पुणे – एका १७ वर्षीय मुलाला अज्ञातांनी पळवून नेल्याची तक्रार मुलाच्या पित्याने केली आहे
याबाबत पोलिसांनी पाठविलेले हे निवेदन पहा जसेच्या तसे ..
पुणे- सिंहगड रस्त्यावरील गणेश मळा येथील सरिता नगरी फेज १ मधील ६ घरे फोडून चोरट्यांनी साडेसहा लाखाचा ऐवज लांबविला . ३० सप्टेंबर रोजी रात्री दीड ते पाहते साडेचार वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी हा हैदोस घातला .
स्नेहल पाटणकर , सुजित कुलकर्णी , मिलिंद आठवले स्मिता जेरे , मिलिंद गाडगीळ , ज्योतीबेन पटेल यांची घरे कुलुपबंद असताना या चोऱ्या झाल्या . दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत .
पुणे- काहीही कारण नसताना … पोलीस चौकीत घुसून तोडफोड केली ,पोलिसांना धक्काबुक्की केली आणि सरकारी कामात अडथला आणला या आरोपावरून कोथरूड पोलिसांनी ३० वर्षीय युवकाला अटक केली आहे .
सागर दत्तात्रय जावळकर(रा. शिवाजी पुतळा चौक , कोथरूड )असे या युवकाचे नाव आहे . तो काळ सायंकाळी साडेचार वाजता एरंडवणे पोलीस चौकीत गेला आणि पोलिसांना धक्काबुक्की करीत अपशब्द वापरीत खिडक्यांची तोडफोड केली अशी तक्रार पोलीस शिपाई सिद्धराम पाटील यांनी नोंदविली आहे . फौजदार वाघमारे अधिक तपास करीत आहेत
पुणे-बांधकाम आणि उद्योग क्षेत्रात बऱ्यापैकी सुपरिचित असलेल्या विनय फडणीस आणि अनुराधा फडणीस यांनी ओम डेव्हलपर्स च्या राजन रायसोनी (वय ५० , प्रभात रोड , पुणे )यांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . रायसोनी यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप फडणीसांना अटक करण्यात आलेली नाही .
विनय फडणीस आणि अनुराधा फडणीस (रा . कल्पवृक्ष , स. नं . ४६/१ सी /१ डी. पी रोड . कर्वेनगर )यांना रायसोनी यांनी आपल्या ओम डेव्हलपर्स या भागीदारी संस्थेत घेतले होते . त्यानंतर ओम च्या मालकीचे असलेले स. नं . ४०/१/१ अ आणि ४१/१/१ मधील प्लॉट नं १, २ ,३ .४ या मिळकतींवर बांधकाम क्कारण्यात आले . यातील व्यापारी बांधकाम हे माझ्या फडणीस प्रॉपर्तीज प्रा. ली . ला म्हणजे स्वतासाठी द्या अशी मागणी करीत फडणीस यांनी रायसोनी यांना ३ कोटी ९१ लाख ४६ हजाराचे धनादेश दिले आणि रायसोनी यांचा संस्थेमधून राजीनामा हि घेतला . आणि ठरल्याप्रमाणे पैसे हि दिले नाहीत
या प्रकरणातील २ कोटी ४१ लाख रुपये आणि व्याज न देता फसवणूक केली असा तक्रार अर्ज रायसोनी यांनी पोलिसांना दिला होता त्यावर तपास करून कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे . गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कुलकर्णी या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत
माहे ऑक्टोबर २०१५ मधील लोकशाही दिन सोमवार दि. ५/१०/२०१५ रोजी सकाळी १० ते १२ या
वेळात महापालिकेच्या मुुख्य भवनात मा.महापालिका आयुक्त कार्यालय सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे
नागरिकांनी आपल्या तक्रारी संदर्भात आवश्यक नमूना प्रपत्र १ (ब) नमून्यात अर्ज सादर करणे
आवश्यक आहे. प्रकरणाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे झेरॉक्स प्रती अर्जासह सादर कराव्यात. अर्ज सादर
केल्यानंतर सुनावणी प्रसंगी स्वत: उपस्थित रहाणे आवश्यक आहे.
न्यायप्रविष्ठ बाबी, माहिती अधिकाराअंतर्गत सादर केलेले अर्ज, मनपा सेवकांच्या व अधिकारी यांचे
संदर्भांतील अर्ज, वारंवार एकाच विषयाचे येणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. संबंधित खात्याने दिलेल्या
अंतिम उत्तरासंदर्भांत समाधान झाले नाही अथवा अपेक्षित कार्यवाही झाली नाही तर अशा अर्जदारांनी
दुसèया आठवड्यातील सोमवारी सकाळी १० वाजता मा. विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे १ (कौन्सिल
हॉल) येथे अर्जासह, आवश्यक कागदपत्रांसह विभागीय लोकशाही दिनात संपर्क साधावा.
महापालिका मुख्य भवनातील लोकशाही दिनात प्रथमत: अर्ज करणारांनी परस्पर न येता प्रथम
मनपाच्या क्षेत्रिय उपायुक्त कार्यालयात महिन्यातील तिसèया सोमवारी आयोजीत केल्या जाणाèया
लोकशाही दिनात सकाळी १० ते १२ या वेळात अर्ज सादर करावेत. क्षेत्रिय उपायुक्त कार्यालयामार्फत एक
महिन्यात कार्यवाही झाली नाही तर मनपा मुख्य भवनात महिन्यातील पहिल्या सोमवारी लोकशाही दिनात
अर्जासह उपस्थित रहावे. मनपा मुख्य भवनातील लोकशाही दिनात अर्ज सादर करावयाचा असल्यास १५
दिवस अर्ज अगोदर करणे आवश्यक आहे.
अर्जदारांकरिता सर्वसाधारण सूचना :
१. महापालिका आयुक्त यांना उद्देशून अर्ज.
२. वरीलप्रमाणे अर्जास क्षेत्रिय उप आयुक्त लोकशाही दिन टोकन क्र. प्रत.
३. क्षेत्रिय उप आयुक्तांच्या उत्तराची प्रत.
४. अर्जासोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी माहिती व जनसंपर्क
कार्यालय, पुणे महानगरपालिका येथे दिलेला अथवा पाठविलेला असणे आवश्यक आहे.
५. बांधकाम विषयक तक्रारी असल्यास अशा अर्जदारांनी आपले अर्ज मुख्य भवनातील पहिल्या
मजल्यावरील बांधकाम विभागामध्ये आपले अर्ज सादर करावेत.
६. वरील प्रमाणे बाबींची पूर्तता केली नाही .तर लोकशाही दिनात प्रत्यक्ष अर्ज सादर करता येणार
७. कामाचे स्वरुप अथवा विभाग थेट महानगरपालिका आयुक्त कार्यालय अथवा मनपा मुख्य
भवनातील अन्य विभागांचे स्तरांवर संबंधित असेल तर क्षेत्रिय उप आयुक्त लोकशाही दिनातील टोकन
क्रमांक व त्याची प्रत आवश्यक राहणार नाही.
नवीन बदला संदर्भात माहिती व अर्ज नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत
स्थळावर उपलब्ध करण्यात आले असुन त्याचा संगणक संकेताक २०१२०९२७१४५१०७०१००
: डेंग्यू व होमिओपेथीबद्दल असलेले गैरसमज-
झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्डस्. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो. या पुरस्कारांचं वैशिष्ट्य म्हणजे यातील विजेत्यांची निवड ही प्रेक्षकांच्या मतदानाद्वारे करण्यात येते. यावर्षी हे मतदान एकाच दिवशी म्हणजे शनिवार ३ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील २० मुख्य शहरांमध्ये होणार आहे. या शहरांमधील विविध ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात येणार असून त्याद्वारे प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकार आणि मालिकेला मत देता येणार आहे.
झी मराठीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहेत. ‘होणार सून मी ह्या घरची’ मधील श्री आणि जान्हवी, ‘का रे दुरावा’ मधील जय – अदिती, ‘नांदा सौख्य भरे’ मधील नील आणि स्वानंदी या सर्वांवर आणि त्यांच्या कुटुंबावर प्रेक्षक जीवावापड प्रेम करतात. ‘जय मल्हार’ ही खंडेरायाची मालिका भक्तीभावाने बघतात. ‘होम मिनिस्टर’ मधून घरोघरी जाणारे आदेश बांदेकर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भावोजी बनलेले आहेत तर ‘चला हवा येऊ द्या’ मधून घराघरांत मनोरंजनाची आणि हास्याची हवा पसरलेली आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारीतील’ मित्रांचं ‘माजघर’ आणि त्यातील किस्से सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनले आहे. याच आणि इतर लोकप्रिय कार्यक्रमांना आणि त्यातील कलाकारांना सर्वोत्कृष्ट ठरवण्याचा सन्मान प्रेक्षकांच्या मतदानातून होणार आहे. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट नायक – नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट भावंडं, सर्वोत्कृष्ट सासू-सासरे, सर्वोत्कृष्ट आई – वडील, सर्वोत्कृष्ट स्त्री आणि पुरूष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट खलभूमिका, सर्वोत्कृष्ट सहाय्यक स्त्री आणि पुरूष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट शिर्षकगीत, सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक, सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम, सर्वोत्कृष्ट मालिका आदि विभागांचा समावेश आहे. यासाठी राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, शिर्डी, धुळे, नगर, जळगाव, औरंगाबाद, लातूर, परभणी, नागपूर, अमरावती, सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट, सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण आणि रत्नागिरी या शहरांमधून एकूण ७२ केंद्रांवर हे मतदान घेण्यात येणार आहे. शनिवारी ३ ऑक्टोबर या एकाच दिवशी हे प्रत्यक्ष मतदान रंगणार आहे. याशिवाय ज्यांना ३ तारखेला मतदान करता आलं नाही त्या प्रेक्षकांना आणि इतर शहरातील प्रेक्षकांना ऑनलाईन मतादानाचाही पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी झी मराठीच्या www.zeemarathi.com या संकेतस्थळावर नामांकनपत्रिकेद्वारे हे मतदान करता येणार आहे. याशिवाय पाच महत्त्वांच्या विभागांसाठी फ्री मिस्ड् कॉलद्वारेही मतदान करता येऊ शकेल. ज्यामध्ये मालिकेसाठी 9021103601, कथाबाह्य कार्यक्रमासाठी 9021103602, नायकासाठी 9021103603, नायिकेसाठी 9021103604 , जोडीसाठी 9021103605 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास मतदान करण्यासाठी या क्रमांकावरून कॉल येईल जिथे प्रेक्षक आपलं मत नोंदवू शकतील. याशिवाय एसएमएसचाही पर्याय उपलब्ध असणार आहे. येत्या १५ ऑक्टोबरला झी मराठी अवॉर्ड्सचा हा सोहळा रंगणार असून १ नोव्हेंबरला तो प्रसारित होणार आहे.
पुणे – अंबानी आणि अन्य मोठ्ठे हजारो करोडोंचे मालक सोडून ; अब्जावधींची संपत्ती दाबून ठेवणारी देवस्थाने सोडून आता सरकार दुष्काळ निधी प्रत्येक माणसाच्या खिशातून वसूल करणार आहे . आता कुठे पेट्रोल डीझेल स्वस्त झाल्याचा दिलासा मिळत असतानाच१ ऑक्टोबर पासून होणारी पेट्रोल डीझेल च्या किमतीतील स्वस्ताई .. आम आदमीचे हे सुख पहावेनासे झालेल्या सरकारने दुष्काळ निधी च्या नावे पेट्रोल डीझेल च्या किमतीत आणखी कर समाविष्ट करून पेट्रोल डिझेलच्या करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे . पाणी साठविण्याचे नियोजन करण्यात अपयशी झालेल्या सरकारच्या कृत्याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागणार आहे . पावूस येतो कि नाही ? असा प्रश्न असताना.. नाही आल्यावर वर्षभर दिवसाआड पाणी मिळणार कि काय ? अशी भीती असताना दुष्काळी झळामुळे रोजगार मिळणेही दुरापास्त होणार असताना वर महागाईचा चटका सोसावा लागला तर शेतकरीच काय अन्य क्षेत्रातील लोकही आत्महत्या करतील । अशी भीती हि सरकारला नसल्याने आश्चर्य वाटत आहे.
महाराष्ट्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर वाढविण्याचा निर्णय घेतला . याच बरोबर सोन्या-चांदीच्या भावातदेखील वाढ होणार आहे.
दुष्काळ निधीसाठी राज्य सरकारने सिगारेट, विडी, दारुवर पाच टक्के अतिरिक्त कर आकारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी पेट्रोल, डिझेलवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतीत प्रति लिटर दोन रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय वाढलेल्या किंमती गुरुवारी मध्यरात्री पासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.मागील महिन्यात नीती आयोगाची बैठक झाली होती, त्यात देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी अधिक निधी गरज असल्याचे सांगण्यात आले. व त्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि इतर काही गोष्टींवरील करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र सरकार हा निर्णय लागू करणारे पहिले राज्य आहे.
दुष्काळ पडतो तेव्हा सरकारने लोकांना तारायचे –आम आदमीला वाचवायचे ;मदत करायची … हे सोडून याच मदतीच्या नावाखाली सरकार आम आदमी कडून अशाप्रकारे वसुली करणार हे अजबच म्हणावे लागणार आहे
राज्य मंत्रिमंडळाचे आजचे महत्त्वाचे निर्णय
दारू, सिगरेट, शीतपेयावर अतिरिक्त 5 टक्के करवाढ
– एलबीटी रद्द केल्यामुळे पेट्रोल १.५० ते २.५० रुपये कमी होणार होते म्हणजे १ ऑक्टोबर पासून पेट्रोल डीझेल स्वस्त होणार होते , त्याऐवजी प्रतिलिटर २ रुपये करवाढ. म्हणजेच दरावर विशेष फरक पडणार नाही असा दावा – हिरे, सोने आणि दागिन्यांवरील वॅट 1 वरून 1.20 टक्क्यांवर- पुढील 5 महिन्यांसाठी वाढ. 1600 कोटींचा महसूल अपेक्षित एक ऑक्टोबरपासून कर लागू.. बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण अंतर्गत उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालिन निदेशकांचे पॅनल तयार करण्याचा निर्णय.100 हून अधिक पटसंख्या असलेल्या 1835 शाळांमध्ये कला, शारीरिक शिक्षण, आरोग्य, कार्यानुभव यासाठी अतिथी निदेशकांचे पॅनल तयार करणार.27 पारेषण योजना ग्रीन एनर्जी कॉरिडॉर कार्यक्रमांतर्गत राबविण्यास मान्यता, 367 कोटींचा अंदाजित खर्च.20% खर्च राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या निधीतून, 40% नॅशनल क्लीन एनर्जी अनुदान तर 40% कर्ज जर्मन डेव्हलपमेंट बँकेकडून घेण्यास मान्यता. ग्रीन एनर्जी कॉरिडॉर योजनांमधून 2570 मे.वॅ. अतिरिक्त वीज उपलब्ध होणार मुंबई महापालिका अधिनियम, महाराष्ट्र महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयजात पडताळणी समितीकडे अर्ज केल्याचा पुरावा जोडून निवडणूक लढविणारा बोगस उमेदवार सहा वर्षांसाठी निवडणुकीस अपात्र ठरणार
केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान यांना पश्चिम विभाग केंद्रीय इलेक्ट्रीकल टेस्टिंग लॅबसाठी नाशिक जिल्ह्यातील मौजे शिलापूर येथील 100 एकर जमीन
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मास कम्युनिकेशन्स या स्वायत्त संस्थेला अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे 6हेक्टर जागा देण्याचा निर्णय
पुणे- स.प . महाविद्यालय जवळच .. दुपारी साडेअकराची वेळ आणि ब्यांक ऑफ महाराष्ट्र मधून एक ६१ वर्षाचा वृध्द इसम बाहेर येतो पैशाची पिशवी सायकल ला लावतो आणि तेवढ्यात कोणीतरी आपले पैसे खाली पडलेत सांगून हि तब्बल ६० हजाराची रोकड असलेली पिशवी घेवून पसार होतो … आश्चर्य वाटेल अशी घटना काळ २९ तारखेला घडली आहे
पांडुरंग चौरे असे या वृद्ध इसमाचे नाव असून याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . पोलीस फौजदार राजपूत याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत .
पुणे- चांदणी चौक ते वारजे चौकाकडे जाणार्या सेल पेट्रोल पंपा समोर वाळू वर दुचाकी स्लीप होवून झालेल्या अपघातात ३० वर्षे वयाचा युवक अखेर गतप्राण झाला
उमेश शिवाजी शिंदे (वय -३० रा. घुलेवाडी , संगमनेर ) असे या युवकाचे नाव असून त्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करून , बेदरकारपणे दुचाकी चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा वारजे पोलिसांनी दाखल केला आहे हा अपघात २४ तारखेला सकाळी झाला उमेश याच्यावर उपचार चालू असताना तो २६ तारखेला मरण पावला सहायक पोलीस निरीक्षक ए व्ही चव्हाण यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे
पुणे- ‘तुमची डीडी किसान भारती या वाहिनीवर पत्रकारितेसाठी निवड झाली आहे असा फोने करून ब्यांक अकाऊंट वर पैसे भरायला सांगून अमृता गायकवाड (वय -२५ रा. वडगाव बुद्रुक ) या तरुणीची ३८ हजार ५० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी राजेशकुमार आणि अनिता वर्मा नामक अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे . याप्रकरणी ब्यांकेचे खाते मोबाईल नंबर्स आदी चा शोध घेत पोलीस फौजदार डी आर कोळपे अधिक तपास करीत आहेत .
दरम्यान या प्रकारे लोकांना फसवण्यात येत असल्याचे यापूर्वीच जाहिरातींद्वारे डीडी किसान भारती ने लोकांना सावधान केले होते . मात्र हि घटना २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०१५ दरम्यान घडली .
पुणे :
खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष, रामदास आठवले यांचा रिपाई (ए), कपिल पाटील यांचा लोकभारती, विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती यांच्यासह 16 पक्षांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे, परंतु यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष नसून त्याची मान्यता रद्द झालेली नाही, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविण्यासाठी आयोगाकडे नोंदणी करणे राजकीय पक्ष आणि आघाड्यांना बंधनकारक आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे मोठ्या-लहान असे राजकीय पक्ष आणि आघाड्या अशा 300 पक्षांची नोंदणी आहे. त्यापैकी सन 2005 मध्ये नोंदणी केलेल्या राजकीय पक्षांचा आयोगाने आढावा घेतला आणि 16 पक्षांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे, परंतु यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष नसून त्याची मान्यता रद्द झालेली नाही, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी दिली.
माध्यमांकडून विचारणा झाल्यामुळे हा खुलासा पक्षाच्या वतीने प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी केला आहे.
सन 2005 मध्ये नोंदणी केलेल्या राजकीय पक्षांचा आयोगाने आढावा घेतला असता, नोंदणीकृत राजकीय पक्षांनी दरवर्षी द्यावयाचे वार्षिक लेखापरीक्षित लेख्याची व आयकर विवरणाची (रिटर्न) प्रत राज्य निवडणूक आयोगास सादरच केली नसल्याचे आढळून आले होते. त्याप्रकरणात आयोगाने जुलैमध्ये 19 पक्ष- आघाड्यांंविरोधात कारवाईचा बडगा उगारत मान्यता का रद्द करू नये, अशा नोटीसा बजावल्या होत्या. त्यानुसार या पक्षांनी आयोगाच्या नोटीसाला उतर दिले. मात्र त्यातून आयोगाचे समाधान झाले नाही किंवा काही पक्षांनी माहितीच दिलेली नाही अशा 16 पक्षांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यामध्ये खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष, रामदास आठवले यांचा रिपाई (ए), कपिल पाटील यांचा लोकभारती, विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती यांच्यासह ऑल इंडिया क्रांतीकारी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष, इंडियन मुस्लिम काँग्रेस पार्टी, मागासवर्गीय जनशक्ती पार्टी, राष्ट्रवादी जनता पार्टी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, सत्यशोधक समाज पक्ष, शिवराज्य पक्ष, रिपाई (डेमोक्रॅटिक), महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष (खोरीपा), जनशक्ती आघाडी पेण यांचा समावेश आहे.
पुणे, दि. 30 : वाकड येथे वीजमीटरमध्ये फेरफार करून 40 हजार 500 युनिटस्च्या 8 लाख 56 हजार 160
रुपयांची वीजचोरी झाल्याप्रकरणी रास्तापेठ येथील महावितरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की सांगवी उपविभाग अंतर्गत वाकड येथील महावितरणचे वाणिज्यिक
वीजग्राहक अनिल सुदाम भूमकर यांचे नावे असलेल्या वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी होत असल्याचे
नियमित तपासणीत निदर्शनात आले. या ठिकाणी तब्बल 40 हजार 500 युनिटस्च्या 8 लाख 56 हजार 160
रुपयांची वीजचोरी झाल्याचे आढळून आले. या चोरीच्या विजेचा वापर हॉटेल सिल्व्हर स्पूनसाठी करण्यात येत
असल्याचे दिसून आले. वीजचोरीचा पंचनामा करून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिल
सुदाम भूमकर याचेविरुद्ध शनिवारी (दि. 26) रास्तापेठ महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा
कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे- इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन अर्थात इम्पा या संघटनेवर टी. पी आगरवाल यांनी आपले वर्चस्व अबाधितपणे कायम राखले आहे . ख्यातनाम निर्माते के . सी बोकाडिया यांच्या गटाचा त्यांनी धुव्वा उडवीत १९ जागा जिंकल्या तर अवघ्या ४ जागांवर बोकाडिया गटाला आपले स्थान राखता आले . त्यांच्या गटातील महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर या २ मातब्बर मराठी निर्माते आणि अभिनेत्यांना आपली छोट्या आणि मोठ्या पडद्यावरची झप्पी येथे उपयोगी ठरली नाही या दोघांचा येथे पराभव झाला . तर आगरवाल गटातील विजय पाटकर या अभिनेता असलेल्या आणि मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षांना हि पराभव चाखावा लागला .
कॉंग्रेस(आय) पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष असलेले , पुण्यातील निर्माते विकास पाटील हे आगरवाल गटातून तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत , ‘भिंगरी ‘ अभिनेत्री -निर्माती सुषमा शिरोमणी आणि बाळासाहेब गोरे हे देखील विजयी झाले . पराभूताममध्ये केतन देसाई , कुकू कोहली , विजय कुमार सिंह यांचा समावेश आहे
निकाल पुढीलप्रमाणे –
मेन प्राईम विभाग –
विजयी उमेदवार
विकास पाटील , टी. पी आगरवाल , अभय सिन्हा, मनोज चतुर्वेदी , बाळासाहेब गोरे , बॉबी बेदी , विनोद छाब्रा , जे नीलम , अशोक पंडित,निशांत उज्वल, जयप्रकाश शा, जितेन पुरोहित,हरेश पटेल, नितीन मावाणी, राजू भट्ट ,रमेश मीर
असोसिएट विभाग –
विजयी उमेदवार-
सुषमा शिरोमणी , के सी बोकाडिया, , मेहुल कुमार , रिकू राकेशनाथ , महेंद्र धारिवाल
टी.व्ही विभाग –
विजयी उमेदवार-
बाबुभाई थिबा , राहुल आगरवाल
मुंबई : महाराष्ट्रात चित्रपट किंवा लघुचित्रपट निर्मिती करु इच्छिणाऱ्यांना एका दिवसात परवानगी मिळणार आहे. त्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
बॉम्बे एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय टुरिझम मार्ट’ च्या वतीने ‘शूट इन महाराष्ट्रा’ चर्चासत्रात श्री. तावडे बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकेश भट, रमेश सिप्पी, यशराज फिल्मचे आशिष सिंग, श्रीमती कांचन अधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले, चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या एकत्रितरीत्या मिळाव्या, यासाठी चित्रनगरी महामंडळाला नोडल एजन्सी म्हणून नेमण्यात येणार आहे. चित्रपटनगरीला चित्रपट निर्मिती केंद्रासोबतच पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. चित्रपटनगरी आणि बॉलिवूड म्युझियम हे पी.पी.पी. तत्वावर एकत्रितरित्या विकसित करण्यात येणार आहेत. याबाबतचा विकास आराखडा ही तयार करण्यात आला आहे. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात जगाची राजधानी बनण्याचे सामर्थ्य मुंबईमध्ये असून निर्मात्यांनी चित्रपट निर्मितीसाठी महाराष्ट्रालाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी उत्कृष्ट ठिकाणाची यादी लवकरच तयार करण्यात येणार असून त्याबद्दलची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येईल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच महाराष्ट्र शासन व टोरांटो फिल्म कमिशन यांच्यादरम्यान स्वाक्षरी करार (एम.ओ.यु.) करण्यात येणार असल्याचे श्रीमती नायर- सिंह यांनी सांगितले.
मुकेश भट, रमेश सिप्पी, आशिष सिंग, श्रीमती कांचन अधिकारी यांनीही मनोगत व्यक्त केले.