेल ती वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत. त्याचबरोबर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना देऊन धान्य साठा पुरेसा राहील याची दक्षता घेण्यात यावी.
सध्या बऱ्याच ठिकाणी सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी होत आहे, अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्या बरोबरच जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याची टंचाई भेडसावू नये म्हणून वैरण विकास कार्यक्रम तातडीने हाती घेण्यात यावा. कृषि आणि महसूल विभागाच्या समन्वयातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवावा. जिल्हा प्रशासनाने पिण्याचे पाणी, चारा टंचाई, धडक विहिरी, जलयुक्त शिवार अभियानावर लक्ष केंद्रीत करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ज्या जिल्ह्यांची जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे पूर्ण झाली आहेत. परंतु त्यांनी काम पूर्ण झाल्याबाबतचे छायाचित्र संकेतस्थळावर अपलोड केले नाही त्यांनी ते तातडीने करण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.
मराठवाड्यात सरासरीच्या 40 टक्के पाऊस झाला असून कालपासून पावसाला सुरूवात झाल्याची माहिती औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी दिली. अमरावती विभागात सरासरीच्या 94 टक्के पाऊस झाला असून 4779 धडक विहिरींचे काम पूर्ण झाल्याची माहिती अमरावती विभागीय आयुक्तांनी दिली. नाशिक विभागात 77 टक्के पाऊन झाल्याची माहिती नाशिक विभागीय आयुक्तांनी दिली.
ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी ;पंकज वीर आणि नुतन पवार यांचा सत्कार
सातारा(जिमाका) :
ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील अकरा तालुक्यात समन्वय ठेवून ऑनलाईन प्रक्रीया कार्यक्षमपणे राबविल्याबद्दल जिल्हा प्रकल्प समन्वयक पंकज वीर आणि अव्वल कारकून नुतन पवार या दोघांचाही सत्कार जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. यावेळी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते.
युनिट कोट्यातून सैन्य भरती
सातारा (जिमाका) : हेड क्वार्टर आर्टिलरी सेंटर, नाशिक मार्फत युनिट कोट्यातून आजी, माजी सैनिक व विधवांच्या मुलांसाठी दि.24 ते 26 ऑगस्ट 2015 या कालावधीत सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
वांग मराठवाडी धरणग्रस्तांच्या रक्कमेवरील व्याजाचे वाटप सुरु
सातारा, (जिमाका) : वांग मराठवाडी धरणग्रस्तांची 65 टक्के रक्कम कपात करुन घेतली होती. त्या रक्कमेवरील व्याजाची रक्कम प्रकल्पग्रस्तांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली असून ज्या प्रकल्पग्रस्तांनी बँक खात्याचे आवश्यक तपशील जलसंपदा विभागाकडे दिलेला आहे अशा खातेदारांच्या नावे व्याजाची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती कराडचे लघु पाटबंधारे सर्व्हेक्षण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी पी.ए. मुसळे यांनी दिली आहे.
ज्या प्रकल्पग्रस्तांनी अद्यापही त्यांच्या बँक खात्याबाबतचा तपशिल दिलेला नाही अशा खातेदारांनी त्यांच्या बँकेच्या पासबुकाच्या प्रथम पानाची छायांकित प्रत जलसंपदा विभागाकडे जमा करावी, असे आवाहनही श्री. मुसळे यांनी केले आहे.

















