Home Blog Page 3556

शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे महत्त्वाचे काम- देवेंद्र भुजबळ

0

TNAIMAGE10971pune

पुणे : शासनाची ध्येयधोरणे, कार्यक्रम, योजना जनतेपर्यंत पोहोचवून सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम आपले आहे, ही बाब लक्षात घेवून सक्षमपणे काम करावे, अशी सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (प्रशासन) देवेंद्र भुजबळ यांनी केली.

संचालक श्री. भुजबळ यांनी येथील विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांना शुक्रवारी अचानक भेट दिली. याप्रसंगी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. उपसंचालक (माहिती) यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र राऊत, सहायक संचालक (माहिती) गो.धों. जगधने यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

माध्यम स्पर्धेच्या कालखंडात माहिती विभागाला अधिक सक्षम व गतीने काम करण्याची आवश्यकता नमुद करून श्री. भुजबळ म्हणाले, संचालनालयातील प्रत्येक घटक अत्यंत महत्त्वाचा असून टीमवर्कने काम करून एक सर्वोत्तम प्रतिमा निर्माण करण्याचे काम करा.

याप्रसंगी श्री. भुजबळ यांनी सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. कार्यालयाचे नुतनीकरण, स्वच्छता व कार्यालयातील संसाधनांची गरज याचाही त्यांनी आढावा घेवून महत्वपूर्ण सूचना केल्या. या भेटीत त्यांनी कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय व माहिती केंद्रासही भेट दिली. प्रारंभी श्री. भंडारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले

मुंबईत बँक ऑफ चायनाच्या शाखा स्थापनेसाठी संपूर्ण सहकार्य करणार – मुख्यमंत्री

0

बँक ऑफ चायनाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्याचे आश्वासन

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये बँक ऑफ चायनाची पहिली भारतीय शाखा सुरू झाल्यास भारत आणि चीन या देशांचे आर्थिक आणि औद्योगिक संबंध वृद्धिंगत होतील. त्यामुळे बँकेच्या स्थापनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँक ऑफ चायनाच्या शिष्टमंडळाला दिले.

बँक ऑफ चायना ही चीनमधील अग्रेसर बँक आहे. या बँकेच्या पर्यवेक्षकीय बोर्डचे संचालक ली जून यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्याची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलिक आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बँक ऑफ चायनाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना चीन भेटीचे निमंत्रणही दिले.

मेक इन महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासह नुकताच चीनचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान झालेल्या चर्चेनुसार बँक ऑफ चायना ही मुंबईमध्ये आपली शाखा सुरू करीत आहे. मुंबईसह राज्यात विविध चिनी उद्योग समुहांनी गुंतवणूक करण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या राज्यातील शाखेमुळे भारत-चीन आर्थिक संबंधांना अधिक चालना मिळणार आहे.

22 अक्टूबर को रिलीज होगी’शानदार ‘

0

 

शाहिद कपूर और आलिया भट्ट की आने वाली फिल्म ‘शानदार’ का ट्रेलर इस साल का सबसे अधिक बार देखा गया ट्रेलर है । साल की सबसे बड़ी हिट फिल्में बजरंगी भाईजान और बाहुबली को पीछे  छोड़ते हुए शानदार के ट्रेलर  को तक़रीबन  8 लाख से ज्यादा लोगो ने देखा है। ट्रेलर १२ अगस्त को लांच हुआ था।

शाहिद शानदार में एक वेडिंग प्लानर बने हैं जो आलिया की बहन की शादी की जिम्मेदारी संभाल रहे हैं। उनके पिता पंकज कपूर ने इसमें आलिया के पिता का किरदार अदा किया है। साथ ही आलिया की बहन के किरदार में शाहिद की बहन सनाह कपूर इस फिल्म से अपनी पारी की शुरुआत करने जा रही हैं।

फिल्म का ट्रेलर काफी दिलचस्प है और लोगों को बेहद पसंद भी आ रहा है। ट्रेलर में एक झलक आलिया का एक ज़बरदस्त बिकिनी शॉट भी है। शाहिद और आलिया कि फ्रेश जोड़ी को भी काफी तारीफ मिल रही है। इस फिल्म का निर्देशन ‘क्वीन’ के निर्देशक विकास बहल ने किया है। यह फिल्म 22 अक्टूबर को रिलीज होगी।

स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांचा सहभाग हवा -अनिल पवार ; एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट विद्यार्थ्यांचा स्मार्ट सिटीत सहभाग

0

पुणे –           स्मार्ट  सिटी अभियाना अंतर्गत नागरिकांच्या सहभागाकरिता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तळागाळापर्यंतच्या सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत जाऊन स्मार्ट सिटी अभियानाबाबत माहिती सांगून शहराच्या विकासाच्या दृष्टीने नागरिकांची मते जाणून घेण्याकरिता व फॉर्म भरुन घेण्याकरिता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग अतिशय महत्वाचा असल्याचे प्रतिपादन  उपायुक्त (विशेष) अनिल पवार यांनी केले.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे शहरातील सुमारे ६८ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत सहभागी विद्यार्थी आज कार्यशाळेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी अनिल पवार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत नागरिकांपर्यंत जाऊन विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती देणे तसेच नागरिकांकडून फॉर्म भरुन घेणे याबाबतील त्यांनी सविस्तर माहिती सांगितली. तसेच विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंका, विविध प्रश्नासंदर्भातही त्यांनी सविस्तर माहिती सांगितली.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मधील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख श्री. संजयकुमार दळवी, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाचे प्रा. संदीप राऊत, जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. शिवाजी पाचारणे व अन्य अधिकारी उपस्थित होते. तसेच विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी संजय गायकवाड, विनोद क्षिरसागर, जगदीश खानोरे, मंगेश दिघे, प्रदीप आव्हाड व अन्य अधिकारी उपस्थित होते.

तसेच सहकारनगर परिसरातील राजीव गांधी अ‍ॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग या शाळेतील नाट्यगृहात मनपा तसेच खाजगी शाळांचे मुख्याध्यापकांकरिता स्मार्ट सिटी अभियानाबाबत माहिती देणेकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अनिल पवार, उपायुक्त (वि) यांनी स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत सविस्तर माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी केले.

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट विद्यार्थ्यांचा स्मार्ट सिटीत सहभाग

 

कोथरुड येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुणे महापालिकेस भेट देऊन स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत माहिती घेतली.

पुणे महानगरपालिकेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या बैठकी प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) मा. ओमप्रकाश बकोरिया यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच महापालिकेतील विविध विभागांच्या कामकाजा संदर्भात तसेच शहरातील विविध प्रकल्प, विकास योजना व स्मार्ट सिटी अभियाना संदर्भात माहिती सांगितली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी घनकचरा व्यवस्थापन संदर्भात सविस्तर माहिती सांगितली.

स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी  बैठकीप्रसंगी आपले फॉर्म्स भरले व या अभिनव योजनेत सहभागी होण्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी मनपातील भाजप सभासद मा. अशोक येनपुरे तसेच एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट मधील प्रा. मनीष केळकर, प्रा. गिरीजा लगड व अन्य अधिकारी उपस्थित होते.

अभिनेत्री निशा परुळेकर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेछ्या…

0

अभिनेत्री निशा परुळेकर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेछ्या…

दीपक बिडकर यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते आणि सोशल मिडिया प्रमुख पदावर नियुक्ती

0
पुणे :
राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदावर दीपक बिडकर यांची फेर निवड करण्यात आली असून पक्षाच्या सोशल मिडिया प्रमुख पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे .
राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पुण्यात मेरीयट हॉटेल येथे झाली . या बैठकीत पक्षाध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी ही घोषणा केली .
प्रदेश प्रवक्ते पदाच्या  नियुक्तीचे पत्र प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कोकरे आणि सयाजी पाटील यांनी आज दीपक बिडकर यांना दिले . पत्रकारितेचा २० वर्षांचा अनुभव असलेले दीपक बिडकर हे  पुण्यातील ‘प्रबोधन माध्यम ‘ या न्यूज एजेन्सी चे १२ वर्षांपासून संचालक आहेत . पुण्यातील पत्रकारिता ,जनसंपर्क ,सामाजिक ,पर्यावरण क्षेत्रात त्यांचे योगदान आहे .
सामाजिक कृतज्ञता पुरस्कार ,सेव्ह पुणे हिल्स इनीशिएटिव्ह(पर्यावरण संवर्धन  ) ,सेव्ह पुणे इनीशिएटिव्ह (नागरी प्रश्न ), ‘सर्व धर्मीय दिवाळी ‘ , गटारी अमावास्येला ‘सामुहिक दीप पूजन करून व्यसन मुक्तीची शपथ ‘ ,’प्रबोधन पाहुणचार ‘,’नगरसेवक कार्य अहवाल स्पर्धा ‘,  रंगभूमीवरील back स्टेज आर्टिस्ट साठी निधी संकलन ,दुष्काळ ग्रस्तांना मदत  हे त्यांचे उपक्रम लोकप्रिय ठरले आहेत .
रासप मध्ये एक वर्षापूर्वी प्रवेश केल्यानंतर त्यांनी पक्षाची धेय्य धोरणे वाहिन्यांवर ,माध्यमातून मांडणे ,प्रसिद्धी ,प्रशिक्षण शिबिरे या योगदानासह ‘ ‘रासप समाचार ‘ या ऑनलाईन मुख पत्राची स्थापना केली . दर शनिवारी प्रसिद्ध होणारे हे ऑन लाईन साप्ताहिक कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत प्रिय ठरले आहे . दीपक बिडकर संस्थापक संपादक असलेल्या ३६ आठवडे   सलग प्रसिद्ध होणाऱ्या या साप्ताहिकाची  वर्ष पूर्ती जवळ आली आहे
 सोशल मिडिया प्रमुख पदावर कार्य करताना दीपक बिडकर यांना संतोष कोल्हे आणि दत्ता ढाकणे यांचे सहाय्य मिळणार आहे
‘ वंचितांना न्याय आणि प्रगतीच्या संधी ,लोक कल्याणकारी राज्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट सर्वांसमोर असले पाहिजे ,त्यासाठी आपण समाजकारण करीत आहोत . ही नियुक्ती राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करीत असून पक्षाचे संस्थापक आमदार श्री महादेव जानकर यांचे विनम्र आभार मानत आहोत ‘ असे दीपक बिडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले

जॅकी श्रॉफ,प्रेम चोप्रा , अजय अतुल .. पुणे फेस्टिव्हल मध्ये पुरस्काराने सन्मानित …

0

ajay atul bindu p2 p3

पुणे- आज पुणे फेस्टिव्हल चे शानदार उद्घाटन झाल्यानंतर जॅकी श्रॉफ,प्रेम चोप्रा , अजय अतुल आदी मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

पुणे फेस्टिव्हल जीवन गौरव पुरस्कार अभिनेते शशी कपूर आणि प्रेम चोप्रा यांना तर  पुणे फेस्टिव्हल पुरस्कार जॅकी श्रॉफ , अजय अतुल ,आणि दो उमा नटराजन यांनाप्रदान करण्यात आला . अभिनेत्री बिंदू हेमामालिनी यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला

पालकमंत्री गिरीश बापट , मंत्री दिलीप कांबळे , उद्योगपती राहुल बजाज , माजी खासदार आणि पुणे फेस्टिव्हल चे अध्यक्ष सुरेश कलमाडी , माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , अभिनेत्री पूनम धिल्लन , अभिनेता शेखर सुमन तसेच कृष्णप्रकाश गोयल ,डॉ. सतीश देसाई , कृष्णकांत कुदळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

s1 s2 s3s4

पुणे फेस्टिव्हल चे शानदार उद्घाटन … स्टार कलाकारांची मांदियाळी

0

f hema hema1 hema2 hema3 resham

1 2 3 unnamed unnamed1 unnamed2

पुणे- बॉलीवूड मधील स्टार कलाकारांची मांदियाळीत संगीत, नृत्य, नाट्य, कला, वादन, गायन, क्रीडा व संस्कृती यांचा

मनोहारी संगम असलेल्या २७ व्या पुणे फेस्टिवलचे शुक्रवारी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शानदार

उद्घाटन झाले. पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात पुणे फेस्टिवलचे मोठे योगदान आहे असे गौरोद्गार गिरीश बापट यांनी यावेळी

काढले.
२७ व्या पुणे फेस्टिवलचे उद्घाटन श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाले त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गिरीशबापट बोलत होते. पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे,जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उद्योगपती राहुल बजाज, पुणे फेस्टिवलचेमुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे,  उपमहापौर आबा बागुल, , महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपराग जैन नानुटीया, म्हैसूरचे महाराजा यदुवीर वडीयार, पुणे फेस्टिवलच्या पेट्रन हेमामालिनी व अभिनेत्री खासदारहेमा मालिनी, जेष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा, अभिनेते जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, शेखर  सुमन, कुणाल कपूर, अभिनेत्री बिंदू,अभिनेत्री पूनम धिल्लन, संगीतकार अजय-अतुल, डॉ उमा गणेश नटराजन, डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूटच्या अबिदाइनामदार,महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष  पी. ए. इनामदार, पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष सुभाषसणस, डॉ. सतीश देसाई  आदी यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी महारष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ मदतनिधीला पुणे फेस्टिवलतर्फे पाच लाख रुपयांचा धनादेश सुरेश कलमाडी यांनी गिरीश बापट यांच्याकडे सुपूर्द केला.

जेष्ठ अभिनेते शशी कपूर आणि प्रेम चोप्रा यांना यंदाच्या पुणे फेस्टिवल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यातआले. शशी कपूर यांच्या वतीने त्यांचे पुत्र अभिनेते कुणाल कपूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच संगीतकार अजय-अतुल, डॉ. उमा गणेश नटराजन, अभिनेते जॅकी श्रॉफ, अभिनेत्री बिंदू, अभिनेत्री पूनम धिल्लन डॉ. उमा गणेश नटराजन’डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष अबिदा इनामदार,यांना पुणे फेस्टिवल अॅवार्डने सन्मानित करण्यात आले. तरअभिनेत्री हेमा मालिनी यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.पुणे फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्याला तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने प्रारंभ झाला. मंचावरील श्री गणेशाचीआरती करण्यात आली.  नृत्यगुरु डॉ. सुचित्रा भिडे चाफेकर यांची संकल्पना, नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांचे नृत्यदिग्दर्शन आणि कालावर्धिनी संकुलाच्या शिष्यांनी गणेशवंदना सादर केली.त्यानंतर २७ वर्षांपैकी २५ वर्षे गणेश वंदना वविविध बॅले सदर करणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी यांनी नाट्यविहार कालाकेंद्राच्या कलाकारांच्या समवेत नेत्रदीपकश्रीकृष्ण वंदना सादर केली. त्यानंतर कोरिओग्राफर निकिता मोघे दिग्दर्शित व  नेहा पेंडसे, सौरभ गोखले, दिपाली सय्यद,शर्वरी जमेनीस, रेशम टिपणीस, पुष्कर जोग या चित्रपट, नाट्य कलावंत यांच्यासह इंद्रधनुच्या ४० कलाकारांचा सहभागअसलेल्या महाराष्ट्र रांगडा व पंजाबी भांगडा या लावणी व भांगडा यांचा फ्युजन असलेल्या कार्यक्रमाने प्रेक्षकांनी रंगमंचडोक्यावर घेतले. त्यानंतर महाराष्ट्र मंडळाच्या १५ विद्यार्थ्यांनी योग आणि २५ विद्यार्थ्यांनी मल्लखांबाची नेत्रदीपकप्रात्यक्षिके सादर करून उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कोरिओग्राफर तेजश्री आडीगे यांनी दिग्दर्शित केलेलाजयमल्हार आणि गोंधळ आदिशक्तीचा हा खंडोबा व आंबामातेचे जागरण करणारा कार्यक्रम सादर केला. त्यामध्येअभिनेता आदिनाथ, श्रुतिका मराठे , प्राजक्ता माळी आणि पुण्यकर उपाध्याय व इतर सहकारी कलाकारांनी सहभागघेतला. लोकमान्य टिळकांचे पात्र सादर करणारे श्री कुलकर्णी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत श्री गणेशाचे दर्शन घेतले.

गिरीश बापट म्हणाले, लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव स्वराज्यासाठी सुरु केला होता. आतासुराज्य होण्यासाठी पुणे फेस्टिवल सारख्या फेस्टिवलची आवश्यकता आहे. पुणे फेस्टिवल हा कार्यक्रम राजकीय नाही तरसांस्कृतिक आहे असे सांगून बापट म्हाणाले, राजकारणापलीकडे जावून अशाप्रकारच्या सांस्कृतिक कार्याकारामांना मदतकरणे क्रमप्राप्त आहे. अशा प्रकारच्या चांगल्या उपक्रमांना आपले नेहेमी सहकार्य राहील असे आश्वासनही त्यांनी दिले.पुणे फेस्टिवल जीवनगौरव पुरस्काराविषयी मनोगत व्यक्त करताना प्रेम चोप्रा म्हणाली, फेस्टिवलमध्ये सादर झालेल्याविविध कार्यक्रमांमधून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे टॅलेंट बघायला मिळाले. पुरस्कार मिळाल्याने अतिशय आनंद झाला आहे.आपले नाव आपणच सांगा असे प्रेम चोप्रा यांना सांगण्यात आले. त्यांच्या संवाद फेकीच्या विशिष्ट शैलीत त्यांनी ‘प्रेम नामहै मेरा.. प्रेम चोप्रा’ असे वाक्य उच्चारताच प्रेक्षकांनी शिट्या वाजवून रंगमंच दणाणून सोडला.

जॅकी श्रॉफ यांनीही त्यांच्या नेहेमीच्या शैलीत प्रेक्षकांशी संवाद साधला. पुण्यात आल्यानंतर अजुनही जुन्या मित्रांकडेजातो. वडापाव, मेतकुट भात खातो असे सांगत आपल्याला जमिनीवरच राहायला आवडते असे सांगितले.संगीतकार अजय म्हणाले, पुणे फेस्टिवल सुरु झाला तेंव्हा आम्ही पुण्याच्या बाहेर होतो. पुणे फेस्तीवलबद्दल खूप ऐकलेहोते. त्यामध्ये सहभागी होण्याची खूप इच्छा होती. कधीही संगीत शिकलो नाही. सिनेमे बघून बघून त्यातून शिकत गेलो.ज्या लोकांकडून प्रोत्साहन  मिळाले त्यांच्यामध्ये बसण्याचा मान मिळेल असे कधीही वाटले नव्हते. अतुल यांनी खासआग्रहास्तव ‘देवा तुझ्या दारी आलो’…. हे गीत सादर केले.हेमा मालिनी म्हणाल्या, पुण्याच्या नागरिकांनी साथ दिली त्यामुळे पुणे फेस्टिवल २७ वर्षे सुरु आहे. फेस्टिवलमध्येमोठमोठ्या बॉलीवूडच्या कलाकारांना बोलावून त्यांना सन्मानित केले. अनेक कलाकारांनी या फेस्टिवल मध्ये सांस्कृतिककार्यक्रम केले. हा फेस्टिवल आम्ही असू वा नसो तो सुरु राहिला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सुरेश कलमाडी आपल्या स्वागतपर भाषणात बोलताना म्हणाले, एखादा फेस्टिवल सुरु करणे खूप सोपे असते मात्र तोसातत्याने सुरु ठेवणे ही अवघड बाब आहे. पुणे फेस्टिवलची ओळख ‘मदर ऑफ आॅल फेस्टिवल अशी झाली आहे. पुणे हाराजकीय नाही तर सांस्कृतिक मंच आहे असे त्यांनी नमूद केले. पुण्यामध्ये मेट्रो लवकरच सुरु होईल त्याचे श्रेय गिरीशबापट यांना जाते मात्र त्यासाठी आम्ही खूप अगोदर प्रयत्न केले. त्याला बापटांनी धक्का दिला असे ते म्हणाले.अभिनेते अनिल कपूर, शेखर  सुमन, हर्षवर्धन पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिली १ लाखाची मदत

0

पिंपरी प्रतिनिधी-
पिंपरी महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपल्या एक महिन्याच्या मानधनासह १ लाख रुपयाची मदत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दुष्काळग्रस्तांसाठीच्या निधीसाठी पक्षाचे संपर्कप्रमुख डॅा.अमोल कोल्हे यांच्याकडे चेकद्वारे सुपुर्द केली
आकुर्डी शिवसेना भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे ,शहरप्रमुख राहुल कलाटे ,महापालिकेतील गटनेत्या सुलभा उबाळे ,शहर संघटक नंदकुमार सातुर्डेकर ,सल्लागार भगवान वाल्हेकर ,नगरसेवक निलेश बारणे ,संपत पवार ,संगीता भोंडवे ,विमल जगताप ,अश्विनी चिंचवडे ,संगीता पवार ,विधानसभा प्रमुख योगेश बाबर ,गजानन चिंचवडे ,उपशहरप्रमुख किसन तापकीर ,शाम लांडे ,विनायक रणसुभे ,संघटक गटप्रमुख बब्रुवान गुळवे ,समन्वयक रोमी संधु उपस्थित होते शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे यांनी २१हजार ,निलेश बारणे यांनी१०हजार तर इतर नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधनाचे चेक सुपुर्द केले ।शिवसैनिक मारुती दाखले यांनीही खारीचा वाटा उचलला

रामराजेंनी केली राजाराम मंडळाच्या गणाधीशाची आरती …

0

(फोटो – सुशील राठोड )

पुणे- ज्ञानप्रबोधीनिजवळील  छत्रपती राजाराम मंडळाने यंदा तुळजापूरच्या मंदिराचा भव्य देखावा केला असून आज या मंडळाच्या गणपतीची आरती विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक  निंबाळकर यांनी केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू प्रसन्न फडणवीस तसेच मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते .

मुसळधार पावसामुळे महामार्ग अन् रेल्वे मार्गावर पाणीच पाणी; वाहतूक विस्कळीत

0

पुणे -मुसळधार पावसामुळे मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली असताना  जोरदार पावसामुळे लोणावळा कान्हेजवळ रूळाखालील १८ ते २०  मिटरपर्यंतची खडी वाहून गेल्याने पुणे-लोणावळा रेल्वे मार्ग विस्कळीत झाला आहे. यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या आणि पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे थांबवण्यात आल्या आहेत.या घटनेचा परिणाम लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर होणार आहे. आणि प्रवाशांना हाल सोसावे लागणार आहेत .
दरम्यान, प्रशासनातर्फे वाहून गेलेल्या रेल्वे रूळावर खडी टकाण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, पावसाचा जोर अधिक असल्याने या कामाला आणखी किती वेळ लागेल याबद्दल काही सांगता येणार नाही.तसेच थांबवण्यात आलेल्या रेल्वे कधी सोडण्यात येतील या बद्दल आता सांगणे शक्य नाही. अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नितीन पाटील यांनी माध्यमांना दिली
शुक्रवारी सकाळपासून पुण्यासह सर्वत्रच मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरही पाणी आले आहे.आणि तेथील वाहतूकही मंदावली आहेछोटे नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी छोटे पूलही पाण्याखाली गेले आहेत. लोणावळ्याच्या तुलनेत कामशेत, तळेगाव, देहूरोड या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसले. कान्हेफाटाजवळील स्मशानभूमीही पाण्याखाली गेली आहे.


शहर परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरणाच्या क्षेत्रात आज (शुक्रवार) सकाळी सहा सात वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. पानशेत धरण क्षेत्रात पाच तासात 66 मिलिमिटर पाऊस पडला आहे.
दरम्यान पाटबंधारे विभागाच्या वतीने दररोज सकाळी सहा वाजता धरणांचा आढावा घेतला जातो. यावेळी या धरण परिसरात शून्य अशी पावसाची नोंद झाली . परंतु त्यानंतर धरणांच्या पाणलोटात पाऊस सुरू झाला. खडकवासला येथे सकाळी 9 वाजेपर्यंत 20 मिमि पानशेत येथे 44 वरसगाव येथे 37 टेमघर येथे 27 मिमि पाऊस पडला.
दुपारी बारा वाजेपर्यंत  खडकवासला येथे 41, मिमि पानशेत येथे 66, वरसगाव येथे 64, टेमघर येथे 39 मिमि पाऊस पडला.


नाशिकमध्ये देखील  मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पिपलगावमध्ये पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पोलिसांनी गोदा घाट रिकामा करण्याचे आवाहन भाविकांना केले आहे.

 

सिंहस्थ महाकुंभ पर्वातील शेवटची शाही मिरवणूक थाटात…

0

जय श्रीराम… गोविंद बोलो, हरी गोपाल बोलोचा…जयघोष

नाशिक : बारा वर्षांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होत असलेल्या सिंहस्थ महाकुंभ पर्वातील नाशिक येथील तिसऱ्या आणि शेवटच्या शाहीस्नानासाठी सकाळी ठिक 5.45 मिनिटांनी येथील लक्ष्मीनारायण मंदिरापासून ढोलताश्यांच्या गजरात, डीजेच्या तालावर गोविंद बोलो… हरी गोपाल बोलो… जय श्रीरामाच्या जयघोषात मुसळधार पावसाच्या साक्षीने शाही मिरवणुकीने प्रारंभ झाला.

या मिरवणुकीची सुरुवात निर्मोही आखाड्याने झाली. या आखाड्यात जवळपास 70 पेक्षा अधिक चित्ररथ सहभागी झाले होते. सर्व चित्ररथ हार, फुलांच्या तोरणांनी सजविण्यात आले होते. यावेळी परदेशी साधकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शहरात सुरु असलेल्या पावसामुळे या मिरवणुकीच्यावेळी भाविकांची वर्दळ कमी असली तरी या शेवटच्या पर्वणीचे शाहीस्नान करण्यासाठी साधूसंतांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. जसजसा पावसाचा जोर कमी झाला तसतशी साधूग्राममध्ये भाविकांची गर्दी वाढू लागली. शाही मिरवणुकीच्या मार्गावर दुतर्फा भाविक मोठ्या संख्येने गर्दी करु लागले. त्यानंतर 6.30 वाजता दिगंबर आखाड्याच्या मिरवणुकीस सुरुवात झाली.

या मिरवणुकीत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत श्री ग्यानदास महाराज हे आपल्या शिष्यांसह पायी सहभागी झाले होते. या मिरवणुकीत साधू, संत व स्थानिक भाविकांनी आपल्या विविध कला कसरती सादर करुन भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

या महाकुंभ पर्वातील शेवटच्या शाहीस्नानासाठी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या निर्वाणी आखाड्याच्या मिरवणुकीस 7.15 वाजता सुरुवात झाली. या मिरवणुकीच्या अग्रभागी नाशिक शहराचे प्रथम नागरिक महापौर अशोक मुर्तडक हे भर पावसात सहभागी झाले होते. प्रत्येक आखाड्याच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने चित्ररथ सामील झाले होते.

दुसऱ्या पर्वणीच्यावेळी झालेली अफाट गर्दी लक्षात घेता पोलीस व प्रशासनातर्फे या पर्वणीच्यावेळी चोख बंदोबस्ताचे नियोजन केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता मिरवणूक सुरळीत व वेळेत पार पडण्यास मदत झाली.

भारतरत्न डॉ.एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डाक लिफाफ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

0

मुंबई : भारतरत्न डॉ.एस.एम. सुब्बुलक्ष्मी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते टपाल लिफाफ्याचे प्रकाशन करण्यात आले.
श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृह, माटुंगा येथे झालेल्या कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, सभेचे अध्यक्ष डॉ.व्ही. शंकर, मुंबई सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल ए.के. दास, आमदार कॅप्टन तामीर सॅल्वन, पद्मभूषण पी.एस. नारायणस्वामी, सभेचे विश्वस्त आर.श्रीधर आदी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ.एस.एम. सुब्बुलक्ष्मी या कर्नाटकी तसेच भारतीय संगीताकरिता प्रेरणादायी आहेत. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. संगीताद्वारे आत्मा प्रकाशमान करणारा आवाज त्यांचा होता. त्यामुळे भारतीय संगीत, संस्कृती, परंपरा जतन करण्याचे मत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या जपान दौऱ्यादरम्यानचे अनुभव यावेळी कथन केले.
यावेळी भारतरत्न एस.एम. सुब्बुलक्ष्मी शिष्यवृत्तीपात्र आर.के. रामकुमार यांना सोन्याची व्हायोलिन देऊन तर के.व्ही. प्रसाद यांना सोन्याचा तबला देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे 50 नवोदित विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे कॅन्टो.बोर्ड विभागनिर्मित गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन

0

unnamed

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे कॅन्टो.बोर्ड विभाग निर्मित गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन पुणे मनपा मनसे गटनेते बाबू वागसकर व शहर अध्यक्ष अजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेवक  बाळा शेडगे, आरती बाबर,राजू पवार, प्रशांत मते, साईनाथ बाबर , आयोजक विकास भांबुरे, लक्ष्मीकांत बुलबुले, आयुब खान आदी उपस्थितहोते.
या आरती संग्रहामध्ये गणपती,शंकर, दुर्गामाता,दत्त,विठ्ठल, हनुमान,महालक्ष्मी, हरितालिका आदी देवांच्या आरत्या , गणपती स्तोत्र,  पसायदान,गणपतीची आवडती २१ पान , फुल व अत्यावश्यक  क्रमांक याची माहिती देण्यात आली आहे.

डी. एस. कुलकर्णी फाउंडेशनतर्फे निर्माल्य संकलन – रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड आणि स्वच्छ यांचाही सहभाग

0
पुणे ता. १८ :-  डी. एस. कुलकर्णी फाउंडेशनच्यावतीने यंदाही गणेशोत्त्सव काळात ‘निर्माल्य संकलन’ उपक्रम राबविण्यात येणार असून, या उपक्रमानुसार नागरिकांकडून निर्माल्य गोळा केले जाणार आहे. त्या निर्माल्यावर प्रक्रिया  त्याचे खात नागरिकांना विनामुल्य देण्यात येणार आहे.
गणेश विसर्जनाच्यावेळी भाविकांकडून नदीमध्ये निर्माल्य टाकले जाते. त्यामुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी  सहा वर्षापासून डी. एस. कुलकर्णी  फाउंडेशन कार्यरत आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे, कोथरूड आणि स्वच्छ या संस्थाही या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे फाउंडेशनच्या विश्वस्त सौ. भाग्यश्री कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘निर्माल्य संकलन’ या उपक्रमाअंतर्गत गौरी आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी अनुक्रमे २२ आणि २७ सप्टेंबर प्रमुख घाटावर निर्माल्य संकलन केले जाणार आहे. गरवारे महाविद्यालय, ठोसरपागा, अष्टभुजा, विठ्ठल मंदिर, मातोश्री वृद्धाश्रम राजाराम पूल, बापू घाट, कमिन्स कॉलेज, पंडित फार्म्स येथे दोन जागी, बीएमसी आर्किटेक्ट कॉलेज या ठिकाणी स्वयंसेवक नेमण्यात येतील. यामध्ये एरंडवणा स्कूल, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे युनिवर्सिटी पर्यावरण विभागाचे विद्यार्थी हे स्वयंसेवक म्हणून सहभागी होणार आहेत. नागरिकांनी निर्माल्य नदीत न टाकता कागदी किंवा कापडी पिशवीत स्वयंसेवकांकडे द्यावे. ३० दिवसांनी नागरिकांना त्याचे खत मोफत देण्यात येणार असल्याचे सौ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
आपले घर स्वच्छ राहावे यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. त्याप्रमाणे  आपल्या शहरातील नदीही स्वच्छ राहावी यासाठी आमच्या या उपक्रमाला जास्तीत जास्त सहकार्य करावे अशी भावना रोटरी कल्बच्या सदस्यांनी व्यक्त केली. याशिवाय आरोग्यसंपन्न किंवा निरोगी पर्यावरणीय परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी आपलीच आहे त्यासाठी  नदी स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यादृष्टीने हा उपक्रम राबविला जात असल्याचे फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्याम भुर्के म्हणाले.  
रोटरी क्लब ऑफ पुणे, कोथरूड गेली अनेक वर्ष डी. एस. कुलकर्णी फाउंडेशन समवेत निर्माल्य संकलन मोहीम यशस्वीपणे राबवत असून, यावर्षी देखील रोटरी क्लब ऑफ पुणे, कोथरूडचे सभासद व २०० हून अधिक स्वयंसेवक यांचा सहभाग निर्माल्य संकलनामध्ये असणार आहे. असे रोटरी क्लब ऑफ पुणे, कोथरूडचे अध्यक्ष उज्ज्वल तावडे यांनी यावेळी सांगितले.
unnamed