Home Blog Page 3577

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्रजी पेंढारकर यांचे दुःखद निधन

0

 

मराठी रंगभूमीतील अ‍ष्‍टपैलू व्‍यक्तिमत्‍त्‍व म्‍हणून ओळख असलेले भालचंद्र ऊर्फ अण्‍णा पेंढारकर यांचे आज (मंगळवार) वृद्धापकाळने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. दिग्दर्शन, नाट्यनिर्मिती, नेपथ्य, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण अशाच सर्वच क्षेत्रात त्‍यांनी आपला ठस्‍सा उमटवला होता. ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘गीता गाती ज्ञानेश्वर’ आणि ‘शाब्बास बिरबल शाब्बास’, ‘ पंडितराज जगन्नाथ’, ‘बावनखणी’, ‘जय जय गौरिशंकर’, ‘आनंदी गोपाळ’, ‘रक्त नको मज प्रेम हवे’, ही त्‍यांची नाटके विशेष गाजली. मराठी नाट्य क्षेत्रातील बिरबल म्‍हणून त्‍यांची ओळख होती. त्‍यांना त्‍यांच्‍या वडिलांकडूनच कलेचे बाळ कडू मिळाले होते.
नाट्चळवळीला बळकटी दिली
अण्‍णांनी ऐन उमेदीच्‍या काळातच ‘ललितकलादर्श नाटकमंडळी’च्‍या कार्यासाठी स्‍वत:ला झोकून दिले. या संस्‍थेची स्‍थापना १ जानेवारी १९०८ रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी केली होती. ४ ऑक्टोबर १९२१ रोजी केशवरावांचा मृत्यू झाला. दरम्‍यान, बापुरावांनी संस्‍थेची धुरा सांभाळाली. पुढे १९३७ साली बापुरावांचे अकाली निधन झाले. आणि १९४२ साली बापुरावांचे चिरंजीव भालचंद्र व्यंकटेश तथा अण्णा पेंढारकरांनी, वयाच्या सोळाव्या वर्षी, कंपनीची सूत्रे हाती घेतली.
संक्षिप्‍त जीवनपट
जन्‍म – २१ नोव्हेंबर १९२१.

पुरस्‍कार –

विष्णुदास भावे पुरस्कार,१९७३
बालगंधर्व पुरस्कार, १९८३
केशवराव भोसले पुरस्कार, १९९०
जागतिक मराठी परिषद, १९९६
संगीत नाटक कला अकादमी, २००४
तन्वीर सन्मान पुरस्कार, २००५
चतुरंग जीवनगौरव पुरस्कार, २००६
प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार, २००६

रणबीर कपूर और दीपिका पदुकोने दिखे तमाशा की रॅप पार्टी मे।

0

2

शुक्रवार को रणबीर कपूर और दीपिका पदुकोने दिखे इम्तिआज़ अली की तमाशा की रॅप पार्टी में ।
शनिवार रात, फिल्म निर्माता साजिद नदिअड्वाला ने बांद्रा के मेहबूब स्टूडियोज में रॅप अप पार्टी आयोजित करवाई, पूरी तमाशा की टीम के लिए।
पार्टी की संख्या बढ़ाई लीड पैर रणबीर, दीपिका, निर्देशक इम्तिआज़ अली और सह निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर साथ ही आयोजक साजिद नदिअड्वाला और उनकी पत्नी वर्धा ने।
पूरी टीम बहुत ही अच्छे मूड में  हस्ते – मुस्कुराते और शौकिया पोज़ देते पकड़ी गयी।
दीपिका जिन्होंने  फैशनेबल काले रंग का ऑफ – शोल्डर ज़रा की ड्रेस और रिप जीन्स वही रणबीर ने पहनी विचित्र ‘तमाशा’ टी-शर्ट में झूमते नज़र आये। पार्टी काफी देर रात तक चली जो की फिल्म के निर्देशक इम्तिआज़ ने होस्ट की।
एक बहुत बड़ा हिस्सा फिल्म  तमाशा का फ्रेंच आइलन्ड डेस्टिनेशन ऑफ़ कोर्सिका, जब की कुछ हिस्सा मुंबई में शूट हुआ है।
२०१३ में आयी  हिट फिल्म यह जवानी है दीवानी के बाद ‘तमाशा’ रणबीर और दीपिका की साथ में दूसरी फिल्म है ।
२००९ में आयी फिल्म लव आज कल के बाद दीपिका का भी दूसरा प्रोजेक्ट है इम्तिआज़ अली के साथ, इसी बीच रणबीर और इम्तिआज़ जो बहुत करीबी जाने जाते है, आखिरी बार फिल्म रॉकस्टार (२०११) में साथ सहयोग दिया था ।

जहांगीर रुग्णालयाचे हृदय शल्य चिकित्सक डॉ. संजीव जाधव आणि सहकार्यांचा विशेष सन्मान

0

पुणे-

पुण्यातील रुग्णाचे हृदय मुंबईतील २२ वर्षीय रुग्णाला यशस्वीपणे प्रत्यारोपण करून आदर्श वैद्यकीय सेवेचे दर्शन घडविल्याबदल जहांगीर रुग्णालयाचे हृदय शल्य चिकित्सक  डॉ. संजीव जाधव व रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ. मनीषा बोबडे यांचा मनजितसिंग विरदी फाऊडेशनच्यावतीने  सन्मानपत्र व पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी फाऊडेशनअध्यक्षचे मनजितसिंग विरदी , मेजरसिंग कलेर , विकास भांबुरे , आरती संघवी , महेश जांभुळकर ,  मनप्रितसिंग विरदी , विजय भोसले , वृंदा शहा आदी उपस्थित होते .

  पश्चिम भारतात पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल जहांगीर रुग्णालयाने आदर्श वैद्यकीय सेवेचे दर्शन घडविले असून  हृदय शल्य चिकित्सक  डॉ. संजीव जाधव यांनी केलेले काम हे पुनर्जीवन देणारे ठरले त्याबद्दल त्यांचा सन्मान केला आहे .

 सध्याच्या काळात अवयव दानाची जनजागृती करणे गरजेचे असून मनजितसिंग विरदी फाऊडेशनने याकामी पुढाकार घ्यावा असे मत डॉ. संजीव जाधव यांनी व्यक्त केले तर रुग्णालयाने केलेल्या हृदय प्रत्यारोपणात हृदय दान करणाऱ्या रुग्णाच्या कुटुंबाच मोठ योगदान आहे असे मत वैद्यकीय संचालिका डॉ. मनीषा बोबडे यांनी व्यक्त केले .

   विकास भांबुरे यांनी प्रास्ताविक केले तर  मनप्रितसिंग विरदी यांनी आभार मानले .

राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी समाजात आदर्श ठरावेत : प्रा.गौरी देवस्थळे

0
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एनएसएस) विभागाच्या वतीने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 पहिल्या दिवशी डॉ. ए.पी.जे. कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.शैला बूटवाला यांनी प्रास्ताविक केले. डॉ. इम्तियाज हुसैन जहीद यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. नुसरत एस.शेख यांनी आभार मानले.
या दोन दिवसीय सत्रामध्ये प्रा. सलमा अजिज, विक्रम दुबाल, प्रा.नुसरत शेख, डॉ. मुशीर मुल्ला, प्रा.गौरी देवस्थळे, डॉ.अन्वर शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विक्रम दुबाल यांनी आपल्या मेंदुला कशा प्रकारे चालना द्यावी यासाठी ‘ट्रेन द बे्रन’ या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा.नुसरत शेख यांनी ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ या आजाराविषयी मार्गदर्शन करताना त्याची कारणे, लक्षणे, सिकल सेल अ‍ॅनिमिया वरील उपचार आणि प्रतिबंध याची माहिती दिली.
एम.ए.रंगूनवाला डेंटल कॉलेज मधील दंतचिकित्सक डॉ. मुशीर मुल्ला यांनी तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.
प्रा. गौरी देवस्थळे म्हणाल्या ‘कोणत्याही पुस्तक, कादंबरी मधून राष्ट्रीय बळकटीसाठीमध्ये आवश्यक असलेल्या नैतिक मुल्यांविषयी ज्ञान मिळत नाही, ते ज्ञान कुटूंब, शिक्षक, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून शिकावे लागते. मोठ्यांना, शिक्षकांना, शेजार्‍यांना आदर दिला गेला पाहिजे. एनएसएस चे विद्यार्थी हे इतरांसाठी आदर्श ठरले पाहीजे.’
डॉ. अन्वर शेख यांनी एनएसएस चा इतिहास आणि विकास याविषयी माहिती दिली.
mail.google.com

‘‘माझं स्वप्न स्मार्ट सिटी’ करिता नागरिकांकडुन भरघोस प्रतिसाद

0

पुणे- शहराच्या विकासाकरिता स्मार्ट सिटी अंतर्गत करावयाच्या विविध विकास कामांबाबत नेमके कोणते कामास प्राधान्य द्यावे, कोणती विकास कामे करणे आवश्यक व क्रमप्राप्त आहेत याकरिता पुणे महानगरपालिका प्रशासनाचे वतीने नागरिकांची मतं जाणून घेण्याकरिता ‘‘माझं स्वप्न- स्मार्ट सिटी” स्पर्धापरिक्षा ऑनलाईन व पत्राद्वारे पहिल्या टप्प्यात आयोजित केली होती.
स्पर्धेचा दुसरा टप्पा ३ ऑगस्ट २०१५ ते ९ ऑगस्ट २०१५ पर्यंत होता. प्रथम टप्प्यात सुमारे ५ लाखापेक्षा अधिक नागरिकांनी संकेतस्थळास भेट दिली होती, तर सुमारे ६ हजारापेक्षा अधिक नागरिकांनी आपली मतं-सुचना नोंदविल्या होत्या.
वरीलप्रमाणे आलेल्या सुचना-मतं यापैकी ३० सुचना-मतं निवडण्यात येऊन यापैकी ५ सुचना-मतं यांच्या सर्वोत्तम निवडीकरिता दुसèया टप्प्यात स्पर्धा आयोजित करणेत आली.
त्यानुसार ऑनलाईन चांगल्या व नागरी हिताच्या कामांच्या प्राधान्यक्रमास नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळालेला असून ९ ऑगस्ट २०१५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ११ लाख ५७ हजार ५०८ नागरिकांनी पुणे मनपाच्या संकेतस्थळास भेट दिली तर प्रत्यक्षात ६३ हजार ५६ नागरिकांनी आपली मतं-सुचना नोंदविलेल्या आहेत. प्रथम टप्प्यातील मतं-सुचना नोंदविणेबाबत अर्थात दुसऱ्या टप्पा आकडेवारी पहाता दोन पटीपेक्षा अधिक नागरिकांनी मनपा संकेतस्थळास भेट दिली तर सुमारे पहिल्या फेरीच्या तुलनेत दहा पटीपेक्षा अधिक नागरिकांनी दुसऱ्या टप्प्यात मतं-सुचना नोंदविल्याचे दिसून येते.
वरीलप्रमाणे ५ सुचनांबाबत प्राप्त झालेल्या मतं-सुचना यांच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार विकास कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करुन संबंधित व्यक्तींना (प्रथम ५ सुचना-मतं) आपल्या सुचना-मतं सविस्तर मांडण्याकरिता-सादरीकरणाकरिता तज्ञ परिक्षण समितीच्या निरीक्षणा अंतर्गत लवकरच संधी दिली जाणार असून या पाचपैकी तीन व्यक्तींच्या सुचना-मतं यांची तज्ञ समिती परिक्षणा अंतर्गत निवड होऊन संबंधितांना येत्या १५ ऑगस्ट २०१५ रोजी मा. महापौर, मा महापालिका आयुक्त यांचे हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

mail.google.com

बाबा गंगाराम यांची जयंती उत्साहात साजरी ….

0

1 2

पुणे  :- श्री बाबा गंगाराम सेवा समितीच्या वतीने ‘श्री बाबा गंगाराम’

यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भजन संध्याचे आयोजन

करण्यात आले. भजन संध्या कार्यक्रमात जयपूर येथील प्रसिद्ध गायिका उमा लहरी

व दिल्लीचे गायक शीतल पांडे यांनी श्री. बाबा गंगाराम यांच्या विविध सुमधुर

भजनांचे सादरीकरण केले. त्यांच्या गीतांना उपस्थितांकडून विशेष दाद मिळाली.

भजन संध्या, महाआरती, नृत्यनाटिका या कार्यक्रमांचा अनेक भक्तांनी लाभ घेतला.

अल्पबचत भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात बंगलोर, हैद्राबाद, मुंबई पासून थेट

अमेरिकेपर्यंतचे बाबांचे भक्तगण याप्रसंगी उपस्थित होते तसेच भजनसंध्येचा आणि

महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी समितीच्या वतीने श्री बाबा

गंगाराम यांच्या साहित्यांचे आणि डीव्हीडीचे  सर्व प्रेक्षकांना विनामूल्य वितरित

करण्यात आल्या.

यावेळी बाबा गंगाराम समितीचे पुण्याचे अध्यक्ष जगदीशचंद्र अगरवाल, नवलकिशोर

अगरवाल, राजकुमार अगरवाल,अशोक अगरवाल, विजयालक्ष्मी अगरवाल, विजय

अगरवाल ,अखिल अगरवाल, श्याम अगरवाल, सुजाता अगरवाल, यांच्यासह विविध

समाजातील बाबा गंगारामचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजही झुंझूनुंनगर  हे गाव विष्णूचे अवतार मानले जाणाऱ्या बाबा गंगाराम

यांच्यामुळे खूप प्रसिद्ध असून त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक भक्त येथील पंचदेव

मंदिराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.

“स्वरतीर्थ बाबूजी” हा स्व श्री.सुधीर फडके यांच्या गाण्यांचा कार्यक्रम संपन्न

0
mail.google.com
पुणे-सर्वोत्कर्ष पब्लिक च्यारीटेबल ट्रस्ट आयोजित “स्वरतीर्थ बाबूजी” हा स्व श्री.सुधीर फडके यांच्या  कार्यक्रम सौ. भाग्यश्री मुळे व श्री. राजेश दातार या गायकांनी सदर केला. या सुखांनो या , प्रथम तुज पाहता , स्वर आले दुरुनी , कानडा राजा पंढरीचा , काहो धरिला मज वर राग , निजरूप दाखवा हो , बलसागर भारत होवो अशी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करण्यात आली.प्रथम तुज पाहता आणि कानडा राजा पंढरीचा या राजेश दातार यांनी गायलेल्या गाण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली,एस एम जोशी सभागृह संपूर्णपणे भरलेले होते व काही रसिकांनी उभे राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. श्री मिलिंद गुणे,अभिजित जायदे व पराग जोशी यांनी समर्पक साथ संगत केली व व्यंकटेश गरुड यांनी निर्मिती व्यवस्था चोख बजावली.
उत्तरार्धात बाबूंजींच्या किस्स्यांच्यावर व गाण्यांवर ध्वनिफिती दाखवण्यात आल्या त्यालाही रसिकांनी भरभरून दाद दिली,कार्यक्रमाची संकल्पना श्री श्रीपाद उम्ब्रेकर यांची होती व बाबूंजींची गायकी रसिकांपर्यंत त्यांनी उत्तमरित्या पोहोंचवली. सर्वोत्कर्ष पब्लिक च्यारीटेबल ट्रस्टच्या उपक्रमांना रसिकांची भरभरून दाद मिळत असल्याने ट्रस्ट मार्फत असेच नवेनवे उपक्रम राबवण्याचे आश्वासन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. राजेश दातार यांनी दिले.

‘डि.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च’ पिंपरी, पुणे आणि एस पी कॉलेज मध्ये ‘डायल 108’ रुग्णवाहिका सेवा जनजागृतीसाठी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

0
पुणे : 
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या सुसज्ज ‘डायल 108’सेवेच्या जनजागृतीसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होतेे.
डायल 108 सेवेबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळणे या प्रमुख हेतूने ‘डि.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च’ पिंपरी, पुणे आणि सर परशूराम महाविद्यालय (एस पी कॉलेज) येथे आयोजित या अभियानाअंतर्गत एकूण तीनशे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे ‘डायल 108’ सेवेच्या कार्याची माहिती देण्यात आली.
या जनजागृती प्रात्यक्षिकाचे संयोजन डॉ. विनय यादव (विभागीय व्यवस्थापक), साहेबराव इंगळे (जनजागृती विभागप्रमुख),  अतुल फडतरे (सहाय्यक जिल्हा व्यवस्थापक), दीपक पवार (निरीक्षक), डॉ.प्रविण साधले (इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटरचे व्यवस्थापक), डॉ. भूषण सोमवंशी (जिल्हा व्यवस्थापक), राहुल गांधले (सहाय्यक जिल्हा व्यवस्थापक) यांनी केले होते.
‘डि.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च’, पिंपरी, पुणे येथे ‘डायल 108’ सेवेच्या जनजागृतीसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एम.डी.मोहिते, मनिषा पवार, अर्जुन काळे,  प्राध्यापक वर्ग आणि 100 विद्यार्थी उपस्थित होते. तसेच सर परशूराम महाविद्यालय (एस पी कॉलेज) येथे ‘डायल 108’ सेवेच्या जनजागृतीसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य दीलीप शेठ, डॉ. विलास उगळे (एनएसएस विभाग प्रमुख), मंगेश चव्हाण, कुणाल चोरमले, किरण आंधळे आणि 200 ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एन एस एस) चे विद्यार्थी उपस्थित होते.
‘डायल 108’ सेवेबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळणे या प्रमुख हेतूने या प्रात्यक्षिक सादरीकरणाचे आयोजन आले होते. यामध्ये ‘डायल 108 रूग्णवाहिका सेवेत या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी ‘108’ या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. अशाप्रकारच्या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा 937 रुग्णवाहिका राज्यभर आहेत. यामध्ये 233 ‘अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ रुग्णवाहिका असून, 704 ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका समाविष्ट आहेत. अपघात, हृदयविकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते’ याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना त्याबाबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके यांनी दिली.
1

राष्ट्रीय समाज पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा औरंगाबाद येथे संपन्न

0

प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांच्या वर्षपूर्ती कार्यअहवाल 2014-15 चे प्रकाशन

1 2

औरंगाबाद :
राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचा जिल्हा-शहर, तालुका पदाधिकारी, जि.प., पं. स. गट-गण सदस्यांचा राज्यस्तरीय मेळावा 9 ऑगस्ट रोजी (रविवार) औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला होता. या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, रासप प्रदेश उपाध्यक्ष दशरथ राऊत, महासचिव बाळासाहेब दोडतले, सचिव कैलास कोळसे-पाटील यांच्या हस्ते प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांच्या राजकीय क्षेत्रातील योगदानाची वर्षपूर्ती कार्यअहवाल 2014-15 चे प्रकाशन करण्यात आले. हा मेळावा ११ ते ६ वाजता गजानन महाराज मंदिराजवळील राधाकृष्ण मंगल कार्यालयात संपन्न झाला.
प्रकाशन प्रसंगी मान्यवरांनी बुद्धिजीवी वर्ग राजकारणात येत असल्याचे स्वागत केले आणि दीपक बिडकर यांचे योगदान पक्षाला उपयुक्त ठरल्याचे सांगितले.
या मेळाव्यामध्ये युवक प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड, महिला प्रदेशाध्यक्ष श्रद्धा भातांब्रेकर, पश्‍चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष डॉ. उज्वला हाके, प्रा. भास्कर टेकाळे, अल्प संख्या आघाडीचे ताजुद्दीन मणेर उपस्थित होते.
2015-16 हे वर्ष राष्ट्रीय समाज पक्षाने संघटनशक्ती वर्ष घोषित केले आहे. संघटन मजबूत करण्यासाठी शहर, जिल्हा-तालुका-गाव पातळीवर कार्यकारिणी स्थापन केली जात आहे. या संघटन उपक्रमातील पुढील दिशा या मेळाव्यात जाहीर करण्यात आली.

दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान’ तर्फे हृद्य सत्कार

0

 

1 2 3

पुणे-‘आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान’ तर्फे पुण्यात राहणाऱ्या मुळशी तालुक्यातील दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सभारंभ नुकताच पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नंदकुमार सुतार आणि ‘युनिक अकादमी’ चे प्रमुख व्यवस्थापक  नागेश गव्हाणे हे उपस्थित होते.

व्यासपीठावर  ‘आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे नंदकुमार सुतार आणि नागेश गव्हाणे यांच्या हस्ते दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दकोश आणि स्मृतीचिन्ह देवून त्यांच्या पाठीवर ‘शाबास’कीची थाप देण्यात आली. आपल्या पाल्यांचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी पालकांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

‘युनिक अकादमी’ चे प्रमुख व्यवस्थापक नागेश गव्हाणे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील आव्हानाबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून अभ्यास केल्यास लोकसेवा आयोगातील मराठी मुलांची कमी असलेली टक्केवारी वेगाने वाढू शकते असे आवाहन त्यांनी केले. तर नंदकुमार सुतार यांनी विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच मन लावून अभ्यास केल्यास ते आपले ध्येय नक्कीच गाठू शकतील असा विश्वास व्यक्त केला. प्रारंभी  ‘आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते यांनी आपल्या प्रास्ताविकात, संस्थेतर्फे दरवर्षी केल्या जाणाऱ्या या उपक्रमाची माहिती सांगितली.  पुणे शहराची आता ‘स्मार्ट सिटी’त गणना होणार असल्याने विद्यार्थ्यांनी रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य देवून स्वत:च्या विकासाबरोबरच मुळशी तालुक्याचाही विकास करून मुळशी तालुक्याला विकासाच्या नकाशावर आणण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.  ‘आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान’ चे निवृत्ती येवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर लक्ष्मण कंधारे यांनी आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र उभे आणि सीताराम चोंडे पाटील यांनी केले.

न्याय आपल्या दारी संकल्पनेचा लाभ घ्यावा – प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.एम. गव्हाणे

0

1

सातारा (जिमाका) : ‘न्याय आपले दारी’ Justice at the doorstep या महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेनुसार जिल्ह्यामध्ये दि. 10 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2015 अखेर मोबाईल लोकअदालत आयोजित करण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त खटले निकाली काढण्यासाठी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. गव्हाणे यांनी केले.
जिल्हा व सत्र न्यायालयात मोबाईल लोकअदालत व्हॅनला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. गव्हाणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखून व्हॅन मार्गस्त करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश 2 श्रीमती व्ही.एम.मोहिते, जिल्हा न्यायाधीश 3 ए.एन.पाटील, जिल्हा न्यायाधीश 5 व्ही.आर.कचरे,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव डॉ. अनिता नेवसे, वकील संघाचे अध्यक्ष अजय डांगे, सरकारी वकील विकास पाटील, मोबाईल लोक अदालतीचे कामकाज पॅनेल प्रमुख निवृत्त न्यायाधीश डी. के. राजेपांढरे यांच्यासह अन्य न्यायाधीश व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोबाईल लोकअदालतीसाठी उच्च न्यायालयाकडून मोबाईल व्हॅनची सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे. या मोबाईल लोकअदालतीचे कामकाज पॅनेल प्रमुख निवृत्त न्यायाधीश डी. के. राजेपांढरे हे पाहणार आहेत. संपूर्ण लोकन्यायालयाचे कामकाज मोबाईल व्हॅनमध्ये चालणार आहे. गावपातळीवरील सर्व व्यक्तींकरिता आपली प्रलंबित दिवाणी व फौजदारी तसेच वादपूर्व प्रकरणे यामध्ये सामील करता येतील. त्याचबरोबर सर्व बँका, मोबाईल कंपन्या, विद्युत वितरण कंपनी यांची वादपूर्व प्रकरणे यामध्ये सामील करता येतील.
जिल्ह्यातील सर्व पक्षकार, विधिज्ञ आणि सर्व वित्तीय संस्था, मोबाईल कंपन्या यांनी या मोबाईल लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, आणि न्याय आपले दारी ही संकल्पना यशस्वी करावी, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. गव्हाणे यांनी केले.

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीस उर्स्फूर्त प्रतिसाद- 2 कोटी 8 लाख 86 हजारांची वसुली -डॉ. अनिता नेवसे

0

2

सातारा(जिमाका) : आज जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे अयोजन करण्यात आले होत. या राष्ट्रीय लोकअदालतीला जिल्ह्यात उर्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 2 कोटी 8 लाख 86 हजारांची वसुली करण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव डॉ. अनिता नेवसे यांनी दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघाच्या संयुक्त विद्यामाने जिल्हा व सत्र न्यायालय व 11 तालुक्यांच्या ठिकाणी राष्ट्रीय लोकदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. गव्हाणे यांनी केले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे, वकील संघाचे अध्यक्ष अजय डांगे, इतर न्यायाधीश, वकील वर्ग, बँकेचे अधिकारी व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये बँकांची वसुली दिवाणी प्रकरणे, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम 138 अन्वये 734 प्ररकणे व वादपूर्व 6 हजार 844 प्रकरणे ठेवण्यात आली होती.
या राष्ट्रीय लोकअदालतीत बँक वसुलीची प्रकरणे मिटविण्यासाठी मोठा उत्साह दिसून आला. यामध्ये एकूण 3 पॅनेल करण्यात आले होते व राष्ट्रीय लोकदालतीमध्ये 311 प्रकरणे तडजोडी करुन 2 कोटी 8 लाख 86 हजारांची वसुली करण्यात आली, असेही डॉ. नेवसे यांनी सांगितले.

नव्या धाटणीची लव्ह स्टोरी ‘ढिनच्यॅक एंटरप्राइज’

0
1 2 3
 प्रेमातुझा रंग कसा? याचं उत्तर कोणाला ठाऊक असेल माहित नाही पण त्याची प्रचीती स्वतःहून घेण्यासाठी सगळेच उत्सूक असतात. त्यामुळे आयुष्यात एकदातरी प्रेम करून पहायला हरकत नाही असो,  आजकाल सगळ्याचं नात्याची समीकरणं बदलत चालल्याने नेमकं विश्वासाचं आणि हक्काचं नातं कोणतं याचा थांगपत्ता कित्येकांना शेवट पर्यंत लागत नाही. मात्र या सगळ्यांत माणुसकीचे असे एक नाते आहे जे वैश्विक मानले जाते. मात्र त्याचे परीस्थितीनुरूप पालटणारे  स्वरूप नेमके कसे आहे यावर भाष्य करणारा ढिनच्यॅक एंटरप्राइज हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २१ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या सिनेमात मनवा नाईक आणि भूषण प्रधान यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. त्याच प्रमाणे खुर्शीद लॉयर, मीना नाईक, अनंत जोग, सक्षम कुलकर्णी, अश्विनी एकबोटे  यांच्याही भूमिका आहेत.
सिनेमात मीरा आणि विशाल यांच्या जोडीप्रमाणे सिनेमाची कथादेखील तितकिच संवेदनशील आणि सत्य परिस्थितीचा आढावा घेणारी आहे. सर्वसाधारण स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी किंवा प्रोडक्ट विकण्यासाठी वापरलं जाणारं मार्केटिंग समाजाच्या आणि माणसाच्या भल्यासाठी देखील वापरता येऊ शकतं यावर एकूणचं सिनेमाची कथा बेतली आहे. निशांत सपकाळे यांनी सिनेमाच दिग्दर्शन केल असून चार्मी गाला हे निर्माते आहेत. लव्ह प्रोडक्शन या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.  ढिनच्यॅक एंटरप्राइज सिनेमा फक्त रोमॅंटिक कॉमेडी नसून प्रेक्षकांना डोळसपणे विचार करायला लावणारा सिनेमा आहे. सिनेसृष्टीत असे गंभीर विषय खूपच कमी हाताळले जातात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचा सामाजिक विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे विशेष आहे. उदयसिंग मोहिते यांनी छायाचित्रिकरणाची धुरा सांभाळली असून देवेंद्र मुरुडेश्वर यांनी सिनेमाचे संकलन केले आहे. समीर साप्तीक आणि काशी रिचर्ड यांनी मिळून सिनेमाला संगीत दिल आहे.  सचिन पाठक आणि मयुर सपकाळे यांनी सिनेमाची गीते लिहिली आहेत तर हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या गायकांचा सिनेमातील गीतांना स्वरसाज चढला आहे. हिंदीतील प्रख्यात गायक मिकासिंग, हर्षदीप कौर, पापोन आणि शिंदे शाही गाजवणारा आदर्श शिंदे यांनी गाणी गायली आहेत.

विद्यार्थ्यांवर शिक्षणाबरोबरच पर्यावरण रक्षणाची मोठी जबाबदारी….आ.मेधा कुलकर्णी.

0

 

1 2पुणे- शिक्षण मंडळ सदस्य सौ.मंजुश्री खर्डेकर यानी कर्वेनगर च्या सम्राट अशोक विद्यालयात आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात आमदार मेधा कुलकर्णी यांच्यातील शिक्षकाचा उपस्थिताना प्रत्यय आला.वृक्षारोपण करतानाच विध्यार्थ्याना स्थानिक वृक्षांची माहिती दिली.तसेच पर्यावरणाची हानी,वारंवार कोपणारा आणी लहरी निसर्ग आणी त्यामुळे बदललेले रुतुचक्र याचे उत्तम विवेचन करताना प्राध्यापक मेधा कुलकर्णी यानी विध्यार्थ्याना शिक्षणाबरोबरच पर्यावरण रक्षणाचे धडे दिले.तसेच शाळेच्या परिसरात लावलेल्या या रोपांचे जतन करा असे ही आवर्जुन सांगितले.गारपीट,अवेळी येणारा पाउस,दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ याच्या मुळाशी आपण पर्यावरणाचा जो नाश करतो तेच कारणीभुत असुन त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर ही होतो हे ही त्यानी नमूद केले.या कार्यक्रमात जिल्हा स्तरावर बोक्सिंग स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळविणारया बाबु कंद्कुर या विध्यार्थ्याचा व त्याच्या आई चा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमा मागची भुमिका विषद करताना संयोजक मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या “या शाळे चे मोठे मैदान आहे,हे मैदान स्वच्छ रहावे याला भिंत घालावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.मात्र त्याच बरोबर या मैदानात सभोवती झाडे बहरल्यास त्याचा पुढील पिढीस फायदाच होइल हे जाणुन येथे 32 रोप लावण्यात आली आहेत.या व्रुक्षांची योग्य निगा राखली जाईल असे ही त्यानी आश्वस्त केले.
यावेळी स्थानिक नगरसेविका सुरेखाताई मकवान,शिक्षण मंडल सदस्य बाबा धुमाळ.श्री.जयंत भावे,प्रशांत हरसुले,जगन्नाथ कुलकर्णी,कुलदीप सावळेकर,भारत शिर्के,तात्या बालवडकर,सोमनाथ गुंड,रामदास गावडे,अमोल डांगे,रितेश वैद्य,माजी नगरसेवक शिवराम मेंगडे,दिलीप उंबरकर इ मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन  आणी प्रास्ताविक सौ.मंजुश्री खर्डेकर यानी केले,तर मुख्याध्यापिका सुनंदा जाधव यानी स्वागत आणी बिडकर सर यानी सूत्र संचालन केले.

अग्निशामक दलाच्या जवानांचे कौतुक …

0

पुणे-पुरंदर येथे १८ फुट खोल बोअरवेल मधुन २ वर्षाच्या मुलाला सुखरुपपणे बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांनी मेहनतीने -युक्ती ने यश मिळविले त्यांच्या कामाचे तमाम पुणेकरांना कोतूक आहे असे सांगत . त्यांचे विशेष अभिनंदन आणि सत्कार  डॉ दत्ता कोहिनकर,यशराज पारखी, विजयकुमार मर्लेचा यांनी येथे केला