डी. एस. कुलकर्णी फाउंडेशनतर्फे निर्माल्य संकलन – रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड आणि स्वच्छ यांचाही सहभाग
‘मुंगळा’ २ ऑक्टोबरपासून ..
साई मोहन एन्टरटेनमेंट व गौरव भानुशाली निर्मित ‘मुंगळा’ हा मराठी चित्रपट २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मुंगळा’ चे दिग्दर्शक विजय देवकर यांनी केले असून कथा, पटकथा, तसेच संवादही त्यांचेच आहेत. ‘मुंगळा’ चित्रपट प्रमुख भूमिकेत लोकेश गुप्ते, गणेश यादव, ज्योती जोशी, सुहास पळशीकर, चेतन दळवी मुख्य भूमिकेत असून सोबत राम कदम, मृणाली जांभळे, हरी ठुमके, मुकेश फाळके, भूषण घाडी, दीपक करंजीकर, जनार्दन परब, वैजनाथ चौगुले, गौरी देशमुख, सविता हांडे, आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘मुंगळा’ चित्रपटात ३ गाणी असून आयटम सॉंग अतुल लोहार यांनी संगीतबद्ध केले असून रचना त्यांनीच आहे. सदर गाणे त्यांच्यासोबत विभावरी सातर्डीकरने गायले आहे. इतर गाणी जय गावंडे यांनी संगीतबद्ध केली असून मंदार चोळकर यांच्या रचना आहेत. तसेच नेहा राजपाल व आदर्श शिंदे यांनी पार्श्वगायन केले आहे. चित्रपटात एक भन्नाट आयटम गाणे असून सारा श्रवण हिने त्यावर दिलखेचक असे नृत्य सादर केले आहे. राजेश बिडवे याने नृत्य दिग्दर्शन केले आहे. सध्याचा गाजत असलेला मुद्दा म्हणजे पाणी आणि वीज. संपूर्ण महाराष्ट्रात पाणी पेटले आहे. ते कसे विझवायचे, या प्रश्नाचे उत्तर आगामी ‘मुंगळा’ चित्रपटातून देण्याच्या प्रयत्न असल्याचे दिग्दर्शक विजय देवकर यांनी सांगितले.
९ ऑक्टोबर … स्पेशल आकर्षण … 3D अॅक्शन सिनेमा… मोगलीचा ‘द जंगल बुक’.. पहा ट्रेलर ….
मोगलीच्या ‘द जंगल बुक’ या 3D अॅक्शन सिनेमा येत्या ९ ऑक्टोबरला प्रदर्शित होतो आहे . या सिनेमा चा ट्रेलर रिलीज झाला आहे.
डिस्नेच्या बॅनरअंतर्गत बनलेला हा 1967 मध्ये आलेल्या सिनेमाचं अॅनिमेटड व्हर्जन आहे. दिग्गज अभिनेते बेन किंग्जले यांनी जंगलबुकमध्ये मोगलीचा मित्र बगिराला, तर सुप्रसिद्ध कॉमेडियन बिल मरे ‘बल्लु’ अस्वलाला आवाज दिला आहे.जॉन फॅवरो यांचा आयर्न मॅन हा सिनेमा प्रचंड गाजला होता. आता हा सिनेमा नक्कीच अपेक्षा उंचावणारा आहे
डिस्नेचा 3 D जंगल बुक सिनेमा 9 ऑक्टोबरला सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.ज्यामध्ये भारतीय वंशाचा बालकलाकार नील सेठी यात मोगलीची भूमिका साकारत आहे.
‘बायकर्स अड्डा’ चित्रपटात गणरायाचं धमाकेदार गीत
गणेशोत्सवात जल्लोष आणि उत्साहात वाजवली जाणारीगणपतीचीगाणीहा अविभाज्य घटक असतो. दर वर्षी गणपतीची अधिकाधिक लोकप्रिय गाणी ऐकायला मिळतात. या वर्षीही ‘बायकर्स अड्डा’ यामराठी चित्रपटातील ‘आला रे आला बाप्पा तू आला’हे गणपतीच्याजयघोषाचं जोशपूर्ण गीत गणरायाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालं आहे.
प्रशांत हळवे लिखित ‘आला रे आला बाप्पा तू आला’ या मराठमोळ्या गीताला वेस्टर्न स्टाईल टच देण्यात आला असून मराठीतला रॉक स्टार जसराज जोशी यांच्यादमदार आवाजात हे गीतं ऐकायला मिळणार आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे मिरवणुकीच्या या गाण्यात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक गिटारची धून ऐकायला मिळणार आहे.विशी-निमो या संगीतकाराने या गीताला तितकचं ठेकेदार संगीत दिलं आहे.विशी-निमो यांचा स्वतःचारॉकबँड असल्यामुळे ह्या गीताला वेगळी ट्रीटमेंट देण्यात आली आहे.
संतोषजुवेकर,श्रीकांत वट्टमवार, राहुलराज डोंगरे, हृषीकेश मांडके या चार जणांवर चित्रित करण्यात आलेल्या या गीताचंनृत्यदिग्दर्शन संतोष पालवणकर यांनी केलं आहे. हे गीतं पुण्याच्या प्रसिद्ध गोखले नगर मंडळ या ठिकाणी शूट करण्यात आलं असून गोखले नगर मंडळाच्या कार्यकर्त्यांचा या चित्रीकरणात सहभाग आहे. ‘बायकर्स अड्डा’च्या निमित्ताने येऊ घातलेलंगणपती बाप्पाच्या जयघोषाचं गाणंभव्यदिव्य सादरीकरणामुळेधमाकेदार झालं आहे.ठेका धरायला लावणारं हे गीत यंदाच्या गणेशोत्सवात धमाल आणेल हे नक्की.
प्रमोद मारुती लोखंडे, विजय हरिया निर्मित, आणि राजेश लाटकर लिखित-दिग्दर्शित ‘बायकर्स अड्डा’मध्येसंतोष जुवेकर, प्रार्थना बेहेरे, श्रीकांत मोघे, श्रीकांत वट्टमवार, राहुलराज डोंगरे,देवेंद्र भगत, तन्वी किशोर, हृषीकेश मांडके, जय आदित्य गिरी, अनिरुद्ध हरीप, आणि निखिल राजेशिर्के आदिंच्या प्रमुख भूमिका पहायला मिळतील.’बायकर्स अड्डा’चित्रपट ९ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
पुणे फेस्टिव्हल च्या ‘श्रीं’ ची विधिवत स्थापना
पुणे- पुणे फेस्टिव्हल च्या २७व्या वर्षी आज सकाळी फेस्टिव्हल चे अध्यक्ष आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते पुणे फेस्तीव्हालच्या गणराजाची विधिवत प्रतिस्थापना करण्यात आली . यावेळी डॉ. सतीश देसाई , अभिनेत्री दिपाली सय्यद तसेच पी ए इनामदार , आबेदा इनामदार , सुनंदा गदाळे, काका धर्मावत , रवींद्र दुर्वे , बाळासाहेब अम राळे ,कृष्णकांत कुदळे, सुहास रानवडे प्रसन्न जगताप आदी मान्यवर उपस्थित होते
27 व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 18) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याची संपूर्ण रंगीत तालीम आज (दि. 17) दुपारी तीनपासून गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सुरू होत आहे. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, मुख्य संयोजक कृष्कांत कुदळे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ. सतिश देसाई आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी लावणी आणि भांगडाचे फ्युजन, श्री गणेश वंदना, जय मल्हार आणि गोंधळ असा धार्मिक कार्यक्रम, मल्लखांब आणि योगाची प्रत्याक्षिके तसेच लोकमान्य टिळक आणि त्यांच्य सहकार्यांनी केलेली गणेशपूजा यांचा रंगीत तालमीत समावेश असणार आहे. याचे सूत्रसंचालन मराठीमधून सुधीर गाडगीळ करणार आहेत.
तसेच या फेस्टिव्हलमध्ये सलग 10 दिवस सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रम होणार आहेत. पुणे फेस्टिव्हलच्या पूर्व तयारीवर दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने कर्टन रेझर टीव्ही रिपोर्ट हा कार्यक्रम तयार केला असून याचे प्रक्षेपण आज (गुरुवार) रात्री साडेदहा वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. यामध्ये कार्यक्रमाची पूर्वतयारी, रंगीत तालीम, निमंत्रणे वाटप याबरोबर सर्व कार्यक्रमांची माहितीचा समावेश आहे. तसेच यामध्ये सुरेश कलमाडी आणि कृष्णकांत कुदळे यांच्या निवडक मुलाखतींचाही समावेश आहे.
अभिजित खांडकेकर -माधुरी दीक्षित यांनी केली गणेशाची प्रतिष्ठापना
अभिनेता अभिजित खांडकेकर आणि ख्यातनाम अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी आपापल्या घरी श्री गणेशाची अगदी साधेपणाने पण भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली
महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या घरी गणराजाची विधिवत प्रतिष्ठापना केली आणि पुण्यातील नृत्य महर्षी पं डॉ. नंदकिशोर कपोते यांनी आपल्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना केली

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी फेसबुक वरून गणेश उत्सवाच्या शुभेछ्या दिल्या, मुंबईत आज लालबागच्या राजाचं मास्टर बाल्स्टर सचिन तेंडूलकरनं सहकुटुंब दर्शन घेतलं.सचिन, त्याची पत्नी आणि त्यांची दोन्ही मुलं लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाली. तेंडुलकर कुटुंबियांनी मनोभावे लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणेशाची मूर्ती नेतांना …… राज्यातील दुष्काळाशी लढण्याचे सामर्थ्य विघ्नहर्ता गणराया सर्वाना देवो हिच प्रार्थना…राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या घरी झाली गणेशाची प्रतिष्ठापना…
मोरयाच्या जयघोषात बाप्पांची एन्ट्री…
पहाट उगवली….लगबग झाली…..निरंजनाचे ताट घेवुन हाती…..आरती सजली….मंगलमय …..जल्लोश झाला…..ढोलताशाच्या गजरात , मोरयाच्या जयघोषात बाप्पांची एन्ट्री… घरोघरी झाली ……!
विघ्नहर्त्या गणरायाचे शहर आणि उपनगरातून तसेच राज्यभर मंगलमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरातील आबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतले होते. आजपासून या आनंद सोहळ्याला सुरुवात झाली सकाळी डोक्याला टोपी तर कोणी गणपती बाप्पा मोरयाची फीत बांधून, रेशमी वस्त्र घेऊन गणेशाला आणायला सुरुवात केली.







तर गणेश मंडळाचे मोठे गणपती रस्त्यावरून वाजत गाजत मंडळाच्या दिशेनं निघाली आहेत. यावेळी लहानग्यांचा उत्साह टिपेला पोहोचला होता. फटाक्यांच्या आतीषबाजीने आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाने वातावरण भारले होते. रस्त्यावर गटागटाने लोक मूर्ती आणण्यासाठी जात होते. येतांना एकत्रितपणे वाजत-गाजत मूर्ती आणत होते.
कोकणातही मोठ्या जल्लोषात गणेशाचे आगमन झाले . अगदी सकाळ पासूनच कोकणातील गावागावत गणेश मूर्तीच्या मिरवणुकां काढण्यात आल्या . कोकणात अत्यंत पारंपरिक पद्धतीने डोक्यावरून गणेश मूर्तीचं आगमनझालंआहे. दहा दिवस संपूर्ण कोकणात घराघरात हा जल्लोष पहायला मिळेल. तर सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्येही मोठ्या जल्लोषात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे.सिंधुदुर्गातली डोक्यावरुन गणपती आणण्याची परंपरा आजही जोपासली जाते. तर गेल्या दोन-तीन दिवसात बाप्पाच्या आगमनासाठी लाखोंच्या संख्येत चाकऱमानी कोकणात दाखल झाले आहेत. त्यामुळं कोकणात प्रत्येक घराला देखाव्याचं स्वरुप आलं आहे.
गणरायाचे आगमन नागपूरकरांना सुखावणारे ठरले आहे. कारण 20 दिवसांच्या खंडानंतर आज सकाळपासूनच नागपुरात संततधार पाऊस सुरु झाला . त्यामुळे वातावरण आनंददायी बनले . या पावसाचा गणपतीच्या आगमनावर काहीसा परिणाम झालेला पहायला मिळाला. आज सकाळी बाप्पाची मूर्ति आणायला गेलेल्या भविकांना काहीसा त्रास ही सहन करावा लागत आहे. छत्र्या आणि प्लॅस्टिक पिशव्यांच्या सहाय्याने गणपतींच्या मुर्तींना घरी आणावे लागले .
मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध- मुख्यमंत्री फडणवीस
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज येथील सिद्धार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभाजवळ आयोजित मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सर्वश्री संजय सिरसाट, अतुल सावे, सुभाष झांबड, भाऊसाहेब चिकटगावकर, नारायण कुचे, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी, विविध स्वातंत्र्यसैनिक, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत चौधरी, महापालिका आयुक्त डॉ. प्रकाश महाजन, जिल्हा पोलीस अधिक्षक नवीनचंद्र रेड्डी आदी उपस्थित होते.
ध्वजारोहणापुर्वी मुख्यमंत्री फडणवीस, विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्यासह विविध मान्यवरांनी सिद्धार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी पोलीस दलातील जवानांनी हवेत तीन फैरी झाडून मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना शुभेच्छा देत मुख्यमंत्री म्हणाले की, आजचा दिवस हुतात्म्यांच्या बलीदानाचे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा आहे. स्वातंत्र्य हे खडतर संघर्षातून मिळाले आहे याची आठवण आपल्याला आणि नवीन पिढीला करुन देण्याचा हा प्रसंग आहे. ज्यांना इतिहासाचा विसर पडतो त्यांना वर्तमानकाळ असतो मात्र भविष्यकाळ नसतो असे उद्गार काढत मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खंबीर नेतृत्वाचा आदरपूर्वक उल्लेख केला आणि या मुक्ती संग्रामाचे स्वातंत्र्य लढ्यातील महत्व तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेत मराठवाड्याची महत्वपूर्ण भूमिका या बाबी नमूद केल्या.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, गेली तीन वर्ष मराठवाडा विभाग दुष्काळाला तोंड देत आहे. यंदा या भागातील परिस्थितीची दाहकता आपण दौरा करुन अनुभवली आहे. या परिस्थितीवर शासनाने उपाय योजले आहेत. पिण्यासाठी पाणी पुरविले जात आहे. चारा टंचाई असलेल्या भागात गुरांसाठी छावण्या उभारण्यात आल्या आहेत. रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. शेतकऱ्यांसाठी विनाअट अन्न सुरक्षा योजना राबविली जात असून या योजनेत माफक दरात अन्नधान्य उपलब्ध करुन दिले जात आहे. मात्र मराठवाड्यातील दुष्काळाचे कायम स्वरुपी निर्मुलन आवश्यक असून दुष्काळाविरुद्ध निर्णायक लढा देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पाण्याचे विकेंद्रीत साठे विकसीत करणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून हे काम करणे शक्य आहे. गेल्या आठ- पंधरा दिवसात जेथे पाऊस झाला तेथे जलयुक्त शिवार योजनेचे यश समोर आलेले आहे. या विभागात या योजनेत जास्तीत जास्त कामे हाती घेणे आणि शेत तेथे शेततळे उभारण्याचा कार्यक्रम राबविणे हाच शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रभावी मार्ग आहे. त्यासाठी सरकार निधी उपलब्ध करुन देईल. निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.
मराठवाड्यातील सामान्य माणसापर्यंत विकासाची प्रक्रिया पोहचणे आवश्यक आहे, अशा आशयाचे उद्गार काढून मुख्यमंत्री म्हणाले की, या भागातील प्रश्न मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी औरंगाबादेत राज्य मंत्री मंडळाची बैठक घेतली जाणार आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचे चित्र मांडणाऱ्या स्मृती संग्रालयाच्या उभारणीचे त्यांनी कौतुक केले. या संदर्भातील प्रयत्नांबाबत त्यांनी पालकमंत्री रामदास कदम यांना धन्यवाद दिले.
या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिकांची भेट घेऊन त्यांना मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हार्दिक शुभेच्छा
मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्र संस्कृतीचा एक आगळावेगळा चैतन्यस्त्रोत आहे. समाजमन प्रेरित करण्याची अभूतपूर्व क्षमता असणाऱ्या या उत्सवाच्या माध्यमातून राज्यात सकारात्मक परिवर्तनासाठी प्रयत्न व्हावेत, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेस शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, राज्याला सार्वजनिक गणेशोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी समाज संघटित करण्याच्या उदात्त हेतूने लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यास प्रारंभ केला. देशास राजकीय स्वातंत्र्य मिळाले असले तरी सामाजिक-सांस्कृतिक प्रबोधनासाठीचा संघर्ष आजही सुरुच आहे. त्यासाठी गणेशोत्सव अतिशय प्रभावी असे माध्यम आहे. त्यादृष्टीने राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रबोधनपर जाणिवा रुजविण्यासाठी या उत्सवाच्या माध्यमातून डोळस प्रयत्न करावेत. त्यासोबतच सामाजिक सलोखा व सांस्कृतिक मूल्यांच्या जोपासनेसह पर्यावरण संवर्धनासाठीही जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
पर्यावरण दिनविशेष पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : ‘एक पाऊल पर्यावरणासाठी, आपल्याच जीवनासाठी’ या संकल्पनेतून वन विभागाच्या वतीने तयार केलेल्या ‘पर्यावरण दिनविशेष’ या पुस्तकाचे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
सह्याद्री अतिथीगृह येथे या पुस्तक प्रकाशनाप्रसंगी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, वन विभागाचे सचिव विकास खारगे उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनासाठी जगभर साजरा केल्या जाणाऱ्या विविध विशेष दिनांची माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. शासनाने नुकतेच पर्यावरणाचे राजदूत जाहीर केले आहेत, त्यामध्ये राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरोळी, राज्य फळ आंबा, राज्य फूल जारूळ आणि राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन यांचा समावेश आहे. या पुस्तकामध्ये या पर्यावरणदूतांबाबत माहितीही देण्यात आली आहे. या पुस्तकामध्ये जागतिक पातळीवर साजरा होणाऱ्या दिन विशेषांची माहिती दिली असून पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करु शकतो, याचीही माहिती देण्यात आली आहे.
सफाई कामगारांच्या नियुक्तीमध्ये वारसा पद्धत कायम ठेवण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय
लाड समितीच्या शिफारशी 40 वर्षांपूर्वी लागू केल्या असल्या तरी सद्य:स्थितीत त्या कायम ठेवणे आवश्यक होते. त्यानुसार याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 26 फेब्रुवारी 2014 च्या परिपत्रकान्वये घेतलेली भूमिका यापुढेही कायम ठेवण्यात आली आहे. सफाई कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या किंवा सेवेत असताना निधन झालेल्या अनुसूचित जातीमधील इतर कर्मचाऱ्यांच्या वारस किंवा नातेवाईकास या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
सफाई कामगार आणि अस्वच्छ व्यवसायातील कामगारांच्या काम व सेवाबाबत श्री. लाड यांच्या अध्यक्षतेखाली 20 जून 1972 रोजी समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशी स्वीकारून त्यानुसार त्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यासह विविध उपाययोजना करुनही समाजातील अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन होऊ शकले नाही. त्यामुळे अस्पृश्यता निर्मुलनार्थ उपाययोजना सूचविण्यासाठी वि.स.पागे यांच्या अध्यक्षतेखाली 9 फेब्रुवारी 1973 मध्ये समिती नेमण्यात आली होती. या समितीने सखोल अभ्यास करून केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी शासनाने 1979 मध्ये निर्णय घेतला.
उच्च न्यायालयात 2014 मध्ये दाखल झालेल्या एका याचिकेनुसार लाड व पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने होत असलेल्या सफाई कामगारांच्या नियुक्तीबाबत आक्षेप नोंदविण्यात आला होता. ही याचिका न्यायालयाने निकाली काढली होती. मात्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले बेरोजगार सफाई कामगारांच्या पदासाठी स्पर्धेत असताना 40 वर्षांपूर्वी सफाई कामगारांच्या मागण्यासाठी करण्यात आलेल्या वारसा हक्क पद्धतीबाबतच्या लाड समितीच्या शिफारशी पुढे सुरु ठेवण्याबाबत पुनर्विचार करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य शासनास दिले होते. यासंदर्भात लाड समितीच्या शिफारशी जरी 40 वर्षांपूर्वी लागू केल्या असल्या तरी सद्यस्थितीत या शिफारशीची अंमलबजावणी कायम ठेवणे आवश्यक असल्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे.
राज्याच्या गतिमान विकासाच्या दृष्टीने विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प यापुढे एमएसआरडीसीच्याच माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. सध्या पुणे रिंग रोड, मुंबई-पुणे एक्सप्रेस रस्त्याची दर्जावाढ, मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस हायवे आदी बाबी नव्याने हाती घ्यावयाच्या असल्यामुळे मुख्य अभियंता पदाची दर्जावाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या आस्थापनेवर सध्या सहव्यवस्थापकीय संचालक (तांत्रिक), सहव्यवस्थापकीय संचालक (प्रशासनिक सेवा) अशी सचिव दर्जाची दोन पदे आहेत. महामंडळाकडील कामाचा व्याप पाहता येथे तांत्रिक दर्जाच्या आणखी एका व्यवस्थापकीय पदाची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन सचिव दर्जाच्या सहव्यवस्थापकीय संचालकाची नियुक्ती तांत्रिक अधिकाऱ्यांमधून करण्यात येणार आहे.
या महामंडळाची 1996 मध्ये स्थापना झाल्यापासून मुंबईतील 55 उड्डाणपूल, वांद्रे-वरळी सागरी सेतू, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. राज्याच्या विकासाला पूरक ठरणाऱ्या नागपूर-मुंबई कंट्रोल ॲक्सेस दर्जाच्या द्रुतगती मार्गाचा प्रस्ताव सध्या एमएसआरडीसी तयार करणार आहे. त्यासोबतच ठाणे-घोडबंदर उन्नत मार्ग, कल्याण-भिवंडी मार्ग आदी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. ही कामे जलदगतीने आणि निश्चित कालावधीत पूर्ण होण्यासाठी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहव्यवस्थापकीय संचालक या पदामुळे मदत होणार आहे.
पाऊस/पीक-पाणी
राज्यात सरासरीच्या 58टक्के पाऊस; 49 टक्के पाणीसाठा
राज्यात सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार जिल्ह्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे- अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या चार जिल्ह्यात 76 ते 100 टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या 22 जिल्ह्यांमध्ये 51 ते 75 टक्के पावसाची नोंद झाली असून नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, यवतमाळ या 8 जिल्ह्यात 26 ते 50 टक्के पाऊस पडला आहे.
राज्यातील 355 तालुक्यांपैकी फक्त एका तालुक्यात सरासरीच्या तुलनेत 0 ते 25 टक्के, 88 तालुक्यात 26 ते 50 टक्के, 180 तालुक्यात 51 ते 75 टक्के, 68 तालुक्यात 76 ते 100 टक्के आणि 18 तालुक्यात तर 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
भात पीक फुटवे फुटणे ते पोटरीच्या अवस्थेत आहे. खरीप ज्वारी पीक पोटरी ते फुलोरा अवस्थेत, बाजरी पीक दाणे भरणे ते दाणे पक्वतेच्या अवस्थेत तर काही ठिकाणी काढणीस सुरुवात झाली आहे. मका पीक वाढीच्या ते फुलोरा अवस्थेत आहे. तूर पीक वाढीच्या अवस्थेत, उडिद व मूग पिके शेंगा भरणे ते शेंगा पक्वतेच्या अवस्थेत तर काही ठिकाणी काढणीस सुरुवात झाली आहे. कापूस पीक पाते, फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पीक शेंगा धरणे ते पक्वतेच्या अवस्थेत आहे. राज्यातील बहुतांश भागात कमी पर्जन्यमानामुळे पिकांची वाढ असमाधानकारक असून पिकांच्या पुढील वाढीसाठी पुरेशा पावसाची नितांत आवश्यकता आहे.
मराठवाडा- 8 टक्के (43), कोकण-87 टक्के (93), नागपूर-75 टक्के (79), अमरावती-62 टक्के (74), नाशिक-44टक्के (77) आणि पुणे-49 टक्के (91), इतर धरणे- 71 टक्के (97) असा पाणीसाठा आहे.
मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
संपूर्ण देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरीही मराठवाड्यासह जुन्या हैदराबाद संस्थानातील लोकांना स्वातंत्र्यासाठी त्यानंतरही तब्बल 13 महीने 2 दिवस वाट पहावी लागली होती. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस जुन्या हैद्राबाद संस्थानाचा भाग असलेल्या व आता महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्यात समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील लोकांकरीता महत्त्वपूर्ण दिवस आहे. हैद्राबाद मुक्ती लढ्यात अनेक देशभक्त लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मराठवाड्यातील अनेक लोकांनी या लढ्याचे नेतृत्व केले होते. मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहतो तसेच जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी संदेशात म्हटले आहे.
‘स्वानंदलोका’त विराजमान होणार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणराज ..
प.पुज्य.श्री. विजयकाका पोफळी महाराज (वाशीम) यांच्या हस्ते वेगळ्याउत्सव मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना विधीपूर्वक होणार आहे.
गुरुवार दि.१७ सप्टेंबर २०१५ वेळ :- सायं. ७.०० वाजताविद्युत रोषणाईचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे.दगडूशेठ हलवाई गणेशाची मूर्ती ज्या स्वानंदलोकात विराजमान होणार आहे, त्या देखाव्याची उंची ९० फूट आहे. सातमजली सजावट असून असंख्य कळसांची जोड देण्यात आली आहे. विविध रंगांमध्ये सव्वा लाख दिव्यांच्या लखलखाटात श्रींची मूर्ती उजळून निघणार आहे.












