संगीता तिवारींची पतीविरोधी तक्रार…. ?
सिलेंडरच्या स्फोटातील जळीतग्रस्तांना पुणे कॅम्पमधील गणेश उत्सव मंडळांनी मदतीचा दिला हात
पुणे
-कॅम्प नवा मोदीखाना भागातील कुंभारबावडी भाजी मार्केट जवळील लोकवस्तीमधील झालेल्या सिलेंडरच्या स्फोटातील जळीतग्रस्तांना पुणे कॅम्प मधील गणेश उत्सव मंडळांनी मदतीचा हात दिला .नवा मोदीखाना मधील उत्सव संवर्धक तरुण मंडळाने या जळीतग्रस्तना मदतीसाठी गणेश मंडळाचे कार्यकर्ते पुढे आलेले आहेत . तसेच , स्थानिक नगरसेवक अतुल गायकवाड यांनी देखील आपले नगरसेवकाचे एक महिन्याचे मानधन जळीत ग्रस्तना मदतीसाठी दिले . उत्सव संवर्धक तरुण मंडळाचे कार्यकर्ते अड. प्रशांत यादव , जितेंद्र शिंदे , निलेश कणसे , मोहन यादव , दिलीप जाधव , दीपक तांबे , शंकर चिकोटी , राजू राऊत , विकी मोरे मोहन नारायणे ,कुंभारबावडी मंडळाचे कार्यकर्ते मंगेश ककरे , जैन्नूभाई आदींनी एकत्रित येऊन जळीतग्रस्त तिन्ही कुटुंबियांना पंधरा हजार रुपयांची धनादेशद्वारे मदत दिली . यावेळी जळीतग्रस्त कुटुंबिय संदीप जगताप , सुनील जगताप , मिलिंद किसन बनसोडे रमेश बाबुराव कोपेल्लू आदी कुटुंबीय उपस्थित होते
अमित शहा लिफ्टमध्ये अडकले, अर्ध्या तासानंतर सुटका
पाटणा-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रचारासाठी बिहारमध्ये दाखल झालेले भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना शुक्रवारी अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले. पाटणा येथील गेस्ट हाऊसच्या लिफ्टमध्ये अमित शहा आपल्या सहकाऱयांसोबत अडकले होते. तब्बल ४० मिनिटांनंतर त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. विधानसभा निवडणुकांमुळे बिहारमधील वातावरण सध्या तापले आहे. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या वारूला रोखण्यासाठी नितीश, लालूप्रसाद यांची एकजूट होण्यास सुरूवात झाली आहे. तर भाजपसाठी देखील ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. त्यामुळे भाजपची रणनिती आखण्यासाठी अमित शहा बिहारमध्ये दाखल झाले होते. पाटणा येथे भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. रात्री उशीरा बैठक संपल्याने ते पाटणा येथील गेस्ट हाऊसवर थांबले. तेथील लिफ्टमधून जात असताना लिफ्ट बंद पडली आणि शहा आपल्या सहकाऱयांसोबत लिफ्टमध्ये अडकले. लिफ्ट दुरूस्त होऊन ते सुखरूप बाहेर येण्यासाठी ४० मिनिटांचा कालावधी गेला. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तेथे संबंधित व्यक्ती देखील उपस्थित नव्हता. लिफ्टचे दरवाजे पूर्णपणे बंद असल्याने आत मोबाईलला नेटवर्क देखील नव्हते. त्यामुळे आत अडकलेल्यांशी संपर्क देखील साधता येत नव्हता, असे भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांनी सांगितले. लिफ्ट सुरू करण्याच्या प्रयत्नांना अर्धा तास ओलांडून गेला तरी यश येत नव्हते अखेर अमित शहा यांच्या झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेतील सीआरपीएफच्या जवानांनी लिफ्टचे दरवाजे तोडून शहा यांना सुखरुप बाहेर काढले.
सुधीर फडकेंचा ‘गीतरामायण ‘वारसा अलौकिक … शरद पवार
बारामती -सुधीर फडकेंचा ‘गीतरामायण ‘वारसा अलौकिक आणि अभिमानाने मिरवण्याची बाब आहे असे सांगत हा वारसा पुढे नेणाऱ्या फडके यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष , ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गौरवोद्गार काढले
पाहू यात शरद पवार यांनी नेमके काय म्हटले आहे त्यांच्याच शब्दात …
गीतरामायण या अजरामर कलाकृतीचा हिरक महोत्सव काल विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात पार पडला. ग. दि. माडगूळकर यांनी रचलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध करून स्वतः गायलेले गीतरामायण ही एक अजरामर कलाकृती आहे. ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने असेलेलं सभागृह हे विद्या प्रतिष्ठानचे सांस्कृतिक केंद्र आहे. सुधीर फडके यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनी आपल्या सुमधूर आवाजात गीतरामायण सादर केले. सुधीर फडके यांची पुढची पिढी हा वारसा पुढे नेतेय याचा मला आनंद होत आहे.
मी शिक्षण घेत असताना माझे मॅट्रिकला असतानाचे मुख्याध्यापक श्रीधर गोगटे, हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. याचाही मला आत्यंतिक आनंद झाला. गोगटे सरांबरोबर बोलताना आपोआपच त्यावेळच्या आठवणींना उजाळा देता आला. जवळजवळ चार पिढ्यांनी एकत्र बसून गीतरामायणाचा आस्वाद घेतला, ही गोष्टही तितकीच अभूतपूर्व.
‘एन्व्हायर्न्मेंटल फोरम ऑफ इंडिया’ या संस्थेने गीतरामायणचा हिरक महोत्सव आणि माझी पंचाहत्तरी याचे निमित्त साधून हा कार्यक्रम आयोजित केला होता. पण मी सांगू इच्छितो, “तुम्ही माझ्या अमृत महोत्सवानिमित्त माझा सत्कार करून मला आठवण करून देताय की, माझे वय ७५ वर्ष झाले आहे. पण मला अजून समाजाच्या सर्व घटकांसाठी तरूणांना सोबत घेऊन काम करायचे आहे. मी कधीही काम करताना वय पाहत नाही.” हा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन…
पिंपोडे ब्रुद्रुक ग्रामस्थांच्या जलक्रांतीने टंचाईला मुक्ती -अश्विन मुद्गल
सातारा (जिमाका) : पिंपोडे ब्रुद्रुकच्या ग्रामस्थांनी खास करुन जनकल्याण समितीच्या माध्यमातून जलक्रांती करुन टंचाईला मुक्ती दिली आहे. त्याच धर्तीवर घीगेवाडी येथेही जलक्रांती करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांनी काल कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे ब्रुद्रुक येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांची पाहणी अचानकपणे केली. यावेळी बंधाऱ्यात झालेल्या पाणीसाठा पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. घिगेवाडी येथेही नारळ मागवून घेत तेथील ब्रिटीशकालीन बंधाऱ्याचे पुनर्जीवन करण्याच्या कामाचा शुभारंभ श्री. मुद्गल यांनी केला. यावेळी सरपंच मच्छिंद्र केंजळे, जनकल्याण समितीचे विजयराव पंडीत, डॉ. अविनाश पोळ, यांत्रिकी विभागाचे प्रकाश भोसले, मंडल अधिकारी उमेश डोईफोडे, भास्कर घिगे, बाळसाहेब घिगे, शामराव साळुंखे, लालासाहेब निकम, उद्धव निकम आदी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे ब्रिटीशकालीन बंधाऱ्याची दुरुस्ती व त्याचबरोबर खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. आहे. सध्या या बंधाऱ्यामध्ये मोठा पाणीसाठा झालेला आहे. या कामाची पहाणी श्री. मुद्गल यांनी काल अचानकपणे भेट देऊन केली. यावेळी आनंद व्यक्त करुन ते म्हणाले, ब्रिटीशकालीन असणाऱ्या बंधारा दुरुस्तीचे काम पिंपोडे ग्रामस्थ, जनकल्याण समिती यांनी हाती घेतले. अत्यंत सुंदर पद्धतीने हे काम झालेले आहे. या बंधाऱ्यामध्ये 600 ते 700 मिटर किमान पाणीसाठा सध्या झालेला आहे. यामुळे गावातील विहिरी, विंधन विहिरी या पुनर्जीवीत झाल्या आहेत. याचे सर्व श्रेय पिंपोडे बुद्रुक ग्रामस्थांना जाते. या ग्रामस्थांनी केलेल्या जलक्रांतीमुळे गावात असणाऱ्या टंचाईला आता मुक्ती मिळणार आहे.
यानंतर त्यांनी घिगेवाडी येथे असणाऱ्या ब्रिटीशकालीन बंधाऱ्याची पाहणी केली आणि या बंधाऱ्याच्या दरुस्तीचे तसेच खोलीकरण, रुंदीकरणाचे आदेश यांत्रिकी विभागाला दिले. या ठिकाणी नारळ मागवून घेत या बंधाऱ्याच्या पुनर्जीवन कामाचा शुभारंभही तात्काळ करुन ग्रामस्थांना सुखद धक्का दिला. या कामामुळे घिगेवाडीसह वाघोली परिसरातील भूजल पातळी वाढण्यासाठी निश्चिपणे मदत होणार आहे. या प्रसंगी सुनील निकम, रणजीत निकम, सूर्यकांत निकम, राजेंद्र निकम, आदीनाथ सावंत, संभाजी लेंभे, बाळासाहेब कदम, प्रमोद खराडे, शरद लेंभे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
1 हजार 809 कोटी रुपये गुंतवणुकीच्या उद्योगांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑफर लेटर ;उमरेड व देवरी येथे नवीन उद्योग सुरु होणार
नागपूर: विदर्भात उद्योग विकासाला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाच्या अनुषंगाने उद्योग सुरु करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे उमरेड येथील औद्योगिक क्षेत्रात 1 हजार 699 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या ॲल्युमिनियम इंजिनियर पे युनिट तसेच गोंदिया जिल्हयातील देवरी येथील औद्योगिक क्षेत्रात रुद्रा फॉर्म्स आणि प्रोसेसिंग प्रायव्हेट लि. या उद्योग समूहाकडून तांदळावर प्रकिया करुन स्वीटनर आणि प्रोटीन तयार करण्याचा उद्योग सुरु होत आहे.
हॉटेल सेंटर पाँईट येथे आयोजित प्लास्टिक आणि केमिकल उद्योगासंदर्भातील सेमिनारच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 हजार 699 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या गुजरात फॉयील लि. या उद्योग समूहाचे सुरेंद्र लोढा यांना औद्योगिक क्षेत्रात उद्योग सुरु करण्यासदंर्भातील ऑफर लेटर दिले. तसेच धान उत्पादक क्षेत्रात तांदळापासून स्वीटनर व प्रोटीन युनिट तयार करण्याचा रुद्रा फार्म ॲन्ड प्रोसेसिंग युनिटचे संजय सिंग यांनाही उद्योग सुरु करण्यासदंर्भातील ऑफर लेटर दिले. तसेच दोन्ही उद्योजकांचे विदर्भात उद्योग सुरु केल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रसायने राज्यमंत्री हंसराज अहीर ,उर्जा मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अजय संचेती, खासदार कृपाल तुमाने, सर्वश्री आमदार नाना शामकुळे, आशिष देशमुख, समीर मेघे, तसेच विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
भंडारा व गोंदिया जिल्हयातील धान उत्पादक क्षेत्रामध्ये धानावर प्रकिया करुन त्यापासून स्वीटनर व प्रोटीन तयार करण्याचा उद्योग प्रथमच सुरु होत असून या उद्योगासाठी देवरी औद्योगिक क्षेत्रात 75 हजार चौरस मिटर जागा उपलब्ध करुन देण्यात आले असून या उद्योगामध्ये 100 ते 120 बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. रुद्रा फार्म ॲन्ड प्रोसेसिंग या उद्योग समूहाकडून 110 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची या उद्योजगाचा टप्प्या टप्प्याने विस्तार करणार असल्याची माहिती संजय सिंग यांनी दिली.
उमरेड औद्योगिक क्षेत्रात गुजरात फाईल लि. या उद्योग समूहाने 1 लक्ष 5 हजार चौरस मिटर जागेवर ॲल्युमिनियम इंजिनिअरींग युनिट सुरु करण्यासाठी जागेची मागणी केली असून या उद्योगात 360 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी संगीतराव यांनी उद्योजकांना उद्योग उभारणी संदर्भातील संपूर्ण प्रकीया पूर्ण करुन जागे संदर्भातील पत्र तयार केले आहे. उद्योजकांना महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ उद्योग उभारणी संदर्भात संपूर्ण सहकार्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कर्नाटक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मनपा प्रकल्पांना भेटी
पुणे-कर्नाटक राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील दहा महापालिका आयुक्त,१६ मुख्य कार्यकारी अधिकारी, ४ वरिष्ठ अभियंते, दोन पर्यावरण अधिकारी यांनी शैक्षणिक दौऱ्या अंतर्गत पुणे महापालिकेस भेट दिली.
कर्नाटक राज्यातील सिटी मॅनेजर्स असोसिएशन यांचे वतीने शैक्षणिक दौऱ्याचे आयोजन करणेत आले होते.
पुणे महानगरपालिकेतील मा. आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीप्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश बकोरिया यांनी अभ्यास दौऱ्यातील अधिकाऱ्यांचे स्वागत केले. तसेच मनपाच्या विविध प्रकल्पांविषयी माहिती दिली. याप्रसंगी प्रमुख अभियंता विवेक खरवडकर यांनी शहरातील विविध रस्ते, पूल, पथ विभागातील विविध प्रकल्पांविषयी माहिती दिली. अधिक्षक अभियंता व्ही.जी. कुलकर्णी यांनी पाणीपुरवठा, श्रीमती किशोरी गद्रे व अरुण खिलारी यांनी घनकचरा व्यवस्थापन, राहूल जगताप यांनी ई-गव्हर्नन्सबाबत, उपायुक्त सुहास मापारी यांनी करआकारणी व करसंकलनाबाबत, श्रीमती उल्का कळसकर यांनी अंदाजपत्रकासंदर्भात माहिती दिली.
मनपाच्या विविध प्रकल्पांच्या भेटी अंतर्गत शिष्टमंडळाने वाडिया महाविद्यालया समोरील माता रमाबाई भिमराव आंबेडकर उद्यानास भेट दिली. बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर विकसित करण्यात आलेल्या या उद्यानांची पहाणी करीत असता येथील अधिकारी अजय घाटगे यांनी सविस्तर माहिती दिली.
सहकारनगर येथील भारतरत्न राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल येथील भेटी प्रसंगी मुख्याध्यापक अरुण कामठे व योगिता पाटील यांनी येथील विविध उपक्रमांची माहिती दिली.
यशवंतराव चव्हाण उद्यान येथील चित्रमहर्षी दादासाहेब फाळके ‘‘फोर-डी”तसेच सेव्हन वंडर्स व कै. वसंतराव बागूल उद्यानातील भारतरत्न पंडित भिमसेन जोशी कलादालन व नाला उद्यानाची पाहणी केली.
रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील रोकेम प्रकल्पास (वेस्ट टू एनर्जी) भेट दिली असता येथील व्यवस्थापक योगेश देशपांडे व अविनाश गावडे यांनी सविस्तर माहिती दिली.
वरील प्रकल्पांची पाहणी करित असताना अभ्यास दौèयातील अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा करुन माहिती घेतली. तसेच सर्व प्रकल्पांची प्रशंसा केली.
अभ्यास दौèया अंतर्गत कर्नाटक राज्यातील सागर, झमखांडी, श्रीरंगपटण, qसधूर, इलकल, निप्पानी, बसव कल्याण, राणी बेन्नुर, गोकाक, कोप्पाल या स्थानिक स्वराज्य संस्थांचे आयुक्त तसेच महाqलगपुरा, अथनी, वाडी, उल्लाळ, इंडी, अन्नीगेरी, के.आर.पेट, आळंद, सौदंसी, qचचोळी, सुल्लिया, कोप्पा, हिरेकेरुर, देवानहळ्ळी, हलिएल, मधुगिरी, रॉबर्ट सोनपेट, या स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी व सिटी मॅनेजर्स असोसिएशन कर्नाटक या संस्थेतील अधिकारी यांचा अभ्यासदौऱ्यात सहभाग होता.
कचरा प्रक्रिया मेळाव्याचे आयोजन
पुणे महानगरपालिकेच्या धनकवडी महा.सहा.आयुक्त कार्यालयाच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनाबाबत सेवा व मार्गदर्शन कचरा प्रक्रिया मेळाव्या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापना विषयी ओला कचरा जिरविणेबाबत प्रदर्शनाचे आयोजन श्री.छत्रपती मंगल कार्यालय, श्री सद्गुरु शंकर महाराज चौक, धनकवडी, पुणे-४११०४ याठिकाणी दिनांक २३/०८/२०१५ व दि.२४/०८/२०१५ रोजी सकाळी १०.०० ते सायं.६.०० या वेळेत आयोजित केलेले आहे.
कचरा निर्मूलन, खतनिर्मिती, गांडुळखत प्रकल्प, कचरा विलगीकरण, बायोगॅस, कचèयातून वीजनिर्मिती अशा विविध उपाययोजनांबाबत विविध कंपन्या, संस्था सहभागी होणार असुन सदरचे प्रदर्शन नागरिकांना विनामुल्य खुले आहे. आपल्या परिसरातील कचरानिर्मूलनास व शहर स्वच्छतेच्या कामी या प्रदर्शनातील माहिती व उपायांचा लाभ होणार असुन सदर प्रदर्शनास नागरिकांनी अवश्य भेट दयावी असे पुणे महापालिका प्रशासनाचे वतीने आवाहन करण्यात येत आहे.
‘अखिल धनगर समाज महासंघा’तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
‘ कधी पकडणार दाभोळकर-पानसरे यांचे मारेकरी … कोण आहेत सूत्रधार ?
पुणे – ‘दाभोलकर- पानसरेंचा खून झाला, महाराष्ट्राची लाज गेली‘, अशी घोषणा देऊन अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी गुरुवारी अभिवादन फेरी काढली. महाराष्ट्रभर दाभोलकरांच्या स्मृतीला उजाळा देत वेगवेगळ्या स्वरुपाची अभियाने विविध शहरात गावांमधून राबविण्यातआली वर्धा, नंदुरबार,धुळे,औरंगाबाद, अह्मदनगर, बीड़, सोलापूर, जळगाव,नाशिक, लातूर,उस्मानाबाद,नांदेड, कोल्हापुर,सातारा इतर अनेक ठिकाणी आंदोलन,मोर्चे, कार्यक्रम घेण्यात आले सगळीकडून एकाच सूर होता’ कधी पकडणार दाभोळकर-पानसरे यांचे मारेकरी … कोण आहेत सूत्रधार ?
पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त काढलेल्या या फेरीची सुरवात ज्येष्ठ विचारवंत एन. डी. पाटील, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पत्रकार निखिल वागळे, दिग्दर्शक नागराज मंजुळे, मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर यांच्या उपस्थितीत झाली.
अंनिसच्या कलाकारांनी फेरीच्या सुरवातीस “सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम‘ हे रिंगणनाट्य सादर करून विवेकवादाचा जागर केला. विठ्ठल रामजी शिंदे पूल येथून महापालिका, शनिवारवाडा, लक्ष्मी रस्ता, शास्त्री रस्ता ते म्हात्रे पुलामार्गे निघालेल्या फेरीची मनोहर मंगल कार्यालय येथे सांगता झाली.
डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला दोन वर्षे पूर्ण होऊनदेखील आरोपींना पकडण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. याचा उपस्थितांनी निषेध केला. “शाहू, फुले, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर‘, “लडेंगे, जितेंगे‘ “कितना दम है तेरी गोली में, देखा है, देखेंगे‘, आदी घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. हमीद दाभोलकर म्हणाले, “शेवटपर्यंत लोकशाही मार्गाने हा लढा सुरू राहील. पोलिसांकडून खुनाच्या तपासात दिरंगाई होत असून, महाराष्ट्रातील जनता संतप्त आहे. त्यांना यामागील सरकारची भूमिका पटलेली नाही. त्यामुळेच या लढ्याला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत असून, येत्या काळात सनदशीर मार्गाने हा लढा अधिक जोमाने पुढे नेऊ.‘‘





शेतकऱ्यांनो धीर सोडू नका; शासन तुमच्या पाठिशी- बबनराव लोणीकर
श्री. लोणीकर यांनी सेलू तालुक्यातील हादगाव तसेच पाथरी तालुक्यातील रूढी व करंजी शिवाय सेलू, जिंतूर शिवारातील पिकांच्या स्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार विजय भांबळे, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी.टी. कदम, उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगावकर, ब्रिजेश पाटील, तहसीलदार आसाराम छडीदार, श्री.गाढे, तालुका कृषी अधिकारी राम रोडगे आदी उपस्थित होते.
श्री.लोणीकर म्हणाले, कर्जाचे पुनर्गठन, शेतकऱ्यांना अन्नसुरक्षेची हमी यासारख्या विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. टंचाई स्थितीत शेतकरी व ग्रामस्थांना सर्व संबंधित विभाग व यंत्रणांनी समन्वयाने काम करून दिलासा द्यावा. ग्रामीण पातळीवरील अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच्या विविध विभागांच्या उपाययोजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.
सन 2014-15 या आर्थिक वर्षात नैसर्गिक आपत्तीने बाधीत झालेल्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्प मुदत कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये रुपांतर करणे, जे शेतकरी या कर्जाचा वार्षिक हप्ता बँकेस विहित मुदतीत परत करतील, अशा शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज सन 2015-16 या वर्षात माफ करणे, त्यापुढील 4 वर्षांचे म्हणजेच सन 2019-2020 पर्यंतच्या वर्षाचे 6 टक्के दराने होणारे व्याज शासनातर्फे शेतकऱ्यांच्या वतीने संबंधित बँकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद विभागातील सर्व व विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागातील 6 जिल्हे अशा 14 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये ज्या कुटुंबांना लाभ मिळत नाही, अशा दारिद्र्यरेषेवरील शिधापत्रक (केशरी) लाभार्थ्यांना (APL)सुद्धा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या दराप्रमाणे म्हणजेच तांदुळ 3 रुपये व गहू 2 रुपये प्रती किलो या दराने वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या 14 जिल्ह्यांमध्ये सर्व शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नसुरक्षेची हमी प्राप्त होणार आहे. शिवाय या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाची अट न ठेवता राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहेत. या जिल्ह्यामधील प्रत्येक शासकीय रुग्णालयात खाजगी मानसोपचारतज्ज्ञ उपलब्ध करुन त्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे श्री. लोणीकर यांनी सांगितले.
पर्जन्यमानातील अनियमिततेमुळे जमीन आर्द्रतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे शेतपिकावरील त्याचे अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी शासनाने महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार या योजनेची सुरुवात केली असून त्यामध्ये जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आली आहेत. याचा फायदा अनेक भागात होत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील धडक सिंचन विहिरींची कामे पूर्ण करणे, नव्याने 1 लाख विहिरी व 50 हजार शेततळ्यांचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
सदभावना दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सामूहिक प्रतिज्ञा
‘मी अशी प्रतिज्ञा करतो की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषाविषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो की, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरुपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचारविनिमय करुन व सांविधानिक मार्गांनी सोडवीन’, अशी सामूहिक प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली.
यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प वाहून अभिवादन केले.
राजधानीत सदभावना दिन साजरा
नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज सदभावना दिन साजरा करण्यात आला. कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदभावना प्रतिज्ञा दिली.
यावेळी श्रीमती शुक्ला यांनी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, अभिलाष कुमार, संजय आघाव आणि अजीतसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात सदभावना दिनाची प्रतिज्ञा
महाराष्ट्र परिचय केंद्रात सदभावना दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदभावना प्रतिज्ञा दिली. श्री.कांबळे यांनी यावेळी स्व. राजीव गांधी यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.
सदभावना दिन भारतरत्न राजीव गांधीना अभिवादन
अमरावती : माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. यानिमीत्त विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी आज राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सदभावना दिनाच्या कार्यक्रमास प्र. अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, प्र. उपायुक्त (सामान्य) ओमप्रकाश अग्रवाल, उपायुक्त (पुरवठा) रमेश मावस्कर, सहाय्यक आयुक्त जे. बी. अपाले, नगर रचनाकार दीपक नागेकर, सहाय्यक नगर रचनाकर, संजय नाकोड, विभागीय आयुक्तांचे स्वीय सहाय्यक महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सदभावना दिवस प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यानंतर सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.
विभागीय अधिस्वीकृती समितीच्या नूतन सदस्यांचा पुणे जिल्हा पत्रकार संघातर्फे सत्कार
प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती पत्र देण्यासंबंधी राज्य शासनाने राज्य अधिस्वीकृती समिती व विभागीय अधिस्वीकृती समित्यांची नुकतीच स्थापना केली आहे. पुण्याच्या विभागीय अधिस्वीकृती समितीच्या सदस्य पदी लोकमत सोलापूरचे संपादक राजा माने, सामनाचे विठ्ठल जाधव, साम वृत्तवाहिनीचे स्वप्निल बापट, चिंतन आदेशचे सचिन घाटपांडे व साप्ताहिक भविष्यकाळचे संपादक सुभाष भारद्वाज यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नूतन सदस्यांचा राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य एस.एम. देशमुख, विभागीय माहिती कार्यालय पुण्याचे उपसंचालक यशवंत भंडारे व जेष्ठ पत्रकार अरूण खोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब गोरे, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य किरण नाईक, शरद पुजारी, दत्तात्रय सुर्वे, संतोष पवार, सुनील वाळुंज आदी उपस्थित होते.














