Home Blog Page 3555

प्रलंबित प्रकरणे निकाली काढा; अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचे निर्देश

0

पुणे : अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील प्रलंबित प्रकरणे गतीने निकाली काढा, असे निर्देश अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विभागातील अधिकाऱ्यांना दिले.

श्री. बापट यांच्या उपस्थितीत पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील प्रकरणांबाबत सुनावण्या झाल्या. त्यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले. यावेळी विभागाचे उपसचिव सतीश सुपे, उपायुक्त प्रकाश कदम, पाचही जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा आणि अन्न धान्य वितरण अधिकारी उपस्थित होते. येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे या सुनावण्या झाल्या.

अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधातील अपिलांच्या सुनावण्या यापूर्वी मंत्रालयात होत असत. पण मुंबई येथे येण्या-जाण्याचा वेळ आणि खर्च वाचावा त्याचबरोबर विभागीय स्तरावरच निर्णय दिला जावा, यासाठी श्री. बापट यांनी प्रथमच विभागीय स्तरावर सुनावण्या घेण्याची पद्धत अवलंबली आहे.

यापूर्वी अमरावती, नागपूर, मुंबई येथे अशा पद्धतीने सुनावण्या घेण्यात आल्या. नागपूर येथे 72, अमरावती येथे 97 आणि मुंबई येथे सुमारे शंभरहून अधिक प्रकरणांवर सुनावण्या घेऊन निर्णय देण्यात आले आहेत, असे श्री. बापट यांनी सांगितले. नागरिकांना मुंबईत येण्यासाठीच्या वेळात बचत व्हावी आणि खर्चही होऊ नये यासाठी विभागीय स्तरावर सुनावणी घेण्यात येत आहे. प्रशासकीय कामाच्या दृष्टीकोनातून ही पद्धत अधिक प्रभावी ठरत आहे. त्याचबरोबर कामकाजातील गतिमानता आणि कार्यक्षमता वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पुण्याच्या पुरवठा अधिकारी ज्योती कदम, अन्न धान्य वितरण अधिकारी नीलिमा धायगुडे, सोलापूरचे पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण, दिनेश भालेदार, साताऱ्याचे पुरवठा अधिकारी पराग सोमण, सांगलीचे पुरवठा अधिकारी भाऊसाहेब गलांडे, कोल्हापूरचे पुरवठा अधिकारी विवेक आगवणे आदी उपस्थित होते.

अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी मुलींचे शिक्षण महत्वाचे- राज्यपाल

0

औरंगाबाद : अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे सगळ्यात प्रभावी माध्यम असून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी अल्पसंख्याक समाजातील मुलींना शिक्षणाची संधी मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.

अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात मुलींचे वसतिगृह उभारण्यात आले आहे. सुमारे 5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 175 प्रवेश क्षमतेच्या या वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे होते. यावेळी महसूल व अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथराव खडसे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिव जयश्री मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट, कुलगुरु प्रा. बी.ए. चोपडे आदी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, व्यक्तिच्या जडणघडणीत आणि सुसंस्कृत समाजाच्या उभारणीमध्ये शिक्षणाची भूमिका परिणामकारक असून ग्रामीण भागातील तसेच दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीमध्ये या समाजातील मुलींची प्रगती हा महत्वाचा टप्पा असून त्यादृष्टीने उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींना राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देणारे हे वसतिगृह आहे. अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या सक्षमीकरणाच्या दिशेने या विभागाने टाकलेले हे एक महत्वाचे पाऊल आहे. अल्पसंख्याक समाजाची सामाजिक, आर्थिक उन्नती होण्यात समाजातील सुशिक्षित मुलीं-महिलांची भूमिका महत्वाची ठरणारी आहे. त्यादृष्टीने बदलत्या काळानुसार कौशल्याधारित शिक्षण देण्यावर विशेष भर द्यावा.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि नंतर देश उभारणीसाठी अल्पसंख्याक समाजाने दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करुन राज्यपाल म्हणाले, तत्कालीन हैद्राबाद संस्थानातील जनतेने दिलेल्या लढ्यात सर्व थरातील लोक सहभागी झाले होते. राज्यपालांनी शोएब उल्लाखान यांच्या कामगिरीचा उल्लेख करुन सांगितले की, त्यांनी कोणत्याही परिणामाची चिंता न करता त्यांची भूमिका मांडली आणि त्यांना त्यांच्या भूमिकेमुळे प्राण द्यावे लागले. स्वातंत्र्य लढ्यात गणेश शंकर विद्यार्थी आणि शोएब उल्लाखान यांच्यासारख्या पत्रकारांनी बजावलेल्या कामगिरीचे स्मरण सर्वांनी विशेषत: तरुण पिढीतील पत्रकारांनी ठेवावे.

श्री. बागडे म्हणाले, शिक्षणाने जगण्याचे शहाणपण प्राप्त होत असते. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तिला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. त्यादृष्टीने ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता वृद्धिंगत करण्याकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे.

श्री. खडसे म्हणाले, अल्पसंख्याकांच्या विकासासाठी विभागामार्फत भरीव प्रयत्न केले जात असून मुलींचे शिक्षणातील प्रमाण वाढण्यासाठी त्यांना 15 हजार रुपये शिष्यवृत्ती, मोफत शिक्षणाची संधी, वसतिगृहाची सुविधा यासारख्या विविध उपयुक्त योजना राबवण्यात येत आहेत. उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना रोजगार, व्यवसाय करण्यासाठी विभागामार्फत पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या सहकार्याने उभारण्यात आलेले 175 मुलींच्या क्षमतेचे हे वसतिगृह एक स्तुत्य उपक्रम असून त्याचे रमाबाई आंबेडकर मुलींचे वसतिगृह असे नामकरण करण्यात येत असल्याचे श्री. खडसे यांनी जाहीर केले.

कार्यक्रमाला आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, अतुल सावे, इम्तियाज जलिल, जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडेय, कुलसचिव डॉ.महेन्द्र शिरसाठ यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक कुलगुरु प्रा.चोपडे यांनी केले.

शारदा-गणेश मूर्ती विशेष आकर्षण ..

0

12004898_731443200316661_7595686050141321566_n

पुण्यातील अखिल मंडई मंडळाचा भव्य विष्णु महालात विराजमान झालेला शारदा-गणेश गणपती…यातील मुर्तीची वस्त्रे दररोज बदलली जातात… मंडइ गणपती म्हणजे भाविकांचे  श्रद्धास्थान आणि खास आकर्षण असते . या अनुषंगाने मंडळाने यंदा सजावट केली आहे आणि  येथील मूर्ती चे दर्शन होताच भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटत आहे .

12042689_730577043713958_8769372974063719967_n 12046910_730576893713973_6935648312993100214_n

कात्रज येथील सातव्या दिवशी विसर्जन होणाऱ्या अखिल मोरेबाग मित्रमंडळाच्या गणाधीशाची आरती प्राध्यापक फुलचंद चाटे सर आणि प्रसिध्द वकील दिलीप जगताप यांच्या हस्ते करण्यात आली .

 

‘कपिल शर्मा’ करणार मराठी चित्रपटाची निर्मीती

0

‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ या कॉमेडी शोद्वारे जगभरात नावारूपाला आलेला कलाकार कपिल शर्मा लवकरच मराठी चित्रपटाची निर्मीती करणार आहे. त्याच्या कारकिर्दीतील पहिलाच चित्रपट ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो नुकताच पुण्यात आला होता. ‘सीजन’ मॉल येथील ‘किवा ब्रेव’ पब येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांने हि माहिती दिली. तो पुढे असे हि म्हणाला की, मी लवकरच मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असून त्या चित्रपटात अभिनय देखील करणार आहे.

unnamed

दहा वर्षांपासून मी मुंबईत राहतोय. अनेक मराठी कलाकार आणि  तंत्रज्ञ यांच्याबरोबर काम करण्याचा योग अनेक वेळा येतो. त्यांच्या बरोबर मी मला जमेल तसे मराठीत बोलतो. ‘किस  किस को प्यार करू’ या चित्रपटात माझ्या बरोबर दोन मराठी अभिनेत्री आहेत. सई लोकूर व मंजिरी फडणीस यांच्या बरोबर मी शुटींग दरम्यान मराठीत बोलायचो. सई लोकूरने मला मराठीचे धडे दिले. कपिलने  आवर्जून सांगितले की मराठी चित्रपटांचा मी चाहता आहे.

मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कार, ऑस्कर पर्येंत धडक मारली आहे. मराठी चित्रपट आशयघन असतात. मी मराठीच्या प्रेमात असल्याने लवकरच मराठी चित्रपट काढणार आहे. मराठीतले ग्रेट कॉमेडीयन दादा कोंडके मला आवडतात. मराठी लोक खूप प्रेमळ आहेत. ‘किस किस को प्यार करू’ हा माझा चित्रपट आवर्जून पहा. या चित्रपटासाठी मी आणि आमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे. जसे तुम्ही मला  छोटया पडद्यावर स्विकारले तसेच  मोठ्या पडद्यावर स्विकारावे असे त्याने आवाहन पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.

युवक कॉंग्रेसच्या वार्ड क्रंमांक ४७ मध्ये ” शासन आपल्या दारी ” हा उपक्रम

0

 पुणे  कॉंग्रेस युवक कॉंग्रेसच्या वार्ड क्रंमांक ४७ मध्ये ” शासन आपल्या दारी ” हा उपक्रम राबविण्यात आला . या उपक्रमात ३७५ नागरिकांनी सहभाग घेतला . यामध्ये नागरिकांना शिधापत्रिका , जेष्ठ नागरिकांना दाखले , अधिवास प्रमाण पत्र , पेन कार्ड , `शिधा पत्रिकेचे नूतनीकरण , नावात बदल , उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढून देण्यात आले . या उपक्रमाचे संयोजन पुणे  कॉंग्रेस युवक कॉंग्रेसचे चिटणीस विपुल यशवंत उमंदे यांनी केले होते . भवानी पेठमधील अजमेरा सोसायटी , विशाल अपार्टमेंट , वॉचमेकर चाळ , चुडामण तालीम या भागातील नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला .

  या कार्यक्रमास पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय छाजेड , माजी राज्यमंत्री रमेश बागवे , माजी आमदार मोहन जोशी , नगरसेवक अविनाश बागवे , बंडू चरण , अड. रमेश धर्मावत व युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते , नागरिक उपस्थित होते .

rsz_1logo-for-portal

आंतरराष्ट्रीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या मिसबाह शेख, ललिताकुमारी चौधरी यांना प्रथम क्रमांक

0
पुणे ः
आयडिएल कॉलेज ऑफ फार्मसी (कल्याण) आयोजित आंतरराष्ट्रीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत एमसीई सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या मिसबाह शेख, ललिताकुमारी चौधरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
त्यांना रोख तीन हजार आणि प्रशस्तिपत्र मिळाले. ‘बदलत्या आरोग्य विश्‍वातील फार्मासिस्टची भूमिका’ या विषयावर स्पर्धा झाली. त्यांना प्रा. किर्ती सपारे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, प्रा. इरफान शेख, प्राचार्य व्ही.एन. जगताप यांनी अभिनंदन केले.


rsz_1logo-for-portal

‘स्कूल ऑफ बिझनेस, इकॉनॉमिक्स’ (स्वीडन)च्या भारती विद्यापीठ आयएमईडीबरोबर सहकार्य करार

0
डॉ. सचिन वेेर्णेकर स्वीडन दौर्‍यावर
पुणे:
‘स्कूल ऑफ बिझनेस अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स’( लिनस युनिव्हर्सिटी, स्वीडन) आणि भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्ट्यिूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’(आय.एम.ई.डी.) मध्ये व्यवस्थापनशास्त्र प्रशिक्षणासंबंधी सहकार्य करार झाला असून, त्यानुसार भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर आणि प्रा. भारतभूषण सांख्ये स्वीडनला रवाना झाले आहेत. दि. 21 ते 28 सप्टेंबरदरम्यान होणार्‍या स्वीडनमधील दौर्‍यात ते चर्चा करणार आहेत.
उच्च शिक्षणातील भविष्यातील सहकार्य, प्रशिक्षण कार्यक्रम, विद्यार्थी आणि प्राध्यापक आदानप्रदान उपक्रम याविषयी आराखडा ठरविला जाणार आहे, अशी माहिती ‘आयएमईडी’चे संचालक आणि भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांनी दिली.

unnamed

माहिती तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध-डॉ. शरद जोशी

0

पुणे –   माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या क्रांतीमुळे विविध क्षेत्रात नवनवीन माहिती व बदलते तंत्रज्ञान व आवश्यक माहितीमुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीयूएमबीए विद्याशाखेचे माजी संचालक डॉ. शरद जोशी यांनी केले.

पुणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने हॅलो माय फ्रेंड उपक्रमा अंतर्गत घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे मान्यवर तज्ञांचे महाविद्यालयीन विद्याथ्र्यांकरिता मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. शरद जोशी यांनी  ‘‘संगणक क्षेत्रातील संधी‘‘ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्षेत्रे किती आहेत, नेमके काय शिकायचे, ई-कॉमर्स, स्वत:ची वेबसाईट तयार करणे, वेबसाईटद्वारे अनेक संधी प्राप्त होतात. तसेच यु-ट्युबद्वारे वैविध्य स्वरुपाची माहिती, ट्युटोरियल्स, डिजीटल मार्केटींग, गुगल तंत्रज्ञानाचे सहाय्य, सोशल मिडीया द्वारे संवाद कौशल्यांचे आदान प्रदान कमी वेळात प्रभावी व उपयुक्त होत असते. उद्योग व्यवसाय निवडताना कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत त्यानुसार नियोजन करुन कष्ट करण्याची सातत्याने तयारी ठेवल्यास यश प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मा. उपमहापौर आबा बागुल यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की १८ ते २५ वयोगटातील तरुण तरुणींना वेळीच मार्गदर्शन व मदत करणे आवश्यक आहे. या कालावधीत शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक अशा विविध स्तरावर मनामध्ये विचारांचा कोंडमारा होत असतो. या बाबींचा विचार करुन त्यांना मदत, सहकार्य करण्याच्या हेतूने ‘‘हॅलो माय फ्रेंडङ्कङ्क संकल्पना आकारास आली. यामध्ये १८००२३३६८५० या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास विविध क्षेत्रातील तज्ञ, मान्यवर, ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर, संबंधित क्षेत्रातील मान्यवर, नाट्य-चित्रपट क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करीत असल्याचे सांगितले. तसेच उपक्रमा अंतर्गत आयोजित केल्या जातात. याचा जास्तीत जास्त विद्याथ्र्यांनी लाभ घेतला पाहिजे असे सांगितले.

स्टडी सर्कलचे डॉ. आनंद पाटील यांनी ‘‘प्रशासकीय क्षेत्रातील करियर संधीङ्कङ्क या विषयावर मार्गदर्शन केले.

प्रशासकीय सेवा प्रवेश करणेकरिता करावयाची तयारी, विविध क्षेत्रे, मानसिकतेवर आधारित अथवा ज्या विषयाची आवड आहे त्या विषयाशी निगडीत असलेल्या क्षेत्रात करियर करण्याकरिता नेमके काय करावये, स्पर्धा परिक्षा, शारिरीक तंदुरुस्ती विषयक चाचण्या, मैदानी खेळ व त्यांचे महत्व, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील लेखी व मौखिक परिक्षांचे स्वरुप याबाबत त्यांनी अनेक उदाहरणे देऊन अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले.

याप्रसंगी विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच समुह संघटिका व नागरवस्ती विकास विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी संजय रांजणे यांनी केले.

rsz_1logo-for-portal

रोलबॉल स्पर्धेत मुला-मुलींच्या गटात पुणे संघांचे वर्चस्व

0

पुणे – २७व्या पुणे फेस्टीव्हलमध्ये झालेल्या राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेत मुले आणि मुलींच्या

गटात पुण्याच्या संघांनी बाजी मारत विजेते पद मिळवले. अंतिम लढतील मुलांच्या गटात पुणे

संघाने कोल्हापूरचा ७ विरूद्ध १ असा तर मुलींच्या गटात सातारा संघावर ७ विरूद्ध ० अशी

दणदणीत मात करत पुणे संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. रोलबॉल या खेळाचा जन्म पुण्यात

झाला असून त्याला पहिल्या वर्षापासून पुणे फेस्टीव्हलने स्पर्धेचे पाठबळ दिले आहे.

कोथरूडच्या महेश विद्यालयात गेले दोन दिवस सुरू असलेल्या रोलबॉल स्पर्धेत मुलांच्या व

मुलींच्या गटात प्रत्येकी २५ जिल्हा संघांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र रोलबॉल

संघटनेचे अध्यक्ष वसंत राठी यांच्या हस्ते झाले होते. महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन तर्फे स्पर्धेचे

आयोजन गेली दहा वर्षे राजू दाभाडे हे पुणे फेस्टीव्हलमध्ये करत आहेत. विजेत्या संघांना पुणे

फेस्टीव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

यावेळी रोलबॉलच्या तांत्रिक समितीचे मिलिंद क्षीरसागर, सतीश घारपुरे, भाऊसाहेब तापकीर आणि

बाळासाहेब काळे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष वसंत राठी

यांनी या डिसेंबर महिन्यात पुण्यात होणा-या रोलबॉल स्पर्धेच्या वर्ल्डकप स्पर्धेची महिती दिली.

अंतिम सामान्यापूर्वी कुदळे यांना दोन्ही संघातील खेळाडूंची ओळख करून देण्यात आली आणि

त्यांनी चेंडू हवेत उडवून सामन्याचा प्रारंभ केला. पुण्याच्या तुलनेत कोल्हापूरचा संघ हा कौशल्यात

जरी कमी वाटत असला तरी त्यांनी चांगली लढत देत अनेक गोल वाचवले. मध्यंतराला दोन्ही

संघांनी प्रत्येकी एकेक गोल केला होता. मध्यंतरानंतर पुण्याच्या खेळाडूंनी बचाव व आक्रमण

यांचा सुंदर मिलाफ साधत शेवटी ७ विरूद्ध १ अशा मोठ्या फरकाने कोल्हापूरवर मात करत

सामना जिंकला. पुणे संघाकडून आगम शहाने सर्वाधिक ४ गोला केले तर मधुसुदन, श्रेयस आणि

सुधांशू यांनी प्रत्येकी एक गोल करत त्याला साथ दिली. कोल्हापूरकडून एकमेव गोल आदित्यने

केला. मुलांच्या गटात तिस-या स्थानासाठी यवतमाळ आणि पिंपरी-चिंचवड संघा दरम्यान झालेला

सामना यवतमाळ संघाने ४ विरूद्ध ० असा सहज जिंकून स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले.

मुलिंच्या गटात अंतिम लढतीत पुणे संघाने सातारा संघाचा ७ विरूद्ध ० असा धुव्वा उडवला. पुणे

संघाकडून सेजल, सुहानी, धृती आणि तनिष्का यांनी गोल नोंदवले. याच गटात तिस-या

स्थानासाठी रायगड आणि नगरच्या संघात लढत झाली. त्यात नगरच्या संघाने ३ वरूद्ध १ असा

रायगड संघाचा पराभव करत तिसरे स्थान मिळवले.

नाच, गाणं आणि अदाकारीच्या त्रिवेणी संगमाने रसिक चिंब

0

unnamed1 unnamed2

पुणे- डोळं रोखून काय बघता…पाव्हनं विचार काय हाय तुमचा, लाही लाही होते माझ्या अंगाची…,बाई मी लाडाची

ग लाडाची, कैरी पाडाची…, आबा जरा सरकून बसा की …,  साजणा जडली तुम्हावर प्रिती …अशा एकाहून एक

सरस, नाच, गाणं आणि अदाकारीचा त्रिवेणी संगम असलेल्या ठसकेबाज लावण्या, लोकगीते व चित्रपट गीतांवर

केलेल्या नृत्यांनी प्रेक्षकांना चिंब केले.

पुणे फेस्टिवल अंतर्गत लावणी सम्राज्ञी माया खुटेगावकर, स्वाती दसवडकर व सहकारी यांचा ‘अहो..नादच  खुळा हा

कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात रंगला. रसिकांच्या टाळया आणि शिट्यांनी नाट्यगृह दणाणून सोडले.

लावणी सम्राज्ञी माया खुटेगावकर यांनी स्वत: गायलेल्या डोळं रोखून काय बघता…पाव्हनं विचार काय हाय तुमचा

या लावणीला, त्यावर केलेल्या नृत्याला व त्यांच्या अदाकारीला, युवा लावणी सम्राज्ञी अर्चन जावळेकर यांच्या ‘दूर

उभे का जवळ याना..मला वाटते भीती..’ व सजना जडली तुम्हावर प्रिती, संगीता लाखे यांच्या ‘आबा जरा सरकून

बसा’ .. तर प्राची मुंबईकर यांच्या तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला..’ .या लावण्यांना टाळ्या, शिट्या

आणि वन्समोअरने प्रेक्षकांनी नाट्यगृह डोक्यावर घेतले. स्वाती दसवडकर यांनी लावणीच्या छक्कड या प्रकारावर व

‘शांताबाय..’ या लोकगीतांवर केलेल्या नृत्याच्या अदाकारीने रसिकांना अक्षरशः घायाळ केले. एकामागोमाग एक

वन्समोअर, त्यांच्याबरोबर उपस्थित नाचणारा प्रेक्षकवर्ग, शिट्या याने संपूर्ण नाट्यगृह दणाणून गेले.

याशिवाय, ‘लाडाची ग लाडाची.. कैरी पाडाची’, आंबा तोतापुरी, ‘सोडा सोडा राया हा नादखुळा’…मी तुझी मैना..तुम्ही

माझे राघू’.., ‘फँड्री’चित्रपटातील गाजलेले ‘तुझ्या प्रीतीचा इंचू चावला’ या गाण्यावरील  अॅटमसॉंग, …अशा लावण्या

व लोकगीतांवर केलेल्या नृत्याचा अविष्काराने  थिरकलेली पाऊले आणि लय, अदाकारीला प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्या

वाजवत भरभरून प्रतिसाद दिला.

बालगंधर्व रंगमंदिर पुणे फेस्टिव्हलचे प्रमुख श्रीकांत कांबळे,अतुल गोंजारी व राजू साठे यांच्या हस्ते कलाकारांचा

सत्कार करण्यात आला. पुणे फेस्टिवलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख मोहन टिल्लू यावेळी उपस्थित होते

कलर्स मराठी वाहिनी हे २७ व्या पुणे फेस्टिवलचे मुख्य प्रायोजक आहेत.

गणेश उत्सवानिमित नेत्रतपासणी , चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

0

 

गणेश उत्सवानिमित भवानी पेठमधील चुडामण तालीमजवळील  जय भवानी मित्र  मंडळाच्यावतीने भव्य नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले तसेच चष्मे वाटप करण्यात  आले . के. एम. हेल्थ केअर असोसिएशनचे  विशेष सहकार्य लाभले . यावेळी मंडळाचे अध्यक्ष मुनवर खान  , उपाध्यक्ष नंदू बनसोडे , रॉकी परेरा , कार्याध्यक्ष कन्हेय्या परदेशी , खजिनदार विलास प्रभुणे , सचिव राजेश परदेशी , सहसचिव सुनील सकट , प्रकाश बंडेल्लू , अफझल खान , यश बनसोडे , अनिल सकट , रितेश सकट , कादर खान , ज्युडील नायडू  आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले .

   नेत्र तपासणीसाठी डॉ . मुकेश विसपुते , संदीप सोनार , तमन्ना शेख  यांनी विशेष परिश्रम घेतले . या नेत्र तपासणी शिबिरात २५० जणांची नेत्र तपासणी करण्यात येऊन २५ जणांना चष्मे वाटप करण्यात १० मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे .

धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास जगासमोर यावा :हरी नरके

0
इतिहास घडविण्यासाठी लढतोय :महादेव जानकर 
पुणे :
धनगर हा पशुपालक समाज इतिहासाच्या आधीपासून आहे ,त्याच्याच इतिहासाकडे दुर्लक्ष होता कामा नये ,मौर्य -हरिहर -बुक्क -सातवाहन -होळकरांपासून  सर्व गौरवशाली इतिहास जगासमोर आला पाहिजे ‘ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी केले
संजय सोनवणी लिखित धनगरांचा गौरवशाली इतिहास ‘ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते . राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर ,’ ख्वाडा ‘ चे दिग्दर्शक भाऊराव कुऱ्हाडे ,लेखक होमेश भुजाडे ,प्रकाश खाडे ,गोपीचंद पडळकर उपस्थित होते
महाराजा यशवंत राव होळकर गौरव प्रतिष्ठान आयोजित हा प्रकाशन समारंभ उद्यान प्रसाद मंगल कार्यालय येथे रविवारी झाला . यावेळी भाऊराव कुऱ्हाडे यांचा यशवंत राव होळकर पुरस्कार देवून गौरव करण्यात आला
हरी नरके म्हणाले ,’ पशु पालक समाज आधीपासून आहे . महाराष्ट्रात सुद्धा २ हजार वर्षापासून सातवाहन राजांनी मराठीतील पहिले पुस्तक तयार केले . १२ बलुतेदारांना रेटण्याची वृत्ती असून हे मारेकरीच बहुजनांच्या वेशात येत असल्याने बहुजनांची फसगत होत आहे . पण ,यातून बाहेर पडून नवा इतिहास रचण्याची गरज आहे ‘
महादेव जानकर म्हणाले ,’ इतिहासाबद्द्दल मी फार बोलणार नाही . मात्र नवीन इतिहास घडविण्य साठी कार्यरत राहणार आहे . धनगर समाज पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा ज्ञानाने श्रीमंत होण्याची गरज आहे . मी मंत्री पदासाठी काम करीत नसून नवीन इतिहास घडविण्यासाठी कार्य करीत आहे . या वाटचालीत मला धनगारान बरोबर इतर समाजाचे योगदान मिळाले आहे
संजय सोनवणी म्हणाले ,’ निपक्ष इतिहास लिहून आत्मभिमान जागृत केला पाहिजे . स्वताकडे पाहण्याची न्यून गन्डाची दृष्टी बदलून धनगर समाजाने सर्व क्षेत्रातील नव्या कार्यासाठी सिद्ध झाले पाहिजे .
धनगर समाजावर विज्ञान वादी संस्कार रुजवले पाहिजेत असे लेखक होमेश भुजाडे म्हणाले

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांना प्रदेशअध्यक्षांनी दिली “क्‍लीन चीट‘

0

2 3

(फोटो – सुशील राठोड )

पुणे – कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांचे काम चांगलेच आहे. त्यांनी राजीनामा दिला असला, तरी तो पक्षाने स्वीकारलेला नाही, असे नमूद करीत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांना “क्‍लीन चीट‘ दिली. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या प्रयत्नांना चाप बसण्याची शक्‍यता निर्माण झाली.
पत्रकार भवनात झालेल्या वार्तालापात कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदाबाबत चव्हाण यांनी स्पष्ट मत मांडले. ‘लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर संघटनात्मक बांधणी सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन परिस्थितीची माहिती घेतली जात आहे. जो काम करतो त्याला संधी दिला जाणार आहे. पुण्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा झाली. शहराध्यक्षपदाबाबतचा विषय या चर्चेत नव्हता. छाजेड यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी तो पक्षाने स्वीकारलेला नाही. गेल्या दहा वर्षांत छाजेड यांनी चांगले काम केले आहे. जो काही निर्णय घ्यायचा असेल तो त्यांना विचारात घेऊन केला जाईल,‘‘ असे चव्हाण म्हणाले.कॉंग्रेसच्या पराभवानंतर छाजेड यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद मिळविण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली. कॉंग्रेस भवन येथे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन केले होते; परंतु प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी छाजेड यांच्या कामाचे कौतुक केल्याने, त्यांच्या जागेवर नवीन नियुक्ती होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाही.

गटबाजीचे प्रदर्शन

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांचे शनिवारी कॉंग्रेस भवनमध्ये स्वागत करताना घोषणाबाजी झाली. मात्र, यातून शहरातील पक्षसंघटनेमधील गटबाजीचे प्रदर्शन घडले.
प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यावर तब्बल सहा महिन्यांनी चव्हाण यांनी अधिकृतपणे शहरात पहिल्यांदाच दौरा केला. सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल मेरिएटमध्ये सकाळी त्यांनी आमदार व माजी आमदारांची भेट घेतली. त्यानंतर ते कॉंग्रेस भवनमध्ये आले. त्या वेळी त्यांचे स्वागत करताना प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजित कदम, माजी आमदार रमेश बागवे, शहराध्यक्ष अभय छाजेड, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, उपाध्यक्ष मुख्तार शेख यांचा जयघोष करणाऱ्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. त्याची दखल घेत चव्हाण यांनी भाषणात नापसंती व्यक्त केली. कार्यकर्त्यांना सांभाळा, त्यांच्या जिवावरच मी निवडून आलो, असे सांगत त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी विश्‍वजित कदम यांनी, शहरातील कॉंग्रेस कमजोर होत असल्याचे तीन महापालिकांमधील आकडेवारीतून दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत जो निर्णय घ्यायचा तो लवकर घ्या आणि जाहीर करा, असे आवाहन केले. त्याचीही दखल घेत चव्हाण यांनी, “ही बैठक म्हणजे, छाजेड यांच्या निरोपाची सभा नाही,‘ असे सांगत, याबाबतचा निर्णय सर्वांशी चर्चा करूनच घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, चव्हाण यांनी नगरसेवक व ब्लॉक अध्यक्षांची आज बैठक घेण्याचे जाहीर केले होते; परंतु ती झाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.

पुणे फेस्टीव्हलमध्ये उलगडला अजय – अतुलचा लहानपणापासूनचा प्रवास

0

पुणे – पाश्चत्य संगीताच्या प्रकरांमध्येही अस्सल देशी व मराठी संगीताचे नाणं खणखणीत वाजवून जगातील संगीत रसिकांना मंत्र मुग्ध कऱणा-या अजय – अतुल या संगीतकार जोडीला २७ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये कलर्स मराठी वाहिनीने पुणेकरांच्या साक्षीने मानाचा मुजरा केला. आज कलर्स मराठी तर्फे मानाचा मुजरा – अजय- अतुलहा संगीतकार अजय – अतुल यांनी संगीत दिलेल्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम पुणे फेस्टीव्हलमध्ये गणेशकलाक्रिडा रंगमंच येथे सादर झाला. त्यात केवळ त्यांनी संगीतबद्ध केलेली केवळ गाणीच नव्हती तर त्याचा जोडीला त्यांच्या लहानपणापासूनचे असलेल्या साक्षीदारांनी ते संगीतकार कसे घडले आणि झाले याचा प्रवास उलगडला.

२७ व्या पुणे फेस्टीव्हलची संध्याकाळ रंगली ती गणेश कला क्रिडा रंगमंच येथे अजय-अतुलच्या संगीतात. प्रारंभी पुणे फेस्टीव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी कलर्स मराठी वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख संजय उपाध्ये यांचा स्मृतीचिन्हं देऊन सत्कार केला तर कार्यक्रमाची संकल्पना करणारे श्रीरंग गोडबोले यांचा सत्कार मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे यांनी केला. डॉ सतीश देसाई यांनी पुणे फेस्टीव्हल सुरू करण्यामागची कलमाडी यांची संकल्पना विषद केली. ब-याच काळानंतर अजय अतुलचा कार्यक्रम पुण्यात होत असल्याने पुणेकरांनी सहावाजल्यापासूनच गणेशकलाक्रिडात गर्दी केली होती.

कार्यक्रमाची सुरूवात झाली तरी अजय-अतुल दिसत नसल्याने रसिकांचे डोळे त्यांना शोधत होते. त्यांच्याच विश्वविनायक मधील प्रसिद्ध गणेश वंदना सुरू झाली. या दरम्यान रंगमचावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मोठे छायाचित्र आले आणि एकीकडे गणेशवंदना, नृत्याविष्कार सुरू असताना त्या छायाचित्राच्या मागून अजय-अतुलची एंट्री झाली अन प्रक्षागृहात गणपती बाप्पा मोरयाचा गरज सुरू झाला. शेवटी श्रीगणेशा देवा श्रीगणेशा देवा या गाण्यावर रसिकांनी जल्लोषच केला. गणेश वंदना झाल्यावर अतुल याने बोलताना सांगितले की, पहिल्यांदाच आम्ही आमचीच गाणी आमच्या पुणेकर कुटुंबाबरोबर बसून बघणार आहोत. रसिकांच्यात कलमाडी यांच्यासह निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते महेश कोठारे हे त्यांचे खास कौतुक कऱण्यासाठी उपस्थित होते.

त्यानंतर पुष्कर श्रोत्री आणि प्रसाद ओक यांनी निवेदनाची सूत्र हातात घेतली तिही गणपती बाप्पामोरया अशा घोषणा देतच. अजय अतुलबद्दल बोलताना त्यांनी थेट त्यांचे प्रथामिक शाळेतील शिक्षक व्ही. डी. कुलकर्णी सरांनी बोलवून बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या. त्यात अतुलने लहानपणी सिंहगडच्या पोवाडा गाऊन बक्षिस मिळवले होते. ते दोघेही लहानपणापासूनच सांस्कृतिक कार्यक्रम, त्यातही गाण्यांमध्ये दंग असायचे. या जोडीने शाळेला भजन स्पर्धेत बक्षिसेही मिळवून दिली असल्याचे कुलकर्णी सरांनी सांगितले.

आठवणींचा सुंगंध दरवळत असतानाच अनिरूद्ध जोशी याने वा-यावरती गंध पसरला  आणि गालावर खळी अशी दोन एव्हरग्रीन गाणी सादर करून कार्यक्रमात रंग भरायला सुरूवात केली. त्यानंतर पुण्यातील डॉ. दिलीप देवधर यांच्या दवाखान्यात अतुल कम्पाउंडर म्हणून कसा काम करत होता आणि हे डॉक्टर – कंम्पाउंडर दवाखान्यात गाणी कसे म्हणायचे याच्या आठवणी सांगताना अजयकडे सूराचे तर अतुलकडे तालाचे ज्ञान असल्याचे नमूद केले. या जोडीला पहिला कीबोर्ड आणि सायकली घ्यायला याच डॉक्टर देधर यांनी मदत केली, आजही करतात असे अतुल यांने सांगितले. रसिकांच्यात बसून अजय-अतुल हे मधूनमधून संवाद साधत आठवणींचे रंग गडद करत होते. एकीकडे लहानपणापासून ते संगीतकार अजय-अतुल हा प्रवास आठणींच्या रूपाने उलगडत होता.दुसरीकडे त्यांचीच गाणी मोरया मोरया, लयभारी चित्रपटातील माऊली माऊली गाण्यावर अभिनेत अभिजीत केळकर व सहका-यांनी यांनी नृत्याविष्कार सादर केला.

नटरंग, लयभारी चित्रपटातील मराठी गाण्यांबरोबरच सिंघम सारख्या हिंदी चित्रपटातील गाण्यांवर प्रजाक्ता माळी, संस्कृती बालगुडे, केतकी पालव, सोनाली कुलकर्णी यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारांना आणि आदर्श शिंदे, राहुल सक्सेना अनिरूद्ध जोशी आणि पियांका बर्वे यांच्या आवाजाला रसिकांनी जल्लोषात दाद दिली. कलर्स मराठी वाहिनी ही यंदाच्या पुणे फेस्टीव्हलची मुख्य प्रायोजक आहे.

logo2015 copy

राज्यात चीनी उद्योग उभारण्यास सहकार्य – मुख्यमंत्री

0

ग्वांगडांग प्रांताचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची भेट : महाराष्ट्र आणि ग्वांगडाग प्रांतामध्ये होणार औद्योगिक करार

मुंबई : देशात आणि विशेषत: राज्यात उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण आहे. राज्यात माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक क्षेत्र विकास, विविध उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी ग्वांगडांग प्रांतातील विविध कंपन्या उत्सुक असून त्यांना शासन संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे चीन येथील ग्वांगडांग प्रांताचे राज्यपाल झ्यू शिउडान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येथे भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव (नियोजन) सुनिल पोरवाल, राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मल्लिक, वित्त विभागाचे प्रधान सचिव (व्यय) सीताराम कुंटे, एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, पर्यटन सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह, उद्योगपती सर्वश्री दिलीप पिरामल, सचिन जिंदल, निखिल गांधी, निरंजन हिरानंदानी, बिपीन चंद्रानी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यास ग्वांगडांग प्रांतातील विविध कंपन्या उत्सुक आहेत. राज्याचे आणि ग्वांगडांग प्रांताचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी कंपन्यासमवेत करार करणे आवश्यक आहे व त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

राज्यपाल झ्यू शिउडान म्हणाले, भारत देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान आहे. महाराष्ट्र हे आर्थिक विकासाचे मॉडेल आहे व राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकास व्हावा यासाठी ग्वांगडांग प्रांतातील जवळजवळ ३० कंपन्या गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या बैठकीदरम्यान ग्वांगडांगच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना ग्वांगडांग येथे येण्याचे निमंत्रण दिले.