Home Blog Page 3569

मनपाच्या सर्व 136 शाळान्मधे व्रुक्षारोपणाचे व वृक्ष संवर्धनाचे कार्यक्रम घेणार – शिक्षण मंडळ सदस्य सौ.मंजुश्री खर्डेकर यांचा निर्धार.

0

unnamed1

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी वृक्षरोपण व वृक्षसंवर्धानाचे आवाहन केले आहे,त्यास अनुसरुन पुणे महानगरपालिकेच्या इमारती असलेल्या सर्व 136 शाळानमधे वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेणार असुन त्याची सुरुवात कोथरुड पासुन करत आहे असे शिक्षण मंड्ळ सदस्य सौ.मंजुश्री खर्डेकर यानी सांगितले

.मनपा च्या ज्या ज्या शाळान्मधे मैदाने आहेत व जेथे मोकळी जागा उपलब्ध आहे तेथे व्रुक्ष लागवड करण्यात येइल असे ही त्या म्हणाल्या.पौड फाट्यावरील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत व्रुक्षारोपणाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.सम्राट अशोक विध्यालया पाठोपाठ दीनदयाळ विध्यालयात आयोजित कार्यक्रमात विध्यार्थी,पालक व रिक्षेवाले काकांच्या हस्ते रोप लागवड करण्यात आली.मनपाच्या उधान विभागाचे कर्मचारी ही यावेळी उपस्थित होते.मोठ्या प्रमाणावर व्रुक्षांची कत्तल होत असल्याने पर्यावरणाची हानी होत असुन मुलानी व्रुक्ष लागवड व संवर्धनाचे महत्व समजुन घ्यावे व आज लावलेल्या रोपांची निगा राखावी असे ही सौ.खर्डेकर म्हणाल्या.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे,क्रीडा शिक्षक बहिरामे  सर,शाळा समिती च्या सदस्या सौ.गौरी करंजकर,राज तांबोळी,निलेश गरुडकर,भारत कदम,पोपट बालवडकर,सुधीर फाटक,सुमीत दिकोंडा,जयेश सरनौबत,रामदास गावडे,श्रीक्रुष्ण गोगावले,जगदीश देडगे व इतर मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘चेहरे’ मध्ये पाहायला मिळणार ‘सायको थ्रीलर’ चे विलक्षण नाट्य

0

‘चेहरे’ या आगामी हिंदी चित्रपटात ‘सायको थ्रीलर’ चे विलक्षण नाट्य प्रेक्षकांना पाहायला मिळेल असे या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक रोहित कौशिक यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत  पत्रकारांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावणारी अभिनेत्री हर्षिता भट्ट तसेच अभिनेत्री गीता विज उपस्थित होत्या.

जैकी श्रॉफ. मनीषा कोईराला, गुलशन ग्रोव्हर, दिव्या दत्ता, राकेश बेदी, हर्षिता भट्ट, आर्य बब्बर अशी तगडी स्टारकास्ट असणारा ‘चेहरे’ हा चित्रपट येत्या २८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक रोहित कौशिक म्हणाले की,  ‘सायको थ्रीलर असलेल्या या चित्रपटाची कथाच अशी विलक्षण आहे की, हा चित्रपट साथ टक्के रंगीत तर चाळीस टक्के कृष्णधवल आहे. मुकपटाच्या जमान्यात काम करणाऱ्या ‘तराना’ नावाच्या एका प्रसिध्द अभिनेत्रीची ही विलक्षण कथा आहे. मुकपटाच्या जमान्यात काम करणाऱ्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला त्यानंतरच्या बोलपटाच्या जमान्यात हवे तसे ‘स्थान’ मिळत नाही त्यामुळे तिच्या होणाऱ्या मानसिक घुसमटीची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या  अनेक नाट्यपूर्ण प्रश्नांची मालिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. कथेचा प्रारंभ १९५२ साली इंग्लंडमध्ये घडलेल्या एका घटनेने होतो. फ़्लैशबैक तंत्राचा वापर करून सादरीकरण केलेल्या  या कथेत १९३० ते १९४० या दशकाचेही चित्रीकरण करण्यात आले असून ते पूर्ण कृष्णधवल स्वरुपात पाहायला मिळणार आहे असेही त्यांनी सांगितले.

आपले जीवन जगताना माणसाला अनेकदा खोट्या मुखवट्याचा आधार घ्यावा लागतो. या प्रत्येक मुखवट्यामागे एक कथा असू शकते म्हणूनच माणसांचे हे ‘चेहरे’ तपासण्याची गरज असते. अशाच चेहऱ्यांची या चित्रपटात कहाणी आहे असे सांगून रोहित कौशिक पुढे म्हणाले,  या चित्रपटात जुन्या काळाचे चित्रीकरण असले तरी प्रेक्षकांना अजूनही गतकाळाचे वैभव पाहायला आवडते. त्यामुळेच नव्या वातावरणातही जुने काळ दर्शविणारे चित्रपट चालू शकतात असे ते म्हणाले.

या चित्रपटात आपली अतिशय वेगळी भूमिका असून ती आव्हानात्मक आहे असे सांगून हर्षिता भट्ट म्हणाली की, माझ्या व्यक्तिरेखेचे लेखनच इतके परफेक्ट होते की मला त्या भूमिकेचा अभ्यास करण्याची फारशी गरज पडली नाही. अभिनेत्री गीता विज हिने आर्य बब्बरच्या प्रेमिकेची भूमिका असून या चित्रपटातील माझा अनुभव खूपच चांगला होता असे तिने सांगितले.  जैकी श्रॉफ यांनी या चित्रपटात एका निर्माता-दिग्दर्शकाची भूमिका केली असून गुलशन ग्रोव्हर डॉक्टरांच्या भूमिकेत चमकले आहेत. तर ‘तराना’ ची मध्यवर्ती भूमिका मनीषा कोईराला हिने केली आहे. या चित्रपटात चार गाणी असून ती संगीतकार जयदीप चौधरी यांनी स्वरबद्ध केली आहेत. कथेला अनुकूल अशा जुन्या साजातील ही गाणी श्रवणीय आहेत.

1 2

डीएसके विश्व ‘मेघमल्हार’गृहप्रकल्पातील फेज -2 चा हस्तांतर सोहळा उत्साहात संपन्न

0

पुणे :- पुण्यातील पहिली भव्य टाऊन शिप म्हणून ओळखल्या

जाणार्‍या डीएसके विश्वच्या  मेघमल्हार या प्रकल्पाच्या  फेज -२

मधील सदनिकाधारकांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार

पडला.  यावेळी गृहप्रकल्प निर्मितीत सहकार्य लाभलेल्या तसेच

मेघमल्हार येथील सर्व सदनिकाधारकांचा सत्कार तुळशीचे रोप आणि

भेटवस्तू देऊन करण्यात आला. सोबतच ‘मल्हार धून’ या संगीत

कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी  डी. एस. के समूहाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी , सौ. हेमंती

कुलकर्णी,  ब्रिगेडियर शर्मा, भाग्यश्री कुलकर्णी, अमित कुलकर्णी व

प्रसिद्ध मुलाखतकार राजेश दामले आदी उपस्थित होते.

६००० उंबऱ्याचे मॉडर्न गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डीएसके विश्व

मधील ‘मेघमल्हार या प्रकल्पाच्या फेज २’  बद्दल  अधिक माहिती

देताना सौ. कुलकर्णी म्हणाल्या, सिंहगड रस्ता परिसरातील निसर्गाच्या

सानिध्यात असणारा, सुप्रसिद्ध आर्किटेक हाफिज कॉट्रॅक्टर यांच्या

डिझाईन मधून साकारलेला हा दर्जेदार गृहप्रकल्प आहे. सर्व सोयी-

सुविधांनी परिपूर्ण अशा ह्या प्रकल्पामध्ये खास स्पॅनिश वास्तुशैलीचा

उपयोग करून घरांची रचना करण्यात आली आहे. सव्वा लाख स्क्वेअर

फुटाचे पोडीयम गार्डन, लहान मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त आणि

ऐसपैस जागा, कम्युनिटी हॉल, जिमनेशियम, कार्यक्रम अथवा

समारंभासाठी प्रशस्त पार्टी लॉन यांसारख्या सुखसोयी खास

ग्राहकांसाठी आम्ही येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय एका

उत्तम गृहप्रकल्पासाठी लागणार्‍या स्केटिंग रिंग,  बास्केट बॉल कोर्ट,

सिटीझन प्लाझा, हर्बल गार्डन आदि अत्याधुनिक सुखसोयी देखील येथे

आहेत. १, २ व ३ बी एच के आणि रो हाउसेस या प्रकल्पात आहेत.

रोजच्या जगण्यासाठी जे काही लागते ते सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध

करून द्यायचे या हेतूने आम्ही डीएसके विश्व या महाराष्ट्रातील पहिल्या

भव्य टाऊनशिपची उभारणी केली असल्याची भावनाही  त्यांनी

यावेळी बोलून दाखवली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.

महासत्ता होताना गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज : डॉ.शां ब मुजुमदार

0
पुणे:
‘ समाजातील सर्व काळजी करण्यासारख्या घटनांचे मूळ शिक्षणातील कमतरतेकडे असल्याने भारत महासत्ता होण्यासाठी  गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे प्राणवायूप्रमाणे लक्ष देण्याची गरज आहे,तसेच लायन्स क्लब इंटरनॅशनल ह्या जगातील सर्वात मोठ्या सेवाभावी संस्थेतर्फे मुलींच्या शिक्षणासंदर्भात प्रकल्प हातात घ्यावेत ’ असे प्रतिपादन सिंबॉयोसिस विश्‍व विद्यापीठाचे कुलपती पद्मविभूषण डॉ.शा ंब मुजुमदार यांनी रविवारी केले.
‘लायन्स क्लब 323 -डी 2’ च्या वतीने आयोजित ‘आगाज- एक नई शुरूवात’ या कार्यक्रमातंर्गत सिम्बायोसिस महाविद्यालयाचे संस्थापक संचालक, कुलपती पद्मभूषण डॉ. शां.ब.मुजुमदार यांना ‘लायन्स एक्सलन्स पुरस्कार’ देऊन गौरविण्यात  आले.त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमात लायन्सच्या नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभ पार पडला.
ते म्हणाले,‘माझ्या रुपाने एका शिक्षकाचा गौरव लायन्स क्लब करीत आहे.म्हणून शिक्षण क्षेत्राच्या वतीने मी कृतज्ञता व्यक्त करतो.समाजातील चांगल्या बदलासाठी शिक्षण हेच महत्वाचे माध्यम आहे.ज्या चिंताजनक घटना समाजात घडत आहेत त्याचे मूळ शिक्षणातील कमतरतेकडे असल्याने भारत महासत्ता होण्यासाठी  गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे प्राणवायूप्रमाणे लक्ष देण्याची गरज आह त्यातून देश संपन्नतेकडे आणि समृध्दीकडे जाईल.लायन्स क्लबने त्यात योगदान म्हणून मुलींच्या शिक्षणासाठीचे प्रकल्प हाती घ्यावेत
 महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त ,आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबाना ,विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा उपक्रम शैलेश शहा आणि डॉ.सतीश देसाई यांनी  यावेळी जाहीर केला.उस्थ्थितांनी लगेच या प्रकल्पासाठी देणग्या जाहीर केल्या.
शतकमहोत्सवी वर्षानिमित्त जगातील 210 देशात विविध उपक्रम सादर केले जाणार आहेत. पुणे, अहमदनगर, नाशिक याभागात पसरलेल्या प्रांत 323 डी-2 चे प्रांतपाल लायन श्रीकांत सोनी यांच्या मार्गदर्शनानुसार पदग्रहण समारंभ पार पडला  हा सोहळा रविवार दि. 23 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंग मंदिराच्या सभागृहात सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत झाला
यावेळी   डॉ.सतीश बत्रा ,प्रांतपाल श्रीकांत सोनी, नरेश अगरवाल, नरेंद्र भंडारी,प्रेमचंद बाफना ,डॉ. विक्रांत जाधव,गिरीश मालपाणी,सरला सोनी होते.द्वारका जालान यांनी सूत्रसंचालन केले

भुक्कड प्रशासकीय यंत्रणेमुळे कामाच्या नियोजनात अडचणी -नितीन गडकरी

0

पुणे -प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली पाहिजे, त्यामुळे विकासाच्या प्रक्रियेला वेग येतो. मात्र एकच फाइल 17 ठिकाणी फिरते. मग ती रेंगाळते. अशा भुक्कड यंत्रणेमुळे कामाच्या नियोजनात अडचणी निर्माण होत असल्याचे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. मात्र ही यंत्रणा सुधारण्याचे प्रयत्न आता केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले. ‘मुंबई-पुणे द्रुतगती मार्गामुळे दोन्ही शहरांच्या विकासाला हातभार लागला आहे. याच धर्तीवर मुंबई-नागपूर मार्ग पुण्याला जोडण्याचे नियोजन आहे,‘‘ असे  गडकरी यांनी शनिवारीपुण्यात सांगितले देशातील वाहतूक व्यवस्था इलेक्‍ट्रीकवर आधारित हवी, असेही ते म्हणाले.
सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज अँड ह्युमन रिसोर्स डेव्हल्पमेंटच्या वतीने आयोजित “इन्फ्राब्लेझ 2015‘ या व्याख्यानमालेचे उद्‌घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर गडकरी यांचे “स्मार्टसिटी‘ या विषयावर व्याख्यान झाले. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, महामार्ग खात्याचे सचिव आर. सी. सिन्हा, रजनी गुप्ते, प्रतिमा शिवरे, डॉ. विद्या येरवडेकर या वेळी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ‘ग्रामीण भागातील लोक शहरात येत आहेत. हे प्रमाण रोखण्यासाठी शहरांसारख्या सुविधा ग्रामीण भागातही उभारल्या पाहिजेत, तसेच उद्योगांचे विकेंद्रीकरण झाल्यास लोक स्थलांतरित होणार नाहीत. त्यासाठी “स्मार्ट व्हिलेज‘ योजना उपयुक्त ठरेल. स्मार्टसिटी योजनेत भूसंपादन हा महत्त्वाचा घटक आहे. विशेषत: वाहतूक सुधाण्याच्या दृष्टीने नियोजन आवश्‍यक आहे. पर्यावरणाचा प्राधान्याने विचार झाला पाहिजे. त्यासाठी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे इलेक्‍ट्रीक आणि जैव इंधनावर हवी. सांडपाणी, प्लॅस्टिक आणि कचऱ्यापासून निर्मिती केली पाहिजे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करताना खर्चात कपात करून प्रकल्पांची गुणवत्ता टिकविण्याकडे लक्ष दिले पाहिजे.‘‘ ‘स्मार्ट सिटी योजनेचे नियोजन करताना शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष दिले पाहिजे. व्यवस्थापन आणि कौशल्याचे शिक्षण देणाऱ्या संस्थांना कमी पैशात जागा मिळाली पाहिजे. आरोग्य यंत्रणाही सक्षम असली पाहिजे. देशभरात तब्बल 3 लाख 80 हजार कोटींचे प्रल्कप रखडले आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी,‘‘ असेही गडकरी म्हणाले. इलेक्‍ट्रीक वाहनांसाठी स्वस्त आणि किफायतशीर बॅटरी लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इंधनावरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच, प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. यासंदर्भात “इस्रो‘च्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. साधारणत: पाच ते सहा लाखांत ही बॅटरी मिळण्याची सोय केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

1907433_10154590373880553_8180045285544437697_n

भाजप कार्यकर्त्यांनी एफ सी रस्ता केला पथारीमुक्त….

0

1 2

पुणे-

भाजपच्या कार्यकर्त्यांनी पथारी आणि फेरीवाल्यांविरोधात आंदोलन सुरु करून अखेर काळ एफ सी रस्ता पथारी मुक्त केला फर्ग्युसन रस्ता व जंगली महाराज रस्त्यावरील पदपथ हे अनधिक्रुत पथारीवाले,फेरीवाले यानी व्यापले असुन येथे नागरिकाना चालणे ही अवघड झाले आहे.एवढेच नव्हे तर येथे गुन्हे गारी ही वाढली आहे.याचा निषेध करणयासाठी व पुणे मनपा प्रशासनाच्या अकार्यक्षमते विरुद्ध आणी अतिक्रमणाना पाठीशी घालण्याच्या प्रव्रुत्तीविरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आंदोलनाची घोषणा केली होती.मात्र परवा रात्री पासुनच मनपा ची यंत्रणा कमालीची कार्यक्षम झाली आणी दिवसातुन तीन चार वेळा कारवाई करुन फर्ग्युसन रस्त्यावरील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले.
शनिवारी सायंकाळी 6 वाजता भाजप कार्यकर्त्यानी जोरदार घोषणा देत या रस्त्यावरील पदपथावरुन फेरी काढली तसेच गोपाळक्रुष्ण गोखले चौकात प्रशासनाविरुद्ध निदर्शने ही केली.निदर्शनांचे नेत्रुत्व शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर,उपाध्यक्ष दत्तात्रय खाडे,नगरसेविका निलीमा खाडे,माधुरीताई सहस्त्र्बुद्धे,चिटणीस अशोक मुंडे,रविंद्र साळेगावकर,शिवाजीनगर मंडल अध्यक्ष नाना मोरे,युवा मोर्चा अध्यक्ष अपूर्व सोनटक्के,योगेश बाचल,संदीप काळे,राजेश धोत्रे,व इतर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदीप खर्डेकर म्हणाले “हा रस्ता नो होकर्स झोन” म्हणुन घोषित आहे,असे असताना येथील पदपथ अतिक्रमणानी भरलेले,तसेच पोलिसानी एक वर्षापूर्वी या रस्त्यावर पार्किंगला बंदी घालताना येथे अतिरेकी हल्ल्याची शक्यता असल्याचे सांगितले होते.मग अचानक येथील पदपथ पूर्णपणे अतिक्रमणानी व्यापले तरी पोलिस खाते व मनपा थंड कशी?यातुनच या सर्वांच्या आशिर्वादाने ही अतिक्रमणे झाली काय अशी शंका येते असे ही ते म्हणाले.
तर स्थानिक नगरसेविका निलीमाताई खाडे यानी आपण वारंवार मनपा कडे तक्रार करुन व सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करुन ही कारवाई होत नसल्याने आंदोलन उभारले असुन आता सातत्याने कारवाई झाली नाही तर भाजप चे कार्यकर्ते रोज आंदोलन करतील असे जाहीर केले.
शहराच्या अन्य भागात ही पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी भाजप आंदोलन उभारेल असे स्पष्ट करतानाच पथारीवाले धोरणाची अमलबजावणी करावी व अधिक्रुत पथारीवाल्यांचे पुनर्वसन करावे असे ही संदीप खर्डेकर म्हणाले.
उद्या ही या रस्त्यावर आंदोलन केले जाईल असे दत्ता खाडे,नाना मोरे,अशोक मुंडे यानी स्पष्ट केले.

पुण्याचे सर्व खासदार एकत्र आले तर कल्याण ;बापट पुढाकार घ्या … पवारांचे आवाहन …

0

पुणे – पुण्यातील आठ खासदार लोकसभा आणि राज्यसभेत आहेत. त्यांना दरवर्षी पाच कोटी रुपयांचा वार्षिक विकास निधी प्रत्येकास मिळतो. त्यातून प्रत्येकाने एक कोटी रुपये दिले तरी आठ कोटी रुपये जमा होतील. त्यात भर घालून दरवर्षी एक प्रकल्प महापालिका मार्गी लावू शकते, त्यासाठी माझ्या स्वतःपासून सुरवात करण्यास तयार असल्याचे सांगून राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार  यांनी यासाठी समन्वयासाठी बापट यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. ‘पुणे शहर विस्तारत आहे. त्यानुसार शहराचे प्रश्‍नही वाढत आहेत; ते सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. त्यासाठी राजकीय विचारधारा बाजूला ठेवून एकत्र येण्याची आवश्‍यकता आहे,‘‘ असे ते म्हणाले
शहराच्या ब्रॅंडिंगसाठी महापालिकेने तयार केलेला लोगो, शहराची छायाचित्रांद्वारे माहिती देणारे “कॉफी टेबल‘ पुस्तकाचे प्रकाशन, पुणे दर्शन बस आणि संकेतस्थळाचे उद्‌घाटन पवार आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. महापौर दत्तात्रेय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण आदी या प्रसंगी उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘प्रत्येक शहराचे वैशिष्ट्य असलेले पुस्तक तयार करण्याची सर्वत्र पद्धत आहे. आपल्याकडे उशीर झाला तरी, ते झाले याबद्दल अभिनंदन करतो. या शहराचा लौकिक मोठा असून, देशाच्या औद्योगिक विकासात येथील ऑटो, आयटी क्षेत्राने मोलाचा वाटा उचलला आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे “बॅक ऑफिसेस‘ शहरात आहेत. शहराचा विस्तार होताना प्रश्‍नही बदलत आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी राजकीय एकमत हवे; तसेच केंद्र, राज्य आणि उद्योग क्षेत्राची मदत घ्यायला हवी.‘‘ शहरातील झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढत असल्याबद्दल पवार यांनी चिंता व्यक्त करून वास्तवतेचे भान ठेवून निर्णय घेण्याची आवश्‍यकता आहे, असे मत व्यक्त केले. उद्योजकांना त्यांच्या नफ्यातील काही रक्कम सार्वजनिक सामाजिक जबाबदारीसाठी खर्च करण्याचे बंधन आहे. त्याचाही महापालिकेने उपयोग करून घ्यायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बापट म्हणाले, ‘ज्या वेगाने पुण्याचा विकास होत आहे, त्या वेगाने महापालिका शहराचा विकास करीत आहे का, याबद्दल आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार, जागतिक वित्त संस्थाही महापालिकेला मदत करीत आहेत. तरीही विकासाचा अपेक्षित वेग साध्य करता आलेला नाही. पुण्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने हातभार लावला पाहिजे.‘‘
शहराच्या ब्रॅंडिंग, कॉफी टेबल पुस्तक, पुणे दर्शन बस आणि संकेतस्थळाची निर्मिती करण्याची पार्श्‍वभूमी महापौरांनी प्रास्ताविकात विशद केली; तसेच महापालिकेच्या आगामी काळातील उपक्रमांची माहिती दिली. जगभरातील पर्यटकांना समृद्ध पुण्याची माहिती देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे खासदार चव्हाण यांनी सांगितले. त्यासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, बापूराव कर्णे गुरुजी, अरविंद शिंदे; तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याचे नमूद केले. आगामी काळात शहर स्वच्छ व सुंदर दिसेल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार जयदेव गायकवाड, अनिल भोसले, शरद रणपिसे, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्‍विनी कदम, सभागृह नेते बंडू केमसे, बाळासाहेब बोडके, शिवलाल भोसले, रूपाली पाटील-ठोंबरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. उपमहापौर बागूल यांनी आभार मानले.
पक्षनेत्यांना डावलणारे राजकारण –
महापालिकेच्या कार्यक्रमास सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना बोलविले जाते आणि ते उपस्थितही राहतात, असा संकेत आहे; परंतु या कार्यक्रमाला भाजप, मनसे, शिवसेनेचे गटनेते उपस्थित नव्हते. कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे सभागृहात उपस्थित असूनही व्यासपीठावर आले नाही. याची दखल पालकमंत्री बापट यांनी त्यांच्या भाषणात घेतली. ते म्हणाले, “”महापालिकेत निवडून आल्यावर प्रत्येक राजकीय पक्षाचे नगरसेवक पूर्वी शहराच्या विकासकामांसाठी एकत्रित काम करायचे. मात्र, गेल्या काही काळात चित्र बदलले आहे. पुण्याच्या प्रश्‍नांसाठी आमदार विधानसभेत एकत्र येतात. मात्र, सभागृहात नगरसेवक एकत्र दिसत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. मोठे व्हायचे असेल तर संकुचितपणा सोडला पाहिजे. पुणेकरांचे प्रश्‍न सोडविले नाहीतर ते पुन्हा निवडून देणार नाहीत.‘‘ पदाचा वापर हा नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी केला पाहिजे, हा सल्ला पालकमंत्री म्हणून नव्हे; तर मित्रत्वाच्या नात्याने आणि पुणेकर म्हणून देत असल्याचे बापट यांनी नमूद केले. याबाबत शिंदे म्हणाले, ‘महापालिकेत गटनेत्यांच्या बैठकीत या कार्यक्रमाबद्दल जे ठरले होते, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आमच्या पक्षनेत्यांना बोलविण्यात आलेले नव्हते. त्यामुळे मी व्यासपीठावर गेलो नाही.‘‘
11885383_466019583575022_6417431258480058854_n 11898616_466019836908330_2783459791631753097_n

संगीता तिवारींची पतीविरोधी तक्रार…. ?

0
पुणे –
महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा आणि काँग्रेस कार्यकर्त्या संगीता रवी तिवारी (वय. ४८ रा. कुमार कृती, कल्याणी नगर) यांनी पतीच्या विरोधात मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी रवी तिवारी यांच्या विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेत शिक्षण मंडळ अध्यक्ष असताना तू कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून, इतकी मोठी रक्कम कोणाकडे ठेवली आहे, तुझ्याकडील सोन्याचे दागिने आणि पंचवीस लाख मला आणून दे, अशी मागणी रवी यांनी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ आणि मारहाणही होत असल्याचे श्रीमती तिवारींनी म्हटले आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने आपण पोलिसांत धाव घेतल्याचेही तक्रारी म्हटले आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीता तिवारी या मनमिळाऊ आणि धाडसी कार्यकर्त्या म्हणून राजकीय वर्तुळात परिचित होत्या . भाजपचे दिलीप कांबळे जेव्हा आपल्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा तिवारी या त्यांच्या खंद्या समर्थक होत्या . त्यांनतर मात्र त्यांनी काँग्रेस(आय )मध्ये प्रवेश केला  सुरेश कलमाडी यांचे  नेतृत्व पत्करले . मीरा कलमाडी यांच्या अगदी जवळच्या सहकारी म्हणूनही त्या परिचित होत्या . या सर्व राजकीय प्रवासात त्यांना पतीची आणि एकूणच कुटुंबाची मोठी साथ मिळाली होती . पण देशातील -राज्यातील काँग्रेस ची सत्ता गेली आणि पुण्यातील कलमाडींचे नेतृत्व हि लयास गेले . त्यानंतर या कुटुंबात झालेली हि आणि विशेष म्हणजे चव्हाट्यावर आलेली बाब राजकीय कार्यकर्त्यांना आपल्या वैक्तिक आयुष्यासाठी बरेच काही सांगून जाणारी आहे .
दो हंसो का जोडा ... अजून आठवे ती रात्र पावसाळी अशी गाणी आठवतील असा हा फोटो -- अर्थात जुना आहे ... सध्या मात्र काळ बदलला आहे का कोण जाणे ?  ते सांगणारीच हि बातमी आहे ... पहा ..वाचा ...
दो हंसो का जोडा … अजून आठवे ती रात्र पावसाळी अशी गाणी आठवतील असा हा फोटो — अर्थात जुना आहे … सध्या मात्र काळ बदलला आहे का कोण जाणे ? ते सांगणारीच हि बातमी आहे ..कुटुंबात मतभेद असलेत तरी या टोकाला ते पोहोचू नयेत याची काळजी घेतलीच पाहिजे हे तीव्रतेने दर्शविणारी हि घटना आहे .

10850124_994089463941593_2171870311419836269_n

सिलेंडरच्या स्फोटातील जळीतग्रस्तांना पुणे कॅम्पमधील गणेश उत्सव मंडळांनी मदतीचा दिला हात

0

 

पुणे

-कॅम्प नवा मोदीखाना भागातील कुंभारबावडी भाजी मार्केट जवळील लोकवस्तीमधील झालेल्या सिलेंडरच्या स्फोटातील जळीतग्रस्तांना  पुणे कॅम्प मधील गणेश उत्सव मंडळांनी मदतीचा हात दिला .नवा मोदीखाना मधील उत्सव संवर्धक तरुण मंडळाने या जळीतग्रस्तना मदतीसाठी गणेश मंडळाचे कार्यकर्ते पुढे आलेले आहेत . तसेच , स्थानिक नगरसेवक अतुल गायकवाड यांनी देखील आपले नगरसेवकाचे एक महिन्याचे मानधन जळीत ग्रस्तना मदतीसाठी दिले .   उत्सव संवर्धक तरुण मंडळाचे कार्यकर्ते अड. प्रशांत यादव , जितेंद्र शिंदे , निलेश कणसे ,  मोहन यादव , दिलीप जाधव , दीपक तांबे , शंकर चिकोटी , राजू राऊत , विकी मोरे मोहन नारायणे ,कुंभारबावडी मंडळाचे कार्यकर्ते मंगेश ककरे , जैन्नूभाई आदींनी एकत्रित येऊन जळीतग्रस्त तिन्ही कुटुंबियांना पंधरा हजार रुपयांची धनादेशद्वारे मदत दिली . यावेळी जळीतग्रस्त  कुटुंबिय संदीप जगताप , सुनील जगताप , मिलिंद किसन बनसोडे रमेश बाबुराव कोपेल्लू आदी कुटुंबीय उपस्थित होते

अमित शहा लिफ्टमध्ये अडकले, अर्ध्या तासानंतर सुटका

0

पाटणा-

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रचारासाठी बिहारमध्ये दाखल झालेले भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना शुक्रवारी अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले. पाटणा येथील गेस्ट हाऊसच्या लिफ्टमध्ये अमित शहा आपल्या सहकाऱयांसोबत अडकले होते. तब्बल ४० मिनिटांनंतर त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. विधानसभा निवडणुकांमुळे बिहारमधील वातावरण सध्या तापले आहे. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या वारूला रोखण्यासाठी नितीश, लालूप्रसाद यांची एकजूट होण्यास सुरूवात झाली आहे. तर भाजपसाठी देखील ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. त्यामुळे भाजपची रणनिती आखण्यासाठी अमित शहा बिहारमध्ये दाखल झाले होते. पाटणा येथे भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. रात्री उशीरा बैठक संपल्याने ते पाटणा येथील गेस्ट हाऊसवर थांबले. तेथील लिफ्टमधून जात असताना लिफ्ट बंद पडली आणि शहा आपल्या सहकाऱयांसोबत लिफ्टमध्ये अडकले. लिफ्ट दुरूस्त होऊन ते सुखरूप बाहेर येण्यासाठी ४० मिनिटांचा कालावधी गेला. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तेथे संबंधित व्यक्ती देखील उपस्थित नव्हता. लिफ्टचे दरवाजे पूर्णपणे बंद असल्याने आत मोबाईलला नेटवर्क देखील नव्हते. त्यामुळे आत अडकलेल्यांशी संपर्क देखील साधता येत नव्हता, असे भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांनी सांगितले. लिफ्ट सुरू करण्याच्या प्रयत्नांना अर्धा तास ओलांडून गेला तरी यश येत नव्हते अखेर अमित शहा यांच्या झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेतील सीआरपीएफच्या जवानांनी लिफ्टचे दरवाजे तोडून शहा यांना सुखरुप बाहेर काढले.

सुधीर फडकेंचा ‘गीतरामायण ‘वारसा अलौकिक … शरद पवार

0

11866218_465626466947667_6540537829552758204_n 11873532_465626460281001_2952674531828924060_n

बारामती -सुधीर फडकेंचा ‘गीतरामायण ‘वारसा अलौकिक आणि अभिमानाने मिरवण्याची बाब आहे असे सांगत हा वारसा पुढे नेणाऱ्या फडके यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष , ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गौरवोद्गार काढले

पाहू यात शरद पवार यांनी नेमके काय म्हटले आहे त्यांच्याच शब्दात …

गीतरामायण या अजरामर कलाकृतीचा हिरक महोत्सव काल विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात पार पडला. ग. दि. माडगूळकर यांनी रचलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध करून स्वतः गायलेले गीतरामायण ही एक अजरामर कलाकृती आहे. ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने असेलेलं सभागृह हे विद्या प्रतिष्ठानचे सांस्कृतिक केंद्र आहे. सुधीर फडके यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनी आपल्या सुमधूर आवाजात गीतरामायण सादर केले. सुधीर फडके यांची पुढची पिढी हा वारसा पुढे नेतेय याचा मला आनंद होत आहे.

मी शिक्षण घेत असताना माझे मॅट्रिकला असतानाचे मुख्याध्यापक श्रीधर गोगटे, हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. याचाही मला आत्यंतिक आनंद झाला. गोगटे सरांबरोबर बोलताना आपोआपच त्यावेळच्या आठवणींना उजाळा देता आला. जवळजवळ चार पिढ्यांनी एकत्र बसून गीतरामायणाचा आस्वाद घेतला, ही गोष्टही तितकीच अभूतपूर्व.

‘एन्व्हायर्न्मेंटल फोरम ऑफ इंडिया’ या संस्थेने गीतरामायणचा हिरक महोत्सव आणि माझी पंचाहत्तरी याचे निमित्त साधून हा कार्यक्रम आयोजित केला होता. पण मी सांगू इच्छितो, “तुम्ही माझ्या अमृत महोत्सवानिमित्त माझा सत्कार करून मला आठवण करून देताय की, माझे वय ७५ वर्ष झाले आहे. पण मला अजून समाजाच्या सर्व घटकांसाठी तरूणांना सोबत घेऊन काम करायचे आहे. मी कधीही काम करताना वय पाहत नाही.” हा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन…

पिंपोडे ब्रुद्रुक ग्रामस्थांच्या जलक्रांतीने टंचाईला मुक्ती -अश्विन मुद्गल

0

सातारा (जिमाका) : पिंपोडे ब्रुद्रुकच्या ग्रामस्थांनी खास करुन जनकल्याण समितीच्या माध्यमातून जलक्रांती करुन टंचाईला मुक्ती दिली आहे. त्याच धर्तीवर घीगेवाडी येथेही जलक्रांती करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांनी काल कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे ब्रुद्रुक येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांची पाहणी अचानकपणे केली. यावेळी बंधाऱ्यात झालेल्या पाणीसाठा पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. घिगेवाडी येथेही नारळ मागवून घेत तेथील ब्रिटीशकालीन बंधाऱ्याचे पुनर्जीवन करण्याच्या कामाचा शुभारंभ श्री. मुद्गल यांनी केला. यावेळी सरपंच मच्छिंद्र केंजळे, जनकल्याण समितीचे विजयराव पंडीत, डॉ. अविनाश पोळ, यांत्रिकी विभागाचे प्रकाश भोसले, मंडल अधिकारी उमेश डोईफोडे, भास्कर घिगे, बाळसाहेब घिगे, शामराव साळुंखे, लालासाहेब निकम, उद्धव निकम आदी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे ब्रिटीशकालीन बंधाऱ्याची दुरुस्ती व त्याचबरोबर खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. आहे. सध्या या बंधाऱ्यामध्ये मोठा पाणीसाठा झालेला आहे. या कामाची पहाणी श्री. मुद्गल यांनी काल अचानकपणे भेट देऊन केली. यावेळी आनंद व्यक्त करुन ते म्हणाले, ब्रिटीशकालीन असणाऱ्या बंधारा दुरुस्तीचे काम पिंपोडे ग्रामस्थ, जनकल्याण समिती यांनी हाती घेतले. अत्यंत सुंदर पद्धतीने हे काम झालेले आहे. या बंधाऱ्यामध्ये 600 ते 700 मिटर किमान पाणीसाठा सध्या झालेला आहे. यामुळे गावातील विहिरी, विंधन विहिरी या पुनर्जीवीत झाल्या आहेत. याचे सर्व श्रेय पिंपोडे बुद्रुक ग्रामस्थांना जाते. या ग्रामस्थांनी केलेल्या जलक्रांतीमुळे गावात असणाऱ्या टंचाईला आता मुक्ती मिळणार आहे.
यानंतर त्यांनी घिगेवाडी येथे असणाऱ्या ब्रिटीशकालीन बंधाऱ्याची पाहणी केली आणि या बंधाऱ्याच्या दरुस्तीचे तसेच खोलीकरण, रुंदीकरणाचे आदेश यांत्रिकी विभागाला दिले. या ठिकाणी नारळ मागवून घेत या बंधाऱ्याच्या पुनर्जीवन कामाचा शुभारंभही तात्काळ करुन ग्रामस्थांना सुखद धक्का दिला. या कामामुळे घिगेवाडीसह वाघोली परिसरातील भूजल पातळी वाढण्यासाठी निश्चिपणे मदत होणार आहे. या प्रसंगी सुनील निकम, रणजीत निकम, सूर्यकांत निकम, राजेंद्र निकम, आदीनाथ सावंत, संभाजी लेंभे, बाळासाहेब कदम, प्रमोद खराडे, शरद लेंभे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

1 हजार 809 कोटी रुपये गुंतवणुकीच्या उद्योगांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑफर लेटर ;उमरेड व देवरी येथे नवीन उद्योग सुरु होणार

0

11895959_1676954972520810_6810206297521341327_n 11898837_1676954969187477_3525534594113960094_n

नागपूर: विदर्भात उद्योग विकासाला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाच्या अनुषंगाने उद्योग सुरु करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे उमरेड येथील औद्योगिक क्षेत्रात 1 हजार 699 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या ॲल्युमिनियम इंजिनियर पे युनिट तसेच गोंदिया जिल्हयातील देवरी येथील औद्योगिक क्षेत्रात रुद्रा फॉर्म्स आणि प्रोसेसिंग प्रायव्हेट लि. या उद्योग समूहाकडून तांदळावर प्रकिया करुन स्वीटनर आणि प्रोटीन तयार करण्याचा उद्योग सुरु होत आहे.
हॉटेल सेंटर पाँईट येथे आयोजित प्लास्टिक आणि केमिकल उद्योगासंदर्भातील सेमिनारच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 हजार 699 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या गुजरात फॉयील लि. या उद्योग समूहाचे सुरेंद्र लोढा यांना औद्योगिक क्षेत्रात उद्योग सुरु करण्यासदंर्भातील ऑफर लेटर दिले. तसेच धान उत्पादक क्षेत्रात तांदळापासून स्वीटनर व प्रोटीन युनिट तयार करण्याचा रुद्रा फार्म ॲन्ड प्रोसेसिंग युनिटचे संजय सिंग यांनाही उद्योग सुरु करण्यासदंर्भातील ऑफर लेटर दिले. तसेच दोन्ही उद्योजकांचे विदर्भात उद्योग सुरु केल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रसायने राज्यमंत्री हंसराज अहीर ,उर्जा मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अजय संचेती, खासदार कृपाल तुमाने, सर्वश्री आमदार नाना शामकुळे, आशिष देशमुख, समीर मेघे, तसेच विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
भंडारा व गोंदिया जिल्हयातील धान उत्पादक क्षेत्रामध्ये धानावर प्रकिया करुन त्यापासून स्वीटनर व प्रोटीन तयार करण्याचा उद्योग प्रथमच सुरु होत असून या उद्योगासाठी देवरी औद्योगिक क्षेत्रात 75 हजार चौरस मिटर जागा उपलब्ध करुन देण्यात आले असून या उद्योगामध्ये 100 ते 120 बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. रुद्रा फार्म ॲन्ड प्रोसेसिंग या उद्योग समूहाकडून 110 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची या उद्योजगाचा टप्प्या टप्प्याने विस्तार करणार असल्याची माहिती संजय सिंग यांनी दिली.
उमरेड औद्योगिक क्षेत्रात गुजरात फाईल लि. या उद्योग समूहाने 1 लक्ष 5 हजार चौरस मिटर जागेवर ॲल्युमिनियम इंजिनिअरींग युनिट सुरु करण्यासाठी जागेची मागणी केली असून या उद्योगात 360 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी संगीतराव यांनी उद्योजकांना उद्योग उभारणी संदर्भातील संपूर्ण प्रकीया पूर्ण करुन जागे संदर्भातील पत्र तयार केले आहे. उद्योजकांना महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ उद्योग उभारणी संदर्भात संपूर्ण सहकार्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कर्नाटक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मनपा प्रकल्पांना भेटी

0

 

a1 a2 a4 a5

पुणे-कर्नाटक राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील दहा महापालिका आयुक्त,१६ मुख्य कार्यकारी अधिकारी, ४ वरिष्ठ अभियंते, दोन पर्यावरण अधिकारी यांनी शैक्षणिक दौऱ्या अंतर्गत पुणे महापालिकेस भेट दिली.
कर्नाटक राज्यातील सिटी मॅनेजर्स असोसिएशन यांचे वतीने शैक्षणिक दौऱ्याचे आयोजन करणेत आले  होते.
पुणे महानगरपालिकेतील मा. आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीप्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश बकोरिया यांनी अभ्यास दौऱ्यातील अधिकाऱ्यांचे स्वागत केले. तसेच मनपाच्या विविध प्रकल्पांविषयी माहिती दिली. याप्रसंगी प्रमुख अभियंता विवेक खरवडकर यांनी शहरातील विविध रस्ते, पूल, पथ विभागातील विविध प्रकल्पांविषयी माहिती दिली. अधिक्षक अभियंता व्ही.जी. कुलकर्णी यांनी पाणीपुरवठा, श्रीमती किशोरी गद्रे  व अरुण खिलारी यांनी घनकचरा व्यवस्थापन, राहूल जगताप यांनी ई-गव्हर्नन्सबाबत, उपायुक्त सुहास मापारी यांनी करआकारणी व करसंकलनाबाबत, श्रीमती उल्का कळसकर यांनी अंदाजपत्रकासंदर्भात माहिती दिली.
मनपाच्या विविध प्रकल्पांच्या भेटी अंतर्गत शिष्टमंडळाने वाडिया महाविद्यालया समोरील माता रमाबाई भिमराव आंबेडकर उद्यानास भेट दिली. बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर विकसित करण्यात आलेल्या या उद्यानांची पहाणी करीत असता येथील अधिकारी अजय घाटगे यांनी सविस्तर माहिती दिली.
सहकारनगर येथील भारतरत्न राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल येथील भेटी प्रसंगी मुख्याध्यापक अरुण कामठे व योगिता पाटील यांनी येथील विविध उपक्रमांची माहिती दिली.
यशवंतराव चव्हाण उद्यान येथील चित्रमहर्षी दादासाहेब फाळके ‘‘फोर-डी”तसेच सेव्हन वंडर्स व कै. वसंतराव बागूल उद्यानातील भारतरत्न पंडित भिमसेन जोशी कलादालन व नाला उद्यानाची पाहणी केली.
रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील रोकेम प्रकल्पास (वेस्ट टू एनर्जी) भेट दिली असता येथील व्यवस्थापक योगेश देशपांडे व अविनाश गावडे यांनी सविस्तर माहिती दिली.
वरील  प्रकल्पांची पाहणी करित असताना अभ्यास दौèयातील अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा करुन माहिती घेतली. तसेच सर्व प्रकल्पांची प्रशंसा केली.
अभ्यास दौèया अंतर्गत कर्नाटक राज्यातील सागर, झमखांडी, श्रीरंगपटण, qसधूर, इलकल, निप्पानी, बसव कल्याण, राणी बेन्नुर, गोकाक, कोप्पाल या स्थानिक स्वराज्य संस्थांचे आयुक्त तसेच महाqलगपुरा, अथनी, वाडी, उल्लाळ, इंडी, अन्नीगेरी, के.आर.पेट, आळंद, सौदंसी, qचचोळी, सुल्लिया, कोप्पा, हिरेकेरुर, देवानहळ्ळी, हलिएल, मधुगिरी, रॉबर्ट सोनपेट, या स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी व सिटी मॅनेजर्स असोसिएशन कर्नाटक या संस्थेतील अधिकारी यांचा अभ्यासदौऱ्यात सहभाग होता.

कचरा प्रक्रिया मेळाव्याचे आयोजन

0

पुणे महानगरपालिकेच्या धनकवडी महा.सहा.आयुक्त कार्यालयाच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनाबाबत सेवा व मार्गदर्शन कचरा प्रक्रिया मेळाव्या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापना विषयी ओला कचरा जिरविणेबाबत प्रदर्शनाचे आयोजन श्री.छत्रपती मंगल कार्यालय, श्री सद्गुरु शंकर महाराज चौक, धनकवडी, पुणे-४११०४ याठिकाणी दिनांक २३/०८/२०१५ व दि.२४/०८/२०१५ रोजी सकाळी १०.०० ते सायं.६.०० या वेळेत आयोजित केलेले आहे.
कचरा निर्मूलन, खतनिर्मिती, गांडुळखत प्रकल्प, कचरा विलगीकरण, बायोगॅस, कचèयातून वीजनिर्मिती अशा विविध उपाययोजनांबाबत विविध कंपन्या, संस्था सहभागी होणार असुन सदरचे प्रदर्शन नागरिकांना विनामुल्य खुले आहे. आपल्या परिसरातील कचरानिर्मूलनास व शहर स्वच्छतेच्या कामी या प्रदर्शनातील माहिती व उपायांचा लाभ होणार असुन सदर प्रदर्शनास नागरिकांनी अवश्य भेट दयावी असे पुणे महापालिका प्रशासनाचे वतीने आवाहन करण्यात येत आहे.

Pune_anna295x200